Sunday, September 13, 2026
Homeक्रीडाश्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम एस एस सी  स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत जल्लोषात...

श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम एस एस सी  स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत जल्लोषात यश!

फलटण प्रतिनिधी :- 13 व 14 ऑक्टोबर 2025 रोजी मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल, एस.एस.सी., जाधववाडी, फलटण येथील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. विविध स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवत, विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

🏅 विजयी विद्यार्थी – मुले :

  1. कबी खान – भालाफेक (प्रथम क्रमांक, 19 वर्ष), थाळीफेक (द्वितीय क्रमांक)
  2. अमन निकाळजे – थाळीफेक (प्रथम क्रमांक, 19 वर्ष)
  3. श्रेयश भोसले – भालाफेक (प्रथम क्रमांक, 17 वर्ष), गोळाफेक व थाळीफेक (तृतीय क्रमांक)
  4. श्रेयश ढेकळे – भालाफेक व 800 मी. धावणे (द्वितीय क्रमांक, 17 वर्ष)
  5. प्रणय जगताप – 100 मी. धावणे (द्वितीय क्रमांक, 17 वर्ष)
  6. मधुसूदन जाधव – थाळीफेक (तृतीय क्रमांक, 14 वर्ष)

🏅 विजयी विद्यार्थिनी – मुली :

  • 4×100 मी. रिले – प्रथम क्रमांक
    • श्रेया पवार, अनुष्का नाईक निंबाळकर, श्रावणी पिंगळे, मनस्वी गायकवाड, तनिष्का भगत
  • स्मिता माने – थाळीफेक (प्रथम क्रमांक, 19 वर्ष), गोळाफेक (द्वितीय क्रमांक)
  • श्रावणी पिंगळे – गोळाफेक (तृतीय क्रमांक, 14 वर्ष)

या गौरवप्राप्त यशाबद्दल मा. श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर (माजी सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद), चेअरमन श्री. रघुनाथराजे निंबाळकर, सचिव श्री. संजीवराजे निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, फलटण क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, प्राचार्या प्रा. अंजुम शेख, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

या यशात प्रा. अंजुम शेख, सुहास कदम सर, परविन मुलाणी मॅडम आणि इतर शिक्षकवर्ग व पालकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीचे महत्त्वाचे योगदान आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments