Sunday, September 13, 2026
Homeसाताराप्रभाग ३ मध्ये शिवसेना उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद; श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा...

प्रभाग ३ मध्ये शिवसेना उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद; श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास

फलटण प्रतिनिधी  : शहरातील विकासाला नवे दिशा देणारे आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीला प्रभाग क्रमांक ३ मधून जोरदार पाठिंबा मिळत आहे. राजे गटाचे युवा कार्यकर्ते शक्ती भोसले यांनी प्रभागातील प्रचारसभा घेत नागरिकांना शिवसेना उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले.

प्रभाग ३ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या पूनम सुनील भोसले आणि सुषमा हेमंत ननावरे यांच्या प्रचारार्थ बोलताना शक्ती भोसले म्हणाले की, “श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुरक्षा, विकास आणि सुव्यवस्थेला नवी गती मिळेल.”

ते पुढे म्हणाले की, “नगराध्यक्षपदासाठी श्रीमंत अनिकेतराजे यांना तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणाऱ्या सर्व शिवसेना उमेदवारांना नागरिकांनी भरघोस मतांनी विजयी करून आणावे.”

श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वामुळे प्रभाग ३ चा सर्वांगीण विकास वेगाने होईल, असा ठाम विश्वास शक्ती भोसले यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments