
शत्रुघ्न सिन्हा यांनी मानले चाहत्यांचे आभार!
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतेच एक्स ट्विटरवर मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि जावई झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी एक खास संदेशही लिहिला आहे. आपल्या आपुलकीने, प्रेमाने आणि शुभेच्छांनी शतकातील सर्वात खास ‘लग्न’ बनवल्याबद्दल आणि आमच्यासोबत कृतज्ञतेच्या भावनेने हा दिवस साजरा केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो, असे त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे. ‘आमची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बालसोबत तिच्या आयुष्याच्या सुंदर प्रवासात एक नवा अध्याय सुरू केला आहे’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.








