
एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार म्हणाले की, जालन्यात आंदोलकांवर प्रखर लाठीहल्ला केला. खरं म्हणजे एकदा चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची काहीही गरज नव्हती. मात्र, हल्ली अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कुठलेही प्रश्न असले आणि ते उत्तर न मिळाल्याने रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी, असा आरोप शरद पवारांनी केला.








