Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रपाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अकलूज प्रभाग क्रमांक १० मध्ये नागरिकांना मोफत आरओ पाणी जार...

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अकलूज प्रभाग क्रमांक १० मध्ये नागरिकांना मोफत आरओ पाणी जार वाटप; नगरसेविका मनिषाताई तिकोटे व नगरसेवक विलास काका क्षीरसागर उद्योजक मोहन तिकोटे यांच्या  उपक्रम

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अकलूज प्रभाग क्रमांक १० मध्ये नागरिकांना मोफत आरओ पाणी जार वाटप; नगरसेविका मनिषाताई तिकोटे व नगरसेवक विलास काका क्षीरसागर उद्योजक मोहन तिकोटे यांच्या  उपक्रम

अकलूज | प्रतिनिधी

सध्या निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये नगरसेविका सौ. मनिषाताई मोहन तिकोटे, नगरसेवक विलास काका क्षीरसागर तसेच सामाजिक कार्यकर्ते व अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्था उद्योजक मोहन तिकोटे यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना मोफत आरओ पाणी जार वाटप करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

सध्या पाणीटंचाईमुळे अनेक नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असून, त्यासाठी वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक बांधिलकी जपत नगरसेविका मनिषाताई तिकोटे आणि नगरसेवक विलास काका क्षीरसागर यांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

या उपक्रमातून प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि मोफत आरओ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये आणि पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या सेवाभावी उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी मनापासून स्वागत केले असून, लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून जनतेच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक व्यक्त केले जात आहे. पाणीटंचाईचा काळ संपेपर्यंत ही सेवा सातत्याने सुरू ठेवण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments