
शरद पवार म्हणाले की, गेल्या ५० वर्षापासूनची ही परंपरा आहे.पाडव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक बारामतीमध्ये येतात. यापूर्वी लोक पाडवा म्हणून यायचे आता लोक २ दिवस आधी येतात आणि सांगतात की पाडवा दिवशी गर्दी असते म्हणून आम्ही आधी येतो. मी हजारो लोकांना आज भेटलो आणि सकाळी ७ वाजल्यापासूनभेटत आहे. मराठवाडा, पुणे शहर, मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मधून लोक भेटले, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.






