Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रअकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक १० मध्ये मतदार यादी विशेष पडताळणी मोहीम;...

अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक १० मध्ये मतदार यादी विशेष पडताळणी मोहीम; नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा

🗳️ अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक १० मध्ये मतदार यादी विशेष पडताळणी मोहीम; नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा

अकलूज | प्रतिनिधी

अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक १० मध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत नागरिकांसाठी मतदार नोंदणी व पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ९.०० वाजता बीएलओ (BLO) उपस्थित राहून मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, पत्ता बदल, नवीन नाव समाविष्ट करणे तसेच इतर आवश्यक मतदार फॉर्म भरून घेणार आहेत.

यावेळी प्रभागातील सर्व पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपल्या मतदार नोंदणीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे आणि नगरसेवक विलास (काका) क्षीरसागर यांनी केले आहे.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेनुसार बीएलओ नागरिकांच्या घरी तीन वेळा भेट देणार आहेत. या तीनही भेटींमध्ये संबंधित मतदार घरी उपलब्ध नसल्यास किंवा आवश्यक फॉर्म भरून दिला गेला नाही, तर नियमानुसार संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेऊन वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, त्याचा लाभ घेण्यासाठी मतदार यादीत नाव असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणाचाही मतदानाचा हक्क वंचित राहू नये यासाठी सर्वांनी या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments