Tuesday, September 15, 2026
Homeसाताराश्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

फलटण :- श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त मुधोजी क्लब फलटण, क्लासिकल चेस अकॅडमी फलटण, कोहिनूर चेस क्लब अँड स्पोर्ट्स क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑक्टोबर २०२४ रोजी, अनंत मंगल कार्यालय कोळकी तालुका फलटण येथे भव्य राज्यस्तरीय जलदगती एकदिवसीय बुद्धीबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल आणि तत्काळ प्रथम फेरीस प्रारंभ होईल. या स्पर्धेसाठी चीफ ऑर्बिटर शार्दुल तपासे, डेप्युटी चीफ ऑर्बिटर प्रणव टंगसाळे तर ऑर्बिटर्स म्हणून सारिका साबळे, दिपंकर कांबळे, श्रेयस कांबळे, रोहिणी तुम्मा, रुपेश हागीर, उद्धव पाटील काम पाहणार आहेत.

राज्यस्तरीय जलदगती बुद्धीबळ स्पर्धा आठ वर्षाखालील, ११ वर्षाखालील, १४ वर्षाखालील आणि खुल्या गटात खेळवल्या जातील. प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी रोख रक्कम व पदकांचे बक्षीस असेल. तसेच स्पर्धा आंतरराष्ट्रीय फिडे नियमानुसार स्विस लीग पद्धतीने होईल. वेळ मर्यादा १५ मिनिटे व ५ सेकंद अतिरिक्त वेळ प्रत्येक चालीसाठी दिला जाईल. स्पर्धेसाठी खुल्या गटासाठी ४०० रुपये व वयोगटासाठी ३०० रुपये प्रवेश फी असेल. प्रत्येक विजेत्यांनी आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.

स्पर्धेचे आयोजन नझीर काझी (९८५०८६७५८७), सुरज फडतरे (७३८७३२२७१४), अक्षय पिसाळ (७०३८१४२१३५), संध्याराणी सस्ते (७४९९४२७७०२), अक्षय कांबळे (८६६८८०४२०८), सुजित जाधव (७४४८०५०८२१), तेजस गोरे (८८५५००५२२३५) यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments