Thursday, August 13, 2026
Homeब्लॉगराजतलाक लेणी: ऐतिहासिक अभ्यास दौरा – ८ डिसेंबर २०२४

राजतलाक लेणी: ऐतिहासिक अभ्यास दौरा – ८ डिसेंबर २०२४

फलटण :- राजतलाक लेणींच्या ऐतिहासिक महत्त्वाला उजाळा देण्यासाठी एकदिवसीय अभ्यास दौरा रविवार, ८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्यात ११ लेण्यांचा गट पाहण्याची संधी मिळणार असून, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील बीबी का मकबराच्या मागच्या डोंगरात या लेण्या स्थित आहेत.

मुख्य तपशील

तारीख व वेळ: रविवार, ८ डिसेंबर २०२४, सकाळी १०:०० वाजता

चढाई स्तर: मध्यम स्वरूपाची

प्रारंभ बिंदू: पुरातत्व खात्याच्या तिकीट खिडकीजवळ सकाळी १०:०० वाजता

अभ्यास मार्गदर्शक: प्रख्यात शिल्पकला तज्ज्ञ महेंद्र शेगांवकर, अकोला

सदस्यांसाठी सूचना:

1. तिकीट: प्रत्येकाने पुरातत्व खात्याचे तिकीट स्वतः काढावे.

2. खाद्य व पाण्याची सोय: आपल्या जेवणाचा डबा व किमान २ लिटर पाणी सोबत आणावे. लेण्यांवर कोणतीही जेवणाची सोय उपलब्ध नाही.

3. परतीचा वेळ: सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत दौरा संपुष्टात येईल.

अभ्यास दौरा निःशुल्क:

या अभ्यास दौऱ्याचे कोणतेही शुल्क नाही.

संपर्क:

सिध्दार्थ गायकवाड
+91 80972 75909

गटामध्ये सामील होण्यासाठी:

खालील लिंकवर क्लिक करून अभ्यास दौऱ्याच्या व्हॉट्सअप गटात सामील व्हा:
WhatsApp Group Link

लेण्यांची वैशिष्ट्ये:

११ लेण्यांचा समूह – पहिल्या गटात १-५ लेण्या, दुसऱ्या गटात ६-११ लेण्या.

ऐतिहासिक आणि कलात्मक शिल्पकलेचे समृद्ध दर्शन.

हा अभ्यास दौरा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी एक अनोखी संधी ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments