Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशRajasthan Accidenr News | लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला; ट्रॉलीने...

Rajasthan Accidenr News | लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला; ट्रॉलीने व्हॅनला दिली धडक, 9 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

Rajasthan Accidenr News | लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला; ट्रॉलीने व्हॅनला दिली धडक, 9 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला; ट्रॉलीने व्हॅनला दिली धडक, 9 जणांचा मृत्यू!

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात एका वेगवान ट्रॉलीने व्हॅनला धडक दिली. या अपघातात लग्नातील 9 पाहुण्यांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की व्हॅनच्या पंखांचे चक्काचूर झाले.

गेल्या काही दिवसापासून देशभरात विविध अपघाताच्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे. शुक्रवारी ओडिसामध्ये दुर्देवी घटना घडली होती. ओडिशातील झारसुगुडा येथे महानदीत बोट उलटून (Odisha Boat Capsized) 7 जणांचा मृत्यू झाला. तर शनिवारी राजस्थानमध्ये एक भीषण अपघात झाल्याचं समोर येत आहे. राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात एका वेगवान ट्रॉलीने व्हॅनला धडक दिली. या अपघातात (Rajasthan Accidenr News) 9 जणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

हे सुद्धा वाचा

कुठे घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात भोपाळ मार्गावर हा अपघात झाला आहे. मध्य प्रदेशातील डुंगरी येथे एका लग्न समारंभात सहभागी होऊन दुगरगाव येथील आपल्या घरी परतत असताना काही लोकांच्या मारुती व्हॅनला एका ट्रॉलीने  धडक दिली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, धडकेनंतर व्हॅनचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना याची सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments