Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 67

आपली शाळा बालवर्गाचे वार्षिक स्नेहसंमेलन हर्षोल्हासात संपन्न

0
आपली शाळा बालवर्गाचे वार्षिक स्नेहसंमेलन हर्षोल्हासात संपन्न

आपली शाळा बालवर्गाचे वार्षिक स्नेहसंमेलन हर्षोल्हासात संपन्न

फलटण :प्रगत शिक्षण संस्थेच्या मंगळवार पेठ फलटण येथील ‘आपली शाळा, येथील बालवर्गाचं वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत हर्षोल्हासात, आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाले. सन २०२५–२०२६ या शैक्षणिक वर्षातील या स्नेहसंमेलनात शिशुगट, मधला गट व मोठा गटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, नृत्ये, गाणी, नाट्यछटा व विविध सादरीकरणांतून आपल्या कलागुणांचे मनमोहक दर्शन घडवले.

बालआनंदाचा रंगतदार उत्सव
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर “फ्लावर्स डान्स”, “दादाजी की छडी”, “इवले इवले सुख चिमुकले”, “Wheels on the Bus”, “I Am So Happy”, “बम बम बोले” यांसारख्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रम बालकांच्या निरागस हसण्यात, टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्स्फूर्त आनंदात रंगून गेला.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या स्नेहसंमेलनासाठी प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झिया कुरेशी, संस्थेचे विश्वस्त तथा सचिव व शिक्षण समन्वयक मधुरा राजवंशी, कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले, कमला निंबकर बालभवन (प्राथमिक विभाग) यांच्या मुख्याध्यापिका प्रियदर्शनी सावंत, बालवाडीच्या मुख्याध्यापिका समीरा कुरेशी, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे तसेच मानद सल्लागार व शिक्षक विश्वास जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिक्षकांचे नियोजन, विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठीची संपूर्ण तयारी बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका समीरा कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बालशिक्षिका व साधन व्यक्ती निलोफर शेख, देवकी जगताप, पल्लवी गाडेकर, योगिता काकडे, सुजाता शिंदे यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केली. शिशुगट, मधला गट व मोठा गटातील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन अभिनय, गीते, नृत्य व नाट्य यांची सुयोग्य निवड करण्यात आली होती.
“गगला गगली” नाटिकेला भरभरून दाद
विशेषतः “गगला गगली” या नाटिकेने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. या नाटिकेला उपस्थित मान्यवर, पालक व प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सादर केलेल्या नृत्य-नाट्य व अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली. पालकांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी
यावेळी कमला निंबकर बालभवन येथील बालवाडी प्रमुख व बालशिक्षिका मनीषा जाधव, निशिगंधा झेंडे, अमृता धडंबे, अश्विनी यादव, स्वाती कदम, विना बेंद्रे, नंदिनी लोखंडे, आसमा मणेर, आरती काकडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
स्मरणात राहणारा आनंदोत्सव एकूणच, बालकांच्या निरागस आनंदाने, सर्जनशीलतेने व कलागुणांनी नटलेले हे वार्षिक स्नेहसंमेलन उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा खरा आनंदोत्सव ठरला.

गर्भधारणेत पॅरासिटामॉल सुरक्षितच? सोशल मीडियावरील दावे खरे? जाणून घ्या ‘द लॅन्सेट’मधील महत्त्वाचा अभ्यास

0
गर्भधारणेत पॅरासिटामॉल सुरक्षितच? सोशल मीडियावरील दावे खरे? जाणून घ्या ‘द लॅन्सेट’मधील महत्त्वाचा अभ्यास


Is paracetamol safe during pregnancy: गर्भधारणेदरम्यान वेदना किंवा तापासाठी पॅरासिटामॉलचा वापर केल्यास मुलांमध्ये ऑटिझम, लक्ष-अभाव हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) किंवा बौद्धिक अपंगत्वाचा धोका वाढतो, हा समज योग्य नसल्याचे ‘द लॅन्सेट’मधील एका नव्या आणि व्यापक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जगभरातील उपलब्ध संशोधनांचा सखोल आढावा घेतल्यानंतर संशोधकांनी गर्भवती महिलांना दिलासा देणारा निष्कर्ष मांडला आहे. हा अभ्यास लंडन विद्यापीठातील सिटी सेंट जॉर्ज येथील संशोधकांनी केला असून, आतापर्यंत झालेल्या ४३ स्वतंत्र अभ्यासांचे विश्लेषण करण्यात आले आहे. हे निष्कर्ष द लॅन्सेट ऑब्स्टेट्रिक्स, गायनॉकॉलॉजी अँड वुमेन्स हेल्थ या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. मागील काही वर्षांत पॅरासिटामॉल आणि ऑटिझम यांच्यात संभाव्य संबंध दर्शवणाऱ्या अहवालांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर या संशोधनाने स्पष्टता आणली आहे.

Add Zee News as a Preferred Source

गर्भधारणेदरम्यान सर्वाधिक वापरले जाते पॅरासिटामॉल

पॅरासिटामॉल (एसिटामिनोफेन) हे गर्भधारणेदरम्यान सर्वाधिक वापरले जाणारे वेदनाशामक आणि ताप कमी करणारे औषध आहे. जागतिक पातळीवर ते पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते. नॉन-स्टेरॉइडल अँटी-इन्फ्लेमेटरी औषधे किंवा ओपिओइड्सच्या तुलनेत त्याची सुरक्षितता अधिक असल्याने प्रसूती काळजीमध्ये डॉक्टरांकडून त्याची शिफारस केली जाते.

यापूर्वी मांडलेले दावे  

यापूर्वी पॅरासिटामॉलविरोधात मांडले गेलेले दावे प्रामुख्याने अपूर्ण माहिती, संभाव्य पक्षपात आणि कौटुंबिक घटकांचा पुरेसा विचार न केलेल्या अभ्यासांवर आधारित होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. नव्या अभ्यासात मात्र भावंडांच्या तुलनात्मक विश्लेषणाचा वापर करण्यात आला. एका गर्भधारणेत पॅरासिटामॉल घेतला गेला आणि दुसऱ्यात घेतला गेला नाही, अशा परिस्थितीतील मुलांची तुलना करण्यात आली, ज्यामुळे अनुवंशिकता, कौटुंबिक वातावरण आणि पालकांचे दीर्घकालीन गुणधर्म यांचा प्रभाव अधिक अचूकपणे तपासता आला.

या अभ्यासांमध्ये ऑटिझमसाठी २.६२ लाखांहून अधिक मुले, ADHD साठी ३.३५ लाखांपेक्षा जास्त मुले आणि बौद्धिक अपंगत्वासाठी सुमारे ४.०६ लाख मुलांचा समावेश होता. या सर्व विश्लेषणांतून असे आढळले की गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचा वापर आणि या न्यूरोविकसनात्मक विकारांमध्ये कोणताही थेट संबंध दिसून येत नाही.

या अभ्यासाच्या प्रमुख संशोधक आणि प्रसूती व मातृ-भ्रूण औषधशास्त्राच्या प्राध्यापिका अस्मा खलील यांनी सांगितले की, “आमच्या निष्कर्षांवरून असे सूचित होते की पूर्वी दिसलेले संबंध हे औषधामुळे नसून, ताप, वेदना किंवा आनुवंशिक प्रवृत्ती यांसारख्या इतर मातृ घटकांमुळे असू शकतात.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, मार्गदर्शनानुसार वापरल्यास पॅरासिटामॉल गर्भधारणेत सुरक्षित आहे आणि त्यामुळे गर्भवती महिलांनी अनावश्यक भीती बाळगू नये.

संशोधकांच्या मते, ताप किंवा तीव्र वेदना दुर्लक्षित केल्यास आई आणि गर्भ दोघांसाठीही धोका वाढू शकतो. त्यामुळे आवश्यक असताना पॅरासिटामॉल टाळणे उलट नुकसानकारक ठरू शकते. अभ्यासातील सर्व संशोधनांचे मूल्यमापन QUIPS (Quality in Prognosis Studies) या मान्यताप्राप्त साधनाद्वारे करण्यात आले आहे.

सोशल मीडियावरील दावे खरे? 

एकूणच, सोशल मीडियावरील दावे किंवा राजकीय विधानांपेक्षा वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित वैद्यकीय सल्ल्याला महत्त्व देण्याचे आवाहन या अभ्यासातून करण्यात आले आहे. गर्भधारणेदरम्यान वेदना आणि तापासाठी पॅरासिटामॉल अजूनही सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय असल्याचा ठाम निष्कर्ष संशोधकांनी मांडला आहे.





Source link

स्वस्त कर्ज, 2 कोटींपर्यंतचा मोफत विमा… बोनस नाही तर आणखी काय? सरकारी कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयसुद्धा आनंदी

0
स्वस्त कर्ज, 2 कोटींपर्यंतचा मोफत विमा… बोनस नाही तर आणखी काय? सरकारी कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयसुद्धा आनंदी


Sayali Patil

सायली पाटील या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रांसाठी काम केलं. ‘लोकसत्ता’मधील ‘VIVA’ या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी ‘एबीपी माझा’ च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

…Read More





Source link

फलटणचे खरे पालकमंत्री रणजितदादा निंबाळकरच; सरकार आणि मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी – मंत्री जयकुमार गोरे

0
फलटणचे खरे पालकमंत्री रणजितदादा निंबाळकरच; सरकार आणि मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी – मंत्री जयकुमार गोरे


फलटण, दि. १६ (प्रतिनिधी). फलटणमध्ये कोणीही येऊ द्या, कोणताही पालकमंत्री असू द्या; मात्र फलटणचे खरे पालकमंत्री रणजितदादा निंबाळकरच आहेत. त्यांच्या पाठीशी संपूर्ण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री स्वतः ठामपणे उभे आहेत, असा ठोस दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.
फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीतील दणदणीत यशाबद्दल माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करताना गोरे बोलत होते. फलटण येथील सजाई गार्डनमध्ये आयोजित विजयी मेळाव्यात त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
गोरे म्हणाले, “पूर्वी मी फलटणला आलो की काही लोक ‘वरचा आलाय, खालचा आलाय’ अशी हेटाळणी करायचे. मात्र काळ बदलला आहे. आज फलटणच्या प्रथम नागरिकांनीच माझे स्वागत केले आहे.” फलटणमधील राजकीय परिवर्तनाची सुरुवात आमदार सचिन पाटील यांच्या विजयाने झाली आणि नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर यांनी नगरपालिकेवर विजयाचा झेंडा फडकवून त्यावर शिक्कामोर्तब केले, असे त्यांनी स्पष्ट केले. फलटण नगरपालिकेतील पराभव म्हणजे विरोधकांच्या राजकीय अस्तित्वाचा शेवट असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
विरोधकांवर टीका करताना गोरे पुढे म्हणाले, “फलटणमधील पराभवाची धास्ती घेत जिल्ह्यातील काही नेते गेल्या काही दिवसांपासून आघाडी करण्याचे केविलवाणे प्रयत्न करत आहेत. राज्यातील महानगरपालिकांचे निकाल पाहिल्यानंतर असे धाडस कोणी करणार नाही. फलटणच्या राजकीय परिवर्तनाचे पहिले दोन टप्पे आपण पाहिले असून, येणारी निवडणूक हा परिवर्तनाचा अंतिम टप्पा ठरेल.”
ते पुढे म्हणाले, “लबाड बोलून बोलून विरोधकांची दाढी पांढरी झाली आहे. चौधरवाडी शाळेच्या इमारतीसाठी रणजितसिंह निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या कामासाठी निधी आम्ही उपलब्ध करून दिला. लबाडीच्या पायावर उभे असलेले राजकारण फार काळ टिकत नाही.”
राजकीय रूपकाचा वापर करत गोरे म्हणाले, “जंगलात वाघ येतो तेव्हा लांडगे अस्तित्वासाठी कळप करतात. उद्या कोणीही आघाडी करा, कोणी कुठेही जाऊ द्या; संघटन मात्र अधिक मजबूत होत जाते. सुकाळ आला की इच्छुकांची संख्या वाढते.”
या कार्यक्रमाला माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, बापूराव शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती (फलटण) २०२६ च्या अध्यक्षपदी हरीश (आप्पा) काकडे यांची एकमताने निवड

0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती (फलटण) २०२६ च्या अध्यक्षपदी हरीश (आप्पा) काकडे यांची एकमताने निवड

फलटण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण (२०२६) च्या अध्यक्षपदी हरीश (आप्पा) काकडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फलटण शहरात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात, शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात साजरा केला जातो. या महोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम तसेच युवकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभावी प्रसार केला जातो.
नूतन अध्यक्ष हरीश (आप्पा) काकडे यांच्या नेतृत्वाखाली २०२६ सालचा जयंती महोत्सव अधिक व्यापक, सर्वसमावेशक व प्रेरणादायी स्वरूपात साजरा होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव व उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या जोरावर हा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडेल, अशी अपेक्षा फलटणकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

१६ जानेवारी – छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन : शौर्य, विद्वत्ता आणि स्वराज्यनिष्ठेचा तेजस्वी अध्याय

0
१६ जानेवारी – छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन : शौर्य, विद्वत्ता आणि स्वराज्यनिष्ठेचा तेजस्वी अध्याय


साहस Times :-  १६ जानेवारी हा दिवस मराठा साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत गौरवशाली मानला जातो. या दिवशी, इ.स. १६८१ साली रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा विधीवत राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेक दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर येथे झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असून, शौर्य, साहस, बुद्धिमत्ता आणि विद्वत्तेचे प्रतीक होते. संस्कृतसह १३ भाषांचे ज्ञान असलेले संभाजी महाराज उत्कृष्ट राजकारणी, कुशल सेनानी आणि प्रतिभावंत साहित्यिक होते.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत संभाजी महाराज राजकारणात व रणांगणात पूर्णतः परिपक्व झाले होते. मात्र दरबारी कारस्थानांमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कोकणातील शृंगारपूरची सुभेदारी, धर्मकार्यातील योगदान, संत-महात्म्यांप्रती असलेली निष्ठा आणि सक्तीच्या धर्मांतराविरोधातील ठाम भूमिका यातून त्यांचा कणखर स्वभाव दिसून येतो.
३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. या कठीण काळात, अनेक अडथळे पार करत संभाजी महाराजांनी २० जुलै १६८० रोजी सत्ता हाती घेतली. अखेर १६ जानेवारी १६८१ रोजी रायगडावर त्यांचा विधीवत राज्याभिषेक पार पडला आणि ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती बनले.
राज्याभिषेकानंतर त्यांनी अष्टप्रधान मंडळाची पुनर्रचना केली, कैद्यांना मुक्त केले आणि स्वराज्याची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच चालू राहील, अशी हमी जनतेला दिली. त्यांच्या नावाची नाणी पाडण्यात आली तसेच स्वतंत्र राजमुद्राही वापरण्यात आली.
राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसांतच संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर धडक मोहीम राबवून प्रचंड संपत्ती हस्तगत केली. या घटनेमुळे औरंगजेब संतप्त झाला आणि त्याने स्वतः मराठ्यांविरुद्ध मोहीम उघडली. अफाट मोगली सैन्याशी सामना करताना संभाजी महाराजांनी असामान्य धैर्य, युद्धकौशल्य आणि नेतृत्वगुण दाखवले. पोर्तुगीज, सिद्दी, म्हैसूरचा राजा यांसारख्या शत्रूंनाही त्यांनी रोखले.
संभाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धेच नव्हे तर उत्तम साहित्यिकही होते. बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख आणि सातसतक हे ग्रंथ त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १२० लढाया केल्या असून, एकाही लढाईत ते पराभूत झाले नाहीत.
असा हा पराक्रम, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा तेजस्वी अध्याय असलेला १६ जानेवारी – छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन मराठा इतिहासात सदैव गौरवाने स्मरणात राहील. या पावन दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार अभिवादन.

एन. रघुरामन यांचा कॉलम: 2026 मध्ये कामाच्या ठिकाणी या 10 बदलांची अपेक्षा आहे

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  2026 मध्ये कामाच्या ठिकाणी या 10 बदलांची अपेक्षा आहे




फंडा असा आहे की, २०२६ हे वर्ष कामाच्या ठिकाणी अधिक आव्हानात्मक असणार आहे, कारण आपण एआयच्या जगात पाऊल ठेवत आहोत. जे लोक हे बदल स्वीकारतील, तेच पदोन्नतीच्या शर्यतीत पुढे राहतील.
केंद्रीय कामगार मंत्रालयाने गिग वर्कर्सच्या सुरक्षेला प्राधान्य देत “१० मिनिटांत डिलिव्हरी’ प्रथा रोखण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच २०२६ मध्ये कामाच्या ठिकाणी अनेक बदल पाहायला मिळू शकतात. हे वर्ष ऑटोमेशन, एआय एजंट्सचा व्यापक वापर आणि औद्योगिक विवादांनी प्रभावित असेल असे मानले जात आहे. हे बदल नेमके कसे असतील? तर याची पहिली चाचणी तुमच्या प्रामाणिकपणावर होणार आहे.
१. मी हे एका कंपनीच्या अंतर्गत परिपत्रकावरून स्पष्ट करतो. कंपनीच्या प्रमुखांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग दिवसातून किमान २० मिनिटे पाहावे अशी माझी इच्छा आहे. गरज पडल्यास एका व्यक्तीला २४x७ देखरेखीसाठी ठेवा.’ याचा अर्थ असा की, जेव्हा कुणी पाहत नसते तेव्हा तुम्ही काय करता? आपल्या मूळ मूल्यांशी बांधील राहणे आता अनिवार्य होईल.
२. एआय आता अर्धा कर्मचारी बनत आहे. व्यवसाय आता माणसांप्रमाणेच एआयला प्रशिक्षण देण्यास तयार आहेत. कंपन्या तयार सिस्टिम खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या गरजेनुसार ‘टेलर-मेड’ एआय सिस्टिम विकसित करण्यावर भर देत आहेत.
३. जर तुम्ही लीडर असाल, तर तुम्हाला चॅटजीपीटीपेक्षा चांगले व्हावे लागेल. एआयने कमालीची पारदर्शकता आणली आहे. उत्पादन विभागात काम करणाऱ्यांनाही आता ग्राहकांच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. ग्राहकांना चॅटजीपीटीपेक्षा अधिक अचूक आणि मानवी उत्तरे हवी आहेत.
४. आता सीव्हीच जुने झाले नाहीत, तर पदव्या आणि पदांचा प्रभावही कमी होत आहे. कंपन्यांना त्यांचे लीडर्स ‘इन्फ्लुएन्सर’ असावेत असे वाटते. जर तुम्ही तुमच्या व्यावसायिक कौशल्याने इतरांवर प्रभाव टाकू शकत नसाल, तर तुम्ही स्पर्धेबाहेर फेकले जाल.
५. नवीन कर्मचारी आता ‘टेस्टर इंटर्नशिप’ शोधत आहेत. पदवीधर विद्यार्थी प्रथम सहा आठवडे वेगवेगळ्या क्षेत्रांत इंटर्नशिप करून अनुभव घेतील आणि मगच करिअर ठरवतील. दुसरीकडे, नियोक्ता पूर्णवेळ नोकरीच्या खर्चाशिवाय सखोल तज्ज्ञता असलेल्या ‘कॉन्ट्रॅक्ट’ आधारित टॅलेंटच्या शोधात आहेत.
६. कंपन्या आता तुम्हाला नाही, तर तुमची वृत्ती (Attitude), चारित्र्य आणि कंपनीच्या संस्कृतीत मिसळण्याची तुमची क्षमता पाहून एखाद्याची नियुक्ती करत आहेत. कौशल्ये शिकवता येतात, पण स्वभाव नाही, हे आता कंपन्यांना उमजले आहे.
७. ‘ब्ल्यू कॉलर’ मुले पुन्हा जोमाने परतताना दिसत आहेत. कुशल कामगार आता कोडिंग इंजिनिअर्सपेक्षा जास्त कमावत आहेत आणि ते कर्जमुक्त आयुष्य जगत आहेत. गेल्या वर्षापर्यंत ज्या नोकऱ्या खालच्या दर्जाच्या मानल्या जात होत्या, त्या आता पहिली पसंती बनत आहेत.
८. कर्मचारी आता मीटिंगमध्ये केवळ स्वतःचे मत मांडणार नाहीत, तर ते त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे संदर्भ घेऊन येतील. बोर्डरूममध्ये आता व्यवसायाचा मूळ हेतू आणि मूल्यांवर आधारित चर्चांना अधिक महत्त्व दिले जाईल.
९. नियोक्ते अशा कर्मचाऱ्यांना अधिक पसंती देतील जे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आपले काम अधिक सुलभ आणि वेगवान करू शकतात.
१०. ‘ऑर्केस्ट्रेटर’: नियोक्ते अशा लीडर्सना पसंत करतील जे केवळ कामाच्या अंमलबजावणीपेक्षा समन्वयावर अधिक भर देतील. त्यांच्यासाठी ‘ऑर्केस्ट्रेटर’ हे नवीन जॉब टायटल असेल.



Source link

29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर…

0


Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: राज्यातल्या 29 महापालिकांसाठी काल मतदान झाल्यावर आज सर्वत्र मतमोजणी सुरु असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 52.94 टक्के,  ठाणे मनपात 56 टक्के, पुणे मनपात 52 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 58 टक्के, नवी मुंबईत 57 टक्के, नाशिक मनपात 57 टक्के मतदान झालंय. परभणीत 66 टक्के, जालन्यात 61 टक्के मतदान झालंय. त्यामुळे 29 महापालिकेत कोणाची सत्ता, कोणाचा महापौर होणार?, हे जाणून घ्या…(Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026)

कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता? Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026-

क्रमांकमहापालिकेचं नावकोणाची सत्ता?
1बृहन्मुंबई- एकूण जागा- 227 
2भिवंडी-निजामपूर- एकूण जागा- 90 
3नागपूर – एकूण जागा-151 
4पुणे – एकूण जागा-162 
5ठाणे – एकूण जागा-131 
6अहमदनगर – एकूण जागा-68 
7नाशिक – एकूण जागा-122 
8पिंपरी-चिंचवड – एकूण जागा-128 
9छत्रपती संभाजीनगर – एकूण जागा-113 
10वसई-विरार – एकूण जागा-115 
11कल्याण-डोंबिवली – एकूण जागा-122 
12नवी मुंबई – एकूण जागा-111 
13अकोला – एकूण जागा-80 
14अमरावती – एकूण जागा-87 
15लातूर – एकूण जागा-70काँग्रेस-वंचित
16नांदेड-वाघाळा – एकूण जागा-81 
17मीरा-भाईंदर – एकूण जागा-96 
18उल्हासनगर – एकूण जागा-78 
19चंद्रपूर – एकूण जागा-66 
20धुळे – एकूण जागा-74 
21जळगाव – एकूण जागा-75 
22मालेगाव – एकूण जागा-84 
23कोल्हापूर – एकूण जागा-92 
24सांगली-मिरज-कुपवाड – एकूण जागा-78 
25सोलापूर – एकूण जागा-113 
26इचलकरंजी – एकूण जागा-76 
27जालना – एकूण जागा-65 
28पनवेल – एकूण जागा-78 
29परभणी – एकूण जागा-65 

महापालिका निवडणुकांच्या निकालाचे सर्व अपडेट्स, VIDEO:

आणखी वाचा



Source link

साताऱ्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल; शंभूराज देसाईंच्या घरी राजकीय हालचालींना वेग

0
साताऱ्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल; शंभूराज देसाईंच्या घरी राजकीय हालचालींना वेग

सातारा प्रतिनिधी :- राज्यभरात आज 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून त्याचा निकाल उद्या 16 जानेवारीला जाहीर होणार आहे. त्यानंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून रणनीती आखली जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात समन्वयाची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याचे समजते.
या बैठकीला माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच अजित पवार गटाचे खासदार नितीन काका पाटील उपस्थित होते. बैठकीबाबत विचारणा केली असता रामराजे नाईक निंबाळकर यांनी, “पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नवीन घरी चहा घेण्यासाठी आलो होतो,” असे सांगत कोणतीही राजकीय भूमिका नाकारली. “चहा चांगला होता,” असे मिश्कील उत्तर देत त्यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या निवडणुका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यात होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 16 ते 21 जानेवारी दरम्यान असणार आहे.

महायुतीत सन्मान नसेल तर स्वबळावर निवडणूक; शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत

0
महायुतीत सन्मान नसेल तर स्वबळावर निवडणूक; शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत


सातारा प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांनी शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसैनिकांना योग्य सन्मान द्यावा, अशी ठाम भूमिका पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली. आत्मसन्मान राखला गेला आणि जागावाटपाच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या, तर महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा विचार होईल. मात्र सन्मान नसेल, तर शिवसेना स्वबळावर किंवा इतर पर्यायांचा विचार करेल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देसाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार महेश शिंदे, संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, नगराध्यक्ष राजेंद्र यादव, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोर गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख रेशमाताई जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
देसाई म्हणाले की, महायुतीतील घटक पक्ष म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील जागावाटपात शिवसेनेला प्राधान्य मिळाले पाहिजे. तिन्ही घटक पक्षांनी सन्मानाची वागणूक दिली तरच एकत्र निवडणूक लढवली जाईल. अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल. जागावाटपासाठी आमचे सर्व चर्चेचे पर्याय खुले असून, जो समविचाराने चर्चा करेल, त्याच्याशी राजकीय समीकरणांचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालिका निवडणुकीप्रमाणे जर यावेळी महायुती झाली नाही, तर शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. कराड पालिकेप्रमाणे पूर्ण ताकदीने आणि आपल्या पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. फलटण पालिकेत काही अंदाज चुकल्याने अपयश आल्याचे त्यांनी मान्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा भाजपकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष निरीक्षक नेमून अहवाल घेतले जाणार असून, पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय इच्छुकांची माहिती गोळा करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.