Thursday, August 6, 2026
Home Blog Page 621

Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे यांच्याविरोधातील वक्तव्य अंगलट, मनोज जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल!

0
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे यांच्याविरोधातील वक्तव्य अंगलट, मनोज जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल!


नुकतेच वकील सदावर्ते यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या जरांगे पाटलांना खडेबोल सुनावले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केले तर, त्याची गय केली जाणार नाही. तुमच्या बापाचे रस्ते आहेत का? शेतीला शेत असल्यास वाट द्यावी लागते. जरांगे तुझे काय शिक्षण आहे? जरांगे असो किंवा धस. मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. एखाद्या मृत व्यक्तीच्या नावाखाली राजकारण करत आहेत’,असेही ते म्हणाले. याशिवाय, ‘संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस कायदा करावा, या मागणीसाठी राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे’, अशीही माहिती सदावर्ते यांनी दिली.



Source link

दिल्लीहून 200 प्रवाशांसह रात्री 10 निघालेले विमान पुण्याला पोहोचलं सकाळी 10 वाजता, 7 तासात नेमकं काय झालं?

0
दिल्लीहून 200 प्रवाशांसह रात्री 10 निघालेले विमान पुण्याला पोहोचलं सकाळी 10 वाजता, 7 तासात नेमकं काय झालं?



दिल्ली ते पुणे विमान प्रवास हा अवघ्या दोन तासांचा आहे, पण एअर इंडियाचं 200 प्रवाशी असलेल्या या विमानाला तब्बल 12 तास लागले. नेमकं झालं तरी काय पाहूयात. 



Source link

Viral News: प्रेयसीला भेटायला गेला, भरबाजारात करु लागला अश्लील चाळे, गावकऱ्यांनी चोप-चोप चोपलं!

0
Viral News: प्रेयसीला भेटायला गेला, भरबाजारात करु लागला अश्लील चाळे, गावकऱ्यांनी चोप-चोप चोपलं!


Uttar Pradesh Viral News: उत्तर प्रदेशच्या मऊ येथे प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी चोप दिल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रेयसीला भेटण्यासाठी संबंधित तरूण प्रेयसीला भेटण्यासाठी बाजारात गेला आणि तिथेच तिच्यासोबत अश्लील कृत्य करू लागला. प्रेमीयुगुलांच्या अशा कृत्यामुळे बाजारात आलेल्या लोकांना विशेषत: महिलांना लज्जा उत्पन्न झाली. तसेच प्रेयसीच्या गावकऱ्यांचा त्यांच्यातील प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी तरुणाला पकडून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच परिसरात वाद पेटू नये म्हणून दक्षता वाढविण्यात आली आहे.



Source link

एका दिवसाचा पगार 48 कोटी! भारतीय बनला सर्वात जास्त पगार घेणारा जगातील एकमेव व्यक्ती

0
एका दिवसाचा पगार 48 कोटी! भारतीय बनला सर्वात जास्त पगार घेणारा जगातील एकमेव व्यक्ती


पुढील
बातमी

1,76,06,66,339… रेल्वेची धनलक्ष्मी! भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी ट्रेन





Source link

पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केलं तर…; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल

0
पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केलं तर…; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल


Gunratan Sadavarte News: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पुन्हा त्रास झाल्यास मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा थेट इशारा दिला. यावर वकील कील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पावशेर दारू पिऊन जर कोणी धनजय मुंडे यांना अपमानित करण्याचे धाडस दाखवत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा पलटवार सदावर्ते यांनी केला.



Source link

Mumbai: विद्यार्थिनी वर्गात येताच तिला मिठी मारली आणि…; मुंबईतील शाळेत संतापजनक प्रकार, शिक्षकाला अटक

0
Mumbai: विद्यार्थिनी वर्गात येताच तिला मिठी मारली आणि…; मुंबईतील शाळेत संतापजनक प्रकार, शिक्षकाला अटक


Mumbai News: मुंबई येथील भोईवाडा पोलिसांच्या हद्दीतील एका शाळेत संतापजनक घटना घडली. शिक्षकाने वर्गाचा दरवाजा बंद करून अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली. ही घटना गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.



Source link

1,76,06,66,339… रेल्वेची धनलक्ष्मी! भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी ट्रेन

0
1,76,06,66,339… रेल्वेची धनलक्ष्मी! भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी ट्रेन


Indian Railway Highest Earning Train:  रेल्वे हे भारतातील सर्वात सुलद, जलद आणि स्वत, सर्वांना परवडणारे वाहतूकीचे प्रमुख माध्यम आहे. भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशता पसरले आहे. काश्मिर पासून कन्याकुमीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे धावते. दैनंदिन लाखो प्रवासी भारतील रेल्वेने प्रवास करतात. देशभरात दैंनदिन हजारो ट्रेन धावतात.  भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी ट्रेन कोणती आहे ते माहित आहे. ही ट्रेन भरादतीय रेल्वेची धनलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. या ट्रेनेची वर्षभराची कमाई 1,76,06,66,339 इतकी आहे. जाणून घेऊया ही ट्रेन कोणती. 

शताब्दी एक्स्प्रेस ही भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रेन. तर भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेली वंदे भारत ट्रेन देखील चांगलीच चर्चेत आहे. या ट्रेन जितक्या लोकप्रिय आहेत तितक्या या ट्रेन कमाई करत नाहीत. भारतीतील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ट्रेनच्या या यादीत शताब्दी एक्स्प्रेस वंदे भारत या ट्रेन स्थान मिळवू शकलेल्या नाहीत. 

बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस ही भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी टट्रेन आहे. 22692 या क्रमांकाची बंगलोर राजधानी एक्सप्रेस ट्रेन ही हजरत निजामुद्दीन ते KSR बेंगळुरू असा प्रवास करते. 2022-23 या आर्थिक वर्षात जवळपास 509510 प्रवाशांची या या ट्रेनने प्रवास केला. या एका ट्रेनने रेल्वेला वर्षभरात 1,76,06,66,339 इतके उत्पन्न मिळवून दिले आहे. 

सियालदह राजधानी एक्सप्रेस ही ट्रेन सर्वाधिक कमाई करणाऱ्या रेल्वेच्या यादीत दुसऱ्य स्थानावर आहे. ही ट्रेन पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली या मार्गावर प्रवास करते. 12314 या क्रमांकाची   सियालदह राजधानी एक्स्प्रेसने 2022-23 या वर्षात 5,09,164 प्रवाशांनी प्रवास केला.  या ट्रेनची वर्षाची कमाई 1,28,81,69,274 इतकी आहे.  नवी दिल्ली ते दिब्रुगड दरम्यान धावणारी दिब्रुगडची राजधानी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या ट्रेनने गेल्या वर्षी 4,74,605 प्रवाशांनी प्रवास केला. या ट्रेनची 1,26,29,09,697 रुपयांची कमाई झाली. 

नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणारी मुंबई राजधानी एक्सप्रेस ही सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 ट्रेनच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. ट्रेन क्रमांक 12952 मुंबई राजधानी एक्स्प्रेसने 2022-23 या वर्षात 4,85, 794 प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामुळे रेल्वेच्या खात्यात 1,22,84,51,554 इतकी कमाई केली आहे. 

 





Source link

OYO New Rule : आता अविवाहित जोडप्याला No Entry! कंपनीच्या चेकःइन पॉलिसीमध्ये मोठे बदल

0
OYO New Rule : आता अविवाहित जोडप्याला No Entry! कंपनीच्या चेकःइन पॉलिसीमध्ये मोठे बदल


OYO Rooms New Rule: सुट्ट्यांना जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण OYO ने आपल्या चेक-इन रुमच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ओयोच्या नव्या नियमानुसार अविवाहीत जोडप्यांना चेक इन करण्यास परवानगी नाही. 

बदलले नियम काय? 

Oyo ने भागीदार हॉटेल्ससाठी नवीन चेक-इन पॉलिसी सुरू केली आहे. नवीन धोरणानुसार, आता अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलच्या रूममध्ये चेक-इन करण्याची परवानगी मिळणार नाही. कंपनीने त्याची सुरुवात मेरठपासून केली आहे. Oyo ने भागीदार हॉटेल्ससाठी नवीन ‘चेक-इन’ धोरण लागू केले आहे, ज्याची सुरुवात मेरठपासून झाली आहे.

अविवाहित जोडप्यांना प्रवेश बंद

नवीन धोरणानुसार अविवाहित जोडप्यांना यापुढे ‘चेक-इन’ करण्याची परवानगी मिळणार नाही. म्हणजे हॉटेलमध्ये फक्त पती-पत्नीच रूम घेऊ शकतील. सुधारित धोरणानुसार, सर्व जोडप्यांना ‘चेक-इन’च्या वेळी त्यांच्या नात्याचा वैध पुरावा देण्यास सांगितले जाईल. यामध्ये ऑनलाइन केलेल्या बुकिंगचाही समावेश आहे. कंपनीने म्हटले आहे की ओयोने आपल्या भागीदार हॉटेलांना स्थानिक सामाजिक संवेदनशीलता लक्षात घेऊन अविवाहित जोडप्यांकडून बुकिंग नाकारण्याचा अधिकार दिला आहे.

Oyo ने मेरठमधील आपल्या भागीदार हॉटेल्सना याचे नियम तात्काळ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. धोरणातील बदलाशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितले की, ग्राउंड प्रतिसादावर अवलंबून, कंपनी अधिक शहरांमध्ये त्याचा विस्तार करू शकते. ते म्हणाले, या समस्येचे निराकरण करण्यासाठी ओयोला विशेषत: मेरठमधील सामाजिक गटांकडून देखील प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय इतर काही शहरांतील रहिवाशांनीही मागणी केली आहे की, अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये चेक-इन करण्याची परवानगी देऊ नये.

OYO उत्तर भारताचे क्षेत्र प्रमुख पावस शर्मा म्हणाले, सुरक्षित आणि जबाबदार आदरातिथ्य पद्धती राखण्यासाठी OYO वचनबद्ध आहे. आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्यांचा आदर करतो, परंतु या मार्केटमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आणि नागरी समाज गटांचे ऐकण्याची आणि काम करण्याची आमची जबाबदारी देखील ओळखतो. ते म्हणाले की कंपनी वेळोवेळी या धोरणाचा आणि त्याच्या परिणामाचा आढावा घेत राहील.





Source link

Mumbai: मुंबईत क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं हल्ला!

0
Mumbai: मुंबईत क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं हल्ला!


Raghav Tiwari Stabbed With Knife: बॉलिवूड चित्रपट, वेब सिरीज आणि क्राइम पेट्रोलसारख्या प्रसिद्ध शोमध्ये काम करणारा अभिनेता राघव तिवारी याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मुंबईतील वर्सोवा येथे त्याच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात राघव तिवारी जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असली तरी अद्याप कोणालाही अटक झाली नाही. राघवने पोलिसांच्या कारवाईवर नाराजी देखील व्यक्त केली आहे.



Source link

डोळे लाल अन् मद्यधुंद ऑटोचालकाने अचानक बदलला मार्ग! घाबरलेल्या महिलेनंन धावत्या रिक्षातून मारली उडी; बेंगळुरू येथील घटना

0
डोळे लाल अन् मद्यधुंद ऑटोचालकाने अचानक बदलला मार्ग! घाबरलेल्या महिलेनंन धावत्या रिक्षातून मारली उडी; बेंगळुरू येथील घटना


Bengaluru Crime News: कर्नाटकची राजधानी आणि आयटी सिटी बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्व बंगळुरूमध्ये एका ३० वर्षीय महिलेने धावत्या ऑटोतून आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारली. मद्यधुंद ऑटोचालकाने अचानक मार्ग बदलत माहीलेला दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिलेला असुरक्षित वाटू लागल्याने तिने ऑटो चालकाला थांबायला सांगितले. मात्र, त्याने रिक्षा थांबवला नाही. यामुळे तिने थेट धावत्या रिक्षातून उडी मारली.  महिलेच्या पतीने ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे.  



Source link