Monday, June 29, 2026
Home Blog Page 55

रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वावर मोठा विश्वास

0
रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वावर मोठा विश्वास


फलटण :-  विडणी येथे पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेश सोहळ्यात आज खऱ्या अर्थाने राजकीय भूकंप पाहायला मिळाला. वडले गावातील सत्ताधारी गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वडले गावात भाजपची स्थिती अत्यंत भक्कम झाली असून विरोधकांचा सुपडा साफ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
या प्रवेश सोहळ्यात केवळ सामान्य कार्यकर्तेच नव्हे, तर गावच्या सत्तेची धुरा सांभाळणारे विद्यमान व माजी पदाधिकारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गळाला लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये वडले ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौ. स्वाती पांडुरंग मोरे, पांडुरंग मोरे, प्रबुद्ध मोरे पाटील, माजी उपसरपंच संतोष मोरे, अमोल मोरे, हिरामण मोरे आणि संतोष जगताप यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासोबतच ‘मित्र समूह वडले’च्या असंख्य तरुणांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेत भाजपप्रती आपली निष्ठा जाहीर केली.
प्रवेशकर्त्यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, गेल्या काही वर्षांत रामराजे गटाकडून केवळ आश्वासनांची खैरात झाली, मात्र प्रत्यक्षात ठोस आणि विकासाभिमुख कामे ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातूनच झाली आहेत. नीरा–देवधरचे पाणी, रस्ते विकासाचे मजबूत जाळे आणि मूलभूत सुविधांची कामे यामुळे वडले गावाच्या विकासाला खरी दिशा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
वडले गावाचे भविष्य ‘कमळा’सोबतच सुरक्षित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करताना माजी उपसरपंच संतोष मोरे आणि विद्यमान उपसरपंच सौ. स्वाती मोरे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर आपला संपूर्ण विश्वास असल्याचे सांगितले.
या वेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मनापासून स्वागत केले आणि,
“वडले गावाचा सर्वांगीण विकास ही आता माझी जबाबदारी आहे,” अशी ठाम ग्वाही दिली.
या जाहीर प्रवेशामुळे वडले गावात भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली असून विरोधकांची अवस्था अक्षरशः ‘धोबीपछाड’ झाल्यासारखी झाली आहे.

‘भारतात 2045 पर्यंत 24.5 लाखाहून अधिक कॅन्सर रुग्ण’, इंडियन कॅन्सर सोसायटीने व्यक्त केली चिंता!

0
‘भारतात 2045 पर्यंत 24.5 लाखाहून अधिक कॅन्सर रुग्ण’, इंडियन कॅन्सर सोसायटीने व्यक्त केली चिंता!


Cancer Patients: भारतात कॅन्सर हा एक मोठा आरोग्यावरील संकट बनत चाललाय. सध्या दरवर्षी सुमारे 15 लाख नवे रुग्ण आढळतात, पण 2045 पर्यंत ही संख्या 24.5 लाखांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. इंडियन कॅन्सर सोसायटी (ICS) ने जागतिक कॅन्सर दिवसाच्या पूर्वसंध्येला ही चिंता व्यक्त केलीय. यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येईल. हे रोखण्यासाठी केवळ उपचारांवर अवलंबून राहता येणार नाही, तर प्रतिबंध आणि लवकर निदान यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. वाढती लोकसंख्या, जीवनशैलीतील बदल आणि पर्यावरणीय प्रदूषण यांमुळे हा अनुमान लावण्यात आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

प्रतिबंधक धोरणाची गरज

केवळ महागडे उपचार उपलब्ध करणे पुरेसे नाही. रुग्णांना अशी अवस्था येऊच देऊ नये जिथे फक्त महाग उपचार हाच पर्याय राहतो. यासाठी वेळेवर तपासणी, प्रतिबंध आणि सुरुवातीच्या ओळखीला राष्ट्रीय आरोग्य धोरणाचा केंद्रबिंदू बनवावे, असे ICS दिल्लीचे तज्ज्ञ सांगतात. समुदाय स्तरावर काम करून धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील दरी कमी करावी. मिथक दूर करणे, वैज्ञानिक माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे आणि नियमित स्क्रीनिंगला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यामुळे रुग्णांची संख्या कमी होईल आणि उपचार खर्चही कमी पडेल, असेही त्यांनी सांगितले. 
 
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील उपाय

2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कर्करोग उपचार स्वस्त आणि सुलभ करण्यासाठी काही घोषणा करण्यात आल्या. यात निवडक कर्करोग औषधांवर सीमाशुल्कात सूट आणि देशांतर्गत बायोफार्मा उत्पादनाला चालना देणे यांचा समावेश आहे. ICS च्या आरोग्य तज्ज्ञांनी या पावलांचे स्वागत केले, पण चेतावणी दिली की केवळ उपचारांपर्यंत मर्यादित धोरण भारतातील वाढत्या कर्करोग बोझाला सामोरे जाण्यासाठी पुरेसे नाही. प्रतिबंध आणि तपासणीवर अधिक भर द्यावा लागणार आहे. 

तज्ज्ञ काय सांगतात? 

चुकीच्या धारणा दूर करणे, वेळेवर तपासणीला प्रोत्साहन आणि विज्ञान आधारित माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे ICS दिल्लीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना गोविल यांनी सांगितले. फोर्टिस मेमोरियल हॉस्पिटलचे वरिष्ठ संचालक डॉ. नितेश रोहतगी यांनी सुरुवातीच्या स्क्रीनिंग आणि नव्या निदान तंत्रज्ञानाला चांगले परिणाम आणि कमी खर्चाची किल्ली म्हटले. नीती आयोगच्या माजी संचालिका आणि कर्करोगातून बाहेर पडलेल्या डॉ. उर्वशी प्रसाद यांनी कर्करोग डेटातील दोष, प्रादेशिक असमानता आणि आर्थिक अडथळ्यांकडे लक्ष वेधले. ICS दिल्लीच्या सचिव रेणुका प्रसाद यांनी रुग्णांवर पडणारा भावनिक आणि आर्थिक भार अधोरेखित केला. 

काय काळजी घ्यावी? 

प्राथमिक आरोग्य स्तरावर स्क्रीनिंगची कमकुवत व्यवस्था, विश्वसनीय आणि एकत्रित कर्करोग डेटाची कमतरता, उपचार आणि तपासणीत प्रादेशिक फरक, गरीब आणि वंचित घटकांसाठी निदान सुविधांची मर्यादित उपलब्धता, आणि उशिरा ओळखल्याने वाढणारा उपचार खर्च व मृत्यूदर या मुख्य कमतरता आहेत. यासाठी समुदाय स्तरावर काम, डेटा मजबूत करणे, असमानता कमी करणे आणि गरीबांसाठी सुविधा वाढवणे आवश्यक आहे. हे बदल केल्यास कर्करोगाशी लढणे सोपे होणार आहे.





Source link

महागड्या टेस्ट करुन सुधारणार नाही तब्येत, डॉक्टरांनी दिला फ्री ‘जादुई’ फॉर्मुला!

0
महागड्या टेस्ट करुन सुधारणार नाही तब्येत, डॉक्टरांनी दिला फ्री ‘जादुई’ फॉर्मुला!



Doctor Magical Formula: महागड्या तपासण्या करणयापेक्षा चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे. 



Source link

अमेरिकन फिट, भारतीय फॅट! वजन कमी तरी पोट सुटलेले? भारतीयांना फॅटी लिव्हरचा धोका का जास्त?

0
अमेरिकन फिट, भारतीय फॅट! वजन कमी तरी पोट सुटलेले? भारतीयांना फॅटी लिव्हरचा धोका का जास्त?


Why do Indians have more belly fat than Americans?: तुम्ही बऱ्याचवेळा असे ऐकले असेल की, पाश्चात्य देशांतील लोक भारतीयांपेक्षा अधिक निरोगी असतात, त्यांचे वजनही भारतीयांपेक्षा नियंत्रित असते. 40 वर्षे वयोगटाली एका भारतीय व्यक्तीला आणि एका अमेरिकी व्यक्तीला समोरासमोर उभे केल्यास एक साधा फरक दिसतो. तो म्हणजे या वयोगटातील भारतीय व्यक्तीची पोटोची ढेरी आणि त्याच्यासमोर उभा असलेला एक निरोगी आणि योग्य शरीरयष्टी असलेला अमेरिकी व्यक्ती. पण हा फरक का जाणवतो? यामागचे नेमके कारण काय आहे? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? चला तर मग तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

 

फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यास काय शरीरावर होणारे परिणाम

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भारतीयांमध्ये ‘एशियन फीनोटाइप’ हा प्रकार  अधिक प्रमाणात आढळतो. एशियन फीनोटाइप म्हणजे आशियाई वंशाच्या लोकांमध्ये आढळणारी विशिष्ट शारीरिक रचना आणि चयापचय वैशिष्ट्ये. म्हणजेच पाश्चात्य देशातील लोकांच्या तुलनेत भारतीयांचे वजन अधिक नसूनही त्यांच्या पोटावर अतिरिक्त चरबी दिसते. याला अशी शरीरयष्टी असलेल्या भारतीय व्यक्तिला ‘थिन-फॅट भारतीय’ असेही म्हटले जाते. जर तुमचेही वजन कमी असेल आणि तरीही पोटाची घेरी, फुगलेले शरीर असेल तर याकडे दुर्लक्ष न करणे योग्य नाही. कारण, पोटाची ही अतिरिक्त चरबी थेट फॅटी लिव्हर आणि हृदयाच्या आजारांना निमंत्रण देऊ शकते.

 

भारतीयांना फॅटी लिव्हर होण्याचे मुळ कारण काय?

याचे मुळ कारण भारतीयांचा रोजचा आहार आहे. एक सामान्य व्यक्ती त्याच्या रोजच्या जीवनात भात, चपाती, ग्लुकोजयुक्त भाज्या अशा पदार्थांचे सेवन करतो. तसेच भारतीय पदार्थ बनवताना मोठ्या प्रमाणात मसाले, तेल आणि तुपाचा वापर केला जातो. तसेच काही पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. कार्बोदकांचा अतिप्रमाणात समावेश असतो. जेव्हा शरीर आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करत नाही, तेव्हा यकृत त्याचे रूपांतर अतिरिक्त चरबीमध्ये करते. आजकाल सर्व ठिकाणी बैठ्या कामाचे प्रमाण वाढले आहे. ऑफिसमध्ये तासनतास बसून काम करणे आणि शारीरिक हालचाल याला कारणीभूत ठरते. यामुळे फॅटी लिव्हरची समस्या होते. ज्यामुळे शरीरात इन्सुलिनचे कार्य योग्य प्रकारे होत नाही. परिणामी वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत  मधुमेह होण्याची शक्यता अधिक वाढते.

 

पाश्चात्य देशातील नागरिकांच्या आहारात इतर पदार्थांसह हिरव्या भाज्या, सॅलेड, फळे अशा आरोग्यदायी पदार्थांचाही समावेश असतो. ज्यामुळे कार्बोदकांसह योग्यप्रमाणात पोषणही मिळते. याचेच उदाहरण घेता भारतीयांनीही त्यांच्या आहारत बदल करायला हवा.

फॅटी लिव्हर आणि थिन-फॅटपासून वाचण्यासाठी काय कराल?

  • आहारात साखर, गूळ आणि मधाचे प्रमाण कमी करा. मैद्याऐवजी संपूर्ण धान्य वपरा.
  • आहारात डाळी, पनीर, अंडी किंवा कडधान्ये यांसारख्या प्रथिनांचा समावेश करा.
  • दिवसातून किमान 3 वेळा उकडलेल्या भाज्या खा.
  • आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायम करा.
  • वय 30 पेक्षा जास्त असल्यास नियमितपणे यकृताची तपासणी करा.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: आश्रम काही कार्यक्रमांपुरते ‎नव्हे तर ती ऊर्जेची केंद्रे‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  आश्रम काही कार्यक्रमांपुरते ‎नव्हे तर ती ऊर्जेची केंद्रे‎




मानवी जीवनात तीन ठिकाणी आपण नेहमी ये-जा करतो. घर,‎कार्यालय आणि बाजारपेठ. परंतु तुलसीदास चौथ्या स्थानाचा देखील‎उल्लेख करतात. पक्षी राजा गरुड काकभूशुंडीकडे गेला आणि‎म्हणाला, मी येथे येताच माझी सर्व कामे पूर्ण झाली. ‘देखि परम पावन‎तव आश्रम, गयउ मोह संसय नाना भ्रम।’ म्हणजे सर्वात पवित्र आश्रम‎पाहून, माझी आसक्ती, शंका आणि विविध प्रकारचे भ्रम सर्व नाहीसे ‎झाले. म्हणूनच चौथे स्थान आश्रम आहे. यात मंदिर अंतर्भूत असते.‎आसक्ती, शंका आणि संभ्रम सर्व नाहीसे झाले. घरात आसक्ती‎निर्माण होते. कार्यालयात संशयाने वावरतो. आणि बाजार‎अपरिहार्यपणे संभ्रम निर्माण करतो. हे तिन्ही नष्ट करण्यासाठी आपण‎रोज आश्रम किंवा मंदिराला भेट द्यावी. ही काही कार्यक्रमांच्या‎आयोजनाचे नव्हे तर उर्जेची केंद्रे आहेत. ऋषी-मुनींची मौलिक क्रिया‎आहे. आजही त्याच्याशी जोडलेले राहिल्यास आपल्याला लाभ‎मिळेल.‎



Source link

माघ पौर्णिमा : धम्मचिंतन, संघएकता व विवेक जागरणाचा पवित्र दिवस -रामचंद्र मोरे

0
माघ पौर्णिमा : धम्मचिंतन, संघएकता व विवेक जागरणाचा पवित्र दिवस -रामचंद्र मोरे


फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने BSI मिशन 25 अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु.महावीर भालेराव व सरचिटणीस आयु.बाबासाहेब जगताप कोषाध्यक्ष आयु.विठ्ठल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम संपूर्ण तालुका भर घेतले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे यांनी समता नगर(विडणी) येथे माघ पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आपल्या निवेदनात माघ पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करताना आयु. रामचंद्र मोरे म्हणाले, बौद्ध धम्मातील माघ पौर्णिमा (माघ पूजा) हा केवळ धार्मिक विधींचा दिवस नसून धम्माचे सखोल चिंतन, मनन आणि आत्मपरिक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. या दिवशी तथागत गौतम बुद्धांनी १,२५० अर्हंत भिक्षूंना कोणत्याही आमंत्रणाविना एकत्र येताना पाहिले आणि ओवाळ पाटीमोक्षाचा (ओवाद पाटीमोक्ष) उपदेश दिला. यात पाप टाळणे, कुशल कर्म करणे आणि चित्त शुद्ध करणे हा धम्माचा सार सांगितला आहे.
माघ पौर्णिमा ही संघाच्या ऐक्याचे, शिस्तीचे आणि विवेकपूर्ण जीवनाचे प्रतीक आहे. या दिवशी उपासक-उपासिकांनी पंचशीलासोबत अष्टशीलाचे पालन करून आपल्या आचरणाकडे प्रामाणिकपणे पाहावे, अहिंसा, करुणा, मैत्री व समतेचा मार्ग स्वीकारावा. उपोसथ व्रत, गाथांचे सूत्रपठण, धम्मचर्चा यांद्वारे मन शुद्ध करून समाजहिताचा विचार करण्याची प्रेरणा या दिवसातून मिळते.
माघ पौर्णिमा ही प्रत्येक बौद्धासाठी स्वतःच्या विचारांचा, कृतींचा आणि जीवनदृष्टीचा पुनर्विचार करून विवेक जागृत करण्याची संधी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी मोठ्या संख्येने समता नगर येथील बौद्ध उपासक – उपासिका, बालक बालिका, अबाल वृद्ध मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

विडणी येथे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांची जाहीर सभा; प्रचाराला तोफ – मंगळवारी सायंकाळी 6 वाजता उत्तरेश्वर मंदिर चौकात आयोजन

0
विडणी येथे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांची जाहीर सभा; प्रचाराला तोफ – मंगळवारी सायंकाळी 6 वाजता उत्तरेश्वर मंदिर चौकात आयोजन

फलटण :- विडणी जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवार सौ. सुषमाताई अविनाश मोरे, विडणी पंचायत समितीचे उमेदवार सचिन गजानन अभंग (अध्यक्ष) तसेच सांगवी पंचायत समितीच्या उमेदवार सौ. सारिका संजय सोडमिसे यांच्या प्रचारार्थ ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भव्य जाहीर सभा मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता विडणी येथील उत्तरेश्वर मंदिर चौकात आयोजित करण्यात आली आहे.
या जाहीर सभेबाबत माहिती देताना विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी सांगितले की, या सभेसाठी विडणी व परिसरात जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या सभेला माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील तसेच फलटण नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सभेला विडणी जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू–भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून, विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवघर धरणाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला, तसेच आळंदी–पंढरपूर रस्ता, फलटण–बारामती रस्ता यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा मार्ग मोकळा केला आहे. याशिवाय नाईकबोमवाडी एमआयडीसीमध्ये येणाऱ्या मोठ्या कंपन्यांमुळे स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याने परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक विकासकामांसाठी ओळख असलेल्या विडणी गावाने लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासाचा आदर्श निर्माण केला आहे. गावाचा सर्वांगीण विकास आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला असून, अशा विकासशील गावात ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांची उपस्थिती लाभणार असल्याने या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे विडणी येथे होणारी ही सभा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अनित्य, अनात्म आणि दुःख : बुद्धधम्माची त्रिसूत्री – माघ पौर्णिमा उत्सवात आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे सखोल धम्म विवेचन

0
अनित्य, अनात्म आणि दुःख : बुद्धधम्माची त्रिसूत्री – माघ पौर्णिमा उत्सवात आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे सखोल धम्म विवेचन

अनित्य, अनात्म आणि दुःख : बुद्धधम्माची त्रिसूत्री – सोमीनाथ घोरपडे

साहस Times :- आकुर्डी प्राधिकरण, पुणे येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे तक्षशिला मित्र संघ यांच्या वतीने माघ पौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभावपूर्ण व धम्ममय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष धम्म प्रवचनात भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी भगवान बुद्धांच्या धम्मातील मूलभूत त्रिसूत्री – अनित्य, अनात्म आणि दुःख यावर सखोल व विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आयु. निर्मला वालकर (अध्यक्ष, तक्षशिला मित्र संघ, आकुर्डी प्राधिकरण, निगडी) या होत्या. कार्यक्रमास संघाचे सचिव बौद्धाचार्य सुनील तायडे, उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, खजिनदार गुणवंत रामटेके, सल्लागार हिरामण रामटेके, उपकार्याध्यक्ष रंजना निमगडे, ऑडिटर संजय सावंत, कार्यकारणी सदस्य भरत बिऱ्हाडे, उपसचिव सुनील तायडे यांच्यासह अनेक उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव, मुक्त पत्रकार, लेखक आयु. सोमीनाथ घोरपडे, यांनी “दुःख, अनित्य आणि अनात्म” या विषयावर सखोल धम्म प्रवचन केले. आपल्या प्रवचनात त्यांनी भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेली धम्माची मूलभूत त्रिसूत्री – अनिच्च (अनित्य), दुक्ख (दुःख) आणि अनत्ता (अनात्म) ही संकल्पना पाली धम्मपरंपरेनुसार स्पष्ट केली.

ते म्हणाले, “सब्बे संखारा अनिच्चा” (धम्मपद – अनिच्च वग्ग) अर्थात सर्व संस्कार नाशवंत आहेत. जगातील कोणतीही गोष्ट स्थिर नाही. या अनित्यतेचे यथार्थ ज्ञान झाले की आसक्ती कमी होते. पुढे “सब्बे संखारा दुक्खा” (धम्मपद – दुक्ख वग्ग) या सूत्राचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, अज्ञानातून निर्माण होणारी तृष्णा हीच दुःखाचे मूळ आहे. जन्म, जरा, व्याधी व मरण हे दुःखाचे स्वरूप आहे.
तसेच “सब्बे धम्मा अनत्ता” (धम्मपद – अनत्ता वग्ग) या पाली सूत्राचा उल्लेख करत त्यांनी आत्मा, परमेश्वर वा शाश्वत सत्ता नसल्याचा बुद्धांचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्पष्ट केला.

“मी” आणि “माझे” या कल्पनाच दुःख वाढवतात असे त्यांनी ठामपणे मांडले.
यावेळी त्यांनी चार आर्य सत्य – दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य – यांचे सोप्या व ओघवत्या भाषेत विश्लेषण केले. तसेच आर्य अष्टांग मार्ग – सम्यक दृष्टि, संकल्प, वाचा, कर्मांत, आजीविका, प्रयास, स्मृती व समाधी – हा मानवमुक्तीचा शास्त्रीय मार्ग असल्याचे प्रतिपादन केले.
ते म्हणाले, “भगवान बुद्धांचा धम्म हा अंधश्रद्धेवर नव्हे तर अनुभव, विवेक आणि विज्ञानावर आधारित आहे. जिथे विज्ञान संपते, तिथे बुद्धाचा धम्म सुरू होतो.”

प्रवचनाच्या शेवटी आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे “मुक्तिदाता” हे पुस्तक उपस्थित उपासक-उपासिकांना भेट दिले व बुद्धधम्माच्या मानवकेंद्री विचारधारेचा प्रसार करण्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारप्रवर्तक प्रवचनामुळे संपूर्ण वातावरण धम्ममय झाले असून उपस्थितांनी बुद्धधम्माच्या मार्गाने आचरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आयु. एल. एन. निकाळजे (माजी सैनिक, माजी समता सैनिक दल प्रमुख ऑफिसर, प्रबोधनकार गायक, फलटण) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचळवळीतील योगदानावर प्रकाश टाकत दोन भीमगीतांच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच तक्षशिला मित्र संघ, आकुर्डी प्राधिकरण, निगडी यांच्या अध्यक्ष आयु. निर्मला वालकर यांनी माघ पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील ऐतिहासिक महत्त्व विशद करत भगवान बुद्धांच्या करुणा, प्रज्ञा व मैत्रीच्या मार्गाने आचरण करण्याचे आवाहन केले आणि धम्मचळवळ अधिक गतिमान करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रसंगी आयु. संग्राम निकाळजे व आयु. नितिन बनसोडे या दोन कुटुंबांच्या वतीने खीरदान व फलाहाराचे आयोजन करण्यात आले. दोन्ही कुटुंबातील प्रमुखांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

माघ पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार कोळकी येथे महिलांचा धम्मकार्यक्रम

0
माघ पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार कोळकी येथे महिलांचा धम्मकार्यक्रम


फलटण : माघ पौर्णिमेच्या पावन पर्वाच्या निमित्ताने बुद्ध फुले शाहू आंबेडकर सभागृह, कोळकी येथे महिला संस्कार वर्गाच्या वतीने धम्मकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वर्गाला गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने भंते काश्यपजी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महिलांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणला. भंते काश्यपजी प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांच्या शिकवणीचा प्रभाव संपूर्ण कार्यक्रमातून दिसून आला.
माघ पौर्णिमा हा दिवस बुद्ध, धम्म आणि संघ यांचे महत्त्व अधोरेखित करणारा असून संघाची एकता, शिस्त आणि धम्माचरणाचे प्रतीक मानला जातो. या निमित्ताने सूत्रपठन व धम्मविचारांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमावेळी उपासिका रजनी माने व त्यांच्या परिवाराच्या वतीने खीरदान करण्यात आले. यावेळी बोलताना रजनी माने म्हणाल्या, “माघ पौर्णिमा हा केवळ धार्मिक विधीचा दिवस नसून, बुद्धांनी दिलेल्या करुणा, प्रज्ञा आणि शील या मूल्यांचे आचरण करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.”
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्राताई गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, बौद्ध धम्मातील प्रत्येक पौर्णिमा ही पवित्र मानली गेली आहे. प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व वेगळा आहे. माघ पौर्णिमा ही फक्त भारतातच नव्हे तर जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली. याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धाने वैशाली नगरीचा अंतिम निरोप घेतला. याच पौर्णिमेला भिक्षु आनंद यांचे परिनिर्वाण झाले. याच पौर्णिमे दिवशी तथागतांनी सारीपुत्त व महा मोग्लान संघाचे संघप्रमुख म्हणून नेमण्यात आले. त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत आनंदात आपण दरवर्षी साजरी करूया. “
या कार्यक्रमास उपासिका प्रियांका भोसले, अंकिता भोसले, अभिलाषा भोसले, दुर्गा भोसले यांच्यासह वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा गायकवाड, विद्या खंदारे, आरती पाटील, किर्ती माने, अक्षदा लोंढे आदी महिला उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम शांतता, शिस्त व धम्मभावनेच्या वातावरणात संपन्न झाला.

अमेरिकेचा भारतासंदर्भात मोठा निर्णय! डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा, म्हणाले ‘नरेंद्र मोदींनी मला…’

0
अमेरिकेचा भारतासंदर्भात मोठा निर्णय! डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा, म्हणाले ‘नरेंद्र मोदींनी मला…’


US India Have Agreed To Trade Deal: अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअऱ करत लिहिलं आहे  की, “आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. ते माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या देशाचे एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. आम्ही व्यापार आणि रशिया आणि युक्रेनसोबतचे युद्ध संपवणे यासह अनेक विषयांवर चर्चा केली”. 

Add Zee News as a Preferred Source

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितल्यानंतर काही वेळातच, टॅरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे भारत-अमेरिका संबंधांमधील तणाव निवळण्याचे संकेत मिळाले आहेत, जे मोठ्या शुल्कांमुळे बिघडले होते. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली असल्याचा दावाही केला आहे. तथापि, अमेरिकेत होणाऱ्या भारतीय निर्यातीवरील अतिरिक्त 25 टक्के शुल्क अद्याप कायम आहे.

बहुप्रतिक्षित अमेरिका-भारत व्यापार करारावरही डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केलं आहे. या कराराला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता कारण भारत अमेरिकेसाठी आपले कृषी क्षेत्र खुले करण्यास तयार नव्हतं. ट्रम्प यांनी अखेरीस एक करार होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. 

ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी टॅरिफ कमी केले आहे आणि या कृतीला त्यांनी मैत्री आणि आदराचं प्रतीक म्हटलं आहे. या दूरध्वनी संभाषणादरम्यान, ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन तेल खरेदी थांबवण्यास आणि भारताची तेल आयात अमेरिका व व्हेनेझुएलाकडे वळवण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध थांबवण्यास मदत होईल, ज्यामध्ये रोज हजारो लोक जीव गमावत आहेत.

नरेंद्र मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार

“पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री आणि आदर आणि त्यांच्या विनंतीनुसार, तात्काळ प्रभावीपणे, आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शविली, ज्याअंतर्गत अमेरिका टॅरिफ 25 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांपर्यंत कमी करेल. भारत देखील अमेरिकेविरुद्धचे त्याचे शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्य करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पंतप्रधानांनी “बाय अमेरिकन” साठी देखील वचनबद्धता दर्शविली, ज्यामध्ये 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची यूएस ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती, कोळसा आणि इतर अनेक उत्पादने आयात करणे समाविष्ट आहे. भविष्यात भारतासोबतचे आमचे अद्भुत संबंध आणखी मजबूत होतील. पंतप्रधान मोदी आणि मी असे दोन लोक आहोत जे काम करुन दाखवतात देतात, जे बहुतेक लोकांबद्दल बोललं जाऊ शकत नाही,” असंही ते म्हणाले आहेत. 





Source link