Monday, June 29, 2026
Home Blog Page 56

अमेरिकेचा भारतासंदर्भात मोठा निर्णय! डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा, म्हणाले ‘नरेंद्र मोदींनी मला…’

0
अमेरिकेचा भारतासंदर्भात मोठा निर्णय! डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा, म्हणाले ‘नरेंद्र मोदींनी मला…’


US India Have Agreed To Trade Deal: अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअऱ करत लिहिलं आहे  की, “आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. ते माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या देशाचे एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. आम्ही व्यापार आणि रशिया आणि युक्रेनसोबतचे युद्ध संपवणे यासह अनेक विषयांवर चर्चा केली”. 

Add Zee News as a Preferred Source

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितल्यानंतर काही वेळातच, टॅरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे भारत-अमेरिका संबंधांमधील तणाव निवळण्याचे संकेत मिळाले आहेत, जे मोठ्या शुल्कांमुळे बिघडले होते. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली असल्याचा दावाही केला आहे. तथापि, अमेरिकेत होणाऱ्या भारतीय निर्यातीवरील अतिरिक्त 25 टक्के शुल्क अद्याप कायम आहे.

बहुप्रतिक्षित अमेरिका-भारत व्यापार करारावरही डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केलं आहे. या कराराला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता कारण भारत अमेरिकेसाठी आपले कृषी क्षेत्र खुले करण्यास तयार नव्हतं. ट्रम्प यांनी अखेरीस एक करार होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. 

ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी टॅरिफ कमी केले आहे आणि या कृतीला त्यांनी मैत्री आणि आदराचं प्रतीक म्हटलं आहे. या दूरध्वनी संभाषणादरम्यान, ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन तेल खरेदी थांबवण्यास आणि भारताची तेल आयात अमेरिका व व्हेनेझुएलाकडे वळवण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध थांबवण्यास मदत होईल, ज्यामध्ये रोज हजारो लोक जीव गमावत आहेत.

नरेंद्र मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार

“पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री आणि आदर आणि त्यांच्या विनंतीनुसार, तात्काळ प्रभावीपणे, आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शविली, ज्याअंतर्गत अमेरिका टॅरिफ 25 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांपर्यंत कमी करेल. भारत देखील अमेरिकेविरुद्धचे त्याचे शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्य करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पंतप्रधानांनी “बाय अमेरिकन” साठी देखील वचनबद्धता दर्शविली, ज्यामध्ये 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची यूएस ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती, कोळसा आणि इतर अनेक उत्पादने आयात करणे समाविष्ट आहे. भविष्यात भारतासोबतचे आमचे अद्भुत संबंध आणखी मजबूत होतील. पंतप्रधान मोदी आणि मी असे दोन लोक आहोत जे काम करुन दाखवतात देतात, जे बहुतेक लोकांबद्दल बोललं जाऊ शकत नाही,” असंही ते म्हणाले आहेत. 





Source link

सुनेत्रा पवारांची वेणूताई चव्हाणांच्या स्मारकाला भेट, रजिस्टरमध्ये काय संदेश लिहला?

0



Sunetra Pawar in Satara: सुनेत्रा पवारांची वेणूताई चव्हाणांच्या स्मारकाला भेट, रजिस्टरमध्ये काय संदेश लिहला?



Source link

विदीप जाधवांच्या मुलांच्या डोक्यावर सुनेत्रावहिनींचा मायेचा हात; उपमुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

0


सातारा : बारामती विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित दादांच्या रुपाने महाराष्ट्राने मोठा नेता गमावला, तर अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला. तर, विदीप जाधव (Vidip Jadhav) यांच्या मृत्यूने जाधव कुटुंबीयांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पवार आणि जाधव कुटुंबीय दु:खात असून दोन्ही कुटुंबीयांकडून एकमेकांचे सांत्वन करण्यात आले. अजित दादांच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे आली. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच सुनेत्र पवार यांनी कराडमधील प्रितीसंगम म्हणजे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर, दिवंगत विदीप जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असा शब्द देत त्यांनी जाधव कुटुंबीयांना आधार दिला. या भावस्पर्शी भेटीमुळे परिसरात उपस्थितांचे डोळे पाणावले. पतीच्या निधनाने स्वत:वरही आधीच दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही कर्तव्यपथ सांभात अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केला. त्यांच्या या कृतीने संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिल्याची चर्चा होत आहे. 

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही तरडगाव येथे जाऊन जाधव कुटुंबीयांची भेट घेतली होीती. “विदीप जाधव यांनी अजितदादांचे अंगरक्षक म्हणून अनेक वर्षे काम केले होते. दुर्दैवाने दोघांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र जसा दुःखात आहे, तसेच विदीप जाधव यांच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुःख वाटल्याने कमी होते, म्हणून आज फलटण (तरडगाव) इथं जाधव कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली आणि या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला.”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते. तसेच, आमदार रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली आहे. 

हेही वाचा

Video: भाजपने पुन्हा शब्द फिरवला, आधी म्हणाले नवाब मलिकांमुळे युती नाही; मुंबई महापालिकेत अमित साटमांचा यु-टर्न

आणखी वाचा



Source link

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणाच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन

0



Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणाच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन



Source link

कालकथित चिंतामण लक्ष्मण अहिवळे यांचे प्रथम पुण्यस्मरण उद्या फलटण येथे

0
कालकथित चिंतामण लक्ष्मण अहिवळे यांचे प्रथम पुण्यस्मरण उद्या फलटण येथे


फलटण प्रतिनिधी : येथील मंगळवार पेठ परिसरातील रहिवासी कालकथित  चिंतामण लक्ष्मण अहिवळे यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार, दि. ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता त्यांच्या राहत्या घरी, मंगळवार पेठ, फलटण येथे आयोजित करण्यात आले आहे.
कालकथित चिंतामण लक्ष्मण अहिवळे हे मनमिळावू स्वभावाचे, कुटुंबवत्सल आणि सामाजिक जाणिवा असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबीय, नातेवाईक व परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सहवास जरी सुटला असला तरी त्यांच्या आठवणी आजही सर्वांच्या मनात सुगंधासारख्या दरवळत आहेत.
या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व पुण्यानुमोदनासाठी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती समस्त अहिवळे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रितीसंगमावर; अजितदादांचे आदर्श यशवंतराव चव्हाणाच्या समाधीस्थळी

0


Deputy Chief Minister Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज (2 फेब्रुवारी) कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराडमध्ये येत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातं अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते वारंवार कराडमध्ये यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

दरम्यान, शपथविधीनंतर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दादांच्या अकाली निधनाने केवळ माझ्या वैयक्तिक आयुष्यावरच नाही, तर महाराष्ट्राच्या हृदयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तथापि, त्यांनी मला दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रती असलेली प्रामाणिक बांधिलकी हेच माझे खरे आधारस्तंभ आहेत त्यांनी स्पष्ट केले की, अजित दादांनी आपले आयुष्य शेतकरी, कष्टकरी, महिला आणि तरुणांना अस्तित्वाचा मंत्र देण्यासाठी वेचले. हा वारसा पुढे नेताना मी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर अढळ निष्ठा ठेवून काम करेन, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानताना त्या म्हणाल्या की, या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हीच माझी सर्वात मोठी शक्ती आहे. तुमच्या विश्वासाच्या जोरावर मी दादांचे विचार जिवंत ठेवून नवीन आशा आणि ऊर्जेने पुढे जात राहीन.

मी माझ्या पूर्ण क्षमतेने काम करेन

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत 2047’ ला बळकटी देण्यासाठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सरकार महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सज्ज आहे. नवीन ऊर्जेने आणि आशेने, माझ्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी माझ्या पूर्ण क्षमतेने काम करेन. सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

माघ पौर्णिमा व संत रविदास महाराज ६४९ वी जयंतीनिमित्त धम्ममित्र बालसंस्कार वर्गाचा प्रेरणादायी कार्यक्रम

0
माघ पौर्णिमा व संत रविदास महाराज ६४९ वी जयंतीनिमित्त धम्ममित्र बालसंस्कार वर्गाचा प्रेरणादायी कार्यक्रम


फलटण :-  सोमवार पेठ | BSI मिशन २५ माघ पौर्णिमेचे पावन औचित्य व संत रविदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त सोमवार पेठ येथे धम्ममित्र बालसंस्कार वर्ग यांच्या वतीने एक प्रेरणादायी व विचारप्रवर्तक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संत रविदास महाराजांच्या जीवनकार्याला भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. सागर भोईटे सर उपस्थित होते. त्यांनी संत रविदास महाराज यांच्या समता, मानवता व श्रमप्रतिष्ठेच्या विचारांवर सखोल मार्गदर्शन केले. संत रविदास महाराजांचा विचार आजच्या पिढीसाठी किती आवश्यक आहे, हे त्यांनी प्रभावी शब्दांत स्पष्ट केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले पुस्तक संत रविदास यांना अर्पण केले आहे.
यावेळी समर्थ न्यूजचे संपादक व पत्रकार बंधू श्री. गणेश भोईटे सर उपस्थित होते. तसेच समर्थ २४ तास न्यूज नेटवर्कचे सहसंपादक गणेश भोईटे व सागर भोईटे सर यांनी आपल्या मनोगतातून संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यामागील सामाजिक आशय मांडला.
कार्यक्रमात चंद्रकांत मोहिते यांनी माघ पौर्णिमेचे महत्त्व व उपोसथ व्रत या विषयावर मार्गदर्शन करत बौद्ध परंपरेतील शील, ध्यान व प्रज्ञेचे महत्त्व विशद केले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सरचिटणीस बाबासाहेब जगताप सर यांनी धम्ममित्र बालसंस्कार वर्गाच्या सातत्यावर भर देत, “आम्ही असो वा नसो, हा वर्ग तुम्ही सर्वांनी पुढे नेलाच पाहिजे,” असे सांगून आयोजक, पालक व बालकांना प्रेरणा दिली.
या कार्यक्रमास धम्ममित्र बालसंस्कार व्यवस्थापक तसेच
प्रदीप खरात, विशाल शिंदे, विकी भोसले, भीमराव लोंढे, गणेश सावंत, मनीष लोखंडे, सचिन बनसोडे, राजपाल लोंढे, किशोर मोर, प्रकाश नाना शिलवंत, गणेश भोसले, अमोल मोरे, राजू सावंत, शामराव लोंढे, बाळू शिलवंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा समारोप संत रविदास महाराज यांच्या जीवनकार्याचा संदेश बालकांच्या मनात रुजवण्याचा संकल्प करत करण्यात आला. हा उपक्रम BSI मिशन २५ अंतर्गत समाजप्रबोधन व बालसंस्कार घडवणारा ठरला.

बरड गटासाठी ऐतिहासिक निर्णय : धोम–बलकवडी प्रकल्पाच्या पोट कालव्यांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर, बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा

0
बरड गटासाठी ऐतिहासिक निर्णय : धोम–बलकवडी प्रकल्पाच्या पोट कालव्यांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर, बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा

फलटण :-  बरड गटासाठी ऐतिहासिक निर्णय : धोम–बलकवडी प्रकल्पाच्या पोट कालव्यांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर, बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा
बरड जिल्हा परिषद गटातील दुष्काळी व जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बरड गटातील गावांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या धोम–बलकवडी प्रकल्पाच्या पोट कालव्यांसाठी राज्य शासनाने तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे हे पोट कालवे पारंपरिक उघड्या कालव्यांऐवजी बंदिस्त पाईपलाईन (Closed Pipeline) पद्धतीने होणार आहेत.
ही महत्त्वपूर्ण माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, बरड गटातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
बंदिस्त पाईपलाईनमुळे उघड्या कालव्यांतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन व गळती पूर्णपणे थांबणार असून पाण्याचा अपव्यय रोखला जाणार आहे. त्यामुळे कालव्याच्या टेल भागातील म्हणजेच शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंतही पुरेशा दाबाने आणि वेळेत पाणी पोहोचणे शक्य होणार आहे.
या नव्या योजनेमुळे पाण्याचे समान व न्याय्य वाटप होणार असून शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारे वादही कमी होतील. तसेच उघड्या कालव्यांसाठी लागणारे मोठ्या प्रमाणातील जमीन अधिग्रहण टळणार असल्याने शेतकऱ्यांची मौल्यवान शेती जमीन वाचणार आहे.
यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले,
“आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर निधी आणून प्रत्यक्ष कामे मार्गी लावतो. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढवत असून बरड गटातील जनतेचा आम्हाला भरघोस पाठिंबा मिळत आहे.”
या निर्णयामुळे बरड गटातील शेतीला नवी दिशा मिळणार असून, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

एन. रघुरामन यांचा कॉलम: समाजाच्या भल्यासाठी एआयचा जास्तीत जास्त वापर करा

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  समाजाच्या भल्यासाठी एआयचा जास्तीत जास्त वापर करा




पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील मदारीहाट-नागरकाटा विभागादरम्यान 52 किलोमीटर क्षेत्रफळावरील ठिकाण म्हणजे- बिन्नागुडी. हा परिसर हत्तींच्या दाट संख्येसाठी ओळखला जातो. हत्तींचा वावर चप्रामारी आणि गोरुमारा जंगलांमध्ये असतो. पण हंगामी भटकंती करताना हत्ती चहाच्या मळ्यांत जाण्यासाठी वारंवार रेल्वे रूळ ओलांडतात. हा एकमेव असा परिसर नाही, पूर्व भारतात असे अनेक भाग आहेत. 20 डिसेंबर 2025 रोजी आसामच्या होजाई जिल्ह्यात सारंग-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला धडकल्याने आठ हत्तींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रेल्वे रुळांवर मृत हत्तींची एकूण संख्या 90 झाली. लोको पायलटना याची जाणीव आहे. ते ट्रेनचा वेग 50 किमी/ताशी मर्यादित करतात. परंतु अपघात रोखण्यासाठी हे पुरेसे नाही. आता एआयचा वापर करून एक नवीन उपक्रम अशा अपघातांना रोखू शकतो. चार रेल्वे कॉरिडॉरमध्ये डिटेक्शन सिस्टिम लागू केली आहे. तिथे स्टेशन अधीक्षकांना बझरद्वारे सतर्क केले जाते. तो ताबडतोब लोको पायलटला 25 किमी/ताशी वेग कमी करण्यास सांगतो. या कमी वेगाने ट्रेन खूप लवकर थांबवता येते. एआय केवळ अपघातांना रोखत नाही तर मानव आणि इतर प्राण्यांचे जीवनमानदेखील सुधारत आहे. येथे काही उदाहरणे आहेत. एआयने मधुमेह तपासणी सुधारण्यास मदत केली आहे. येनेपोया (डीम्ड-टू-बी) विद्यापीठ, चेन्नईमधील मद्रास डायबिटीस रिसर्च फाउंडेशन आणि अटलांटामधील एमोरी विद्यापीठातील संशोधकांनी एक एआय-आधारित पद्धत विकसित केली आहे. ती मधुमेहाशी संबंधित रक्तवाहिन्यांमधील बदल शोधण्यासाठी उच्च-रिझोल्युशन रेटिनल प्रतिमा वापरते. यामुळे बोटातून रक्त काढण्याची गरज भासत नाही. शिवाय अधिक अचूकता मिळते. “डायबिटीस टेक्नॉलॉजी अँड थेरपीटिक्स’मध्ये प्रकाशित झालेले निष्कर्ष रेटिनाच्या जिवंत रक्तवाहिन्यांची आक्रमकपणे कल्पना करण्याच्या अद्वितीय क्षमतेवर आधारित आहेत. भारतात 10 कोटींहून अधिक लोकांना मधुमेह आहे. त्यापैकी किती जण त्यांच्या साखरेची पातळी तपासण्यासाठी दररोज स्वतःला टोचतात हे आपल्याला माहिती नाही. अशा एआय-आधारित नवकल्पनांमुळे या लोकसंख्येचे जीवन निःसंशयपणे सुधारू शकते. दुसरे उदाहरण विचारात घ्या : वाहतूक व्यवस्थापन. वाहनांची वाढती संख्या आणि ड्रायव्हिंग लायसन्सची वाढती संख्या यामुळे या क्षेत्रातील परिस्थिती आणखी बिकट होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आणि नवीन चालकांना वाहतूक चिन्हे आणि नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आयआयटी मद्रास येथील सेंटर फॉर एक्सलन्स ऑन रोड सेफ्टी (COERS) ने एआय-आधारित लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम विकसित केली आहे. “थिन्नाई’ नावाची ही सिस्टिम व्हिडिओ गेमसारख्या मॉड्यूलद्वारे अनेक चाचण्या करेल. ती सध्या मूल्यांकनाच्या टप्प्यात आहे. एकदा मंजूर झाल्यानंतर ती लर्नर्स लायसन्स जारी करण्यासाठी वापरली जाऊ शकते. एआय एका विशेष साधनापेक्षा पुढे जात आहे, जे मानवांसाठी मूलभूत बनत आहे. विविध क्षेत्रातील जटिल समस्यांवर उपाय प्रदान करते. अशी अपेक्षा आहे की 2026 च्या अखेरीस एआय दैनंदिन जीवनात आणि उद्योगात अधिक खोलवर अंतर्भूत, संरचनात्मक आणि मूक तंत्रज्ञान बनेल. केवळ आकर्षक आणि नवीन अनुप्रयोगाऐवजी. आरोग्यसेवेमध्ये त्याचे अल्गोरिदम मानवी तज्ज्ञांपेक्षा वैद्यकीय स्कॅन आणि डेटाचे अधिक अचूक विश्लेषण करू शकतात. हे निदान सुधारते आणि नवीन औषधांच्या शोधाला गती देऊ शकते. वाढत्या विभक्त कुटुंबांच्या आणि नातेवाइकांच्या कमतरतेच्या युगात, एआय-आधारित टेलिमेडिसिन, चॅटबॉट्स आणि वेअरेबल तंत्रज्ञान दुर्गम भागातील रुग्णांना तज्ज्ञांच्या काळजीशी जोडत आहेत. शेती, अन्न सुरक्षा, पीक व्यवस्थापन, हवामान बदल व्यवस्थापन आणि शाश्वत विकास ही अशी विशिष्ट क्षेत्रे आहेत. तेथे एआय मानवी जीवन सुधारू शकते.

एआयचलित अनुकूल शिक्षण प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजांनुसार सामग्री तयार करू शकतात. सरकारी योजनांमध्ये प्रक्रिया वेळ कमी केल्याने सार्वजनिक सेवांची कार्यक्षमता वाढू शकते. हॅकिंगच्या प्रयत्नांना तोंड देण्यासाठी एआय रिअल-टाइममध्ये विसंगती आणि धोके शोधू शकते. ते पारंपरिक प्रणाली शोधू शकत नाहीत.



Source link

अजितदादांनी आयुष्यभर जी गोष्ट जीवापाड जपली तोच वसा सुनेत्रा वहिनी पुढे नेणार, कराडमध्

0


Sunetra Pawar at Satara: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यात कायम शीर्षस्थानी राहिलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वसा आता त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडून पुढे चालवला जाताना दिसत आहे. सुनेत्रा पवार या सोमवारी सातारा आणि फलटणचा (Phaltan news) दौरा करणार आहेत. यावेळी सुनेत्रा पवार कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधीची दर्शन घेतील. अजित पवार यांच्या राजकीय जीवनात यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आणि त्यांचे विचार नेहमीच महत्त्वाचे राहिले. अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेकदा आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. आपल्या भाषणांमधून ते अनेकदा आपले राजकारण आणि समाजकारण हे यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीचे असल्याचे सांगायचे. त्यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवारही हाच वसा पुढे नेताना दिसत आहेत. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत.  सकाळी 10  वाजता कराड येथील प्रितीसंगम बाग येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पमाला अर्पण करत त्यांना आदरांजली वाहतील.  यानंतर दुपारी 11  वाजता उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार मोटारीने फलटणकडे रवाना होतील. दुपारी 1 वाजता त्या कै. विदीप जाधव यांच्या निवासस्थानी (लोणंद, तरडगाव, ता. फलटण) कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होणार आहेत. अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला तेव्हा सुरक्षारक्षक विदीप जाधव हे त्यांच्यासोबत विमानात होते. विमान कोसळल्यानंतर विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. कालच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. यानंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीत परतणार आहेत. 

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारीला बारामती येथे अपघात झाला होता. विमान खाली कोसळल्यानंतर प्रचंड स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्नायकी परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे 31 जानेवारीला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अजित पवार यांच्याकडील अर्थ खाते सुनेत्रा पवार यांना देण्यात आले नसले तरी क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास या तीन खात्यांचे मंत्रीपद सुनेत्रा पवार यांना देण्यात आले होते. 

आणखी वाचा

विमान अपघातावेळी ‘धुकं नव्हतं तर तिथं धोका’ होता, अजितदादांचा 100 टक्के घात झालाय; आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केली शंका, म्हणाले, जोपर्यंत..

आणखी वाचा



Source link