Monday, August 17, 2026
Homeसातारामाघ पौर्णिमा व संत रविदास महाराज ६४९ वी जयंतीनिमित्त धम्ममित्र बालसंस्कार वर्गाचा...

माघ पौर्णिमा व संत रविदास महाराज ६४९ वी जयंतीनिमित्त धम्ममित्र बालसंस्कार वर्गाचा प्रेरणादायी कार्यक्रम


फलटण :-  सोमवार पेठ | BSI मिशन २५ माघ पौर्णिमेचे पावन औचित्य व संत रविदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त सोमवार पेठ येथे धम्ममित्र बालसंस्कार वर्ग यांच्या वतीने एक प्रेरणादायी व विचारप्रवर्तक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संत रविदास महाराजांच्या जीवनकार्याला भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. सागर भोईटे सर उपस्थित होते. त्यांनी संत रविदास महाराज यांच्या समता, मानवता व श्रमप्रतिष्ठेच्या विचारांवर सखोल मार्गदर्शन केले. संत रविदास महाराजांचा विचार आजच्या पिढीसाठी किती आवश्यक आहे, हे त्यांनी प्रभावी शब्दांत स्पष्ट केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले पुस्तक संत रविदास यांना अर्पण केले आहे.
यावेळी समर्थ न्यूजचे संपादक व पत्रकार बंधू श्री. गणेश भोईटे सर उपस्थित होते. तसेच समर्थ २४ तास न्यूज नेटवर्कचे सहसंपादक गणेश भोईटे व सागर भोईटे सर यांनी आपल्या मनोगतातून संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यामागील सामाजिक आशय मांडला.
कार्यक्रमात चंद्रकांत मोहिते यांनी माघ पौर्णिमेचे महत्त्व व उपोसथ व्रत या विषयावर मार्गदर्शन करत बौद्ध परंपरेतील शील, ध्यान व प्रज्ञेचे महत्त्व विशद केले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सरचिटणीस बाबासाहेब जगताप सर यांनी धम्ममित्र बालसंस्कार वर्गाच्या सातत्यावर भर देत, “आम्ही असो वा नसो, हा वर्ग तुम्ही सर्वांनी पुढे नेलाच पाहिजे,” असे सांगून आयोजक, पालक व बालकांना प्रेरणा दिली.
या कार्यक्रमास धम्ममित्र बालसंस्कार व्यवस्थापक तसेच
प्रदीप खरात, विशाल शिंदे, विकी भोसले, भीमराव लोंढे, गणेश सावंत, मनीष लोखंडे, सचिन बनसोडे, राजपाल लोंढे, किशोर मोर, प्रकाश नाना शिलवंत, गणेश भोसले, अमोल मोरे, राजू सावंत, शामराव लोंढे, बाळू शिलवंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा समारोप संत रविदास महाराज यांच्या जीवनकार्याचा संदेश बालकांच्या मनात रुजवण्याचा संकल्प करत करण्यात आला. हा उपक्रम BSI मिशन २५ अंतर्गत समाजप्रबोधन व बालसंस्कार घडवणारा ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments