Monday, June 29, 2026
Home Blog Page 57

फलटण एमआयडीसीतील मुख्य रस्त्याचे चार पदरी रुंदीकरण; १० कोटींच्या कामास तत्वतः मान्यता

0
फलटण एमआयडीसीतील मुख्य रस्त्याचे चार पदरी रुंदीकरण; १० कोटींच्या कामास तत्वतः मान्यता


फलटण : फलटण औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) सुरवडी, नांदळ व ढवळेवाडी गावांच्या सीमेवरील सुमारे १८८.०३ हेक्टर जमीन संपादित केली आहे. हे औद्योगिक क्षेत्र पुण्यापासून ८७ किमी तर फलटणपासून १४ किमी अंतरावर महाड–पंढरपूर राज्य महामार्ग क्रमांक ७० वर वसलेले आहे.
फलटण एमआयडीसीतील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी १० कोटी रुपयांच्या कामास तत्वतः मान्यता दिली असून, आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
सुरुवातीला एमआयडीसीने या औद्योगिक क्षेत्रात १०० हेक्टरवर सेझ (SEZ) विकसित केले होते, तर उर्वरित ८८ हेक्टरवर जनरल इंजिनिअरिंग झोन आहे. त्यापैकी आता ५० हेक्टर क्षेत्र सेझमधून वगळून जनरल इंजिनिअरिंग झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या क्षेत्रात मेसर्स कमिन्स इंडिया लिमिटेड यांना एकूण ५ भूखंडांचे वाटप करण्यात आले असून सर्व युनिट्स सध्या उत्पादनात आहेत.
एमआयडीसीने एकूण २६७ भूखंडांचा लेआउट तयार केला असून, त्यापैकी १४१ भूखंडांचे वाटप झाले आहे. यातील ११ भूखंडधारकांनी प्रत्यक्ष उत्पादन सुरू केले आहे. पाणीपुरवठ्यासाठी ४ एमएलडी क्षमतेचा जलवाहिनी प्रकल्प तसेच लोणंद ते फलटण २३ किमी लांबीची ४५० मिमी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे.
औद्योगिक क्षेत्राला जोडणारा ७.५० मीटर रुंदीचा १.९५ किमी लांबीचा मुख्य रस्ता २०१२–१३ मध्ये बांधण्यात आला होता. २०१९–२० मध्ये या रस्त्याचे अंतिम डांबरीकरण करण्यात आले. मात्र, हा रस्ता महाड–पंढरपूर महामार्गाशी जोडलेला असल्याने तसेच कमिन्ससारख्या मोठ्या उद्योगांच्या जड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि स्थानिक ग्रामस्थांचा वापर लक्षात घेता, अपघातांचा धोका वाढला आहे.
याच पार्श्वभूमीवर कमिन्स इंडिया लिमिटेडने २१ मार्च २०२२ रोजी रस्ता रुंदीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार आता हा रस्ता दोन पदरीवरून चार पदरी, म्हणजेच ७.५० मीटरवरून ११ मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे. यामध्ये डीबीएम, बीएम आणि बीसी थरांचे डांबरीकरण, तसेच साइन बोर्ड, थर्मोप्लास्टिक स्ट्रिप्स व झेब्रा क्रॉसिंग यांसारख्या रस्ते सुरक्षेच्या सुविधांचा समावेश असेल.
या कामासाठी पीडब्ल्यूडी एसएसआर २०२२–२३ नुसार ७२८.०९ लाख रुपये (निव्वळ) आणि ८३७.३१ लाख रुपये (एकूण) खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रस्ता रुंदीकरणामुळे औद्योगिक वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

भारतीय पुरुषांमध्ये एकटेपणा का वाढलाय? त्यांच्यासाठी ‘सुरक्षित जागा’ का आवश्यक? जाणून घ्या

0
भारतीय पुरुषांमध्ये एकटेपणा का वाढलाय? त्यांच्यासाठी ‘सुरक्षित जागा’ का आवश्यक? जाणून घ्या


Male loneliness: भारतीय समाजात लहानपणापासून मुलांना “मजबूत” राहण्याचे आणि भावना लपवण्याचे शिकवले जाते. “पुरुषांना वेदना होत नाही” अशा म्हणींमुळे ते कमकुवतपणा दाखवत नाहीत. किंवा कुणाच्या खांद्यावर डोके ठेवून रडू शकत नाहीत. यामुळे युवकांच्या मनात एकाकीपण वाढत जातो. जनरेशन झेडमधील तरुणांना हे ओझं अधिक जाणवते. कारण ते भावनिक आधार शोधतात पण सामाजिक नियमांमुळे त्यांना तो मिळत नाही. परिणामी ते एकटे पडतात आणि मानसिक आरोग्य बिघडते. हा दबाव कमी करण्यासाठी भावना व्यक्त करण्याची स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे.

Add Zee News as a Preferred Source

डिजिटल जीवनातील एकटेपणा

आजच्या डिजिटल युगात हातात मोबाइल असतो पण मनातील व्यथा ऐकणारा खरा मित्र नसतो. सोशल मीडिया आणि ऑनलाइन जगात तरुण व्यस्त राहतात, पण खोलवरच्या नात्यांची कमतरता जाणवते. करिअरच्या धावपळीत आणि यशस्वी दिसण्याच्या दबावात ते गर्दीतही एकटे वाटतात. जनरेशन झेडमधील युवकांना हे अधिक त्रासदायक ठरते, कारण ते वास्तविक संवादाची अपेक्षा करतात पण मिळवू शकत नाहीत. यामुळे अकेलेपनाची भावना वाढते आणि ते भावनिकदृष्ट्या अलग पडतात. खरे नाते जोडण्यासाठी ऑफलाइन जगात प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

करिअरचा दबाव

तरुण पुरुषांना करिअरमध्ये यश मिळवण्याचा आणि “सक्सेसफुल” दिसण्याचा प्रचंड दबाव असतो. यामुळे ते सतत कामात बुडून राहतात आणि वैयक्तिक जीवनाकडे दुर्लक्ष करतात. जनरेशन झेडमध्ये हे अधिक दिसते, कारण स्पर्धात्मक जगात ते स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात एकटे पडतात. घर, नातेसंबंध आणि जबाबदाऱ्यांमध्ये ते स्वतःला विसरतात. याचा परिणाम म्हणजे मानसिक तणाव वाढतो आणि अकेलेपनाची जाणीव होते. हे टाळण्यासाठी संतुलित जीवनशैली अवलंबणे आवश्यक आहे.

एकाकीपणाची लक्षणे 

एकाकीपणा पुरुषांमध्ये दुःखाच्या रूपात नव्हे तर इतर वर्तनात दिसतो. ते अतिआवश्यक कामात बुडून राहतात (वर्कहोलिझम), चिडचिड करतात किंवा छोट्या गोष्टींवर रागावतात. सामाजिक अंतर वाढते, मित्रांशी बोलणे टाळतात आणि एकटे राहण्याची सवय लागते. झोप आणि भूक यात बदल होतात. जास्त झोपणे किंवा न झोपणे, खाण्याकडे दुर्लक्ष. दारू किंवा नशेच्या व्यसनाकडे वळतात. ही लक्षणे ओळखून वेळीच मदत घेणे गरजेचे आहे, अन्यथा ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकते.

एकाकीपणा रोखण्याचे उपाय 

एकाकीपणातून बाहेर पडण्यासाठी जुन्या विचारांना बदलणे आवश्यक आहे. मदत मागणे किंवा भावना व्यक्त करणे हे कमकुवतपणा नव्हे तर सामर्थ्याच लक्षण आहे. जुन्या मित्रांशी बोलणे, छंद जोपासणे. खेळ, जिम, चित्रकला किंवा संगीत – यामुळे व्यस्त राहता येते आणि नवीन लोक भेटतात. भावनांना व्यक्त करण्यात लाज वाटू नये. जर एकाकीपणा जास्त असेल तर थेरपिस्ट किंवा काउंसेलरची मदत घ्या. प्रत्येक पुरुषाला ‘सेफ स्पेस’ हवी, जिथे न्याय न करता भावना व्यक्त करता येतील. यामुळे भावनिक आराम मिळतो, तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे एकाकीपणा हा वैयक्तिक नव्हे तर सामाजिक मुद्दा आहे. ज्यासाठी समाजाने वातावरण बदलणे गरजेचे आहे.





Source link

अकाली निधनाने हळहळ; रामराजे नाईक निंबाळकर यांची तरडगाव येथे जाधव कुटुंबीयांना धीराची भेट

0
अकाली निधनाने हळहळ; रामराजे नाईक निंबाळकर यांची तरडगाव येथे जाधव कुटुंबीयांना धीराची भेट

फलटण :- स्व. अजितदादा पवार यांचे अंगरक्षक स्व. विदीप जाधव यांच्या अकाली निधनामुळे तरडगाव गावावर शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाधव कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी स्व. विदीप जाधव यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या दुःखात राजे कुटुंब पूर्णपणे सहभागी असल्याची भावना रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. तसेच भविष्यात जाधव कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या भेटीवेळी जाधव कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. परिसरात शोकमय वातावरण होते.

तेरावा झाल्यानंतरच राजकीय चर्चा, रोहित पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष अन् व्हायरल व्हिडिओबाबत मांडली भूमिका

0


अजित दादांची बातमी आपण ऐकली, बातमी खरी आहे का स्वप्न आहे हे आम्हालाही कळत नाही. आजपर्यंत आम्ही त्या दु:खात आहोत, त्या विमानात आणखी जे होते त्यांचाही परिवार दुःखात होता. काही दिवसांपूर्वी कळले की, दिंडोरी तालुक्यातील सुदाम बोडके हे अजित दादांचे आणि साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. जेव्हा त्यांना अजित दादांच्या निधनाची बातमी कळली, तेव्हा अस्वस्थ झाले नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. आज पवार परिवार आणि हा परिवार दुःखात आहे. त्यामुळे, मी बोडके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, 9 तारखेपर्यंत मी कुठलीही राजकीय चर्चा करणार नाही. अजित दादांच्या तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मी राजकीय विषयावर भाष्य करेन, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.  

तेरावा ज्या दिवशी होईल, त्या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन सांगेल, आता राजकीय बोलणे ते योग्य नाही. दादांसोबत काय चर्चा झाली, सगळ्या प्रक्रियेत मी होतो, मात्र तेरा दिवसांनी सांगेल, असे म्हणत रोहित पवारांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओ अजित दादांसोबत काय चर्चा झाली, याबाबतचे बोलणे सध्यातरी टाळले. तसचे, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यावरही रोहित पवारांनी परखडपणे भूमिका मांडली. 



Source link

विमान अपघातात वीर सुपुत्राचे दुःखद निधन; तरडगावचे विदीप जाधव यांना अनिकेतराजेंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

0
विमान अपघातात वीर सुपुत्राचे दुःखद निधन; तरडगावचे विदीप जाधव यांना अनिकेतराजेंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली


फलटण :-  बारामती येथे बुधवारी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात फलटण तालुक्यातील तरडगाव येथील सुपुत्र व कै. अजितदादा पवार यांचे जवळचे अंगरक्षक कै. विदीप जाधव यांचे अपघाती निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण फलटण तालुक्यात शोककळा पसरली असून जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुःखद घटनेनंतर फलटण संस्थांचे युवराज नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी तरडगाव येथील जाधव कुटुंबीयांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी कै. विदीप जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
श्रीमंत अनिकेतराजे यांनी कै. विदीप जाधव यांच्या पत्नी, मुले तसेच आई-वडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व या कठीण प्रसंगी त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी नाईक निंबाळकर राजघराणे जाधव कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारेल, अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता बापू अनपट यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. विदीप जाधव यांच्या निधनाने एक निष्ठावान अंगरक्षक आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Budget 2026: इनकम टॅक्सबाबत मोठा बदल, ITR भरण्याच्या तारखांबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घ्या

0
Budget 2026: इनकम टॅक्सबाबत मोठा बदल, ITR भरण्याच्या तारखांबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घ्या


Income Tax Slab for AY 2026-27 New Regime: केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 आज संसदेत सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक क्षेत्राविषयी माहिती दिली. यावेळी अर्थमंत्र्यांनी करदात्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. विशेषतः मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देणारे निर्णय यंदाच्या बजेटमध्ये पाहायला मिळाले. इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, आता करदात्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या डेडलाईन्स ठरवण्यात येणार आहेत. ITR फाइलिंगच्या तारखांमध्ये महत्त्वाचा नक्की काय बदल झाले आहेत याबद्दल जाणून घेऊयात… 

Add Zee News as a Preferred Source

काय असणार आता तारीख?

आत्तापर्यंत बहुतांश वैयक्तिक करदात्यांसाठी 31 जुलै ही अंतिम तारीख अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, यंदाच्या बजेटनंतर ही पद्धत बदलली आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की वेगवेगळ्या प्रकारचे ITR (उदा. ITR-1, ITR-2) भरणाऱ्या करदात्यांसाठी वेळापत्रक अधिक नियोजित पद्धतीने ठरवले जाईल. त्यामुळे करदात्यांना शेवटच्या क्षणी घाईगडबड न करता निवांतपणे रिटर्न दाखल करता येईल. या निर्णयामुळे आयकर पोर्टलवरील तांत्रिक अडचणी कमी होतील आणि रिफंड प्रक्रिया अधिक वेगाने पार पडेल, असा सरकारचा विश्वास आहे.

 हे ही वाचा: Medical Budget 2026: मधुमेह, कॅन्सरची औषधं स्वस्त! आरोग्य क्षेत्राला बजेटमध्ये काय मिळाले? जाणून घ्या एका क्लिकवर

 

नवीन इनकम टॅक्स कायदा कधी लागू होणार?

अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात आणखी एक मोठी घोषणा केली ती म्हणजे देशात नवीन इनकम टॅक्स कायदा लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल. हा कायदा याच वर्षापासून अंमलात येणार आहे. दशकानुदशके अस्तित्वात असलेली गुंतागुंतीची कररचना बदलून, अधिक सोपी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख व्यवस्था उभारणे हा या नव्या कायद्याचा उद्देश आहे.

 हे ही वाचा: Nirmala Sitharaman Budget Saree Look: 2019 ते 2026…बघा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे ‘बजेट लूक’! यंदाच्या साडीत काय आहे खास? जाणून घ्या

 

यामुळे करचुकवेगिरीवर नियंत्रण राहील, तसेच सामान्य नागरिकांसाठी टॅक्स भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. भविष्यात टॅक्स स्लॅब्स आणि सूट नियमांमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार?

बजेट 2026 मधील हे निर्णय थेट सामान्य नागरिकांच्या सोयीसुविधा आणि खर्चाशी संबंधित आहेत. नवीन इनकम टॅक्स कायद्यामुळे कागदपत्रांचा त्रास कमी होईल आणि डिजिटल फाइलिंगला अधिक चालना मिळेल. तर परदेश प्रवासावरील कर कपात केल्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही सकारात्मक बूस्ट मिळण्याची अपेक्षा आहे. मध्यमवर्गीयांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सरकार आता करप्रणालीला ‘भितीदायक’ न ठेवता ‘सहकार्याची’ बनवण्याच्या दिशेने पावले टाकताना दिसत आहे.





Source link

सुरवडी गणात वंचित बहुजन आघाडीचे रणजित मोहितेंचा भावनिक प्रचार दौरा;‘ही लढाई सत्तेसाठी नाही, तर माणसाच्या सन्मानासाठी’

0
सुरवडी गणात वंचित बहुजन आघाडीचे रणजित मोहितेंचा भावनिक प्रचार दौरा;‘ही लढाई सत्तेसाठी नाही, तर माणसाच्या सन्मानासाठी’

फलटण : सुरवडी गणात वंचित बहुजन आघाडीचे रणजित मोहितेंचा भावनिक प्रचार दौरा; ‘ही लढाई सत्तेसाठी नाही, तर माणसाच्या सन्मानासाठी’
निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे पंचायत समिती सुरवडी गण येथील उमेदवार रणजित मोहिते यांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रभावी आणि भावनिक प्रचार दौरा केला. घराघरांत जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधत स्वतःची ओळख करून दिली तसेच वंचित बहुजन आघाडीचे विचार आणि पक्षाचे चिन्ह मतदारांसमोर मांडले.
या प्रचार दौऱ्यात रणजित मोहिते यांनी सर्व कष्टकरी, शोषित, वंचित, गरीब आणि सामान्य घटकांचे प्रश्न हाच आपल्या लढ्याचा केंद्रबिंदू असल्याचे ठामपणे सांगितले. ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत “सत्तेच्या खुर्चीसाठी नव्हे, तर माणसाच्या सन्मानासाठी ही निवडणूक लढवली जात आहे,” असा भावनिक संदेश देत त्यांनी मतदारांच्या मनाला हात घातला.
या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. घोषणाबाजी, जनसंवाद आणि संघटनेची ताकद या माध्यमातून परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. नागरिकांनीही उमेदवाराला भरभरून प्रतिसाद देत आपल्या अपेक्षा मांडल्या.
सुरवडी गणात सामाजिक न्याय, समानता आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी रणजित मोहितेंचा प्रचार दौरा चर्चेचा विषय ठरत असून, वंचित बहुजन आघाडीची उपस्थिती अधिक ठळक होताना दिसत आहे.

सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा साताऱ्याला, विदीप जाधवांच्या कुटुंबीयांची भेट घेणार

0


मुंबई : राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) दोन दिवसात सातारा दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला त्या अभिवादन करणार आहेत. तसेच अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचं बारामती विमान अपघातात निधन झालं होतं. विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगावचे होते. त्यांच्या निधनानंतर या आधी पवार कुटुंबीयांतील आमदार रोहित पवारांनी भेट घेतली होती. आता सुनेत्रा पवारही त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला जाणार आहेत. 

Vidip Jadhav : विदीप जाधव यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आलं. तरडगावमध्ये 29 जानेवारी रोजी रात्री उशिरा पार्थिव पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढून अंत्यविधीच्या ठिकाणी त्यांना पोलीस सलामी देऊन अखेरचा निरोप देण्यात आला. विदीप जाधव यांच्या जाण्याने पोलीस दल, कुटुंबीय, त्यांचा मित्रपरिवार आणि गावावर मोठी शोककळा पसरल्याचं दिसून आलं. 

सुनेत्रा पवारांची पोस्ट

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क या विभागाचा पदभार असेल. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक्स पोस्ट केली. ती खालीलप्रमाणे,

आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.

दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.

मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट केली. कठीण प्रसंगातही सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला. तो कौतुकास्पद आणि धाडसी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसंचं अजितदादांचा वारसा सुनेत्रा पवार समर्थपणे चालवतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

स्व. विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी रोहित पवारांकडून”

0
स्व. विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी रोहित पवारांकडून”

फलटण :- फलटण तालुक्यातील तरडगाव येथील स्व. विदीप जाधव यांच्या कुटुंबियांसाठी आमदार रोहित पवार हे आधारवड ठरले आहेत. माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या सोबत झालेल्या अपघातात अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना विदीप जाधव यांचे दुर्दैवी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले – कु. नेत्रा व अद्विक – असा परिवार आहे.
या घटनेनंतर अनेक राजकीय नेतेमंडळींनी केवळ सांत्वनपर भेटी दिल्या. मात्र प्रत्यक्ष जबाबदारी उचलण्याचे धाडस आमदार रोहित पवार यांनी दाखवले. त्यांनी स्व. विदीप जाधव यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
आमदार रोहित पवार यांनी तरडगाव येथे जाधव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी “विदीप जाधव यांनी कर्तव्य बजावताना आपले प्राण गमावले. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. नेत्रा आणि अद्विक यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ देणार नाही,” असा शब्द दिला.
या निर्णयामुळे जाधव कुटुंबियांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. कठीण काळात कुणीतरी खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्याने कुटुंबियांनी आमदार रोहित पवार यांचे मनापासून आभार मानले. “नेते फक्त आश्वासने देतात, पण रोहित पवार यांनी कृतीतून दाखवून दिले,” अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त केली.
फलटण तालुक्यात या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक जाणिवेचे आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. राजकारण केवळ सत्तेसाठी नसून समाजासाठीही असते, हे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राजघराणे दुःखात सहभागी; कै. अजित पवार यांना श्रद्धांजली

0
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राजघराणे दुःखात सहभागी; कै. अजित पवार यांना श्रद्धांजली

फलटण :- कै. अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून या दुःखद प्रसंगात फलटणचे नाईक निंबाळकर राजघराणे पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले आहे. पवार कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखातून सावरण्यास बळ मिळावे तसेच कै. अजित पवार यांना सद्गती लाभावी, यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ईश्वरचरणी प्रार्थना करत श्रद्धांजली अर्पण केली.
काल बारामती येथे कै. अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यां सुनेत्राताई  पवार व त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी दोघांनीही कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली व कै. अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
तसेच याच दौऱ्यादरम्यान श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी बारामती येथील शरदचंद्र पवार यांच्या ‘गोविंद बाग’ निवासस्थानी जाऊन त्यांचीही सांत्वनपर भेट घेतली.