Sunday, June 28, 2026
Home Blog Page 54

चिमणराव कदम यांची पुण्याई सह्याद्री कदम यांच्या विजयाची पायाभरणी ठरणार?

0
चिमणराव कदम यांची पुण्याई सह्याद्री कदम यांच्या विजयाची पायाभरणी ठरणार?


फलटण–खंडाळा तालुक्याच्या राजकारणात १९८० ते १९९५ या कालखंडात आमदार म्हणून ठसा उमटवणारे सूर्याजीराव ऊर्फ चिमणरावजी कदम हे नाव आजही जनतेच्या स्मरणात आहे. सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी तालुक्याचे नेतृत्व केले. या काळात रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा, तसेच बजेट इस्टिमेट कमिटीचे अध्यक्षपद भूषवत त्यांनी प्रभावी कामगिरी केली.
आमदार होण्यापूर्वी तब्बल ११ वर्षे पंचायत समिती सभापती, २ वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि २० वर्षे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून काम करत त्यांनी अभ्यासू व कर्तबगार नेतृत्वाची ओळख निर्माण केली. महाराष्ट्र विधानसभेमधील ‘मुलुख मैदान तोफ’ म्हणून ते राज्यभर परिचित होते.
दुष्काळी भागातील शेतकरी, शेतमजूर, दिनदलित व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी कायम आवाज उठवला. नाला बंडिंग, पाझर तलाव, के.टी. बंधारे, गाव तिथे दवाखाना, एसटी सेवा, रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या योजनांसारखी अनेक समाजोपयोगी कामे त्यांच्या कार्यकाळात झाली.
सर्वसामान्य जनतेचा कैवारी म्हणून ओळख निर्माण करताना त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली. आजही फलटण तालुक्यात चिमणरावजी कदम यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते सक्रिय आहेत.
हीच पुण्याई आता त्यांचे सुपुत्र व युवा नेते सह्याद्री भैया कदम यांना कोळकी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवताना लाभदायक ठरणार का, असा प्रश्न जनतेत चर्चेत आहे. मात्र, जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि जनसंपर्क पाहता सह्याद्री कदम यांचा विजयाचा मार्ग सुकर होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, चिमणराव कदम यांच्यानंतर फलटण तालुक्याचे नेतृत्व माजी विधान परिषद सभापती आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्याकडे आले. त्यांनी जलक्रांती, औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून तालुक्याचा चेहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनीही चांगला जनसंपर्क ठेवत लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाचे म्हणजे, चिमणरावजी कदम हयात असताना त्यांनीही कळत-नकळत राजघराण्याच्या राजकारणाला पूरक भूमिका घेतली होती. तालुक्याची सूत्रे सुसंस्कृत घराण्याकडे जावीत आणि तालुका प्रगतीच्या दिशेने जावा, अशीच त्यांची भूमिका होती.
याच भूमिकेचा पुढचा भाग म्हणून राजघराण्याने आज सह्याद्री कदम यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कोळकी गटातून सह्याद्री कदम यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

जेवण शिजवताना ‘या’ चुका करणे टाळा, नाहीतर तुम्हीच तुमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आणाल!

0
जेवण शिजवताना ‘या’ चुका करणे टाळा, नाहीतर तुम्हीच तुमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आणाल!


Manali Sagvekar

सध्या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी ‘सकाळ मीडिया’ ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ – एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, ‘साम टीव्ही मराठी’मध्ये (जुलै २०२५ – सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.

…Read More





Source link

शीला भट्ट यांचा कॉलम: दक्षिणेकडील राजकारणावरही लक्ष ठेवा!‎

0
शीला भट्ट यांचा कॉलम:  दक्षिणेकडील राजकारणावरही लक्ष ठेवा!‎




‎‎‎‎‎‎‎‎‎‎तामिळनाडूमध्ये प्रादेशिक राजकारणाचा एक अध्याय‎सुरू होणार आहे. त्याचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम‎होईल. तज्ञांनुसार दशकांनंतर तमिळनाडूत त्रिकोणीय‎स्पर्धा होऊ शकते. यावेळी त्रिशंकू विधानसभेची शक्यता‎आणखी आश्चर्यकारक आहे. दक्षिण भारतातील या‎महत्त्वाच्या राज्यात राजकारणातील मूलभूत गोष्टी बदलत‎आहेत. यावेळी निवडणुका केवळ हिंदी विरुद्ध तमिळ‎आणि उत्तर विरुद्ध दक्षिण या बद्दल नाहीत. या निवडणुका‎केवळ तमिळ संस्कृतीचे रक्षण करण्याबद्दल नसतील. त्या‎तमिळनाडूचे स्वरूप बदलण्याबद्दल देखील असतील. या‎खेळात पत्ते अद्याप पूर्णपणे उघड झालेले नाहीत. परंतु हा‎मुकाबला खूप मनोरंजक ठरला आहे.‎ विधानसभेतील 234 जागांपैकी 133 जागा सत्ताधारी‎द्रमुककडे आहेत. इतर सर्व पक्ष द्रमुकचे मुख्यमंत्री एमके‎स्टॅलिन यांच्याविरुद्ध युती करत आहेत. त्यामुळे या‎निवडणुकीत द्रमुकचा पूर्णपणे पराभव करण्याचे आव्हान‎त्यांच्यासाठी आहे. अनेक वर्षांपासून तामिळनाडूत द्रमुक‎विरुद्ध अण्णा द्रमुक उभे राहिले आहे आणि मुकाबला‎नेहमीच या दोन द्रविड पक्षांत राहिला आहे. व्यक्ती पूजेचे‎राजकारण हे तामिळनाडूचे वैशिष्ट्य राहिले आहे.‎अण्णादुराई, एमजी रामचंद्रन, करुणानिधी आणि‎जयललिता यासारख्या महान व्यक्तींना तमिळ लोकांनी‎अवर्णनीय आदराने स्वीकारले होते. पण आज‎तामिळनाडूमध्ये त्यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याची कमतरता‎आहे. पक्षाच्या पलीकडे जाणारा आणि तमिळ संस्कृतीचा‎एक शक्तिशाली रक्षक असलेल्या नेत्याची कमतरता‎आहे. विशेषतः जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा‎द्रमुककडे आता त्यांच्या दर्जाचा नेता राहिलेला नाही.‎पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद वाढले आहेत. यामुळे ते ‎‎द्रमुकविरोधी भावनांचा पूर्णपणे फायदा घेऊ शकत नाही. ‎‎द्रविड भूमीत आपली मुळे रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‎‎भाजपकडे ना करिष्माई नेता आहे ना द्रविड रणनीती‎समजून घेणारा तमिळ भाषिक तज्ञ. कदाचित भाजपला‎पक्ष व विचारसरणीपेक्षा मोठे स्थान असलेल्या ‎‎व्यक्तिमत्त्वाची गरज नसेल. भाजप ही निवडणूक एकाच ‎‎उद्दिष्टाने लढत आहे : काहीही झाले तरी द्रमुकचा पराभव ‎‎करणे. तामिळनाडूमध्ये काँग्रेस पूर्णपणे द्रमुकच्या‎सावलीत वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना‎फक्त नऊ जागा मिळाल्या. द्रमुक तामिळनाडूमध्ये हरला‎तर केंद्रात काँग्रेसची स्थिती सध्याच्यापेक्षा अधिक‎कमकुवत होईल. द्रमुकचे लोकसभेत 22 खासदार आहेत.‎ते प्रत्येक मुद्द्यावर मोदी सरकारचा तीव्र विरोध करतात. ‎‎आज देशात भाजपविरोधी दोन मजबूत बालेकिल्ले‎आहेत: बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमध्ये ‎‎स्टालिन. तामिळनाडूमध्ये भाजप संघटनेत द्रमुकची‎बरोबरी करणारा नेता नाही. हे देखील खरे आहे की 2026‎च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुका भाजपच्या ‎‎नेतृत्वाखालील निवडणुका नाहीत. या निवडणुकीत‎अमित शाह हे मुख्य रणनीतीकार आहेत. त्यांना‎द्रमुकविरुद्ध प्रभावी युती करण्यात काही प्रमाणात यश ‎‎मिळाले आहे. एप्रिल 2024 मध्ये भाजप आणि अण्णा‎द्रमुकने तामिळनाडू निवडणूक लढवण्यासाठी युती केली.‎गेल्या तीन महिन्यांत अमित शाह आणि प्रभारी पियुष‎गोयल यांनी गौंडर आणि वाणीयार जातींना एनडीएमध्ये‎सामील होण्यासाठी राजी केले आहे. दरम्यान, गेल्या दोन‎वर्षांपासून द्रमुकचा प्रचार प्रामुख्याने भाजपच्या‎विचारसरणीविरुद्ध आहे. भविष्य लक्षात घेऊन स्टॅलिन‎यांनी त्यांचा मुलगा उदयनिधी यांना प्रोत्साहन दिले आहे.‎आज उदयनिधी हे द्रमुकच्या भाजपविरोधी राजकारणाचे‎मुख्य प्रचारक आहेत. स्टॅलिन अनेक संकटांनी वेढलेले‎आहेत. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, त्यांचा मुलगा‎उदयनिधी यांना त्यांचा उत्तराधिकारी बनवण्याचा त्यांचा‎दृढनिश्चय व राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्थेची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎परिस्थिती यामुळे द्रमुकच्या विरोधाचे वातावरण निर्माण‎होत आहे. बदलत्या जमिनीवरील वास्तवामुळे एकेकाळी‎द्रमुकचा सहकारी असलेला काँग्रेसही द्रमुकपासून वेगळे‎निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. परंतु तसे‎होण्याची शक्यता कमी आहे. पण तामिळनाडूच्या‎निवडणुका अभूतपूर्व होणार असतील तर त्या स्टॅलिन‎किंवा विरोधी पक्षनेते पलानीस्वामी (ईपीएस) यांच्यामुळे‎नाहीत. खरे तर तमिळ सुपरस्टार विजय यांनी सर्वांनाच‎प्रभावित केले आहे. अनेक सर्वेक्षणांमध्ये सुमारे 25%‎मतदारांमध्ये विजयला पाठिंबा असल्याचे दिसून आले‎आहे. हे लोक विजयच्या टीव्हीके (तामिळनाडू वेत्री‎कझगम) पक्षाला मतदान करत असले तरी‎निवडणुकीच्या निकालांचा अंदाज कोणीही लावू शकत‎नाही. विजय काँग्रेससोबत आल्यास द्रमुकला 20 जागाही‎मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा अंदाज‎बांधणारे लोकही काँग्रेसमध्ये आहेत. पण विजयला‎कोणीही सहजासहजी घेणार नाही. त्याच्याकडे प्रचंड‎आत्मविश्वास आणि भरपूर पैसा आहे. तो आजचा सर्वात‎लोकप्रिय सुपरस्टार आहे. तो इतर पक्षाच्या नेत्यांना सहज‎भेटत नाही आणि घटनांवर तो लवकर प्रतिक्रिया देत‎नाही. संपूर्ण तामिळनाडूमध्ये त्याच्याकडे उभे करण्यासाठी‎पुरेसे उमेदवार नाहीत. परंतु बिघडत्या परिस्थितीमुळे लोक‎इतके संतापले आहेत की ते विजयवर आशा ठेवत आहेत.‎विजयला दलित, महिला आणि तरुणांचा पाठिंबा आहे.‎ खरे तर, लोक दोन्ही द्रविड पक्षांना इतके कंटाळले आहेत‎की द्रमुकच्या विरोधात असणारी निवडणूक मतदानाच्या‎दिवशी विजयसाठी अनुकूल निवडणुकीत रूपांतरित‎झाली तर आश्चर्य वाटणार नाही. भाजपविरुद्ध कोणतेही‎महत्त्वाचे विधान न केल्याबद्दल द्रमुक नेते विजयवर‎जोरदार टीका करतात. सेन्सॉर बोर्डाने त्यांचा महागडा‎चित्रपट ब्लॉक केला आहे.‎ तरीही, ते भाजपविरुद्ध बोलण्यात अपयशी ठरले. यामुळे‎भाजप द्रमुकविरुद्ध युक्ती खेळत असल्याच्या अफवांना‎बळकटी मिळाली आहे. सध्या सुरू असलेले सर्वेक्षण‎सर्वांना गोंधळात टाकण्यासाठी पुरेसे आहेत. तज्ज्ञांनुसार‎विजय द्रमुक आणि अण्णा द्रमुक दोघांचेही नुकसान‎होईल. अशा परिस्थितीत द्रमुक निवडणूक जिंकण्याचा‎सर्वतोपरी प्रयत्न करेल. अगदी थोड्या फरकानेही. कारण‎विजयच्या प्रवेशामुळे द्रमुकविरोधी मते फुटण्याची शक्यता‎आहे. दरम्यान, भाजप तामिळनाडूमध्ये त्रिशंकू‎विधानसभा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. त्यात ते‎एनडीएमध्ये सरकार स्थापन करण्यात किंवा चालवण्यात‎भूमिका बजावू शकेल.‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)‎ द्रविड राजकारणात एक नवीन‎त्रिकोणीय संघर्ष उदयास‎गेल्या अनेक वर्षांपासून तामिळनाडूत द्रमुक‎आणि अण्णाद्रमुक मैदानात आहे. हा‎मुकाबला सामान्यपणे दोन द्रविड पक्षांत‎असतो. आज त्यांच्याकडे लोकप्रिय नेता‎नाही. विजय त्यांच्यासमोर कठीण आव्हान‎उभे करत आहेत. भाजप- काँग्रेस या‎समीकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.‎



Source link

भीम जयंतीपूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे आश्वासन

0
भीम जयंतीपूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे आश्वासन

फलटण | प्रतिनिधी  फलटण शहरातील मंगळवार पेठ प्रभाग क्रमांक दोन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळांचे व्यापक सुशोभीकरण करण्यास लवकरच सुरुवात करण्यात येणार असून, भीम जयंतीपूर्वी सर्व कामांचे पूर्णत्व साधून देण्याचे ठाम आश्वासन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.
फलटण जयंती मंडळ व विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच नवनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह  नाईक निंबाळकर यांच्यासमोर निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय अभ्यासिका आणि बुद्ध विहार या तीन अत्यंत महत्त्वाच्या स्थळांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुशोभीकरणात समाविष्ट असलेली प्रमुख कामे :
सर्व इमारतींचे सर्वांगीण रंगकाम
बांधकामातील दारांची दुरुस्ती व डागडुजी काढणे
स्लायडिंग व्यवस्था व आधुनिक लाईट फिटिंग
पंखे बसविणे
पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायरची स्थापना
वाचनालय अभ्यासिकेतील झिरपा (गळती) पूर्णतः बंद करणे
विद्यार्थ्यांसाठी जलशुद्धिकरणाची स्वतंत्र व्यवस्था
खुर्ची व टेबलांची सोय
स्मृती भवन व बुद्ध विहारास आकर्षक रंगीत प्रकाश सजावट
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी जयंती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधत, भीम जयंतीपूर्वी सर्व कामे पूर्ण करून ही स्थळे नागरिकांसाठी अधिक सुविधायुक्त आणि प्रेरणादायी बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी नगरसेवक सचिन अहिवळे, सुदाम आप्पा मांढरे, किरण राऊत, राहुल भैया निंबाळकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रणजीत बाबा भोसले, अमोल सस्ते, संजय गायकवाड उपस्थित होते. तसेच आदर्श अहिवळे, सुजल गायकवाड, निसर्ग सावंत, स्वप्निल काकडे, अनिकेत अहिवळे, संघराज अहिवळे, अमर अहिवळे, शशी अहिवळे, प्रणव काकडे, संविधान काकडे, प्रेम अहिवळे, रोनित अहिवळे, साहिल अहिवळे आदी कार्यकर्त्यांनी निवेदन देताना उपस्थिती लावली.
या निर्णयामुळे फलटण शहरातील आंबेडकरी चळवळीशी निगडित स्थळांना नवसंजीवनी मिळणार असून, विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

फलटणमध्ये सत्तासंघर्ष तीव्र : जिल्हा परिषद–पंचायत समितीत ‘राजे गट’ अस्तित्वाच्या लढाईत

0
फलटणमध्ये सत्तासंघर्ष तीव्र : जिल्हा परिषद–पंचायत समितीत ‘राजे गट’ अस्तित्वाच्या लढाईत

फलटण :- फलटण तालुक्यावर गेली तब्बल ३५ वर्षे एकहाती सत्ता असलेल्या राजे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. या सलग दोन पराभवांनंतर आता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजे गटाने संपूर्ण ताकद पणाला लावत ही निवडणूक अस्तित्वाची लढाई म्हणून लढण्याचा निर्धार केला आहे.
दुसरीकडे, मा. खासदार व आमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य निवडून आणणे व पंचायत समितीवर सत्ता मिळवणे हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवून जोरदार रणनीती आखली जात आहे.
शिलेदारांची साथ सुटल्याने राजे गट अडचणीत
मागील विधानसभा व नगरपालिका निवडणुकीदरम्यान राजे गटाच्या अनेक प्रमुख शिलेदारांनी साथ सोडत मा. खासदार गटाची वाट धरली. त्यामुळे सध्या राजे गट काहीसा एकाकी पडलेला असून, मोठ्या नेत्यांपेक्षा मावळ्यांच्या जोरावर लढाई द्यावी लागत आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढून झालेली चूक लक्षात घेत, राजे गटाने नगरपालिका निवडणुकीत सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय होईपर्यंत फलटण शहरातील राजे गटाचे जवळपास सर्वच प्रमुख कार्यकर्ते मा. खासदार गटात दाखल झाले होते. परिणामी, नगरपालिकेच्या निवडणुकीत राजे गटाला उमेदवार शोधण्यापासूनच संघर्ष करावा लागला.
घरातीलच उमेदवार रणांगणात
नगराध्यक्षपदासाठी समोरून मा. खासदार यांचे बंधू मैदानात उतरल्याने, राजे गटालाही विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना रिंगणात उतरवावे लागले. मात्र, फलटणच्या जनतेशी थेट संपर्क आणि जनाधार नसल्याने मतदारांनी त्यांना नाकारले.
संस्थात्मक बळ अजूनही जमेची बाजू
सलग दोन पराभवांनंतरही राजे गटाकडे श्रीराम व दत्त साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, विविध सहकारी संस्था, गोविंद मिल्क, कमिन्स यांसारखे संस्थात्मक बळ ही मोठी जमेची बाजू मानली जात आहे. मात्र, राजकीय ताकद आणि जमिनीवरील कार्यकर्त्यांची संख्या तुलनेने कमी झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मा. खासदार गटासमोरही आव्हाने
मा. खासदार यांच्यासोबत फलटण तालुक्यातील बहुतांश सर्व पक्षांतील दिग्गज नेते उभे असले, तरी त्यापैकी काही नेत्यांविषयी स्थानिक पातळीवर नाराजी असल्याचे चित्र आहे. ही नाराजी दूर करणे हे मा. खासदार यांच्यासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. दूधेबावी येथील सभेत त्यांनी या नाराजीची दखल घेत भाष्य केल्याने, त्यानंतर त्यांनी थेट ग्राउंड कनेक्ट सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
३० वर्षांतील पहिलीच निवडणूक
एकूणच गेल्या ३० वर्षांत प्रथमच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणांगणात एकही नाईक निंबाळकर थेट उमेदवार म्हणून नसणे हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरत आहे. तरीही लढत अत्यंत चुरशीची होत असून, खरा प्रचार मतदानाच्या आदल्या रात्रीच रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सध्या सुरू असलेला प्रचार प्रामुख्याने आरोप-प्रत्यारोपांपुरताच मर्यादित असल्याचे चित्र आहे.

सोने-चांदीच्या दरात होणार मोठी घसरण? सरकारच्या ‘या’ निर्णयाचा परिणाम काय?

0
सोने-चांदीच्या दरात होणार मोठी घसरण? सरकारच्या ‘या’ निर्णयाचा परिणाम काय?


Gold Silver Import: सोने आणि चांदीची आयात आता स्वस्त होणार आहे. कारण सरकारने दोन्ही मौल्यवान धातूंची आधारभूत किंमत कमी केली आहे. सोन्याची आधारभूत किंमत प्रति १० ग्रॅम ४९ डॉलरने कमी करण्यात आली आहे, तर चांदीची आधारभूत किंमत प्रति किलोग्रॅम 870 डॉलरने कमी करण्यात आली आहे. आज सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. दरम्यान, सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवर लक्षणीय दिलासा दिला आहे. सरकारने या मौल्यवान धातूंच्या आयातीवरील सीमाशुल्क मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मूळ आयात किमतीत कपात केली आहे.

Add Zee News as a Preferred Source

याचा काय परिणाम होईल?

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) ही माहिती देणारी अधिसूचना जारी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचत असताना हे पाऊल उचलले आहे. या सरकारी निर्णयामुळे सोने आणि चांदी आयातदारांवरील भार कमी होईल.

आधारभूत किमतीचे काय?

CBIC ने सोन्याची मूळ आयात किमती प्रति १० ग्रॅम ४९ डॉलरने कमी करून १,५१८ डॉलर केली आहे. दरम्यान, चांदीची मूळ आयात किमती प्रति किलोग्रॅम ८७० डॉलरने कमी करून २,६७५ डॉलर प्रति किलोग्रॅम केली आहे. हे नवीन दर निर्दिष्ट टॅरिफ शीर्षकाखाली कोणत्याही स्वरूपात आयात केलेल्या सोने आणि चांदीवर लागू होतील. ही शुल्क कपात उच्च शुद्धतेच्या सोन्याच्या बार आणि नाणी तसेच चांदीच्या बुलियन आणि पदकांवर देखील लागू असेल. तथापि, ही सूट दागिने, इतर मौल्यवान धातूंच्या वस्तू आणि पोस्ट, कुरिअर किंवा सामानाद्वारे आयात करण्यासाठी लागू होणार नाही.

चांदीची मूळ आयात किंमत शेवटची २७ जानेवारी २०२६ रोजी सुधारित करण्यात आली होती, तर सोन्याची किंमत शेवटची २२ जानेवारी २०२६ रोजी सुधारित करण्यात आली होती. सामान्यतः, सरकार दर पंधरा दिवसांनी (दोन आठवड्यांनी) मौल्यवान धातूंच्या मूळ आयात किंमतीत सुधारणा करते.

भारतीय सोने आणि चांदीचे प्रेमी

सध्या, भारत जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. तो चांदीची सर्वात मोठी बाजारपेठ देखील आहे. भारताची जवळजवळ सर्व सोन्याची मागणी आयातीद्वारे पूर्ण केली जाते. दरम्यान, त्याच्या चांदीच्या गरजांपैकी ८०% पेक्षा जास्त गरजा परकीय पुरवठ्यावर अवलंबून असतात. तसेच, लक्षात ठेवा की गेल्या वर्षी भारताने त्याच्या एकूण परकीय चलन साठ्यापैकी जवळजवळ दहावा भाग सोने आणि चांदीच्या आयातीवर खर्च केला. असा अंदाज आहे की २०२६ पर्यंत हे आयात बिल आणखी वाढू शकते, कारण दोन्ही धातूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

सोने आणि चांदीचा सध्याचा दर

22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 8 ग्रॅम 113008 रुपये आहे. त्याचप्रमाणे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 8 ग्रॅम 123272 रुपये आहे. एमसीएक्सवर, बुधवारी सकाळी 9.30 वाजता सोने प्रति 10 ग्रॅम 159600 रुपये होते, जे 5791 किंवा 3.77% वाढले. त्याचप्रमाणे, चांदी प्रति किलो 281116 रुपये होती, जे 13101 किंवा 4.89% वाढले.





Source link

तोंडाच्या कॅन्सरची ‘ही’ लक्षणे चुकूनही दुर्लक्षित करू नका!

0
तोंडाच्या कॅन्सरची ‘ही’ लक्षणे चुकूनही दुर्लक्षित करू नका!


Manali Sagvekar

सध्या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी ‘सकाळ मीडिया’ ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ – एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, ‘साम टीव्ही मराठी’मध्ये (जुलै २०२५ – सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.

…Read More





Source link

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दी-खोकल्याचे औषध घेताय? थांबा! होऊ शकतात जीवघेणे परिणाम

0
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दी-खोकल्याचे औषध घेताय? थांबा! होऊ शकतात जीवघेणे परिणाम


Don’t Take Any Medicine Without Doctor’s Advice:  हिवाळा ऋतु गुलाबी थंडीसह अनेक आजारही सोबत घेऊन येतो. यावेळी सर्दी आणि खोकला या सामान्य आजारांना सर्वांनाच सामोरे जावे लागते. अशात हवेतील प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचे संक्रमण वाढले आहे. ज्यावर वेळीच उपचार न केल्यास गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते. अनेकजण ‘अशा साधारण सर्दी-खोकल्यासाठी दवाखान्यात कशाला जायचं’ असा विचार करतात, आणि जवळच्या मेडिकलमधून काही ठराविक औषधे घेतात. पण तुम्हाला माहित आहे का? की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधे काहीवेळा तुमच्या जीवावरही बेतू शकतात. यामुळे आरोग्यास कोणते गंभीर धोके होऊ शकतात? हे जाणून घ्या आणि वेळीत सावध व्हा. 

Add Zee News as a Preferred Source

 

कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे का आहे आवश्यक?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चुकीची औषधे घेतल्यास साधारण सर्दी खोकलाही हृदयविकार, मेंदू, लिव्हर आणि मूत्रपिंडाच्या गंभीर समस्येचे कारण बनू शकते. या औषधांमध्ये कंजेस्टंट्स, अँटीहिस्टामाइन्स, खोकला आणि वेदना कमी करणाऱ्या गोळ्यांचा किंवा कफ सिरपचा समावेश असतो. काहीवेळा घरात पूर्वीच्या उरलेल्या औषधांचा साठा असल्यास सर्दी-खोकल्याची लक्षणे दिसताच लगेचच त्या औषधांचे सेवन केले जाते. या औषधांमुळे काही प्रमाणात आराम तर मिळतो. पण अतिप्रमाणात घेतल्यास उलट परिणाम होऊन औषधे बाधू शकतात. 

 

आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतील?

डेक्स्ट्रोमेथोर्फन सारखे खोकला कमी करणारे औषध अतिप्रमाणात घेतल्यास त्याचा मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे चक्कर येणे, मती गोंधळल्या सारखी होणे, असामान्य वर्तन आणि मूड स्विंग्स होऊ शकतात. तसेच ताप असल्यास सर्वात अधिक पॅरासिटामॉल आणि डोलो यांसारख्या औषध गोळ्या घेतल्या जातात. पण जर तुम्ही आधीच इतर औषधे घेत असाल किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अतिप्रमाणात या गोळ्या घेतल्या तर त्या यकृत आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचवू शकतात. काही प्रकरणांमध्ये यामुळे पोटात रक्तस्त्राव होणे, हृदयविकाराचा धोका वाढणे अशा जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात. 

इतरांनाही सावध करा!

यामुळे कोणतीही औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. तसेच कोणत्याही औषधांचे सेवन अतिप्रमाणात करू नका. यामुळे तात्पुरता आराम मिळेल पण आयुष्य धोक्यात येऊ शकते. म्हणूनच ही बातमी तुमचे कुटुंबिय आणि जवळच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा. वेळीच सावध व्हा!

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

‘या’ कफ सिरपने घेतला आणखी एक बळी, अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकल्याने गमावला जीव

0
‘या’ कफ सिरपने घेतला आणखी एक बळी, अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकल्याने गमावला जीव


Manali Sagvekar

सध्या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी ‘सकाळ मीडिया’ ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ – एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, ‘साम टीव्ही मराठी’मध्ये (जुलै २०२५ – सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.

…Read More





Source link

फलटणमध्ये राजकीय वादाला धार; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा नाव न घेता शिवरूपराजेंवर जोरदार हल्लाबोल

0
फलटणमध्ये राजकीय वादाला धार; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा नाव न घेता शिवरूपराजेंवर जोरदार हल्लाबोल


फलटण | प्रतिनिधी :- . फलटण तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून माजी विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता शिवरूपराजे  यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना रामराजेंनी “कमळाला अनेक भुंगे लागलेले आहेत, त्यातील हा एक भुंगा” अशी टीका करत विरोधकांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला.
रामराजे पुढे म्हणाले, “बारामतीला जा, कोल्हापूरला जा; पण फलटणमधून तडीपार व्हा”, अशा शब्दांत त्यांनी स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “यांचं या मातीशी नेमकं नातं काय?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी फलटणच्या राजकारणात बाहेरच्यांच्या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त केली.
या वक्तव्यामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. रामराजेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या वक्तव्यावर शिवरूपराजे किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते, फलटणमधील सत्तासंघर्ष आता अधिक गडद व आक्रमक होत चालला आहे