Sunday, June 28, 2026
Home Blog Page 53

नॉनव्हेज न खाताही मिळेल भरपूर पोषण, आहारात करा या 3 बियांचा समावेश!

0
नॉनव्हेज न खाताही मिळेल भरपूर पोषण, आहारात करा या 3 बियांचा समावेश!


Seeds For Protein: मानवी शरीराला प्रथिनांची ( Protein) सर्वाधिक आवश्यकता असते. शरीराचे स्नायू, त्वचा, केस, नखे आणि हाडे तयार होण्यासाठी; तसेच त्यांच्या मजबुतीसाठी प्रथिने महत्त्वाची असतात. याशिवाय शरीरातील पेशींची झीज भरून काढणे आणि जखम लवकरात लवकर बरी करण्याचे कामही प्रथिने करतात. एवढेच काय तर जेव्हा शरीरात कार्बोदकांचे प्रमाण कमी होते, तेव्हा प्रथिने शरीराला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात. मांसाहारी आहारातून शरीराला प्रथिने प्राप्त होतात. म्हणूनच बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा मासे, अंडी इतर मांसाहारी पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्ही शाकाहारी असाल तर, मांसाहार न करताही तुम्ही भरपूर प्रिथने मिळवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पौष्टिक बियांचा समावेश करू शकता. 

Add Zee News as a Preferred Source

 

भांगेच्या बिया (Hemp Seeds)

अनेकदा भांगेच्या बियांचा संबंध अमली पदार्थांशी जोडला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, की भांगेच्या बिया खाल्ल्याने कोणतीही नशा होत नाही तर, या बिया आरोग्याकसाठी अत्यंत गुणकारी मानल्या जातात. शाकाहारी व्यक्तींसाठी या बिया प्रिथिनांचा उत्तम स्त्रोत आहेत. मानवी शरीराला एकूण 20 अमिनो अॅसिड्सची गरज असते. त्यापैकी 9 आवश्यक अमिनो अॅसिड्स या बियांमध्ये उपलब्ध असतात. जसे की, हिस्टिडाइन, आयसोल्युसीन, ल्युसीन, लायसीन, मेथिओनिन, फिनाइलअलानीन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन, व्हॅलिन. तसेच यामध्ये फॅटी अॅसिडही मोठ्या प्रमाणात असते. जे हृदयाच्या आणि मेंदूच्य आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामधील फायबरमुळे पचनसंस्था सुधारते. आहारात या बियांचा समावेश केल्यास कोरड्या त्वचेच्या समस्या दूर होतात. 

 

भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds)

भोपळ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात झिंक असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम हृदय आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि फायबरही असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन असते जे शरीरात गेल्यानंतर त्याचे रूपांतर सरोटेनिनमध्ये होते. ज्यामुळे झोपेचे आरोग्य सुधारते. तसेच या बिया रक्तातील साखरेचे प्रमाण कमी ठेवण्यास मदत करतात, जे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते. 

 

सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds)

सूर्यफुलाच्या बिया हे लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच एक सुपरफूड आहे. या बिया ऊर्जा, निरोगी चरबी आणि जीवनसत्त्वांचा मोठा स्त्रोत आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते. जे पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते. तसेच यामधील सेलेनियम शरीरातील सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. सूर्यफुलांच्या बियांमध्ये फायटोस्टेरॉल्स असतात, जे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. तसेच मॅग्लेशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. 

 

आहारात या बियांचा समावेश कसा कराल?

भांगेच्या बिया:  सकाळी स्मूदीमध्ये, कोशिंबीरमध्ये किंवा दुधामध्ये घालून खाऊ शकता. 

भोपळ्याच्या बिया: हलक्या भाजून त्यावर मीठ आणि काळी मिरी पूड घाला, प्रोटिन शेक किंवा फळांच्या ज्यूसमध्ये घालून खाऊ शकता. 

सूर्यफुलांच्य बिया: बिया सोलून हलक्या भाजा, केक किंवा मफिन्स बनवताना त्यात घाला, उपमा किंवा ओट्समध्ये घालूनही खाऊ शकता. 





Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: ‘टूल-बेल्ट’ जनरेशनचे फॅशन स्टेटमेंट आमच्या पिढीच्या अगदी उलट आहे

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  ‘टूल-बेल्ट’ जनरेशनचे फॅशन स्टेटमेंट आमच्या पिढीच्या अगदी उलट आहे


  • Marathi News
  • Opinion
  • N Raghuramans Column: Tool Belt Generation Fashion Statement Is Opposite Our Era

58 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

नुकतेच अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या बहिणीने मला २८ डॉलरची ‘काउबॉय हॅट’ भेट दिली. ही हॅट केवळ उन्हापासून संरक्षण करण्यासाठी चेहरा झाकून ठेवते म्हणूनच वेगळी नव्हती, तर ज्याप्रमाणे बुटांच्या छिद्रांमधून लेस ओवलेली असते तशीच त्या हॅटच्या चारी बाजूंनी फीत ओवलेली होती. त्या हॅटलाही चारही बाजूंनी छिद्रे होती. जशी तुम्ही फीत सोडता तशी हॅटच्या आतून एक मच्छरदाणी उघडते आणि चेहरा व मान झाकून टाकते, जी तुम्ही शर्टच्या कॉलरमध्ये खोचून बटण लावू शकता. बहिणीने माझा एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये मी फिरत होतो आणि मच्छर मला चावत होते. त्यानंतर तिने ही हॅट खरेदी केली. तेव्हापासून रात्री बाहेर जाताना हा माझा आवडता पेहराव बनली आहे. कारण तेव्हा डास चावण्याची शक्यता असते. ती माझ्या टक्कल पडत असलेल्या डोक्याला झाकते, फॅशनेबल आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डासांपासून बचाव करते. काही लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत असले तरी मला फरक पडत नाही- कारण काही प्रमाणात ती मला संभाव्य आजारांपासून वाचवते.

आतापर्यंत मला माहित नव्हते की ही हॅट घालून मी ‘टूल-बेल्ट जनरेशन फॅशन प्रमोटर’ बनलो आहे. आता हे काय आहे? तर ही अशा लोकांची फॅशन आहे, जे शारीरिक श्रम करतात आणि अशा आरामदायी कपड्यांवर व चांगल्या साधनांवर (टूल्स) खर्च करण्यास तयार असतात, जे सुरक्षा देतात. उदाहरणार्थ, सुरक्षा मानकांनुसार असलेले वर्क बूट्स. अनेक ‘जेन-झी’ तरुणांना आता हे उमजले आहे की, केवळ पदवीधर होण्यापेक्षा मेकॅनिक, प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन बनून जास्त कमाई होऊ शकते. अशा परिस्थितीत ते शारीरिक श्रमाच्या कार्यबलात सामील होत आहेत. म्हणूनच त्यांनी असे कपडे आणि फॅशन निवडली आहे, जी त्यांच्या कामाच्या प्राधान्यक्रमानुसार अधिक लवचिक (फ्लेक्सिबल) आहे. आणि जे लोक असे फंक्शनल फिट कपडे परिधान करतात, त्यांना ‘ट्रेड्सपीपल’ म्हटले जाते. आज ट्रेड्सपीपल म्हणजे फक्त तेच लोक नाहीत, जे निळा गणवेश घालून वर्कशॉपमध्ये असतात. गेल्या चार वर्षांत शॉप फ्लोअरचा मोठा कार्यबल बनलेले जेन-झी तरुण केवळ कामावर येता-जातानाच नाही, तर वर्कप्लेसवरही फॅशनेबल दिसू इच्छितात. यामुळे या कपड्यांची ओढ आता ‘ब्लू कॉलर’ संस्कृतीच्या पलीकडे गेली आहे. ब्रंट, लोव्हस यांसारखे मोठे आंतरराष्ट्रीय ब्रँड केवळ जगभरात स्टोअर्स उघडत नाहीत, तर ब्रँड-बिल्डिंग कंपन्यांच्या माध्यमातून ‘वर्कवेअरमधील वारसा’ (लेगेसी) देखील सांगत आहेत. परदेशात त्यांना कोणी केवळ कामगार म्हणू शकत नाही, तर तिथे त्यांना ‘स्ट्रीटवेअर कम्युनिटीज’ म्हटले जाते. हे वर्कवेअर अशा लोकांसाठी आहेत, जे त्यांचा वापर फॅशन प्रॉडक्ट म्हणून नाही, तर इक्विपमेंट्स (साधने) म्हणून करतात. वर्कवेअर हा आज अपेरल आणि फुटवेअर इंडस्ट्रीमधील सर्वात वेगाने वाढणारा विभाग आहे, ज्याची किंमत लाखो डॉलर्स आहे. ‘बकेट टॉक’ नावाचा एक पॉडकास्ट आहे, जो वेल्डर्स, प्लंबर्स, शेतकरी आणि युटिलिटी लाइनमन यांसारख्या लोकांसाठी आहे. यात आपण पाहू शकतो की कशा प्रकारे लोक हलक्या आणि अधिक आरामदायी कपड्यांकडे वळत आहेत. हे कपडे वेगवेगळ्या हवामानात आणि स्वच्छतेच्या परिस्थितीत काम करण्यास उपयुक्त ठरत आहेत.

आठवा की कॉलेजच्या दिवसांत आपल्यापैकी अनेक जण बसमध्ये ॲप्रन घालून फिरत असत, जणू आपण मेडिकलचे शिक्षण घेत आहोत, जरी आपण बीएस्सी किंवा एमएस्सीचे विद्यार्थी असू. त्याचप्रमाणे आज ही टूल-बेल्ट जनरेशन आपले आधुनिक स्ट्रीटवेअर घालून आरामात बस स्टँड आणि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत आहे. इतरांना दाखवण्यासाठी आपण कपडे घालत होतो, ते दिवस आता गेले. टूल-बेल्ट जनरेशन मानते की ‘माय कम्फर्ट, कम्स फर्स्ट’ (माझा आराम आधी येतो). आणि यात काही चुकीचेही नाही. त्यांच्या नवीन कार्गो पँट्स आपल्या काळातील कडक कॅनव्हास पँट्सपेक्षा कितीतरी जास्त स्ट्रेचेबल आहेत. मी पाहतो की सोशल मीडियावरही हे तरुण आपल्या आरामाला प्राधान्य देत मेकॅनिक, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन्सचे जोडे आणि पेहराव घालत आहेत.

मोबाईलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

फंडा असा आहे की, टूल-बेल्ट जनरेशनच्या पेहरावाच्या नवीन स्टाइलबाबत पूर्वग्रहदूषित (जजमेंटल) होऊ नका. कारण त्यांना इतरांच्या नजरेत चांगले दिसण्यापेक्षा स्वतःचा आराम जास्त महत्त्वाचा वाटतो.



Source link

साताऱ्यात अजितदादा गटाच्या नेत्याच्या मुलावर बिबट्याचा हल्ला, प्रचारासाठी जात असताना अंगावर झेप

0


Leopard Attack in Satara: ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर (Vilasrao Patil Undalkar) यांच्या नातवावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केल्याची धक्कादायक घटना सातारा (Satara) जिल्ह्यात घडली आहे. या हल्ल्यात अधिराज पाटील (Adhiraj Patil) यांना पायाला दुखापत झाली असून, सध्या त्यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंडाळे–शेवाळवाडी मार्गावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. अधिराज पाटील हे आपल्या सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी दुचाकी चालवत असलेले धनाजी पाटील हे थोडक्यात बचावले.

Leopard Attack in Satara: प्रचार आटोपून परततानाच थरारक घटना

अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर हे येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आहेत. प्रचार आटोपून परतत असतानाच ही थरारक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अधिराज पाटील यांना तातडीने उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Leopard Attack in Satara: नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दरम्यान, उंडाळे आणि परिसरात बिबट्याचा वावर वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सातत्याने होत असलेल्या मानव–बिबट संघर्षाच्या घटनांमुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी वेशीपर्यंत बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे होणाऱ्या मानव–वन्यजीव संघर्षावर उपाय म्हणून काही स्तरातून बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी होत असली तरी, वन्यजीवप्रेमी आणि तज्ज्ञ मात्र या भूमिकेला विरोध करत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वन विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्रचारसभेत बोलताना अधिराज पाटील म्हणाले होते की, परिसरातील तीनही उमेदवार येथे निवडून येतील, असे मी तुम्हाला आश्वासन देतो. परिसरातील नागरिकांची छोटी-मोठी कामे बाकी आहेत. कोणाला व्यायाम शाळा पाहिजे, कुणाला ग्रंथालय पाहिजे, रस्त्यावरील खड्डे बुजवा, अशा मागण्या होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपण सत्तेत नव्हतो. मात्र, आता आपण सत्ताधारी पक्षात आहोत. चार वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे आपल्याकडे निधी नव्हता. आता या निवडणुकीनंतर राहिलेले कामे पूर्ण करू, असे त्यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

Sharad Pawar : कुटुंबावर दु:खाचा डोंगर,आजोबांचं नातवांना मार्गदर्शन, शरद पवारांची रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत चर्चा

आणखी वाचा



Source link

तंत्र-मंत्राने नाही तर विकासकामांनीच निवडणुका जिंकता येतात – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

0
तंत्र-मंत्राने नाही तर विकासकामांनीच निवडणुका जिंकता येतात – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण :- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या घराबाहेर अघोरी तांत्रिकाचा जादूटोण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “लोकशाहीत निवडणुका या जनतेच्या मतांवर जिंकल्या जातात, तांत्रिक-मांत्रिक किंवा जादूटोण्याच्या माध्यमातून नाही. अशा अघोरी प्रकारांमुळे समाजात अंधश्रद्धा पसरते आणि त्याला माझा तीव्र विरोध आहे.”
पुढे बोलताना त्यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडत म्हटले की, “राजकारणात विकास, कामगिरी आणि जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो. निवडणुका जिंकण्यासाठी तांत्रिकांचा आधार घेणे म्हणजे स्वतःच्या कामावरचा विश्वास उडाल्याचे द्योतक आहे.”
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अघोरी बाबा प्रकरणी आरोप म्हणजे राजकीय स्टंट; आमचा अंधश्रद्धेवर विश्वास नाही – श्रीमंत संजीवराजे व अनिकेतराजे नाईक निंबाळकरांचा पलटवार

0
अघोरी बाबा प्रकरणी आरोप म्हणजे राजकीय स्टंट; आमचा अंधश्रद्धेवर विश्वास नाही – श्रीमंत संजीवराजे व अनिकेतराजे नाईक निंबाळकरांचा पलटवार


फलटण प्रतिनिधी :  फलटण तालुक्यातील तथाकथित अघोरी बाबा प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना निंबाळकर कुटुंबीयांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “अघोरी विद्या, साधू-मांत्रिक यावर आमच्या कुटुंबाचा काडीभरही विश्वास नाही. आमचे घराणे वारकरी संप्रदायाचे आहे,” असे स्पष्ट करत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी हे आरोप फेटाळले.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, रामराजेंचे नाव घेणे हा निव्वळ राजकीय स्टंट असून विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. साधू-मांत्रिकाचा विषय पुढे करून राजकीय लाभ मिळवण्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनीही या प्रकरणावर आपली भूमिका मांडत सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये संबंधित तांत्रिकाची चौकशी व्हावी, यासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाणार आहे. जर फलटणमध्ये असे प्रकार घडत असतील तर त्या मांत्रिकाला पोलिसांच्या ताब्यात का देण्यात आले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच, मांत्रिकाला सोडवण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पोहोचणे हेच आश्चर्यकारक आहे, असे म्हणत अनिकेतराजे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“माजी खासदारांचा हा रडीचा डाव असून राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केलेला शेवटचा प्रयत्न आहे,” अशी टीकाही अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी केली. अघोरी कृत्यांशी आमचा काडीमात्रही संबंध नसल्याचे ठामपणे सांगत त्यांनी सर्व आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे फलटणच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

ज्ञान, समता आणि लोककल्याणाचा दीपस्तंभ : महाराजा सयाजीराव गायकवाड

0
ज्ञान, समता आणि लोककल्याणाचा दीपस्तंभ : महाराजा सयाजीराव गायकवाड


फलटण : महाराजा सयाजीराव गायकवाड हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक अत्यंत प्रगल्भ, दूरदृष्टीचे आणि समाजाभिमुख शासक होते. ते केवळ बडोदा संस्थानाचे राजे नव्हते, तर विवेक, विज्ञाननिष्ठा आणि मानवतावाद या मूल्यांवर आधारित लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचे शिल्पकार होते. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव केवळ त्यांच्या काळापुरता मर्यादित न राहता आजही भारतीय लोकशाही, शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक सुधारणांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो.
शिक्षण : सामाजिक मुक्तीचे प्रभावी साधन
सयाजीराव गायकवाड यांचा ठाम विश्वास होता की, “शिक्षणाशिवाय समाजाचा खरा विकास होऊ शकत नाही.” त्यामुळेच त्यांनी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २०व्या शतकाच्या प्रारंभी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण बडोदा संस्थानात लागू केले. हा निर्णय त्या काळात केवळ भारतातच नव्हे, तर आशियातही क्रांतिकारी मानला जातो.
शाळा, वसतिगृहे, शिक्षक प्रशिक्षण संस्था उभारून त्यांनी शिक्षणाचा पाया भक्कम केला. दलित, आदिवासी, मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना राबवून त्यांनी शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी खुल्या केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेले ऐतिहासिक पाठबळ
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दूरदृष्टीचा सर्वात उज्ज्वल दाखला म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेले प्रोत्साहन. बाबासाहेबांमधील विलक्षण बुद्धिमत्ता, जिज्ञासा आणि समाजपरिवर्तनाची तळमळ ओळखून सयाजीरावांनी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली.
ही मदत केवळ आर्थिक नव्हती, तर एका नव्या भारताच्या निर्मितीसाठी घातलेला मजबूत पाया होता. बाबासाहेबांनी पुढे भारतीय संविधानाच्या माध्यमातून ज्या समतेचा, न्यायाचा आणि मानवाधिकारांचा विचार देशाला दिला, त्यामागे सयाजीरावांच्या प्रगत विचारांची प्रेरणा होती.
सामाजिक सुधारणांचा धाडसी अजेंडा
सयाजीराव गायकवाड यांनी समाजातील रूढी, अंधश्रद्धा आणि अन्यायकारक परंपरांविरुद्ध निर्भीडपणे भूमिका घेतली.
अस्पृश्यता निवारण, स्त्रीशिक्षणाला प्रोत्साहन, बालविवाहास प्रतिबंध, विधवा विवाहाला मान्यता, कामगारांचे हक्क
या विषयांवर त्यांनी कायदे करून सामाजिक परिवर्तनाला गती दिली. समाजसुधारणा ही केवळ भाषणांतून नव्हे, तर ठोस कृतीतून घडते, हे त्यांनी दाखवून दिले.
लोककल्याणकारी राज्यव्यवस्था
राज्य म्हणजे राजाची खासगी मालमत्ता नसून जनतेची जबाबदारी आहे, असा लोकशाही विचार त्यांनी आपल्या कारभारात रुजवला. आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, शेती सुधारणा, सिंचन प्रकल्प, सहकार चळवळ यांद्वारे सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.
प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लोकाभिमुखता आणण्यासाठी त्यांनी आधुनिक कायदे आणि सुधारित व्यवस्था लागू केल्या.
कला, साहित्य आणि सांस्कृतिक समृद्धी
महाराजा सयाजीराव गायकवाड हे कलांचे मोठे आश्रयदाता होते. संगीत, नाट्य, चित्रकला, साहित्य, शिल्पकला यांना त्यांनी राजाश्रय दिला. बडोदा सार्वजनिक ग्रंथालय, संग्रहालये, संशोधन संस्था यांची उभारणी करून त्यांनी ज्ञानसंपदेचे भांडार निर्माण केले.
त्यांच्या काळात बडोदा हे भारतातील एक अग्रगण्य सांस्कृतिक व बौद्धिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले.
जागतिक दृष्टिकोन आणि आधुनिक विचार
विदेश प्रवास, आंतरराष्ट्रीय परिषदांतील सहभाग, पाश्चात्त्य शिक्षणपद्धतींचा अभ्यास यामुळे सयाजीरावांचा दृष्टिकोन अत्यंत व्यापक होता. परंपरेचा आदर राखत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार केला. त्यामुळेच त्यांना “जागतिक कीर्तीचे राजे” असे म्हटले जाते.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे जीवनकार्य हे ज्ञान, समता, सामाजिक न्याय आणि लोककल्याण या मूल्यांचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी उभा केलेला प्रगत विचारांचा वारसा आजही आपल्याला प्रेरणा देतो. भारतीय समाजाने समतावादी, विज्ञाननिष्ठ आणि मानवकेंद्री वाटचाल करावी, यासाठी त्यांनी दिलेले योगदान इतिहासात अजरामर राहील.

आयु. सोमीनाथ घोरपडे, संस्कार सचिव, भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा (पूर्व)

भीमसूर्याची सावली – त्यागमूर्ती माता रमाई(७ फेब्रुवारी – जयंती विशेष लेख)

0
भीमसूर्याची सावली – त्यागमूर्ती माता रमाई(७ फेब्रुवारी – जयंती विशेष लेख)

भीमसूर्याची सावली – त्यागमूर्ती माता रमाई
(७ फेब्रुवारी – जयंती विशेष लेख)

फलटण :-  इतिहास महान पुरुषांची नावे मोठ्या अक्षरांनी लिहितो; पण त्या महानतेच्या मागे उभ्या असलेल्या स्त्रियांचे किंबहुना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यागमय जीवन जगणाऱ्या स्त्रियांचे आयुष्य अनेकदा सावलीत राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार, संघर्ष आणि क्रांती यांचा पाया ज्या मायेवर, संयमावर आणि त्यागावर उभा राहिला ती सावली म्हणजे त्यागमूर्ती भीम सूर्याची सावली माता रमाई.

इतिहासाच्या पानांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव क्रांती, विद्रोह आणि मुक्तीचे प्रतीक म्हणून कोरले गेले आहे. पण त्या क्रांतीच्या वाटेवर अखंड सावलीसारखी उभी राहिलेली, दुःख गिळून ध्येय जपणारी, त्याग आणि मायेची मूर्त प्रतिमा म्हणजे माता रमाई आंबेडकर. रमाईंचे जीवन म्हणजे एका स्त्रीचे आयुष्य नव्हे, तर एका युगाच्या जडणघडणीतील मूक पण निर्णायक भूमिका होय.

बालपण : गरिबी, दुःख आणि जबाबदारीची सुरुवात
७ फेब्रुवारी १८९८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद या लहानशा गावात रमाईंचा जन्म झाला. वडील भीकू धोत्रे हे कष्टकरी मजूर होते. घरात धार्मिक संस्कार होते; पण रोजच्या जगण्यासाठीची झुंज अधिक तीव्र होती. रमाई लहान असतानाच आई रुक्मिणीचे निधन झाले. आईच्या मायेपासून वंचित झालेल्या रमाईवर अल्पवयातच घराची जबाबदारी आली.
आईपाठोपाठ वडीलही टी.बी.सारख्या आजाराने गेले. या दोन आघातांनी रमाई पूर्णपणे पोरकी झाली. मृत्यू, दारिद्र्य आणि संघर्ष यांचे वास्तव तिने बालपणीच अनुभवल्यामुळे तिच्या स्वभावात सहनशीलता, गंभीरपणा आणि त्याग रुजला.

बालविवाह आणि अकाली संपलेले बालपण
तत्कालीन सामाजिक रूढींनुसार रमाईंचा विवाह अत्यंत लहान वयात भीमराव आंबेडकरांशी झाला. शिक्षण, स्वप्ने, इच्छा या सर्व गोष्टी बालविवाहात गुदमरल्या. संसारात पाऊल टाकताच गरिबी, सामाजिक उपेक्षा आणि जबाबदाऱ्यांचा भार तिच्या खांद्यावर पडला. पण तिने तक्रार केली नाही. परिस्थिती स्वीकारून तिने संसार सावरला.

शिक्षणासाठी संघर्ष आणि रमाईंचा त्याग
भीमरावांना शिक्षण हेच मुक्तीचे साधन आहे, हे उमगले होते. या ध्येयासाठी रमाईने स्वतःच्या आयुष्याचे सर्व सुख बाजूला ठेवले. १९१२ साली यशवंतचा जन्म झाला हा रमाईसाठी आशेचा किरण होता.
१९१३ मध्ये रामजी सुभेदारांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातच बाबासाहेबांना अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. पतीला निरोप देताना रमाईचे हृदय भरून आले होते; पण तिने अश्रूंना आवर घातला. कारण तिला माहीत होते हा प्रवास एका कुटुंबासाठी नव्हे, तर एका समाजाच्या भवितव्याकरिता आहे.

पती परदेशात, रमाई एकटी आणि दुःखांची मालिका
१९१३ ते १९२३ हा काळ रमाईच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ ठरला. बाबासाहेब परदेशात असताना संसाराची, मुलांची आणि आजारी नातेवाईकांची जबाबदारी एकटीवर आली.
या काळात रमेश, इंदू आणि गंगाधर या मुलांचे अकाली निधन झाले. उपासमार, औषधोपचारांचा अभाव, आजारपण या साऱ्यांचा सामना रमाईने एकटीने केला. तरीही बाबासाहेबांना पत्रांतून कधीही परिस्थितीची कल्पना दिली नाही. “आम्ही खुशाल आहोत” असे लिहून तिने त्यांचे मन अभ्यासात गुंतवून ठेवले. हा त्याग इतिहासात दुर्मीळ आहे.

बॅरिस्टर बाबासाहेब आणि रमाईचा स्वाभिमान
१९२३ साली बाबासाहेब बॅरिस्टर होऊन भारतात परतले. त्या वेळी रमाईकडे नेसण्यास नीट साडीही नव्हती. तरीही तिने जरीचा फेटा नेसून, साधेपणात स्वाभिमान जपत पतीचे स्वागत केले. गरिबी असूनही आत्मसन्मान कसा जपायचा, हे रमाईंनी आपल्या वागण्यातून दाखवले.

सामाजिक संघर्ष आणि रमाईची आईसारखी भूमिका
महाड चवदार तळे सत्याग्रह, कळाराम मंदिर सत्याग्रह, गोलमेज परिषद—या प्रत्येक टप्प्यावर बाबासाहेब समाजासाठी लढत होते, तर रमाई त्यांच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करत होत्या. सत्याग्रह यशस्वी झाल्याची बातमी येईपर्यंत त्या अन्नही घेत नसत.
धारवाड येथे उपाशी विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवून अन्नाची व्यवस्था करणारी रमाई केवळ पत्नी नव्हे, तर समाजमातेची भूमिका बजावत होती.

श्रद्धा ते विवेक : वैचारिक परिवर्तन
बालपणापासून रमाई धार्मिक होत्या. पंढरपूर वारी, उपास-तपास यावर त्यांचा विश्वास होता. पण बाबासाहेबांनी तिला समतेचा, विवेकाचा मार्ग समजावून सांगितला. “जिथे माणसाला प्रवेश नाही, त्या देवाचे दर्शन निरर्थक आहे” हे विचार रमाईंनी स्वीकारले. श्रद्धेऐवजी मानवतेला महत्त्व देण्याचा हा तिच्या जीवनातील मोठा वैचारिक टप्पा होता.

राजगृह आणि रमाईची शांत छाया
दादरच्या हिंद कॉलनीतील ‘राजगृह’ हे बाबासाहेबांचे विचारकेंद्र बनले. गृहप्रवेशाच्या दिवशी रमाईंनी सर्व महिलांना सन्मानाने बोलावले, हळदीकुंकू केले आणि “माझं मूळ नाव भागीरथी आहे, आज ते सार्थ झालं” असे भावूक शब्द बोलल्या. त्या स्त्रियांच्या मनात रमाई म्हणजे आईच होती.

अंतिम क्षण : त्यागाचा परमोच्च बिंदू
आयुष्याच्या शेवटच्या काळात रमाईंची प्रकृती ढासळली. औषधोपचार सुरू असतानाही तिला मृत्यू जवळ दिसत होता. बाबासाहेब आले तेव्हा तिने शांतपणे सांगितले “आता उपचार नकोत.”
पती, पुत्र यशवंत आणि समाजकार्य यांचीच चिंता करत तिने शेवटचा श्वास घेतला. साहेबांच्या समक्ष मरण येणे हेच आपले भाग्य मानणारी रमाई, त्यागाची सर्वोच्च सीमा गाठून गेली.

माता रमाई आंबेडकर म्हणजे इतिहासातील एक मूक क्रांती.
त्यांच्या त्यागाशिवाय बाबासाहेबांचा संघर्ष अपूर्ण राहिला असता. रमाई म्हणजे भीमसूर्याची सावली जी स्वतः दिसत नाही, पण सूर्याला उभे राहण्याचे बळ देते.
त्यांची जयंती म्हणजे केवळ स्मरण नव्हे,
ती त्याग, संयम, स्त्रीशक्ती आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा आहे.
💐🙏 त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन! 💐🙏

आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा (पूर्व)

Zee Samvaad With Real Heroes: ‘माझं रक्त भगवं, हिंदू राष्ट्रात नाही तर मग काय पाकिस्तानात जाऊन बोलणार,’ नितेश राणेंचं विधान

0
Zee Samvaad With Real Heroes: ‘माझं रक्त भगवं, हिंदू राष्ट्रात नाही तर मग काय पाकिस्तानात जाऊन बोलणार,’ नितेश राणेंचं विधान


Zee Samvaad With Real Heroes: जर आपण आपल्या हिंदू राष्ट्रात हिंदू राष्ट्राबद्दल, सनातन धर्माबद्दल बोलणार नाही, तर मग काय पाकिस्तानमध्ये बोलणार का? असा प्रश्न भाजपा नेते नितेश राणे यांनी विचारला आहे. ‘झी रिअल हिरोज संवाद’च्या मंचावर नितेश राणे यांनी हजेरी लावली. “योग्य देशात योग्य भूमिका घेणे खूप महत्वाचे आहे. आम्ही इतर कोणत्याही धर्माचा अवमान करत नाही, परंतु आमच्या धर्माकडे घाणेरड्या नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवतो,” असंही यावेळी ते म्हणाले. 

Add Zee News as a Preferred Source

नितेश राणेंना यावेळी विचारण्यात आलं की, ‘तुम्ही निर्भय आहात, तुम्ही धाडसी आहात, पण इतकीही भीती कशाला ज्यामुळे इतर धर्माचे लोकही घाबरतील?’. त्यावर नितेश राणे यांनी उत्तर दिलं की, “माझे रक्त भगवे आहे म्हणून, मी निर्भय आहे आणि माझ्या भगव्या रक्तामुळे मी धाडसी आहे. जर आपण आपल्या हिंदू राष्ट्रात हिंदू राष्ट्राबद्दल, सनातन धर्माबद्दल बोलणार नाही, तर मग काय इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये बोलणार का?”

पुढे ते म्हणाले की, “योग्य देशात योग्य भूमिका घेणे खूप महत्वाचे आहे. आम्ही इतर कोणत्याही धर्माचा अवमान करत नाही, परंतु आमच्या धर्माकडे घाणेरड्या नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही आमची जागा दाखवतो”. पण तुम्ही काहीही बोलून टाकता? तुम्ही कोणाला दुखावता का? यावर नितेश राणे म्हणाले की, ठदुसरा धर्म लव्ह जिहादच्या नावाखाली आमचा धर्म, आमच्या मुला-मुलींना नष्ट करू शकतो. दुसरा धर्म स्वतःच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी आमच्या मंदिरांच्या जागी मशिदी बांधू शकतो का? हे आमचे हिंदू राष्ट्र आहे, येथे हिंदूंचे हित प्रथम जपले जाते. नंतर इतरांचा विचार केला जातो”.

भाजपचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह देखील व्यासपीठावर होते. त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की, एक इंग्रजी वाक्य आहे – continuity with change. भूतकाळाच्या पायावर भविष्याची उभारणी. सनातन धर्म होता, आहे आणि राहणार. पण सोबतच विकास हा भाजपचा मूळ मंत्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतके तरुण आहेत की, नितेश राणे आणि त्यांच्यात फरक वाटणार नाही. जर आपल्याकडे धर्म नसेल तर आपण कसे काम करणार. म्हणूनच हिंदुस्तान हा हिंदुस्तान आहे. जेव्हा जेव्हा धर्माचे नुकसान होते तेव्हा नीच आणि अहंकारी राक्षस वाढतात (जब जब होई धर्म की हानि, बाड़हि असुर अधम अभिमानी). प्रत्येकाने धार्मिक असले पाहिजे, परंतु जर कोणी म्हटलं की, मी माझ्या धर्मासाठी सर्वस्व ठेवतो आणि इतर धर्म काहीच नाही, तर नितेश राणे हे अशा लोकांसाठी एक उदाहरण आहेत. ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाने धार्मिक असले पाहिजे, पण कट्टर नाही





Source link

बाजारातील कृत्रिम काजळ तुमच्या मुलांसाठी ठरतयं घातक; बालरोगतज्ज्ञ काय म्हणतात? पहा…

0
बाजारातील कृत्रिम काजळ तुमच्या मुलांसाठी ठरतयं घातक; बालरोगतज्ज्ञ काय म्हणतात? पहा…


Baby Care Tips: पूर्वी लहान मुलांच्या डोळ्यांत काजळ लावणे ही एक सामान्य आणि शुभ परंपरा मानली जात होती. काजळामुळे वाईट नजर लागत नाही, मुलं अधिक गोड दिसतात आणि नशीब चांगले राहते, अशी अनेकांची समजूत होती. पण काळ बदलला आहे. आज जे काजळ बाजारात मिळते, ते पूर्वीसारखे नैसर्गिक राहिलेले नाही. त्यामुळे ही परंपरा आता हळूहळू मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.

Add Zee News as a Preferred Source

भारतभरातून अलीकडे काही धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. काजळ लावल्यानंतर अनेक मुलांच्या डोळ्यांना जळजळ, सूज, लालसरपणा आणि संसर्ग झाल्याचे आढळून आले. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून डॉक्टरांनीही गंभीर इशारा दिला आहे.

बाजारातील काजळ किती सुरक्षित आहे?
बालरोगतज्ज्ञांच्या मते, सध्या उपलब्ध असलेले बहुतांश काजळ शुद्ध नसते. त्यामध्ये रसायने, कार्बन, शिसे आणि इतर घातक घटक मिसळलेले असतात. हे घटक प्रौढांसाठीही हानिकारक ठरू शकतात, तर लहान मुलांच्या नाजूक डोळ्यांसाठी ते अधिक धोकादायक आहेत.

बालरोगतज्ज्ञांच्या  सांगतात की नवजात मुलांना आणि लहान मुलांच्या डोळ्यांभोवतीची त्वचा अतिशय संवेदनशील असते. थोड्याशा रासायनिक संपर्कामुळेही मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणतीही खात्री नसलेले काजळ वापरणे टाळावे.

काजळामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या
रासायनिक काजळामुळे डोळ्यांतून पाणी येणे, सतत डोळे चोळणे, खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये संसर्ग इतका वाढतो की डॉक्टरांचा उपचार आणि औषधांची गरज भासते.

दीर्घकाळ काजळ वापरल्यास डोळ्याच्या पटलावर परिणाम होऊन दृष्टी कमजोर होण्याचा धोका असतो. त्यामुळे डॉक्टर कोणत्याही प्रकारचे काजळ मुलांच्या डोळ्यांत लावण्याचा सल्ला देत नाहीत.

एक वर्षाखालील मुलांसाठी खास इशारा
डॉक्टरांच्या मते 1 वर्षाखालील मुलांच्या डोळ्यांत काजळ अजिबात लावू नये. फारच आवश्यक वाटल्यास बाजारातील काजळ पूर्णपणे टाळावे. काजळामुळे अॅलर्जी, जंतुसंसर्ग, पापण्यांवर गाठी येणे आणि डोळ्यांच्या नसांना सूज येण्याचा धोका असतो.

हे ही वाचाः जेवण शिजवताना ‘या’ चुका करणे टाळा, नाहीतर तुम्हीच तुमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आणाल!

डोळ्यांची स्वच्छता कशी ठेवावी?
डोळ्यांची स्वच्छता राखण्यासाठी फक्त स्वच्छ कपडा आणि उकळून थंड केलेले पाणी वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. डोळ्यांत लालसरपणा, सूज किंवा जळजळ दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. परंपरेपेक्षा विज्ञान महत्त्वाचे असून, मुलांच्या डोळ्यांशी कोणताही प्रयोग भविष्यात गंभीर परिणाम करू शकतो, असा इशाराही तज्ज्ञ देत आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

पंकजा मुंडेंचा सातारा दौरा रद्द, पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, हवाई सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

0


Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडे यांचा सातारा दौरा अचानक रद्द झाला आहे. तांत्रिक कारणास्तव हेलिकॉप्टर उड्डाण रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. आज दुपारी मुंडे या मुंबईतून साताऱ्याला जाणार होत्या. मात्र, हेलिकॉप्टर रद्द झाल्याने दौरा ही रद्द करावा लागला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. आजही त्यांचा दौरा रद्द झाला असून, पंकजा मुंडे या दौरा रद्द करून रस्ते मार्गे पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. दोन दिवसांत मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड झाल्याने नेत्यांच्या हवाई सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी देखील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं लातूर दौरा रद्द झाला होता

मंगळवारी देखील भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडें यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक (Helicopter) बिघाड झाल्याची घटना घडली होती. छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वीच बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे लातूर दौऱ्यावर जाणार होत्या, मात्र टेकऑफपूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झालं. परिणामी पंकजा मुंडेंनी आपला प्रवास आणि संभाव्य सभांच्या वेळा पुढे ढकलल्या असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी सकाळी साडे दहा वाजता निघणार होते. त्यासाठी हेलिकॉप्टर विमानतळावरून टेक ऑफ होणार होते. मात्र मला कळवण्यात आले मी जे काल हेलिकॉप्टर वापरत होते त्यामध्ये काही बिघाड आहे. मला कालही तसे वाटले होते, हे हेलिकॉप्टर जुने आहे. पण काय बिघाड आहे या टेक्निकल बाबतीत मी गेले नाही. मला दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येणार असे सांगण्यात आले. मात्र जेव्हापासून अजितदादांचा अपघात झाला आहे आणि त्यात त्यांचे निधन झाले आहे. मी विचार करते की त्यावेळी त्या विमानातील लोकांना काय वाटले असेल? किती भयानक यातना आणि भय त्यांनी अनुभवले असेल. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडें यांनी दिलीय.

महत्वाच्या बातम्या:

Pankaja Munde: हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, लँडिंगवेळी भीती वाटते का? अजितदादांचा संदर्भ देत पंकजा मुंडे म्हणाल्या…..

आणखी वाचा



Source link