Thursday, July 30, 2026
Home Blog Page 521

“लग्नाआधी तो…” आयुष्य संपवणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

0
“लग्नाआधी तो…” आयुष्य संपवणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा


 Agra Suicide Case: पत्नीच्या अनि तिच्या माहेरच्या त्रासला कंटाळून स्वतःचे आयुष्य संपवणाऱ्या आग्रा येथील टीसीएस मॅनेजर मानव शर्माची पत्नी निकिता शर्माची प्रतिक्रिया समोर आली आहे. तो दारूच्या नशेत असताना मारहाण करायचा, असे निकिताने सांगितले आहे. एवढेच नाही तर तिने असेही म्हटले आहे की मानव शर्माने यापूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण तिनेच त्याला वाचवले आहे. ज्या रात्री त्याने आत्महत्या केली, त्याच दिवशी मी त्याच्या बहिणीलाही त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल आधीच सांगितले होते.

नक्की काय म्हणाली निकिता? 

निकिताने सांगितले की, “ज्या दिवशी मानवने आत्महत्या केली, तेव्हा त्याने मला माझ्या घरी सोडून गेला होता. मी त्याचा शेवटचा व्हिडीओ पाहिला आहे, मी हे सर्व माझ्या पत्नीमुळे करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. पण तो माझा भूतकाळ होता, जे काही घडले ते लग्नापूर्वीचे होते. लग्नानंतर काहीच नव्हते. ही गोष्ट ऐकून तो खूप प्यायचा.  गोंधळ घालायचा आणि स्वतःचे नुकसानही करून घ्यायचा. “

वाचा संपूर्ण प्रकरण: ‘पुरुषांचाही विचार करा’ म्हणत TCS च्या मॅनेजरची आत्महत्या! बायकोच्या ‘त्या’ हट्टाने घेतला जीव

दोन-तीन वेळा फाशी घेण्याचा प्रयत्न

निकिताने पुढे सांगितले की, “त्याने दोन-तीन वेळा फाशी घेण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः फास कापून त्याला वाचवले होते.  आनंदाने त्याला घेऊन आग्राला आणले आणि तोही मला आनंदाने घरी सोडून निघून गेला. त्याने हे सर्व एकाच रात्री केले.”

हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आली वाईट बातमी, ‘या’ दिग्गज फलंदाजाचा झाला आकस्मिक मृत्यू; चाहत्यांना धक्का

“मद्यपान केल्यावर तो मला मारहाण करायचा”- निकिता शर्मा 

“मद्यपान केल्यावर तो मला मारहाणही करायचा. त्यावेळी तो रागाच्या भरात धक्काबुक्की, हात चावण्यासारख्या गोष्टी करायचा.  मी मानवच्या आई-वडिलांनाही हे सांगितले होते की त्यांच्यापैकी एकाने त्याच्यासोबत असायाला हवे. त्यावर त्यांनी सांगितले की, हा पती-पत्नीचा विषय आहे आणि यात तिसरं  कोणीही काहीही करू शकत नाही. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला तेव्हा मी त्याच्या बहिणीला फोन करून सांगितले की मानव दारू पिऊन आत्महत्या करणार आहे, मी फोटो देखील पाहिला होता. तर त्यावर त्याची बहीण म्हणाली, “झोप जा , त्याला काही होणार नाही, माझं बोलणं झालेलं आहे.” 

निकिता पुढे म्हणाली, “यानंतर मी माझ्या वडिलांना मेसेज केला आणि म्हणालो, पापा, प्लीज एकदा मानवच्या खोलीत जा आणि त्याला बघा. तो माझा फोन उचलत नाहीये. मी ओरडत होतो की तो आत्महत्या करेल.” 

हे ही वाचा: “भारत तुम्हाला पगार देत आहे…”, सुनील गावस्कर अचानक संतापले, वक्तव्याने उडाली खळबळ

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आग्रा येथील टीसीएस कंपनीचे व्यवस्थापक मानव शर्मा यांनी  व्हिडीओ बनवून त्यात लाइव्ह आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मानव शर्माने पत्नीवर छळ करण्याचे आणि अफेअरचे आरोप केले होते.  व्हिडीओमध्ये, मृत मानव शर्मा रडला आणि आई आणि वडिलांना सॉरीसुद्धा म्हणाला. मी माझ्या पत्नीच्या छळाला कंटाळलो आहे. असे म्हणत त्याने जीव दिला. 





Source link

IIT बाबाला लाईव्ह कार्यक्रमात चोप दिला? राड्याचा Video Viral

0
IIT बाबाला लाईव्ह कार्यक्रमात चोप दिला? राड्याचा Video Viral


IIT Baba beaten up : संगमनगरी प्रयागराज इथं यंदाच्या वर्षी भरलेल्या महाकुंभ मेळ्यातून अनेक चेहरे, साधूसंत प्रकाशझोतात आहे. आयआयटी बाबा (IIT Baba) सुद्धा त्यापैकीच एक. आपण आयआयटीमधून शिक्षण घेतल्याचं सांगण्यापासून ते अगदी अध्यात्मिक जीवनाला विज्ञानाची जोड देत त्याच आधारावर आपले विचार मांडणारे हे आयआयटी बाबा सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं प्रसिद्धीझोतात आले. पण, त्याचे विचार सर्वांनाच पटले असं नाही. 

या युवा संन्यस्त व्यक्तीच्या विरोधातही काही साधूसंतांनी आवाज उठवला आणि यातूनच नवा वाद डोकं वर काढताना दिसला. महाकुंभ मेळ्याची सांगता झाल्यानंतर ही मंडळी कुठे लुप्त होतील अशीच चर्चा असताना आता पुन्हा एकदा या बाबांनी सर्वांचं लक्ष वेधलं. 

IIT Baba वर रोष… 

नुकतंच एका खासगी वृत्तवाहिनीनं कुंभमुळं चर्चेत असणाऱ्या या बाबांना चर्चा आणि वादविवादपर कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. पण, प्रत्यक्षात मात्र या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात काही केशरी वस्त्र धारण केलेल्या व्यक्ती दाखल झाल्या आणि त्यांनी आपल्याला मारहाण केली, असा गंभीर आरोप अभय सिंह अर्थात IIT Baba यांनी केला. इतकंच नव्हे तर त्यांनी या घटनेची रितसर तक्रार पोलिसातही दाखल केली. 

हा सर्व प्रकार इथंच थांबला नाही. तक्रार दाखल केल्यानंतर हा बाबा नोएडातील सेक्टर 126 मधील पोलीस स्थानकाबाहेर आंदोलनही करताना दिसले. अखेर पोलिसांच्याच सांगण्यावरून त्यांनी हे आंदोलन मागेही घेतलं. 

राहिला प्रश्न त्या कार्यक्रमादरम्यान या व्हायरल बाबांसोबत नेमकं काय. घडलं, याबाबतचा तर सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये जिथं आयआयटी बाबा सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात काही इतर साधूसंतमंडळींनीसुद्धा हजेरी लावली होती. न्यूज नेशन या वाहिनीच्या या कार्यक्रमादरम्यानच आयआयटी बाबानं इन्स्टा लाईव्ह करण्यास सुरुवात केली. मला मारलं, खोलीत डांबून ठेवलं…. केशरी वस्त्र घातलेल्या लोकांनी मला मारहाण केली असं म्हणत आपण कसाबसा बचाव करून बाहेर पडलो आहोत, असंही त्यांनी व्हिडीओतून सांगितलं. सध्या या वाहिनीचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत असून, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. 

आयआयटी बाबांची खरी ओळख… 

महाकुंभमधील IIT Baba यांचं खरं नाव अभय सिंह. ते मुळचे हरियाणाचे रहिवासी असून, आयआयटी मुंबईतून त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत कॅनडात काही वर्षे लाखोंच्या पगाराची नोकरी केली. तिथंच फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं आणि यातूनच त्यांचा कल अध्यात्माकडे वाढू लागला. 





Source link

Explainer : नेपाळमधील भूकंपानंतर बद्रीनाथमध्ये हिमस्खलन; योगायोग नव्हे तर… निसर्ग देतोय विध्वंसाचे संकेत?

0
Explainer : नेपाळमधील भूकंपानंतर बद्रीनाथमध्ये हिमस्खलन; योगायोग नव्हे तर… निसर्ग देतोय विध्वंसाचे संकेत?


Earthquake News : भारतीय उपखंडातील हिमालयीन क्षेत्रासह नजीकच्या देशांमध्ये सातत्यानं येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींनी आता चिंता वाढवली आहे. मागील 28 दिवसांचा आढावा घेतल्यास साधारण 14 भूकंपांची नोंद करण्यात आली. 4 रिश्टर स्केलहून अधिक तीव्रता असणाऱ्या या श्रेणीत हे भूकंप गणले गेले. भीतीदायक बाब म्हणजे भूकंपांची ही मालिका इतक्यावरच थांबणार नसून, दिवसागणित त्यात आणखी वाढ होणार आहे. 

भूगर्भशास्त्रज्ञांनी जानेवारी महिन्यातच यासंदर्भातील इशारा देत संशोधकांनाही सतर्क केलं होतं. हिमालयातील भूगर्भीय हालचालींमुळंच खरंच इतके भूकंप येत आहेत का? हाच प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. भूकंपांनी चिंता वाढवलेली असतानाच त्यात भर पडली ती म्हणजे बद्रीनाथ धाम येथील माणा गावात झालेल्या हिमस्खलनाची. 

सदर भागाचा आढावा घेण्यात आला तर, इथं हिमस्खलन किंवा भूस्खलनासारख्या घटना अगदी सामान्य आहेत. पण, हिमवृष्टी सुरी असताना हा बर्फाच्छादित डोंगरकडा इतक्या भयावह पद्धतीनं कोसळणं ही बाब मात्र काहीची अनपेक्षित ठरली कारण, या संकटाची दूरदूरपर्यंत चाहूलच नव्हती. 

बद्रीनाथमध्ये झालेली हिमस्खलनाची घटना सर्वसामान्य नसून या घटनेमुळं दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापैकी एक  म्हणजे इथं वादळसदृश्य हवामान स्थितीची कोणतीही चिन्हं नव्हती आणि दुसरा मुद्दा म्हणजे संपूर्ण हिमालय क्षेत्रामध्ये जाणवणारे धरणीकंप. या शक्यता आणि सद्यस्थिती हा निव्वळ योगायोग नसून, हे एका मोठ्या संकटाचे संकेत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 

घटनाक्रमाचा आढावा घेतल्यास शुक्रवारी बद्रीनाथ धाम इथं हिमकडा कोसळला, तत्पूर्वी काही तास आधीच नेपाळमध्ये 6.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता. परिणामी बद्रीनाथमधील या घटनेस हिमालयाच्या तळाशी होणाऱ्या हालचाली कारणीभूत आहेत ही बाब नाकारता येत नाही. या भागात भूकंपाची नोंद करण्यात आली नसली तरीही इथं भूगर्भात निर्माण होणारी कंपनी इतकी जास्त तीव्र असतात की त्यामुळं ग्लेशियर दुभंगून मोठमोठ्या दऱ्याही निर्माण होतात. हिमालयाची एकंदर रचना आणि सध्या घडणाऱ्या घटना पाहता भूगर्भातील या हालचाली येणाऱ्या एका मोठ्या संकटाचे संकेत देत तर नाहीत? हाच भीतीदायक प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 

विध्वंसातूनच निर्माण झालाय हिमालय… 

आजच्या घडीला हिमालय हा उत्तुंग पर्वत जिथं स्थिरावला आहे तिथं 225 कोटी वर्षांपूर्वी टिथिस समुद्र असल्याचं सांगितलं जातं. पृथ्वीच्या उदरात सागरी आणि महाद्वीपीय थरांमध्ये सतत बदलणाऱ्या गतीमुळं या समुद्रानं भारतीय थर आशिया आणि युरोपच्या थरापासूव वेगळा केला होता. या प्रक्रियेत टिथिस सागराचं अस्तित्वं नष्ट झालं आणि भारतीय उपखंडाचा थर वेगानं पुढे सरकला. 

भारतीय आणि युरेशियन हे दोन थर जवळ आल्यानं टिथिस सागरावर दबाव वाढला आणि त्यातूनच जो थर वर उचलला देला त्यातून 3 भागांमध्ये हिमालय पर्वत तयार झाला. हिमालय पर्वत तीन थरांमध्ये विभागला जातो ज्यात अनुक्रमे ग्रेटर (एव्हरेस्टसारखी शिखरं), मिडल (मध्य हिमालय) आणि खालचा थर (लघु हिमालय) यांचा समावेश आहे. 

वरील तिन्ही भागांच्या खालून, भूगर्भातून एक फॉल्टलाईन या संपूर्ण क्षेत्रामध्ये वारंवरा येणाऱ्या भूकंपास कारणीभूत ठरते असं अभ्यासकांतं मत. साधारण 2900 किमी लांबीच्या या रेषेला ‘मेन सेंट्रल थ्रस्ट (MCT)’ असंही म्हटलं जातं. हा तोच केंद्रबिंदू आहे जिथं भूपृष्ठाच्या खाली असणाऱ्या थरांचं एकमेकांवर घर्षण होत त्यातून प्रचंड उर्जा निर्माण होत असते. 

घर्षण प्रक्रियेदरम्यान अनेकदा हे दर एकमेकांव आदळून काही कंपनं निर्माण होतात. सहसा कमी तीव्रतेच्या भूकंपांना प्रीकर्सर शॉक्स असं म्हटलं जातं. या कंपनांनंतर मोठा भूकंप येतोच असं नाही. पण, एखाद्या मोठ्या भूकंपानंतर मात्र कमीजास्त तीव्रतेची अनेक कंपनं सातत्यानं जाणवत राहतात. सध्या हिमालयाच्या भूर्भात अशा अनेक हालचाली सुरू असून, त्यामुळं हिमालयच्या उंचीसह त्याच्या क्षेत्रफळावरही या हालचालींचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे. यातूनच ही कोणत्या मोठ्या संकटाची चाहूल तर नाही, हाच प्रश्न डोकं वर काढतो. 





Source link

गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला; मार्च महिन्यात वाढीव खर्चाच्या झळा, बदलले 4 महत्त्वाचे नियम

0
गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला; मार्च महिन्यात वाढीव खर्चाच्या झळा, बदलले 4 महत्त्वाचे नियम


Rules Change From 1March 2025 : देशभरात नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल केले जातात. हे नियम इतके महत्त्वाचे असतात की, कमीजास्त प्रमाणात त्याचा सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर, खर्चाच्या गणितावरही परिणाम होत असतं. मार्च महिनाही इथं अपवाद ठरलेला नाही. कारण, या महिन्यातही असेच काही सुधारित नियम लागू झाले आहेत. काय आहेत ते नियम? पाहा… 

गॅस सिलेंडर महागला 

1 मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर अर्थात 19 किलोचा सिलेंडर 6 रुपयांनी महागला आहे. ज्यामुळं आता दिल्लीत या सिलेंडरसाछी 1803 रुपये तर, मुंबईत त्यासाठी 1755.50 रुपये इतकी किंमत मोजावी लागत आहे. घरगुती वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कोणतीही कपात करण्यात आली नसून, 14.2 किलो वजनाचे हे सिलेंडर मुंबईत 802.50 रुपये तर, दिल्लीमध्ये 80.3 रुपयांना उपलब्ध आहेत. 

म्युच्युअल फंड आणि डिमॅट अकाऊंट 

SEBI नं म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यासाठीच्या नामांकन अर्थात नॉमिनी प्रक्रियेतील नियम बदलला असून, आता गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 10 व्यक्तींचं नाव नॉमिनी म्हणून देता येणार आहे. हक्क नसलेल्या मालमत्ता कमी करत गुंतवणुकीच्या नियोजित व्यवस्थापनासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. 

पंजाब नॅशनल बँक केवायसी अपडेट 

पंजाब नॅशनल बँकेत खातं असल्यास आणि 2 वर्षांपासून कोणताही व्यवहार न झाल्यास तुमचं बँक खातं बंद होऊ शकतं. बँकेनं ग्राहकांना याबाबतच्या सूचना जारी केल्या असून, खातं सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी केवायसी अपडेट करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

विमा प्रिमियम 

विमा नियामक IREDA च्या वतीनं जीवन-आरोग्य विमान कंपन्यांसाठी ‘विमा-ASBA’ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत पॉलिसी खरेदीदारांना त्यांच्या बँक खात्यात विमा प्रिमियमची रक्कम ब्लॉक करता येऊ शकते. पॉलिसी जारी केल्यावर खात्यातून ही रक्कम वजा होईल. कंपनीनं विमा नाकारल्यास खात्यातील रक्कम अनब्लॉक होणार असून, वैयक्तिक पॉलिसीधारकांसाठी ही सुविधा लागू असेल. 

वरील नियमांमध्ये बदल झालेले असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नसून, इंधनाचे दर स्थिर ठेलण्यात आले आहेत. 





Source link

फलटण तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष अटळ – श्रीमंत रामराजे

0
फलटण तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष अटळ – श्रीमंत रामराजे

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये शेतकऱ्यांची बैठक; पुण्यात तीव्र विरोधाचा निर्धार

फलटण: पुणे येथे उद्या होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, फलटण तालुक्याच्या हक्काच्या नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचा अन्य तालुक्यांना वाटप करण्याच्या प्रयत्नांना तीव्र विरोध दर्शवत, “फलटणच्या हक्काचे एकही थेंब पाणी बाहेर जाऊ देणार नाही, वेळ पडल्यास संघर्षाला तयार आहोत,” असा ठाम निर्धार आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कुणालाही देणार नाही
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत लक्ष्मी विलास निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे येथील बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मागणीला विरोध करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगोला तालुक्यातील किसंगी तलावात नीरा उजवा कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे, तर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी माचनूर उपविभागातील शाखा क्र. 2 साठी वाढीव पाणी मागितले आहे. या मागण्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठवण्यात आल्या असून, त्यावर पुण्यातील बैठकीत निर्णय होणार आहे.

फलटणच्या ऊस कारखान्यांवर परिणाम
यासंदर्भात बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले, “नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा हक्क डावलला जाणार नाही. सांगोला व माळशिरसला पाणी मिळावे याला आमचा विरोध नाही, पण तोपर्यंत नीरा खोऱ्यातील जलसाठ्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्चस्तरीय बैठक घेण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी दखल घेतली नाही. फलटणमध्ये चार साखर कारखाने असून, पाणी कमी झाल्यास ऊसशेतीवर मोठा परिणाम होईल.”

रामराजेंचा माजी खासदारांना टोला
यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता टोला लगावत म्हटले, “जे बारामतीकरांना पाणी चोर म्हणत होते, तेच आता आपल्या हक्काचे पाणी दुसऱ्या तालुक्यांना वळवण्याचा डाव आखत आहेत. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.”

यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Book Review : ‘गाईच्या नावानं चांगभलं…’ गोरक्षा चळवळीमागचं राजकारण आणि सामाजिक-आर्थिक परिणाम

0
Book Review : ‘गाईच्या नावानं चांगभलं…’ गोरक्षा चळवळीमागचं राजकारण आणि सामाजिक-आर्थिक परिणाम


पत्रकार श्रुति गणपत्ये लिखित ‘गाईच्या नावानं चांगभलं’ या पुस्तकात गोरक्षकांच्या कामाची पद्धत, त्यांच्याकडून होणारा हिंसाचार, गोमांस खाण्यावर आणि विक्रीवर असलेली बंदी, गरीब शेतकऱ्यांचं बिघडलेलं अर्थकारण, हिंदूंच्या गोमांस भक्षणाचा उदाहरणासह इतिहास सादर केला आहे.



Source link

धोका! रोज सकाळी इडली खाणाऱ्यांनो सावध व्हा; सरकारनं एकाएकी का घातली बंदी?

0
धोका! रोज सकाळी इडली खाणाऱ्यांनो सावध व्हा; सरकारनं एकाएकी का घातली बंदी?



Idli for breakfast : सकाळच्या वेळी किंवा दिवसभरात कधीही इडली आवडीनं खाताय खरं, पण हीच इडली तुमच्या आरोग्यास किती घातक ठरतेय कळतंय का?



Source link

Badrinath Avalanche: बद्रीनाथमध्ये मोठी दुर्घटना; हिमकडा कोसळून 57 जण बर्फाखाली दबले?

0
Badrinath Avalanche: बद्रीनाथमध्ये मोठी दुर्घटना; हिमकडा कोसळून 57 जण बर्फाखाली दबले?


Nov 28, 2024 | 1st Test – Day Stumps

Crowe-Thorpe Trophy, 2024

Nov 28, 2024 | 1st Test – Day Stumps

Sri Lanka in South Africa, 2 Test Series, 2024

No match is being played.

Nov 22, 2024 | 1st Test

Bangladesh in West Indies, 2 Test Series, 2024

WI

(144.1 ov) 450/9 dec

(46.1 ov) 152

VS

BAN

269/9 dec (98.0 ov)

132 (38.0 ov)

West Indies beat Bangladesh by 201 runs
Full Scorecard →

Nov 26, 2024 | 2nd ODI

Pakistan in Zimbabwe, 3 ODI Series, 2024

ZIM

(32.3 ov) 145

VS

PAK

148/0 (18.2 ov)

Pakistan beat Zimbabwe by 10 wickets
Full Scorecard →





Source link

Highest Salary Jobs: भारतातील ‘हे’ 5 जॉब्स देतील बक्कळ पगार, नोकरी मिळाली तर समजा जणू लागली ‘लॉटरी’!

0
Highest Salary Jobs: भारतातील ‘हे’ 5 जॉब्स देतील बक्कळ पगार, नोकरी मिळाली तर समजा जणू लागली ‘लॉटरी’!


Top 5 Highest Paying Jobs in India: अभ्यास पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला एक उत्तम नोकरी मिळवून भरपूर पैसे कमवायचे असतात. अनेकदा विद्यार्थ्यांना अशा कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असतो जो पूर्ण केल्यानंतर त्यांना खूप जास्त पगाराची नोकरी मिळण्यास मदत होईल. चला तर मग आम्ही तुम्हाला भारतातील अशा नोकऱ्यांबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये मिळणार पगार हा बाकीच्या पगारापेक्षा सर्वोत्तम आहेत. यानुसार तुम्ही तुमचे भविष्यातील करिअर सहज ठरवू शकता. S&P ग्लोबल रेटिंगनुसार, भारत 2027 पर्यंत जागतिक आर्थिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो, 2029 पर्यंत जर्मनी आणि जपानला मागे टाकत. अशा परिस्थितीत भारतातील नोकरीच्या जगातही मोठे बदल होत आहेत.  चला अशा नोकरींबद्दल जाणून घेऊयात ज्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळाली तर तुम्ही लॉटरी जिंकली आहे असे समजा.

1. आयटी डायरेक्टर

रिपोर्ट्सनुसार, भारतात सर्वाधिक पगाराची नोकरी ही आयटी डायरेक्टरची आहे. आयटी डायरेक्टर्सचे काम एखाद्या संस्थेच्या किंवा कंपनीच्या तांत्रिक प्रणाली आणि कामकाजावर देखरेख करणे आहे. आयटी डायरेक्टर होण्यासाठी, पदवीधराकडे कॉम्प्युटर सायन्स, आयटी, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि संबंधित क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक असते. मास्टर्स डिग्रीकेल्यानंतरही तुम्ही आयटी डायरेक्टर होऊ शकता. या जॉबच्या पगाराचे पॅकेज 14 लाख ते 99 लाख रुपये प्रति वर्ष असू शकते. मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, गुगल, अ‍ॅमेझॉन सारख्या कंपन्या आयटी डायरेक्टरची नियुक्ती करतात.

हे ही वाचा: ‘पुरुषांचाही विचार करा’ म्हणत TCS च्या मॅनेजरची आत्महत्या! बायकोच्या ‘त्या’ हट्टाने घेतला जीव

 

2. कमर्शियल पायलट

कमर्शियल पायलटची नोकरी ही सुद्धा भारतातील सर्वाधिक पगाराची नोकरी आहे. याचे काम अतिशय आव्हानात्मक आणि जोखमीचे आहे, म्हणूनच त्यांना या कामासाठी खूप कठोर प्रशिक्षण दिले जाते. सुरक्षित उड्डाणे उडवण्याची जबाबदारी कमर्शियल पायलटची असते. यामध्ये उड्डाणपूर्व तपासणी, उड्डाण नियोजन, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन, लँडिंग आणि इतर अनेक कामांचा समावेश आहे. व्यावसायिक पायलटचे पगाराचे पॅकेज 1.1 लाख रुपये ते 84 लाख रुपये प्रति वर्ष असू शकते.

हे ही वाचा: Champions Trophy 2025: रोहित शर्मा पुढचा सामना खेळणार नाही ? ‘हा’ 25 वर्षांचा फलंदाज होऊ शकतो न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात कर्णधार

 

3. मॅनेजमेंट कन्सल्टन्ट 

मॅनेजमेंट कन्सल्टन्ट या जॉबमध्ये कंपन्यांच्या बारीकसारीक समस्या समजून घेतल्यानंतर, कंपनी अधिक चांगले कसे कार्य करू शकते याबद्दल त्यांच्या सूचना देतात. यासाठी कोणत्याही विशेष पदवीची आवश्यकता नसते पण तुमच्याकडे व्यवसाय, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, वित्त आणि इतर संबंधित क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. या नोकरीमध्ये वार्षिक पगार 6.6 लाख ते 42 लाखांपर्यंत असू मिळू शकतो.

4. प्रोडक्ट मॅनेजर 

प्रोडक्ट मॅनेजर हे कोणत्याही उत्पादनाच्या कामावर देखरेख करतात. या जॉबसाठी मार्केटिंग, कॉम्प्युटर सायन्स, इंजिनीअरिंग आणि इतर संबंधित क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. प्रोडक्ट मॅनेजरचा वार्षिक पगार 5.5 लाख ते 38 लाखांपर्यंत असतो. 

हे ही वाचा: Kedarnath Yatra: प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी उघडणार केदारनाथ मंदिर, जाणून घ्या चार धाम यात्रेशी संबंधित डिटेल्स

 

5.  इनव्हेसमेंट बँकर्स

ज्यांना पैशाशी संबंधित क्षेत्रात अधिक रस आहे त्यांच्यासाठी इनव्हेसमेंट बँकर्स हा एक चांगला करिअर पर्याय आहे. इनव्हेसमेंट बँकर्स हे कंपनीला वेगवेगळ्या स्त्रोतांकडून पैसे कमवण्याच्या कल्पना देतात. म्हणूनच त्यांना पैसेवाले असेही म्हणतात. इनव्हेसमेंट बँकर्सचा पगार वर्षाला 2 लाख ते 60 लाख रुपयांपर्यंत असतो.





Source link

“मल्हार युग” – डॉ. आम्रपाली कोकरे यांचे ऐतिहासिक योगदान

0
“मल्हार युग” – डॉ. आम्रपाली कोकरे यांचे ऐतिहासिक योगदान

फलटण – महान योद्धा मल्हारराव होळकर यांच्या अद्वितीय कार्यावर आधारित “मल्हार युग” या पुस्तकाचे लेखन फलटणच्या डॉ. आम्रपाली कोकरे यांनी केले आहे. या ग्रंथात मल्हाररावांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे उत्कृष्ट शब्दांकन करण्यात आले आहे.

या पुस्तकाबाबत अनूप शहा यांनी विशेष कौतुक व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, “हे पुस्तक प्रत्येक घरात असले पाहिजे, जेणेकरून समाजात मल्हाररावांसारख्या धैर्यवान योद्ध्यांची प्रेरणा निर्माण होईल.”

पुस्तक लेखनासाठी डॉ. आम्रपाली कोकरे यांनी अत्यंत मेहनत घेतली असून, संकटांचा सामना करत इतिहासातील हा स्वाभिमानी योद्धा नव्या पिढीसमोर उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. अनूप शहा यांनी पुस्तक स्वीकारताना सांगितले की, “मल्हाररावांच्या पराक्रमाची ओळख करून देणारे हे पुस्तक वाचून प्रत्येकाला राष्ट्रभक्ती आणि परिश्रमाची प्रेरणा मिळेल.”