Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेश"लग्नाआधी तो..." आयुष्य संपवणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

“लग्नाआधी तो…” आयुष्य संपवणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

“लग्नाआधी तो…” आयुष्य संपवणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

[ad_1]

 Agra Suicide Case: पत्नीच्या अनि तिच्या माहेरच्या त्रासला कंटाळून स्वतःचे आयुष्य संपवणाऱ्या आग्रा येथील टीसीएस मॅनेजर मानव शर्माची पत्नी निकिता शर्माची प्रतिक्रिया समोर आली आहे. तो दारूच्या नशेत असताना मारहाण करायचा, असे निकिताने सांगितले आहे. एवढेच नाही तर तिने असेही म्हटले आहे की मानव शर्माने यापूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण तिनेच त्याला वाचवले आहे. ज्या रात्री त्याने आत्महत्या केली, त्याच दिवशी मी त्याच्या बहिणीलाही त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल आधीच सांगितले होते.

नक्की काय म्हणाली निकिता? 

निकिताने सांगितले की, “ज्या दिवशी मानवने आत्महत्या केली, तेव्हा त्याने मला माझ्या घरी सोडून गेला होता. मी त्याचा शेवटचा व्हिडीओ पाहिला आहे, मी हे सर्व माझ्या पत्नीमुळे करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. पण तो माझा भूतकाळ होता, जे काही घडले ते लग्नापूर्वीचे होते. लग्नानंतर काहीच नव्हते. ही गोष्ट ऐकून तो खूप प्यायचा.  गोंधळ घालायचा आणि स्वतःचे नुकसानही करून घ्यायचा. “

वाचा संपूर्ण प्रकरण: ‘पुरुषांचाही विचार करा’ म्हणत TCS च्या मॅनेजरची आत्महत्या! बायकोच्या ‘त्या’ हट्टाने घेतला जीव

दोन-तीन वेळा फाशी घेण्याचा प्रयत्न

निकिताने पुढे सांगितले की, “त्याने दोन-तीन वेळा फाशी घेण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः फास कापून त्याला वाचवले होते.  आनंदाने त्याला घेऊन आग्राला आणले आणि तोही मला आनंदाने घरी सोडून निघून गेला. त्याने हे सर्व एकाच रात्री केले.”

हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आली वाईट बातमी, ‘या’ दिग्गज फलंदाजाचा झाला आकस्मिक मृत्यू; चाहत्यांना धक्का

“मद्यपान केल्यावर तो मला मारहाण करायचा”- निकिता शर्मा 

“मद्यपान केल्यावर तो मला मारहाणही करायचा. त्यावेळी तो रागाच्या भरात धक्काबुक्की, हात चावण्यासारख्या गोष्टी करायचा.  मी मानवच्या आई-वडिलांनाही हे सांगितले होते की त्यांच्यापैकी एकाने त्याच्यासोबत असायाला हवे. त्यावर त्यांनी सांगितले की, हा पती-पत्नीचा विषय आहे आणि यात तिसरं  कोणीही काहीही करू शकत नाही. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला तेव्हा मी त्याच्या बहिणीला फोन करून सांगितले की मानव दारू पिऊन आत्महत्या करणार आहे, मी फोटो देखील पाहिला होता. तर त्यावर त्याची बहीण म्हणाली, “झोप जा , त्याला काही होणार नाही, माझं बोलणं झालेलं आहे.” 

निकिता पुढे म्हणाली, “यानंतर मी माझ्या वडिलांना मेसेज केला आणि म्हणालो, पापा, प्लीज एकदा मानवच्या खोलीत जा आणि त्याला बघा. तो माझा फोन उचलत नाहीये. मी ओरडत होतो की तो आत्महत्या करेल.” 

हे ही वाचा: “भारत तुम्हाला पगार देत आहे…”, सुनील गावस्कर अचानक संतापले, वक्तव्याने उडाली खळबळ

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आग्रा येथील टीसीएस कंपनीचे व्यवस्थापक मानव शर्मा यांनी  व्हिडीओ बनवून त्यात लाइव्ह आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मानव शर्माने पत्नीवर छळ करण्याचे आणि अफेअरचे आरोप केले होते.  व्हिडीओमध्ये, मृत मानव शर्मा रडला आणि आई आणि वडिलांना सॉरीसुद्धा म्हणाला. मी माझ्या पत्नीच्या छळाला कंटाळलो आहे. असे म्हणत त्याने जीव दिला. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments