Thursday, July 30, 2026
Home Blog Page 520

जितेंद्र, हसन यांनी नाकारला होता ‘चालबाज’: 24 फेब्रुवारीला होती श्रीदेवीची पुण्यतिथी, त्यांचा ‘चालबाज’ ठरला होता सुपरहिट सिनेमा

0
जितेंद्र, हसन यांनी नाकारला होता ‘चालबाज’:  24 फेब्रुवारीला होती श्रीदेवीची पुण्यतिथी, त्यांचा ‘चालबाज’ ठरला होता सुपरहिट सिनेमा


रूमी जाफरी6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ज्यांना मी भाभीजी म्हणायचो, त्या श्रीदेवीजींची २४ फेब्रुवारीला पुण्यतिथी होती. त्या दिवशी आम्हाला त्यांच्यासोबत व्यतित केलेला काळ आठवत होता. त्यांच्या संस्मरणीय सिनेमांपैकी एक म्हणजे ‘चालबाज’. आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये या सिनेमाविषयी…

‘चालबाज’चे दिग्दर्शक पंकज पराशर माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्यासोबत कामही केले आहे. या सिनेमाच्या प्लॅनिंगविषयी त्यांना विचारले. ते म्हणाले की, माझा ‘जलवा’ सिनेमा पाहून एल. व्ही. प्रसाद यांनी दक्षिणेतील दिग्गज निर्माते ए. पूर्णचंद्र राव यांना सांगितले, तुम्ही याला घेऊन सिनेमा बनवा, हा खूप मोठा दिग्दर्शक होईल. मग राव यांनी माझ्याशी संपर्क केला. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले. त्यांच्याकडे निघाल्यावर मनात विचार घोळत होता.. आपण त्यांना सांगावे की, तुम्ही अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘अंधा कानून’, ‘आखिरी रास्ता’ असे दोन्ही सुपरहिट सिनेमे बनवले आहेत. अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे प्लीज अमिताभ बच्चन यांना आणा, मी तुम्हाला एक सुपरहिट सिनेमा देतो.. त्यांच्या ऑफिसात शिरताच मला श्रीदेवीच्या कोणत्या तरी दाक्षिणात्य सिनेमाचे पोस्टर लावलेले दिसले.

हे पोस्टर पाहिल्यावर माझा विचार बदलला. मी पूर्णचंद्र रावांना विचारले, तुम्ही श्रीदेवीला ओळखता? ते म्हणाले की, माझे श्रीदेवीशी कौटुंबिक संबंध आहेत. मी तिच्याशी बोलेन, पण विषय काय आहे? मी तर अमिताभ बच्चन यांचा विचार डोक्यात ठेऊन गेलो होतो. पण, अचानक ‘सीता और गीता’ असे मी बोलून गेलो. पूर्णचंद्र रावांनी लगेच ‘ठीक आहे’ म्हणत साइनिंग अमाउंट म्हणून ११ हजार रुपयांचा चेक मला दिला आणि म्हणाले, पप्पी सध्या अमेरिकेत आहे, पण उद्या दुपारपर्यंत मी तुम्हाला तिच्या तारखा मिळवून देईन. आणि खरोखरच त्यांनी दुसऱ्या दिवशी मला श्रीदेवीच्या तारखा कळवल्याही. श्रीदेवीचे पूर्णचंद्र रावांशी किती जवळचे नाते असेल बघा, त्यांनी कथानक न ऐकताच केवळ ‘सीता और गीता’ एवढ्या नावावरच तारखाही मिळवून दिल्या. त्यानंतर पूर्णचंद्र रावांनी सांगितले की, तुम्ही लगेच पटकथा लिहायला सुरूवात करा. मी विचारले, सर, हीरो कोण घ्यायचे? ते म्हणाले, धर्मेंद्रने केलेल्या भूमिकेसाठी रजनीकांतला आणि संजीवकुमारच्या भूमिकेसाठी जितेंद्रला घेऊ. दोघांशीही माझे घनिष्ट संबंध आहेत, तुम्ही त्याचे टेन्शन घेऊ नका. मग त्यांनी जीतूजींची अपॉइंटमेंट घेतली आणि मी जाऊन त्यांना कथानक ऐकवले. जितूजींना त्यात मजा वाटली नाही. ते मला म्हणाले, पंकज, तू ‘करमचंद’सारखा स्टायलिश शो बनवला, ‘जलवा’सारखा जबरदस्त सिनेमा तयार केला, मग रमेश सिप्पीच्या सिमेनाचा रिमेक का करतोयस? आपल्या शैलीतले काही ओरिजनल बनव.

ही गोष्ट पूर्णचंद्र रावांना सांगितल्यावर ते म्हणाले, आपण दुसऱ्या कुणाला तरी घेऊ. तुम्हाला ‘सीता और गीता’ बनवायचाय ना, तुम्ही त्यावरच काम करा. मग मी ‘सीता और गीता’पेक्षा ही कथा कशी वेगळी करता येईल, हे डोक्यात ठेऊनच ती लिहिली. मी परत आल्यावर राव मला म्हणाले की, मी कमल हसनसोबत अपॉइंटमेंट फिक्स केली आहे, तुम्ही त्यांना कथानक ऐकवा. मी कमल हसन यांना नॅरेशन दिले. त्यावर ते म्हणाले, तुम्ही ‘सीता और गीता’मध्ये का बदल केला? मी उत्तर दिले की, मला ‘सीता और गीता’ जसाच्या तसा बनवायचा नाहीय. हे एेकून कमल हसन म्हणाले की, तुम्ही हे चुकीचे करताय. ‘सीता और गीता’ बनवायचे ठरवलेय तर तेच बनवा. तुम्ही समजा शेक्सपिअरची कहाणी घेतली आणि म्हणालात की मी यावर सिनेमा बनवतोय, पण आता त्यातून शेक्सपिअर बदलतोय, तर सगळे बिघडून जाईल. तुमचे संवाद वेगळे असतील, व्यक्तिरेखा वेगळ्या असतील, शॉट डिव्हिजन वेगळे असेल, लोकेशन वेगळे असेल, तर सिनेमाही वेगळा वाटेलच. पण, ‘सीता और गीता’ची जी मूळकथा आहे, ती बदलू नका.

हे ऐकून मनात विचार आला की, मी पुन्हा ‘सीता और गीता’च बनवतोय असे वाटल्याने जितेंद्र यांनी नकार दिला आणि मी ‘सीता और गीता’ बदलतोय म्हणून कमल हसन नकार देत होते. असो. मी परत येऊन हे पूर्णचंद्र रावांना सांगितले. ते म्हणाले, अगदी बरोबर आहे. तुम्ही तुमच्या मनातील कल्पनेप्रमाणे ‘सीता और गीता’ लिहा, आपल्याला दुसरा हीरो मिळेल. मग ही भूमिका सनी देओलने केली. आणि त्यानंतर हा सिनेमा किती गाजला, हे सगळ्यांना माहीत आहे. ‘चालबाज’ हा श्रीदेवीच्या आणि माझ्याही आयुष्यातील सर्वांत संस्मरणीय सिनेमांपैकी आहे… यावरुन मला शकील बदायुनी यांचा एक शेर आठवतोय… चाहिए ख़ुद पे यक़ीन-ए-कामिल हौसला किस का बढ़ाता है कोई।

मला पंकज यांनी सांगितले की, या सिनेमाची पहिली प्रिंट आली, तेव्हा मी रमेश सिप्पीजींना बोलावले आणि त्यांच्या पायाशी बसून त्याची पहिली ट्रायल पाहिली. सिनेमा संपल्यावर त्यांनी मला शाबासकी दिली. या गोष्टीवरुन मला जावेद साहेबांनी सांगितलेला एक किस्सा आठवतोय. त्यांनी सांगितले होते की, आम्ही सिप्पी फिल्ममध्ये काम करत होतो तेव्हा ‘राम और श्याम’ हा सिनेमा खूप हिट झाला होता. त्यावेळी सिप्पी फिल्मने असा विचार केला की, या सिनेमाप्रमाणेच दिलीपकुमार यांच्याऐवजी एखाद्या हीरोइनला घेऊन का सिनेमा बनवू नये? आणि मग हेमामालिनी यांना घेऊन ‘सीता और गीता’ बनवला, जो सुपरहिट झाला.

‘राम और श्याम’चे निर्माते होते बी. नागीरेड्डी. एकेदिवशी सिप्पी फिल्मच्या ऑफिसमध्ये नागीरेड्डीचींचा फोन आला की, मी मुंबईत आलो आहे आणि मला सिप्पी साहेबांना भेटायचेय. सिप्पी साहेबांनी दुसऱ्या दिवशी भेटीची वेळ दिली. पण, नागीरेड्डीजी येणार आहेत आणि आपण त्यांच्या ‘राम और श्याम’ची कॉपी करुन ‘सीता और गीता’ बनवलाय, त्याचा रिमेक केलाय. आता त्यांना सामोरे कसे जायचे, या विचाराने सिप्पींच्या ऑफिसात अस्वस्थता पसरली. ठरल्याप्रमाणे नागीरेड्डीजी आले, सिप्पी साहेबांसोबत चर्चा केली आणि निघून गेले. ते कशासाठी आले होते, असे सगळ्यांनी विचारल्यावर सिप्पी साहेबांनी सांगितले की, ते तमिळसाठी ‘सीता और गीता’च्या रिमेकचे राइट घेण्यासाठी आले होते. मी त्यांना म्हणालो, सर, का आम्हाला लाजवताय? आम्हीच तुमच्या ‘राम और श्याम’ला मुलगी बनवून रीमेक केलाय. तर नागीरेड्डीजी म्हणाले की, हीरोने केलेल्या भूमिकांमध्ये मुलगी काम करेल, ही आयडिया तुमचीच होती ना! पैसे तर अशा आयडियाचे असतात. त्यामुळे तुमच्याकडून राइट घेतल्यावरच मी त्यावर दक्षिणेत सिनेमा बनवेन. नागीरेड्डी यांच्यासारख्यांची नैतिकता आणि चारित्र्य असे होते.

श्रीदेवीजींनी अंगात ताप असतानाही चित्रीत केलेले ‘चालबाज’चे हे गाणे आज त्यांच्या आठवणीत ऐका…

न जाने कहाँ से आयी है, न जाने कहाँ को जाएगी…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

रसिक स्पेशल: राजधानीतील साहित्यपूर्ण संमेलन

0
रसिक स्पेशल:  राजधानीतील साहित्यपूर्ण संमेलन


ज्ञानेश्वर मुळे8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मराठी माणसाने आता तरी बहिर्मुख होण्याची गरज आहे. केवळ १९६० मध्ये भाषावार प्रांतरचना होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठीत साहित्याचे पीक जोरदार वाढीस लागले आहे, एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही.

दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलन संपून जेमतेम आठवडा झाला आहे. या संमेलनात नेहमीप्रमाणे अनेक विषयांवर टीकाटिप्पणी करणारी चर्चा झाली. खरे तर ती अजूनही सुरूच आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांप्रमाणे समाजमाध्यमांतही आपापल्या मगदुराप्रमाणे आणि आकलनाप्रमाणे कुणी आसूड ओढत आहे, कुणी पाठ थोपटत आहे. कुणी चिमटे काढत आहे, तर कुणी तोंडसुख घेत आहे. आणखी एक-दोन आठवडे चर्चा सुरू राहील आणि मग हा विषय थंड होऊन लोक नव्या विषयांवर मतमतांतरे व्यक्त करु लागतील.

या संमेलनात मीही काही अंशी सहभागी होतो आणि एका सत्रात भागही घेतला. पण, तीनही दिवस मी संमेलनाला जवळपास पूर्ण म्हणता येईल अशी हजेरी लावली. पंतप्रधानांच्या उपस्थितीतील उद्घाटनापासून महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील समारोपापर्यंत महत्त्वाची सर्व सत्रे मी पाहिली आणि ऐकली. आयोजनातही एक स्वयंसेवक म्हणून मी जमेल तितके काम केले. या पार्श्वभूमीवर कोणताही पूर्वग्रह न बाळगता आपली काही निरीक्षणे मांडण्याचा प्रयत्न मी इथे करत आहे.

‘विचारकलहाला का भिता?’ असं आगरकरांनी म्हटलं होतं, तेव्हा भारत पारतंत्र्यात होता. समाज अनेक अनिष्ट प्रथांमध्ये लिप्त होता. आता स्वातंत्र्याच्या अवकाशात ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही अपवाद वगळता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बहुसंख्य नागरिक लाभ घेत आहेत. आणि त्याबाबतीत ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीप्रमाणे मतमतांतरे असणार, यात शंका नाही. या वेळीही संमेलनाची व्यवस्था, आमंत्रणपत्रे देताना उडालेला गोंधळ, राजकीय नेत्यांचा सहभाग, अमुक साहित्यिकांचा अनुपस्थिती अशा अनेक विषयांवर चर्चा आणि टीकाही झाली, ती अद्याप सुरू आहे.

संमेलनात अनेक उणिवा होत्या. खरे तर प्रत्येकाची प्रत्येक इच्छा किंवा सूचना विचारात घ्यायची झाली, तर (लोकशाही मान्य करुनही) संमेलन होणे अशक्य आहे. महाराष्ट्रात पत्रकार आणि विचारवंत, लेखक आणि टीकाकारांची अजिबात कमतरता नाही. शिवाय, प्रत्येकाचा स्वत:चा एक अजेंडा आणि फुगलेला अहं असतो. या पार्श्वभूमीवर संमेलन शेवटपर्यंत चांगले चालले आणि संपन्न झाले, हीच एक कामगिरी आहे.

पण, या सगळ्या धामधुमीतून आणि चर्वितचर्वणातून काही शिकण्यासारखे आहे का? हो, आहे. आणि तेच खरे तर आपण करत नाही. संमेलनाची चर्चा ही त्याचे स्थळ आणि अध्यक्ष जाहीर झाल्यावर सुरू होते आणि संमेलनाचे सूप वाजल्यावर काही काळापर्यंत चालते. पुन्हा चर्चा होते ती पुढच्या वर्षीचे स्थळ आणि अध्यक्ष निवडीच्या वेळी. साहित्य महामंडळाची एक प्रक्रिया आहे. ती पूर्ण पारदर्शक करुन सर्वांना या प्रक्रियेची माहिती देणे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया सर्वांना समजली तरी अर्धी-अधिक टीकाटिप्पणी टळेल. उदा. पूर्वी निवडणुका व्हायच्या. आता अध्यक्षांची निवड होते. निवडणुका होत्या तेव्हा अनेक अनिष्ट गोष्टींना वाव होताच; शिवाय साहित्यिकांचे राजकारण बघायची संधी सगळ्यांना मिळायची. आता मैफिलीचा तो भाग काहीसा नीरस झाला आहे. पण, निदान राजकारणाने येणारी कटुता तरी दिसत नाही.

दुसरी बाब म्हणजे, आधीच्या आणि होऊ घातलेल्या संमेलनाची अवास्तव चर्चा. अवास्तव यासाठीच की, ही चर्चा फक्त व्यवस्थेसंबंधी असते. ती साहित्याविषयीच्या प्रश्नांवर अजिबात नसते. दिल्लीच्या संमेलनाची इचलकरंजीच्या किंवा जळगावच्या संमेलनाशी तुलना करणे योग्य आहे का? महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर आलेल्या आपल्या सैन्याची पानिपतावर थंडीमुळे दैना झाली, असे इतिहास सांगतो. प्रत्येक ठिकाणची व्यवस्था, वातावरण आणि संदर्भ वेगळे असतात. दिल्लीत तर अनेक हितसंबंध आपोआप सक्रिय होणे साहजिक होते. ७० वर्षांनी आणि अभिजात भाषेच्या मान्यतेनंतर पंतप्रधानांच्या उपस्थितीत राजधानीमध्ये आपल्या साहित्याचा सन्मान होणे, ही गोष्ट महाराष्ट्राला भूषणावह नाही का? त्या समारंभातही प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष दृष्टिकोनाच्या वेगवेगळ्या छटा व्यक्त झाल्या, हा भारतीय लोकशाहीचा विजय नाही का? ही भाषणे परिपूर्ण नव्हती, पण ती मुख्यत: मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्र यावर केंद्रित होती, हे महत्त्वाचे.

आयोजकांची दिल्लीतील कसरत गेली चार – पाच महिने सुरू होती. या दरम्यान वातावरण निर्मितीसाठी अनेक उपक्रम घेण्यात आले. पुस्तक प्रकाशने, वक्त्यांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम यातून स्थानिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. महादजी शिंदेंची लेखनकामाठी प्रकाशात आणली गेली. तीन दिवसांच्या कार्यक्रमांचे नेटके आयोजन करण्यात आले. त्या दरम्यान आणि आजही प्रशंसा व टीका या दोन्ही गोष्टींना समबुद्धीने, समभावनेने स्वीकारले गेले.

साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे स्वरुप बदलायला हवे. कारण कवींची प्रचंड संख्या ही स्वागतार्ह गोष्ट असली, तरी तासन् तास कविता शांतपणे एेकणारा श्रोतृवंृद संमेलनात नसतो. यावर उपाय म्हणजे, कवितांचे वेगळे संमेलन ठेवणे किंवा कवींच्या संख्येला गुणात्मकतेच्या कठोर निकषांवर कात्री लावणे. पण, चांगली कविता कोण ठरवणार? शिवाय, प्रत्येक कवीचा अभिनिवेश ‘मंच हा आपला अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ असा असेल, तर महामंडळाने तरी काय करायचे?

संमेलनाचा ‘भव्यता’ हाच केवळ एक निकष कशासाठी हवा? एका विशाल अखिल भारतीय साहित्य संमेलनाऐवजी तीन किंवा चार संमेलने चार वेगवेगळ्या ठिकाणी का करु नयेत? त्यामुळे अनेकांनी संधीही मिळेल. छोट्या संमेलनांमुळे खर्चही कमी येईल. जिथे कधीच झाले नाही किंवा नजीकच्या काळात होण्याची शक्यता नाही, अशा ठिकाणीही संमेलने होतील. शिवाय, या विविध ठिकाणी साहित्यावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे.

साहित्य संमेलनाइतक्याच मराठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्याशी संबंधित गोष्टींवरही संमेलनाच्या निमित्ताने चर्चा व्हायला हवी. दिल्लीतील संमेलनाच्या औचित्याने ती काही प्रमाणात झाली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील कुसुमाग्रज अध्यासन, नूतन मराठी विद्यालयासाठी मदतीची घोषणा, मराठी माणसांसाठी दिल्लीत भव्य मराठी संकुल, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित व्यवस्था अशी काहीशी चांगली सुरूवात या संमेलनाच्या निमित्ताने झाली. पण, त्याची नाममात्र दखल घेण्यापलीकडे आपण सर्वांनी काय केले?

मराठी माणसाने आता तरी बहिर्मुख होण्याची गरज आहे. केवळ १९६० मध्ये भाषावार प्रांतरचना होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठीत साहित्याचे पीक जोरदार वाढीस लागले आहे, एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. पुढच्या काही वर्षांत बृहन्महाराष्ट्रातील मराठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांचे पुनरुज्जीवन किंवा संवर्धन, अटकपासून कटकपर्यंत घडलेल्या मराठी इतिहासाच्या अवशेषांचे दस्तावेजीकरण व संरक्षण, तसेच देशातील १० प्रमुख विद्यापीठांमध्ये मराठी अध्यापनासाठी अध्यासनांचे प्रावधान या गोष्टींना साहित्याइतकेच महत्त्व शासन व मराठी जनतेने दिले पाहिजे. साहित्य म्हणजे सर्वांना ‘सहित’ अर्थात सोबत घेऊन जाणारे अशी व्याख्या असेल, तर ते सर्जनशील आणि समावेशक असणे आवश्यक आहे.

(संपर्क – dmulay58@gmail.com)



Source link

रसिक स्पेशल: राज्यभर पसरलेल्या ‘फिक्सर्स’चे काय..?

0
रसिक स्पेशल:  राज्यभर पसरलेल्या ‘फिक्सर्स’चे काय..?


शैलेन्द्र परांजपे10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘फिक्सर’ असा बदलौकिक असलेल्यांना पीए, ओएसडी नेमणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले, हे बरेच झाले. त्यामुळे मंत्रालयातील फिक्सर काही काळ मुख्य प्रवाहाबाहेर राहतीलही. पण, सर्वसामान्यांच्या घामाच्या कमाईवर दररोज डल्ला मारणाऱ्या राज्याच्या सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाऱ्यांवर ते काही उपाय करणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे.

आपल्याला स्वीय सचिव किंवा विशेष कार्यअधिकारी नेमण्याचेही अधिकार नाहीत, असे जाहीर विधान राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अलीकडेच केले. आता पीए किंवा ओएसडी यांची नेमणूक करण्याचे अधिकारही मुख्यमंत्र्यांकडे आहेत, असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. त्यानंतर या नेमणुकांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच असतात, हे कोकाटे यांचे नाव घेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. तसेच, आपल्याकडे विविध मंत्र्यांकडून आलेल्या १२५ नावांपैकी १०९ नावांना मंजुरी दिली असून, १६ नावांना ती दिली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात ज्या पीए किंवा ओएसडींबद्दल ‘फिक्सर’ असल्याचा बदलौकिक आहे, ज्यांची नावे गैरप्रकारांमध्ये गुंतलेली आहेत किंवा ज्यांच्यावर आरोप आहेत, अशांची नावे आपण क्लिअर केलेली नाहीत, हे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत.

स्वत: मुख्यमंत्र्यांनीच ‘फिक्सर’ हा शब्द वापरल्याने सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या नसत्या, तरच नवल! ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे लोकांच्या अंगवळणी पडले आहे. सहा महिने थांबायला लागते, कारण अगदी साधी साधी कामेही कूर्मगतीने होतात आणि ती करताना शक्य तितकी ‘लक्ष्मीदर्शना’ची संधी साधली जाते. पदार्थविज्ञानानुसार जड वस्तूच्या हालचालीचा वेग कमी, तर हलक्या वस्तूचा वेग जास्त असतो. पण, सरकारी कामांमध्ये याच्या उलट घडते. तिथे फायलींवर वजन ठेवल्याशिवाय त्या पुढे सरकत नाहीत, हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे.

मुख्यमंत्र्यांनी १२५ पैकी १०९ नावांना मंजुरी दिली आणि फिक्सर असल्याचा संशय असलेली किंवा गैरप्रकारांचे आरोप असलेली १६ नावे मंजूर केली नाहीत. पण, मग सर्वसामान्यांना हे पीए किंवा ओएसडी नेमके काय ‘फिक्स’ करतात, हेही कुतूहल निर्माण झाले असणारच. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी, ‘रुपयातील पंधरा पैसेच लोकांपर्यंत पोहोचतात,’ असे विधान केले होते, त्याला किमान पस्तीस वर्षे लोटली आहेत. महाराष्ट्राच्या येऊ घातलेल्या अर्थसंकल्पातील आकड्यांशी शंभरपैकी १५ आणि ८५ च्या या गुणोत्तराचा हिशेब मांडला, तर मग अशा फिक्सर मंडळींच्या उलाढालींचा अंदाज येऊ शकेल. सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे वाटेकरी केवळ हे फिक्सर असतात? की ज्यांच्यासाठी हे लोक फिक्सिंग करतात, ते असतात? की हे सगळे मिळूनच लाभार्थी असतात? असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे लाभार्थी कोण असतात, हे आता सर्वसामान्यांपासूनही लपून राहिलेले नाही. दिवसाला एक कोटी रुपये घरी नेले नाहीत, तर त्या अमुकतमुक मंत्र्याला झोप येत नाही, असे मंत्रालयात सर्रासपणे सांगितले जायचे. चार वेळा मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या शरद पवारांनीच एका विरोधी पक्षनेत्याबाबत ‘तोडी करणारा विरोधी पक्षनेता,’ असे शब्द वापरले होते. इथे ‘तोडी’, “फिक्सर’ हे शब्द राज्याच्या सर्वोच्च पदावरील नेत्यांनी वापरले आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल. आणि अशा प्रकारांना आळा घातला जावा, या हेतूनेच त्यांनी ते वापरले असावेत, असे आपण म्हणू शकतो. पण, भ्रष्टाचाराचे आकडे समजून घ्यायचे म्हटले तर कदाचित भोवळ येईल, इतक्या प्रमाणात तो होतो, हे सत्य आहे. ही पीए किंवा फिक्सर मंडळी त्या भ्रष्टाचाराच्या कडीतील मंत्रालय पातळीवरील छोटे मोठे मासे असतात. मूळ प्रश्न हा आहे की, महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि गतिमान राज्यातील छोट्या छोट्या गावांतही सरकारी कर्मचाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय सर्वसामान्य माणसाचे कोणतेही काम होत नाही. भ्रष्टाचाराबद्दल प्रत्येक निवडणुकीत बोलले जाते, पण सरकारी कामात शंभर टक्के पारदर्शकता येत नाही.

खरे तर एखादे काम विहित मुदतीत न झाल्यास संबंधित सरकारी कर्मचाऱ्याला शिक्षेची; विशेषत: आर्थिक दंडाची, तसेच पदोन्नती नाकारण्याची किंवा पदावनतीच्या शिक्षेची तरतूद सेवा हमी कायद्यामध्ये असायला हवी. सध्या अशी कोणतीही भीती नसल्याने एकदा कुणी सरकारी नोकरीत पर्मनंट म्हणजेच कायम झाला की मग साक्षात परमेश्वरही त्याचे फारसे नुकसान करू शकत नाही, असे उपहासाने म्हटले जाते. त्यामुळेच, सरकारी व्यवस्थेच काम करण्यापेक्षा ते अडवण्याकडे जास्त कल दिसून येतो.

सामान्य माणसाला लहान-मोठ्या कामांसाठी मंत्रालयात हेलपाटे घ्यावे लागू नये, म्हणून प्रादेशिक, जिल्हा आणि तालुका पातळीवर कामकाजाचे विकेंद्रिकरण केल्याचे सांगितले जाते. पण, तरीही बहुतांश कारभार मंत्रालयातच केंद्रित झाला आहे. दुसरीकडे, विभागीय पातळीवरील आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी किंवा महसूल यंत्रणा आणि एकूणच सर्व सरकारी खात्यांतील राज्य, प्रादेशिक, जिल्हा व तालुका पातळीवरील कथित विकेंद्रित कार्यालयांमध्येही सर्वसामान्यांना रोज कमी-अधिक प्रमाणात भ्रष्टाचाराचा अनुभव येतो. मुख्यमंत्र्यांनी वगळलेले मंत्रालयातले काही फिक्सर काही काळ मुख्य प्रवाहाच्या बाजूला राहतील. पण, राज्यभर अशा विकेंद्रित पद्धतीने सर्वसामान्य लोकांना नाडणाऱ्या, त्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट सरकारी यंत्रणेवर मुख्यमंत्री प्रभावी उपाययोजना करतील का, हाच खरा प्रश्न आहे.

(संपर्क – shailendra.paranjpe@gmail.com )



Source link

रसिक कव्हर स्टोरी: तेलाचा तडका… आरोग्याला चटका

0
रसिक कव्हर स्टोरी:  तेलाचा तडका… आरोग्याला चटका




मन की बात… या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतीयांना स्थूलत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी आहारातील खाद्यतेलाचे प्रमाण दहा टक्के कमी करण्याचे आवाहन केले. एकीकडे आहारातील खाद्यतेलांचा अतिवापर ही आपल्या आरोग्यापुढची मोठी समस्या बनली आहे, तर दुसरीकडे रिफाइंड तेलामुळे एक मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. आरोग्याला चटका आणि अर्थकारणाला तडका देणाऱ्या तेलाचा हा लेखाजोखा… भारतीयांमध्ये वाढणारे स्थूलत्वाचे प्रमाण आणि त्यामुळे जडणारे विकार यांमुळे दस्तुरखुद्द पंतप्रधान चिंतित आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करतानाही त्यांनी या मुद्द्याला स्पर्श केला होता. भारतीयांमध्ये अलीकडच्या काही वर्षांत जीवनशैलीशी निगडीत आजारांत सातत्याने वाढ होत आहे. आहारातील खाद्यतेलाच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व वयोगटांत, विशेषत: किशोरवयीन मुले आणि तरुणांमध्ये स्थूलत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यातूनच मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. कोणत्याही वयात सुदृढ, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा ठरतो. हा आहार केवळ संतुलितच नव्हे, तर सुयोग्य असायला हवा. आजकाल धावपळीच्या दिनक्रमामुळे बहुतांश लोक असा आहार घेत नाहीत किंवा घेऊ शकत नाहीत. त्यातही मुलांमध्ये फास्ट फूड, जंक फूडचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशा पदार्थांमुळे स्थूलत्वाच्या साथीने लहान वयातच शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी आणि दोष निर्माण होत आहेत. साधारण तीस ते चाळीस वर्षांपूर्वी सकस आणि चौरस आहारामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा आजारांचा फारसा धोका नव्हता. पण, नंतर आहारात आलेल्या अनेक घटकांमुळे या व्याधी सुरू झाल्या. आहारात असा परिणामकारक बदल घडवणाऱ्या घटकांपैकी ‘खाद्यतेल’ हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. कधी काळी घाण्यावरील तेलापासून सुरू झालेला आपल्या खाण्याच्या तेलाचा प्रवास आता ‘डबल-ट्रिपल रिफाइंड ऑइल’पर्यंत पोहोचला आहे. सर्व प्रकारच्या तेलबियांपासून बनणाऱ्या अशा खाद्यतेलांसाठी प्रामुख्याने पामतेलाचा वापर केला जातो. कारण वनस्पतिजन्य तेलांपेक्षा पामतेल जवळपास २० ते २५ टक्के स्वस्त आहे. तथापि, सुमारे ४५ वर्षांच्या प्रयत्नांनंतरही भारतात अपेक्षेइतके पाम उत्पादन होऊ शकले नाही. परिणामी आयात केलेले पामतेल आणि विविध प्रकारच्या तेलबिया यांपासून बनलेले रिफाइंड तेल आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग बनले आहे. या तेलाच्या उत्पादन आणि बाजारपेठेतून एकीकडे मोठी अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे, त्याचवेळी आपल्या आरोग्यापुढे त्याहून मोठे प्रश्नचिन्हही उभे राहिले आहे. भारताचे ‘तैलचित्र’…
– जगातील एकूण तेलबियांच्या उत्पादनापैकी ५ ते ६ टक्के उत्पादन भारतात होते.
– गरजेच्या ५७ % खाद्यतेल अन्य देशांकडून घेणारा भारत हा सर्वांत मोठा आयातदार देश आहे.
– इंडोनेशिया, अर्जेंटिनाकडून कच्चे खाद्यतेल, तर मलेशियाकडून कच्च्या पामतेलाची आयात.
– ब्राझील, रशियाकडून कच्चे सोयाबीन तेल, तर युक्रेनकडून सूर्यफूल तेलाची आयात.
– कच्च्या खाद्यतेलावर पूर्वी शून्य सीमाशुल्क, ते सप्टेंबर २०२४ मध्ये २० % करण्यात आले.
– देशांतर्गत उत्पादनातील वाढ आणि तुलनेने कमी मागणी यामुळे आयातीच्या प्रमाणात काहीशी घट. देशात २०२३-२४ मध्ये झालेले खाद्यतेलाचे उत्पादन
– मोहरीचे तेल : ३६.४ लाख मे. टन
– शेंगदाणा तेल : २२.९ लाख मे. टन
– सोयाबीन तेल : २०.८ लाख मे. टन
– एरंडाचे तेल : ५.६६ लाख मे. टन
– तिळाचे तेल : २.३८ लाख मे. टन
स्त्रोत : नीती आयोग आणि अन्य संस्थांचे खाद्यतेलविषयक अहवाल. कसे तयार होते रिफाइंड तेल?
रिफाइंड तेल बनवताना पहिल्यांदा आयएनएस ३१९ / टीबीएचक्यू, आयएनएस ९०० ए , ई ९०० ए आणि डीएमपीएस यांसारख्या ६ ते ७ रसायनांचा वापर केला जातो. हे तेल दुसऱ्यांदा रिफाइंड करताना अशी १० ते १२ रसायने वापरली जातात. तेल पूर्णपणे रिफाइंड होईपर्यंत सुमारे अर्धा तास २०० अंश सेल्सिअस तापमानात तापवले जाते. त्यानंतर तेलातील नैसर्गिक उग्र वास घालवण्यासाठी दुर्गंधीनाशन (Deodorization) प्रक्रिया करण्यात येते. त्यासाठी हे तेल पुन्हा दोनदा तापवले जाते. त्यामुळे तेलाची नैसर्गिक चव आणि गंध नाहीसा होतो. काही रिफाइंड तेलांमध्ये नंतर कृत्रिम स्वाद आणि सुगंध मिसळले जातात.
आरोग्यावर काय परिणाम होतो?
*नैसर्गिक खाद्यतेलामुळे शरीराला चरबी आणि स्निग्धतेसोबतच प्रथिनेही मिळतात. पण, तेल रिफाइंड केल्याने त्यातील पोषक घटक निघून जातात. शिवाय, उत्पादनवेळी होणाऱ्या रासायनिक पदार्थांच्या तसेच अतिउच्च तापमानाच्या वापरामुळे असे तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्याच्या नियमित आणि अतिरिक्त सेवनाने अनेक गंभीर विकार होऊ शकतात. स्थूलत्वासोबतच रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि काही प्रमाणात कर्करोगाचा धोकाही त्यामुळे निर्माण होतो. शिवाय, हाडे आणि सांध्यांच्या व्याधी जडणे, विचार प्रक्रिया व आकलनक्षमतेवर परिणाम होणे अशी लक्षणेही दिसतात.
दहा टक्के कपात आरोग्यापेक्षा अर्थकारणासाठी जास्त उपयुक्त – डॉ. जगन्नाथ दीक्षित, स्थूलत्व आणि मधुमेहतज्ज्ञ भारत खाद्यतेलांच्या आयातीवर १.३१ लाख कोटी रुपये खर्च करतो. त्यात १० % घट झाली तर ते अर्थकारणासाठी नक्कीच चांगले आहे. दुसरीकडे, अतिकर्बोदके असलेले, तसेच गोड, तेलकट, खूप प्रक्रिया केलेले पॅकेज्ड् अन्नपदार्थ, कोल्ड्रिंक यांचे वारंवार सेवन आणि व्यायामाचा अभाव ही भारतीयांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची मुख्य कारणे आहेत. यात सर्वात जास्त वाटा कोल्ड्रिंक आणि प्रोसेस्ड् अन्नपदार्थांचा आहे. या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांना व्यायामासाठी मोफत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याशिवाय, आरोग्याच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी विविध आरोग्य शिक्षण मोहिमा राबवणे, आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देणे आणि अनारोग्य पसरवणाऱ्या गोष्टींना कायद्याने चाप लावणे, या गोष्टी बिघडते आरोग्य सुधारण्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. आहारातील अतिरिक्त तेलामुळे वाढला अनेक व्याधींचा धोका – डॉ. शशांक शहा, संचालक, लॅप्रो ओबेसो सेंटर, पुणे देशात स्थूलत्वाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. तरुणांमध्ये एकूण कॅलरींचे प्रमाण वाढत आहे. आहारातील तेल कमी केल्यास ते घटू शकेल. कॅलरी नियंत्रणासाठी तेल कमी करण्यासोबतच आहारात फळे – पालेभाज्यांचे प्रमाण वाढवले पाहिजे. वारंवार उकळलेल्या तेलातील ट्रान्सफॅट हृदयाला हानिकारक ठरतात. शरीरात इन्फ्लमेशन वाढते, इन्शुलिन रेझिस्टन्स तयार होऊन मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे अतिलठ्ठ असलेल्यांच्या आहारातील अतिरिक्त तेल कमी झाले, तर त्यांचे वजन आणि मधुमेह या दोन्ही गोष्टी आपोआप नियंत्रणात येतात. अतिरिक्त तेल फॅट अर्थात मेदाच्या रुपामध्ये हृदयात, यकृतात गोळा होते. फॅटी लिव्हरमुळे वेगवेगळे स्त्राव तयार होऊन नवे आजार होऊ शकतात. त्यामुळे आहारातील तेल कपातीबाबत पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचे पालन करणे सर्व भारतीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. स्थानिक तेलाचा वापर वाढल्यास शेतकरी, उत्पादकांना होईल फायदा – ललित गांधी, अध्यक्ष, महा. चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आहारात देशी खाद्यतेलाऐवजी परदेशातून आयात केलेल्या रिफाइंड तेलांचा वापर खूप वाढला आहे. या तेलांच्या उत्पादनात होणारा रसायनांचा वापर अनेक आजारांना आमंत्रण देणारा तर आहेच; शिवाय आयातीमुळे आपल्या परकीय गंगाजळीलाही कात्री लावणारा आहे. आयात खाद्यतेलाचे प्रमाण १० टक्के कमी झाले, तरी दरवर्षी साधारण १५ ते २० हजार कोटींचे परकीय चलन वाचेल. स्थानिक तेलबियांपासून बनलेल्या तेलांचा वापर वाढला, तर तेलबियांचे उत्पादन वाढेल. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल आणि स्थानिक उत्पादकांनाही प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे आहारातील रिफाइंड तेलाचा वापर कमी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन सर्वांनी गांभीर्याने घेतले पाहिजे. भारतीयांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच देशाच्या खाद्यतेल उद्योगावर आणि तेलबिया उत्पादनावर याचा निश्चितपणे सकारात्मक परिणाम होईल.



Source link

Success Story: गॅरेज ते कॉस्मॅटिक कंपनी; मीरा कुलकर्णी ‘असं’ उभारलं 10000000000000 रुपयांचे साम्राज्य

0
Success Story: गॅरेज ते कॉस्मॅटिक कंपनी; मीरा कुलकर्णी ‘असं’ उभारलं 10000000000000 रुपयांचे साम्राज्य


Nov 28, 2024 | 1st Test – Day Stumps

Crowe-Thorpe Trophy, 2024

Nov 28, 2024 | 1st Test – Day Stumps

Sri Lanka in South Africa, 2 Test Series, 2024

No match is being played.

Nov 22, 2024 | 1st Test

Bangladesh in West Indies, 2 Test Series, 2024

WI

(144.1 ov) 450/9 dec

(46.1 ov) 152

VS

BAN

269/9 dec (98.0 ov)

132 (38.0 ov)

West Indies beat Bangladesh by 201 runs
Full Scorecard →

Nov 26, 2024 | 2nd ODI

Pakistan in Zimbabwe, 3 ODI Series, 2024

ZIM

(32.3 ov) 145

VS

PAK

148/0 (18.2 ov)

Pakistan beat Zimbabwe by 10 wickets
Full Scorecard →





Source link

Chhaava नंतर मराठा साम्राज्य चर्चेत; छत्रपती की पेशवे कोणाकडे होती सत्ता? हिंदवी स्वराज्य म्हणजे काय?

0
Chhaava नंतर मराठा साम्राज्य चर्चेत; छत्रपती की पेशवे कोणाकडे होती सत्ता? हिंदवी स्वराज्य म्हणजे काय?


Chhaava : सध्या गेल्या काही दिवसांपासून छावा चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने साकारली आहे. तर अक्षय खन्नाने औरंगजेब या पात्राला न्याय दिला आहे. या चित्रपटामुळे मराठी साम्राज्य, छत्रपती, पेशवे आणि मुघल साम्राज्याची चर्चा सुरु झाली आहे. इतिहासाची पानं जेव्हा जेव्हा वाचली जातात तेव्हा त्यात मराठी साम्राज्यबद्दल कमी तर मुघलांबद्दल जास्त वाचायला मिळतं. यावरुन अनेक वेळा वादही झाले आहेत. औरंगजेबाच्या राजवटीचा मुद्दा कायम गाजला आहे. याचाच परिणाम औरंगाबाद म्हणजे आताचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद जे आताचे धाराशीव यांची नावं बदलण्यात आली. (After Chhaava the Maratha Empire was in discussion Who had power Chhatrapati or Peshwa What is Hindavi Swarajya)

गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडने मराठा साम्राज्य आणि युद्धातील शौर्याबद्दल तान्हाजी, बाजीराव मस्तानी आणि पानीपत या चित्रपटामुळे लोकांना या शौर्याची खऱ्या अर्थाने झाली. जेव्हा कधी आपण मराठा साम्राज्याबद्दल पुस्तकांमध्ये वाचतो किंवा चित्रपटातून त्याबद्दल बघतो. तेव्हा तुम्ही छत्रपती, पेशवे, सरदार, प्रांतप्रमुख, सामंत आणि श्रीमंत अशा पदव्यांचा उल्लेख पाहिला असेल. या शब्दांचा अर्थ आजही अनेकांना माहिती नाही. एवढंच नाही तर छत्रपती आणि पेशवे यामध्ये फरक आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो. मराठा साम्राज्याचा उदय आणि मराठा साम्राज्य हे राज्यात किती पसरलंय पाहूयात. 

भारतीय इतिहासाच्या सुवर्ण पानांमध्ये मराठा साम्राज्याचं नाव मोठ्या आदराने आजही घेतलं जातं. यात मराठा योद्ध्यांच्या शौर्याबद्दल सांगितलं आहे. 1674  मध्ये रायगडावर राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना ‘छत्रपती’ म्हणून घोषित करण्यात आलं आणि मराठा साम्राज्याची स्थापना करण्यात आली.  

आता आपण मराठा साम्राज्यातील पदव्यांबद्दल जाणून घेऊयात

  • छत्रपती : ही मराठा साम्राज्यातील सर्वोच्च पदवी मानलं जातं. छत्रपती म्हणजे ‘राजांचा राजा’. शिवाजी महाराजांनी हे पद भूषवलं आणि नंतर त्यांचे वंशज ते पद भूषवत आहेत.

  • पेशवे : छत्रपतींनी नियुक्त केलेला मराठा साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली मंत्री असतात. सुरुवातीला ते एक पद होते, मात्र नंतर पेशवे मराठा साम्राज्याचे प्रत्यक्ष शासक मानले गेले आहेत. 

  • प्रांत प्रमुख : मराठा साम्राज्यातील राज्ये आणि प्रांतांचे प्रशासक असतात. प्रमुख राज्यांमध्ये प्रशासनावर देखरेख करणे आणि कर वसूल करणे ही प्रांतांची जबाबदारी असते. 

  • सामंत : मराठा साम्राज्याचे कनिष्ठ राजे किंवा जमीनदार जे स्थानिक शासक म्हणून काम करत होते. लष्कर आणि कर प्रणालीत योगदान दिले.

  • सरदार : मराठा सैन्यातील उच्च लष्करी अधिकारी, ज्यांचे स्वतःचे सैन्य होते आणि युद्धादरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  • श्रीमंत : ही पदवी साम्राज्यातील प्रभावशाली लोकांना, विशेषतः पेशवे आणि इतर महत्त्वाच्या सरकारांना दिली जात असे.

छत्रपती आणि पेशवे यांच्यात काय फरक होता?

छत्रपती हे मराठा साम्राज्याचे सर्वोच्च पद होते, जे वंशपरंपरागत आहेत. हे पद फक्त शिवाजी महाराजांच्या वंशजांना देण्यात आलंय. त्याच वेळी, पेशवे हे मराठा साम्राज्यात मंत्रीपद होते, मात्र 1713 नंतर सत्ता पेशव्यांच्या हाती आली. छत्रपती फक्त नावापुरतंच शासक राहिले.

मराठा साम्राज्याचा उदय कधी झाला?

1674 मध्ये शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी बाजीराव पेशवे आणि त्यांच्या उत्तराधिकारी यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार दक्षिण भारतापासून उत्तर भारतातील दिल्लीपर्यंत आणि पश्चिमेकडील गुजरातपासून पूर्वेकडील ओरिसा (आता ओडिशा) पर्यंत केलंय. 

हिंदवी स्वराज्य म्हणजे काय?

छावा चित्रपटात दाखवले आहे की छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढत राहिले. आता प्रश्न असा आहे की, स्वराज्य म्हणजे काय? खरंतर, शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक केला. त्याला मुघल साम्राज्यापासून पूर्णपणे वेगळे व्हायचे होते, यासाठी त्याने नवीन चलन आणि शाही चिन्ह देखील जारी केलं. प्राचीन भारतीय प्रशासकीय व्यवस्था आणि समकालीन व्यवस्था यांचे संयोजन करून शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळासाठी आणि लोकांना अनुकूल असलेली एक नवीन शासन व्यवस्था निर्माण केली. याअंतर्गत धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन प्रतिभावान लोकांना संधी देण्यात आल्या. लोकांचे रक्षण केलं. शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष दिलं. उद्योगांना प्रोत्साहन देऊन आर्थिक स्थिरता सुनिश्चित केली. राज्याचे रक्षण करण्यासाठी एक शक्तिशाली लष्करी दल निर्माण केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य म्हणजे अशी शासनव्यवस्था ज्याद्वारे सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक क्रांती घडून आली. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहूजी छत्रपती झाले, तेव्हा मराठ्यांमध्ये फूट पडू लागली. ज्याला हाताळण्यात पेशव्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हा तो काळ होता जेव्हा पेशवे शक्तिशाली बनले आणि छत्रपतींकडे फक्त गादी उरली होती.





Source link

वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी विवेकवाद जीवनाचा मूलाधार बनला पाहिजे

0
वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी विवेकवाद जीवनाचा मूलाधार बनला पाहिजे


फलटण : २८ फेब्रुवारी २०२५ रोजी विज्ञान दिनाचे औचित्य साधून ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाचे प्रदर्शन फलटणच्याकमला निंबकर बालभवन शाळेमध्ये उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित रथ व डॉ. आनंद कर्वे आणि विज्ञान क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या महिला शास्त्रज्ञ डॉ. चंदा निंबकर, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे व डॉ. नंदिनी निंबकर, प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. झिया कुरेशी आणि उपाध्यक्ष डॉ. मंजिरी निंबकर यांची उपस्थिती होती.प्रदर्शनातील एक- एक मांडणी बारकाईने पाहत आणि मुलांशी गप्पा करत या सर्वांनी मुलांची मने जिंकली.
प्रदर्शनामध्ये इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘कुतूहल’ या दालनात त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची प्रभावी मांडणी केली होती. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी वर्गात होणारी भांडणे, मोबाईलचा वापर, कुरकुरे आणि चिप्सचे सेवन, दात घासणे, आणि धूम्रपान असे दैनंदिन जीवनातील पाचविषय निवडून शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांकडे कसे बघायचे याचा विचार करून मांडणी केली होती. सहावी ते नववीच्या वर्गांनी व्यक्त होण्याची इतर अनेक माध्यमे वापरली होती. यांमध्ये शॉर्ट फिल्म, रील्स, छायाचित्रे, खेळ, चमत्कार व हातचलाखी मागील विज्ञान दाखवणारे प्रयोग, वर्तमान पत्रातील फसव्या जाहिरातींची कात्रणे, वादविवाद, नाटक, पथनाट्य रॅप असे अनेक माध्यमप्रकार प्रभावीपणे हाताळलेले पाहायला मिळाले.
प्रदर्शन बघण्यासाठी सुमारे दोनशे पालकांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी, ता. फलटण चे पाचवी ते सातवीचे विद्यार्थीही प्रदर्शन पाहण्यास आले.
विद्यार्थ्यांनी डॉ.रथ यांच्यासोबत प्रकल्प काम सुरू करण्याच्या सुरुवातीला ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी ऑनलाइन संवादसाधला होता. प्रदर्शन पाहिल्यानंतर ‘तुम्ही मी ऑनलाइन सत्रामध्ये मांडलेल्या गोष्टींचे सोने केले, हे मलाही जमले नसते’ असे मनोगत डॉ. रथ यांनी व्यक्त केले. आधीपासून शोध लागलेल्या गोष्टींची चर्चा करतानाच ज्याची उत्तरे मानवाला गवसलेली नाहीत त्याबद्दलही मुला-मुलींनी बोलत राहावे आणि ‘का’ हा प्रश्न विचारण्यापेक्षा ‘कसे’ या प्रश्नावर विचार व्हावा असे त्यांनी सुचवले.सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक यांनी घेतलेल्या मेहनतीचे पाहुण्यांनी कौतुक केले.

‘चल हल्ला बोल’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री! नामदेव ढसाळ यांना ओळखण्यास नकार

0
‘चल हल्ला बोल’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री! नामदेव ढसाळ यांना ओळखण्यास नकार

मुंबई: दलित, कष्टकरी आणि उपेक्षित वर्गाच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली आहे. चित्रपटातील सर्व कविता हटविल्याशिवाय प्रदर्शनाला मंजुरी मिळणार नाही, अशी अट सेन्सॉर बोर्डाने घातली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सांगितले की, “सेन्सॉर बोर्डाने नोटीसमध्ये ‘नामदेव ढसाळ कोण आहेत, आम्हाला माहीत नाही’ असे नमूद केले आहे, जे अत्यंत धक्कादायक आहे. दलित पँथरसारख्या क्रांतिकारी चळवळीतून समाजाला दिशा देणाऱ्या ढसाळ यांना ओळखण्यास नकार देणे, हे सांस्कृतिक अनास्थेचे लक्षण आहे.”

‘गोलपीठा’मधील कविता वादाच्या केंद्रस्थानी

नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपीठा’ या गाजलेल्या कवितासंग्रहातील काही कविता सेन्सॉर बोर्डाने आक्षेपार्ह ठरवल्या असून, त्या हटविण्याची सक्त सूचना केली आहे. तसेच, ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला ‘यू’ प्रमाणपत्र नाकारत ‘ए’ सर्टिफिकेटसाठीही अनेक अटी लादल्या आहेत.

सेन्सॉर बोर्डाची आक्षेपार्ह निरीक्षणे

  • “वाघ्या-मुरळी नृत्याला स्टेज डान्स मानले जाईल.”
  • “मंदिराची दृश्ये वगळावी.”
  • “‘हरामखोर’ आणि कवितेतील काही शब्द हटविणे आवश्यक.”

सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप

सेन्सॉर बोर्डाच्या या भूमिकेमुळे संविधानवादी आणि दलित संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “हे फक्त सेन्सॉरशिप नाही, तर नामदेव ढसाळ यांच्या वैचारिक आणि साहित्यिक प्रभावाला संपविण्याचा प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार का? की विचारांना गळा घोटण्याचा हा प्रयत्न यशस्वी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक असा सीरियल किलर ज्याने 10, 20, 30 नव्हे तब्बल 931 जणांना ठार मारलं!

0
एक असा सीरियल किलर ज्याने 10, 20, 30 नव्हे तब्बल 931 जणांना ठार मारलं!


Crime Story Of Serial Killer Behram: भारतात असे अनेक सिरिअल किलर आलेत ज्यांनी केलेल्या निर्घृण हत्या व गुन्हे ऐकल्यावर अंगावर काटा येतो. 18 आणि 19 शतकात भारतात असा एक सिरीअल किलर होता ज्याच्या नावाने इंग्रजही थरथर कापत. त्याने इतक्या जणांची निर्घृण हत्या केलीये की त्यांना किंग ऑफ ठग असंही म्हणतात. भारतातील या सर्वात खतरनाक सिरिअल किलरचे नाव आहे ठग बेहराम. कोण होता हा ठग बेहराम, जाणून घेऊया. 

बेहरामबद्दल बोललं जातं की, सन 1790 ते 1840 च्या दरम्यान तो इतका कुख्यात होता की इस्ट इंडिया कंपनीचे अधिकारीदेखील त्याला घाबरत होते. कारण तो लुटीसाठी लोकांवर हल्ला करायचा आणि त्याच्या विशिष्ट्य पद्धतीने तो लोकांची गळा घोटून हत्या करायचा. बेहरामची स्वतःची अशी टोळी होती. त्याच्या टोळीतील लोक व्यापारी आणि पर्यटकांमध्ये वेष बदलून फिरत असायचे आणि संधी साधून लोकांची हत्या करायचे आणि सर्व सामान लुटून पसार व्हायचे. 

ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी जेम्स पेटॉनने लिहलं होतं की, बेहरामने त्याच्या संपूर्ण आयुष्यात 931 जणांची हत्या केली होती. त्याने हत्येचा गुन्हा कबूलदेखील केला होता. जेम्स पेटॉनने दिलेल्या माहितीनुसार, तो नेहमी त्याच्यासोबत एक पिवळा रुमाल ठेवत असायचा आणि त्यात रुमालाने लोकांची गळा घोटून हत्या करायचा. त्याने 900 हून अधिक लोकांची गळा दाबून हत्या केली होती. त्याच्या या अमानुष कृत्यामुळं त्याच नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्येही नोंद आहे. 

बहरामची दहशत इतकी होती की, दिल्ली ते ग्वालिअर, झांशी आणि जबलपूरपर्यंतच्या व्यापाऱ्यांनी आणि पर्यटकांनी, सैनिकांनी त्या रस्त्यांवरुन फिरणे बंद केले होते. जिथे कुठे बेहरामच्या हल्ल्याची शक्यता वाटायची तिथे लोक जाणेच टाळायचे. कारण बेहराम त्याची संपूर्ण टोळी घेऊन अशापद्दतीने लोकांना गायब करायचा की पोलिसांना त्यांचा मृतदेहदेखील सापडायचा नाही. 

असं म्हणतात की, ठग एका खास भाषेत बोलायचा जी कोणालाही समजायची नाही. ही भाषा समजण्यासाठी ब्रिटिश हेरांनी खूप प्रयत्न करुनही समजली नाही. बेहरामच्या टोळीतील ठग ज्या खास भाषेत बोलायचे त्याला रामोसी असं म्हटलं जायचं. रामोसी एक सांकेतिक भाषा आहे. प्रवासाला निघणारे लोक जेव्हा झाडाखाली किंवा एखाद्या आश्रय घेऊन झोपायचे तेव्हा ते ठग गिधाडाच्या आवाजात रडायचे आणि हल्ल्याचा इशारा द्यायचे. त्यानंतर बहराम त्याच्या टोळीसह तिथे पोहचायचा आणि पिवळ्या रंगाच्या रुमालात शिक्का बांधून त्या लोकांचा गळा आवळून खून करायचा. लोकांचे मृतदेह विहिरीत टाकून किंवा एखाद्या ठिकाणी दफन करुन निघून जायचे. 

बेहरामच्या या भयानक कृत्याची माहिती इंग्लंडपर्यंत पोहोचली. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने 1809 साली एक ब्रिटिश अधिकारी कॅप्टन स्लीमॅनकडे ही जबाबदारी सोपवली. त्यानंतर तपासात समोर आले की ठग बेहरम आणि त्याच्या टोळीनेच हत्या करुन मृतदेह गायब केले आहेत. कॅप्टन स्लीमॅन यांनी खुलासा केला की ठग बेहरामच्या टोळीत 200 हून अधिक ठग आणि हल्लेखोर आहेत. 

कॅप्टन स्लीमॅन यांनी बेहरामच्या शोधासाठी मोठी चळवळ उभारली होती. त्यानंतर अखेर 10 वर्षांनी त्यांना खतरनाक ठग आणि सिरीअल किलर सापडण्यात यश आले. बेहरामला जेव्हा अटक केली तेव्हा त्याचे वय 75 वर्षे होते. त्यानंतर 1840 साली त्याला त्याच्या अपराधांसाठी मृत्यूदंड देण्यात आला. याच बहराम ठगावर आधारित एक चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. ठग्स ऑफ हिंदुस्थान. यात अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरीना कैफ आणि फातिमा सना शेख यांनी भूमिका साकारली आहे. 





Source link

“लग्नाआधी तो…” आयुष्य संपवणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

0
“लग्नाआधी तो…” आयुष्य संपवणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा


 Agra Suicide Case: पत्नीच्या अनि तिच्या माहेरच्या त्रासला कंटाळून स्वतःचे आयुष्य संपवणाऱ्या आग्रा येथील टीसीएस मॅनेजर मानव शर्माची पत्नी निकिता शर्माची प्रतिक्रिया समोर आली आहे. तो दारूच्या नशेत असताना मारहाण करायचा, असे निकिताने सांगितले आहे. एवढेच नाही तर तिने असेही म्हटले आहे की मानव शर्माने यापूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण तिनेच त्याला वाचवले आहे. ज्या रात्री त्याने आत्महत्या केली, त्याच दिवशी मी त्याच्या बहिणीलाही त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल आधीच सांगितले होते.

नक्की काय म्हणाली निकिता? 

निकिताने सांगितले की, “ज्या दिवशी मानवने आत्महत्या केली, तेव्हा त्याने मला माझ्या घरी सोडून गेला होता. मी त्याचा शेवटचा व्हिडीओ पाहिला आहे, मी हे सर्व माझ्या पत्नीमुळे करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. पण तो माझा भूतकाळ होता, जे काही घडले ते लग्नापूर्वीचे होते. लग्नानंतर काहीच नव्हते. ही गोष्ट ऐकून तो खूप प्यायचा.  गोंधळ घालायचा आणि स्वतःचे नुकसानही करून घ्यायचा. “

वाचा संपूर्ण प्रकरण: ‘पुरुषांचाही विचार करा’ म्हणत TCS च्या मॅनेजरची आत्महत्या! बायकोच्या ‘त्या’ हट्टाने घेतला जीव

दोन-तीन वेळा फाशी घेण्याचा प्रयत्न

निकिताने पुढे सांगितले की, “त्याने दोन-तीन वेळा फाशी घेण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः फास कापून त्याला वाचवले होते.  आनंदाने त्याला घेऊन आग्राला आणले आणि तोही मला आनंदाने घरी सोडून निघून गेला. त्याने हे सर्व एकाच रात्री केले.”

हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आली वाईट बातमी, ‘या’ दिग्गज फलंदाजाचा झाला आकस्मिक मृत्यू; चाहत्यांना धक्का

“मद्यपान केल्यावर तो मला मारहाण करायचा”- निकिता शर्मा 

“मद्यपान केल्यावर तो मला मारहाणही करायचा. त्यावेळी तो रागाच्या भरात धक्काबुक्की, हात चावण्यासारख्या गोष्टी करायचा.  मी मानवच्या आई-वडिलांनाही हे सांगितले होते की त्यांच्यापैकी एकाने त्याच्यासोबत असायाला हवे. त्यावर त्यांनी सांगितले की, हा पती-पत्नीचा विषय आहे आणि यात तिसरं  कोणीही काहीही करू शकत नाही. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला तेव्हा मी त्याच्या बहिणीला फोन करून सांगितले की मानव दारू पिऊन आत्महत्या करणार आहे, मी फोटो देखील पाहिला होता. तर त्यावर त्याची बहीण म्हणाली, “झोप जा , त्याला काही होणार नाही, माझं बोलणं झालेलं आहे.” 

निकिता पुढे म्हणाली, “यानंतर मी माझ्या वडिलांना मेसेज केला आणि म्हणालो, पापा, प्लीज एकदा मानवच्या खोलीत जा आणि त्याला बघा. तो माझा फोन उचलत नाहीये. मी ओरडत होतो की तो आत्महत्या करेल.” 

हे ही वाचा: “भारत तुम्हाला पगार देत आहे…”, सुनील गावस्कर अचानक संतापले, वक्तव्याने उडाली खळबळ

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आग्रा येथील टीसीएस कंपनीचे व्यवस्थापक मानव शर्मा यांनी  व्हिडीओ बनवून त्यात लाइव्ह आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मानव शर्माने पत्नीवर छळ करण्याचे आणि अफेअरचे आरोप केले होते.  व्हिडीओमध्ये, मृत मानव शर्मा रडला आणि आई आणि वडिलांना सॉरीसुद्धा म्हणाला. मी माझ्या पत्नीच्या छळाला कंटाळलो आहे. असे म्हणत त्याने जीव दिला. 





Source link