Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 490

Crime Story: शारीरिक संबंधांनंतर द्यायचा विषारी गर्भनिरोधक गोळ्या, 20 नववधूंचा बळी देणारा ‘Cyanide Killer’

0
Crime Story: शारीरिक संबंधांनंतर द्यायचा विषारी गर्भनिरोधक गोळ्या, 20 नववधूंचा बळी देणारा ‘Cyanide Killer’


Crime Story: महिलांविरोधातील अत्याचार आणि गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यापूर्वीही देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळं संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती. त्यातीलच एक प्रकरण म्हणजे सायनाइड किलर (Cyanide Killer). या घटनेने संपूर्ण भारतात एकच दहशत पसरली होती. 20 नववधूंचा जीव घेणाऱ्या या विकृत आरोपीचं पुढं काय झालं आणि हे नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया. 

सायनाइट मोहन ज्याचं खरं नाव मोहन कुमार आहे. कुख्यात भारतीय सीरियल किलर म्हणून तो कुप्रसिद्ध होता. पीडितांना सायनाइड विष देऊन त्यांची हत्या करायचा त्यामुळं मोहन कुमार याचं नाव सायनाइड मोहन म्हणजे सायनाइड किलर असंही ठेवण्यात आलं. मोहनने 2003 ते 2009 च्या दरम्यान कर्नाटकात 20 महिलांची हत्या केली. महिलांच्या हत्येनंतर तो त्यांचे दागिने घेऊन पसार व्हायचा. याच पद्धतीने त्याने 20 महिलांचा बळी घेतला. 

असा रचायचा हत्येचा कट

मोहन 20 ते 30 वर्ष वयाच्या अविवाहित मुलींना जाळ्यात ओढायचा आणि त्यांना प्रेमाची वचने देऊन विश्वास मिळवायचा. त्यानंतर मुलींशी लग्नदेखील करायचा. लग्न केल्यानंतर त्या मुलींना शहरापासून दूर घेऊन जायचा. त्यानंतर एखाद्या हॉटेलमध्ये बनावट कादगपत्रे दाखवून थांबायचा. मोहन कुमार मुलींना दरवेळी त्याचे नाव वेगळे सांगायचे. 

मुलींसोबत एक रात्र हॉटेलमध्ये थांबायचा. मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्यांना गर्भनिरोधक गोळी द्यायचा. मात्र त्या गोळ्यांमध्ये सायनाइड विष असायचे. ती गोळी खावून मुलीचा लगेचच मृत्यू व्हायचा. मुलीचा मृत्य झालाय की नाही याची खातरजमा करुनच तो लॉजवर परतायचा आणि सर्व पुरावे नष्ट करायचा. 

मोहन मुलींचा जीव घेतल्यानंतर त्यांचे दागिने आणि सर्व सामान घेऊन घटनास्थळाहून फरार व्हायचा. सायनाइड मोहनने कमीत कमी 20 तरुणींची हत्या केली होती. असं म्हणतात की, पीडितांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते.  सुनंदा नावाच्या महिलेच्या मृत्यूनंतर नराधम मोहनचा खरा चेहरा जगासमोर आला. 

कर्नाटक पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेनंतर 2009मध्ये मोहनला अखेर अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर त्याच्या क्रुरतेचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यानंतर अनेक पीडितेची ओळखदेखील पटली. खटला सुरू असताना पीडितांची ओळख, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि साक्षीदार यासारखे पुरावेदेखील मांडण्यात आले. त्यामुळं त्याचा गुन्हादेखील सिद्ध होऊ शकला. 

17 डिसेंबर 2013 रोजी सायनाइड मोहनला कर्नाटकातील मंगळुरूच्या सत्र न्यायालयाने अनेक महिलांवर बलात्कार, हत्या आणि दरोडेखोर यासारख्या गुन्हांसाठी दोषी ठरवण्यात आला. त्याच्या गुन्ह्यासाठी मोहन सायनाइडला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर स्वतः मोहननेच कर्नाटक उच्च न्यायालयात निर्णयाविरोधात धाव घेतली. मात्र त्याची याचिका फेटाळण्यात आली. 





Source link

कबीररंग: पानी के पीये बिना, कैसे मिटे पियास…

0
कबीररंग:  पानी के पीये बिना, कैसे मिटे पियास…


हेमकिरण पत्की15 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपलं रोजचं जगणं म्हणजे आत-बाहेरच्या संगतीसोबतचा प्रवास आहे. ही संगत व्यक्तींची, वस्तूंची, वास्तूंची, भवतालातील सृष्टीची आहे. ही संगत अर्थपूर्ण, भावपूर्ण असेल, योग्य अवकाशासह असेल, तर असा प्रवास आनंददायीच असतो. अन्यथा, मनाला ही नुसतीच गर्दी वाटते. अनेकदा कळत – नकळतपणे आपण या गर्दीचे धनी होतो. हे सारं नीटसं उमगल्यावर आपण बाहेरच्या गर्दीपासून अलिप्त होत जातो, उथळ सहवासापासून वेगळं होत स्वत:च्या मनापाशी पोहोचतो, तेव्हा आपल्याला काय जाणवतं? गंमत वाटेल, पण अशा कृतीनं आपल्याला आपल्या मनाची खरी स्थिती जाणवते. मनातलं इष्ट – अनिष्ट संचित जाणवतं. त्याविषयी आपलं चिंतन घडतं. आपण कुणाविषयी तरी बाळगलेला द्वेष, शब्दांतून कुणाचा तरी अवमान करून घेतलेलं सुख, एखाद्याच्या माघारी त्याची निंदा करून झालेला क्षणिक संतोष आणि आपण कळत- नकळत केलेल्या आत्मप्रतारणेस बाजूला सारण्याची आपली चतुराई हा असाही त्या स्थितीतील आपल्या मनाचा आशय असतो. आपण स्वत:शी प्रामाणिक असलो की, हे सारं ध्यानात येतं. आपलं मन व्यर्थ गोष्टी सांभाळून ठेवतंय, हे उमजल्यावर आपल्याला आपल्या हृदयाचं मोल जाणवतं. तरल भावस्थितीत हृदयाचे बोल आठवतात. तिथं एक शांत स्रोत लख्ख दिसतो, जिथं शब्दांहून अधिक नितळ-निर्मळ भाव व्यक्त होत असल्याचं ध्यानात येतं. आपल्या ‘असण्या’चं गहिरेपण या हृदयात आहे. हेच तर आपल्या जीवनाचं केंद्र आहे! कबीर म्हणतात, आपला ‘मी’ आपल्याला कळत नाही. या ‘मी’चं स्वातंत्र्य, अवलंबन, स्वामित्व आणि दास्यत्व कळत नाही. ते साधकाशी कळवळ्याच्या परिभाषेत बोलतात…

दासातन हिरदै नहीं,

नाम धरावे दास।

पानी के पीये बिना,

कैसे मिटे पियास।।

ज्या सद्गुरुंनी उजेडी राहून उजेडाची वाट आपल्याला दाखवलेली असते, त्यांचा दास होण्यात खळखळ कसली? पण, आपण थारा नसलेल्या मनाच्या ताब्यात असतो. या अशा मनाचा दास होणं आपल्याला आवडतं. मनानं निर्माण केलेल्या जगाचा दास होणं आपल्याला रुचतं. म्हणजे ‘असत्’चा दास होणं हीच आपली निवड असते. कबीर सांगतात की, दास्यत्व या नाशवंत जगाचं करायचं की या समग्र अस्तित्वाचं करायचं? याचा विचार साधकाला करावाच लागतो. याचं कारण म्हणजे सद्गुरुच साधकासाठी प्रकट ईश्वरी तत्त्वाचे वाटाडे असतात. कबीर म्हणतात, नुसत्या मुखानं उच्चारलेलं देवाचं नाम हृदयाशी जोडलेलं नसतं तर मनातून आलेलं असतं. आपलं मन कुठल्याही कामातील कर्तेपण सोडायला तयार नसतं. आतून या मनाला मालकी हक्क हवा असतो आणि म्हणून आपण सद्गुरुंचे दास न होता विषयसुखाचे म्हणजे कांचनकामिनीचे दास होऊन राहतो. या सत्याचा बोध खरं जगण्याचं कुतूहल असलेल्या तहानल्या जीवाला होतो. देहाचं दास्यत्व परमचेतनेला जाणून शरण गेल्यावरच संपतं. हे एक प्रकारचं स्वामित्व असतं, जे अशा चेतनेला जाणल्यानं सहज लाभतं. साधकाला हे अनुभवातूनच उमजतं.

दास कहावन कठिन है,

मैं दासन का दास।

अब तो ऐसा होय रहूँ,

पांव तले की घास।।

सद्गुरुंचा ‘मी’ शुद्ध असतो. या ‘मी’पणाला अनुसरताना साधकाला आपला ‘मी’ शुद्ध झाल्याचा भास, भ्रम होऊ शकतो. म्हणूनच सद्गुरुंविषयी साधकाच्या ठायी असलेलं दास्यत्व महत्त्वाचं असल्याचं या दोह्यातून कबीर सुचवतात. हे दास्यत्व सद्गुरुंच्या पायांखालचं गवत होण्यासारखंच आहे, असं साधकाला हृदयातून वाटणं होय. सद्गुरुंचा दास म्हणजे काय, हे नीट उमजायला हवं. दास होणं म्हणजे समर्पणातील आत्यंतिकता होय. दास होणं म्हणजे गुलाम होणं नाही. इच्छेविरुद्ध जो समर्पित होऊ पाहतो, तो गुलाम. गुलामी सक्तीतून घडते, परमप्रेमातून नाही. भयानं एखाद्याचा माथा सद्गुरुंच्या चरणावर ठेवला जाईल, पण आत्मा असा कधी झुकतो? दास्यत्व म्हणजे सद्गुरुंप्रति स्वेच्छेनं केलेलं समर्पण आहे. यात मानसिक दबाव नाही, भय नाही. आनंदात, अहोभावात आपल्या मर्जीनं आणि समग्र संकल्पासह केलेलं समर्पण आहे. कबीरांना या दास्यत्वात साधकाच्या ठायी असलेल्या अहंकाराचं विसर्जन होईल, याचा विश्वास वाटतो. त्यांनी साधकाला घडवलेलं हे दर्शन देहाचा मालक समजणाऱ्या त्याच्यासाठी आरसा होऊ शकतं.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link

इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय, वाद घालणं योग्य नाही : शिवेंद्रराजे

0


सातारा :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)  सैन्यात मुस्लिम सैनिक किती होते? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र याबाबत ठोस अशी माहिती नसली तरी इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती मांडली आहे. त्यामुळं त्यांच्यावर चर्चा करणं किंवा वाद घालणं योग्य नाही असं मत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर नितेश राणे यांनी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील शिवेंद्रसिंह राजे यांनी प्रतिक्रिया दिली. 

अबू आझमी यांच्यामुळेच वाद वाढला 

नितेश राणे यांनी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला हिंदूकडून मटन घ्यायचं तो त्यांच्याकडून घेईल आणि ज्याला मुस्लिमांकडून मटन घ्यायचं तो त्यांच्याकडून घेईल असं शिवेंद्रराजेसिंह भोसले यांनी सांगितले. मात्र हा वाद अबू आझमी यांच्यामुळेच वाढला असल्याचं देखील त्यांनी सांगितल आहे. खरंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपटानंतर अबू आझमी यांनी असं वक्तव्य करायची गरजच नव्हती. राजकारण करायला बरेच विषय आहेत. मात्र, या विषयात राजकारण करणं चुकीचं असल्याचं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?

अबू आझमींनी म्हटलं होतं की, चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेत अबू आझमींच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. यानंतर आता अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत. मी कोणत्याही महापुरुषाबद्दल कोणतही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. आम्ही जे काही भाषणं ऐकतो, त्यावरुन मी वक्तव्य केले. यावर वाद तयार करण्याची काय गरज आहे? भाजपचा ज्या मुद्द्यांवरून मतं मिळतात त्याच मुद्द्यांवर वाद निर्माण केले जातात.  महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा द्या, तसा कायदा करा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे या आधीच केली आहे. ज्याची सत्ता असते तो कसाही गुन्हा दाखल करु शकतो. आज त्यांची सत्ता आहे, त्यांनी खुशाल आपल्याला तुरुंगात घालावे. जे इतिहासात सत्य आहे ते बदलता येणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. 

महत्वाच्या बातम्या:

Abu Azmi : औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या अबू आझमींची छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खास पोस्ट; म्हणाले…

अधिक पाहा..



Source link

tense in rajapur after dispute between two groups during the holi festival zws 70

0
tense in rajapur after dispute between two groups during the holi festival zws 70



tense in rajapur after dispute between two groups during the holi festival zws 70 | राजापुरात होळी उत्सवात दोन गटातील वादानंतर तणावपूर्ण शांतता; पोलिसांकडून २१ लोकांवर गुन्हे दाखल





Source link

man duped over 21 lakh by promising to get a job in pcmc pune print news ggy 03 zws 70

0
man duped over 21 lakh by promising to get a job in pcmc pune print news ggy 03 zws 70



man duped over 21 lakh by promising to get a job in pcmc pune print news ggy 03 zws 70 | पिंपरी महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक





Source link

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्याचा कारभार हाकत आहेत’ : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

0
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्याचा कारभार हाकत आहेत’ : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ


सिंधुदुर्गातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ‘पुष्पा’तील ‘झुकेगा नही साला..’ भावनेने काम करावे

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला कोकणात सामाजिक तेढ निर्माण करायचे आहे, संस्कृती मोडून काढायची आहे. आगामी काळात हा जिल्हा काँग्रेसमय करा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जनतेचे प्रश्न हाती घेऊन काम करा. ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘झुकेगा नही साला…’ या भावनेने काम करावे, असं सपकाळ म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाला पाहिजे, प्रत्येक तालुका, वार्ड, ग्रामपंचायतीत काँग्रेसचा कार्यकर्ता दिसला पाहिजे, असे आवाहन सपकाळ यांनी केले.



Source link

one killed and four injured after speeding car hit a power pole then two wheeler in nagpur adk 83 zws 70

0
one killed and four injured after speeding car hit a power pole then two wheeler in nagpur adk 83 zws 70



one killed and four injured after speeding car hit a power pole then two wheeler in nagpur adk 83 zws 70 | कार अपघातात एक ठार, चार जखमी….आधी खांबाला धडक, नंतर…. 





Source link

the suvir saran show indian express swara bhaskar fahad ahmad

0
the suvir saran show indian express swara bhaskar fahad ahmad


Swara Bhaskar Fahad Ahmad Live : अभिनेत्री स्वरा भास्कर मागील काही वर्षापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. दोन वर्षांपूर्वी तिने फहाद अहमदशी लग्न केलं आणि नंतर एका गोंडस मुलीची आई झाली. स्वरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती अनेक सामाजिक, राजकीय विषयांवर तिची मतं मांडत असते. आज इंडियन एक्सप्रेसच्या द सुवीर सरन शोमध्ये ती व तिचा पती फहाद अहमद त्यांचे वैयक्तिक आयुष्य, व्यावसायिक आयुष्य, राजकारण या विषयांवर मनमोकळेपणाने बोलणार आहेत.





Source link

‘डान्स कर नाहीतर सस्पेंड करुन टाकीन’; तेज प्रताप यादवची पोलिसाला धमकी, पुढे काय झालं पाहा?

0
‘डान्स कर नाहीतर सस्पेंड करुन टाकीन’; तेज प्रताप यादवची पोलिसाला धमकी, पुढे काय झालं पाहा?



Tej Pratap Yadav : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कॉन्स्टेबल दीपकला नाचायला लावले. जर त्याने नाच केला नाही तर तिला निलंबित करण्याची धमकीही त्याने दिली. मग तरुण शिपाई दीपकने पुढे काय केलं? पाहा खालील व्हिडीओमध्ये. 



Source link

जुनं प्रकरण मिटलं, सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही राजे एकत्र, नेमकं प्रकरण काय?  

0


सातारा  : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात आज खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Minister Shivendraraje Bhosale) एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. जुन्या दोन प्रकरणावरुन हे दोन्ही राजे यावेळी उपस्थित राहिले होते. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी माघारी घेतल्यामुळं खिंडवाडी येथील नवीन मार्केट कमिटीचे प्रकरण न्यायालयानं निकाली काढले आहे. तर सुरुची राडा प्रकरण सेशन कोर्टाकडून जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

साताऱ्यातील 2017 मधील सुरुची राडा प्रकरण आणि नवीन मार्केट कमिटीतील जागेच्या वादावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यासह मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. हे दोन्ही खटले सातारा न्यायालयात सुरु आहेत. या प्रकरणात आज दोन्ही राजे त्यांच्या गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले होते. यामध्ये आज न्यायालयाने खिंडवाडी येथील नवीन मार्केट कमिटीच्या प्रकरणाचा निकाल लागला. यामधील दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारी माघारी घेतल्यामुळे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाने निकाली काढला आहे. आनेवाडी टोल नाका व्यवस्थापनाच्या प्रकरणावरून 2017 मध्ये शिवेंद्रराजे यांच्या सुरुची निवासस्थानासमोर झालेल्या दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमधील राडा प्रकरण हे गंभीर गुन्ह्यातील असल्यामुळं ते सेशन कोर्टातून हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. या दोन्ही खटल्यात सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही राजेंनी उपस्थिती लावल्यामुळं मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी न्यायालयाच्या आवारात पाहायला मिळाली. 

महत्वाच्या बातम्या:

मेलो तर चालेल, पण याला खल्लास करणार अशी वेळ येऊ देऊ नका; महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवरून उदयनराजेंचा इशारा, सरकारकडे केल्या तीन मागण्या

 

अधिक पाहा..



Source link