Sunday, June 28, 2026
Home Blog Page 49

ना विष, ना कोणता कट…, मग साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू झाला कसा? पोलिसांकडून मोठा गौप्यस्फोट

0
ना विष, ना कोणता कट…, मग साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू झाला कसा? पोलिसांकडून मोठा गौप्यस्फोट


Jodhpur Sadhvi Prem Baisa Death Case: राजस्थानच्या जोधपूरमध्ये साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयित मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आता मोठा खुलासाा केला आहे. पोलीस आयुक्त ओमप्रकाश पासवान यांनी साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू ह्रदय बंद पडल्याने आणि फुफ्फुसातील अडथळ्यांमुळे (Cardiac and Palmonary Arrest)झाल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसएल आणि हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्टमधून मृत्यू विषप्रयोग किंवा इतर कोणत्या कारणांमुळे झालेला नाही. तसंच कोणताही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, तपासात समोर आलं की रुग्णालयातील नर्स कर्मचाऱ्याने साध्वीला इंजेक्शन दिलं होतं. असे इंजेक्शन डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय दिले जाऊ शकत नाहीत. पण याच इंजेक्शनमुळे त्यांचं ह्रदय बंद पडलं आणि फुफ्फुसातील अडथळे निर्माण झाले का? असं विचारलं असता त्यांनी यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल येणं बाकी असल्याचं सांगितलं आहे. 

पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, देवी सिंग स्वत: इंजेक्शन घेऊन आला होता. मात्र अद्याप त्याच्याकडे इंजेक्शनशी संदर्भात कोणताही कागद सापडलेला नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या रिपोर्टमधून, निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं तर बीएनएस आणि वैद्यकीय नियमांतर्गत कारवाई केली जाईल. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या शक्यतेबद्दल त्यांनी सांगितले की, अहवालाच्या आधारे सर्व पर्याय खुले आहेत. चौकशी अद्याप पूर्ण झाली नसून, तज्ज्ञांचं मत आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

एसआयटीने या प्रकरणाचा तपास केला आहे. आतापर्यंत 44 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसंच 106 मोबाईल क्रमांकाचे डिटेल्स तपासण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, साध्वींच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी लोकांना एकत्र जमवण्यासाठी फोन केले होते. पण हे भावनेच्या भरात त्यांनी केलं होतं. तपासात त्यांची कोणतीही संशयित भूमिका आढळलेली नाही. 

आयुक्तांनी असेही सांगितले की साध्वीने यापूर्वी दाखल केलेल्या खटल्यांशी संबंधित कोणीही तिच्या मृत्यूमध्ये सामील नाही. त्यांनी असेही म्हटले की तिच्या नावाने पोस्ट केलेला न्याय मागणारा संदेश तिच्या वडिलांनी गर्दी जमवण्यासाठी लिहिला होता. तपास सुरू आहे आणि तज्ञांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल.





Source link

फलटण नगर परिषदेचा इशारा : रस्त्यावर माल व हातगाड्या ठेवल्यास जप्तीची कारवाई

0
फलटण नगर परिषदेचा इशारा : रस्त्यावर माल व हातगाड्या ठेवल्यास जप्तीची कारवाई


फलटण : फलटण येथील फलटण नगर परिषद यांच्या वतीने शहरातील सर्व फळ विक्रेते, भाजी विक्रेते तसेच विविध चौक व रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या फिरत्या हातगाडी धारकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यालगत किंवा रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शिल्लक माल ठेवू नये आणि हातगाड्या रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या करू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
नगर परिषदेच्या निदर्शनास आले आहे की, अनेक विक्रेते दिवसभराचा व्यवसाय संपल्यानंतर उरलेला माल रस्त्याच्या कडेला किंवा थेट रस्त्यावरच ठेवून जातात. तसेच काही हातगाडी धारक सायंकाळनंतर आपापल्या गाड्या घरी न नेता रस्त्यालगत उभ्या करतात. या प्रकारामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले की, “नागरिकांची सुरक्षितता ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिल्लक माल रस्त्यावर ठेवू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित माल व हातगाड्या जप्त करण्यात येतील. तसेच होणाऱ्या नुकसानीस संबंधित मालक स्वतः जबाबदार राहील.”
रात्रीच्या वेळी आग लागणे किंवा इतर आपत्कालीन घटना घडल्यास अग्निशमन दल, रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांना मार्ग मोकळा मिळावा, यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्यास जीवित व मालमत्तेची हानी होण्याचा धोका वाढतो, याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.
दरम्यान, या संदर्भात लवकरच विशेष पथकाद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शहरातील सर्व व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.

साठे गावाचा आदर्श उपक्रम : मिंडवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना ५० हजारांच्या स्पोर्ट ड्रेस व कबड्डी किटचे वाटप

0
साठे गावाचा आदर्श उपक्रम : मिंडवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना ५० हजारांच्या स्पोर्ट ड्रेस व कबड्डी किटचे वाटप

साठे गावाचा आदर्श उपक्रम : मिंडवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना ५० हजारांच्या स्पोर्ट ड्रेस व कबड्डी किटचे वाटप


साठे (ता फलटण ) – साठे गावातील सर्व ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून मिंडवस्ती (साठेफाटा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सुमारे ५०,००० रुपयांच्या स्पोर्ट ड्रेस व कबड्डी स्पोर्ट किटचे वितरण उत्साहात करण्यात आले.
या उपक्रमासाठी गावातील माजी डि.वाय.एसपी शिवाजी मुळीक यांनी १०,००० रुपयांची देणगी दिली. तसेच अमोल शिंदे (५,००० रुपये), कै. संदिप खटके यांच्या स्मरणार्थ आदर्श खटके (४,००० रुपये – कबड्डी स्पोर्ट ड्रेस किट), आणि चंद्रकांत जगताप (२,००० रुपये) यांनी आर्थिक मदत केली. याशिवाय साठे गावातील आजी-माजी राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक व शिक्षकवृंद यांनीही उत्स्फूर्त सहकार्य केले.
या आर्थिक पाठबळातून विद्यार्थ्यांना अंदाजे ४५,००० रुपयांचे स्पोर्ट ड्रेस आणि ४,००० रुपयांचे कबड्डी स्पोर्ट किट प्रदान करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी साठे गावच्या माजी सरपंच शर्मिला माने मॅडम, विद्यमान सरपंच निलम खांडेकर मॅडम, बाबासो धायगुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संदिप मिंड, उपाध्यक्षा पल्लवी धायगुडे मॅडम, तसेच ऋषिकेश खटके आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून देत, नियमित सराव व शिस्त यांद्वारे जिल्हा व राज्य स्तरावर यश मिळवण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल उत्साह वाढला असून ग्रामस्थांच्या एकजुटीचे उत्कृष्ट उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.
गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध झाल्याने पालक व शिक्षकवर्गाने समाधान व्यक्त केले.

फलटणमध्ये ‘दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर’चे उद्घाटन न्याय प्रक्रिया होणार सुलभ; ‘फलटण जिल्हा’ निर्मितीकडे महत्त्वाचे पाऊल

0
फलटणमध्ये ‘दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर’चे उद्घाटन न्याय प्रक्रिया होणार सुलभ; ‘फलटण जिल्हा’ निर्मितीकडे महत्त्वाचे पाऊल


फलटण : फलटणच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन इतिहासात आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला जात आहे. बहुप्रतिक्षित ‘दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर’ या न्यायालयाची प्रत्यक्ष सुरुवात रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होत असून, यामुळे फलटणच्या न्यायव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण-कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे न्यायालय फलटणसाठी मंजूर झाले होते. त्यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून आता न्यायालयाचे प्रत्यक्ष उद्घाटन होत आहे. यामुळे स्थानिक वकिलांसह नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
न्यायमूर्तींच्या उपस्थितीत होणार उद्घाटन सोहळा
विमानतळाशेजारील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीत सकाळी ११.३० वाजता भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन आर. बोरकर यांच्या हस्ते न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे.
या सोहळ्यास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे, राजेश एस. पाटील, संजय ए. देशमुख आणि रणजितसिंह राजा भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद शं. वाघमारे हेही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांना मोठा दिलासा
आजवर वरिष्ठ स्तरावरील दिवाणी प्रकरणांसाठी फलटण व परिसरातील पक्षकारांना सातारा येथे जावे लागत होते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांचा मोठा अपव्यय होत होता. आता हे न्यायालय फलटणमध्येच सुरू होत असल्याने न्याय मिळवणे अधिक सुलभ, जलद आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
स्थानिक बार असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
प्रशासकीय विस्तारामुळे वाढते महत्त्व
नुकतेच फलटणला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. त्यानंतर वरिष्ठ स्तर न्यायालयाची सुरुवात होत असल्याने ‘फलटण जिल्हा’ निर्मितीच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
प्रशासकीय आणि न्यायालयीन यंत्रणेचा विस्तार झाल्याने फलटणचे स्थान राज्याच्या प्रशासकीय नकाशावर अधिक ठळक होत आहे. राजकीय, प्रशासकीय आणि न्यायिक स्तरावर फलटणच्या वाढत्या प्रभावाची ही नोंद असून, भविष्यात स्वतंत्र जिल्हा निर्मितीच्या मागणीला यामुळे अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.

Bel Patra Ayurvedic Use: पुजेत अर्पण होणारे बेलपत्र ‘या’ आजारांवर रामबाण उपाय

0
Bel Patra Ayurvedic Use: पुजेत अर्पण होणारे बेलपत्र ‘या’ आजारांवर रामबाण उपाय


Bael Patra Benefits in Marathi: बेलपत्र हा केवळ पूजेसाठी वापरला जाणारा पवित्र पानांचा प्रकार आहे, अशी अनेकांची समजूत असते. पण आयुर्वेदात याला औषधी वनस्पतीचे महत्त्व दिले गेले आहे. श्रावण महिन्यात शिवमंदिरात बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा असली तरी रोजच्या आहारात त्याचा योग्य वापर केल्यास आरोग्यास मदत होऊ शकते. शरीरशुद्धी, पचन सुधारणा आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणूनही याचा उपयोग केला जातो. त्यामुळे बेलपत्र फक्त धार्मिक नाही तर आरोग्यदायीही मानले जाते.

Add Zee News as a Preferred Source

बेलपत्र आणि त्यातील पोषक घटक
संस्कृतमध्ये बिल्वपत्र म्हणून ओळखले जाणारे बेलपत्र हे औषधी गुणांनी समृद्ध आहे. या पानांमध्ये vitamin A, C, B1 आणि B6 आढळतात. त्यासोबत calcium आणि fiber देखील योग्य प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार हे पान शरीरातील दोष संतुलित ठेवण्यास सहाय्यक ठरते.

बेलपत्र सेवन करण्याच्या सोप्या पद्धती
बेलपत्र रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे घेता येते. सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 कोवळी पाने स्वच्छ धुवून चावून खाल्ली जाऊ शकतात. तसेच पानांचा काढा किंवा हलकी चहा बनवूनही सेवन करता येते. मात्र जास्त प्रमाण टाळावे आणि नियमितता ठेवणे महत्त्वाचे मानले जाते.

रिकाम्या पोटी सेवनाचे आरोग्यदायी फायदे

  1. मधुमेह नियंत्रणासाठी मदत
    दररोज योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास सहाय्य मिळू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो.

  2. पचनक्रिया सुधारते
    fiber मुबलक असल्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. त्यामुळे पोट फुगणे किंवा जडपणा कमी होऊ शकतो.

  3. बद्धकोष्ठता कमी होते
    गॅस, acidity आणि अपचन यांसारख्या तक्रारी कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. नियमित सेवनाने पोट साफ राहण्यास मदत मिळते.

  4. आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवते
    बेलपत्र शरीरातील अशुद्धता बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता सुधारते.

  5. प्रतिकारशक्ती वाढवते
    antioxidant घटकांमुळे शरीराची immunity मजबूत होते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते.

हे ही वाचा: 14 महिन्याच्या बाळाच्या घशात अडकली 1/2 इंच स्प्रिंग, डॉक्टरांनी…

काळजी आणि उपयुक्त सूचना
ज्यांना गंभीर आजार आहेत किंवा औषधे सुरू आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करावे. लहान मुलांना किंवा गर्भवती महिलांनी अति सेवन टाळावे. योग्य प्रमाण आणि नियमित वापर केल्यास बेलपत्र नैसर्गिक आरोग्यसाथी ठरू शकते.





Source link

पीएम सूर्यघर योजना: सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे; महावितरणचा पुढाकार, महाराष्ट्राची आघाडी

0
पीएम सूर्यघर योजना:  सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे; महावितरणचा पुढाकार, महाराष्ट्राची आघाडी


  • Marathi News
  • Opinion
  • Maharashtra Solar Energy Self Reliance: PM Suryaghar Scheme Completes 2 Years

ज्ञानेश्वर आर्दड15 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

13 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेबरोबर स्वच्छ ऊर्जा, आर्थिक बचत आणि ऊर्जा स्वावलंबन यांचा नवा अध्याय सुरू झाला. आज या योजनेला दोन वर्षे पूर्ण होत असताना, देशभरातील लाखो कुटुंबांचे आयुष्य उजळले आहे. वाढते वीजदर, पर्यावरणीय समस्या आणि पारंपरिक इंधनस्रोतांची मर्यादा या पार्श्वभूमीवर अक्षय ऊर्जेकडे वळणे ही काळाची गरज बनली होती. प्रत्येक घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून स्वच्छ, शाश्वत आणि परवडणारी वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

सौर ऊर्जा ही नैसर्गिक, अक्षय आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा आहे. कोळसा, पेट्रोल आणि डिझेलसारख्या पारंपरिक इंधनांमुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सौरऊर्जा हा सर्वोत्तम पर्याय आहे. वर्षातील बहुतांश दिवस मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने भारतात सौरऊर्जेची प्रचंड क्षमता आहे. त्या क्षमतेचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी सरकारनेही दोन पावले पुढे टाकली आहेत.

वीज विकून उत्पन्न

दरमाह तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी या योजनेत मिळत आहे. त्यामुळे या योजनेस वीजग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

बिल शून्य करण्याची संधी

घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज ग्राहकांना वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास ती विकत घेण्यात येत आहे. त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. योजनेमुळे अनेक ग्राहकांचे वीजबिल जवळपास शून्यवत होत आहे.

अनुदानाचा आधार

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. याबरोबरच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामायिक उपयोगासाठी 500 किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट 18 हजार रुपये असे कमाल 90 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. 300 युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. तसेच सुमारे 25 वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे.

येथे करा अर्ज

पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे.

उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल

पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रणाली बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गत दोन वर्षांत योजनेने लक्षणीय प्रगती साधली आहे. गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू ही राज्ये अंमलबजावणीत आघाडीवर आहेत. आतापर्यंत 29 लाख 19 हजार 477 घरांपर्यंत ही योजना पोचली आहे. योजनेत 23 लाख 44 हजार 794 ग्राहकांच्या घरांवर सौर ऊर्जा प्रणाली उभारली असून, त्याची स्थापित क्षमता 8606.34 मेगावॅट इतकी झाली आहे. तसेच अनुदानापोटी 16 हजार 731 कोटी रुपये ग्राहकांच्या थेट बँक खात्यात जमा झाले आहेत.

सर्व प्रक्रिया फेसलेस

महाराष्ट्राने या योजनेत आघाडी घेतली आहे. महावितरणने मानवी हस्तक्षेप टाळून अर्ज करण्यापासूनची सर्व प्रक्रिया फेसलेस केली आहे. 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत असून सौर नेटमीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. अर्जांची छाननी, तांत्रिक तपासणी, नेट मीटर बसवणे आणि ग्रिड जोडणी प्रक्रिया सुलभ करणे यामध्ये महावितरणचे मोलाचे योगदान आहे.

ग्राहकांचा सहभाग वाढला

जनजागृती मोहिमा आणि ऑनलाइन सेवा सुविधांमुळे ग्राहकांचा सहभाग वाढला आहे. महाराष्ट्रात या योजनेत 4 लाख 43 हजार 944 ग्राहकांच्या घरांवर सौर ऊर्जा प्रणाली उभारली असून, त्याची स्थापित क्षमता 1685.9 मेगावॅट इतकी झाली आहे. तसेच अनुदानापोटी 3 हजार 202 कोटी रुपये ग्राहकांच्या थेट बँक खात्यात जमा झाले आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध संस्थांकडून महावितरणला पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

परिवर्तनाची नवी दिशा

या योजनेमुळे घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात लक्षणीय घट झाली असून, काही ग्राहकांचे वीजबिल शून्यवत झाले आहे. अतिरिक्त वीज ग्रिडला विकून उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागात वीजपुरवठा अधिक स्थिर झाला आहे. सौर पॅनेल उत्पादन, स्थापना आणि देखभाल क्षेत्रात रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आहे.

हरित ऊर्जेसाठी भक्कम पाऊल

पीएम सूर्यघर योजना ही केवळ एक शासकीय योजना नसून ती देशाला हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने नेण्यासाठी उचललेले ऐतिहासिक पाऊल आहे. दोन वर्षांत या योजनेने ऊर्जा क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यांच्या सक्रिय सहभागामुळे भारत ऊर्जा स्वावलंबनाकडे अधिक वेगाने वाटचाल करत आहे. या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी वीजबिल बचतीबरोबरच स्वच्छ ऊर्जेचा अवलंब करायला हवा, एवढेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

(लेखक छत्रपती संभाजीनगर महावितरण परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)



Source link

14 महिन्याच्या बाळाच्या घशात अडकली 1/2 इंच स्प्रिंग, डॉक्टरांनी…

0
14 महिन्याच्या बाळाच्या घशात अडकली 1/2 इंच स्प्रिंग, डॉक्टरांनी…


जर एखाद्या बाळाच्या अन्ननलिकेत स्प्रिंग अडकले तर परिस्थिती किती गंभीर असेल याची कल्पना करा. त्यामुळे बाळाचा जीवही जाऊ शकतो. नवी दिल्लीतील एम्स येथील डॉक्टरांनी 14 महिन्यांच्या बाळावर यशस्वी उपचार करून तिचा जीव वाचवला. बाळाच्या अन्ननलिकेत एक मोठा धातूचा स्प्रिंग अडकला होता, ज्यामुळे तिची प्रकृती बिकट झाली होती.

Add Zee News as a Preferred Source

बाळामध्ये जाणवले हे बदल?

यमुना नगर येथील रहिवासी असलेली ही मुलगी एका आठवड्यापासून सतत उलट्या करत होती आणि तिचे पालक तिला काय झाले आहे हे समजू शकले नव्हते. मुलीने दोन दिवसांपासून खाणे-पिणे बंद केले होते आणि ती संवाद साधू शकत नव्हती. पालक घाबरले आणि तिला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी एक्स-रे केला आणि बाळाच्या अन्ननलिकेच्या वरच्या भागात एक मोठा धातूचा स्प्रिंग अडकलेला आढळला. त्यानंतर, एंडोस्कोपी वापरून स्प्रिंग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो अयशस्वी झाला.

कुटुंबाच्या मते, मुलीच्या शरीरात नळी खोलवर अडकली होती आणि तिच्याभोवती सूज आणि जखम होती, ज्यामुळे फाटण्याचा धोका निर्माण झाला होता. डॉक्टरांनी तिला ताबडतोब एम्समध्ये रेफर केले, जिथे तिचे यशस्वी ऑपरेशन झाले.

स्प्रिंग अर्धा इंच रुंद 

एम्स दिल्ली येथील बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. विशेष जैन यांनी स्पष्ट केले की केस खूप गंभीर आहे. स्प्रिंग अन्ननलिकेच्या वरच्या भागात अडकले होते आणि ते खूप जाड होते. ते सामान्य स्प्रिंगपेक्षा बरेच वेगळे होते: ते अर्धा इंच रुंद आणि दीड ते दोन इंच लांब होते. धोका लक्षात घेऊन, आम्ही ताबडतोब ऑपरेशन केले, त्यानंतर मुलगी आता निरोगी आहे आणि खात आहे. त्यांनी पुढे सांगितले की मुलीने दोन एंडोस्कोपिक प्रक्रिया केल्या होत्या आणि तिच्या अन्ननलिकेला नुकसान झाल्याचे आढळले, ज्यामुळे तीव्र सूज आणि काही रक्तस्त्राव झाल्यामुळे दुर्बिणीतून देखील ते पाहणे कठीण झाले. तथापि, आम्ही संयमाने काम केले आणि मुलीचा जीव यशस्वीरित्या वाचवला.

पालकांनी लहान मुलांकडे द्यावं विशेष लक्ष द्यावं

डॉ. विशेष जैन म्हणाले की पालकांनी लहान मुलांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. स्प्रिंग्ज, नाणी, बॅटरी किंवा लहान खेळण्यांचे भाग यासारख्या वस्तू त्यांच्यापासून दूर ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्यांना कधीच माहित नसते की ते कधी गिळतील. जर एखाद्या लहान मुलाला अचानक उलट्या झाल्या, खाण्यास किंवा पिण्यास नकार दिला किंवा जास्त लाळ आली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. या प्रकरणात, सामान्य उलट्यासारखी वाटणारी समस्या गंभीर आणि जीवघेणी ठरली, परंतु वेळेवर उपचार केल्याने मुलाचा जीव वाचला.





Source link

Bank Strike : बँका बंद आहेत तर व्यवहार कसे कराल? CSP मधून मिळेल रोख रक्कम

0
Bank Strike : बँका बंद आहेत तर व्यवहार कसे कराल? CSP मधून मिळेल रोख रक्कम


Bank CSP, Customer Service Point: कामगार संघटनांनी आज, १२ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे आणि बँक कर्मचारी संघटना देखील त्यात सामील होत आहेत. परिणामी, बँकिंग कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बँक शाखांना कुलूप लागू शकतात किंवा कामकाज विस्कळीत होऊ शकते. डिजिटल बँकिंग, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग उपलब्ध आहे, परंतु ते कसे वापरायचे हे सर्वांनाच माहिती नसते. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे: बँकांचे CSP (ग्राहक सेवा केंद्रे). बँक संपादरम्यान, या CSP ची भूमिका आणखी महत्त्वाची बनते. ते बँक कर्मचाऱ्यांद्वारे चालवले जात नसून बँक मित्र किंवा प्रशिक्षित व्यक्तींद्वारे चालवले जात असल्याने, ते संपादरम्यानही खुले राहतात.

Add Zee News as a Preferred Source

जर तुम्हाला पैसे काढायचे असतील, व्यवहार करायचे असतील, मिनी स्टेटमेंट घ्यायचे असेल किंवा इतर महत्त्वाची कामे करायची असतील, तर तुमच्या अनेक गरजा ग्राहक सेवा केंद्रावर पूर्ण केल्या जाऊ शकतात. SBI, PNB, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि HDFC बँक यासह अनेक बँकांमधील ग्राहक सेवा केंद्रे (CSP) तुमचा ताण कमी करू शकतात.

तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र (CSP) बद्दल माहिती असेल. तुमच्या घरी किंवा ऑफिसला जाताना, तुम्हाला तुमच्या परिसरात, परिसरात किंवा थोड्या अंतरावर कुठेतरी याचा साइनबोर्ड दिसला असेल. जरी तुम्हाला तो दिसत नसेल तरी काही हरकत नाही; ते शोधणे खूप सोपे आहे.

कोणत्या बँका ग्राहक सेवा केंद्रे देतात?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह देशभरातील ग्राहक सेवा केंद्रे (CSPs) संपादरम्यानही उघडी राहतात, ज्यामुळे अनेक महत्त्वाची बँकिंग कामे हाताळणे सोपे होते. SBI सोबत, PNB (पंजाब नॅशनल बँक), बँक ऑफ बडोदा (बँक ऑफ बडोदा), कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि HDFC बँक यासह अनेक सार्वजनिक आणि खाजगी बँका ग्रामीण आणि शहरी भागात CSPs चालवतात. हे बँक मित्र (बँक मित्र) किंवा बिझनेस कॉरस्पॉन्डंट्स (BCs) द्वारे चालवले जातात.

कामगार संघटनांनी आज, १२ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे आणि बँक कर्मचारी संघटना देखील त्यात सामील होत आहेत. परिणामी, बँकिंग कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बँक शाखांना कुलूप लागू शकतात किंवा कामकाज विस्कळीत होऊ शकते. डिजिटल बँकिंग, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग उपलब्ध आहे, परंतु ते कसे वापरायचे हे सर्वांनाच माहिती नसते. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे: बँकांचे CSP (ग्राहक सेवा केंद्रे). बँक संपादरम्यान, या CSP ची भूमिका आणखी महत्त्वाची बनते. ते बँक कर्मचाऱ्यांद्वारे चालवले जात नसून बँक मित्र किंवा प्रशिक्षित व्यक्तींद्वारे चालवले जात असल्याने, ते संपादरम्यानही खुले राहतात.

जर तुम्हाला पैसे काढायचे असतील, व्यवहार करायचे असतील, मिनी स्टेटमेंट घ्यायचे असेल किंवा इतर महत्त्वाची कामे करायची असतील, तर तुमच्या अनेक गरजा ग्राहक सेवा केंद्रावर पूर्ण केल्या जाऊ शकतात. SBI, PNB, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि HDFC बँक यासह अनेक बँकांमधील ग्राहक सेवा केंद्रे (CSP) तुमचा ताण कमी करू शकतात.

तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र (CSP) बद्दल माहिती असेल. तुमच्या घरी किंवा ऑफिसला जाताना, तुम्हाला तुमच्या परिसरात, परिसरात किंवा थोड्या अंतरावर कुठेतरी त्याचा फलक दिसला असेल. जरी तुम्हाला तो दिसत नसला तरी, काही हरकत नाही; ते शोधणे खूप सोपे आहे.

ग्राहक सेवा केंद्रात कोणती कामे केली जातात?

ग्राहक सेवा केंद्रात बँकांशी संबंधित अनेक कामे काही मिनिटांत पूर्ण केली जातात. तुम्हाला फक्त या CSPs ला भेट द्यावी लागेल आणि तुमच्या गरजा स्पष्ट कराव्या लागतील. जाण्यापूर्वी, CSP मध्ये तुम्ही कोणती कामे करू शकता याबद्दल जाणून घ्या…

  • बॅलन्स चेक आणि मिनी स्टेटमेंट
  • रोख ठेवी आणि पैसे काढणे
  • आधार-आधारित बँकिंग (AEPS) द्वारे व्यवहार
  • DBT/सरकारी अनुदान स्थिती तपासणे
  • खाते उघडण्यास मदत (मूलभूत बचत खाते)
  • मोबाइल नंबर अपडेट आणि KYC अपडेट
  • चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट, लॉकर अॅक्सेस किंवा मोठ्या कर्जांशी संबंधित काही कामे CSP मध्ये केली जात नाहीत. 





Source link

एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी डिवचलं

0


सांगली: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेनं देखील लक्षवेधी कामगिरी केली आहे. शिवसेना नेते तथा मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी भाजपला खोचक टोला लगावला. एका लुगडयाने कोण म्हातारे होत नाही, सत्ता स्थापनेसाठी भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर असते, असे म्हणत देसाई यांनी भाजपला डिवचलं. सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेवरुन भाजपला चांगलाच टोला लगावला. तसेच, जिल्हा परिषदेमध्ये (ZP) भाजपला पाठिंबा द्यायचा का नाही? याबाबत शिवसेनेचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, असेही शंभूराजेंनी स्पष्ट केले.

निवडणुकीच्या अगोदर मित्र पक्षांना डावलायचं आणि नंतर सत्ता स्थापन करताना सोबत असल्याचे सांगायचं ही भाजपची सोयस्कर भूमिका नेहमी असते. शिवसेनेची भूमिका ठरवणारे भाजप कोण ? जिल्हा परिषदेमध्ये पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश येतील त्या पद्धतीने आमचा पुढील निर्णय असणार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सांगलीमध्ये ते प्रसारमध्यमांशी बोलत होते. 

एका लुगड्याने कोण म्हातारी होत नाही

एका लुगड्याने कोण म्हातारी होत नाही, निवडणुकीच्या अगोदर आणि त्यानंतर महापालिकेमध्ये भाजपने निर्णय घेतले. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करताना आम्ही जो निर्णय घ्यायचा तो घेऊ. सांगली जिल्ह्यात निवडून आलेल्या शिवसैनिकांशी चर्चा करून त्यांची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगितली जाईल. त्यानंतर शिंदे साहेब सांगतील तो निर्णय आम्ही घेऊ, असेही शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, कालच देसाई यांनी भाजपच्या दोन मंत्र्यांवरही बोचरी टीका केली होती. पाटण दौऱ्यात असताना त्यांनी नाव न घेता मंत्री गणेश नाईक आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला होता. 

हेही वाचा

Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला

आणखी वाचा



Source link

शंभूराज देसाई यांच्या पालकत्वाखाली आम्ही आहोत, शिवेंद्रराजेंचं पत्रकारांना मिश्किल उत्तर….

0


सातारा : सातारा जिल्हा परिषद निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची एकत्रित सत्ता येऊ शकते, असं चित्र निर्माण झालं आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांपैकी 27 जागा भाजपला मिळाल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला 20  आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. तर, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विजय मिळवला आहे. या सर्व घडामोडींनंतर आज शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराज देसाई जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्तानं आमने सामने आले होते.  यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर मिश्किल उत्तर दिलं.

शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले?  

आज भाजप मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त आमने सामने आले. या बैठकीनंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्रकारांनी जिल्हा परिषदच्या सत्ता स्थापनेबद्दल प्रश्न विचारले.  मंत्री शंभूराज देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या पालकत्वाखाली आम्ही आहोत.हात मिळवायचा काय, आम्ही मिठी मारायला देखील तयार आहोत. मात्र, त्यांना ते चालतंय का बघा अशी मिश्किल कोपरखळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मारली आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांनी शेजारी उभे असणाऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांकडे इशारा करत त्यांनी मला बोलावले आणि मी गेलो नाही असं कधी झालं नाही. फक्त या आधी मला थेट निरोप मिळाला नव्हता.मात्र जिल्हा परिषदेत तुम्ही दोघे एकत्र येणार का ?असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर भाजप कडे संख्याबळ जारी जास्त असलं तरी पालकमंत्री मोठे आहेत आणि मोठ्यांनी सामावून घेतलं पाहिजे.दोन बैठकांना बोलावून देखील तुम्ही आला नाही असे विचारल्यावर त्यावेळी वातावरण ठीक नव्हते मात्र आता चांगले झालं आहे, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.  
 
शंभूराज देसाई यांनी दोन दिवस बोललो असून आज बोलणार नसल्याचं म्हटलं. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात पुढील चर्चा वरिष्ठ नेत्यांसोबत बोलून करणार असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुती म्हणून लढण्यासंदर्भात शंभूराज देसाई यांनी प्रयत्न केले होते. त्याला यश आलं नव्हतं.  त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येत निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या संख्याबळाची बेरीज केल्यास त्यांची जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊ शकते.    

सातारा जिल्हा परिषदेतील संख्याबळ

भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस: 20
शिवसेना :15
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
काँग्रेस :01
इतर :01

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link