फलटण : कमला निंबकर बालभवन च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या बोर्ड परीक्षेचे मार्गदर्शन सत्र नुकतेच उत्साहात पार पडले. इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ व अनुभवी शिक्षक श्री. चंद्रकांत सस्ते यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. सध्या ते साखरवाडी हायस्कुल साखरवाडी येथे कार्यरत असून यापूर्वी त्यांनी कमला निंबकर बालभवनमध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी ते कमला निंबकर बालभवनमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. या मार्गदर्शन सत्रात त्यांनी इयत्ता दहावीच्या इंग्रजी बोर्ड पेपरची रचना, प्रश्नपत्रिकेचा आराखडा, गुणांचे विभाजन, तसेच प्रत्येक घटकाची तयारी कशी करावी याबाबत सविस्तर विवेचन केले. वाचन कौशल्य (Reading Skills) अंतर्गत उताऱ्यांवरील प्रश्न सोडवताना योग्य पद्धत, की-वर्ड ओळखण्याची सवय आणि वेळेचे नियोजन यावर त्यांनी भर दिला. लेखन कौशल्य (Writing Skills) विभागात पत्रलेखन, अहवाल लेखन, संवाद लेखन, ई-मेल लेखन यांसारख्या प्रश्नप्रकारांमध्ये अपेक्षित मांडणी, योग्य शब्दसंपदा आणि व्याकरणातील अचूकता याचे बारकावे स्पष्ट केले. व्याकरण (Grammar) भागातील काळ (Tenses), Active-Passive Voice, Direct-Indirect Speech, तसेच वाक्यरचना यावर त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. साहित्य (Literature) विभागात पाठ्यपुस्तकातील धडे व कविता यांवरील अपेक्षित प्रश्न, उत्तरांची मांडणी, मुद्देसूद लेखन आणि आवश्यक तेथे संदर्भासहित स्पष्टीकरण कसे द्यावे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्तरपत्रिका स्वच्छ, सुबक आणि वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व त्यांनी विशेष अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी यावेळी इंग्रजी विषयातील अडचणी, लेखनातील चुका, व्याकरणातील संभ्रम यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. श्री. चंद्रकांत सस्ते यांनी प्रत्येक प्रश्नाला संयमपूर्वक व मार्गदर्शक स्वरूपात उत्तरे देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे दरवर्षी विद्यार्थी इंग्रजी विषयात उल्लेखनीय यश संपादन करत असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमावेळी कमला निंबकर बालभवनच्या माध्यमिक विभागाचे माजी मुख्याध्यापक तथा विद्यमान शिक्षक तथा मानद सल्लागार विश्वास जगदाळे सर यांनी श्री.चंद्रकांत सस्ते यांचे प्रगत शिक्षण संस्थेला 40 वर्षे झाल्याच्या प्रत्यार्थ तयार करण्यात आलेले ‘मातीत रुजलेलं आभाळ गोष्ट प्रगत शिक्षण संस्थेची हे पुस्तक व कप देऊन स्वागत केले व त्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले सर यांनी सरांचा अल्पसा परिचय करून देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी कमला निंबकर बालभवन च्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गीता बोबडे उपस्थित होत्या.
सदर मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीला निश्चितच बळ मिळाले असून इंग्रजी विषयातील भीती दूर होऊन आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.
8th Pay Commission: 31 डिसेंबर 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या फायद्यांपासून वंचित राहावे लागेल अशी चर्चा सुरु होती.अर्थसंकल्प 2025 मुळे ही चर्चा सुरु झाली. मात्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
अर्थ मंत्रालयाने काय म्हटलंय?
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत महत्वाची माहिती दिली. आठवा वेतन आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आणि निवृत्तिवेतन याबाबत शिफारशी करण्यासाठी नेमल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्प 2025 च्या भाग-IV ने सध्याच्या नियमांची वैधता कायम ठेवली. त्यात नागरी किंवा संरक्षण निवृत्तिवेतनात कोणताही बदल केलेला नाही. सेवानिवृत्तीची तारीख काहीही असो, सर्व कर्मचाऱ्यांना समान लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. हे विधेयक केवळ सध्याच्या निवृत्तिवेतन नियमांना दुजोरा देतय असून त्यात कोणताही भेदभाव नाही. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन आयोगाच्या शिफारशींनुसार लाभ मिळतील, असे सरकारने म्हटलंय. हे नियम केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 2021 आणि इतर संबंधित आदेशांनुसार चालतात जे स्वतंत्रपणे लागू होतात, असेही स्पष्ट करण्यात आलय.
आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया
आठवा वेतन आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचना, भत्ते आणि निवृत्तिवेतन याबाबत सविस्तर शिफारशी करणार आहे. यासाठी सरकारने एक वेबसाइट सुरू केलीय. ज्याद्वारे वेतन, भत्ते आणि निवृत्तिवेतन याबाबत अभिप्राय मागवले जात आहेत. हे अभिप्राय मायगॉव पोर्टलवर उपलब्ध असलेल्या प्रश्नावलीद्वारेही गोळा केले जातात. ही प्रक्रिया पारदर्शक असून कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आयोगाच्या अहवालाची तयारी केली जाईल, असे यात म्हटलंय. यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक न्याय्य आणि अद्ययावत वेतन प्रणाली मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.
आपले मत नोंदवता येणार
सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी अभिप्राय गोळा करण्याची प्रक्रिया 16 मार्चपर्यंत सुरू ठेवलीय. इच्छुक व्यक्ती वेबसाइट किंवा मायगॉव पोर्टलद्वारे आपले मत नोंदवू शकतात. या प्रक्रियेत सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार आहे. ज्यामुळे आयोगाच्या शिफारशी अधिक सर्वसमावेशक होतील, असे म्हटले जात आहे. यात वेतन वाढ, भत्त्यांच्या प्रकारात बदल आणि निवृत्तिवेतनाच्या सुधारणा याबाबत सूचना अपेक्षित आहेत.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांची जपणूक
31 डिसेंबर 2025 पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या लाभांपासून वगळले जाणार नाही. निवृत्तिवेतनातील सुधारणा आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर सामान्य आदेशांनुसार लागू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थ विधेयक 2025 मुळे कोणताही भेदभाव होणार नाही, कारण ते केवळ नियमांना दुजोरा देते. यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही आर्थिक स्थिरता मिळेल आणि त्यांच्या हक्कांची जपणूक होईल, असे स्पष्ट करण्यात आलंय.
Satara Crime News सातारा: शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’ ला घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकानेच ‘प्रपोज’ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. (Satara Crime News)
नेमकं काय घडलं? (Satara Crime News) 14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले. “मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडल्याचा आरोप आहे.
शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल- (Satara Crime News) घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने मैत्रिणी व कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Satara Crime News सातारा: शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’ ला घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकानेच ‘प्रपोज’ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. (Satara Crime News)
नेमकं काय घडलं? (Satara Crime News)
14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले. “मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडल्याचा आरोप आहे.
शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल- (Satara Crime News)
घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने मैत्रिणी व कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथमध्ये आठवडाभरापूर्वी महालक्ष्मी नगर येथील एका खासगी रुग्णालयात सहा वर्षीय मुलावर चुकीचे उपचार झाल्याने त्याचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. महिला डॉक्टरवर सध्या उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. संबंधित डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी याबाबत तक्रारी करत असून तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ त्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे संबंधित महिला डॉक्टरने सांगितले आहे.
फलटण :- सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेचा तिढा अधिकच वाढला असून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत थेट सामना रंगला आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने अध्यक्षपदावर ठाम दावा केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास बहुमत निश्चित असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या गटाचा होणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना–राष्ट्रवादीची एकजूट, ‘प्लॅन बी’ची गरज नाही राज्याचे पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. “आमचा ए प्लॅन तयार आहे. आम्हाला प्लॅन बीची गरज नाही,” असे ते म्हणाले. भाजपकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी (20) आणि शिवसेना (15) एकत्र आल्यास त्यांची एकूण संख्या 35 होते, जी बहुमतासाठी पुरेशी आहे. त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी या दोन्ही पक्षांत हालचाली वेगात सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. ‘अध्यक्ष भाजपचाच’ – जयकुमार गोरेंचा ठाम दावा दुसरीकडे भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, “जागा कमी आल्या म्हणून आम्ही अध्यक्षपद सोडणार नाही. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार.” वरिष्ठ नेतृत्व त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असून आम्हीही आमच्या पद्धतीने काम करत आहोत, असे ते म्हणाले. साताऱ्यात भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे नैतिकदृष्ट्या अध्यक्षपदाचा हक्क भाजपकडेच असल्याचा दावा गोरेंनी केला आहे. सातारा जिल्हा परिषद : पक्षीय बलाबल भाजप – 27 राष्ट्रवादी काँग्रेस – 20 शिवसेना (शिंदे गट) – 15 शिवसेना (ठाकरे गट) – 0 काँग्रेस – 1 इतर – 2 पुढची चाल कोणाची? महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणावामुळे स्थानिक राजकारण तापले आहे. मैत्री कायम ठेवून सत्ता वाटपाचा तोडगा निघणार की राष्ट्रवादीसोबतची आघाडी निर्णायक ठरणार, यावर आता वरिष्ठ पातळीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील हा सत्तासंग्राम पुढील काही दिवसांत अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत. अध्यक्षपदासाठी आकडेमोड, राजकीय डावपेच आणि वरिष्ठ नेत्यांची हस्तक्षेपाची शक्यता यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतरची ही लढत राज्याच्या राजकारणातही महत्त्वाची ठरणार आहे.
फलटण : फलटणच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी असा ऐतिहासिक क्षण आज अनुभवायला मिळाला. वरिष्ठ स्तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्यामुळे फलटणच्या न्यायलढ्याला नवे बळ प्राप्त झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या उपस्थितीत झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमाने फलटणच्या न्यायप्रवासात नवे पर्व सुरू झाले. कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, नगरसेवक संदीप चोरमले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे संचालक कोंडे देशमुख व भोसले यांनी न्यायालय मंजुरी प्रक्रियेचा सविस्तर आढावा मांडला. साताऱ्याच्या फेऱ्यांना पूर्णविराम फलटण वकील संघाचे अध्यक्ष एन. एम. जाधव यांनी प्रास्ताविकात गेल्या अनेक वर्षांतील संघर्षाची भावनिक कहाणी सांगितली. “फलटण ते सातारा 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास करताना वकील आणि पक्षकारांना अपघात, वेळेचा अपव्यय, आर्थिक खर्च आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. आता हे न्यायालय सुरू झाल्याने फलटणकरांचा मोठा भार हलका झाला आहे,” असे त्यांनी नमूद केले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे स्वप्न साकार झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व न्यायालये एकाच प्रशस्त इमारतीत असावीत, तसेच धर्मादाय कार्यालय व सहकार न्यायालय फलटणमध्ये सुरू व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दोन दिवसांत 2045 प्रकरणांचे वर्गीकरण जिल्हा प्रमुख न्यायाधीश वाघमारे यांनी माहिती दिली की, न्यायालयाला मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत 2045 प्रकरणे साताऱ्यावरून फलटण येथे वर्ग करण्यात आली. ही मोठी प्रशासकीय कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयात ई-सुविधा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असून तत्काळ कामकाज सुरू होणार आहे. “आता फलटणकरांना न्यायासाठी इतरत्र भटकंती करावी लागणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “कोर्ट सॅल्युटसाठी नाही, न्यायासाठी आहे” — न्यायमूर्ती संजय देशमुख मुंबई उच्च न्यायालयचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की, “न्याय देण्यास होणारा उशीर हा व्यवस्थेवरील काळा डाग आहे. तो पुसून काढणे आपले कर्तव्य आहे. कोर्ट हे साहेबांना सॅल्युट करण्यासाठी नसते; ते पक्षकारांसाठी असते.” ग्रामीण भागातील शेतकरी हा अन्नदाता असून त्याला वेळेत न्याय देणे ही पवित्र जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. फलटणच्या उद्घाटनासाठी उच्च न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती उपस्थित राहणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. “आमची माती, आमची माणसं” — न्यायमूर्ती ए. एन. पानसरे न्यायमूर्ती ए. एन. पानसरे यांनी फलटणशी असलेले आत्मीय नाते व्यक्त करत आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. “सरकारी वकील आणि न्यायाधीशांनी पक्षकार व साक्षीदारांना सुसंवादातून विश्वास द्यावा. प्रकरणे जलदगतीने निकाली काढणे हीच खरी सेवा आहे,” असे त्यांनी सांगितले. “उद्घाटन केलेले कोर्ट बंद होऊ देऊ नका” — न्यायमूर्ती नितीन बोरकर न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालय दूर असल्यास पक्षकार व साक्षीदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. “आज फलटणमध्ये कोर्टाची साखळी पूर्ण झाली आहे. मात्र हे उद्घाटन केलेले कोर्ट भविष्यात कधीही बंद होऊ नये,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रलंबित 30 ते 40 वर्षांची प्रकरणे जलद निकाली काढण्यासाठी न्यायाधीशांसह वकिलांनीही नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध फलटणचे पहिले दिवाणी न्यायाधीश एस. पी. सय्यद यांनी सर्व न्यायमूर्तींचे आभार मानत, “जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असून न्यायदान अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही दिली. फलटणमध्ये वरिष्ठ स्तर जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेने अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. हा दिवस फलटणच्या स्वाभिमानाचा आणि न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणाचा ठरला आहे. न्यायाचा दरवाजा आता फलटणमध्येच उघडल्याने सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.
Mahashivrastri Upvas: महाशिवरात्री जवळ आली की अनेक भक्त उपवास करतात. आपल्या संस्कृतीत उपवासाला आध्यात्मिक शुद्धीचे स्थान दिले गेले आहे. देवपूजा, जप आणि संयम यांसोबत शरीरालाही विश्रांती देण्याचा हा एक मार्ग मानला जातो. अनेक लोक केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही उपवास पाळतात. योग्य पद्धतीने उपवास केल्यास शरीर स्वस्थ होते, पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण दिवसभर काही न खाल्ल्यानंतर उपवास सोडताना जर चुकीची पद्धत अवलंबली, तर उलट त्रास वाढू शकतो. म्हणून उपवास जितका महत्त्वाचा, तितकेच त्याचे पारण कसे करावे हे जाणून घेणेही आवश्यक आहे.
Add Zee News as a Preferred Source
उपवासानंतर लगेच तिखट-तेलकट खाणे टाळा दिवसभर पोट रिकामे असल्यामुळे पचनसंस्था संवेदनशील बनते. अशावेळी लगेच तळलेले, मसालेदार किंवा जास्त तेलकट पदार्थ खाल्ले तर ऍसिडिटी, अपचन आणि पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्यामुळे उपवास संपल्यावर हलक्या आहाराने सुरुवात करणे योग्य ठरते.
आंबट फळे खाण्याची घाई करू नका रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ल्यास पोटातील आम्ल वाढते. त्यामुळे जळजळ, गॅस आणि पचन बिघडण्याची शक्यता असते. म्हणून पारण करताना सुरुवातीलाच संत्री, मोसंबी किंवा इतर आंबट पदार्थ खाणे टाळावे.
ज्यांना डायबेटिज आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नये. दीर्घकाळ अन्न न घेतल्यावर अचानक जास्त खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल अस्थिर होऊ शकते. यामुळे चक्कर, अशक्तपणा किंवा इतर त्रास संभवतात.
अनेकांना उपवासानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र रिकाम्या पोटी कॅफिन घेतल्यास ऍसिडिटी वाढू शकते आणि मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. त्यामुळे पारण करताना प्रथम सौम्य पेय घेणे अधिक सुरक्षित ठरते.
उपवास सोडताना सर्वात आधी करा ‘हे’ काम दिवसभर उपवासामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे सर्वप्रथम 1 मोठा ग्लास पाणी प्यावे. त्यानंतर दही, ताजे फळांचा ज्यूस, नारळ पाणी किंवा लिंबू सरबत घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
उपवासानंतर शरीराला ताकद देणारा आहार आवश्यक असतो. त्यामुळे कडधान्य, उकडलेल्या भाज्या, हलकी खिचडी किंवा साधे घरगुती अन्न खाणे फायदेशीर ठरते. थोड्या प्रमाणात खाण्यापासून सुरुवात करून नंतर नियमित आहार घ्यावा.
योग्य पद्धतीने पारण केल्यास उपवासाचे खरे फायदे मिळतात. पचन व्यवस्थित राहते, थकवा कमी होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे महाशिवरात्रीसह कोणताही उपवास करताना केवळ श्रद्धाच नव्हे तर योग्य आहारशिस्त पाळणेही तितकेच आवश्यक आहे.
Waking Up Suddenly At Night Can Lead To Heart Disease: असे तुमच्या सोबतही घडते का? रात्री गाढ झोपेत असताना अचानकच जाग येते, श्वास गुदमरल्यासारखा वाटतो. जर तुमचे उत्तर हो असेल तर, आत्ताच सावध व्हा. कारण या समस्या थेट तुमच्या हृदयाच्या आरोग्याशी जोडलेल्या असू शकतात. तसेच असे असल्यास तुम्ही झोपेच्या समस्येच्या गंभीर स्थितीलाही बळी जात आहात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदय विकाराच्या झटक्याची ही सुरूवातीची लक्षणे असू शकतात. म्हणूनच तुम्हाला अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. यासाठी यामागचे नेमके कारण आणि योग्य उपाय जाणून घेणे आवश्यक आहे.
Add Zee News as a Preferred Source
रात्री अचानक जाग येण्याचा आणि हृदयविकाराचा संबंध काय?
आरोग्यतज्ज्ञांनुसार, जर हृदयाची कार्यक्षमता कमी झाली असेल, तर रात्रीच्या झोपेत अडथळा येऊ शकतो. जेव्हा हृदयाला त्याचे कार्य करण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतात, तेव्हा फुफ्फुसांमध्ये पाणी साठू लागते. यामुळेच रात्री झोपेत अचानक श्वास गुदमरल्यासारखे वाटते आणि अचानक जाग येते. तसेच कधीकधी हृदयाचे ठोके अनियमित होतात. ज्यामुळे अस्वस्था वाटूनही रात्री अचानक जाग येऊ शकते. याशिवाय बऱ्याचदा छातीत जडपणा वाटतो. हे देखील जाग येण्याचे कारण असू शकते.
हृदयविकाराची मुख्य लक्षणे कोणती?
श्वास गुमरणे, हृदयाचे अनियमित ठोके, रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे येणे ही हृदय विकाराची मुख्य लक्षणे आहेत. जेव्हा तुम्ही दिवसभर उभे असता किंवा बसलेले असता तेव्हा शरीरातील पाणी अधिकप्रमाणात पायांकडे साठते. आणि रात्री झोपल्यानंतर हे पाणी पुन्हा रक्ताभिसरण कार्यात येते. यावेळी हृदय कमकुवत असल्यास त्याच्या कार्यत अडथळा येतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच जर रक्चवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असतील तर, हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे छातीत जडपणा जाणवतो.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जर रात्री झोपेत ऑक्सिजनची कमतरता जाणवत असेल आणि अचानक जाग येऊन घाम फुटत असेल तर, याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी महागात पडू शकते. अशावेळी उशीर न करता कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञांकडे जाऊन आवश्यक चाचण्या करून घ्या. ज्यामुळे वेळीच समस्या ओळखली जाऊन उपचार करता येतील.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
सातारा : साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या सत्तेचा थरार आता पुढच्या टप्प्यावर गेला असून भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकल्याचं चित्र आहे. कमी जागा आल्या म्हणून अध्यक्षपद सोडणार नाही, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार असा दावा मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केला. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहेत, आम्हाला ‘प्लॅन बी’ची गरज नाही असं शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आता कोणत्या गटाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये 27 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादीने 20 तर शिंदेंच्या शिवसेनेने 15 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता असून राष्ट्ववादी आणि शिवसेना एकत्र आले तर बहुमताची संख्या पार होते. त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये हालचाली सुरू आहेत.
शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र
राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत असं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. आमचा ए प्लॅन तयार आहे, आम्हाला बी प्लॅनची गरजच नाही असं ते म्हणाले. त्याचबरोबर भाजपकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही अधिकृत चर्चा नाही, असंही मंत्री शंभूराज देसाई यांनी ठामपणे सांगितलं.
अध्यक्ष भाजपचाच, गोरेंचा दावा
तर दुसरीकडे भाजपचीही तितकीच आक्रमक भूमिका समोर येत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी थेट अध्यक्षपदावर दावा केला आहे. जागा कमी आल्या म्हणून अध्यक्षपद सोडणार नाही. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असं जयकुमार गोरे यांनी सांगितलं. अध्यक्ष भाजपचाच व्हावा यासाठी वरिष्ठ नेतृत्व त्यांच्या पद्धतीने काम करत आहे, आपण आपल्या पद्धतीने काम करू असं गोरे म्हणाले.
शिवसेना आणि भाजपच्या भूमिकेनंतर साताऱ्यात आता आणि तर्कवितर्क लावले जात आहेत. महायुतीत सेना भाजपची मैत्री टिकणार की सत्तेसाठी वेगळी चाल खेळली जाणार?साताऱ्याच्या सत्तेचा हा संग्राम आता वरिष्ठ पातळीवर पोहोचणार का? राजकीय पटलावर पुढची चाल कोण टाकणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
कायदेमंडळ निवडणूक 1946 : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची दहिवडी येथील निर्णायक सभा
साहस Times :- कायदेमंडळाच्या निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दहिवडी, ता. माण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक सभा झाली. त्याला आता 80 वर्षे होत आहेत. त्या आठवणीला उजाळा या लेखातून मिळेल.
दहिवडी हे पुसेसावळी-शिंगणापूर मार्गावर साताऱ्याच्या पूर्वेस ६४ कि.मी. अंतरावर व वडूजच्या ईशान्येला १९ कि.मी. अतंरावर माण नदीच्या उजव्या तीरावर आहे. माण तालुक्याचे ते मुख्यालय आहे. दहिवडीच्या आग्नेयेस २७कि.मी. अंतरावर सातारा-पंढरपूर रस्त्यावर आणि माण नदीच्या डाव्या तीरावर म्हसवड आहे. सन १८८५ मध्ये हे माण उप-विभागातील मोठे व्यापारी केंद्र होते. येथून कोकणात मालाची आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात होत असे.
ता. १५ फेब्रुवारी १९४६ कायदेमंडळाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दहिवडी येथे आले होते. दिल्लीहून जवळजवळ १००० मैलांचा प्रवास करून येऊन त्यांनी जनमाणसास मार्गदर्शन केले.
अध्यक्ष महाराज व बंधुभगिनींनो, आज मी या ठिकाणी दिल्लीहून जवळजवळ १००० मैलांचा प्रवास करून आलो आहे. याचे कारण म्हणजे हल्लीचा प्रसंगही तितकाच महत्त्वाचा आहे. जिकडे तिकडे पक्षोपक्षांची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पण अलिकडे हिंदुस्थानमधील वर्तमानपत्रांमध्ये एका गोष्टीला अगदी ऊत आलेला आहे व ती गोष्ट म्हणजे गांधी व माझेमधील झगडा. हा झगडा २५ वर्षे म्हणजे जवळजवळ १९२० सालापासून चालू आहे. पण हा झगडा का व कशाकरता चालला आहे याचा तुम्ही सर्वजण विचार करा. गांधींचा टिळकांशी झगडा होता, गांधींचा गोखलेंच्या बरोबरही झगडा होता, गांधींचा सर चिमणलाल सेटलवाड बरोबर सुद्धा झगडा होता पण हे झगडे मात्र आता नामशेष झालेले आहेत, पण माझा गांधींशी चाललेला झगडा मात्र अजून चालूच आहे.
मी एका दरिद्री कुटुंबात जन्मलो आहे. कष्टाने व चिकाटीने मी शिकलो. पुढे बडोदा सरकारच्या मदतीने विलायतेस जावून पदव्या संपादन केल्या. नंतर नोकरी धरली. दोन वर्षांनी नोकरी सोडून परत विलायतेस जावून बॅरिस्टर व डी.एस.सी. झालो व तेव्हापासून समाजकार्य व धंदा प्रामाणिकपणे करीत आलो आहे. मी बॅरिस्टरीस सुरुवात केली त्यावेळी हायकोर्टातील सर्व वकील ब्राह्मण व सर्व सॉलिसिटर्स गुजराती. त्यावेळीच गांधींकडे जाऊन काहीतरी माझेकरिता मला मागता आले असते व मानमरातब, केसेस व पैसाही मिळविता आला असता व गांधींना शरण जाऊन इतरांप्रमाणे माझा खाजगी वैयक्तिकवाद असता तर तो सुद्धा मी मिटविला असता. पण माझा व गांधींचा वाद न मिटता राहिलेला आहे. याचे कारण मला गांधींजवळ व्यक्तिशः काहीही मागावयाचे नाही. बुद्धीने, कर्तबगारीने व पुरुषार्थाने मी जीवन आक्रमित आहे. मी जे गांधींकडे मागित आहे ते तुमच्या वतीने जे न्याय्य तेच मागत आहे. माझा गांधींशी चाललेला हा झगडा आपल्या सर्व समाजाच्या वतीने असून तो सर्व समाजाच्या भवितव्यतेचा आहे.
अलीकडे सगळेजण स्वराज्य मागत आहेत. पण विचार करा की, ते कोणाचे स्वराज्य आहे? आम्ही स्पृश्यांना विचारतो की, तुमचे राज्य आमचेवरच का? आम्हालाही आमचे स्वराज्य व न्याय हक्क नकोत का? हिंदूचे स्वराज्य म्हणजे शुद्ध पेशवाई! पेशवाई तरी स्वराज्यच होते ना! मग त्यात आमचा कितीतरी छळ झाला. अस्पृश्य माणसाची थुकी रस्त्यावर पडून विटाळ होऊ नये म्हणून त्याच्या गळ्यात गाडगे बांधले व त्याची पाऊले उठलेल्या धुळीच्या स्पर्शाचा विटाळ होऊ नये, म्हणून पाठीशी खराटा लटकाविला व ओळखण्यासाठी गळ्यात काळा दोरा बांधला. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणूनच माझे भांडण आहे.
माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही. पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे. अधिकाराच्या व माऱ्याच्या जागी आमची माणसे हक्काने आली पाहिजेत. गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघासाठी मी भांडलो. स्पृश्यांनी निवडलेली माणसे आम्हाला प्रतिनिधी नकोत म्हणून मी आग्रह धरला. अखेर मी विजयी झालो व स्वतंत्र मतदारसंघ मिळविला. पण गांधींना पोटदुखी ऊठली. अस्पृश्यांना स्वाभिमानाचे हक्क जे मिळाले ते दुष्टपणाने हिरावून घेणेसाठी त्यांनी आमरण अन्न सत्याग्रह केला व आपले हक्क हिरावून घेतले. त्यामुळे आपल्याला फारच कमी हक्क मिळाले. आपल्या बुरुजाला जी भेग पाडली आहे तीत संघटनेचा चुना वगैरे घालून आपण ती भरून काढली पाहिजे. आपले सरकारी अधिकारी पाहिजेत, मंत्री पाहिजेत, मध्यवर्ती सरकारातही मंत्री पाहिजेत. असे असता ७प्रांतांत काँग्रेस मंत्रीमंडळे झाली पण गांधींचा दृष्टिकोन बदलला नाही किंवा त्यांचे हृदयात पालटही झाला नाही. परवा गांधींनी मद्रासचा दौरा काढला. तेथे अस्पृश्यांची व तुमची एवढी तेढ का असा एकाने प्रश्न केला. तेव्हा सरळ व स्पष्ट उत्तर न देता गांधींनी काहीतरी उडवाउडवीचे उत्तर दिले व इंग्रजांनी यांना अधिकाराची चट लाविली असे उद्गार काढले. मराठे, मुस्लीम, तसेच खिश्चन, अँग्लो इंडियनांना नोकऱ्या देतात. त्याबद्दल गांधींचे काही म्हणणे नाही फक्त अस्पृश्यांना दिल्या की त्यांच्या पोटात दुखते असा अनुभव आहे. हे इलेक्शन अति महत्त्वाचे आहे. इंग्रज आपली सत्ता काढून घेऊन लोकांना
सत्ता व घटना बनविण्याचे अधिकार देणार आहे. त्यासाठी एक घटनासमिती बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आपले आमदार तेथे जाऊन घटनेचा व्याप ठरविणार आहेत. आपल्याला नोकऱ्या, शिक्षण, प्रतिनिधित्व, सत्ता, स्वतंत्र अस्तित्व, बसाहती वगैरे मागण्या निर्भिडपणे मांडणारी माणसे पाहिजेत. स्पृश्यांचे ऑजळीने पाणी पिणारे लोक नको आहेत. जर काँग्रेस तिकीटावरची माणसे कोणाचीही भाडभीड न ठेवता आमच्या मागण्या मांडतील तर मी त्यांना पाठिंबाच देईल पण ती माणसे स्पृश्यांचे गुलाम आहेत अस्पृश्यांच्या हिताकडे न बघता स्वार्थाकडे बघणारी आहेत. त्याना आपण पाडले तर फारच चांगला परिणाम होईल. ज्याप्रमाणे धनी आपल्या कुत्र्याला कोठे दुसरीकडे जाऊ नये म्हणून पट्टा लावून बांधतो त्याप्रमाणे काँग्रेसचे तिकीट म्हणजे पितळेचा पट्टा आहे. काँग्रेसला जवळ उभे करु नका. काँग्रेसचा उमेदवार आपला शत्रू आहे. तो पराधीन आहे आपली माणसे पराधीन होता कामा नयेत. म्हणून तुम्ही दक्ष रहा
पराधीनतेने नुकसान कसे होते याचे एक प्रत्यक्ष घडलेले उदाहरण सांगतो फलटणच्या काही महारांना ४ चाहूर जमीन होती पण काही कारणानिमित्त तेथील राजा एका देऊळात दररोज ५०० ब्राह्मणांना पंचपक्वान्न जेवू घालीत होता. राजबाड्यातून दररोज गाड्या भरून अन्न येत असे व महार लोक तेथील उष्ट्या अन्नावर दररोज अवलंबून राहिल्यामुळे शेती करीत नव्हते. महारांच्या जमिनीवर जगल उगवून त्या जमिनी इतर मराठ्यांनी तशाच कब्जात घेतल्या पुढे ६०/७० वर्षानी राजा शहाणा झाला व त्याने ब्राह्मणांचे जेवण बंद केले. महाराचेही उष्टे बद झाले. पुढे एक म्हातारा आपली जमीन मिळवून द्या म्हणून माझेकडे कागदपत्रे घेऊन आला. पण १८७४ चे आधी जमिनी गेल्यामुळे काही करता आले नाही. अशाप्रकारे खरकट्यामुळे महारांच्या जमिनी गेल्या व परावलंबी जीवनामुळे हक्क गेले. तेव्हा तुम्ही सर्वांनी झोप सोडून डोळे उघडा व जागे रहा. वर्षे दोन वर्षांतच येथे मोठे परिवर्तन होणार आहे. इंग्रजसत्ता देईल ती सत्ता दुसऱ्याकडे न जाता आपणाकडेही पाहिजे. यासाठी चालू निवडणुका हा एक निर्णयाचा संग्राम आहे. कौरव पांडवांच्या संग्रामासारखा आहे.
आपले ब्राह्मणेतर भिडू आता काँग्रेसकडे झुकत आहेत. आता काँग्रेस व आपली फेडरेशन यामध्येच झगडा आहे. आपण एकजूट केली, निश्चय व निर्धार केला तर जय आपलाच ! मेलो तरी हरकत नाही पण सन्मानाने जगू असा निर्धार केल्याशिवाय कायम स्वरुपाचा सामुदायिक बदल घडवून आणता येणार नाही. वीस वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत व आताच्या परिस्थितीत जमीन अस्मानचे अंतर आहे. त्यावेळी शेकडा ९० लोक तात्या तुमच्या गोठ्यातच राहतो असे म्हणत असत. आज तसे म्हणणारा आपल्यातील एकही माणूस नाही. ही आनंदाची गोष्ट आहे. महाराला पूर्वी कायदेमंडळाच्या इमारतीत झाडूवाल्यांचेच काम होते. पण आज माझी १५ माणसे कायदेमंडळात सभासद आहेत व इतरांच्या मांडीला मांडी लावून मानसन्मानाने ती तेथे बसत आहेत. आज ना उद्या ती मंत्रीही होतील. म्हणून हे इलेक्शन फार महत्त्वाचे आहे. ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर निवडणुकीस उभे राहतात ते मानासाठी पण तुम्हा आम्हाला कायदेमंडळात जावयाचे ते ज्या जात्याखाली आपण भरडले जातो, त्या जात्याचा खुंटा आपले हाती आणण्यासाठीच! जोर जुलूम टाळणे हे आपले तेथे जाऊन करणेचे काम आहे. आपल्याजवळ पैसा नाही, आपण बलवान नाही, म्हणून आपल्याला राजकीय सामर्थ्य पाहिजे. आमच्या संमतीने राज्यकारभार चालला पाहिजे. तेव्हा ज्याला मत असेल त्याने त्या मताचा अमौलिक वस्तुसारखा उपयोग केला पाहिजे. मत म्हणजे ईश्वराने दिलेला संजीवनी मंत्र आहे. त्याचा योग्य उपयोग केला तरच आमचे संरक्षण होईल. स्वाभिमानी जीवनाचा तो एक तरणोपाय आहे, त्याची जोपासना करा. या दृष्टीनेच इलेक्शनचा विचार करा.
आपण कायदेमंडळातही अल्पसंख्याक आहोत. १७५ मध्ये आपण १५ आहोत. या संख्येवर कार्य करणे कठीणच! तेव्हा या १५ ची आता २०, २५ माणसे आपण निवडून आणली पाहिजेत. म्हणूनच आपण जनरलच्या जागाही लढवित आहोत. दक्षिण भागाला मे. इनामदार यांना उभे केले आहे. आपण सर्वांनी त्यांना चारही मते दिली तरच आपल्याला यश येईल. १०,००० जणांनी तरी त्यांना मते दिली पाहिजेत. १०,००० मते प्रत्येकाला ४ मते व ४ जागा आहेत. तरी सर्वांनी ही जबाबदारी ओळखली पाहिजे. आपल्या विरोधकांजवळ पैसा आहे. आपल्या विरोधकांनी काळ्या बाजारात मिळविलेला पैसा पापक्षालनार्थ ते काँग्रेसला निवडणुकीसाठी देत आहेत. पण पैशावर जर आपण राजकारण खेळू लागलो तर आपणाला राजकारण सोडावे लागेल व राजकारणाचा खेळखंडोबाच होईल. आपले अस्पृश्य लोक काँग्रेसच्या मागे नाहीत. इतर लोक पैशास भुलून काँग्रेसच्या मागे लागतात. कारण काँग्रेसला जर लोक मानतात तर मग काँग्रेसचे इलेक्शन कवडीही खर्च न होता झाले पाहिजे. १९३७ साली माझ्या विरोधकाने निवडणुकीमध्ये ३५,००० रु. खर्च केले. माझा खर्च फक्त जरुरी पुरता अवघा ९०० रुपये इतकाच होऊन जवळजवळ माझा पहिला नंबर आला. याबद्दल मला धन्यता वाटते. म्हणून राजकारण कोणाला कळत असेल तर ते अस्पृश्यांना असे म्हणावे लागते. बाकीचे राजकारण स्वतः करिता करतात. समाजाचे किंवा देशाचे हित त्यांचेपुढे नसते !
मी गेली २० वर्षे सतत राजकारण करीत आहे व खोलवर त्याचा अभ्यासही करीत आहे. माझे राजकारण कधीच फसलेले नाही. मी राजकारणाच्या पाण्यात पूर्ण डुंबलो आहे. म्हणून माझे राजकारण खरे, प्रामाणिक व स्वभावजन्य आहे. इतर लोक पाण्याच्या कडेला उभे राहून नुसत्या उड्या मारून मजा पाहतात. त्यांना अनुभव नाही. आपले तसे नाही. तरी आपण सर्वांनी जागरूक राहून विरोधकांच्या कसल्याही भूलथापांना, धाकदपटशांना भीक न घालता समाजाच्या उद्धाराचे पवित्र कर्तव्य आपली चारही मते आपल्याच उमेदवारास देऊन बजावावे. मला सांगावयाचे ते सांगून मी माझे कर्तव्य केले आहे. तुम्ही सर्वजण तुमचे कर्तव्य पार पाडाल अशी मला आशा आहे.
(सन १९४२ मध्ये ‘अस्पृश्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी अस्पृश्यांचा स्वतंत्र पक्ष असला पाहिजे’ या उद्देशाने ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ नावाच्या दुसऱ्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली; पण या पक्षाला ‘सवर्ण मतदारांची मतं मिळणे मुश्किल झाल्याने’ ह्या पक्षाचा दारुण पराभव झाला. तेव्हा समविचारी लोकांनी एकत्र येऊन जातिजमातींच्या पलीकडे जाऊन शोषितांचं राजकारण करण्यासाठी एक नवा पक्ष स्थापन करण्याची बाबासाहेबांना गरज वाटू लागली. या उद्देशानेच बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन व रिपब्लिकन पक्ष या दलित राजकारणाच्या तीन पायऱ्या आहेत.)
माहिती संकलन : सोमीनाथ घोरपडे, संस्कार सचिव भारतीय बौध्द महासभा, सातारा जिल्हा (पूर्व)