Monday, August 31, 2026
Homeसातारासाताऱ्यात व्हॅलेंटाईन डेला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस...

साताऱ्यात व्हॅलेंटाईन डेला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस…

साताऱ्यात व्हॅलेंटाईन डेला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस…

[ad_1]

Satara Crime News सातारा: शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’ ला घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकानेच ‘प्रपोज’ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. (Satara Crime News)

नेमकं काय घडलं? (Satara Crime News)

14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले. “मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडल्याचा आरोप आहे.

शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल- (Satara Crime News)

घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने मैत्रिणी व कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील अंबरनाथमधीलही धक्कादायक घटना- (Thane Ambernath Crime News)

अंबरनाथमध्ये आठवडाभरापूर्वी महालक्ष्मी नगर येथील एका खासगी रुग्णालयात सहा वर्षीय मुलावर चुकीचे उपचार झाल्याने त्याचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. महिला डॉक्टरवर सध्या उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. संबंधित डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी याबाबत तक्रारी करत असून तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ त्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे संबंधित महिला डॉक्टरने सांगितले आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

धक्कादायक! नांदेडमध्ये 16 वर्षीय मुलाचा खून, पूर्व वैमानस्यतून घटना घडल्याचा पोलिसांचा संशय

आणखी वाचा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments