छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अजिंक्यताऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या मशाल महोत्सवाला मंत्री शिवेंद्रराजे भोसले, साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अजिंक्यताऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या मशाल महोत्सवाला मंत्री शिवेंद्रराजे भोसले, साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते उपस्थित होते.

इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हणजेच शारीरिक संबंधादरम्यान पुरुषांमध्ये लिंगाची ताठरता ने येणे. अनेक पुरुषांसाठी ही एक लाजिरवाणी किंवा वैयक्तिक समस्या मानली जाते. मात्र तज्ज्ञांच्या मते ही समस्या केवळ लैंगिक आरोग्यापुरती मर्यादित नसून ती हृदयविकाराचा सुरुवातीचा इशारा देखील असू शकते. याबाबत डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डियाक सर्जन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हृदय आणि लैंगिक अवयवांपर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य एकमेकांशी संबंधित असते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे, कोलेस्ट्रॅाल वाढणे किंवा रक्तप्रवाह कमी होणे यामुळे आधी इरेक्टाइल डिसफंक्शन दिसून येते आणि पुढे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. बदलती जीवनशैली, ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा हे इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि हृदयविकार दोन्हींसाठी प्रमुख कारणीभूत घटक मानले जातात. अनेकदा पुरुष छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होण्याआधीच लैंगिक समस्या अनुभवतात मात्र ते याकडे दुर्लक्ष करतात.
वैद्यकीय अभ्यासानुसार, इरेक्टाइल डिसफंक्शनची लक्षणे दिसल्यानंतर पुढील 3 ते 5 वर्षांत हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन ही एक धोक्याची घंटा मानली जाते. लैंगिक उत्तेजना आणि हृदयाचे ठोके यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे. लैंगिक उत्तेजना होत असताना लिंगाकडे रक्ताचा प्रवाह वाढतो आणि यासाठी हृदयाची कार्यक्षमता आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे असते. लिंगाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आणि हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या या एकाच रक्ताभिसरण व्यवस्थेचा भाग आहेत.
म्हणूनच जर हृदयात काही बिघाड असेल, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असतील किंवा रक्तप्रवाह कमी होत असेल, तर त्याचा परिणाम सर्वप्रथम लैंगिक क्षमतेवर दिसून येतो. अनेक वेळा हृदयविकाराची लक्षणे दिसण्याआधीच लैंगिक समस्या जाणवू लागतात. यामुळेच या विषयाची योग्य आणि वेळेवर माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या यावर विविध वैद्यकीय संशोधन सुरू असल्याने, लैंगिक आरोग्य आणि हृदयाचे आरोग्य यांचा संबंध अधिक स्पष्ट होत आहे. या संशोधनामुळे जनजागृती वाढत असून, पुरुषांनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असा संदेश दिला जात आहे.
तज्ज्ञांनी असा सल्ला दिला आहे की, लैंगिक समस्या जाणवत असल्यास त्याबाबत लाज न बाळगता आणि दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. वेळीच तपासणी केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राखता येते आणि भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणाव नियंत्रण, धूम्रपान टाळणे आणि नियमित आरोग्य तपासणी या सवयी केवळ लैंगिक आरोग्यच नव्हे तर हृदय निरोगी ठेवण्यासाठीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

फलटण प्रतिनिधी –रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचा वाढदिवस असून, कोणत्याही प्रकारे वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी सहकारी कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांना केले आहे. तसेच कौटुंबिक कारणास्तव त्या दिवशी ते बाहेरगावी असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम, शुभेच्छा फलक, बॅनर, पोस्टर किंवा सत्कार समारंभ आयोजित करू नयेत, अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली असून, या दुःखद प्रसंगी सर्वांनी दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा आदर्श जपावा, असेही नाईक निंबाळकर यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

फलटण प्रतिनिधी : फलटण शहर व परिसरात शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन सराईत इसमांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश सातारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळी प्रमुख अनिकेत सुभाष बनसोडे (वय २२, रा. मलठण, फलटण) आणि त्याचा साथीदार अर्जुन राजू जाधव (वय १९, रा. मलठण, फलटण) यांचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध दुखापत करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, चोरी यांसारखे गंभीर दखलपात्र गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अरविंद काळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार संबंधित आरोपींना संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्णा खांबे यांनी केली. त्यानंतर हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या समोर सुनावणी होऊन अंतिम आदेश पारित करण्यात आला.
सदर आरोपींवर यापूर्वी अटक व प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही त्यांनी गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली होती. अवैध मार्गाने दहशत निर्माण करणे, मारहाण, चोरी, अग्निशस्त्र बाळगणे आदी प्रकारांमुळे फलटण परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे या टोळीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत होती.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे तसेच महिला पोलिस कर्मचारी अनुराधा सणस यांच्या पथकाने आवश्यक पुरावे सादर केले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का व एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
सातारा : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल 9 जानेवारीला जाहीर झाला आहे. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल त्रिशंकू लागल्यानं सत्ता कोण स्थापन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यास ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेंसदर्भात रोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतील नंदनवन बंगल्यावर मंत्री मकरंद पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे.
साताऱ्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून या निमित्तानं मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक जिल्हा परिषद सदस्य यांना साताऱ्यातून बाहेर हलवण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आऊट ऑफ कव्हरेज आहेत तर काहींचे स्विच ऑफ लागत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळं साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार अशी खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. सत्ता स्थापनेत आकड्यांचा खेळ, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दाराआडच्या बैठका आणि जिल्हा परिषद सदस्य आऊट ऑफ कव्हरेज असल्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षाने राज्याचे लक्ष साताऱ्याकडे वेधलं आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर भाजपचं स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्याचं स्पष्ट झालंय. मात्र, भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होणार अशा आशयाचं वक्तव्य केल्यानं साताऱ्याच्या राजकारणातील रंगत वाढली आहे.
सातारा जिल्हा परिषद संख्याबळ : एकूण जागा 65
भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस :20
शिवसेना : 16
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
काँग्रेस : 01
अपक्ष : 01
आणखी वाचा

फलटण प्रतिनिधी : फलटण शहरात अतिक्रमणाविरोधी मोहीम जोरात सुरू करण्यात आली असून मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी थेट अॅक्शन मोडमध्ये येत सुपर मार्केट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई केली. शहरातील गजबजलेल्या व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या भागात असलेल्या बेकायदेशीर फेरीवाले, अनधिकृत दुकाने, हातगाड्या तसेच रस्ते, फुटपाथ व पथदिव्यांना अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटवण्यात आली.
सुपर मार्केट परिसरात वाढत्या गर्दीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. नागरिकांना पायी चालताना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी नगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभाग, नगररचना विभाग आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली.
हातगाड्या व तात्पुरती दुकाने हटवली
कारवाईदरम्यान अनेक हातगाड्या, तात्पुरती दुकाने व जाहिरात फलक काढून टाकण्यात आले. काही व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून भविष्यात अतिक्रमण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले, “शहर स्वच्छ, सुस्थितीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.” नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
️ नागरिकांची शहरभर मोहीम राबवण्याची मागणी
सुपर मार्केट परिसरातील कारवाईनंतर शहरातील नागरिकांनी संपूर्ण फलटणमध्ये विशेष अतिक्रमण मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, फुटपाथ, सार्वजनिक जागा आणि चौकांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे असल्याने वाहतूक, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काही नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत करत नियमितपणे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. तर काही व्यापाऱ्यांनी अचानक झालेल्या कारवाईमुळे नुकसान झाल्याचे सांगत पुनर्वसन व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
❓ मोहीम सुरूच राहणार का?
नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम टप्प्याटप्याने सुरू ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे ही मोहीम सातत्याने राबवली जाणार की काही दिवसांत थांबणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Gold Silver Price Fall On 17 Feb Night: सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्यानंतर मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चांदीच्या किंमतीमध्ये घट होऊन चांदी 2.26 लाख रुपये किलोपर्यंत पोहचली असून सोन्या दरांमध्येही विक्रमी घसरण नोंदवण्यात आली आहे. दरांमध्ये झालेले हे बदल मल्टी कमोडिटी मार्केट म्हणजेट एमसीएक्सवर पाहायला मिळत आहे.
मंगळवारी रात्री एमसीएक्सवर 5 मार्चच्या वायद्यासाठी चांदीची किंमत 5.58 टक्क्यांनी घसरली. म्हणजेच प्रती किलो 13 हजार 378 रुपयांनी घरसण होऊन चांदी 2 लाख 26 हजार 513 रुपयांवर आली. त्याचप्रमाणे 2 एप्रिलच्या वायद्यासाठी सोन्याच्या किंमतीतही घसरण दिसून येत आहे. 10 ग्राम सोन्याची किंमत बाजारपेठेत 3 हजार 796 रुपयांनी म्हणजेच 2.45 टक्क्यांनी घसरली. सोनं 1 लाख 50 हजार 964 रुपये प्रती तोळ्यावर पोहोचलं आहे. मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये झालेली ही सर्वात मोठी पडझड ठरली आहे.
29 जानेवारी रोजी सोनं आणि चांदीच्या दरांनी विक्रमी स्तर गाठला होता. चांदीने 4 लाख 20 हजार रुपये प्रती किलोपर्यंत उडी घेतली होती. मात्र आता या दरांमध्ये तब्बल 1.93 लाख रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याचे सर्वोच्च दर 1 लाख 93 हजारांवर पोहचले होते. हे दर आज 43 हजारांहून अधिकने स्वस्त झाल्याचं दिसत आहे.
17 फेब्रुवारी रोजी अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची स्पॉट प्राइज प्रती औंस 4920 ते 4950 अमेरिकी डॉलर्सदरम्यान होती. तर चांदीचा दर प्रती औंस 74 ते 75 अमेरिकी डॉलर्स इतका होता. मंगळवारी झालेल्या पडझडीमुळे सोनं आणि चांदीचे दर या आठवड्याभरातील सर्वात खालच्या स्तराला पोहोचले आहेत. डॉलर अधिक मजबूत झाल्याने ही पडझड झाल्याचं सांगितलं जात आहे.
शेअर बाजाराच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये अचानक पडझड झाल्याने बुधवारी शेअर बाजारामध्ये सोनं-चांदी ईटीएफच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. मंगळवारीही सोनं-चांदीच्या ईटीएफमध्ये घसरण दिसून आली. मंगळवारी सोनं-चांदीच्या ईटीएफचे दर 3 टक्क्यांनी पडले. विक्रमी दरांवरुन पडलेल्या दरांचा विचार केला तर चांदीच्या ईटीएफमध्ये 40 टक्क्यांची पडझड झाली आहे. तर सोन्याच्या ईटीएफमधील घसरण ही 18 टक्क्यांची आहे.
(टीप – सोनं, चांदीमध्ये गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागारांची मदत घ्या. येथील माहिती समान्य आकडेवारीवर अवलंबून असून ‘झी 24 तास’ कोणत्याही प्रकारे कोणालाही प्रोमोट करत नाही.)

फलटण :- फलटण शहराच्या राजकारणात वरवर शांतता दिसत असली, तरी आतल्या गोटात सत्तेच्या हालचालींना वेग आला आहे. फलटण नगरपरिषदेतील सात विषय समित्या आणि सर्वाधिक प्रभावी मानली जाणारी स्थायी समिती यांच्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय नसून सत्तेच्या वाटपाची खरी परीक्षा ठरणार आहे.
२६ फेब्रुवारीची विशेष सभा: ‘खाती कोणाची?’ याचा फैसला
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारी विशेष सभा नगरसेवकांसाठी राजकीय प्रयोगशाळा ठरणार आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असली, तरी सूत्रे मात्र राजकीय समीकरणांच्या हातीच आहेत. सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काढलेली नोटीस ही अधिकृत चौकट असली, तरी पडद्यामागे लॉबिंग, गुप्त भेटीगाठी आणि सूचक सौदेबाजी सुरू असल्याची चर्चा आहे.
समित्या म्हणजे निधी आणि प्रभावाची केंद्रे
सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, नियोजन व विकास, आरोग्य अशा समित्या केवळ नावापुरत्या नसतात; त्या निधी, प्रभाव आणि निर्णयक्षमतेची प्रमुख केंद्रे असतात. त्यामुळे कोणत्या नगरसेवकाकडे कोणती समिती जाते, यावर पुढील वर्षभरातील राजकीय दिशा ठरणार आहे. कागदोपत्री विषय समित्या आणि स्थायी समिती वेगळ्या असल्या, तरी प्रत्यक्षात स्थायी समिती ही नगरपरिषदेचा कणा मानली जाते.
पदसिद्ध सभापतींचा समीकरणांवर प्रभाव
नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतात, तर उपनगराध्यक्ष शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे काही सत्ताकेंद्रे निवडणुकीबाहेरच निश्चित होतात. महिला व बालकल्याण समितीवर महिलांनाच नेतृत्व देण्याची अट स्वागतार्ह असली, तरी तिचाही राजकीय उपयोग कसा केला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
युतीतील अंतर्गत कुरघोडी?
सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादी युती बाहेरून स्थिर दिसत असली, तरी अंतर्गत नाराजी दाटून आल्याची चर्चा आहे. उपनगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा केला असताना भाजपच्या सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची निवड झाली. हा निर्णय केवळ एका पदापुरता मर्यादित न राहता युतीतील वजनकाट्याचे प्रतीक ठरला. राष्ट्रवादीचे दावेदार राहुल निंबाळकर यांची नाराजी ही वैयक्तिक न मानता पक्षीय अस्वस्थतेचे द्योतक मानली जात आहे.
समतोल राखला तर स्थैर्य, अन्यथा संघर्ष
आता खरा प्रश्न समित्यांचे वाटप कोणाला मिळते यापेक्षा, ते समन्यायी पद्धतीने होते का याचा आहे. जर सत्ताधाऱ्यांनी समतोल साधला, तर युती स्थिर राहील. अन्यथा ‘भागीदार असूनही दुय्यम वागणूक’ अशी भावना उफाळल्यास निर्णयप्रक्रिया विकासाऐवजी संघर्षकेंद्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२६ फेब्रुवारीची सभा ही औपचारिक कार्यक्रम नसेल; ती सत्तेच्या शह-काटशहाची मैफल ठरेल. फलटणकरांनी या प्रक्रियेकडे केवळ राजकीय तमाशा म्हणून नव्हे, तर शहराच्या विकासाचा कस लावणारा क्षण म्हणून पाहणे गरजेचे आहे. कारण समित्या आणि चेहरे बदलले, तरी शहराच्या प्रश्नांची जबाबदारी कायमच राहणार आहे.

फलटण (प्रतिनिधी) – फलटण येथील न्यायालयाच्या आवारात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख बसविण्यात यावा, अशी मागणी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री. नितीन आर. बोरकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनावर हरिश हणमंत काकडे, आदर्श विरसिंह अहिवळे, शशीकांत अहिवळे, संघराज अहिवळे, अनिकेत अहिवळे, सुजल गायकवाड, संघकारा अहिवळे, सहिल अहिवळे, राज घोडके, संघर्ष अहिवळे, संविधान काकडे, निसर्ग सावंत, प्रणव काकडे, अमर अहिवळे, प्रेम अहिवळे आणि स्वप्नील काकडे यांच्या सह्या आहेत.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संविधान हे देशाच्या शासन व्यवस्थेचे मूलभूत तत्त्वज्ञान व मार्गदर्शक तत्वे निश्चित करणारे सर्वोच्च दस्तऐवज आहे. संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचा समावेश असून, हीच भारतीय लोकशाहीची खरी ओळख आहे.
न्यायालय हे न्यायदानाचे पवित्र स्थान असून येथे दररोज सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, वकील आणि विविध स्तरांतील लोक येत असतात. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख उभारल्यास नागरिकांना संविधानातील मूल्यांची जाणीव होईल व लोकशाही तत्त्वांबद्दल जागरूकता वाढेल, असे मंडळाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
संविधान उद्देशिका ही देशाच्या एकात्मतेचे आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे. न्यायालयाच्या परिसरात तिचा शिलालेख उभारणे म्हणजे न्यायव्यवस्थेप्रती आदर व्यक्त करण्याबरोबरच नागरिकांमध्ये संवैधानिक कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
मागणीवर सकारात्मक विचार करून न्यायालय प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

फलटण : कमला निंबकर बालभवन च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या बोर्ड परीक्षेचे मार्गदर्शन सत्र नुकतेच उत्साहात पार पडले. इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ व अनुभवी शिक्षक श्री. चंद्रकांत सस्ते यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
सध्या ते साखरवाडी हायस्कुल साखरवाडी येथे कार्यरत असून यापूर्वी त्यांनी कमला निंबकर बालभवनमध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी ते कमला निंबकर बालभवनमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात.
या मार्गदर्शन सत्रात त्यांनी इयत्ता दहावीच्या इंग्रजी बोर्ड पेपरची रचना, प्रश्नपत्रिकेचा आराखडा, गुणांचे विभाजन, तसेच प्रत्येक घटकाची तयारी कशी करावी याबाबत सविस्तर विवेचन केले. वाचन कौशल्य (Reading Skills) अंतर्गत उताऱ्यांवरील प्रश्न सोडवताना योग्य पद्धत, की-वर्ड ओळखण्याची सवय आणि वेळेचे नियोजन यावर त्यांनी भर दिला. लेखन कौशल्य (Writing Skills) विभागात पत्रलेखन, अहवाल लेखन, संवाद लेखन, ई-मेल लेखन यांसारख्या प्रश्नप्रकारांमध्ये अपेक्षित मांडणी, योग्य शब्दसंपदा आणि व्याकरणातील अचूकता याचे बारकावे स्पष्ट केले.
व्याकरण (Grammar) भागातील काळ (Tenses), Active-Passive Voice, Direct-Indirect Speech, तसेच वाक्यरचना यावर त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. साहित्य (Literature) विभागात पाठ्यपुस्तकातील धडे व कविता यांवरील अपेक्षित प्रश्न, उत्तरांची मांडणी, मुद्देसूद लेखन आणि आवश्यक तेथे संदर्भासहित स्पष्टीकरण कसे द्यावे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्तरपत्रिका स्वच्छ, सुबक आणि वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व त्यांनी विशेष अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी यावेळी इंग्रजी विषयातील अडचणी, लेखनातील चुका, व्याकरणातील संभ्रम यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. श्री. चंद्रकांत सस्ते यांनी प्रत्येक प्रश्नाला संयमपूर्वक व मार्गदर्शक स्वरूपात उत्तरे देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे दरवर्षी विद्यार्थी इंग्रजी विषयात उल्लेखनीय यश संपादन करत असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमावेळी कमला निंबकर बालभवनच्या माध्यमिक विभागाचे माजी मुख्याध्यापक तथा विद्यमान शिक्षक तथा मानद सल्लागार विश्वास जगदाळे सर यांनी श्री.चंद्रकांत सस्ते यांचे प्रगत शिक्षण संस्थेला 40 वर्षे झाल्याच्या प्रत्यार्थ तयार करण्यात आलेले ‘मातीत रुजलेलं आभाळ गोष्ट प्रगत शिक्षण संस्थेची हे पुस्तक व कप देऊन स्वागत केले व त्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले सर यांनी सरांचा अल्पसा परिचय करून देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी कमला निंबकर बालभवन च्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गीता बोबडे उपस्थित होत्या.
सदर मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीला निश्चितच बळ मिळाले असून इंग्रजी विषयातील भीती दूर होऊन आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.