Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 459

महापुरुषांचे विचार सर्वांसाठी: आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा आगळा उपक्रम

0
महापुरुषांचे विचार सर्वांसाठी: आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा आगळा उपक्रम

महापुरुषांना चौकटीबाहेर नेण्याचा संकल्प, ग्रंथवाटपाने समाजप्रबोधन

फलटण : महापुरुषांचे विचार केवळ विशिष्ट जात, धर्म किंवा चौकटीत मर्यादित राहू नयेत, तर ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2025 ने अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. 1 एप्रिलपासून दररोज एका महापुरुषाला अभिवादन करून त्यांच्या विचारांची पुस्तके वाटप करण्याचा संकल्प या समितीने केला आहे.

आज या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. तसेच विविध महापुरुषांच्या विचारांची पुस्तके शिवप्रतिष्ठान फलटण आणि मोती चौक तालीम शिवजयंती महोत्सव फलटण या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आली.

या वेळी जयंती महोत्सव समितीचे गणेश अहिवळे, अजय काकडे, गोविंद काकडे, सुरज काकडे, सिद्धार्थ अहिवळे, भूषण बनसोडे, चंद्रकांत मोहिते, मंगेश सावंत, कपिल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजप्रबोधनासाठी ग्रंथवाटपाचा हा उपक्रम फलटणमध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Viral Video: ‘बेबी तू आला नाहीस, तू बोलला होतास’, शहीद पायलटच्या अंत्ययात्रेत धायमोकळून रडली प्रेयसी

0
Viral Video: ‘बेबी तू आला नाहीस, तू बोलला होतास’, शहीद पायलटच्या अंत्ययात्रेत धायमोकळून रडली प्रेयसी


Viral Video Pilot Siddharth Yadav: हरियाणाच्या रेवाडी येथील शहीद फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांना आज सन्मानापूर्वक अंतिम निरोप देण्यात आला. त्यांच्या मूळ गावी भालखी माजरा येथे वडील सुशील यादव यांनी त्यांच्या 28 वर्षीय मुलाच्या चितेला अग्नी दिला. यावेळी, हवाई दलाच्या तुकडीने त्यांना श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान, सिद्धार्थ यादवची होणारी बायको सानिया धायमोकळून रडत होती.

साखरपुड्याच्या 10 दिवसांनी शहीद

सिद्धार्थचा 10 दिवसांपूर्वी सानियाशी साखरपुडा झाला होता. सिद्धार्थला अंतिम निरोप देण्यासाठी सानियाही पोहोचली होती. सिद्धार्थचं पार्थिव पाहिल्यानंतर तिला अश्रू अनावर होत होते. फोटोकडे पाहून ती म्हणाली, “बेबी, तू मला घ्यायला आला नाहीस. तू येशील असं म्हणाला होतास.” सिद्धार्थ आणि सानियाचं 2 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं. दोघांच्या घरी त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. मृतदेहाकडे पाहत सानिया पुन्हा पुन्हा म्हणत होती, “कृपया मला एकदा त्याचा चेहरा दाखवा.” दरम्यान सिद्धार्थच्या हौतात्म्याचा अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मला माझ्या मुलाचा गर्व आहे, आईने मांडल्या भावना

शहीद जवानाची आई सुशीला यादव आणि बहीण खुशी या या क्षणी खूप दुःखात बुडाल्या होत्या. मुलाला अंतिम निरोप देताना आई भावूक झाली आणि म्हणाल्या, “मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मी देशातील प्रत्येक आईला सांगू इच्छिते की त्यांनी त्यांच्या मुलांना देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात पाठवावे. तो कधीही घाबरला नाही, परंतु अभिमानाने देशासाठी आपले जीवन अर्पण केले. आमचे संपूर्ण कुटुंब सैन्यात आहे आणि हे माहित असूनही मी त्याला सैन्यात पाठवले. मला त्याच्या हौतात्म्याचा अभिमान आहे,” अशी भावना त्यांनी मांडली. “तो व्यक्ती म्हणून कसा होता, हे मी शब्दात वर्णन करू शकत नाही,” असंही त्यांनी म्हटलं.

लोकांना वाचवण्यासाठी दिला जीव

सुशील यादव यांनी अभिमानाने सांगितलं की, त्यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी सैन्यात सेवा केली आहे. त्या म्हणाल्या, “मला सांगण्यात आलं की सिद्धार्थ शेवटच्या क्षणी पॅराशूटने उडी मारू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही कारण खाली सामान्य लोक होते. स्वतःच्या जीवाची चिंता न करता, त्याने लोकांचे जीव वाचवण्याचा निर्णय घेतला.”





Source link

नागपुरात ५६ वारसदार महापालिकेत नोकरीस पात्र

0
नागपुरात ५६ वारसदार महापालिकेत नोकरीस पात्र


नागपूर : नागपूर महापालिकेमध्ये ५६ सफाई कामगारांच्या वारसदारांना लाड व पागे समितीच्या शिफारशी नुसार नोकरीस पात्र ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती संदर्भात वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या परिपत्रकाच्या अनुषंगाने तसेच लाड व पागे समितीने सफाई कामगारांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने नागपूर महापालिकेमध्ये कार्यरत सफाई कामगारांच्या वारसदारांना लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्याबाबत महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

गुरुवार या समितीची बैठक पार पडली. अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त विजया बनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, विधी अधिकारी प्रकाश बरडे, सहायक आयुक्त श्याम कापसे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. बैठकीमध्ये झालेल्या चर्चे उपरांत गठित समितीने एक मताने एकूण ५६ वारसदारांना नियुक्तीकरिता पात्र ठरविले आहे.

पात्र ठरिवण्यात आलेल्या वारसदारांच्या नावावर नियुक्ती देण्यापुर्वी आक्षेप व हरकती मागविण्याकरिता मनपा मुख्यालय व दहाही झोन कार्यालयांमध्ये ५६ वारसदारांच्या नावाची यादी प्रकाशित करण्यात यावी. प्रकाशित करण्यात आलेल्या वारसदारांच्या नावावर जे काही आक्षेप व हरकती प्राप्त होतील त्यांच्या निराकरण करुन अंतिम यादी पोलिस मुख्यालय, विशेष शाखा, नागपूर शहर यांना पाठवून संपूर्ण ५६ वारसदारांची चारित्र्य पडताळणी प्राप्त करुन घ्यावी, असे निर्देश यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.





Source link

सावित्रीबाईंच्या लहानपणीची भूमिका साकारणारी राधा धारणे म्हणते, “माझ्यासाठी ही खूप मोठी संधी”

0
सावित्रीबाईंच्या लहानपणीची भूमिका साकारणारी राधा धारणे म्हणते, “माझ्यासाठी ही खूप मोठी संधी”



Child Artist Radha Dharane Told Her Experience About Phule Movie What She Said? |सावित्रीबाईंच्या लहानपणीची भूमिका साकारणाऱ्या राधा धरणे म्हणते, “माझ्यासाठी ही खूप मोठी संधी”





Source link

Ahmednagar Merchant Bank posts profit of Rs 7 crores अहमदनगर मर्चंट बँकेला ७ कोटींचा नफा

0
Ahmednagar Merchant Bank posts profit of Rs 7 crores अहमदनगर मर्चंट बँकेला ७ कोटींचा नफा


अहिल्यानगर : अहमदनगर मर्चंट सहकारी बँकेला यंदा ७ कोटी ३ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. नफ्यातून सभासदांना १५ टक्के लाभांश व सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचे बक्षीस बँकेकडून दिले जाणार आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी ही माहिती दिली. बँकेचे व्यवहार अधिक सुलभ पद्धतीने करता यावे त्यासाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना ५१०० रुपयांची ठेव पावती देण्यासाठी सहकार विभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे. सहकार विभागाने सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यास सांगितली आहे. येत्या सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, बँकेला गत वर्षात ३९ कोटी १५ लाखांचा नफा झाला. करोनानंतर तीन वर्षांनी शून्य एनपीए झाला आहे. सर्व तरतुदी वगळून ७ कोटी ३ लाखांचा नफा झाला आहे. १३७ कोटींची वसुली अद्याप बाकी असली तरी नफ्यातून एनपीएची तरतूद केल्याने एनपीए शून्य टक्के झाला आहे. त्यामुळे बँकेला शेड्युल बँकेचा दर्जा मिळेल व बँकिंग सुविधा आणखीन वाढवता येतील.

यंदा नियमित कर्जफेड करणाऱ्या ७० टक्के कर्जदारांना २६ कोटी ८७ लाखांची व्याज सवलत (रिबेट) देण्यात आली आहे. बँकेच्या ठेवीत ८१ कोटींची वाढ होऊन १४६२ कोटी १६ लाखांच्या ठेवी झाल्या आहेत. एकूण कर्ज ९६८ कोटी ३९ लाख वितरित करण्यात आले. इतर कोणत्याही नागरी सहकारी बँकेपेक्षा मर्चंट बँकेचे कर्ज व्याजदर कमी असल्याचा दावाही हस्तीमल मुनोत त्यांनी केला.बँकेच्या एकूण १८ शाखा आहेत, सर्व शाखा नफ्यात आहेत. एकूण १९६ कर्मचाऱ्यांना ११ हजाराचे बक्षीस मिळणार आहे.

हेही वाचा

यावेळी संचालक अनिल पोखरणा, आनंदराम मुनोत, संजय चोपडा, मोहनलाल बरमेचा, किशोर गांधी, संजय बोरा, संजीव गांधी, कमलेश भंडारी, किशोर मुनोत, सुभाष बायड, मीना मुनोत, प्रमिला बोरा, विजय कोथिंबिरे, सुभाष भांड, जितेंद्र बोरा, प्रसाद गांधी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

कार्पोरेट बँकिंगकडे वाटचाल

बँकेचा एनपीए शून्य झाल्यामुळे आणखीन चार ते पाच शाखा सुरू केल्या जाणार आहेत. त्यासाठी सर्वे सुरू आहे. बँकेने सन २०१९ मध्ये डिजिटल सेवेत प्रवेश केला. आता कार्पोरेट बँकेकडे वाटचाल सुरू आहे. त्यादृष्टीने आणखी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यामध्ये मोबाइल मल्टिपल यूजर सुविधा, पेमेंट गेटवे प्रकल्प, स्विपिंग इन व स्विपिंग आऊट डिपॉझिट सुविधांचा समावेश असल्याची माहिती उपाध्यक्ष अजय मुथा यांनी दिली.





Source link

“प्रियदर्शी सम्राट अशोक” आणि त्यांचे इतर देशांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध…!

0
“प्रियदर्शी सम्राट अशोक” आणि त्यांचे इतर देशांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध…!

“प्रियदर्शी सम्राट अशोक” आणि त्यांचे इतर देशांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध…!

चक्रवर्ती सम्राट अशोक हे किती दूरदृष्टीचे होते हे आपल्या त्यांनी तयार करून घेतलेल्या शिलालेख वरून दिसुन येते, त्यांनी आपले शिलालेख इतर कोणताही माध्यम न वापरता दगड हे माध्यम वापरुन चिरकाल टिकेल असं माध्यम निवडून ते लेख कोरून घेतले.
सम्राट अशोक आपल्या प्रजेच्या हितासाठी नेहेमी तत्पर असतं , त्यांचे त्यांच्या प्रजेशी व इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध होते असे “शहाबाजगडीच्या” त्यांच्या शिलालेखातून स्पष्ट होते.

राज्य अभिषेकच्या आठव्या वर्षी हा शिलालेख कोरण्यात आला होता.

शिलालेखातील महत्त्वपूर्ण गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे जे देश होते ज्यांचे सम्राटांचे मैत्रीपूर्ण संबंध त्यांची नावे आजच्या पेक्षा त्यावेळी म्हणजे सम्राट अशोक यांच्या काळात वेगळी होती, ती पुढील प्रमाणे असे आहेत.

१) अंतीयोक हा “सिरिया” देशाचा राजा होता.

२) तुरमय हा “इजिप्तचा” राजा “टाॅलोमी फिलाडेल्फस” हा होता.
(राज्य काल ख्रि. पू. २८५ ते २४७ हा होता )

३)किनि किंवा अन्तिकिनी हा “मॅसिडोनियाचा” राजा होता ( राज्य काल ख्रि पू २७८ ते २३९ )

४) आंटिगोनस ( “गोनाटस” या नावाचे अपभ्रंश ) मक म्हणजे “सायरीनचा” राजा होता. ( टाॅलेमी फिलाडेल्फसचा सावत्र भाऊ) राज्य काल ख्रि पू ३०० ते २५०

५) अलेक्झांडर हा “काॅरिंथ” येथील राजा होता ( राज्य काल ख्रि पू २५२ ते २४४ )

६) “ताम्रपर्णी” म्हणजे आजचा “श्रीलंका” , होय सम्राट अशोक यांच्या काळात “श्रीलंकेला” “ताम्रपर्णी” असेच नाव होते.
“ताम्रपर्णीचे” पुढे “सिंहलदीप” झाले व नंतर “श्रीलंका” म्हणूनच ओळखू लागले.
आजही श्रीलंकेतील भाषा जी बोलली जाते तीचे नाव “सिंहलीच” आहे .
अशा अनेक महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला सम्राट अशोक यांच्या बाबतीत समजण्यास मदत मिळते.
सम्राट अशोक यांच्या बद्दल समाजात खूप गैरसमज पसरलेले आहेत ते खोडून काढण्याच्या दृष्टीकोनातून माझा हा अल्पसा प्रयत्न आहे.

सूरज रतन जगताप (लेणी अभ्यासक )

साधी महिला कॉन्स्टेबल, 2 कोटींचं घर, iPhone अन् एक लाखाचं घड्याळ; Insta Queen ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
साधी महिला कॉन्स्टेबल, 2 कोटींचं घर, iPhone अन् एक लाखाचं घड्याळ; Insta Queen ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या



पंजाब पोलीस दलातील वरिष्ठ महिला कॉन्स्टेबल अमनदीप कौरला अटक करण्यात आली आहे. ड्रग्जविरोधात सध्या पोलिसांची मोहीम सुरु असून, यादरम्यान तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 
 



Source link

जनता दरबार: महायुतीचा जनतेसाठी पुढाकार

0
जनता दरबार: महायुतीचा जनतेसाठी पुढाकार

📍 राधाकृष्ण मंगल कार्यालय, वाठार स्टेशन
📅 सोमवार, ७ एप्रिल २०२५ | दुपारी ३:०० वाजता

फलटण : उत्तर-कोरेगाव तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुती तर्फे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यावर भर दिला जाणार आहे.

महत्त्वाचे निर्देश:
🔹 जनतेच्या समस्या सोडवणे हा या दरबाराचा मूळ उद्देश आहे, त्यामुळे आलेल्या निवेदनांवर प्राधान्याने कार्यवाही केली जाईल.
🔹 तक्रारदारांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, त्यामुळे गोंधळ न घालता संयमाने सहभाग घ्यावा.
🔹 कोणत्याही अधिकाऱ्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
🔹 दर महिन्याला जनता दरबार आयोजित करण्याचा मानस असल्याने ऐनवेळी तक्रारी नोंदवू नयेत.

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जनता दरबार यशस्वी करण्यासाठी विशेष जबाबदारीने सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शिवरायांबद्दल अवमानजनक वक्तव्य, कायदा होणार, तारीख ठरली; अमित शाह रायगडावरुन घोषणा करणार

0


सातारा : राज्यात गेल्या काही महिन्यांत महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव केल्यावरुन राज्यभर संतापाची लाट पसरली होती. अभिनेता राहुल सोलापूरकर आणि तथाकथीत पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर शिवभक्तांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर, या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशांत कोरटकर सध्या तुरुंगात आहे. मात्र, या घटनांवरुन सातत्याने तीव्र संताप होत असून छत्रपती घराण्यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली होती. आता, लवकरच यासंदर्भात कायदा होणार असून स्वत: गृहमंत्री अमित शाह (Amit shah) याची घोषणा करतील, असे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje) यांनी म्हटलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणाऱ्या अवमानावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वारंवार आक्षेपार्ह विधाने केली जातात, या मुद्यांवर बोलताना सरकार काय बोळ्याने दूध पितं का? असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि तात्काळ कायदा पारित करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. तत्पू्र्वी गृहमंत्री अमित शाह यांचीही त्यांनी भेट घेतली होती. आता, याबाबत त्यांनी माहिती देत रायगडावरुन या कायद्याची घोषणा होऊ शकते, असे म्हटले आहे. 

या महिन्यात 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून घोषणा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात मी जी इच्छा व्यक्त केली होती, त्या कायद्याची घोषणा झाली तर याला वेगळं महत्व प्राप्त होईल, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, 12 तारखेला अमित शाह रायगडावरुन या कायद्यासंदर्भात घोषणा करतील का, हे पाहावे लागेल.  

अजामिनपात्र कायदा करावा

राज्य शासनाने तज्ज्ञांशी विचारविमर्श करुन, ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिध्द करणे गरजेचे होते. आज विकृत प्रवृत्ती असलेली व्यक्ती,  त्याला जसे समजले, वाटते आहे  अश्या पध्दतीने इतिहासातील प्रसंगाचे वर्णन करुन अकारण विवाद निर्माण करतो. अश्या प्रवृत्तींमुळे समाजामध्ये दुही पसरतेच परंतु राज्यातील देशातील कायदा आणि सुव्यवस्था देखिल बिघडते. शेजारी  राहणाऱ्यांची मने कुलूषित होतात आणि त्याचे दिर्घ परिणाम समाजाला भोगावे लागतात  ही वस्तुस्थिती आहे. आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वीच राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिध्द करावा त्याचबरोबरीने अश्या प्रवृत्तींच्या बाबतीत कायदेशीर कारवाई करता येणारा तसेच  किमान 10 वर्षाची शिक्षा असणारा अजामिनपात्र विशेष कायदा पारित करावा, अशी मागणीही उदयनराजेंनी निवेदनाद्वारे अमित शाह यांच्याकडे केली आहे. 

हेही वाचा

बस खरेदीवरुन वादंग, परिवहनमंत्र्यांकडून 1287 ई-बसचे टेंडर रद्द; ST महामंडळ अध्यक्षांच्या पत्राला स्थगिती

अधिक पाहा..



Source link

‘चलाओ ना नैनो से बाण रे’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स अन् कमालीचे एक्स्प्रेशन्स; VIDEO पाहून कराल कौतुक

0
‘चलाओ ना नैनो से बाण रे’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स अन् कमालीचे एक्स्प्रेशन्स; VIDEO पाहून कराल कौतुक



Viral Video girl beautiful dance in Chalao Na Naino Se song video viral on social media l ‘चलाओ ना नैनो से बाण रे’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स अन् कमालीचे एक्स्प्रेशन्स; VIDEO पाहून कराल कौतुक





Source link