Sunday, September 13, 2026
Homeसातारामहापुरुषांचे विचार सर्वांसाठी: आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा आगळा उपक्रम

महापुरुषांचे विचार सर्वांसाठी: आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा आगळा उपक्रम

महापुरुषांना चौकटीबाहेर नेण्याचा संकल्प, ग्रंथवाटपाने समाजप्रबोधन

फलटण : महापुरुषांचे विचार केवळ विशिष्ट जात, धर्म किंवा चौकटीत मर्यादित राहू नयेत, तर ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2025 ने अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. 1 एप्रिलपासून दररोज एका महापुरुषाला अभिवादन करून त्यांच्या विचारांची पुस्तके वाटप करण्याचा संकल्प या समितीने केला आहे.

आज या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. तसेच विविध महापुरुषांच्या विचारांची पुस्तके शिवप्रतिष्ठान फलटण आणि मोती चौक तालीम शिवजयंती महोत्सव फलटण या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आली.

या वेळी जयंती महोत्सव समितीचे गणेश अहिवळे, अजय काकडे, गोविंद काकडे, सुरज काकडे, सिद्धार्थ अहिवळे, भूषण बनसोडे, चंद्रकांत मोहिते, मंगेश सावंत, कपिल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजप्रबोधनासाठी ग्रंथवाटपाचा हा उपक्रम फलटणमध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments