Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 458

स्त्री चळवळीची पन्नाशी : बाईपणाचं सार्थक?

0
स्त्री चळवळीची पन्नाशी : बाईपणाचं सार्थक?



डॉ. मीनाव वैशंपायन

बाईपणाचं सार्थकम्हणजे घर उत्तमरीत्या सांभाळणं, मुलांचं संगोपन करणं, नवऱ्याची मर्जी सांभाळणं, कुटुंबासाठी स्वत:ला समर्पित करणं. १९५०-६० पर्यंत अमेरिकेतील स्त्रियांची मानसिकताही अशीच होती. बेट्टी फ्रीडन यांनी त्याला छेद देणाऱ्या द फेमिनाइन मिस्टिकया पुस्तकातून चूल आणि मूलया चौकटीत अडकलेल्या तेथील स्त्रियांच्या कथा-व्यथा मांडल्या. मला माझी ओळख हवी आहे, या विचाराचं भान या स्त्रियांना आलं आणि स्त्रीवादाच्या नव्या लाटेत स्त्री बाईपणाच्या अधिकारासाठी संघर्ष करू लागली.

पाश्चात्त्य देशांमध्ये स्त्रीवादाचा, स्त्रीसाहित्याचा विचार १९७५ या ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्षा’आधीपासून अनेक वर्षं पद्धतशीरपणे व जोमाने सुरू होता. स्त्रीच्या अंगभूत क्षमतांचा विकास व्हावा, तिच्या कौशल्यांचा तिच्या कुटुंबाबरोबर समाजालाही लाभ व्हावा, पुरुषप्रधान समाजाकडून तिच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाऊ नये, असे प्रयत्न होत होते. त्यांचे तपशील भिन्न असले, देशोदेशी, वेगळ्या काळात, हे प्रयत्न होत असले तरी सर्व चळवळींचा, तत्संबंधित साहित्याचा प्रमुख उद्देश स्त्रियांना सर्व बाबतीत समानाधिकार मिळवून देणं, सामाजिक घटक म्हणून समाजउभारणीत स्त्रीचा सहभाग घेणं हाच होता.

आधुनिक पाश्चात्त्य स्त्रीवादाचा उल्लेख काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांद्वारा निर्देशिला जातो. स्त्रीवादाच्या पहिल्या लाटेमध्ये (१८८०-१९२०) केल्या गेलेल्या प्रयत्नांमुळे स्त्रियांना मताधिकार मिळाला आणि वारसाहक्कांमधील लिंगभेदाधारित विषमता दूर व्हावी, असा प्रयत्न झाला. त्यानंतर दोन जागतिक महायुद्धांमुळे स्त्रीस्वातंत्र्यासाठीच्या चळवळी थंडावल्या होत्या.

दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या जगाचं चित्र अनेक अर्थांनी बदललं. अनेक सामाजिक, आर्थिक, परिमाणं बदलली. अमेरिकेत युद्धावेळी सैन्यात भरती झालेले पुरुष युद्धानंतर घरी परतले. त्यांच्या जागी ज्या स्त्रिया काम करीत होत्या, त्यांनी पूर्वीसारखं घरातच, घरातली कामं करत राहावं अशी अपेक्षा होती. शिवाय प्रसिद्धीमाध्यमं, स्त्रियांसाठीची मासिकं, त्यांच्या समोर स्त्रियांचे आदर्श नमुने म्हणून जे काही मांडू लागली, जी दृश्ये दाखवू लागली, त्यातून स्त्रियांचं गृहिणीपद अधिक अधोरेखित केलं जात होतं.

‘बाईपणाचं सार्थक’ म्हणजे घर उत्तमरीत्या सांभाळणं, मुला-बाळांचं करणं, नवऱ्याची मर्जी सांभाळणं, त्याच्या सर्व प्रकारच्या गरजा पुरवण्यासाठी स्वत:ला समर्पित करणं. हेच तर तिचं स्त्रीत्व. त्या दशकात आदर्श स्त्रीची प्रतिमा ही एका कणखर, स्वतंत्र करिअर करणाऱ्या स्त्रीऐवजी घर व कुटुंब या मर्यादेत अडकलेली स्त्री अशी होत गेली. ही माध्यमं सगळी पुरुषांच्या मालकीची होती. त्यामुळे त्यांचा व्यवहार स्वाभाविकच पुरुषी परिप्रेक्ष्यातून होत होता. १९५०च्या आसपास अमेरिकेत उपनगरांची जी वाढ झाली, त्यातील बहुतेक सर्व कुटुंबे ही मध्यमवर्गीय, एककेंद्री-आईवडील व तीन-चार मुलं अशा स्वरूपाची होती.

अशाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक स्त्री ही सगळी कामं करत असताना मनात विचार करत होती, ‘झालं? हे आणि असंच रोज, आयुष्यभर करत राहायचं? माझ्या शिक्षणाचा, मिळवलेल्या उत्तम गुणांचा उपयोग केवळ मुलांना प्राथमिक गोष्टी शिकवण्यापुरताच?’ तिची अस्वस्थता, असमाधान तिला गप्प बसू देईना. तिने आपल्या कॉलेजच्या मैत्रिणींशी संपर्क साधला आणि एक वेगळंच चित्र समोर आलं. त्या अस्वस्थतेने एका वेगळ्याच समस्येचा शोध तिला लागला. हा प्रश्न अनेकींना भेडसावत होता. नैराश्याने ग्रासलेल्या अनेक जणी वैद्याकीय उपचारही घेत होत्या. या स्त्रिया खरोखरी दु:खी होत्या का? ही कोणती समस्या? या बिननावाच्या समस्येचा शोध घेण्याच्या ध्यासानं पुढे जो इतिहास घडला त्या स्त्रीचं नाव होतं, बेट्टी फ्रीडन.

बेट्टी (गोल्डस्टीन) फ्रीडन या ४ फेब्रुवारी १९२१ रोजी अमेरिकेतील इलिऑनिस राज्यातील पिओरिया गावी एका ज्यू कुटुंबात जन्मल्या. कॅलिफोर्नियामधील बर्कले विद्यापीठातून ‘मानसशास्त्र’ या विषयात त्यांना उत्तम गुणांसह पदवी व शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मित्राला चांगले गुण मिळाले नाहीत, मग आपण कशी शिष्यवृत्ती घेऊन पुढे शिकायचं अशा तत्कालीन विचारसरणीच्या प्रभावाने त्यांनी पुढचं शिक्षण सोडलं. पण नंतर मित्रही सोडून गेला. नंतर त्यांचा विवाह कार्ल फ्रीडन यांच्याशी झाला, तीन मुलं झाली.

शाळा-महाविद्यालयाच्या नियतकालिकांमधून कवितालेखन, इतर लेखन करत, पुढे संपादन व काही प्रमाणात राजकीय स्वरूपाचे लेख त्यांनी लिहिले. त्यावेळी मित्रमंडळींमध्ये डाव्या विचारसरणीचीही मंडळी होती. त्यांच्यासाठी, कामगारांसंबंधित पत्रकारिताही केली. पण पुढे फारसा संपर्क राहिला नव्हता. १९५२मध्ये ‘ UE News’साठी काम करत असताना त्या गर्भवती आहेत या कारणावरून अचानक कामावरून काढण्यात आलं. त्यानंतर त्यांनी विविध नियतकालिकांमध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केलं.

या सर्व काळात समाजात स्त्रियांबाबत केल्या जाणाऱ्या भेदभावाचा अनुभव स्वत: घेतल्याने त्यांचं मन याबाबतीत अधिक सजग झालं होतं. नंतर आधी म्हटल्याप्रमाणे मैत्रिणी, इतर समवयस्क स्त्रिया यांच्या बाबतीत त्यांनी एक प्रश्नावली तयार करत सर्वेक्षण केलं आणि ‘नाव नसलेली समस्या’ या नावाने त्यांनी लेखमालिका लिहिली. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला.

अनेक गृहिणींना वाटू लागलं की, आपण एकट्या नाही, आपल्यासारख्या इतर कितीतरी आहेत. बेट्टी म्हणतात, ‘स्त्रीत्वाच्या या चुकीच्या प्रतिमेत कित्येक जणी अडकल्या, कोणी आपलं शिक्षण सोडलं, कोणी नवऱ्यांचं शिक्षण पुरं व्हावं म्हणून धडपड केली आणि जसजसं वय वाढत गेलं तसंतसं त्यांना एक पोकळी जाणवू लागली. या पुढे शिकणं वा आवडीची नोकरी करण्याची शक्यता संपली. आयुष्य निरर्थक वाटू लागलं.’ अशा अनेक हकिकतींनंतर फ्रीडन यांनी या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून पुस्तकलेखनाची तयारी केली.

बऱ्याच संदर्भांची जुळवाजुळव करत पुस्तक पुरं व्हायला पाच वर्षं लागली. ‘द फेमिनाइन मिस्टिक’(१९६३) हे ते पुस्तक. या पुस्तकातून त्यांनी अमेरिकी समाजातील तत्कालीन स्त्रीचं वास्तव चित्र उभं केलं. यात स्त्रियांच्या वाढत्या मानसिक अस्वस्थतेच्या अनेक कहाण्या सांगितल्या. समाजाने माध्यमांद्वारा ज्या स्त्रीप्रतिमांचं चित्रण केलं त्या किती चुकीच्या आणि स्त्रीवर अन्याय करणाऱ्या आहेत हे फ्रीडन यांनी दाखवलं.

स्त्रीत्वाचं सार्थक घरातल्या फरशा चकचकीत करणं किंवा वेगवेगळे जॅम-जेलीचे प्रकार करण्यात नाही. स्त्रीला तिची स्वत:ची वेगळी ओळख हवी, तिच्या क्षमतांचा पूर्ण विकास झाला, तर ती आनंदी होईल. तिला कुटुंब हवं आहेच, पण तिची ओळख केवळ ‘टॉमची आई’ किंवा ‘जॉनची बायको’ अशी न राहता ‘मी एमिली’ म्हणून व्हावी असं तिला वाटतं ते योग्यच आहे. असं त्या म्हणत.

फ्रीडन म्हणतात, ‘स्त्रियांचं असमाधान, जाणवणारी मानसिक पोकळी, आपली ओळख निर्माण करण्याची गरज ही अमेरिकी स्त्रीची खरी समस्या आहे. आजवर ही समस्या सामाजिक दडपणामुळे अव्यक्त राहिली, दबली गेली. या समस्येला आपणच कारण आहोत असा ती चुकीचा समज करून घेत स्वत:लाच दोष देत राहिली. विकास, आत्मविकास हा मानवी गुण आहे आणि तो प्रत्येकाचा अधिकार आहे.’

‘पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही सर्व प्रकारची कामे करू शकतात, कोणत्याही जबाबदाऱ्या पेलू शकतात. दुसऱ्या महायुद्धात ज्या स्त्रियांनी सर्व प्रकारची कामं युद्धभूमीवरही यशस्वीपणे केली, त्या आता जबाबदारी घेऊ शकत नाहीत का? युद्धकाळात अमेरिकेतील सिएटलमधल्या बोईंग विमानांच्या कंपनीत अनेक स्त्रियांनी महत्त्वाची कामे यशस्वी केली, त्यांना आता शांतताकाळात कंपनीचे मुख्यपद सांभाळता येणार नाही का?’

विचार करायला लावणाऱ्या फ्रीडन यांच्या ‘द फेमिनाइन मिस्टिक’ या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. लाखो प्रती खपल्या. असंख्य स्त्रियांनी पत्रं पाठवून आपल्या ‘मनची बात’ व्यक्त केल्याबद्दल आभार मानले. ललितेतर वाङ्मयातले हे सर्वोत्तम पुस्तक ठरले. एवढंच नाही तर तोवर थंडावलेल्या स्त्रीचळवळीला, स्त्रीवादाच्या दुसऱ्या लाटेला याच पुस्तकामुळे मोठी चालना दिली.

फ्रेंच अभ्यासक, लेखक सिमॉन द बोव्हार यांच्या ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकाने स्त्रियांच्या समाजातील दुय्यम स्थानाची प्रकर्षानं जाणीव करून दिली आणि बेट्टी फ्रीडन यांच्या ‘द फेमिनाइन मिस्टिक’ या पुस्तकाने स्त्रियांना आपणच आपल्या विकासाचा मार्ग अनुसरत स्वत:ला सुख मिळवत, समाजाच्या उभारणीत सहभाग घेतला पाहिजे याचं भान दिलं. त्यात त्यांनी स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक भूमिकांना गरजेप्रमाणे छेद दिला पाहिजे, कोणीही कोणतीही भूमिका स्वीकारली पाहिजे याचा आग्रह धरला. फ्रीडन यांनी एकूण पाच पुस्तकं व आत्मचरित्र लिहिलं. पण ‘द फेमिनाइन मिस्टिक’ या पुस्तकाने त्यांना अनन्य ओळख दिली.

बेट्टी फ्रीडन यांनी ओळखलं होतं की, केवळ लेखन हे समाजभान जागं करण्याचं मर्यादित साधन ठरू शकतं. त्यासाठी स्त्रियांची संघटना निर्माण झाली पाहिजे, जी सर्व प्रकारच्या, सर्व स्तरातील स्त्रियांना एकत्र आणून मोठ्या प्रमाणावर बदल घडवू शकते. फ्रीडन यांच्या मते, केवळ पुरुषांविरुद्ध आमचा लढा नाहीच. कारण स्त्रियांप्रमाणेच पुरुषही समाजाने लादलेल्या प्रतिमेचे बळी आहेत. त्यांना त्या प्रतिमेविरुद्ध जाऊन वागता येत नाही. हे सारं प्रत्येक वेळी जाणीवपूर्वकच घडतं असं नाही. पण ते समाजाच्या मानसिक चौकटीत घट्ट रुतलं आहे. कोणत्याही बाबतीत प्रगती घडवायची असेल तर कळीचा मुद्दा हा असतो की, जुन्या गोष्टी आपण नव्या दृष्टिकोनातून पण चिकित्सकपणे पाहाव्यात.

पुस्तकाच्या अमाप यशानंतर फ्रीडन यांनी समविचारी स्त्रियांच्या मदतीने ‘National Organization for Women- NOW’ या संस्थेची स्थापना केली. सरकारने कायदे केले तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही, ते बासनात बांधलेल्या स्थितीतच राहतात यासाठी प्रयत्न आवश्यक होते. तसेच अमेरिकी स्त्रीच्या या कुंठितावस्थेमध्ये समाजमाध्यमांप्रमाणेच ताठर शैक्षणिक धोरणे, अकारण मदत नाकारणारे इतर तज्ज्ञ, जाहिरातदार यांचाही वाटा आहे असं फ्रीडन यांचं म्हणणं होतं. या संघटनेद्वारा सतत पाठपुरावा करत फ्रीडन व संघटनेतील इतर स्त्रिया यांनी नोकरीच्या ठिकाणी लिंगभेदावर आधारित राबवला जाणारा वेतनभेद दूर करणारा कायदा लागू करायला लावला.

सर्वात महत्त्वाचं हे की, स्त्रीला गर्भपात करण्याचा वा संतती होऊ देणं वा न देणं हे ठरवण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला व शेवटी तो मान्य करून घेतला. यामुळे स्त्रियांचं जीवन सुधारण्यास बरीच मदत झाली. फ्रीडन यांचं असं स्पष्ट मत होतं की, स्त्रियांना स्वत:जवळील क्षमता पूर्ण सामर्थ्यानिशी वापरायच्या असतील, तर तुम्ही समाजव्यवस्थांमध्ये प्रत्यक्ष उतरल्याशिवाय तुमचा आवाज प्रभावी ठरत नाही. स्त्रियांना स्वत:ची ओळख निर्माण करत स्वातंत्र्य मिळवायचं असेल, तर त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं ही प्राथमिक अट आहे.

पण तेवढंच पुरेसं नाही. या व्यवस्थेतील विवाह, नोकऱ्या, कुटुंब, घरं, वैद्याकीय मदत यांसारख्या कितीतरी गोष्टींसंबंधीच्या कायद्यांचं पुनर्विलोकन करून त्यात सुधारणा करणंही गरजेचं आहे. आपला आत्मसन्मान राखत, स्त्रियांना जर कुटुंब, त्यातलं प्रेम मिळवायचं असेल तर त्यांनी या गोष्टींचा समतोल साधला पाहिजे. शिवाय जोडीदाराचं सुख हवंसं वाटणं हे नैसर्गिक आहे. समजूतदार सहजीवनाने आयुष्य सुखी होऊ शकतं हे लक्षात घ्यावं, असे सांगणाऱ्या फ्रीडन यांनी सामान्य स्त्रियांच्या दुखऱ्या नसेवर सांगितलेला उपाय साऱ्यांनी करून पाहणं जरुरीचं आहे.

स्त्री चळवळीला नवीन दिशा देत संघटनेचं पाठबळ उभं करणाऱ्या फ्रीडन यांच्याविषयी ‘यांनी आमचं आयुष्य बदललं’, असे म्हणणाऱ्या लाखो स्त्रियांना आजही ‘द फेमिनाइन मिस्टिक’ समकालीनच वाटावं यातच फ्रीडन यांचं जीवनसार्थक असलं तरी ती आपल्या समाजाची शोकांतिका आहे.



Source link

भारतीयांना प्रवेश तर लांबच डोकाऊनही पाहण्याची परवानगी नाही; भारतातील सर्वात रहस्यमयी ठिकाणी एक अमेरिकन तरुण घुसला आणि…

0
भारतीयांना प्रवेश तर लांबच डोकाऊनही पाहण्याची परवानगी नाही; भारतातील सर्वात रहस्यमयी ठिकाणी एक अमेरिकन तरुण घुसला आणि…


North Sentinel Island Andaman Islands Tribe : भारतात एक असं रहस्यमयी ठिकाण आहे जिथे  भारतीयांना प्रवेश तर लांबच डोकाऊनही पाहण्याची परवानगी नाही. हे ठिकाण म्हणजे अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट.  हे संपूर्ण जगासाठी रहस्य आहे. या बेटावर राहणाऱ्या विशिष्ट आदीवासी जमातीतील लोक संपूर्ण जगापासून अलिप्त  राहतात. या जमातीतील लोक संपूर्ण जगापासून दूर आहे. जगाचा यांचा काहीच संबध नाही. हे कुणाच्याच संपर्कात येत नाहीत. कुणी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते त्याचा खात्मा करता. या ठिकाणी एका  अमेरिकन तरुणाने घुसण्याचा प्रयत्न केला. जाणून घेऊया त्याच्यासोबत नेमकं काय घडलं?

अमेरिकन नागरिकाच्या हत्येमुळे भारताची अंदमान निकोबार बेटं चर्चेत आली होती. काही वर्षांपूर्वी अंदमानमध्ये आदिवासींना ख्रिस्ती धर्माच्या जाळ्यात ओढण्यासाठी आलेल्या अमेरिकन नागरिकाची हत्या करण्यात आली. यानंतर त्याचा मृतदेह पुरून टाकला अशी चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा एका अमेरिकमन तरुणाने येथे घुसण्याचा प्रयत्न केला.

मार्च 2025 मध्ये, अमेरिकन युट्यूबर मिखाइलो विक्टोरोविच पॉलीकोव्हला अंदमान आणि निकोबार बेटांमधील नॉर्थ सेंटिनेल बेटावर बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली. पॉलीयाकोव्ह हा २४ वर्षांचा अमेरिकन युट्यूबर आहे. त्याने नॉर्थ सेंटीनल बेटाजवळ व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला.एका लहान बोटीचा वापर करून बेटाजवळ पोहचला. त्याने नारळ आणि डाएट कोक सोबत नेला होता. तो शिट्ट्या मारुन वेगवेगळे आवाज काढून येथील लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. जवळपास 5 मिनिटांसाठी तो या बेटावर उतरल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याने बेटावर काही वस्तू सोडल्या आहेत. या वस्तू  नॉर्थ सेंटीनल बेटवर राहणाऱ्या लोकांसाठी धोकादायक ठरु शकतात अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

अंदमान आणि निकोबार बेटसमुहातील नॉर्थ सेंटिनल द्वीप जितकं शांत आणि सुंदर  तेवढचं खतरनाक आहे. नॉर्थ सेंटीनल बेटं निसर्ग सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.  पण या बेटांवर जाण्यास संपूर्णपणे बंदी आहे. असं म्हटलं जातं या द्वीपांवर जो गेला तो परतलाच नाही.  असंच काहीसं  27 वर्षाीय अमेरिकन नागरिक जॉन अॅलनसोबत घडलं होत. ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी जॉन अॅलन या बेटावरील आदिवासींना भेटण्यासाठी गेला. त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे 5 मच्छिमारांसह तो पुन्हा या बेटांवर पोहोचला. जॉनने आदिवासींसाठी काही भेटवस्तूही नेल्या होत्या.  मात्र, इथल्या आदिवासींनी बाण मारून जॉनला ठार केले.  त्यानंतर आदिवासींनी त्याचा मृतदेह समुद्र किनारी वाळूत पुरून टाकला अशी माहिती समोर आली.  

नेमकं कुठ आहे हे बेट?

नॉर्थ सेंटीनल बेटं राजधानी पोर्ट ब्लेअरपासून 50 किलोमीटर दूर आहेत. या बेटांवर राहणाऱ्या आदिवासींना सेंटीनल आदिवासी म्हटलं जातं. आजवर या आदिवासींचा इतर कोणत्याही मानवी समुहांशी संपर्क आलेला नाही. या बेटांवर केवळ 100 आदिवासी राहतात असं म्हटलं जातं. यातल्या कोणाचाही इतर जगाशी आयुष्यात संबंध आलेला नाही. या बेटावर जाण्यास सर्वांनाच मनाई आहे. या बेटावरील आदिवासींवर कोणताही खटला भरता येत नाही. सेंटीनल आदिवासींना लॉस्ट ट्राईब हा दर्जा देण्यात आलाय. 2004 साली आलेल्या सुनामीनंतरही या आदिवासींच्या मदतीसाठी कोस्ट गार्डची हेलिकॉप्टर्स गेली. पण आदिवासींनी या हेलिकॉप्टर्सवर बाणांचा अक्षरशः पाऊस पाडला. 

 





Source link

मोबाईलच्या अतिवापरामुळे नैराश्य, नालासोपार्‍यात २० वर्षीय तरुणाची आत्महत्या

0
मोबाईलच्या अतिवापरामुळे नैराश्य, नालासोपार्‍यात २० वर्षीय तरुणाची आत्महत्या



विरार : मोबाईल आणि त्यावर सतत गेम खेळण्याचे वेड मुलांच्या जीवावर बेतू लागले आहे. नालासोपाऱ्यात राहणार्‍या एका २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याला मोबाईल गेम खेळण्याची सवय होती. त्या गेमचे व्यसन लागले आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. मागील आठवड्यात देखील विरार मध्ये १२ वर्षीय मुलाने आईने मोबाईल न दिल्याने आत्महत्या केली होती.

आर्यन सिंग हा (२०) हा तरुण नालोसापारा पूर्वेच्या तुळींज येथील साईहरी अपार्टमेंट मध्ये आपल्या मामा आणि मामी सोबत रहात होता. तो मुळचा उत्तरप्रदेशातील प्रतापगड येथे राहणारा आहे. त्याचे आई वडील गावी असतात तर आर्यन शिक्षणासाठी नालासोपारा येथील मामाकडे रहात होता. गुरूवारी रात्री घरात कुणी नसताना त्याने स्वयंपाक घरातील पंख्याल साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येतात कुटुंबियांनी त्याला पालिकेच्या विजय नगर येथील तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

स्वयंपाक घरातील फ्रिजवर त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली. ही चिठ्ठीत इंग्रजीत होती. मी आयुष्याला कंटाळलो आहे. माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही, असा मजकूर या चिठ्ठीत त्याने लिहून ठेवला होता. आर्यन हा कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयात १४ वी मध्ये शिकत होता.

त्याला मोबाईल गेमचे व्यसन लागले होते. सतत तो मोबाईल गेम खेळून त्याला नैराश्य आले होते, असे आर्यनचा मामा शत्रुधन सिंग याने तुळींज पोलिसांना सांगितले. आर्यनचे मूळ गाव उत्तरप्रदेशातील प्रतापगढ येथे असून त्याचे आई वडिल गावी राहतात. याप्रकरणी आम्ही अपमृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे तपासिक अंमलदार कदम यांनी सांगितले.

आठवड्याभरातील दुसरी आत्महत्या

मागील आठवड्यात विरारच्या उंबऱगोठण येथे राहणार्‍या १२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तो सतत मोबाईल बघत असायचा. अभ्यास करत नाही, मोबाईल मध्ये गेम खेळत असल्याने त्याची आई त्याला ओरडली होती. आईने मोबाईल काढून घेतल्याने त्याने आत्महत्या केली होती. तो सहावीत शिकत होता. मोबाईल वापरामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असतानाच आता मोबाईलमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या करणाऱ्यांचे विशेतः शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांचे प्रमाण वाढते आहे. अशा घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराचे प्रमाण वाढत आहे. यासाठी पालकांनी मुलांच्या कलाने समजून त्यांना अतिवापरापासून दूर ठेवायला हवे, असे समुपदेशक मिलिंद पोंक्षे यांनी सांगितले.



Source link

वसई विरार मधील नालेसफाईला सुरवात, २४ कोटींची तरतूद

0
वसई विरार मधील नालेसफाईला सुरवात, २४ कोटींची तरतूद



वसई: वसई विरार शहरात नालेसफाईला शुक्रवारपासून सुरवात करण्यात आली आहे. यांत्रिक पद्धत वापरून ही सफाई पावसाळ्या आधीच पूर्ण केली जाणार आहे.यासाठी २४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरतील नाल्यांची साफसफाई करण्याचत येत असते. शहरात १ लाख ५० हजार ५९० मीटर लांबीचे २०१ नाले आहेत. बेकायदा बांधकामे, माती भराव, विकासाच्या नावाखाली बुजविण्यात आलेले नैसर्गिक नाले कचरा, गाळ, माती ढिगारे यामुळे नाले तुंबून गेले आहेत. याशिवाय नाले तुंबून गेल्याने पाणी जाण्यास ही अडचणी येत आहेत तर दुसरीकडे डासांचा प्रादुर्भाव याशिवाय दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून वसई विरारकरांना पूरस्थितीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत.

तासभर जरी पाऊस झाला तरीही सखल भागात पाणी जमत असते. त्यामुळे पालिकेने यंदा एप्रिल महिन्यातच नालेसफाईच्या कामाला सुरवात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवार पासून ९ प्रभागात एकाच वेळी नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. २०२४ मध्ये देखील पालिकेने एप्रिल महिन्याच्या मध्यात नालेसफाईला सुरवात केली होती.

यंदा पालिकेने नालेखोदाई व पूरप्रतिबंधक कामे यासाठी २४ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद केली आहे. पावसाळा सुरू होण्या आधीच शहरातील सर्व नाल्यातील गाळ उपसा करून स्वच्छ केले करण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाच्या पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यास मदत होईल असे पालिकेने उपायुक्त नानासाहेब कामठे (घनकचरा) यांनी सांगितले.

नालेसफाई करताना ज्या ठिकाणी पोकलेन यंत्र किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पाण्यातून किंवा दलदलीच्या भागातून गाळ काढण्यासाठी पालिकेने ड्रेन मास्टर या आधुनिक यंत्राचा वापर सुरू केला आहे. काही नाले हे वनविभागाच्या अखत्यारीत येतात. त्यासाठी वनविभागाची परवानगी लागणार असल्याने पालिकेने वनविभागाची पत्रव्यवहार केला आहे. दैनंदिन नालेसाफाईच्या कामावर प्रत्येक प्रभागनिहाय उपअभियंता, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांमार्फेत पर्यवेक्षण केले जाणार आहे. प्रत्येक अधिकार्‍यांना देखरेखीसाठी नाले विभागून देण्यात आले आहे. या नियोजनामुळे नालेसफाई योग्यरित्या केली जाईल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला.

शहरात सुरू असलेल्या नालेसफाईचे काम योग्य पघ्दतीने आणि परिणाकारकरित्या व्हावे यासाठी त्यावर अधिकार्‍यांमार्पत पर्यवेक्षण केले जाणार आहे. शहरातील ९ प्रभागातील नाल्यांवर सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त दर आठवड्याला पर्यवेक्षण करणार आहे. नाल्यातील काढलेला गाळ टाकण्यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. वसई विरार शहरात १८० किलोमीटर लांबीचे दिडशेहून अधिक नाले आहेत. सर्वाधिक नाले जी- वालीव (५१) आणि एफ- पेल्हार (४३) प्रभागात आहेत.



Source link

‘वादळवाट’ फेम अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन, काही वर्षांपूर्वी आलेला ब्रेन स्ट्रोक, मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

0
‘वादळवाट’ फेम अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन, काही वर्षांपूर्वी आलेला ब्रेन स्ट्रोक, मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली



vadalvaat fame marathi actor dr vilas ujawane passed away ‘वादळवाट’ फेम अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन, काही वर्षांपूर्वी आलेला ब्रेन स्ट्रोक, सिद्धार्थ जाधवने वाहिली श्रद्धांजली





Source link

गोंदिया–बल्लारशाह मार्गाच्या दुसऱ्या रेल्वे लाईनला मंजुरी, ४८१९ कोटीचा खर्च…

0
गोंदिया–बल्लारशाह मार्गाच्या दुसऱ्या रेल्वे लाईनला मंजुरी, ४८१९ कोटीचा खर्च…



railway minister ashwini vaishnav approved 240 km second railway line project costing rs 4819 crore || गोंदिया–बल्लारशाह मार्गाच्या दुसऱ्या रेल्वे लाईनला मंजुरी, ४८१९ कोटीचा खर्च…





Source link

बारामती कृषी बाजार समितीतून आंब्याचा पहिला कंटेनर लंडनला रवाना

0
बारामती कृषी बाजार समितीतून आंब्याचा पहिला कंटेनर लंडनला रवाना

बारामती – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारातील निर्यात सुविधा केंद्रातून चालू हंगामातील पहिला आंब्याचा कंटेनर लंडनच्या दिशेने रवाना झाला. बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे यांनी हिरवा झेंडा दाखवून या निर्यात प्रक्रियेस प्रारंभ केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून 2007 मध्ये जळोची येथे हे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले. त्याच धर्तीवर आता मॅग्नेट प्रकल्पांतर्गत फळे आणि भाजीपाला हाताळणी केंद्रही उभारण्यात आले असून, ते लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर बाजारपेठ मिळेल, असा विश्वास सभापती आटोळे यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षी या केंद्रातून 485 टन आंब्याची निर्यात ऑस्ट्रेलिया, लंडन, अमेरिका आणि चीन या देशांमध्ये झाली होती. यंदा पहिल्या टप्प्यात 10 टन आंबा लंडनला पाठवण्यात आला. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करून रेसिड्यू-मुक्त, निर्यातक्षम आंब्याचं उत्पादन करावं, जेणेकरून अधिकाधिक लाभ मिळू शकेल, असे आवाहन सचिव अरविंद जगताप यांनी केले.

रेनबो इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून आंबा निर्यात केली जात असून, गेल्या 15 वर्षांत देवगड हापूस आणि केशर आंबा लंडन, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि चीनमध्ये पाठवण्यात आला आहे. या प्रक्रियेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातमधील शेतकऱ्यांचा सहभाग असून, त्यांना उत्तम बाजारभाव मिळत आहे.

“पहिला कंटेनर लंडनला पाठवला असून, ऑर्डरनुसार इतर देशांमध्येही निर्यात करणार आहोत,” असे रेनबो इंटरनॅशनलचे मालक अभिजित चंद्रकांत भसाळे यांनी सांगितले.

सभापती व सचिवांनी निर्यातदारांना शुभेच्छा दिल्या असून, हा उपक्रम आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पालखीतळांची पाहणी; प्रशासन व विश्वस्त समितीचा समन्वय

0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पालखीतळांची पाहणी; प्रशासन व विश्वस्त समितीचा समन्वय

फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 19 जून ते दि. 21 जुलै या कालावधीत संपन्न होणार आहे. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पालखी मुक्कामी असणाऱ्या पालखीतळांची पाहणी करण्यात येत आहे. प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.

याअंतर्गत फलटण तालुक्यातील तरडगाव, फलटण व बरड येथील पालखीतळांची पाहणी करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्सव समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या शिष्टमंडळाने हा दौरा केला.

यावेळी फलटणच्या प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या वतीने पालखी सोहळा समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या दौऱ्यात रामभाऊ चोपदार व इतर विश्वस्त, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, तसेच तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव अहिवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन आणि समिती यांच्यात सुसंवाद आणि समन्वय कायम राखत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे.

फलटणमध्ये ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन; आमदार सचिन पाटील यांनी जनतेसाठी केली प्रार्थना

0
फलटणमध्ये ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन; आमदार सचिन पाटील यांनी जनतेसाठी केली प्रार्थना

फलटण: फलटणकरांसाठी एक अद्भुत आध्यात्मिक योग साधला गेला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने टीओके हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात सर्वसामान्य जनतेला ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमाला फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन सुधाकर पाटील उपस्थित होते. त्यांनी भक्तिभावाने ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले व मतदारसंघातील नागरिकांवर कोणत्याही संकटाची छाया येऊ नये, यासाठी प्रार्थना केली.

या वेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, “ही एक विलक्षण आध्यात्मिक संधी आहे. फलटणच्या जनतेने या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन सकारात्मक ऊर्जा मिळवावी. येथे आल्यावर अध्यात्मिक शांती आणि ऊर्जा मिळते, हे मी स्वतः अनुभवलं आहे.”

कार्यक्रमादरम्यान अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. या आध्यात्मिक सोहळ्यामुळे फलटणमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

फलटणमध्ये ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा; आमदार रामराजेंचे भक्तिभावाने दर्शन

0
फलटणमध्ये ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा; आमदार रामराजेंचे भक्तिभावाने दर्शन

फलटण | भडकमकरनगर येथील TOK हॉलमध्ये आज (4 एप्रिल) सकाळी 11 वाजता ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या पवित्र सोहळ्याला अनेक भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या निमित्ताने विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला. या अद्वितीय दर्शनाचा लाभ मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.