Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 457

कंत्राटी कर्मचारी नियुक्तीस राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा विरोध

0
कंत्राटी कर्मचारी नियुक्तीस राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा विरोध



maharashtra safai karamchari aayog opposes appointment of contractual employees at government offices कंत्राटी कर्मचारी नियुक्तीस राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा विरोध





Source link

पैशांसाठी माणुसकी गमावली! पुण्यातील नामांकित रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार

0
पैशांसाठी माणुसकी गमावली! पुण्यातील नामांकित रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार

पुणे: एका नामांकित रुग्णालयाने माणुसकीला मागे टाकत फक्त पैशासाठी गर्भवती तरुणीच्या जीवाशी खेळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उपचाराअभावी या तरुणीचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तातडीच्या उपचारांसाठी १० लाखांची मागणी करण्यात आली. अडीच लाख रुपये तातडीने भरण्याची तयारी दाखवूनही उपचार सुरू करण्यात आले नाहीत. काही मंत्री आणि आमदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तरीही रुग्णालयाने दुर्लक्ष केले.

प्रसूती वेदना वाढत असल्याने आणि तनिषा यांची प्रकृती बिघडत असल्याने, अखेर कुटुंबीयांनी त्यांना २५ किलोमीटर लांब वाकड येथील सुर्या हॉस्पिटलमध्ये हलवले. तिथे सिझेरियनद्वारे त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला, पण त्यांची तब्येत अधिकच खालावली. योग्य उपचार न मिळाल्याने त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला आणि तनिषा यांचे निधन झाले.

एकीकडे दोन नवजात मुलींचा जन्म, तर दुसरीकडे त्यांच्या आईचा मृत्यू—या दुर्दैवी घटनेमुळे भिसे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. “रुग्णालयाने पैशांपेक्षा माणुसकीला महत्त्व दिले असते, तर आज तनिषा जिवंत असत्या,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि राज्य सरकारला अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली आहे. मात्र, त्यांच्या निवेदनाने संतप्त नागरिक आणि पीडित कुटुंबाला समाधान मिळालेले नाही. आरोग्य सेवेतील हा अमानवीय प्रकार प्रशासन किती गांभीर्याने घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Vadodara Hit And Run प्रकरणातील रक्षित चौरसियाचा मेडिकल रिपोर्टमध्ये मोठा खुलासा, ‘तो दारु नाही तर…’

0
Vadodara Hit And Run प्रकरणातील रक्षित चौरसियाचा मेडिकल रिपोर्टमध्ये मोठा खुलासा, ‘तो दारु नाही तर…’


गेल्या महिन्यात वडोदरा येथे झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले होते. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, गांधीनगर येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या प्राथमिक अहवालात – ज्यामध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती – असे दिसून आले आहे की, तो घटनेच्या वेळी मद्यधुंद नव्हता तर त्याने गांजा ओढला होता. चौरसियासोबत, त्याचा सहप्रवासी प्रांशु चौहान आणि अपघातादरम्यान कारमध्ये असलेल्या आणखी एका मित्र सुरेश भारवाड यांच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या अपघातानंतर सुमारे 20 दिवसांनी वैद्यकीय अहवाल आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायदा, 1985 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि चौरसियाविरुद्ध मोटार वाहन कायदा, 1988  च्या कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, ज्यामुळे दारू किंवा ड्रग्जच्या नमुन्यावर गाडी चालवणे हा फौजदारी गुन्हा आहे.

चौहानला अटक करण्यात आली आहे, तर चौरसिया सध्या वडोदरा मध्यवर्ती कारागृहात आहे. तिसरा आरोपी फरार आहे. “आज आम्हाला तीन रक्त नमुन्यांचा निकाल मिळाला, ज्यामध्ये ड्रग्ज पॉझिटिव्ह आढळले. ते गांजा ओढल्यानंतर गाडी चालवत होते. आम्ही रक्षित चौरसियाच्या सहप्रवाशाला अटक केली आहे आणि तिसऱ्या आरोपीला लवकरच अटक केली जाईल,” असे झोन 4 चे पोलिस उपायुक्त पन्ना मोमाया म्हणाले.

13 मार्च रोजी, प्रयागराज येथील 23 वर्षीय कायद्याचा विद्यार्थी चौरसिया याने त्याच्या फोक्सवॅगन व्हर्टस सेडानला तीन वाहनांवर धडक दिली, ज्यामुळे हेमाली पटेल या एका महिलेचा मृत्यू झाला. कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना वडोदरामधील वर्दळीच्या चौकातील करेलीबाग येथील आम्रपाली चार रस्ताजवळ घडली.

आरोपीच्या त्रासदायक प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये काळ्या टी-शर्टमध्ये परिधान केलेला आरोपी वारंवार ओरडत होता: “आणखी एक फेरी, आणखी एक फेरी!” आणि “ओम नमः शिवाय!”. एका दिवसानंतर त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला नाही.

बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात शिकणाऱ्या आरोपीने यापूर्वी दारू पिऊन किंवा वेगाने गाडी चालवल्याचा आरोप फेटाळला  होता आणि कारच्या एअरबॅग्जमुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले होते. 

“आम्ही एका स्कूटरला ओव्हरटेक करत होतो आणि उजवीकडे वळलो तेव्हा एका खड्ड्यात आदळलो. कार दुसऱ्या वाहनाला स्पर्शून गेली आणि एअरबॅग बंद पडली, ज्यामुळे माझ्यानजरेवर परिणाम झाला आणि कार नियंत्रणाबाहेर गेली… मला सांगण्यात आले की एका महिलेचा मृत्यू झाला आणि इतर जखमी झाले. मला पीडितांच्या कुटुंबियांना भेटायचे आहे – ही माझी चूक आहे,” असं रक्षित चौरसिया म्हणाला.





Source link

येत्या जूनपासून राज्यात एआय विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

0
येत्या जूनपासून राज्यात एआय विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती



in pune minister chandrakant patil said artificial intelligence university to start from june 2025 येत्या जूनपासून राज्यात एआय विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती





Source link

पुणे : ‘ससून’मध्ये रुग्णाची आत्महत्या

0
पुणे : ‘ससून’मध्ये रुग्णाची आत्महत्या


पुणे : ससून रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. दशरश सुरेश मेढे (वय ३१, रा. राजूर, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

मेढे याला दारू पिण्याचे व्यसन आहे. गुरुवारी रात्री दारू प्यायल्यानंतर त्याने कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली. तो अस्वस्थ झाल्याने त्याला कुटुंबीयांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तो वाॅर्ड क्रमांक ४० मध्ये उपचार घेत होता.

शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याने रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.



Source link

जोडीदाराचे नाव वाढविण्यासाठी पारपत्रामध्ये आता नवा पर्याय

0
जोडीदाराचे नाव वाढविण्यासाठी पारपत्रामध्ये आता नवा पर्याय


पुणे : पारपत्र काढताना तसेच नूतनीकरण प्रसंगी जोडीदाराचे आडनाव लावताना यापुढे अर्जदार महिलांना ‘विवाह नोंदणी प्रमाणपत्र’ आवश्यक नाही. अर्जदारांच्या सोयीसाठी केंद्रीय पारपत्र कार्यालयाने नव्याने ‘परिशिष्ट जे’ (अनेक्श्चर) हा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

पारपत्रामध्ये जोडीदाराचे संपूर्ण नाव जोडीदार म्हणून टाकण्यासाठी (नवीन आणि नूतनीकरण) विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसल्यास संयुक्त छायाचित्र जाहीरनाम्याचा (परिशिष्ट जे) वापर करता येईल. मात्र, या परिशिष्टावर पती-पत्नी दोघांचे एकत्र छायाचित्र, स्वाक्षरी, दोघांची जन्म तारीख, आधारकार्ड क्रमांक, मतदानाचे ओळखपत्र किंवा पारपत्र क्रमांक लिहिणे बंधकारक आहे, अशी माहिती पुण्याचे प्रादेशिक पारपत्र अधिकारी डॉ. अर्जुन देवरे यांनी दिली.

तसेच, पारपत्रावरून जोडीदाराचे नाव वगळण्यासाठी घटस्फोटाच्या आदेशाची प्रत आवश्यक आहे. जोडीदाराचे नाव बदलण्यासाठी, घटस्फोटाच्या आदेशाची प्रत किंवा पहिल्या जोडीदाराचा मृत्यू दाखला आणि नवरा-बायको दोघांकडून पुनर्विवाह प्रमाणपत्र किंवा संयुक्त छायाचित्र जाहीरनामा आवश्यक आहे. अर्जदार किंवा जोडीदाराला नाव संपूर्ण बदलण्याचे असल्यास त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया असून, पारपत्र कार्यालयाच्या संकेतस्थळावर त्याची माहिती उपलब्ध आहे, असे डॉ. देवरे यांनी सांगितले.

लग्नानंतर महिला सरकारी कागदपत्रांवर त्यांच्या संपूर्ण नावांमध्ये असलेले वडिलांचे नाव आणि माहेरचे आडनाव बदलून त्याजागी पतीचे नाव अणि आडनाव लिहितात. अशा महिलांना आता स्टेट गॅझेटमध्ये किंवा दोन वृत्तपत्रांमध्ये नाव बदलीची जाहिरात द्यावी लागेल आणि त्यासोबत त्या संपूर्ण नवीन नावाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अशी दोन ओळखपत्र द्यावी लागतील, याकडे देवरे यांनी लक्ष वेधले.





Source link

जागतिक पडझडीने ‘सेन्सेक्स’ची नऊ शतकी गटांगळी

0
जागतिक पडझडीने ‘सेन्सेक्स’ची नऊ शतकी गटांगळी


लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: व्यापार युद्धाचा भडका आणि अमेरिकेसह जगभरावर मंदीच्या छायेच्या चिंतेतून जागतिक बाजारपेठांमध्ये झालेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे शुक्रवारी स्थानिक बाजारातही भीतीदायी पडसाद उमटले. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये ९०० अंशांहून अधिक घसरण होऊन तो ७६,००० च्या पातळीच्या खाली ढासळला.

खनिज तेलाच्या किमतीतील घसरण आणि निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो आणि इन्फोसिस या बाजारातील दिग्गज कंपन्यांच्या समभागात विक्री झाल्याने बाजारातील निराशेत आणखी भर पडली, असे विश्लेषकांनी मत व्यक्त केले. परिणामी सप्ताहातील अखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९३०.६७ अंशांनी म्हणजेच १.२२ टक्क्यांनी घसरून ७५,३६४.६९ वर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,०५४.८१ अंश गमावत ७५,२४०.५५ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३४५.६५ अंशांची (१.४९ टक्के) घसरण झाली आणि तो २२,९०४.४५ पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्सधील टाटा स्टील सर्वाधिक ८.५९ टक्क्यांनी गडगडला. त्यापाठोपाठ टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, टेक महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मास्युटिकल, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि एनटीपीसी या कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावले. दुसरीकडे, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एशियन पेंट्स आणि ॲक्सिस बँक यांचे समभाग मात्र तेजीत होते.

जागतिक शेअर बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात प्रमुख निर्देशांकांमध्ये पडझड झाली. क्षेत्रीय पातळीवर विविध निर्देशांक प्रत्येकी २-६ टक्क्यांपर्यंत घसरले. ट्रम्प यांच्या नवीन व्यापार धोरणामुळे मंदी येण्याची शक्यता असून अमेरिकेतही महागाई वाढेल. आगामी काळात हे अरिष्ट इतर प्रमुख अर्थव्यवस्थांनाही गिळंकृत करेल, या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये घर निर्माण केले आहे. मंदी आली तर मागणीला फटका बसण्याच्या शक्यतेने धातू आणि तेल वितरण कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली, असे निरीक्षण मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे यांनी नोंदवले.

अमेरिकी मंदीच्या भीतीने हाहा:कार

गुरुवारी अमेरिकेच्या प्रमुख शेअर बाजार निर्देशांकांमध्ये २०२० नंतरची सर्वात मोठी टक्केवारीतील घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर कर धोरणामुळे जागतिक मंदीच्या भीतीने एस अँड पी ५०० निर्देशांकातील कंपन्यांनी एकत्रितपणे २.४ (ट्रिलियन) लाख कोटी अमेरिकी डॉलरचे बाजार मूल्य केवळ काही तासात गमावले. १६ मार्च २०२० रोजी जागतिक बाजारपेठेत करोना साथीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जे नुकसान झाले, त्यानंतरचा हा एका दिवसातील सर्वात मोठा तोटा आहे. नॅसडॅक निर्देशांकानेही सहा टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदविली.

रुपया ५ पैशांनी वधारून ८५.२५ वर

डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारच्या सत्रात ५ पैशांनी वधारून ८५.२५ पातळीवर स्थिरावला. कमकुवत डॉलर निर्देशांक आणि खनिज तेलाच्या किमतींमध्ये सहा टक्क्यांची तीव्र घट झाल्यामुळे रुपयाला बळ मिळाले. मात्र भांडवली बाजारातील पडझड आणि परदेशी निधीच्या बहिर्गमनामुळे रुपयातील वाढ मर्यादित राहिली. रुपयाने ८५.०७ प्रति डॉलर पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि नंतर दिवसभरात ८४.९६ चा उच्चांक आणि ८५.३४ ही नीचांकी पातळी त्याने गाठली होती.

गुंतवणूकदारांना १० लाख कोटींची झळ

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९०० अंशांहून अधिक घसरून ७६,००० च्या पातळीच्या खाली घसरल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १० लाख कोटी रुपयांची घसरण झाली. गेल्या दिन सत्रात सेन्सेक्स १२,०० अंशांहून अधिक कोसळला आहे. शेअर बाजारातील निराशाजनक वातावरणामुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ९.९८ लाख कोटी रुपयांनी घसरून ४०३.३४ लाख कोटी रुपयांपर्यंत (४.७३ ट्रिलियन अमेरिकी डॉलर) खाली आले आहे.

सेन्सेक्स ७५,३६४.६९ -९३०.६७ -१.२२%

निफ्टी २२,९०४.४५ -३४५.६५ -१.४९%

तेल ६७.८५ – ३.२६%

डॉलर ८५.२५ -५पैसे



Source link

आठवणीसाठी… आठवणीने…!

0
आठवणीसाठी… आठवणीने…!


भारतात साधारण ८८ लाख माणसे डिमेन्शियाने बाधित आहेत. साठीच्या आतील लोकांमध्ये डिमेन्शियाचे प्रमाण वाढत आहे. त्यातही स्त्रियांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट आहे. व्यक्तिकेंद्री होत असलेला समाज लक्षात घेता सर्वांनी तरुण वयातच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. डिमेन्शियासाठी कारणीभूत जोखीम घटक कोणते हे लक्षात घेतले तर आपण त्यापासून दूर राहून आपल्या मृत्यूपर्यंत सजग आयुष्य जगू शकतो.

रॉबर्टने अॅमस्टरडॅम येथून विस्प या गावाला जाणारी ट्रेन पकडली. आपल्या ७० वर्षीय बायकोला भेटायला रॉबर्ट निघाला होता. खरे तर ना ती त्याला पाहून ‘स्वीटहार्ट’ म्हणत गळामिठी मारणार होती, ना मुलाबाळांची चौकशी करणार होती, ना घराच्या अंगणातील ट्युलिप या वर्षी फुलले का विचारणार होती, ना तिने पूर्वी हौसेने लावलेल्या चेरीच्या झाडाला फळे धरली का याची तिला उत्सुकता होती. हे सर्व खरे तर तिचे जिवलग जग, पण आता या साऱ्याच्या पल्याड गेली होती ती! रॉबर्टने तिला दोन वर्षांपूर्वी विस्पला आणून ठेवले होते. जगातल्या पहिल्या ‘डिमेन्शिया व्हिलेज’मध्ये. २००९ मध्ये ते वसवले गेले आणि आता बहुतांशी प्रगत देशांत डिमेन्शिया झालेल्या रुग्णांसाठी विशेष कम्युनिटी विकसित करण्यात येत आहेत.

‘‘अरे, कधी आलास तू?’’ नानांनी हा प्रश्न त्यांना भेटायला गेल्यानंतरच्या अर्ध्या तासात पाच वेळा विचारला होता आणि प्रत्येक वेळी पुतण्याने अगदी शांतपणे तेच ते उत्तर न कंटाळता दिले होते. काकाने आपल्याला ओळखले नाही याची त्याला कल्पना होती आणि ते क्वचित सुसंगत, पण इतर काही तरी सर्वसामान्य गप्पा मारणार, त्यात कोणतेही कौटुंबिक संदर्भ, प्रेमळ चौकश्या, काळजीचे प्रश्न येणार नाहीत हेही त्याला माहीत होते. कारण गेल्या सहा वर्षांपासून काकांच्या स्मृती हळूहळू धूसर होत गेल्या आणि एकंदर डिमेन्शिया वाढत होता हे सर्व कुटुंबीयांच्या अंगवळणी पडले होते.

आपल्याही नात्यात, आसपास अशी ‘हरवलेली’ माणसे आपण बघतो. स्मृती, स्थळ, काळ, वेळ, समज, समाज, उमज, नाती-गोती याचे भान सरलेली, गोंधळलेली, निर्णयक्षमता, कार्यक्षमता गमावलेली, बावरलेली किंवा कधी एकदम रागीट होणारी, आपल्यात असूनही नसल्यासारखी, ‘अनरिचेबल’ माणसे. त्यांचे आयुष्य त्यांच्या सुखदु:खापलीकडे, पण कुटुंबीयांना मात्र फार आव्हानात्मक. हे सर्व बघून आपल्यापैकी अनेकांच्या मनात विचार चमकून जातो, आपलेही असेच होईल की काय भविष्यात? कमी-जास्त फरकाने?

डिमेन्शिया अर्थात बुद्धिभ्रंश-स्मृतिभ्रंश हा मुख्यत: वयस्क लोकांना होणारा एक गुंतागुंतीचा आजार. ‘अल्झायमर’ हा एक माहीत असलेला प्रकार. भारतात साधारण ८८ लाख लोक या आजाराने बाधित आहेत. २०१० मध्ये ३७ लाख रुग्ण होते आणि २०३० पर्यंत ८८ लाख होतील, असा अंदाज ‘अल्झायमर अँड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी’ने वर्तवला होता. पण २०२०पर्यंतच रुग्णांची संख्या ८८ लाख झाली. रुग्णांची संख्या अशा वेगाने वाढत आहे आणि त्यातही स्त्रियांमध्ये डिमेन्शियाचे प्रमाण पुरुषांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. त्यामुळे खरे तर या आजाराकडे एक स्त्री आरोग्याचा प्रश्न म्हणूनही बघायला हवे. जसे जसे माणसाचे आयुष्यमान वाढते आहे तसे तसे डिमेन्शिया असलेल्यांची संख्या वाढणार हे स्पष्ट आहे. पण साठीच्या आतील लोकांमध्येही डिमेन्शियाचे प्रमाण वाढत आहे, हे धोकादायक आहे. पूर्वी एक लाखांमध्ये ५९ व्यक्ती डिमेन्शियाने पीडित असत, आता हे प्रमाण ६५ रुग्णांवर गेले आहे. अजून तरी या आजाराला पूर्ण बरे करणारे औषध नाही. थोडेफार यश देणारी औषधे आहेत, त्यावर जगभरात संशोधन चालू आहे.
डिमेन्शियासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? त्यासाठी कोणते जोखीम घटक वा रिस्क फॅक्टर आहेत याचा विचार सर्वांत महत्त्वाचा आहे कारण अशी स्थिती येणार नाही यासाठी आधीपासूनच उपाययोजना करता येऊशकेल. आपली जनुके किंवा आनुवंशिकता हे अगदी थोड्या प्रमाणात डिमेन्शिया होण्यासाठी कारणीभूत आहेत असे दिसतेय. मात्र वाढते वय, हवा, प्रदूषण असे काही धोकादायक घटक आहेत की जे आपण बदलू शकत नाही, पण इतर अनेक बाबींमध्ये काय करावे आणि काय करू नये हे बऱ्यापैकी समजून येत आहे.

आदिमानवाचा मेंदू खूप छोटा होता. आजच्या उत्क्रांत मानवाच्या मेंदूचे वजन शरीराच्या साधारण दोन टक्के असते आणि मेंदूला एकूण ऊर्जेपैकी तब्बल २० टक्के ऊर्जा लागते. मेंदूपेशी (मज्जातंतू) आणि दुसऱ्या ‘ग्लीअल’ नावाच्या पेशींनी मेंदू बनतो. एक मज्जातंतू शरीरातील इतर अनेक मज्जातंतूंशी जोडला जातो आणि मज्जातंतूंची अनेक जाळ्या (नेटवर्क्स) तयार होतात. त्यांच्यात रासायनिक दळणवळण आणि संदेशवहन चालू असते, त्यामुळे मेंदूचे काम सुरळीत चालते. मज्जातंतूंच्या कार्यासाठी आवश्यक अशी ‘बीटा अमिलॉइड’ आणि ‘टाऊ’ ही प्रथिने मेंदूत असतात. काही कारणाने या प्रथिनांची विकृत रूपे तयार होतात आणि अतिरिक्त प्रमाणात मेंदूत जागोजागी जमा होतात. स्मृतिकेंद्रे, विचारकेंद्रे यावर त्याची पुटे जमतात. पेशींच्या आतही गुंता निर्माण करतात. यामुळे मेंदूपेशींतील दळणवळण, पेशीपेशींतील जोडणीच्या जागा नाहीशा होऊ लागतात. मेंदूचे काम विस्कळीत होते. गोंधळ उडतो. विस्मरण होते, दोन गोष्टींतली विसंगती समजत नाही आणि रुग्णाला डिमेन्शिया झाल्याचे निदान होते.

या आजारामध्ये ‘मायक्रोग्लिया’ या पेशी शरीरात फार जास्त प्रमाणात तयार होतात, दाह निर्माण करून मेंदूला इजा करतात. अनेक पेशी मृत होतात. वयोमानानुसार काही पेशी मृत होणे अपेक्षित असले तरी अशा रुग्णांमध्ये हे प्रमाण खूप जास्त दिसते, मेंदू आक्रसतो. मेंदूचा आलेख, ईईजी (इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी), पेट-स्कॅन, एफएमआरआयमध्ये (Functional Magnetic Resonance Imaging) मेंदूचे विस्कटलेले अंतरंग स्पष्ट दिसतात. अनेक आजारांचे मूळ शरीरातील दाह (इन्फ्लमेशन) आणि ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ यात असते. ऑक्सिजनचे अस्थिर अतिक्रियाशील रूप, रेणू (फ्री रॅडिकल्स)अति प्रमाणात बनतात. मोकाटपणे शरीरभर विहरत निरोगी पेशींना इजा करतात आणि हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदूजन्य आजाराची सुरुवात होते. अशा मुक्त रॅडिकल्स आणि शरीरात अनेक कारणांनी निर्माण झालेला दाह (एकमेकांना पूरक असे हे दोन्ही आपले शत्रू) मेंदूला इजा करतात, विकृत प्रथिने तयार होतात.

मधुमेह किंवा उच्च रक्तदाब जर नियंत्रणात नसेल, तर त्यामुळे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, मेंदूपेशींना प्राणवायू मिळत नाही, ४० ते ६० वर्षे वयापर्यंत जर रक्तदाबाकडे दुर्लक्ष झाले, तर अशा व्यक्तींमध्ये पुढील काळात डिमेन्शियाची शक्यता वाढते. आज आपल्याकडे साधारण २० ते २५ टक्के लोकांना माहीतच नसते की त्यांना या व्याधी आहेत, कारण कधी तपासण्या केलेल्या नसतात. यासाठी डोळे तपासणे, कानाची क्षमता तपासणे या चाचण्यासुद्धा वेळच्या वेळी करणे आवश्यक आहे तसेच आवश्यकतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र वापरले नाही तर तेसुद्धा डिमेन्शिया होण्यास कारणीभूत ठरू शकते. हिरड्या, दात, एकंदरच मौखिक आरोग्य नीट राखले नाही तर शरीरात दाह निर्माण होऊन डिमेन्शिया आणि इतर व्याधींची शक्यता वाढते. धूम्रपान, मद्यापान किंवा तत्सम व्यसनांमुळेही डिमेन्शिया होण्याचा धोका संभवतो.

मेंदूला २० टक्के ऊर्जा लागते या दृष्टीने आणि बाकी जीवनशैलीने होणारे आजार होऊ नयेत (जे पुढे डिमेन्शिया होण्यास कारणीभूत ठरतात) यासाठीही शारीरिक व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही प्रकारचा व्यायाम सातत्याने केला तर मेंदूला सुरळीत रक्तपुरवठा होऊन निश्चित फायदेशीर ठरते.
झोप हा एक जोखीम घटक म्हणून अद्याप प्रस्थापित झाला नसला, तरी ब्रिटनमध्ये झालेले संशोधन झोप आणि डिमेन्शियाचा जवळचा संबंध असल्याचे सूचित करते. दररोज जर सहा तासांहून कमी तास झोपत असाल, विशेषत: ५० ते ६० या वयात, तर डिमेन्शियाचा धोका वाढतो. झोपेत ‘स्लीप एपनिया’(झोपेत श्वसनास अडथळे येणे) असेल तरीही डिमेन्शिया होऊ शकतो आणि जर वेळीच उपाय केले, तर कमीही होऊ शकतो. संशोधन हे नक्कीच सांगते की, झोप आणि बुद्धी यांचा परस्परांशी संबंध आहे. त्यामुळे दररोज सात ते आठ तास पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे असते.
‘डिजिटल डिमेन्शिया’ हा अजूनही प्रस्थापित जोखीम घटक नाही, पण अति स्क्रीनटाइममुळे मेंदूतील ग्रे आणि व्हाइट मॅटर यामध्ये बदल घडून येतात. मेंदू विकसित होण्याच्या वयात गॅजेट्सच्या वापरामुळे मेंदूला सतत मिळणाऱ्या उत्तेजनेमुळे तरुण वयातच मानसिक आजार, डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते.

शरीरातील हानीकारक फ्री रॅडिकल्सना नियंत्रणात ठेवायचे असेल तर आहारात अँटिऑक्सिडंट्स हवेत. त्यासाठी ओमेगा ३ स्निग्धाम्ले असलेले अन्नघटक रोजच्या रोज जाणीवपूर्वक आहारात हवेत. सर्व रंगांच्या भाज्या आणि फळे, वेगवेगळ्या तेलबिया, कडधान्ये, शेंगभाज्या, सुका मेवा हे सगळे लाभदायक अन्नघटक आलेच. जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले, तेच मेंदूलाही योग्य हे समीकरण लक्षात ठेवायचे. अति साखरयुक्त, अति प्रक्रियायुक्त, पॅकेज्ड फूड, जंक फूड हे शरीरात दाह वाढवतात. आहारात योग्य प्रमाणात चोथा नसला, तर आतड्यातील मित्रजंतूंची उपासमार होते, ते हळूहळू लोप पावतात. शत्रुजंतूचे राज्य तयार होते, मेंदू आणि आतडी यांचे घनिष्ट नाते. त्यामुळे आतड्यांचा ‘फ्लोरा’ शत्रुजंतूंनी व्यापला की मेंदूवर विपरीत परिणाम होतो. मेंदूला जास्त वापरले नाही, म्हणजे बुद्धिमांद्या जीवनशैली ठेवली तर साहजिक मेंदूतील मज्जातंतूंची जाळी कमी होऊ लागतात. यामुळे डिमेन्शिया आजाराची सुरुवात होऊ शकते. आपण अनेक कृती फार यंत्रवत करतो. फक्त साधारण पाच टक्केच मेंदू वापरतो. रोजच्या ठरलेल्या कामातील पद्धतीत बदल (उदा. शक्य तिथे उजव्याऐवजी डावा हात वापरायचा) केला तरी मेंदू जागरूक राहतो. तसेच जे करतो त्यात त्या क्षणी पूर्ण लक्ष देणे, म्हणजे ‘माइंडफूल’ राहणे याला साऱ्या जगात खूपच महत्त्व आले आहे. आपल्याला पूर्वी गाणी, संगीतकार पाठ असायचे, पण आता विसरले तरी चालते. कारण इंटरनेट आहेच. आठवणीने अमुक आणायलाच हवे अशी आपली पूर्वीची मेंदूला लावलेली सवयही, विशेषत: शहरात राहणाऱ्यांमध्ये नाहीशी होतेय. कारण आता खूप अॅप्स दहाव्या मिनिटाला वस्तू घरी आणून देतात. त्यामुळे मेंदू सैलावतो, त्यात त्याचा काय दोष? दूरध्वनी क्रमांक पाठ करणे, साधे हिशोब, शब्दकोडी, प्रवास, नवीन छंद, नवीन भाषा असे काही केले की मेंदूला आव्हाने मिळतात. असे मेंदूचे व्यायाम (नुरोबिक्स) उपकारक आहेत.

एक खूप महत्त्वाची बाब संशोधनाने दिसून आली की, ज्या व्यक्ती मेंदूची क्षमता जास्तीत जास्त वापरतात त्यांच्या मेंदूत वयस्क झाल्यावर जरी विकृत प्रथिने साठली तरी त्यांना डिमेन्शिया होत नाही, याचे कारण त्यांनी केलेला ‘बौद्धिक साठा’ ( cognitive reserve) ही नक्कीच आशादायक बाब आहे. एकलकोंडा स्वभाव, फारसे मित्रमैत्रिणी नसणे हेसुद्धा डिमेन्शियासाठी अगदी वाईट. त्यामुळे समृद्ध सामाजिक आयुष्य खूप आवश्यक आहे. सातत्याने करायला हव्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे आपण डिमेन्शिया रोखण्याचा प्रयत्न करू शकतो.

‘जागतिक अल्झायमर अहवाल २०२३’चे उमेद वाढणारे समर्पक शीर्षक होते. ‘नेव्हर टू लेट, नेव्हर टू अर्ली’ तर मग, चला आठवणीसाठी, आठवणीने काही बदल घडवू या…

Manjeerig@gmail.com



Source link

माध्यम सुनावण्यांची ‘अग्निपरीक्षा’?

0
माध्यम सुनावण्यांची ‘अग्निपरीक्षा’?


अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बहुतांश वृत्तमाध्यमांचं वर्तन आपणच सर्वव्यापी, सर्वज्ञ असल्यासारखं होतं. लोकशाहीच्या चार स्तंभांनी परस्परांच्या अधिकारकक्षांचं उल्लंघन करणं अलीकडे नित्याचंच झालं आहे. त्यात आरोपी जर स्त्री असेल, तर तिला अग्निपरीक्षा द्यावीच लागेल, ही मानसिकताही अद्याप पाठ सोडत नाही. माध्यम सुनावण्यांच्या अग्निपरीक्षेतून जावं लागलेली प्रत्येक स्त्री समाज म्हणून आपलं अध:पतन अधोरेखित करते… सुशांत आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती निर्दोष असल्याचा अहवाल नुकताच ‘सीबीआय’ने दिला आहे. त्यानिमित्ताने…

‘रिया चक्रवर्ती के व्हॉट्सअॅप कॉन्व्हर्सेशन्स मेरे पास हैं, और वो बोलती हैं, ‘ड्रग्ज दो, ड्रग्ज दो, मुझे ड्रग्ज दो…’ मेरे पास प्रमाण हैं.’ एका वृत्त वाहिनीचा चेहरा असलेले निवेदक घसा फोडून, टेबलठोक आरोप करत होते की, रिया नशेबाज आहे आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. पुढे त्यांच्या या व्हिडीओवर अनेक मीम्स आले. नेटिझन्सची घटकाभर करमणूक झाली. पण वास्तव काय होतं?

तो करोनाचा काळ होता. लोकांकडे रिकामा वेळ भरपूर होता. दरम्यान सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण घडलं आणि बहुतांश माध्यमांनी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीकडे बोटं दाखवायला सुरुवात केली. घरी बसून रोज फक्त रुग्ण आणि मृतांचे आकडे ऐकणाऱ्या प्रेक्षकांना सनसनाटी खबरा देऊन अनेक वृत्तवाहिन्यांनी त्या काळात ‘टीआरपी’चे आकडे गगनाला भिडवले. रियापाठोपाठ दीपिका पदुकोणपासून सारा अली खानपर्यंत अनेक अभिनेत्रींची अमली पदार्थ सेवनाच्या आरोपांखाली चौकशी झाली. कोणी सुशांतचा मृत्यू हा त्याच्या गृहराज्यातल्या निवडणुकांत मतं गोळा करण्याचा मुद्दा बनविल्याचे आरोप केले. भाजपने बिहारमध्ये ‘ना भुले हैं ना भुलने देंगे’, ‘जस्टिस फॉर सुशांत’ अशा मजकुराचे स्टिकर्स, पोस्टर्स लावले. ‘रिया का काला जादू’, ‘लव्ह ड्रग्स और धोका’ या दर्जाचे मथळे दूरचित्रवाणीवर दिवसभर दाखवले जात राहिले. या खटल्याशी काडीचाही संबंध नसलेले तिचे जुने-पुराणे व्हॉट्सअॅप चॅट, ‘इस पल की सबसे बडी खबर’ असल्याचं सांगत जगापुढे मांडले गेले. रियाला ‘गोल्ड डिगर’ ठरवलं गेलं. हे सारं नाट्यमय संगीत, वाद घालणारे पाहुणे, कर्णकर्कश निवेदक, अतिरंजित ग्राफिक्स याच्या साथीने साग्रसंगीत पार पाडलं गेलं. अखेर या अनिर्बंध वार्तांकनाची दखल घेत ‘न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्डस अथॉरिटी’ने (NBDA) काही टीव्ही वाहिन्यांना माफी मागण्याचे आदेश दिले होते.

या घटनेला आता पाच वर्षं उलटली आहेत. दरम्यानच्या काळात अमली पदार्थ सेवनाचे आरोप झालेल्या अभिनेत्रींचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. सारं काही सुरळीत सुरू आहे. पण ही पाच वर्षं रिया चक्रवर्ती काय करत होती? खरं तर ज्या अमली पदार्थांच्या खटल्यात तिला अटक झाली होती, त्यातून तिची २७ दिवसांतच जामिनावर सुटका झाली. मधल्या काळात ती पुन्हा आपलं अभिनयातलं करिअर पुढे नेऊ शकली असती, पण तिला अंधारातच चाचपडत राहावं लागलं. असं का झालं?

१७ वर्षांपूर्वी आरुषी तलवार हत्या प्रकरणातही हेच झालं होतं. खरं तर या प्रकरणात पोलिसांच्या तपासातील हलगर्जी समोर आली होती आणि त्यासंदर्भात चर्चा होणं गरजेचं होतं, त्याऐवजी बहुतेक माध्यमांनी आई-वडिलांनीच मुलीचा खून केल्याचं गृहीतक प्रस्थापित करण्यावर भर दिला गेला. नूपुर आणि राजेश तलवार या दंतवैद्या पती-पत्नीविरोधात विविध कथानकं पसरवली गेली. आरुषी आणि घरचा नोकर हेमराजचे शारीरिक संबंध होते, ते राजेश तलवार यांना कळलं आणि त्यांनी दोघांची हत्या केली. त्यामुळे हा ‘ऑनर किलिंग’चा प्रकार आहे, असा शोध कोणी लावला. कोणी म्हटलं, राजेश तलवार आणि अन्य एक स्त्री दंतवैद्या यांचे अनैतिक संबंध होते आणि हे हेमराजला कळल्यामुळे राजेशने हेमराजला मारण्याची धमकी दिली होती. कोणाचं म्हणणं, पोटच्या मुलीचा खून झालाय आणि आईला रडूसुद्धा येत नाही, असं कसं होऊ शकतं? नक्कीच मृत्यूमागे आई बापाचंच कारस्थान असणार… एका मुलीचा आणि पुरुषाचा खून झालाय म्हणजे त्यांच्यात ‘संबंध’ असणारच. बाईने चारचौघात आपल्या भावनांचं प्रदर्शन मांडलंच पाहिजे, अन्यथा ती निष्ठुरच असणार. माध्यमं आणि बरोबरीनं समाज हे गृहीतच धरून चालला होता का? मात्र २०१७मध्ये या दाम्पत्याची पुराव्यांअभावी सुटका झाली. हळूहळू त्यांचं ‘डेन्टल क्लिनिक’ही पुन्हा सुरू झालं. जुने रुग्ण पुन्हा येऊ लागले. बोचऱ्या नजरा टाळण्यासाठी बराच काळ त्यांना तोंड लपवतच फिरावं लागलं. पण साधारण नऊ वर्ष त्यांच्यावरच्या मानसिक ताणाचं काय?

उद्याोजिका आणि खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या बाबतीतही तेच. त्यांच्या अचानक आालेल्या मृत्यूच्या बातमीनंतर आत्महत्येपासून विषप्रयोगापर्यंत वाट्टेल ते कयास करण्यात आले. सुनंदा यांच्या ट्विट्सचीदेखील चिरफाड केली गेली. शशी थरूर यांच्यावरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप झाले. अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतरही तिचे आरोग्यविषयक अहवाल काही माध्यमांनी प्रसारित केले. तिच्या शरीरात मद्याचे अंश आढळल्याच्या मुद्द्यावरून तिला व्यसनाधीन ठरवलं गेलं. यामागे बोनी कपूरच असणार असं ठरवून अनेक माध्यमं मोकळी झाली.

माध्यमांचं असं बेजबाबदार वर्तन माध्यम सुनावणी किंवा ‘ट्रायल बाय मीडिया’ म्हणून ओळखलं जातं. केवळ शक्यता, अफवा किंवा गैरसमजांच्या आधारे माध्यमांद्वारे केल्या जाणाऱ्या न्यायालयबाह्य सुनावण्यांमुळे बहुतेकदा आरोपी किंवा तक्रारदाराचं चारित्र्यहनन होण्याची, त्याच्या सामाजिक प्रतिमेविषयी जनमानस कलुषित होण्याची शक्यता असते.
अर्थात, माध्यम सुनावण्यांचा परिणाम दरवेळी नकारात्मकच होतो असंही नाही. जेसिका लाल हत्या खटला हे सकारात्मक परिणतीचं उत्तम उदाहरण. जेसिका एक प्रसिद्ध मॉडेल आणि बार टेंडर होती. रात्री उशिरा, बार बंद झाल्याचं सांगून मद्य नाकारलं म्हणून मनू शर्माने तिची गोळ्या झाडून हत्या केली. तत्कालीन खासदार विनोद शर्मा यांचा मुलगा असल्याचे सारे फायदे मनूला कसे मिळाले, याचं वार्तांकन माध्यमांनी सातत्याने केलं. पुरावे नष्ट झाले, साक्षीदार फिरले. मनू कायद्याच्या कचाट्यातून अलगद सुटला, मात्र सामाजिक संघटनांनी आणि माध्यमांनी दाद मागणं थांबवलं नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याची स्वत:हून दखल घेतली आणि २००६ मध्ये मनूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

माध्यम सुनावण्यांची मालिका मोठी आहे. कायद्यापुढे सर्वजण सारखे असतात, असं म्हटलं जातं. पण न्यायमंदिरांबाहेर रोज जमणाऱ्या माध्यम प्रतिनिधींसाठी सर्व खटले सारखे असतातच असे नाही. प्रत्येक न्यायालयात रोज शेकडो सुनावण्या होतात. सामान्यांच्या फसवणुकीच्या, जगण्या-मरण्याच्या, घरादाराच्या, नातेसंबंधांच्या, पोटापाण्याच्या अनेक विवंचना त्यांत गुंतलेल्या असतात, पण हेच सामान्य जेव्हा प्रेक्षक होऊन टीव्हीसमोर बसतात, तेव्हा त्यांना सारंच असामान्य, अतिरंजित हवं असतं, नाही तर ते सेकंदात वाहिनी बदलणार आहेत, हे न्यायालयाच्या, आरोपींच्या दारात उन्हातान्हात, भर पावसात उभा रिपोर्टर, कॅमेरामन जाणून असतो. एखाद्या वृत्त वाहिनीने ‘वेडेपणा’ केला की अनेकांना तो करण्याशिवाय गत्यंतर नसतं. माध्यमांचे कॅमेरे आरोपींच्यामागे झुंडीने धावत सुटतात, ते त्यामुळेच. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहायचं, नोकरी टिकवायची, तर ‘गंदा हैं पर धंदा हैं’ म्हणत न पटणारंही बरंच काही माध्यमांना करावं लागतं का?

या साऱ्यात आता आणखी एक भर पडली आहे, ती समाजमाध्यमांची. पूर्वी आरोपीच्या आयुष्याचा पंचनामा करण्याचे उद्याोग केवळ माध्यमांपुरतेच सीमित होते. आता समाजमाध्यमांचं कोलीत हाती असल्यामुळे प्रत्येक जण न्यायाधीशाच्या थाटात सुनावण्या करून, निकाल देऊन मोकळा होऊ लागला आहे. रिया चक्रवर्तीच्या बाबतीत आक्रस्ताळ्या वाहिन्यांनी केलेल्या वार्तांकनाचे स्क्रीनशॉट्स घेऊन ते व्हायरल केले गेले. त्यावर रील्स तयार केली गेली. या साऱ्या समाजमाध्यमी मोहिमेत कोणी तरी सूत्रबद्ध पद्धतीने तेल ओतत असल्याचा संशयही व्यक्त झाला. सुशांतच्या मृत्यूला वर्ष उलटत आलं तरी ‘जस्टिस फॉर एसएसआर’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड होत होता, तो केवळ चाहत्यांमुळे असं म्हणता येईल का?

अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. माध्यमं तर स्वतंत्र आहेतच आणि कोणत्याही निमित्ताने त्यांच्या या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न निषेधार्हच. पण जबाबदारीचं काय? आत्महत्या किंवा हत्यांची दृश्यं स्टुडिओत ‘रिक्रिएट’ करणाऱ्या वाहिन्यांना याचा समाजावर काय परिणाम होईल, असा प्रश्न पडतच नाही का? एखाद्या आधीच नैराश्याचा सामना करणाऱ्या व्यक्तीने अशी दृश्यं पाहिली, एखाद्या लहान मुलाने पाहिली, तर त्याच्यावर किती गंभीर दुष्परिणाम होतील? प्रबोधन करणं ही ज्यांची जबाबदारी, ती माध्यमंच जेव्हा एखाद्या स्त्रीला जादूटोणा करणारी चेटकीण ठरवून मोकळी होतात, तेव्हा आताशी कुठे अंधश्रद्धांच्या गाळातून बाहेर येत असलेल्या आपल्या समाजाला आपण पुन्हा काही शतकं मागे तर नेतोय का, असा प्रश्न त्यांना पडत नाही का?

अनेकदा अनेक माध्यमं स्वत:च सर्वव्यापी, सर्वज्ञ असल्याचं भासवत बाष्कळपणा करतात, तो पाहून या प्रक्रियेत सहभागी प्रामाणिक व्यक्तींना किती संताप येत असेल. प्रत्यक्षदर्शीही आपण, पोलीस आणि वकीलही आपण आणि न्यायाधीशही आपणच अशा थाटात वावरणाऱ्या आजच्या काही माध्यमांचा आत्मविश्वास ‘सेक्रेड गेम्स’ या वेब मालिकेमधल्या ‘कभी कभी तो लगता है अपुन ही भगवान हैं’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेपेक्षा वेगळा नाही. अशा आत्मविश्वासातून शेवटी कपाळमोक्षच होतो.

अशा माध्यमांना दिशा देणाऱ्या प्रेक्षकांनीही थोडी सुज्ञता दाखवणं अपेक्षित आहे. वृत्तवाहिन्यांच्या बुलेटिन्सकडून डेली सोपमधल्या थराराची अपेक्षा असेल, तर त्यासाठी सत्याच्या कसोटीवर तोललेल्या नि:स्पृह वार्तांकनाची आणि लोकशाहीच्या एका महत्त्वाच्या स्तंभाची किंमत मोजावी लागेल, हे निश्चित!

vijaya.jangle@expressindia.com



Source link

बारमाही : भरभरून आणि शुकशुकाट!

0
बारमाही : भरभरून आणि शुकशुकाट!


कौतुक ही माणसाची अत्यंत मूलभूत गरज आहे. आपल्या आजूबाजूला काही जण भरभरून कौतुक करणारे असतात, तर काहींमध्ये कौतुकाचा शुकशुकाटच आढळतो. खरं तर आताच्या काळात चार-दोन कौतुकाचे शब्द मनावर प्राजक्ताची पखरण करत असतात…

‘‘काय मग, सध्या काय सुरू आहे?’’
‘‘एक सदर लिहिते आहे, वर्तमानपत्रात.’’
‘‘तू सदर लिहिते आहेस? तू?’’
‘‘हो.’’
‘‘कसं शक्य आहे? दैनंदिन मालिकांमध्ये वर्षानुवर्षं दळण लावणारी तू. ठरावीक शब्दांचं सदर लिहिते आहेस म्हणजे कमालच झाली.’’
‘‘हां, एक अनुभव. बघू जमतंय का.’’
‘‘जमेल की, न जमायला काय झालं. तुला नाही जमणार तर कुणाला जमणार? एवढी शेकड्याने माणसं सदर लिहितात आणि तसंही हल्ली वाचतं कोण? तू एवढं लिहिलं आहेस. आता हेही लिहिशील, नि:शंक मनाने लिही.’’
‘‘तुम्ही वाचाल ना काकू?’’
‘‘बघते बाई, मला हल्ली कंटाळाच येतो वाचायचा. तेच तेच सगळं. तू तरी काय वेगळं लिहिणार? त्यामुळे मालिका बऱ्या. एकीकडे काम करत ऐकता येतात. ते बरं लिहितेस तू. सदर लिही. जमेल तुला.’’

या संपूर्ण संवादात काकूंनी माझं कौतुक केलं, की मला वास्तवाची प्रखर जाणीव की काय ती करून दिली, की टोमणे मारले, हे मला अजूनही कळलेलं नाहीये. एवढं नक्की कळलं की, काकूंना ‘अरे वा! छान’, एवढंच पण मनापासून म्हणावंसं वाटलं नाही. किंवा वाटलंही असेल, पण त्यांच्या जिभेला, आवाजाला, चेहऱ्याला, इतकी सहजता नव्हती. कदाचित कित्येक वर्षांत त्यांना आता कुणाचंही मनमोकळं कौतुक करण्याची सवयच राहिलेली नसावी. खरं तर या संवादात मला काही मोठ्या ‘कौतुकाची’ अपेक्षाच नव्हती. ‘मी एक सदर लिहिते आहे,’ यावर ‘हो का? नक्की वाचेन हं’एवढं मला पुरेसं होतं. पण त्यांना ते तेवढं बोलणं जड गेलं. ही अशी ओझी बाळगत आयुष्य काढतात मंडळी.

माझ्या आजूबाजूला, माणसांचे या बाबतीतले दोन प्रकार आहेत… एक तर अतिरेकी, अंगावर येणारं कौतुक करणारे, किंवा शक्यतो, म्हणजे अगदी उर्ध्व लागून नाकाला दोरा लावायची वेळ येईपर्यंत कुणाचंही, कधीही, कुठल्याही कारणाने कौतुक न करणारे. पहिल्या प्रकारचे लोक, ‘भरभरून दाद द्या’, हे वाक्य भलतंच मनावर घेतात. अलीकडेच मी एका कवितांच्या कार्यक्रमाला गेले होते. तसंही दोन-अडीच तास कवितांच्या माध्यमातून लोकांना खिळवून ठेवणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे समोरचे कलाकार जीव ओतून अतिशय श्रवणीय कार्यक्रम सादर करत होते. रात्रीची वेळ होती, दिवसभरातली सगळी दगदग, धावपळ संपवून शांतपणे उत्तम साहित्याचा आस्वाद घ्यायला मी गेले होते. आता काही वेळ समोर जे काही सादर होईल ते मनसोक्त ‘ऐकायचं’, मनात साठवायचं, अशा कल्पनेत मी होते. पण मध्यंतरानंतर अचानक माझ्या शेजारच्या रिकाम्या खुर्च्यांवर कानठळ्या बसण्याइतकी दाद देणारी काही मंडळी येऊन बसली. पहिल्या दादेला तर मी दचकलेच. आणि मग जणू काही आपापसांत स्पर्धा लागल्यासारखी ही मंडळी, शब्दाशब्दाला प्रशंसोद्गार, एकेका कडव्याला टाळ्या, शेर संपण्याचा अवकाश कौतुकाचा प्रचंड कोलाहल, गदारोळ, दंगा करू लागली. ही ‘दाद’ आहे की हे कार्यक्रम पाडतायत अशी शंका यावी इतका कलकलाट होऊ लागला. एवढा हर्षोल्हास पाहून कवी गडीसुद्धा अधिक जोशात आता. थोड्याच वेळात तो एक सार्वजनिक ‘वा दादा वा…’ इव्हेंट झाला, सगळ्या कार्यक्रमाचा नूरच पालटला. ही अशी अंगावर आदळणारी दाद दिल्याशिवाय आपली कलेची जाण, आपल्याला कलाकाराबद्दल असलेलं प्रेम, जवळीक आणि मुख्य म्हणजे आपण आलोय, आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेतोय, हे लोकांना कळणारच नाही असं बहुदा या लोकांना वाटत असावं.

मुळात प्रत्येक कलाकाराची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना आवडेलच असं नसतं. ते काही खूप थोडे विजेसारखे लख्ख क्षण असतात जेव्हा आपसूक तोंडून ‘वाह’ येते. कलाकार त्या अंतिम क्षणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि कधी कधी ही अशी आक्रस्ताळी दाद त्याच्या एकाग्रतेचा भंग करत असते. इतर प्रेक्षकांचाही रसभंग होतो.

कधी कधी असंही होतं की, एखादा जाहीर कार्यक्रम नाट्यगृहात प्रचंड रंगतो, पण नंतर टीव्हीच्या पडद्यावर बघताना तो अजिबात मनोरंजक वाटत नाही. नंतर असे कार्यक्रम बघणाऱ्यांना वाटतं ‘एवढे का हे प्रेक्षक हसतायत किंवा भावनिक होतायत.’ होतं असं की, नाट्यगृहात जिवंत अनुभव घेताना तो एक ऊर्जेचा खेळ निर्माण झालेला असतो. थोडा माहौलचाही परिणाम असतो. जो नाट्यगृहात जाणवतो, पण पडद्यापलीकडे पोहोचत नसतो. त्यामुळे तेव्हा ती दाद खोटी वाटली तरी प्रत्यक्षात अनेकदा ती उत्स्फूर्तही असते. याच्या बरोब्बर उलट काहींना कशाचंही आणि कुणाचंही कौतुक म्हणून वाटत नाही. हे तिकीट काढून विनोदी नाटकांना जातात, पण यांना हसवायला अस्वल नाट्यगृहात सोडलं तरी ते हसत नाहीत. भावनिक नाटकात यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावत नाहीत. कारण तेवढं काहीच त्यांना भिडत नाही, रुचत नाही. दाद ही हसण्यातून किंवा टाळ्यांमधूनच दिली जाते असं नाही… कधी कधी अत्यंत शांत सभागृह हीसुद्धा दाद असते. अशा वेळी ते शेजारच्याशी बोलतात कारण त्यांना काहीच ऐकण्या किंवा बघण्यासारखं वाटलेलं नसतं. बहुदा यांना याहून उच्च दर्जाचं काही तरी बघण्याची किंवा ऐकण्याची सवय असते. यांची अभिरुची फार ‘हटके’ असते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांसारखं ऊठसूट कशाचीही स्तुती करणं यांच्या बुद्धीला पटत नाही. हे नाटक बघून अर्धा तास फोन करतात, पण नाटक सोडून सगळ्याबद्दल बोलतात. तुमच्या मुलांची प्रगती, तुमच्या जोडीदाराला मिळालेलं प्रमोशन, सगळं त्यांना माहीत असतं पण ते त्याबद्दल कधीच बोलत नाहीत, कारण ‘हे काय सगळेच करतात’. यांना कौतुक असतं फार फार वेगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तींचं. ८५ टक्के जनता मध्यम प्रतीचंच काम करत असते, त्यातल्या तुमचं काय कौतुक करायचं, असं त्यांना वाटतं. पण ते कसं उगाचच करायचं म्हणून कुणाचं कौतुक करत नाहीत, या त्यांच्या बाणेदारपणाबद्दल त्यांचं सगळ्यांनी कौतुक करावं असं त्यांना नक्की वाटतं.

‘दाद’ उत्स्फूर्त असते, प्रशंसा अभ्यासातून किंवा विचारातून आलेली असते, स्तुतीमध्ये समर्पणभाव आहे, शाबासकीमध्ये प्रोत्साहन आहे आणि ‘कौतुक’ प्रेमातून, आपुलकीतून आपोआप येतं. या सगळ्यात समोरच्या माणसाच्या प्रतिभेबद्दल, कौशल्याबद्दल आदर असतो. त्याच्या कष्टांची, सातत्याची, शिस्तीची जाणीव असते. तो जे सादर करतो आहे त्याबद्दल कुतूहल आणि मग ते शमल्यानंतरचं समाधान असतं. हा माणूस पुढेही काही तरी चांगलं करेल अशी आशा असते. आणि समजा, यातलं काहीही समोर नाही दिसलं, तरीही तो एक हाडामांसाचा माणूस असतो ज्याला कौतुकाची थाप हवी असते.

एक खूप ज्येष्ठ अभिनेत्री, नाटक संपल्यावर आत येऊन कलाकारांना भेटून नाटकातले ‘कॉस्च्युम्स’ कसे छान होते, एवढंच म्हणायच्या. अभिनयाबद्दल काहीही बोलायच्या नाहीत, याची रसभरित वर्णनं मी ऐकली आहेत. मला मात्र शुद्ध शब्दात हा कोतेपणा वाटतो. काय बिघडेल कार्टूनमध्ये दाखवतात तसं ‘डोळ्यात चांदण्या चमचमत असलेल्या’ उत्साही कलाकाराला दोन प्रोत्साहनाचे आणि कौतुकाचे शब्द दिले तर? त्यानं तो हुरळूनच जाईल, की त्याचा विचार करण्याचं तारतम्य त्याच्याकडे असेल, हा त्याचा प्रश्न झाला, तुमचा नाही.

आपल्याकडे कित्येक पिढ्या, ‘पालकांनी मुलांचं कौतुक केलं तर ती शेफारतात’ या समजुतीत जगल्या. आमच्या सुदैवाने आता हा समज बदलला आहे. उलट योग्य वयात मुलाचं योग्य रीतीनं केलेल्या कौतुकामुळे त्याची वाढ उत्तम होते हे आता सिद्ध झालंय. सतत टीका करून मुलं शिकत नाहीत, उलट ती आईवडिलांना कंटाळतात. ‘वडिलांनी आयुष्यात कधी कौतुक केलं नाही, एकदा फक्त पाठीवर हात ठेवला,’ असं काही ऐकलं की माझ्या तर डोळ्यात पाणीच येतं. किती सुंदर क्षणांना मुकलं ते मूल त्याच्या वाढीच्या वयात. सतत लोकांसमोर स्वत:च्या मुलाचं कौतुक करणंही योग्य नाही, पण पालक मुलांच्या जगातला अत्यंत महत्त्वाचा भाग असतात. आणि आपल्या आयुष्यातला एक मोठा भाग आपलं कधी कौतुकच करत नाही, प्रोत्साहन देतो, पण निर्मळ, निर्व्याज आणि मोकळं कौतुक करत नाही, हे मनात येणं काही फार बरं नाही. कधी तरी मुद्दाम चारचौघांत आपल्या मुलांचं, नवऱ्याचं, बायकोचं कौतुक करायला काय हरकत आहे? थेट पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात ‘हिनं माझ्यासाठी आयुष्य वेचलं’ म्हणण्यापेक्षा अध्येमध्ये केलं जाहीर कौतुक तर काही ‘ही’ चिडणार नाहीये, उलट आवडेलच तिला. रांधणाऱ्या माणसाला त्याने केलेला पदार्थ चांगला झालाय हे सांगणं महत्त्वाचं आहे. रोज तेच तेच काम करून कंटाळणाऱ्या सगळ्यांना कौतुकाचे चार शब्द कानावर आले तरी काम करण्याचा हुरूप येतो.

कौतुक ही माणसाची अत्यंत मूलभूत गरज आहे. सध्याच्या भाषेत एकूणच ‘स्ट्रेस’ एवढा वाढला आहे, की एखाद्याच्या नजरेत, कृतीत, शब्दांत आपल्याबद्दल कौतुक दिसणं खूप खूप महत्त्वाचं झालंय. कळणाऱ्याला त्यातलं खरं कौतुक आणि खोटी प्रशंसा कळते. शेवटी, ‘जो शेर समझे मुझे दाद देता है, गले लगाये जिसे गम समझ मे आ जाये’, हा बालमोहन पांडेंचा शेर आठवतो. काही तरी मनापासून आवडायला हवं, त्याबद्दल बोलायला हवं, पोहोचवायला हवं. झोपलेल्या मुलाकडे आई ज्या मायेनं आणि कौतुकानं बघते, ते ना त्या मुलाला दिसत असतं, ना जगात कुणाला. पण ही जी तरल सुंदर आशा आहे… त्यावर सगळं जग चाललं आहे.



Source link