Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 456

woman police who fled after accepting bribe of rs 1000 caught by acb pune print news ggy 03 zws 70

0
woman police who fled after accepting bribe of rs 1000 caught by acb pune print news ggy 03 zws 70



woman police who fled after accepting bribe of rs 1000 caught by acb pune print news ggy 03 zws 70 | एक हजार रुपयांची लाच स्वीकारुन पळून जाणारी महिला पाेलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात





Source link

लोणंद पोलिसांची विजयी कारवाई! खुनानंतर अवघ्या तासाभरात आरोपी जेरबंद

0
लोणंद पोलिसांची विजयी कारवाई! खुनानंतर अवघ्या तासाभरात आरोपी जेरबंद


सातारा :- साताऱ्यातील लोणंद पोलीस ठाण्याच्या टीमने एक अत्यंत धाडसी आणि वेगवान कारवाई करत इंदीरानगर (ता. खंडाळा) येथील खुनातील दोन आरोपींना गुन्हा घडल्यानंतर केवळ एक तासात अटक केली आहे.

दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता इंदीरानगर, ता. खंडाळा, जि. सातारा येथील बिरोबा मंदिराच्या परिसरात जुन्या वादातून किरण किसन गोवेकर (रा. कोरेगाव, ता. फलटण) याचा लाकडी फळकुटी व धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला. आरोपी सतिश भाऊसाहेब काळे व रोहित शिवाजी डेंगरे (दोघेही रा. इंदीरानगर, लोणंद) हे घटनास्थळावरून फरार झाले होते.

या गंभीर घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बी. वाय. बालचीम यांनी तत्काळ सुचना देऊन तपासाची जबाबदारी लोणंद पोलिसांवर सोपवली. सपोनि सुशिल बी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. विशाल कदम, मा.पो.उ.नि. ज्योती चव्हाण, पो.ह.वा. चंद्रकांत काकडे, पो.कॉ. सचिन कोळेकर यांनी अवघ्या तासाभरात तपास करत आरोपींचा शोध घेऊन त्यांना लोणंद येथून ताब्यात घेतले.

ही कारवाई लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सुशिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या यशस्वी मोहिमेत पोउनि. शिवाजी घुले, सपोफौ. देवेंद्र पाडवी, पोहवा. नितीन भोसले, सर्जेराव सुळ, विजय पिसाळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, महेश टेकवडे, विठ्ठल काळे, सुनिल नामदास, सतीष दडस, केतन लाळगे, अभिजीत घनवट, शेख शिंगाडे, राणी कुदळे, भारती मदने, स्नेहल कापसे, होमगार्ड सचिन निकम, अनिल पवार, सुहास काटकर, विकास कोकरे यांनी देखील सहभाग घेतला.

या यशाबद्दल मा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी लोणंद पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.

राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संत समिती बैठकीत ठराव

0
राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संत समिती बैठकीत ठराव



resolution passed to ban political leaders like raj thackeray and jitendra awhad from making unauthorized religious statements || राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संत समिती बैठकीत ठराव





Source link

मुंबईत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

0
मुंबईत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन



सतीश सबनीस फाउंडेशन आणि मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामानाने मुंबईत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ही स्पर्धा विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी असून एकूण 3 लाखांहून अधिक रक्कमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. येत्या रविवारी 6 एप्रिल रोजी ही भव्य बुद्धीबळ स्पर्धा पार पडणार आहे. 

मुंबईतील वांद्रे येथील उत्तर भारतीय सेवा संघाच्या सभागृहात ही स्पर्धा पार पडणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून स्पर्धेची पहिली पार फेरी पडणार आहे. विविध वयोगटासाठी ही स्पर्धा पार पडणार आहे.



Source link

रुग्णालयाचा दावा खोटा, भाजप आमदार अमित गोरखे यांचा आरोप

0
रुग्णालयाचा दावा खोटा, भाजप आमदार अमित गोरखे यांचा आरोप


पुणे : ‘ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ समितीने दिलेला अहवाल खोटा आहे. रुग्णालयाच्या मुजोरीमुळेच हा मृत्यू झाला आहे,’ असा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शुक्रवारी केला. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.

आमदार गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या ईश्वरी या पत्नी होत्या. गोरखे म्हणाले, ‘दीनानाथ रुग्णालयाने १० लाख नव्हे, तर २० लाख रुपये मागितले होते. सुरुवातीला १० लाख रुपये भरण्यास सांगितले होते. आता रुग्णालयाच्या समितीने चुकीचा अहवाल दिला आहे. ईश्वरी यांच्या मृत्यूस रुग्णालयच जबाबदार आहे. डॉ. सुश्रुत घैसास आणि सुशांत भिसे यांचे मोबाइल संभाषणाचे तपशील तपासावेत. त्यातून सत्य बाहेर येईल. डॉ. धनंजय केळकर आणि सुशांत भिसे यांचे झालेले संभाषणही तपासावे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास खरा प्रकार समोर येईल. रुग्णालय आता आपली बाजू खरी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. याप्रकरणी मी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.’

‘रुग्णाला कर्करोग झाल्याचे रुग्णालयाच्या समितीने म्हटले आहे. हे पूर्णपणे खोटे आहे. दीनानाथ रुग्णालयात रुग्णाची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया झाली होती. तिला कर्करोग असता, तर ती एवढे दिवस जिवंत राहू शकली असती का? गर्भधारणेसाठी त्यांनी आयव्हीएफ केले होते. आठव्या महिन्यात प्रसूती करावी लागणार असल्याने चांगल्या रुग्णालयात करावी, म्हणून त्या दीनानाथ रुग्णालयात गेल्या होत्या. कारण तेथे आधी उपचार घेतल्याने डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती होती. रुग्णालयाने उपचार नाकारल्याने रुग्णाचा मृत्यू झाला आहे,’ असा आरोप गोरखे यांनी केला.





Source link

एकनाथ शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला धक्का, मुनावळे जल पर्यटन प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश

0


Eknath Shinde :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सातारा (Satara) जिल्ह्यातील मुनावळे इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्पाचे (Water Tourism Project) काम सुरु होते. मात्र, हे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुशांत मोरे (Sushant More) यांनी याबाबत आंदोलन केलं होतं. 16 परवानग्या मिळाल्या नसल्याने मुनावळे येथील उपमुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम सुरु करता येणार नाही असे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत.

मागील वर्षी 8 मार्चमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प विकसित करण्याचे काम सुरू केले. मुनावळे हे ठिकाण केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी इकोसिन्सिव्ह झोन म्हणून जाहीर केला या ठिकाणी कोणतेही पर्यटन प्रकल्प राबवताना वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकार, केंद्रीय वन्यजीव मंडळ, राज्य वन्यजीव मंडळ, स्थानिक  सल्लागार समिती सह्याद्री व्याघ्र राखीव, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोयना जलसंपदा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत या प्राधिकरणांच्या 16 ना-हरकत परवानग्या मिळवणे गरजेचे असताना सद्य:स्थितीत कोणत्याही विभागाची परवानगी मिळाली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे न हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय पर्यटन प्रकल्पातील कामे सुरू करू नये असे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोयना धरणातील शिवसागर जलाशयात मुनावळे येथे जलपर्यटनाच्या प्रकल्पाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता. गोड्या पाण्यातील हा देशातला पहिलाच जल पर्यटन प्रकल्प आहे. याच्या उदघाटनावेळी एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पामुळं स्थानिकांना कसा फायदा होईल हे सांगितलं होते. स्थानिक तरुणांना रोजगार तयार होणार असून कामासाठी शहरात गेलेला स्थानिक माणुस या प्रकल्पामुळं परत येईल असं सांगून महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या पर्यटकांना आता याचा दुहेरी लाभ होईल असं ते म्हणाले होते. .

महत्वाच्या बातम्या:

Eknath Shinde: आम्ही दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करु, कर्जमाफीच्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंनी जाहीर केली भूमिका

 

अधिक पाहा..



Source link

…ज्या पत्नीच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला, तीच पत्नी प्रियकरासह हातात हात घालून फिरताना दिसली, पोलीसही हादरले

0
…ज्या पत्नीच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला, तीच पत्नी प्रियकरासह हातात हात घालून फिरताना दिसली, पोलीसही हादरले



2022 मध्ये, पोलिसांनी सुरेशला त्याच्या पत्नीचे अवशेष पेरियापटना तालुक्यातील बेट्टाडापुराजवळ सापडले आहेत असं सांगत समन्स बजावलं होतं. 
 



Source link

mumbai local train mega block on central harbour and western lines on saturday and sunday mumbai print news zws 70

0
mumbai local train mega block on central harbour and western lines on saturday and sunday mumbai print news zws 70



mumbai local train mega block on central harbour and western lines on saturday and sunday mumbai print news zws 70 | पश्चिम रेल्वेवर शनिवारी आणि मध्य रेल्वेवर रविवारी ब्लाॅक; प्रवाशांचे होणार हाल





Source link

waqf board properties data in india Islamic management

0
waqf board properties data in india Islamic management


Waqf Properties India Update : बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमतानं मंजूर करण्यात आलं. या ऐतिहासिक विधेयकावर लोकसभा आणि राज्यसभेत वादळी चर्चा झाली. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवलं जाणार आहे. या विधेयकातील नवीन तरतुदींवर मुस्लीम संघटना आणि विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकारनं आणलेलं हे नवीन विधेयक असंवैधानिक असल्याचं इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी म्हटलं आहे. मुस्लीम संघटना या नव्या सुधारित कायद्याला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, या विधेयकानंतर वक्फ बोर्डाकडे नेमकी किती मालमत्ता आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

वक्फ बोर्डाकडे एकूण किती मालमत्ता?

सरकारी आकडेवारीनुसार, वक्फ बोर्डाकडे सुमारे ८.८ लाख एकरची मालमत्ता आहे. संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे यांच्याशी तुलना केली तर जमिनीच्या बाबतीत वक्फ भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संरक्षण मंत्रालयाकडे अंदाजे १७.७५ लाख एकर, तर रेल्वेकडे १२ लाख एकर जमीन असल्याची माहिती आहे. वक्फची मालमत्ता देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरली आहे. यापैकी ७३ हजार एकरहून अधिक जमीन वादाच्या भोवऱ्यात आहे. विधेयकातील नवीन तरतुदींमुळे या जमिनीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वक्फ ही मुस्लिमांनी धार्मिक, धर्मादाय किंवा खाजगी उद्देशांसाठी विशिष्ट उद्देशाने बाजूला ठेवलेली खाजगी मालमत्ता आहे. या मालमत्तेचे लाभार्थी वेगवेगळे असू शकतात, परंतु तिची मालकी अल्लाहकडे (देवाकडे) असते असे मानले जाते.

वक्फ कायद्यात दोन मालमत्तांचा समावेश

वक्फ कायद्यात दोन प्रकारच्या मालमत्तेचा उल्लेख आहे. पहिला वक्फ अल्लाहच्या नावावर आहे, ज्यासाठी कोणताही वारसा हक्क शिल्लक नाही. दुसऱ्या वक्फमध्ये अलल औलाद मालमत्तेचा समावेश होतो. ही अशी मालमत्ता आहे, ज्याची देखभाल वारसदार करतील. या दुसऱ्या वक्फबाबत नव्या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये महिलांचा वारसा हक्क सुरक्षित होणार आहे. वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन केंद्र सरकारद्वारे केले जाते, ज्याअंतर्गत सर्व मालमत्तांची नोंद ठेवली जाते. केंद्र सरकार वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाची देखरेख करते आणि त्यांच्या योग्य वापराची खात्री करते. यामध्ये वक्फ मालमत्तांचे प्रकार, व्यवस्थापन आणि सध्याची स्थिती याची माहिती ठेवली जाते.

वक्फची कोणत्या राज्यात किती मालमत्ता?

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात वक्फच्या एकूण ८.८ लाख एकर मालमता आहेत. यातील सर्वाधिक २.४ लाख एकर मालमत्ता उत्तर प्रदेशात आहे, ज्यामध्ये सुन्नी आणि शिया दोन्ही बोर्ड्सच्या मालमत्तांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशनंतर पश्चिम बंगालमध्ये वक्फची ८० हजार ४८० एकर जमीन आहे, तर पंजाबमध्ये ७५ हजार ५११, तामिळनाडूमध्ये ६६ हजार ९२, कर्नाटकात ६५ हजार २४२, गुजरातमध्ये ३० हजार ८८१, आंध्र प्रदेशात १० हजार ७०८ आणि बिहारमध्ये सुमारे ८ हजार ६०० वक्फ मालमत्ता आहेत. बिहार हे एकमेव राज्य आहे, ज्यात स्वतंत्र सुन्नी आणि शिया बोर्ड आहेत; इतर सर्व राज्यांमध्ये एकत्रित वक्फ बोर्ड्स आहेत.

वक्फच्या मालमत्तांचा वापर कशासाठी?

वक्फ बोर्डाकडे असलेल्या ६.२ लाख मालत्तांपैकी दोन तृतीयांश मालमत्तांमध्ये कबरस्तान, शेतजमीन, मशिदी, दुकाने किंवा घरे आहेत. कबरस्तानमध्ये वक्फची १७.३ टक्के मालमत्ता गुंतली आहे, तर शेतजमीन आणि मशिदीत अनुक्रमे १६ आणि १४ टक्के मालमत्ता आहे. गेल्यावर्षी केंद्र सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडलं होतं. त्यावेळीही या विधेयकाला विरोधकांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतर सरकारने हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवलं, या समितीने सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी सुचवलेल्या १४ दुरुस्ती स्वीकारल्या, तर विरोधी पक्षांनी सुचवलेल्या ४४ सुधारणा समितीने फेटाळून लावल्या. नवीन विधेयकामुळे वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे संचालन आणि नियमन करण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे, ज्यात राज्य वक्फ बोर्ड्सची संरचना आणि वाद निवारणात राज्य सरकाराची भूमिका यामधील बदल समाविष्ट आहेत.

वक्फच्या कोणकोणत्या मालमत्तांवरून वाद?

वामसी पोर्टलनुसार, वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्तांवरून न्यायालयात वाद सुरू आहेत. हे खटले दोन प्रकारात विभागण्यात आले आहेत. पहिला खटला हा बाह्य न्यायालयीन आहे. यामध्ये व्यक्तींशी संबंधित नागरी खटले असतात, जे वक्फ मालमत्तेवरील अधिकार किंवा मालकीवर वाद निर्माण होण्यामुळे दाखल केले जातात, तर दुसरा खटला आंतरिक न्यायालयीन असतो, ज्यात वक्फ बोर्डामध्ये असलेल्या वादांमुळे खटले दाखल होतात. यामध्ये बोर्डातील सदस्य, कर्मचारी किंवा इतर संबंधित व्यक्तींमधील वादांवर चर्चा केली जाते. याशिवाय, हस्तांतरित मालमत्तांवरील खटलेदेखील असू शकतात, ज्यात अवैध हस्तांतरणामुळे नागरी खटले दाखल केले जातात.

बाबरी मशिदीवरून वक्फचा दावा काय?

१९९२ मध्ये उत्तर प्रदेशात बाबरी मशीद पाडण्यात आली होती. ही मशीद वक्फच्या प्रमुख मालमत्तांपैकी एक होती, असा दावा मुस्लीम समुदायाकडून करण्यात आला. मात्र, या जागेवर पूर्वी प्रभू श्रीरामाचे मंदिर होते, असे हिंदू समुदायाने ठामपणे सांगितलं. अयोध्येत आता राम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान, बाबरी मशिदीचा वाद सुरुवातीला उत्तर प्रदेशातील न्यायालयात सुरू होता. २०१९ मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून ऐतिहासिक निकाल दिला होता.

‘वक्फ’चे सर्वाधिक वाद कोणकोणत्या राज्यांत?

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची खरेदी-विक्री करता येत नाही किंवा ती कुणालाही हस्तांतरित करता येत नाही, असं सांगितलं जातं. वक्फच्या सर्वाधिक मालमत्तांचे वाद पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये सुरू आहेत. वामसी पोर्टलनुसार, पंजाबच्या ७५ हजार ५११ वक्फ मालमत्तांपैकी ५६.५ टक्के मालमत्ता अतिक्रमणावर असल्याचा आरोप केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये वक्फकडे सर्वाधिक मालमत्ता असली तरी त्यापैकी तीन हजार ४४ मालमत्तांवर वाद सुरू आहेत. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये तीन हजार ७४२ वादग्रस्त वक्फ मालमत्तांचा समावेश आहे. काही मुस्लीम नेत्यांनी केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध केला आहे, तर काहींनी त्यांचं समर्थनही केलं आहे. “या दुरुस्तीद्वारे केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या मालमत्तेत होणारी मनमानी थांबवेल”, असं ऑल इंडिया मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी म्हटलं आहे.





Source link

विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन पतीकडून इंजीनिअर पत्नीची हत्या, ‘प्लीज आईला वाचवा’ मुलांचा टाहो

0
विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन पतीकडून इंजीनिअर पत्नीची हत्या, ‘प्लीज आईला वाचवा’ मुलांचा टाहो


No match is being played.

Apr 05, 2025 | 3rd ODI

Pakistan in New Zealand, 3 ODI Series, 2025

Apr 04, 2025 | Match 16

Indian Premier League, 2025

MI

(20 ov) 203/8

VS

LSG

191/5(20 ov)

Lucknow Super Giants beat Mumbai Indians by 12 runs
Full Scorecard →

Apr 03, 2025 | Match 15

Indian Premier League, 2025

SRH

(20 ov) 200/6

VS

KKR

120(16.4 ov)

Kolkata Knight Riders beat Sunrisers Hyderabad by 80 runs
Full Scorecard →





Source link