Monday, July 27, 2026
Home Blog Page 455

अमेरिकी आयातकर धोरण भारतीय वस्त्रोद्योगाच्या पथ्यावर

0
अमेरिकी आयातकर धोरण भारतीय वस्त्रोद्योगाच्या पथ्यावर


कोल्हापूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आयातशुल्क धोरणाने भारतीय वस्त्रोद्योगाला लाभ होण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेला प्रामुख्याने चीन, बांगलादेश आणि भारत या तीन देशांकडून कापडाची निर्यात होते. त्यापैकी भारतावर सर्वात कमी आयातशुल्क आकारल्याने त्याचा फायदा होण्याची संधी निर्माण झाली आहे.

भारत हा वस्त्रोद्याोग निर्मिती आणि निर्यातीत जगातील आघाडीचा देश आहे. २०२३ मध्ये भारताने कापड आणि तयार कपडे निर्यातीत जगात सहावे स्थान मिळवले होते. २०२३-२४ मध्ये कापड आणि वस्त्र प्रावरणे यांच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा ३.८ टक्के होता. भारतातून निर्यात होणारे कापड आणि तयार कपडे हे प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपीय महासंघ येथील बाजारपेठेत पाठवले जाते.

अमेरिकेसारखा सधन देश निर्यातदार देशांसाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. अमेरिकेला कापड, कपडे निर्यात करणाऱ्या देशांमध्ये आजवर चीन आघाडीवर आहे. २०२४ मध्ये चीनने ३६.१ अब्ज डॉलर (२९. ६ टक्के) निर्यात केली होती. पाठोपाठ १५.५ अब्ज डॉलरची निर्यात करणारा (१२.७ टक्के) व्हिएतनाम दुसऱ्या स्थानी होता. भारताने ९.७१ अब्ज डॉलर (७. ८ टक्के) निर्यात करून तिसरे स्थान पटकाविले होते. या पाठोपाठ बांगलादेशाने ७.४९ अब्ज डॉलर ( ६.१४ टक्के ) निर्यात केली होती. अमेरिकेत २०२४ मध्ये एकूण १०७ अब्ज डॉलर आयात झाली होती. जगाच्या वस्त्रोद्याोग निर्यात बाजारपेठेच्या तुलनेने ही आकडेवारी १४ टक्के भरभक्कम आहे.

हेही वाचा

चीन, बांगलादेशला फटका

अमेरिकेच्या नव्या आयात कररचनेमध्ये विविध देशांतील तयार कापडावर आयातशुल्क आकारले जाणार आहे. यातील प्रमुख पुरवठादार देशांचा विचार करता ही स्पर्धा प्रामुख्याने चीन, बांगलादेश आणि भारत यांच्यात आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनसाठी ५४ टक्के, बांगलादेश ३७, तर भारतावर २६ टक्के नव्या आयातशुल्काची घोषणा केली. चीनवर मोठी करवाढ लादल्याने यातून भारताला कापड निर्यातीसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. केवळ चीनचा विचार केला तर यापूर्वी या देशासाठी असलेला ३४ टक्के आयातकरात तब्बल २० टक्क्यांची वाढ करत तो ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. चीनसाठी वाढलेला कर तर बांगलादेशातील अस्थिरता या पार्श्वभूमीवर भारताला कापड निर्यातीसाठी आता मोठी संधी निर्माण झाली आहे.

नव्या करधोरणामध्ये चीन, कंबोडिया, व्हिएतनाम, श्रीलंका या देशांची वस्त्रोत्पादने अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी महागडी होणार आहेत. इंडोनेशिया, पाकिस्तान, युरोपीय संघ, तुर्कस्तान आदी देशातील कापड- तयार कपडे तुलनेने स्वस्त असणार आहेत. मात्र या उद्योगातील खऱ्या स्पर्धेचा विचार करता चीन, व्हिएतनाम, श्रीलंका, बांगलादेश, इंडोनेशिया, कंबोडिया, श्रीलंका यांच्यापेक्षा भारतीय वस्त्रोत्पादने स्वस्त होणार आहेत. याचा आपल्याला फायदा होईल. – विश्वनाथ अग्रवाल, माजी अध्यक्ष, संचालक पिडिक्सेल (पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्स्पोर्ट प्रोमोशन कौन्सिल)

हेही वाचा

या नव्या कररचनेचा भारताला फायदा दिसत आहे. मात्र जोडीनेच आपल्या देशातील वस्त्रनिर्मितीचा खर्च कमी होणे आवश्यक आहे. बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, व्हिएतनाम आदी देशांमध्ये वस्त्रनिर्मितीचा खर्च भारतापेक्षा खूप कमी आहे. यामुळे कर वाढला, तरी त्या देशांना अमेरिकेला निर्यात करणे परवडते. या स्पर्धात्मक पातळीवर भारतीय वस्त्रोद्याोगाला नियोजन, व्यूहात्मक रचनेवर भर देऊन वाटचाल केल्यास संधीचा अधिक फायदा घेणे शक्य होणार आहे. – किरण तारळेकर अध्यक्ष, विटा यंत्रमाग औद्याोगिक सहकारी संघ





Source link

सोलवटून जाईन, पण मी माझेपणा टिकवीन…

0
सोलवटून जाईन, पण मी माझेपणा टिकवीन…


‘अशोक अॅट कलिंग’ हे मीरा मुखर्जी यांचं भव्य शिल्प. परदेशी पर्यटक ते पाहताना हरखून जातात, भारताबद्दल आस्था असलेले भारतीयसुद्धा या पुतळ्याकडे पाहताना सुखावतात… असं काय आहे त्यात?

दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलांपैकी ‘आयटीसी मौर्य’ हे तसं जुनं, १९७७ पासूनचं. मध्यंतरी या हॉटेलचं नाव ‘आयटीसी मौर्य शेरेटन’ असं होतं. मालकीच्या करारांनुसार हा बदल झाला होता, पण करार संपले आणि या हॉटेलचं नावही बदलून पूर्ववत झालं… हॉटेलभोवतीच्या बागेतली झाडं एव्हाना वाढली होती, झुडपांचे प्रकारही बदलत गेले वगैरे… पण या हॉटेलच्या बाह्यरूपातली एकच गोष्ट वर्षानुवर्षं तशीच्या तशी राहिली- इथं सम्राट अशोकाच्या पुतळ्याऐवजी उभारलेलं, ‘अशोक अॅट कलिंग’ हे भव्य शिल्प! या शिल्पाची उंची साडेअकरा फूट आणि रुंदीही सुमारे साडेसहा फूट आहे. ते घडवलंय मीरा मुखर्जींनी. सगळेच पुतळे नाकीडोळी नीट पाहणाऱ्या आजच्या महाराष्ट्रीय नजरेला हा पुतळा (तेच ते- शिल्प) जरा ओबडधोबडच वाटेल, पण परदेशी पर्यटक हे शिल्प पाहताना अगदी हरखून जातात, भारताबद्दल आस्था असलेले भारतीयसुद्धा या पुतळ्याकडे पाहताना सुखावतात… असं काय आहे या शिल्पामध्ये? ‘लोककला आणि आधुनिकता यांचा संगम’ म्हणून या शिल्पाकडे पाहिलं जातं. म्हणजे काय? संगम कसा? हे उमजण्यासाठी आधुनिक म्हणजे काय, लोककला म्हणजे काय, हेही समजून घ्यावं लागेल.

लोककला म्हणजे काय, याचं उत्तर अनेकांना सोपं वाटेल. कारण, कुणीही उठावं आणि वारली नृत्य किंवा बंजारा डान्स करावा याला लोककला म्हणत नाहीत हे सर्वांना माहीत असतंच. त्यामुळे ‘लोककला म्हणजे विशिष्ट लोकसमूहानं, प्रामुख्यानं आपल्या समूहासाठीच केलेली अभिव्यक्ती,’ हेही पटतं. विशिष्ट तंत्र किंवा शैली हे तर लोककलेच्या परंपरेचा भाग असतात; पण अनेकदा आशयसुद्धा परंपरेचा भाग असतो- लोककलेतून व्यक्त होणारी काही मिथकं, कथा यांतून त्या समूहाची अस्मिता टिकून राहत असते. समूहातल्या पुढल्या-पुढल्या पिढ्या आपापल्या बुद्धीनं आणि कदाचित आपापल्या पिढीच्या सहमतीनं आशय आणि शैलीमध्ये जी भर घालतात, ती लोककलेतली ‘अभिव्यक्ती’ असते आणि या अशा समूहमनस्क अभिव्यक्तीमुळे परंपरेचं वस्तूकरण (कमॉडिफिकेशन) होत नाही. हे वाचायला ज्यांना कठीण वाटेल त्यांच्यासाठी एक सोपं निष्कर्षवजा वाक्य : कलाकृतीचं वस्तूकरण झालं रे झालं की ‘लोककला’ संपते!

याउलट, आधुनिकतावादी कलावंतांनी कलेच्या वस्तूकरणाला आम्ही पुरून उरणार, अशी जिगर दाखवली होती असा (१८७२ पासूनचा) इतिहास आहे. यथातथ्यवादी चित्रणाचा मूलगामी विचार ज्या युरोपीय देशांमध्ये (शिल्पकलेत रोमन काळापासून आणि रंगचित्रांमध्ये १५व्या शतकापासून) सुरू झाला आणि वाढला होता, त्या देशांमध्ये ‘फोटोग्राफी’ हा मोठा धक्काच होता. तिथल्या कलावंतांनी मग, ‘खऱ्यासारखा भास’ उत्पन्न करणाऱ्या चित्रणात धन्यता न मानण्याचा मार्ग निवडला आणि मग कलावंताचा मुक्तपणा (आशय, शैली किंवा एकंदर अभिव्यक्तीबद्दल प्रत्येक कलावंताला ‘व्यक्ती’ म्हणून स्वातंत्र्य) हीच कलेतली ‘आधुनिकता’ आहे हेही मान्य होऊ लागलं. या मान्यतेनंतरची कला म्हणजे आधुनिकतावादी कला. मग ‘साच्यातून एका शिल्पाच्या नऊच प्रती काढाव्यात’ (आणि एकच स्वत:जवळ ठेवून, बाकीच्या आठ विकाव्यात!) यासारख्या पद्धतीही रुळत गेल्या, तेव्हा त्यांना कुणीच वस्तूकरण मानलं नाही. कारण तोवर एबोनाइट वगैरेपासून कारखान्यांतून हज्जारो ‘कलावस्तूं’चं उत्पादन होऊ शकत होतं किंवा फोटोच्याही शेकडो प्रती काढल्या जाऊ लागल्या होत्या. इथं मुद्दा एवढाच की, आधुनिकतावादी कला आणि लोककला यांच्यातला फरक नुसताच भौगोलिक वगैरे नसून ही दृष्टिकोनांमधली भिन्नता असल्यानं संकल्पनात्मक तफावतही त्यामध्ये आहे.

ही तफावत मिटवण्याचा प्रयत्न मीरा मुखर्जी यांच्याकडून झाला, म्हणून आपल्यासाठी इथं त्या महत्त्वाच्या. ‘उंची साडेअकरा फूट आणि रुंदीही सुमारे साडेसहा फूट’ असं मोठ्ठं शिल्प ‘बाई असूनसुद्धा’ मीरा मुखर्जी यांनी घडवल्याचं कौतुक समजा कुणी केलंच, तर तो मुखर्जी यांच्या बाईपणासकट त्यांच्या कलेचाही अपमानच ठरतो (उलट, कौतुक करणाऱ्यांचा कोतेपणाच यातून दिसतो); हे लक्षात ठेवून पुन्हा त्या शिल्पाकडे पाहिल्यावर, त्या शिल्पातल्या अशोकाचं सौष्ठव आणि त्याच्या कपड्यांसाठी वापरलेलं ‘ढोकरा कास्टिंग’चं तंत्र ही दोन्ही वैशिष्ट्यं नजरेत भरतात. त्यातल्या सौष्ठवाचा संबंध आधुनिकतावादाशी आहे- त्यातही, जर्मन एक्स्प्रेशनिझम या कलाशैलीशी आहे. ढोकरा कास्टिंग हे बस्तरच्या आदिवासी भागांत विकसित झालेलं तंत्र आणि तो तिथल्या लोककला शैलीचा भाग आहे. या लोकशिल्प-शैलीचा आणि त्यामागच्या तंत्राचा केवढा अभ्यास मीरा मुखर्जींनी केला होता, हे जाणून घेण्यासाठी ‘फोक मेटल क्राफ्ट ऑफ ईस्टर्न इंडिया’ हे पुस्तक वाचावं लागेल (‘ऑल इंडिया हॅण्डिक्राफ्ट्स बोर्ड’ या महामंडळानं ते १९७६ मध्ये प्रकाशित केलेलं असल्यामुळे मिळणारही नाही); पण बस्तरच्या कलेचा वापर आधुनिक शिल्पात करण्यापूर्वी मीरा मुखर्जींनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला अक्षरश: सोलवटून- नवं करून- घेतलं होतं. ते कसं, हे लक्षात येण्यासाठी त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहायला हवं.

तो कमीत कमी शब्दांत असा की, कोलकात्याच्या सुखवस्तू घरातल्या मीरा मुखर्जींना वयाच्या चौदाव्या वर्षापासून (१९३७ पासून) ‘इंडियन स्कूल ऑफ ओरिएन्टल आर्ट’ मध्ये दाखल करण्यात आलं. इथं कालीपाद घोष हे ‘इंडियन स्टाइल पेंटिंग’ शिकवत, तर ओरिसाच्या शिल्पकार घराण्यातले गिरिधारीलाल व श्रीधर महापात्र हे दोघे बंधू शिल्पकलेचं मार्गदर्शन करत. हे शिक्षण चालू असताना बंगालचा दुष्काळ पडला आणि मीराला उजवून दिल्लीला नवऱ्याघरी धाडण्यात आलं. रजत गोस्वामी हे ‘तसे आधुनिक विचारांचे गृहस्थ’ असावेत, कारण त्यांच्याशी असलेला ‘संसार सांभाळून दिल्लीच्या कला महाविद्यालयात (तत्कालीन नाव ‘दिल्ली पॉलिटेक्निक’) शिकण्याची परवानगी’(!) मीरा यांना मिळाली. तो काळ- १९४७ ते ५१ – दिल्लीच्या कलाक्षेत्रातही बऱ्याच घडामोडींचा… ‘शिल्पी चक्र’ या कलावंत-समूहाची स्थापना शंखो चौधुरी आदींनी केली होती, लाहोरला राहणारे शिल्पकार भाबेशचंद्र सन्याल फाळणीमुळे दिल्लीत आले होते, धनराज भगत तर ‘पॉलिटेक्निक’मध्ये शिल्पकला शिकवायचेच, वगैरे. पण रजत गोस्वामींशी झालेलं लग्न १९५१ मध्ये मोडलं. मीरा कोलकात्यात, वडिलार्जित घरी आल्या. जवळच ‘१, चौरंगी टेरेस’मध्ये जतीन मजुमदार राहत. या बड्या घरात तेव्हा शांतिनिकेतनात शिकलेले (आणि पुढे ‘अफान्दी’ म्हणूनच जगप्रसिद्ध झालेले) चित्रकार अफान्दी कोएसोमा यांचं प्रदर्शन भरलं तेव्हा अफान्दींची पत्नी आणि मुलगी यांची ओळख काढून, मीरा यांनी शांतिनिकेतनात अफान्दी यांच्या कुटुंबात राहून या चित्रकाराचं मार्गदर्शन मिळवलं. ‘फॉर्म, कम्पोझिशन, स्ट्रक्चरल सिमेट्री (घाट, रचना आणि समतोल) वगैरे कशाचीच चिंता करू नकोस… झाडाचा जिवंतपणा येऊ दे चित्रात! निसर्गात असतोच घाट आणि समतोल…’ असं अफान्दींचं सांगणं. त्या आत्मविश्वासातून पुढल्याच वर्षी ‘१, चौरंगी टेरेस’मध्ये मीरा यांनी स्वत:ची चित्रं प्रदर्शित केली. त्या प्रदर्शनामुळे जर्मन शिष्यवृत्तीसुद्धा मिळाली आणि म्युनिकच्या ‘अकाडेमी डेर बिल्डेनेन कून्स्ट’कडे मीरा (जहाजाने) रवाना झाल्या. तिथल्या चार वर्षांत आव्हानं अनेक होती, पण टोनी ष्टाडलर आणि हाइन्रिक किर्शनर यांचं मार्गदर्शन आणि स्वत:ची हिंमत, लगन, तयारी यांमुळे मीरा त्यातून तरून गेल्या. मीरा यांच्याआधीही, भारतीय महिलेनं परदेशात जाऊन चित्रकला शिकणं नवं नव्हतं. अनिमा अहमद कोलकात्याच्याच पुरोगामी कुटुंबातल्या, त्यांचे वडील प्रतिष्ठित दंतवैद्या आणि राजकारणी. या अनिमांना तर वयाच्या १८ व्या वर्षी पॅरिसच्या ‘अकादेमी यूलियान’मध्ये शिकण्याची संधी मिळाली होती.

पण म्युनिकहून भारतात परतल्यावर मीरा काय करणार होत्या? घर वडिलार्जित, पण ते ‘भावाचं घर’ हे मान्य करून त्यांनी स्वत:च्या पायांवर उभं राहण्यासाठी दार्जिलिंगजवळच्या करसाँगमधल्या एका निवासी शाळेत नोकरी धरली. ती वर्षभर करून, पुढली दोन वर्षं कोलकात्यातल्याच शाळेत त्यांनी ड्रॉइंग शिकवलं. जर्मन एक्स्प्रेशनिझम, कॅथे कोलवित्झ (१८७६-१९४५) या दिवंगत शिल्पकर्तीच्या कामानं दिपून जाण्याचा अनुभव, ‘तू भारतीय आहेस, मग तुझी कला आमच्याचसारखी कशाला हवी?’ हा म्युनिकमध्ये विविध सुरांत/ विभिन्न हेतूंनी विचारला गेलेला प्रश्न आणि त्यातून उभरलेला ‘भारतीयत्वा’चा सवाल, हे सारं विसरून न जाता, त्या चित्रं काढायच्याच. १९६० मध्ये कोलकात्याच्या ‘मॅक्समुल्लर भवना’त प्रदर्शनही भरलं. त्याच वर्षी शाळेच्या मोठ्या सुट्टीत, मोठ्या भावाचे मित्र निर्मल सेनगुप्ता आणि त्यांची बहीण- समवयस्क म्हणून मीराचीही मैत्रीण- यांच्यासह जगदलपूरला जाणं झालं. तेव्हा तो बस्तर भाग हे काही बंगाल्यांचं सुट्टीचं ठिकाण नव्हतं, पण निर्मलबाबू सरकारच्या ‘दंडकारण्य प्रोजेक्ट’वर प्रथमपासून (१९५८) होते. रविवारच्या बाजारात मीरानं कंसधातू (बेलमेटल- तांबं आणि टिन यांचं मिश्रण) वापरून घडवलेल्या मूर्ती पाहिल्या. मूर्तिकार माणिक कैसर. यानं त्या इतक्या प्रभावित झाल्या की, कैसर यांच्या गावी- गंगामुण्डा भागातल्या घौरा बस्तीवर जाऊन त्यांनी या प्रकारच्या कामाचा अभ्यास सुरू केला. असा अभ्यास आणखी करता यावा, म्हणून ‘ऑल इंडिया हॅण्डिक्राफ्ट्स बोर्डा’कडे अर्जही केला. मग मार्च १९६१ मध्ये बोर्डाचं उत्तर आलं- ताबडतोब निघा. बंगलोरला (आताचं बेंगळूरु) पोहोचा. तिथून ब्राँझ कास्टिंगचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटकात फिरा.

मीरा मुखर्जी निघाल्या. ताबडतोब. अभ्यास करून दिला अहवाल. याचं फळ म्हणजे १९६२ ते ६४ अशी ‘अँथोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची फेलोशिप मिळाली. काठमांडूपासून दक्षिणेत धातूच्या आरशांसाठी प्रसिद्ध असलेल्या अरणमुला (केरळ) पर्यंत त्या फिरल्या. बस्तरवर विशेष भर देण्याची त्यांची विनंतीही मान्य झाली (कारण ‘आदिवासी समाजांमधलं धातूकाम तंत्र’ हे बस्तरमध्येच आहे). आणि मग १९६५ मध्येच मीरा यांनी बनवलेला अहवाल बोर्डाकडे धूळ खात पडला! तोवर मात्र मीरा यांनी ठरवलंच होतं- आपणही धातूची शिल्पंच घडवायची. कोलकात्यापासून जरा दूरच त्यांनी स्टुडिओ थाटला. तिथंच भट्टीही उभारली. बस्तरच्या कारागीरांच्या मदतीनं ‘मीरा-दी’ शिल्पं घडवू लागल्या. १९७२ पासून बक्षिसं मिळू लागली, नाव होऊ लागलं.

म्युनिकमध्ये भेडसावू लागलेला ‘तुझी कला कुठेय?’ हा सवाल आता सुटू लागला होता. मीरा मुखर्जी या त्यांच्या शैलीसाठी ओळखल्या जाऊ लागल्या. ‘अशोक’ हे शिल्प घडलं, तेव्हा मीरा ५४ वर्षांच्या होत्या. म्हणजे तोवर त्या संघर्षच करत होत्या. मग स्थिरावल्या, तेव्हा मात्र त्यांनी कारागिरांच्या बायकामुलींनाही स्टुडिओतच वसवलं, या महिलांकडून ‘कांथा’ कारागिरीच्या मिषानं त्यांना त्यांच्या कलात्म अभिव्यक्तीसाठी मीरा प्रोत्साहन देऊ लागल्या. स्त्रीला संघर्ष करावा लागतो, करता येतो आणि यशस्वीही होता येतं हे स्वानुभवातून उमगलेल्या मीरा आता स्त्रीकेंद्री विचार अधिक सजगपणे मांडू लागल्या. ‘माझी कलाकृती (जरी अनेक मदतनीस त्यामागे असले तरी) माझीच आहे’ असं सार्थपणे त्या म्हणू शकत होत्या.

कुणी यूट्यूबवरली त्यांची फिल्म पाहून म्हणेल, ‘इथंपण विषमताच दिसतीय की… त्या मीरादीदी कशा सगळ्यांच्या प्रमुख, बाकीचे सगळे त्यांचे नोकरच…’ – पण ज्ञानाची, अनुभवाची विषमता कायमस्वरूपी नसते. ती नेहमीच मान्य करावी आणि त्यातून आपणही ज्ञान, अनुभव शोधून पुढं जावं. हे मीरादींनीही केलं- म्युनिकवरच न थांबता माणिक कैसरकडूनही त्या शिकल्याच. एक प्रकारे, नवजोत वगैरे पुढल्या शिल्पकर्तींना त्यांनी वाट खुली करून दिली!





Source link

बांदा दशक्रोशीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; केळी, झाडे कोसळली

0
बांदा दशक्रोशीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; केळी, झाडे कोसळली



Sindhudurg: Heavy rain with strong winds in Banda; Bananas, trees fell सिंधुदुर्ग : बांदा दशक्रोशीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; केळी, झाडे कोसळली





Source link

भारतातील 80 टक्के सोनं ‘या’ राज्यात सापडते; जगातील मोठ्या सोन्याच्या खाणींना टक्कर देणारे ठिकाण

0
भारतातील 80 टक्के सोनं ‘या’ राज्यात सापडते; जगातील मोठ्या सोन्याच्या खाणींना टक्कर देणारे ठिकाण


No match is being played.

Apr 05, 2025 | Match 18

Indian Premier League, 2025

RR

(20 ov) 205/4

VS

PBKS

155/9(20 ov)

Rajasthan Royals beat Punjab Kings by 50 runs
Full Scorecard →

Apr 05, 2025 | Match 17

Indian Premier League, 2025

DC

(20 ov) 183/6

VS

CSK

158/5(20 ov)

Delhi Capitals beat Chennai Super Kings by 25 runs
Full Scorecard →

Apr 05, 2025 | 3rd ODI

Pakistan in New Zealand, 3 ODI Series, 2025





Source link

Pune Deenanath Mangeshkar Hospital Twin Girls State Government Take Big Disicions over Treatment Declare by CM Devendra Fadnavis

0
Pune Deenanath Mangeshkar Hospital Twin Girls State Government Take Big Disicions over Treatment Declare by CM Devendra Fadnavis



Pune Deenanath Mangeshkar Hospital Twin Girls State Government Take Big Disicions over Treatment Declare by CM Devendra Fadnavis | पुण्यातील ‘त्या’ जुळ्या मुलींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर!





Source link

CSK Coach Stephen Fleming Statement on MS Dhoni Retirement Said I don’t Even Ask him These Days CSK vs DC IPL 2025

0
CSK Coach Stephen Fleming Statement on MS Dhoni Retirement Said I don’t Even Ask him These Days CSK vs DC IPL 2025


IPL 2025 MS Dhoni Retirement Rumour: आयपीएल २०२५ च्या मध्यातच धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्यात सुरू होती. सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेने लक्ष वेधलं होतं. दरम्यान धोनीचे आई-वडिल पहिल्यांदाच त्याचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते. यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना अधिक वेग आला. पण धोनी खरंच निवृत्ती घेणार आहे का? यावर संघाचे कोच स्टिफन फ्लेमिंग यांनी उत्तर दिलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सामन्यापूर्वी धोनी या सामन्यात पुन्हा एकदा संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे, अशी चर्चा होती. सीएसकेचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तो दिल्लीविरूद्धचा सामना खेळणार नाही, अशी चर्चा असल्याने धोनी नेतृत्त्व करेल असे म्हटले जात होते. यानंतर धोनी निवृत्ती घेईल अशी चर्चा रंगली. पण असं काहीचं घडलं नाही. कारण ऋतुराज सामन्यासाठी मैदानात उतरला होता.

तसेच, सामन्याच्या आधी समालोचकांनी सांगितले होतं की या सामन्यासाठी धोनीचे आईबाबा देखील आले आहेत, जे धोनीच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याला खेळताना पाहण्यासाठी आले आहेत. सामना सुरू असताना धोनीचे आई-वडिल स्क्रिनवर दिसले, याचबरोबर त्याची पत्नी आणि लेकही उपस्थित होते. संपूर्ण कुटुंब उपस्थित असलेलं पाहताच धोनी खरंच निवृत्ती जाहीर करेल असं चित्र होतं. पण सामन्यानंतर संघाच्या कोचने यावर उत्तर दिलं आहे.

हेही वाचा

सामना संपल्यानंतर धोनी किंवा त्याची फ्रँचायझी चेन्नईकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नसली तरी हा धोनीचा शेवटचा सामना होता का हा प्रश्न चाहत्यांच्या मनात कायम होता. संघाच्या पराभवानंतर प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना हा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्टपणे नाकारले.

हेही वाचा

कोच स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, अफवा थांबवणं हे माझं काम नाही. मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मला अजूनही त्याच्याबरोबर काम करायला मजा येतेय. तो अजूनही एकदम मजबूत दिसत आहे. मी आजकाल त्याला निवृत्तीबद्दल विचारतही नाही.”

हेही वाचा

स्टीफन फ्लेमिंगच्या वक्तव्यानंतर धोनी आयपीएल 2025 च्या मध्यात निवृत्ती घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. चेन्नईचा पुढचा सामना पंजाब किंग्जविरुद्ध ८ एप्रिलला मुल्लानपूर येथे होणार आहे.





Source link

कायद्यातील ‘या’ एका कलमामुळे वक्फ बोर्ड भारतात कुणाच्याही जमिनीवर कधीही दावा करुन ताबा घेऊ शकतो

0
कायद्यातील ‘या’ एका कलमामुळे वक्फ बोर्ड भारतात कुणाच्याही जमिनीवर कधीही दावा करुन ताबा घेऊ शकतो


Apr 05, 2025 | LIVE

Indian Premier League, 2025

Apr 05, 2025 | Match 17

Indian Premier League, 2025

DC

(20 ov) 183/6

VS

CSK

158/5(20 ov)

Delhi Capitals beat Chennai Super Kings by 25 runs
Full Scorecard →

Apr 05, 2025 | 3rd ODI

Pakistan in New Zealand, 3 ODI Series, 2025

Apr 04, 2025 | Match 16

Indian Premier League, 2025

MI

(20 ov) 203/8

VS

LSG

191/5(20 ov)

Lucknow Super Giants beat Mumbai Indians by 12 runs
Full Scorecard →





Source link

हक्काच्या पाण्यासाठी रणसंग्राम! – संजीवराजेंचा इशारा; “फलटणचा हक्क हिरावू देणार नाही”

0
हक्काच्या पाण्यासाठी रणसंग्राम! – संजीवराजेंचा इशारा; “फलटणचा हक्क हिरावू देणार नाही”

फलटण (सासवड) :“नीरा-देवघर धरणातून वाचणाऱ्या पाण्यावर फलटण-खंडाळ्याचा हक्क प्रस्थापित आहे, हे पाणी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न झाला, तर तीव्र संघर्ष छेडू,” असा ठाम इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. सासवड (ता. फलटण) येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

“गवगवा करणाऱ्यांनी पाणी भलत्याच दिशेने वळवलं”

संजीवराजेंनी माजी खासदारांवर निशाणा साधत म्हटलं की, “जे पाणी फलटण-खंडाळ्यासाठी वाचलं होतं, त्याचा गवगवा करत ते सांगोला-पंढरपूरकडे वळवण्याचा प्रयत्न झाला, आणि आता तर ते तिसऱ्याच दिशेने वळवलं जात आहे. हे खपवून घेणार नाही. हे पाणी आमचं आहे आणि ते आमच्याकडेच राहिलं पाहिजे.”

“पाण्यावर हक्क प्रस्थापित करणार्‍यांचा संघर्ष विसरू नका”

“आ. रामराजेंनी पाणी प्रश्नासाठी मोठा लढा दिला. कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली, तेव्हा माजी खासदार शिक्षण घेत होते. त्यांचं पाणी आणल्याचं दावं हास्यास्पद आहे,” असा टोला संजीवराजेंनी लगावला.

“नव्या नेतृत्वाचा उदय; जुन्या राजकारणाला रामराम”

संजीवराजेंनी पुढे स्पष्ट केलं की, “राजकारणात जे मोठं झालं ते आता स्वतःच्या फायद्यासाठी पळून गेलेत. आता नवे दमाचे नेतृत्व उभे करून, तालुक्याला सुसंस्कृत राजकारण देण्याची वेळ आली आहे. खचून न जाता कामाला लागा.”

इतर प्रमुख उपस्थितांचे मत :

  • माजी आमदार दीपक चव्हाण – “रामराजेंच्या मार्गदर्शनामुळे शैक्षणिक, हरित आणि औद्योगिक क्रांती झाली. पुढच्या सर्व निवडणुका ताकतीने लढू.”
  • जिल्हा परिषद माजी सदस्य दत्ता अनपट – “1995 मध्ये रामराजेंनी पाणी प्रश्नासाठी सरकारला पाठिंबा दिला. फलटणमध्येच मुख्यमंत्री मनोहर जोशींनी कृष्णा खोरे महामंडळाची घोषणा केली होती.”

संपूर्ण कार्यक्रमात राजकीय धुराळा उडवत संजीवराजेंनी स्पष्ट संदेश दिला – पाण्याच्या हक्कावर कोणतीही तडजोड मान्य नाही!

भ्रष्ट राजकारण्यांवर जलद गतीने खटले चालवा, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांंचे मत

0
भ्रष्ट राजकारण्यांवर जलद गतीने खटले चालवा, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांंचे मत



kiran Bedi stated corrupt politicians must be prosecuted for fundamental reforms and honest leadership || भ्रष्ट राजकारण्यांवर जलद गतीने खटले चालवा, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांंचे मत





Source link

best foods to eat in Summer nutritionist shares better options

0
best foods to eat in Summer nutritionist shares better options



best foods to eat in Summer nutritionist shares better options | उन्हाळ्यात कोणत्या प्रकारच्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोणते पदार्थ खाणे टाळावे? वाचा तज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ यादी





Source link