Monday, July 27, 2026
Home Blog Page 454

रसिक स्पेशल: ‘जिबली’ची चित्रे अन् धोक्याच्या रंगछटा

0
रसिक स्पेशल:  ‘जिबली’ची चित्रे अन् धोक्याच्या रंगछटा


अतुल कहाते11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘एआय’चा आवाका, त्याचा वेग, झपाटा हे सगळं अवाक् करून सोडणारं आहे. आपल्याला त्यामुळं गांगरल्यासारखं होत असलं, तरी ‘जिबली’च्या निमित्तानं आपली सारासार विवेकबुद्धी गमावून ‘एआय’च्या त्सुनामीत गटांगळ्या खाण्यापासून तरी निदान स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे!

भारतात जिलबी सगळ्यांना माहीत असली, तरी गेल्या काही दिवसांपासून आपल्या डिजिटल विश्वात ‘जिबली’ हा नवा प्रकार अचानक धुमाकूळ घालू लागला आहे. यामागेही पुन्हा एकदा ‘एआय’चंच तंत्रज्ञान असणं, हा आता आश्चर्यही वाटू नये इतका सातत्यानं घडणारा प्रकार असल्याचं दिसत आहे. हायाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाता आणि तोशिओ सुझुकी या तिघांनी १९८५ मध्ये जपानच्या टोकियोमधल्या कोगाने या भागात ‘स्टुडिओ जिबली’ची स्थापना केली. तेव्हापासून अॅनिमेशन, जाहिराती, टीव्हीसाठीचे चित्रपट अशा अनेक गोष्टींसंबंधीची निर्मिती करण्याचं काम जिबलीकडून होतं आहे. जिबलीचं वैशिष्ट्य म्हणजे, पारंपरिक पद्धतीनं तयार केले जात असलेले कार्टून, अॅनिमेशनपट यांच्यापेक्षा खूप वेगळ्या प्रकारची आणि जिवंत वाटतील अशी चित्रं त्यात असतात. बहुतेक जिबली चित्रं एखाद्या निष्णात चित्रकारानं हातानं काढल्यासारखी वाटत असल्यामुळं ती अगदीच बघत राहावीशी वाटतात.

गंमत म्हणून ठीक, पण… ‘एआय’ तंत्रज्ञानाची मूळ संकल्पना म्हणजे माहितीच्या अतिविशाल साठ्यांचा अक्षरश: फडशा पाडणे, त्यातून शिकणे आणि शिकलेल्या गोष्टींचा वापर प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी किंवा नवनिर्मितीसाठी करणे. ‘माहिती’ हा यातला महत्त्वाचा मुद्दा. इथे माहिती म्हणजे मजकूर, चित्रं, व्हीडिओ, आवाज, संगीत असं काहीही असू शकतं. मोझार्टच्या सिंफनी, भीमसेनजी किंवा किशोरीताईंची रागांची सादरीकरणं, चित्रपट हे सगळं ‘एआय’ समजू / ऐकू / वाचू / बघू शकतं आणि त्यातून शिकून नवं तयार करू शकतं. साहजिकच, जिबलीची आजवरची चित्रं बघून त्यानुसार नवी चित्रं तयार करणं किंवा आपण दिलेल्या वैयक्तिक चित्राचं रूपांतर जिबलीसारख्या चित्रामध्ये करणं हे ‘एआय’ला सहजशक्य आहे. यासाठीची तरतूद ‘ओपन एआय’ आणि इतर कंपन्यांनी करून दिल्यावर जगभरात आपल्या छायाचित्रांचं रूपांतर जिबलीसारख्या चित्रांमध्ये करण्याची लाटच पसरली. निव्वळ गंमत म्हणून हा प्रकार करून बघणं ठीक असलं, तरी यातून दोन ठळक मुद्दे समोर येतात : पहिला स्वत:पुरता, तर दुसरा सर्वव्यापी. त्याविषयी बोललं पाहिजे.

‘डीप फेक’चा धोका : पहिला मुद्दा म्हणजे, आपण आपली स्वत:ची, कौटुंबिक, खासगी छायाचित्रं जिबलीसारख्या स्वरूपात काढून घेण्यासाठी स्वत:हून पुरवतो, तेव्हा आपण ‘एआय’ला आयतं खाद्य पुरवतो. ‘एआय’चं शिक्षण पूर्णपणे त्याला मिळू शकत असलेल्या माहितीच्या आधारावर सुरू असल्यामुळं त्याच्यासाठी ही पर्वणीच आहे. यातून आपली छायाचित्ररूपी माहिती ‘एआय’ कंपन्यांकडे तर जातेच; पण तिथून ती कशी, कुणासाठी, कधी वापरली जाईल, यावरचं नियंत्रण आपण पूर्णपणे गमावून बसतो. ‘डीप फेक’सारखे प्रकार सातत्यानं घडत असताना आपण स्वत:हून हा धोका ओढावून घेण्यासारखं आहे. उद्या आपल्या कुटुंबातल्या कुणाचा ‘डीप फेक’ व्हिडिओ निघाला किंवा आपल्या कुटुंबातल्या कुणाचा आपण संकटात असल्याचा बनावट पण अगदी खरा वाटणारा व्हिडिओ कॉल आला आणि आपण त्याला फसलो, तर त्यामागे आपणच अशा प्रकारे ‘एआय’ला पुरवलेलं खाद्य कारणीभूत ठरू शकतं. काही वर्षांपूर्वी फेसबुकवर.. ‘तुम्ही आत्ता अमुक वर्षे वयाचे असताना असे दिसत असाल, तर तमुक वर्षांचे झाल्यावर कसे दिसाल?’ अशा प्रकारच्या आकर्षक गोष्टी असायच्या. असंख्य लोकांनी आपली छायाचित्रं फेसबुकला यासाठी पुरवून समृद्ध केलं. याचा हा आधुनिक प्रकार म्हणता येईल.

रोजगारांच्या मुळावर घाव : दुसरा मुद्दा सर्वव्यापी अशासाठी की, आज जिबली तर उद्या काय, असा प्रश्नच विचारण्याची सोय आता ‘एआय’मध्ये राहिलेली नाही. ‘एआय’साठी खरोखरच काहीही अशक्य नाही. सगळ्या क्षेत्रांमधल्या सगळ्या गोष्टी शिकणं ‘एआय’ला शक्य आहे. त्यामुळे अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची मुळात गरजच काय, असा प्रश्न विचारला जाणंही अपरिहार्य झालं आहे. जिबलीचं सोडा; ज्या संगणक क्षेत्रानं ‘एआय’ची निर्मिती केली आहे, त्या क्षेत्रामध्येच ‘प्रोग्रॅमिंग’ किंवा ‘कोडिंग’ करत असलेल्यांची गरज लवकरच खूप कमी होईल, अशी परिस्थिती ‘एआय’ने निर्माण केली आहे. म्हणजेच, संगणक क्षेत्रानं रोजगारांच्या बाबतीत आपल्या मुळाशीच घातलेला हा घाव आहे.

‘एआय’ला काहीही अशक्य नाही : जिबलीच्या बाबतीत बोलायचं, तर जीव ओतून चित्रं काढत असलेल्या चित्रकारांचं काय? मुळात जिबलीची निर्मिती केलेल्या लोकांचं काय? आता ‘एआय’मध्ये सर्रास कुणीही अशी चित्रं काढू शकत असेल आणि अॅनिमेशन तयार करू शकत असेल, तर ‘जिबली’ या मूळ कंपनीकडं कोण जाईल? इतर कुठल्याही क्षेत्राच्या बाबतीतही आपल्याला असंच म्हणता येईल. फक्त कला, साहित्य यापुरतं हे मर्यादित नाही, हे संगणकशास्त्राच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेलच. पण, इतरही असंख्य क्षेत्रांमध्ये माणूस करत असलेलं काम ‘एआय’साठी अजिबात अशक्य नसल्याचं आपल्या लक्षात येईल. ‘एआय’चा आवाका, त्याचा वेग, झपाटा हे सगळं अवाक् करून सोडणारं आहे. आपल्याला त्यामुळं गांगरल्यासारखं होत असलं, तरी ‘जिबली’च्या निमित्तानं आपली सारासार विवेकबुद्धी गमावून ‘एआय’च्या त्सुनामीत गटांगळ्या खाण्यापासून तरी निदान स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे!

‘एआय’ माणसासारखा विचार करू लागला तर..? ‘एआय’चे ‘गॉडफादर’ जेफ्री हिंटन यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला : ‘एआय खरोखरच माणसासारखा विचार करू शकेल का?’ यावर हिंटन यांनी प्रतिप्रश्न केला : ‘माणूस विचार करतो म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला समजलेलं आहे का?’ हे ऐकून मुलाखतकार गडबडला. हिंटन पुढे म्हणाले : ‘जेव्हा आपल्याला हे समजेल, तेव्हा ते ‘एआय’ला शिकवणं अगदी सहजशक्य आहे.’

(संपर्कः akahate@gmail.com)



Source link

कव्हर स्टोरी: जल – कारभाराचं घातक ‘प्रदूषण’

0
कव्हर स्टोरी:  जल – कारभाराचं घातक ‘प्रदूषण’


प्रदीप पुरंदरे14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गंगा की गटारगंगा..? नद्यांच्या प्रदूषणाकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष वेधल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. प्रत्यक्षात मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक प्रदूषित होत असलेल्या नद्यांच्या या अवस्थेच्या मुळाशी जाण्याची आपली तयारी नाही. नद्यांच्या स्थितीवरुन एकमेकांना दूषणे देताना, एकूणच आपल्या ‘प्रदूषित’ जल-कारभाराकडे आपण सोयिस्कर डोळेझाक करत आलो आहोत.

नद्या या जीवनवाहिनी असल्याने साहित्य, संस्कृती, धर्म, राजकारण, पर्यावरण आणि एकूणच जीवनात त्यांना मूलभूत महत्त्वाचे स्थान आहे. विशेषत: भारतात नद्यांभोवती अनेक धार्मिक श्रद्धा, धारणा आणि आचार-विचार एकवटले आहेत. नद्या या धार्मिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय भावनांचे प्रतीक बनल्याने कळत – नकळत राष्ट्रीयत्वाशी जोडल्या गेल्या आहेत. आपल्या जीवन व्यवहारातील यश, समृद्धी, ऐश्वर्य, सौंदर्य, आरोग्य, दीर्घायुष्य, रोगनिवारण, पापक्षालन, उदरभरण, प्रेम, संतती, पुण्यसंचय आदी अनेक विषयांशी संबंधित धार्मिक दृष्टिकोनांचा / मूल्यांचा संबंध नद्यांशी जोडण्यात आला आहे. धार्मिक विधींमध्ये शुद्धीकरणासाठी बहुतांश वेळा नद्यांचे जल वापरले जाते. नद्यांच्या उगमस्थानांना आणि संगमांना तीर्थस्थळांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नद्यांमध्ये स्त्रीत्व असल्याचीही एक धारणा आहे. पण, याचा अर्थ काय होतो? तर भारतीय समाजात स्रियांना जशी वागणूक मिळते तशीच ती नद्यांनाही मिळते. एकीकडे तात्त्विक पातळीवर तिचे माता आणि देवता असे उदात्तीकरण केले जाते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र नद्यांना दूषित केले जाते, अतिक्रमण करून त्यांचे प्रवाह आक्रसण्यात येतात. पाण्याचा अतिवापर, प्रवाहांवरील अतिक्रमण आणि पात्रांमध्ये होणाऱ्या प्रदूषणामुळे आपल्या नद्या निर्जीव बनू लागल्या आहेत.

आपल्या नद्यांची विदेशातील स्वच्छ, नितळ, प्रवाही नद्यांशी तुलना करताना, त्यांच्या बाबतीत अवाजवी भावनिक दृष्टिकोन ठेऊन वास्तविक भूमिका घेण्याचे मात्र आपण टाळतो. या संवेदनशील मुद्द्यावर केवळ राजकारण न करता, नद्यांच्या स्थितीचा अभ्यास करुन त्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. सध्या केंद्राची तसेच राज्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळे अस्तित्वात आहेतच; शिवाय नद्यांच्या स्वच्छतेसाठी सरकारांकडून अनेक अभियानांची घोषणाही झाली आहे. पण, नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी कठोर, काटेकोर आणि एकसमान राष्ट्रीय धोरण नसल्याने कुणाचेच उत्तरदायित्व निश्चित होत नाही. परिणामी नद्यांचे प्रदूषण रोखण्यास ना सरकार यशस्वी होते, ना समाज. खरे तर हा प्रश्न व्यवस्थांच्या तांत्रिक सक्षमतेचा नाही, तर जल-कारभारातील (Water Governance) ‘प्रदूषणा’चा आहे. ते कोण आणि कसे दूर करणार, यावरच नद्यांचे भवितव्य अवलंबून असेल.

प्रदूषण-प्रवण पाणी : भूपृष्ठावरील ‘दृश्य स्वरूपातील’ पाणी प्रदूषित होण्याची शक्यता जास्त असते. पण, ते सार्वजनिक मालकीचे असल्याने त्याचे सामूहिक व्यवस्थापन शक्य होते. त्याचे रूपांतर भूजलात झाले की ते ‘अदृश्य’ आणि खासगी मालकीचे होते, तिथे व्यक्तिवाद फोफावतो. हे भूजल प्रदूषित होण्याची शक्यता तुलनेने कमी असते. पाण्याला भावना आणि मूल्ये नसतात. ते आपले उताराकडे वाहते, कोणी अडवले तर अडते, उपसा केला तर परत उताराकडे जाते. समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटल्याप्रमाणे, विषामध्ये विष, अमृतामध्ये अमृत, सुगंधात सुगंध आणि दुर्गंधामध्ये दुर्गंध होण्याच्या त्याच्या स्वभावामुळे ते मुळातच प्रदूषण-प्रवण आहे.

महाराष्ट्रातील नद्यांची सद्यस्थिती राज्यातील बहुतांश नद्यांच्या प्रवाहात असंख्य अडथळे आणि अतिक्रमणे आहेत. नदीतील पाण्याचा अमाप उपसा आणि प्रचंड वापर होतो आहे. प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. नीती आयोगाच्या मते, देशातील ७० टक्के पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत प्रदूषित आहेत. पावसाळ्यानंतर नदीकडे वाहणाऱ्या भूजलात (बेस फ्लो) लक्षणीय घट झाली आहे. नद्यांसंदर्भातील आकडेवारी आणि माहिती उपलब्ध नसणे किंवा तिची विश्वासार्हता संशयास्पद असणे हा प्रकार नेहमीचा आहे. हवामान बदलामुळे तर आता सगळेच संदर्भ बदलले आहेत.

जलप्रदूषणाची मुख्य कारणे : – अशास्त्रीय, नियोजनशून्य, बेलगाम शहरीकरण. – पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत होणारे बेजबाबदार औद्योगिकरण. – कारखान्यांतील घातक रसायने, औद्योगिक सांडपाणी विनाप्रक्रिया नद्यांमध्ये सोडणे. – नागरी भागातील मलजल / सांडपाणी, गटारी-नाल्यांचे पाणी थेट नदीपात्रात सोडणे. – शेतीतून वाहून जाणारे खते आणि किटकनाशके मिश्रित पाणी नदीत मिसळणे. – जलस्त्रोतांबाबतची बेपर्वाई, पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणातून फोफावलेला चंगळवाद.

नियंत्रण व्यवस्था किती सक्षम? जलप्रदूषण रोखणे आणि जलगुणवत्ता राखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) आणि राज्यस्तरावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) या संस्था, पाणी (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम १९७४ तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ या कायद्यांनुसार कार्यरत आहेत. राष्ट्रीय जलगुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत ‘एमपीसीबी’ पाण्याच्या गुणवत्तेचे संनियंत्रण करते. त्यासाठी जलगुणवत्ता निर्देशांक (Water Quality Index) वापरला जातो. याबाबतचा तांत्रिक तपशील गोदावरी नदीच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यात उपलब्ध आहे. तथापि, या सरकारी यंत्रणांनी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी पूर्ण क्षमतेने आणि पारदर्शकतेने काम केले असते, तरी बऱ्याच प्रमाणात चित्र बदलले असते.

कसे रोखता येईल नद्यांचे प्रदूषण? नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी आणि पात्रालगतची अतिक्रमणे या दोन कळीच्या बाबींसंदर्भात ठोस निर्णय व कारवाई होण्याची आवश्यकता आहे. निळ्या आणि लाल पूररेषा क्षेत्रातील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात नगरविकास विभागाच्या ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली’च्या आधारे नगरपालिका, महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हाधिकऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. या कारवाईसाठी महाराष्ट्र नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हे कायदे तसेच जलसंपदा विभागाचे २ मार्च २०१५ आणि ३ मे २०१८ रोजीचे शासन निर्णय वापरावेत. त्याचवेळी, सर्व प्रकारच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाण्याचा तिसरा स्त्रोत निर्माण करण्याची गरज आहे.

(संपर्कः pradeeppurandare@gmail.com)



Source link

रावबा गजमलच्या ‘सांगळा’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार

0
रावबा गजमलच्या ‘सांगळा’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार



Raoba Gajmal Sangala wins Best International Marathi Film award रावबा गजमलच्या ‘सांगळा’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार





Source link

Actors Dilip Prabhavalkar and Vijay Kenkare in the play ‘Patrapatri’ ‘पत्रापत्री’चा आज सुवर्णमहोत्सवी प्रयोग

0
Actors Dilip Prabhavalkar and Vijay Kenkare in the play ‘Patrapatri’ ‘पत्रापत्री’चा आज सुवर्णमहोत्सवी प्रयोग


मराठी रंगभूमीवरील एक आगळावेगळा प्रयोग आणि मनाला भिडणारे नाटक म्हणजे अभिनेता दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे या जोडीचे ‘पत्रापत्री’. गेल्या वर्षी १७ मे रोजी रंगभूमीवर दाखल झालेल्या ‘पत्रापत्री’ या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ४.३० वाजता ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रंगणार आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा असून, रसिक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे.

मुंबईत एनसीपीए येथे झालेल्या पहिल्या प्रयोगापासून ते अमेरिकेतही १६ प्रयोगांचा अत्यंत यशस्वी दौरा पूर्ण करणारं हे नाटक लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या ‘पत्रापत्री’ या पुस्तकावर आधारित आहे. दोन वृद्ध मित्र, तात्यासाहेब आणि माधवराव, यांच्यातील पत्रव्यवहारावर आधारित हे नाटक हलकीफुलकी मांडणी असलेले प्रभावी भाष्य करणारे आहे.

या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रयोगात केवळ पाच पत्रे सादर केली जातात आणि ती दरवेळी बदलत राहतात. त्यामुळे प्रत्येक प्रयोगात प्रेक्षकांना नवीन अनुभव मिळतो. सध्या नाटकात असलेले एक पत्र इंडियन प्रीमियर लीगवर विनोदी भाष्य करते. क्रिकेटच्या या आकर्षक स्वरूपावर दोन वृद्ध मित्रांचे वेगवेगळे दृष्टिकोन मनोरंजनात्मक पद्धतीने सादर केले जातात, हे विशेष आकर्षण ठरते.

‘पत्रापत्री’ या नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांनी केले आहे. तसेच दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे यांच्या अतुलनीय अभिनयामुळे हे नाटक अधिकच प्रभावी ठरते. या नाटकाचे लेखन व नाट्यरूपांतर नीरज शिरवईकर यांनी केले आहे.





Source link

‘सुंदर मी होणार’ पुन्हा रंगभूमीवर, पु. ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नव्या कलाकारांच्या संचात नाटक

0
‘सुंदर मी होणार’ पुन्हा रंगभूमीवर, पु. ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नव्या कलाकारांच्या संचात नाटक



‘Sunder Me Honar’ play is back on stage ‘सुंदर मी होणार’ पुन्हा रंगभूमीवर, पु. ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नव्या कलाकारांच्या संचात नाटक





Source link

What is special about the play The Damayanti Damle? द दमयंती दामले : सासूबाईंचं चांगभलं

0
What is special about the play The Damayanti Damle? द दमयंती दामले : सासूबाईंचं चांगभलं


सासू-सुना यांच्यातला संघर्ष हा आदिम, सनातन काळापासूून चालत आलेला आहे. या संघर्षात त्यांच्या नवऱ्यांची मात्र हकनाक फरफट होते. म्हणजे सुनांच्या नवऱ्यांची आणि सासरेबुवांचीही! अर्थात हेही रीतीला धरूनच आहे. या समस्येला हात घालणारी नाटकं, चित्रपट याआधी भरपूर येऊन गेले आहेत. पण तरीही हा विषय चिरंतनच राहिला आहे. त्यातले तिढे, पेच नेमकी कोणकोणती वळणं घेतात यावर त्या कलाकृतींचं यश अवलंबून असतं. नुकतंच ‘द दमयंती दामले’ हे याच पठडीतलं, पण आगळ्या हाताळणीचं नाटक रंगभूमीवर आलं आहे. इम्तियाज पटेल यांच्या मूळ कथेवर लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांनी ते बेतलं आहे. संतोष पवारांच्या नेहमीच्या सर्वसाधारण चाकोरीबाहेरचं असं हे नाटक आहे. चमत्कृतीपूर्ण पात्रं आणि उपरोधिक घटना-प्रसंग ही त्यांची खासीयत यात आहेच; पण बहुुश: वास्तवदर्शी पात्रंही इथे आहेत. सुधांशू- मृण्मयी आणि अंशुमान-तन्मयी ही मुलं-सुना असलेली दमयंती दामले ही सासू त्यांच्यासह एकत्र राहते आहे. पण त्यांचं आपापसात जराही पटत नाहीए. दोन्ही सुना एकमेकींचा भयंकर दु:स्वास करतात. त्या दोघींचा सासूशीही उभा दावा आहे. तरी बरं सासू नोकरी करतेय आणि घराला हातभारही लावतेय. मात्र सासूदेखील सुनांसारखीच खमकी आहे. ती जिथल्या तिथे त्यांना तोडीस तोड उत्तरं देेऊन निरुत्तर करत असते. त्यांना नेहमी शब्दश: धारेवर धरत असते. त्यांच्या कृत्यांचा तत्काळ आरसा दाखवत असते. मात्र बोर्डिंगमध्ये ठेवलेल्या नातवंडांसाठी तिचा जीव तीळ तीळ तुटतो. या तिघींच्या सततच्या भांडणांमुळे घरात नेहमीच रणकंदन चाललेलं असतं.

एकदा दमयंती नातवंडांना बोर्डिंगमध्ये भेटायला म्हणून घरून निघते आणि तिच्या टॅक्सीला अपघात होतो. तिला फारसं लागत नाही, पण चालकाचा मात्र जीव जातो. दमयंतीची मोठी सून मृण्मयी याबद्दल एक रील तयार करते आणि या अपघाताबद्दल जबाबदार धरून रीलद्वारे मंत्र्यांना जाब विचारते. स्वाभाविकपणेच मंत्रालयात खळबळ माजते आणि या घटनेची त्वरित दखल घेतली जाते. मंत्री जातीने दमयंतीच्या घरी येऊन तिची विचारपूस करतात आणि तिला एक लाख रुपये नुकसानभरपाई देऊ करतात. पण दमयंती मंत्र्यांना चालकाचा जीव गेल्याबद्दल चांगलीच फैलावर घेते आणि त्यांच्या कोडग्या उत्तरांची चीड येऊन ती त्यांच्या कानाखालीदेखील वाजवते. साहजिकपणेच सर्वत्र खळबळ माजते. दमयंतीविरुद्ध पोलीस केस होते. या सगळ्यामुळे घरातलं वातावरण पार ढवळून निघतं. आधीच सासू-सुनांचा छत्तीसचा आकडा; त्यात ही अकस्मात उद्भवलेली नको ती भानगड. त्यामुळे त्यांच्यातली भांडणं आणखीनच विकोपाला जातात.

पुढे या घटनेला अनेक फाटे फुटत जातात. सुनांच्या कारवायांमुळे दमयंतीचं जिणं हराम होतं. पण ती जशास तशी, ठोशाला ठोसा देणारी असल्याने त्या सर्वांना पुरून उरते.

हे सगळं नाट्य धुंवाधार विनोदाच्या दे धमाल आतषबाजीत संतोष पवार यांनी नाटकात सादर केलं आहे. सासू-सुनांची भांडणं आणि त्यातले अहंगंड आणि तिढे, कटकारस्थानं, त्याचे भयंकर परिणाम या गोष्टी टोकाला जाताना नाटकात दाखवल्या आहेत. सुना आपल्या विरोधात जी जी कारस्थानं रचतात ती सर्व दमयंती जशास तशी वागून हाणून पाडते. उलट अनेकदा त्यांच्यावरच डाव उलटवते. या तिघीही जणी एकापेक्षा एक कजाग, भांडखोर दाखवल्या आहेत. साहजिकपणेच त्यांच्यातला संघर्षही तितकाच ताणलेला आहे. मात्र त्यातून होणारी हास्यस्फोटक निष्पत्ती प्रेक्षकाला खुर्चीला बांधून ठेवते. हसून हसून गडाबडा लोळायला भाग पाडते.

संतोष पवार यांनी सासू-सुनांतील हा संघर्ष तीव्रतेनं यात सादर केला आहे. मागून कटकारस्थानं हा प्रकार न करता त्यांना समोरासमोरच त्यांनी भिडवलं आहे. त्यातून जी झकाझकी होते ती पाहण्याजोगी आहे. नाटक सुरू कुठून होतं आणि जातं कुठे, हा काहीसा अनाकलनीय प्रकार असला तरी त्यात प्रेक्षक वाहवत जातो, हेच खरं. सासूने ठरवून केलेलं बंड मुलं आणि सुनांना भारी पडतं. तेही आपल्या परीनं तिचा प्रतिवाद करतात, पण त्यात कायम तोंडघशी पडतात. हे भांडणनाट्य संतोष पवार यांनी धमाल रचलंय. पात्रं, त्यांचे स्वभावविभाव, वृत्ती, त्यातून निर्माण होणारे पेच… एकातून एक निर्माण होणारी घटनांची मालिका संतोष पवार यांनी उत्तमरीत्या आकारली आहे. तरीही सगळी पात्रं खरीखुरी, हाडामांसाची वाटतात यातच त्यांचं यश आहे. त्यांच्यातील चोरावर मोर होण्यासाठी लागलेली चढाओढ नाटकात धम्माल आणते. लेखक-दिग्दर्शक म्हणून हा सगळा खेळ संतोष पवार यांनी थेट प्रेक्षकांच्या समोरच घडवून आणला आहे. जुन्या नाटकांतल्यासारखं ‘पीठ पीछे’ काही होत नाही हे या नाटकाचं वैशिष्ट्य. दोन देऊन, दोन घेऊन सासू-सुनांतला हा संघर्ष सतत पेटता राहतो. आणि हीच या नाटकातली गंमत आहे. बायकोचा बैल असलेली फेंदाड मुलं त्यात भर घालतात. सुना आपसात कितीही एकमेकींचा दु:स्वास करत असल्या तरी सासूविरुद्ध मात्र एक होतात. यात सासू नेहमीचीच तंत्र वापरून त्यांना नेस्तनाबूत करते. अगदी त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी देण्यापासून स्वत:ला कम्पॅनियन शोधण्यापर्यंत ती एकेक डाव टाकून मुलं आणि सुनांची तंतरवून ठेवते. हे सगळे घटना-प्रसंग संतोष पवार यांनी छान खुलवलेत. आणि हे सगळं क्षणाचीही त्यांना फुरसद न देता हम करेसो कायदा पद्धतीनं दमयंती उत्स्फूर्तपणे करते. अशानं विरोधी पक्षांची दाणदाण उडते हे वेगळं सांगायला नकोच. म्हटलं तर हे सारं वास्तवदर्शीच आहे! तरीही त्यातून नाट्य फुलत जातं.

संदेश बेंद्रे यांनी सासू-सुनांसह एकत्र कुटुंबाचं प्रशस्त घर छान उभारलंय. अमोघ फडके यांनी प्रकाशयोजनेतून यातले नाट्यपूर्ण क्षण नेमकेपणानं उठावदार केले आहेत. नचिकेत जोग आणि संतोष पवार यांच्या ‘ऑड’ गीतांना जितेंद्र कुलकर्णी यांनी सुसह्य संगीत दिलं आहे. सोनिया परचुरेंची नृत्यरचना नाटकाची मागणी पुरवते.

विशाखा सुभेदार या चतुरस्रा कलावतीने दमयंती दामलेंच्या भूमिकेत आवश्यक तो तिखटपणा, उपहास-उपरोधाची फोडणी आणि त्याबरोबरीनेच लाडिक खट्याळपणाची उत्तम जोड दिली आहे. जवळजवळ एकखांबी तंबूसारख्या अख्खं नाटक त्या आपल्या खांद्यांवर घेऊन जातात. संवादफेकीतील नजाकत, त्यांतले आरोह-अवरोह त्यांनी अप्रतिम पेलले आहेत. खडुस सासू आणि तितकीच प्रेमळ, भावपूर्ण आज्जी त्यांनी छान साकारली आहे. पल्लवी वाघ-केळकर यांनी मृण्मयीच्या रूपात उपद्व्यापी, हेकेखोर सून फणकाऱ्याने उभी केली आहे. तितकीच जहांबाज दुसरी सून सुकन्या काळण (तन्मयी) यांनी वठवली आहे. सागर खेडेकर (अंशुमन) आणि संजीव तांडेल (सुधांशू) यांनी बायकोच्या हुकुमात असलेले नंदीबैल नवरे वास्तवदर्शी उभे केले आहेत. संजय देशपांडे यांनी मंत्री आणि वकिलाची दुहेरी भूमिका यथार्थपणे साकारली आहे. एलआयसी एजंट, स्वानंद आणि अॅण्डी- क्षितीज भंडारी यांनी पुरेशा समजेनं आकारले आहेत. वैदेही करमरकर यांनी टीव्ही रिपोर्टर आणि स्वानंदी या दोन भूमिका केल्या आहेत. ‘द दमयंती दामले’ ही दोन घटका उत्तम विरंगुळ्याची मागणी पुरवणारी कॉमेडी आहे.





Source link

institute of pavtology Marathi Movie Comedy Story ‘रिकामटेकड्यां’ची रंजक गोष्ट

0
institute of pavtology Marathi Movie Comedy Story ‘रिकामटेकड्यां’ची रंजक गोष्ट


शिक्षण, समाज आणि राजकारणाचा अनोखा मेळ असलेला ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा नवाकोरा मराठी चित्रपट ११ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एका विनोदी कथेतून समाजाला अंतर्मुख करणारा विचार ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. सध्याच्या स्पर्धात्मक जगात अनपेक्षित घडामोडी घडत असून माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजातील नैतिकता ढासळली असून ती वाढविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’च्या निमित्ताने सयाजी शिंदे यांच्यासह दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, सागर वंजारी आणि अभिनेता पार्थ भालेराव यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद.

समाजातील नैतिकता ढासळली

विविध स्तरांवर व्यक्ती घडत असतात. शिक्षण हा आयुष्य घडविण्याचा एक मार्ग आहे, परंतु पूर्वीचा काळ आणि आताचा काळ पाहिल्यास शिक्षण क्षेत्रासह समाजातील सर्वच क्षेत्रांतील नैतिकता ढासळली आहे. नैतिकतेची घटलेली टक्केवारी वाढविण्याची गरज आहे. समाजात काही प्रमाणात नैतिकतेने जगणारी माणसे आहेत, त्यामुळेच समाज सुरळीतपणे सुरू आहे. आपण अशा नैतिकतेने जगणाऱ्या माणसांसोबत उभे राहिले पाहिजे. त्यांच्या खाद्याला खांदा लावून काम केले पाहिजे, असे मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

जुनी कथा, नवीन मांडणी

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ ही संतोष शिंत्रे यांची कथा आहे. या कथेच्या अनुषंगाने मी चित्रपटासाठी पटकथा व संवाद लिहिले आहेत. त्यामुळे ही मूळ कल्पना संतोष शिंत्रे यांची आहे. रिकामटेकड्या लोकांना पावटे म्हणण्याचा प्रघात अगदी जुना आहे, ३०० ते ३५० वर्षांपूर्वीच्या ग्रंथांमध्ये पावट्यांकडून काम करून घेतल्याचे संदर्भ आढळतात. आजघडीलाही गावांमध्ये पावटा हा शब्द वापरला जातो. त्यामुळे आम्ही पावट्यांचा विषय नव्या पद्धतीने ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटाच्या निमित्ताने आणला आहे. रिकामटेकड्या मुलांचा अनेकांना उपद्रव जाणवतो, मात्र कोणतीही आपत्ती येते तेव्हा मदतीसाठी ही मुलेच पुढे सरसावतात. त्यामुळे पावट्यांना एकत्र आणून त्यांचा अभ्यासक्रम, इन्स्टिट्यूट, कुलगुरू, शिक्षक आणि मुलांमधील संघर्ष अशी ही कथा गुंफलेली आहे, असे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनी सांगितले.

मराठी भाषेला प्राधान्य देणे महत्त्वाचे

गेल्या अनेक वर्षांपासून एकाच वेळेस अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. जे चित्रपट लोकांना आवडतात, त्या चित्रपटासाठी चित्रपटगृहात निश्चितच गर्दी होते. परंतु जेव्हा एका चांगल्या विषयावर चित्रपट येतो, तेव्हा आपल्या मराठी भाषेसाठी व महाराष्ट्रासाठी प्रेक्षकांनी सर्वप्रथम मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत, त्यानंतर इतर भाषिक चित्रपट पाहावेत, किमान इतके प्राधान्य मराठीला द्यायलाच हवे, असेही सयाजी शिंदे यांनी सांगितले.

एक वेगळी भूमिका आणि माझ्यासाठी शाळा

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव भारीच आहे. पावट्यांना एकत्र बांधणारी इन्स्टिट्यूट असावी, अशी मित्रमंडळींमध्ये चर्चा असते. कट्ट्यावरील चर्चेचा विषय खोलवर जाऊन रंजक पद्धतीने मांडलेला आहे, असे या चित्रपटात ‘अंशा’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता पार्थ भालेराव याने सांगितले. या भूमिकेचा बाज हा माझ्या आधीच्या भूमिकेसारखा वाटू शकतो, पण त्या भूमिकांची व्याप्ती ही मर्यादित होती. परंतु ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटात संबंधित पात्राची खोली आणि आव्हाने जाणून घेत, संपूर्णत: अभ्यासानिशी भूमिका साकारली आहे, असे पार्थने सांगितले. चित्रपटात सगळेच दिग्गज कलाकार असल्याने त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. त्यांना अभिनय करताना पाहणे, हीच माझ्यासारख्या युवा कलाकारासाठी शाळा होती, असेही त्याने सांगितले.

पावट्यांची निवड करणे आव्हानात्मक

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटाची संहिता आणि संवादशैलीच्या अनुषंगाने कलाकारांची निवड केल्याचे दिग्दर्शक सागर वंजारी यांनी सांगितले. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, पार्थ भालेराव या मुख्य पात्रांची निवड करणे सोपे होते आणि या कलाकारांनी स्वत:चे काम चोखपणे केले आहे. पण संहितेत समाविष्ट नसलेल्या पण चित्रीकरणादरम्यान महत्त्वाच्या वाटत गेलेल्या विशेषत: पावट्यांची भूमिका करण्यासाठी कलाकारांची निवड करणे आव्हानात्मक होते, असे त्यांनी सांगितले. या भूमिकांसाठी ९०० जणांच्या ऑडिशन्समधून ५० जणांची निवड करताना कसोटी लागली, असेही सागर वंजारी यांनी सांगितले.

चित्रभाषा समजणारे दिग्दर्शक

मी आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. परंतु एक वेगळी विनोदी भूमिका ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाच्या निमित्ताने साकारायला मिळाली. विविध विषयांवर भाष्य करणारा, भावनांचे अनेक कंगोरे असलेला आणि दरवेळी पावट्यांची धमाल घडवून बाजूला होणारं असं मजेशीर पात्र मी यात साकारलं आहे, असं सांगतानाच सयाजी शिंदे यांनी दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांच्यातील उत्तम समन्वयाचे कौतुक केले. या दोघांनाही चित्रभाषा आणि चित्रपटातील कलात्मकता समजते. एखाद्या प्रसंगाला विनोदाची जोड आणि सामाजिक जाणिवेची जोड कशी द्यावी, हेसुद्धा त्यांना कळते. त्यामुळे माझी भूमिका मला प्रेक्षकांसमोर व्यवस्थित मांडता आली, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले.





Source link

मराठवाड्यातील ‘सराईत’ माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा भंडाफोड

0
मराठवाड्यातील ‘सराईत’ माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा भंडाफोड


मुंबई : शासकीय कामात कार्यतत्परता, पारदर्शकता आणून जनतेला माहिती मिळावी या मुख्य उद्देशाने अंमलात आलेल्या माहितीचा अधिकार कायद्याचा स्वत:च्या फायद्यासाठी शस्त्र म्हणून गैरवापर करणाऱ्या आणि प्रशासनास वेठीस धरणाऱ्या मराठवाड्यातील सुमारे दीड डझन सराईत माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या नव्या उद्याोगाचा राज्य माहिती आयोगानेच भंडाफोड केला आहे.

मोठ्यासंख्येने वारंवार द्वितीय अपिले दाखल करणाऱ्या या उद्योगींचा लेखाजोखाच आयोगाने सार्वजनिक केला असून या अपिलार्थींनी गेल्या आठ महिन्यात तब्बल ७ हजार ७५१ राज्य माहिती आयोगाकडे दाखल केल्याची गंभीर बाब आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सार्वजनिक केली आहे.

अलिकडच्या काळात व्यक्तीगत हेतू साध्य करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा मोठ्याप्रमाणावर गैरवापर होत असल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमाणात माहिती आयोगाकडे येत आहेत. काही महिन्यांपूर्वी आयोगाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी बीडमधील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने या कायद्याचा आपल्या फायद्यासाठी शस्त्र म्हणून गैरवापर केल्याचा ठपका ठेवत त्यांनी दाखल केलेली तब्बल ६ हजार ५८५ अपिले फेटाळली होती. त्यावेळी या कार्यकर्त्याने विविध विभागांमध्ये माहितीसाठी १० हजार अपिले दाखल केल्याची बाबही समोर आली होती. या घटनेनंतर अशाच प्रकारे मराठवाड्यात किती माहिती अधिकार कार्यकर्ते या कायद्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करुन घेत आहेत. आधी माहिती मागायची आणि वाटाघाटीनंतर माहिती मिळाल्याचे पत्र अधिकाऱ्यांना द्यायचे असा नवा उद्याोग करणाऱ्यांचा खंडपीठाने शोध घेतला असता त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

हेही वाचा

जनहितापेक्षा ‘टार्गेट’ अधिक

● वने, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, महसूल, महापालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय. भूमि अभिलेख, जिल्हा परिषद ही प्रमुख कार्यालये माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या अजेंड्यावर असतात.

● विभागांकडून एखाद्या विषयाची विस्तृत माहिती मागविली जाते. त्यानंतर अधिकाऱ्यांशी वाटाघाटी केल्या जातात.

● तडजोडीअंती हवी असलेली माहिती मिळाली असून अपिल बंद करावे असे पत्र दिले जाते.

● बहुतांशवेळा आयोगाकडे द्वितीय अपिल सुनावणीसाठी आल्यानंतर सबंधित अधिकारी अपिलार्थीला त्याचे समाधान झाल्याचे पत्रच सादर करतात.

चांगला कायदा बदनाम होत असून जनहितासाठी माहिती मागणारे कार्यकर्तेही नाहक बदनाम होत आहेत. त्यामुळे या कायद्याची आणि एका चांगल्या चळवळीची विश्वासार्हता धोक्यात आली असून आता अधिकारी आणि लोकांनीही सजग होण्याची गरज आहे. – मकरंद रानडे, राज्य माहिती आयुक्त

हेही वाचा

प्रवेशद्वारावर यादी जाहीर

जुलै२०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान वारंवार मोठ्या संख्येने द्वितीय अपिल दाखल करून आयोग आणि प्रशासनास वेठीस धरणाऱ्यांची यादीच आयोगाच्या प्रवेशद्वारावर जाहीर केली. त्यामध्ये केशवराजे निंबाळकर(बीड) यांची २६ जूनला २७८८ आणि १२ नोव्हेंबरला ८४२, शरद दाभाडे(छत्रपती संभाजीनगर) यांची ११४४, मोतीराम काळे (नांदेड) ४६३, बाळासाहेब बनसोडे (संभाजीनगर) २५६, अनिता वानखेडे (संभाजीनगर) ११६, बाबूराव चव्हाण(बुलढाणा) २७९, जयभिम सोनकांबळे (नांदेड) १७६, हरी गिरी (संभाजीनगर)२९६, विनोदकुमार भारुका (संभाजीनगर) २३६, गिरीश यादव (जालना) ३०६, संजय राठोड (जालना) १००, रायभान उघडेे (संभाजीनगर) २१६, बालाजी बंडे (नांदेड) १५६ अशा १९ जणांची नावे आणि फेटाळलेल्या अपिलांचा तपशील आयोगाने सार्वजनिक केला आहे.





Source link

दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा, अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार

0
दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा, अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार



New law to prevent milk adulteration, non-bailable offence, fines to increase दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा, अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार





Source link

कृषिमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी, कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधानानंतर विरोधक आक्रमक

0
कृषिमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी, कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधानानंतर विरोधक आक्रमक



Demand for the dismissal of Agriculture Minister Kokate. Opposition aggressive after controversial statement on loan waiver कृषिमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी, कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधानानंतर विरोधक आक्रमक





Source link