Monday, July 27, 2026
Home Blog Page 453

Ram Navami 2025: थायलंडमधील रामाकियनआहे तरी काय? त्याच्या सादरीकरणाला एवढे महत्त्व का?

0
Ram Navami 2025: थायलंडमधील रामाकियनआहे तरी काय? त्याच्या सादरीकरणाला एवढे महत्त्व का?



Thailand Ramakien: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच थायलंडला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रामाकियन या रामकथेचे भारताच्या भरतनाट्य आणि थायलंडच्या खोन या दोन्ही शैलीतील सादरीकरण पाहिले. इतकंच नाही तर भारत आणि थायलंड यांच्या प्राचीन सांकृतिक आणि ऐतिहासिक अनुबंधावरही भाष्य केले. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय रामकथेचे सादरीकरण करणाऱ्या थायलंडच्या खोन नाट्यनृत्य शैलीविषयी जाणून घेऊ.

खोन या नृत्यनाटय कलेची तुलना थायलंड मधील इतर कुठल्याच कलाप्रकाराशी होऊ शकत नाही. हा नृत्यप्रकार इसवी सनाच्या १३५०–१७६७ या कालखंडात या देशात विकसित झाला. खोन या नाट्यकलेत डौलदार हालचाली, युद्धनृत्याचे सादरीकरण, पारंपरिक विधी, संगीत, निवेदन, गीत आणि कविता यांचा सुरेख संगम आढळतो. त्याचबरोबर खोनचे आकर्षक मुखवटे, दागदागिने आणि भरजरी वेशभूषादेखील तितकेच लक्षणीय आहेत. या कलेत वापरण्यात येणारे मुखवटे तयार करण्यासाठी अत्यंत कुशल कारागिरांची आवश्यकता असते. आजच्या घडीला खोन ही थायलंडमधील सर्वाधिक प्रतिष्ठेची नाट्यकला मानली जाते.

खोन म्हणजे काय?

मुख्यतः खोन हा नाट्यप्रकार आहे. रामाकियन या थाय महाकाव्यातील कथा या नाट्यप्रकारात सादर केली जाते. हे महाकाव्य हिंदू धर्मातील रामायणावर आधारित आहे. कलाकार चेहऱ्यावर मुखवटे धारण करून या नाट्याचे सादरीकरण करतात. या नाट्यप्रकारात फ्रा (राजा/देव), नांग (स्त्रिया), याक (राक्षस), आणि लिंग (वानर) इत्यादी चार प्रकारच्या कलाकारांचा समावेश होतो. पूर्वी सर्व कलाकार मुखवटे घालत असत, परंतु आजच्या काळात फ्रा आणि नांग हे कलाकार पारंपरिक थाय भित्तीचित्रांपासून प्रेरित खास शैलीतील मेकअप करतात. केवळ याक आणि लिंग श्रेणीतील कलाकारच अजूनही पारंपरिक आणि कलात्मक मुखवटे घालतात. खोन हा शब्द पाली भाषेतील क्ल किंवा कोल या संज्ञेपासून तयार झालेला आहे. या नाट्यप्रकारात ढोलाच्या तालावर लयबद्ध सादरीकरण केले जाते. प्रारंभिक कालखंडात खोन हा प्रकार धार्मिक विधीचा भाग होता. यात विष्णूच्या कीर्तीचे वर्णन केले जात असे. या विधीमध्ये प्रेक्षकांचा समावेश नसे. नंतरच्या कालखंडात या कलेत राम सतुतीला प्राधान्य देण्यात आले.

भारतीय संस्कृतीचा प्रभाव

भारतीय संस्कृतीचा प्रभाव दक्षिण आशियात पोहोचल्यानंतर रामायणाची कथा तेथील राजघराण्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली. प्रत्येक देशाने या कथेला आपापल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या प्रकारे सादर केले. थायलंडमध्ये ही कथा रामाकियन (भगवान रामाची कीर्ती) या नावाने ओळखली जाते. रामायणावर आधारित रंगभूमीवरील विविध सादरीकरणे या संपूर्ण प्रदेशात लोकप्रिय झाली. यामध्ये थायलंडमधील खोन, बर्मामधील यामा झाटडॉ, कंबोडियामधील लखोन खोल आणि लाओसमधील फ्रा लक फ्रा लाम यांचा समावेश होतो. थाय फाउंडेशन या संकेत स्थळावर खोन नृत्यशास्त्राचे गुरु प्रमेथ बुन्याचाय यांनी या कलेत चक-नाक, क्रबी-क्रबोंग आणि नांग याय यांचा समावेश आहे असे म्हटले आहे. चक-नाक ही एक रंगभूमीवरील सादरीकरणाची पद्धत होती. या नाट्यप्रयोगात क्षीरसागराचे मंथन ही पुराणकथा सादर केली जात असे. या पद्धतीत कलाकार देवता आणि राक्षसांच्या भूमिकेत दिसत. खोनवर प्रभाव टाकणारे आणखी एक शास्त्र म्हणजे क्रबी-क्रबोंग. हे हातातील शस्त्रांच्या युद्धकलेचे तंत्र आहे. हे थायलंडच्या मुए थायशी (किक बॉक्सिंग) जवळचे नाते असलेले युद्धशास्त्र आहे. खोनमधील युद्धनृत्यात क्रबी-क्रबोंगचे अनेक घटक ठळकपणे दिसून येतात.

नांग याय म्हणजेच ग्रँड शॅडो पपेट्स ही आणखी एक नाट्यकलेची शैली आहे. यात रामकथा अर्थात रामाकियन सादर करण्यात येते. कथानक, नृत्य आणि संगीत यांचा मिलाफ असलेली ही शैली नंतर खोन नाट्यकलेत सामावली. थायलंडमध्ये भगवान राम या व्यक्तिरेखेचे राजसत्तेशी अतिशय जवळचे नाते आहे. त्यामुळे प्रारंभी खोन हे नृत्यप्रदर्शन फक्त विशेष प्रसंगीच जसे की, राजघराण्यातील अंत्यविधी किंवा दीक्षा समारंभप्रसंगी आयोजित केले जात होते. पुढे ही कला सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाली आणि एक मनोरंजनाचे साधन ठरली.

मुखवटे आणि पोशाख

खोन नृत्यकलेची सर्वात वेगळी आणि उठून दिसणारी वैशिष्ट्ये म्हणजे कलाकारांनी परिधान केलेले भव्य आणि कलात्मक मुखवटे. हे मुखवटे चार प्रमुख व्यक्तिरेखा दर्शवतात फ्रा (राजे/देव), नांग (स्त्रिया), याक (राक्षस), आणि लिंग (वानर) तसेच देवता, ऋषी, प्राणी आणि इतर अनेक रूपांचा समावेश होतो. सर्व खोन मुखवटे पवित्र मानले जातात. धार्मिक विधींमध्ये हे मुखवटे वेदीवर ठेवले जातात आणि देवतांचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांची पूजा केली जाते. कलाकारांनी आपले खोन मुखवटे आदराने आणि काळजीपूर्वक हाताळावे लागतात आणि परिधान करण्यापूर्वी त्यांना वंदन करणे आवश्यक असते. असं मानलं जातं की, मुखवटा घालून नृत्य करताना कलाकार तल्लीन होतात. प्रत्येक खोन मुखवटा आकार, रंग आणि तपशीलांमध्ये वेगळा असतो आणि तो त्या व्यक्तिरेखेच्या शारीरिक रचनेवर, स्थान, प्रतिष्ठा आणि स्वभावावर आधारित असतो. संपूर्ण खोन नाट्यसमूहासाठी १०० पेक्षा अधिक राक्षसांचे मुखवटे आणि ४० पेक्षा अधिक वानरांचे मुखवटे असतात. हे मुखवटे पारंपरिक हस्तकलेतील अनेक कौशल्यांमध्ये प्रावीण्य असलेल्या विशेष प्रशिक्षित कारागिरांकडून तयार केले जातात. एक मुखवटा तयार करायला अनेक महिने लागतात.

(विकिपीडिया)

खोनचे झगमगते पोशाख आणि दागदागिने देखील दृश्यात्यदृष्ट्या अत्यंत मोहक असतात. हे पोशाख विविध रंगांमध्ये तयार केले जातात, आणि प्रत्येक रंग एका विशिष्ट व्यक्तिरेखेचे प्रतीक असतो. उदाहरणार्थ, भगवान राम आणि इंद्र (युद्धाचे देव) हिरवा रंग, ब्रह्मा (सृष्टीचे देव) पांढरा रंग आणि फ्रा लक (रामाचा भाऊ) पिवळा रंग परिधान करतात. पारंपरिक पोशाखांसाठी वापरले जाणारे कापड हे चांदी आणि सोन्याच्या जरीसह तयार केलेले खास रेशीम असते. आज असे पोशाख विणणारे कारागीर फार थोडे उरले आहेत. या कापडावर भरतकाम केले जाते. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिवणकामात कुशल असलेल्या कलाकारांच्या वेगळ्या समूहाची गरज असते. कपडे तयार झाल्यावर, कलाकारांना ते परिधान करून देण्याचे काम आणखी एका तज्ज्ञ समूहाद्वारे केले जाते. या तज्ज्ञांना नेमकं माहिती असतं की, आतील गाद्या कुठे ठेवायच्या आणि कपड्यांवर टाके कुठे घालायचे जेणेकरून रंगमंचावर पोशाख सैल पडू नये याची ते काळजी घेतात.

एकदा पोशाख परिधान झाल्यावर कलाकार आपापल्या व्यक्तिरेखेनुसार दागदागिने घालतात. प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वतःचा एक खास अलंकारांचा संच असतो. तो कुशल सुवर्णकार आणि रौप्यकार यांच्या हस्ते तयार केलेला असतो. पोशाख कसा गुंडाळला जातो आणि त्यावर वापरलेले दागिने किती बारकाईने तयार केलेले आहेत यावरून त्या व्यक्तिरेखेचा दर्जा आणि स्थान समजते. फ्रा आणि नांग या नर्तकांच्या चेहऱ्याला रंग देण्यासाठी मेकअप करणाऱ्या कलाकारांना बोलावलं जातं. हे कलाकार पारंपरिक थाय चित्रकलेत पारंगत असणे गरजेचं असतं कारण त्यांना मंदिरांच्या भित्तिचित्रांवर दिसणाऱ्या देवतांच्या चेहऱ्यांचे हुबेहूब चित्रण कलाकारांच्या चेहऱ्यावर करावं लागतं. शेवटी असा परिणाम साधला जातो की जणू त्या व्यक्तिरेखा एखाद्या चित्रकथेतून थेट रंगमंचावर उतरलेल्या आहेत.

देहबोली

प्रारंभिक कालखंडात खोन नृत्यप्रदर्शन अनेक अंशी एखाद्या मूकनाट्यासारखे होते. त्यामुळे डौलदार देहबोली हीच भावनांची आणि आशयाची भाषा होती. प्रत्येक व्यक्तिरेखा गटाची स्वतःची खास नृत्यशैली असते. त्यामुळे नर्तकांना त्यांच्या शारीरिक रचना आणि हालचालींच्या क्षमतेनुसार प्रशिक्षणाच्या सुरुवातीलाच विशिष्ट व्यक्तिरेखा दिली जाते.

खोनचे नृत्यशास्त्र पूर्णपणे आत्मसात होण्यासाठी संपूर्ण आयुष्य जावे लागते. प्रशिक्षण लहान वयातच सुरू होते. कारण कलाकारांचं शरीर व्यायामपटूंसारखं तयार केलं जातं. चांगल्या हालचालींसाठी लवचिकता, ताकद आणि बारकावे लक्षात घेण्याची क्षमता आवश्यक असते. युद्धाच्या प्रसंगांमध्ये जेव्हा कलाकार एकमेकांवर चढून युद्धकौशल्य दाखवतात तेव्हा हालचाली अधिक अवघड आणि प्रभावी असतात. चुई चाय हा नृत्यप्रकार अत्यंत कुशल नर्तकांद्वारे सादर केला जातो आणि सौंदर्य व नजाकतीचे प्रतीक मानला जातो. आजच्या खोन सादरीकरणांमध्ये जरी गाणं, निवेदन आणि संगीत यांचा समावेश अधिक प्रमाणात झालेला असला तरीही देहबोली हीच या कलेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. खोनच्या हालचाली वाचण्यात पारंगत प्रेक्षक फक्त नृत्य पाहून संवाद काय आहे हे समजू शकतात.

संगीत, निवेदन आणि गायन

खोनचे संगीत पी फाट या वाद्यवृंदाद्वारे वाजवले जाते. जो मुख्यतः पाई नाय (छोटा ओबो), रणाद एक (मध्यम बाँसच्या पट्ट्यांचे झायलोफोन), रणाद थुम (जाड पट्ट्यांचा झायलोफोन), खोंग वोंग याय (गोल चौकटीत मोठ्या घंटा), खोंग वोंग लेक (लहान घंटा), क्लोंग थाड (मोठे ढोल), ता-पोन (दोन तोंडाचे साजेलेले ढोल), क्रॅप (लाकडी टाळ्या), आणि चिंग (लहान मंजीरी) यांचा समावेश असतो. युद्धाच्या दृश्यांमध्ये क्रॉंग वापरल्या जातात. ज्या सैनिकांच्या पावलांचा आवाज दर्शवतात. प्रसंगानुसार इतर वाद्यही यात समाविष्ट केली जातात. खोनमध्ये वापरली जाणारी गाणी ना फाट म्हणून ओळखली जातात आणि ती पवित्र मानली जातात. ही गाणी विविध भावनांवर आधारित असतात आणि विशिष्ट प्रसंगात वापरली जातात. उदाहरणार्थ, पाया दुएन हे गाणं एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तिरेखा चालताना वाजवलं जातं, तर क्राओ नोक (बाह्य क्राओ) हे गाणं वानरसेना चाल करत असताना वापरलं जातं. खोनच्या संवाद लेखनात निवेदन, गीते आणि संवाद यांचा समावेश असतो. निवेदन निवेदकांद्वारे खास शैलीतील पण सुरांशिवाय केले जाते. या निवेदनांमधील स्वर थायलंडमधील अयुथाया साम्राज्यातील जुने उच्चार दर्शवतात, असं मानलं जातं. निवेदनात निसर्गदृश्यांचे वर्णन, वाहने, सैन्याची चळवळ याबरोबरच एकपात्री संवाद, भावनिक प्रतिक्रिया जसे की रडणं, आक्रोश इत्यादींचाही समावेश असतो. संवाद मुक्तछंदात आणि तात्काळ रचनेतून येतो. चाम उअद (विनोदी व्यक्तिरेखा) हे कलाकार मुख्यतः विनोदी तात्काळ सादरीकरणावर अवलंबून असतात.

गायन

गायन हा एक घटक आहे जो लखोन नाय या आणखी एका उच्च दर्जाच्या नाट्यकलेतून खोनमध्ये सामावला गेला. लखोन नायमध्ये निवेदनाऐवजी सुरेल गायनातून कथाकथन केलं जातं. खोनमधील गायन दोन गायक मंडळांद्वारे सादरीकरण केलं जातं.

पटकथा

रामाकियन महाकाव्य आणि रामायणावर आधारित इतर अनेक साहित्यकृती थायलंडमध्ये प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. मात्र, अयुथाया साम्राज्याच्या १७६७ मधील पतनानंतर बहुतेक ग्रंथ नष्ट झाले. रामाकियनची पुन्हा एकत्रित रचना राजा राम पहिल्याच्या (१७८२–१८०९) कारकिर्दीत करण्यात आली. त्यांनीच बँकॉकमधील वॉट फ्रा काओ (एमराल्ड बुद्ध मंदिर) येथील भित्तिचित्र दालनात रामाकियन चित्रांची मालिका रेखाटण्याचे आदेश दिले. ‘बोट लखोन रूएंग रामाकियन’ (रामाकियनसाठीची नाट्य पटकथा) ही राजा राम पहिल्याने संकलित केलेली आवृत्ती आजवरची सर्वात सुसंगत मानली जाते. आजच्या खोन सादरीकरणांमध्ये मुख्यतः या ग्रंथावर आधारित मजकूर वापरला जातो. इतर प्रसिद्ध कवींनीही खोनसाठी पूरक पटकथा लिहिल्या आहेत. रामाकियनमधील अनेक प्रसंग हे भगवान रामाच्या शौर्यगाथेवर आधारित असतात. या सादरीकरणांचा उद्देश विष्णूच्या अवताराच्या स्तुतीचा असतो आणि म्हणूनच खोनमध्ये मुख्यत्वे चांगल्याने वाईटावर मात केल्याचे संदेश देणारे प्रसंग सादर केले जातात.

खोन आणि विधी

खोन सादर करण्यापूर्वी कलाकारांनी खोन गुरूंना वंदन करणे आवश्यक असते. सादरीकरणाची सुरुवात ‘होम रोँग’ नावाच्या संगीत प्रस्तावनेने होते. यात सर्वप्रथम ‘साथुकर्ण’ हे आदरभाव व्यक्त करणारे गीत वाजवले जाते. हे संगीत वाजताना कोणताही कलाकार, संगीतकार किंवा नर्तक असो त्याने दीप आणि धूप अर्पण करून गुरूंना वंदन करणे आवश्यक असते. जर ते शक्य नसेल, तर डोक्याच्या वर हात जोडून वंदन करण्याची परंपरा आहे. खोन गुरूंमध्ये केवळ जिवंत किंवा मृत मानवी शिक्षकच नव्हे, तर भगवान शंकर, गणेश आणि विष्णू यांचाही समावेश होतो.

होम रोँग झाल्यानंतर ‘बर्क रोँग’ (बेर्ग रोँग) नावाचं पारंपरिक प्रारंभिक नृत्य सादर केलं जातं. या लोकप्रिय नृत्यात भगवान रामाचा सेनापती हनुमान (पांढरं वानर) आणि निलाफट (काळा वानर) यांच्यातील लढाईचा छोटा भाग दाखवला जातो. ‘ख्रॉब ख्रू’ हा विधी खोन नर्तकांसाठी एक दीक्षाविधी आहे. या विधीत गुरू विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ऋषीचा मुखवटा, भैरव मुखवटा आणि सेर्ड (दक्षिण थायलंडचा पारंपरिक मुकुट) असे तीन मुखवटे ठेवतात. जेव्हा विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतात आणि पुढील टप्प्यावर जातात तेव्हा हा विधी पार पाडला जातो. ‘वाई ख्रू’ हा खोनसाठी आणखी एक महत्त्वाचा विधी आहे. हा वार्षिक समारंभ गुरूंना वंदन करण्यासाठी आयोजित केला जातो. कलाकार यावेळी आपल्याकडून झालेल्या चुका क्षम्य कराव्यात अशी प्रार्थना करतात आणि आशीर्वाद मागतात. नवीन विद्यार्थी ‘राम थवाय मुए’ हे नृत्य सादर करून खोनच्या प्रशिक्षणाच्या प्रवासात प्रवेश करतात.

(विकिपीडिया)

भूतकाळापासून वर्तमानापर्यंत

खोनच्या अनेक शैली आणि सादरीकरण रूपांमध्ये वेळोवेळी बदल झाला आहे. या समृद्ध परंपरेने शाही दरबारातील ‘खोन लुआंग’ पासून उघड्या मैदानावर सादर होणाऱ्या ‘खोन क्लांग प्लांग’, बांबूच्या बाकावर बसून सादर होणाऱ्या ‘खोन नांग राव’, पडद्यासमोर सादर होणाऱ्या ‘खोन ना जॉर’, लखोन नायवर आधारित ‘खोन रोँग नाय’ आणि विशेष नेपथ्य व साहित्य वापरून सादर होणाऱ्या ‘खोन चक’ यांसारख्या विविध रूपांत प्रगती केली. सामान्य लोकांद्वारे तयार झालेलं एक वेगळं रूप म्हणजे ‘खोन सोद’ यात कलाकार मुखवटा उचलून तात्काळ पद्यरचना सादर करतात. दुसऱ्या महायुद्धानंतर खोनची परंपरा जवळपास लोप पावण्याच्या मार्गावर होती. या कलेला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न थायलंडची राणी माता सिरिकित यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्यांच्या SUPPORT Foundation अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना हस्तकलेतील विविध कौशल्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात आली.



Source link

Maharashtra how many cities became smart under smart city mission of Central government ended on 31st march 2025 महाराष्ट्रातील शहरे कितपत ‘स्मार्ट’?

0
Maharashtra how many cities became smart under smart city mission of Central government ended on 31st march 2025 महाराष्ट्रातील शहरे कितपत ‘स्मार्ट’?


मुंबई : ‘तंत्रज्ञानदृष्ट्या अतिप्रगत १०० शहरे बनवण्याच्या’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अस्तित्वास आलेल्या ‘स्मार्ट सिटी मिशन’ मोहिमेला ३१ मार्च २०२५ नंतर मुदतवाढ देण्यात आली नसल्याने या मोहिमेला आता पूर्णविराम मिळाला. तिची सांगता झालेली असल्याने आता या योजनेचा जमाखर्च मांडणे आवश्यक ठरते.

गेली दहा वर्षे राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत १०० पैकी जेमतेम आठ शहरांतील १०० टक्के प्रकल्प पूर्णत्वाला गेल्याचे खुद्द केंद्र सरकार म्हणते. यात महाराष्ट्रातील पुण्याचा समावेश असला तरी, प्रत्यक्षात पुण्यातील प्रकल्पपूर्ती कागदोपत्री असल्याचेच दिसून येत आहे. महाराष्ट्रातील अन्य शहरांतील प्रकल्पपूर्तीचा टक्काही नव्वदीच्या घरात गेला असला तरी, ही यशाची टक्केवारी प्रत्यक्षात आढळते का?

या योजनेतील शहरांना इंटरनेटने सुसज्ज करून त्याचा नागरी सुविधांसाठी वापर करणे तसेच या शहरांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारणे, ही ‘स्मार्ट सिटी मिशन’मागील मूळ संकल्पना. मात्र, निधी मिळण्यातील अडचणी, ‘स्मार्ट’साठी निवडलेल्या शहरांतील मूलभूत सुविधांचा अभाव, शहरांची उदासीनता अशा विविध कारणांमुळे मूळ योजना मागे पडली आणि नंतर ती ‘स्मार्ट शहर’ मोहीम अस्तित्वात असलेल्या शहरांचा कायापालट करण्यापुरती मर्यादित राहिली. ही मोहीम २०२०मध्ये पूर्णत्वाला येणे अपेक्षित असताना तिला एकूण पाच वर्षांची मुदतवाढ मिळाली. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार या मोहिमेवर आतापर्यंत तब्बल एक लाख ६४ हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२५पर्यंत या शहरांतील ७४०० प्रकल्प पूर्णत्वाला आले. यापुढे या मोहिमेअंतर्गत उरलेल्या प्रकल्पांना ‘स्मार्ट सिटी मिशन’ऐवजी अन्य योजनांच्या माध्यमातून निधीपुरवठा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

या मोहिमेत महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांचा समावेश होता. शासकीय आकडेवारीनुसार नागपूरचा अपवाद वगळता या मोहिमेंतर्गत अन्य शहरांतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, या प्रकल्पांमुळे तेथील नागरिकांचे जीवन सुसह्य झाले का, हा प्रश्न कायम आहे. पुण्यात गेल्या वर्षी अचानक निर्माण झालेली पूरस्थिती, ठाणे शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न, कल्याण-डोंबिवली शहरांतील अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक कोंडी, अन्य शहरांतील वाहतूक व्यवस्थापनातील अडथळे इत्यादी घटक या शहरांच्या ‘स्मार्ट’ या बिरुदालाच आव्हान निर्माण करत आहेत. यातील जवळपास सर्वच शहरांनी केवळ रंगरंगोटी, रस्त्यांची कामे, सीसीटीव्ही यावर निधी खर्च केल्याचे दिसून आले. त्यामुळे ही शहरे ‘स्मार्ट’ बनली का, असा प्रश्न कायम आहे. वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय म्हणून सायकल मार्गिकेची योजना जवळपास सर्वच शहरांत राबवण्यात आली असली तरी सुरक्षित मार्गिकांअभावी त्याबाबतचा प्रतिसादही थंडा दिसतो.





Source link

महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या

0
महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या



latur municipal commissioner babasaheb manohare shot himself लातूर : महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या





Source link

Mesh To Meen Horoscope in Marathi : Which zodiac sign will be lucky on 6th April Ram Navami

0
Mesh To Meen Horoscope in Marathi : Which zodiac sign will be lucky on 6th April Ram Navami



Mesh To Meen Horoscope in Marathi : Which zodiac sign will be lucky on 6th April Ram Navami | ६ एप्रिल राशिभविष्य: मेष ते मीनपैकी कोणत्या राशीला प्रभू श्रीराम पावणार? कोणाला फायदा तर कोणाला तोटा होणार





Source link

बुकमार्क: व्रतस्थ सेवाकार्यातील नव्या पिढीचा पायरव…

0
बुकमार्क:  व्रतस्थ सेवाकार्यातील नव्या पिढीचा पायरव…


स्वप्नील जोशी15 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

सेवावृत्तीने श्रम करणाऱ्या आमटे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीच्या कार्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे डॉ. प्रकाश आमटे लिखित ‘नवी पिढी, नव्या वाटा’. (स्व.) बाबा आमटेंच्या जीवनसाधनेतून मिळालेला निष्काम सेवेचा वारसा डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी निरंतर पुढे चालवला. या कार्यात व्यक्तींचे उन्नयन आणि समाजाची प्रगती यांचा विचार करताना श्रम आणि सेवा यांची त्यांनी सांगड घातली. हे कार्य बहुआयामी झालं, ते दोन्ही मुलं आणि सुना यांच्या अथक प्रयत्नातून. तरुण खांद्यावर आलेली ही जबाबदारी पेलताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? भामरागडचं दुर्गम आदिवासी जग आणि लोकबिरादरी प्रकल्पातील कार्य लोकाभिमुख कसं झालं? याची नेमकी गोष्ट या पुस्तकातून वाचायला मिळते.

पुस्तकाच्या सुरूवातीला ‘थोडी उजळणी’ या प्रकरणातील एका चित्राला लागून लेखक लिहितात… “बाबा आम्हाला घेऊन भामरागडच्या जंगलात आले, तोवर इथल्या आदिवासींबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आदिवासींचं जगणं पाहून आम्ही हबकलो.” या हृद्य चित्रात दोन आदिवासी बांधवांशी बाबा काहीतरी चर्चा करत आहेत. आमटे कुटुंबाचं कार्य त्यांच्या श्वासाइतकंच नैसर्गिक आहे. छत्तीसगडला लागून असलेल्या भागात महाराष्ट्रातील तर सोडाच, पण चंद्रपूर जिल्ह्यातीलही माणसं कधी फिरकलेली नव्हती, असं लेखक सांगतात. काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या सोबतीने काम सुरू झालं खरं, पण ते सोपं नव्हतं. मुळात डॉक्टर म्हणजे काय? हे त्या आदिवासींना माहिती नव्हतं. त्यामुळं वैयक्तिक आरोग्य, शिक्षण याविषयी जनजागृती करणं क्रमप्राप्त होतं. आपला समाज हेच कुटुंब मानत आमटे दाम्पत्याने काम सुरू केलं. आनंदवनात बाबा – ताई आणि कार्यकर्त्यांच्या कामाची पार्श्वभूमी असली, तरी डॉ. प्रकाश यांच्यासाठी हे एक नवीन आव्हान होतं.

लोकबिरादरी प्रकल्प महाराष्ट्राच्या एका टोकावरच्या दुर्गम, जंगली भागात असल्याने तब्बल २२ वर्षे या गावात वीज नव्हती. पाऊस आला की रस्तेही वाहून जात. अशा परिस्थितीत कित्येक दिवस गावाचा उर्वरित जगाशी संपर्क नसे. दरम्यान दिगंत आणि अनिकेत या दोघांचा जन्म झाला. त्याचं संस्कारक्षम मन हेमलकशातील असंख्य गोष्टी टिपत होतं. पुढं आरतीचे कुटुंबात आगमन, तिची जडणघडण या सगळ्याच गोष्टींचे वर्णन वाचनीय आहे. “आदिवासींचा विश्वास मिळवणं आणि त्याचं जगणं सुसह्य करण्यासाठी जास्तीत जास्त सोयी-सुविधा पुरवत राहणं, यात आमच्या आयुष्याची ३५ वर्षे कशी गेली हे कळलंच नाही, असे डॉ. प्रकाश सांगतात. कालांतराने मुलगा दिगंतचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा प्रकल्पात काम करण्याचा निर्णय असो किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावरही अनिकेतचे तिथल्या व्यवस्थापनात पूर्णवेळ झोकून देऊन देणे असो; या दोघांनीही आपापल्या परीने प्रकल्प चालवण्याची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. दोन्ही मुलांचे करिअर, त्यांची संवेदनशील वृत्ती, लग्न आणि नंतर प्रकल्पात काम करतानाचा प्रत्यक्ष अनुभव या सगळ्या टप्प्यांवर “हे काम माझं आहे आणि ते मी पुढे नेणारच!” हा भक्कम विश्वास डॉ. प्रकाश यांनी मुलांच्या मनात निर्माण केला. आमटे कुटुंबाच्या या सेवाकार्यात पत्नी, मुले – सुना तर होत्याच; पण असंख्य कार्यकर्त्यांची फौजही सोबतीला होती.

कितीतरी प्रकारचे रुग्ण आणि त्यांची वाढती संख्या यामुळे प्रकल्पाचे कार्य विस्तारणे आवश्यक होते. ही गरज ओळखून दिगंत – अनघा आणि अनिकेत – समीक्षा यांनी नव्या अत्याधुनिक हॉस्पिटलची केलेली निर्मिती असो किंवा शाळेच्या माध्यमातून केलेला एक अभिनव शैक्षणिक प्रयोग असो; अशा सगळ्या गोष्टी करताना या पुढच्या पिढीमध्ये कल्पकता आणि जबाबदारीची जाणीव होती. आजच्या तरुणाईने आदर्श घ्यावा, असे आमटे कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांचे सेवाव्रती कार्य या पुस्तकरूपाने जगासमोर आले आहे.

आदिवासींच्या कुटुंबातील शिक्षणाच्या प्रवाहात आलेली तरुण मंडळी आज प्रकल्पाच्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी काम करत आहेत. त्यापैकी आय सेंटरमध्ये डोळ्यांची तपासणी करणारे जगदीश बुरडकर आणि गणेश हिवरकर यांची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. डॉ. अनघा यांची प्रसुती विभागातील सहायक, तसेच प्रियांका मोगरकर, शारदा भावसार, दीपमाला लाटकर आणि समुपदेशन करणाऱ्या सविता मडावी हे सगळे या सेवाकार्याच्या नव्या पिढीचे शिलेदार आहेत. आश्रमशाळेतील काम असो वा वाड्या – वस्त्यांवर जाऊन आरोग्याच्या, शिक्षणाच्या सुविधा पोहोचवणे असो; ही आजची गरज असल्याचे ओळखून नव्या पिढीने उचललेले प्रत्येक पाऊल तिथल्या स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन स्वयंसिद्ध बनवत आहे. निकोप समाजाच्या निर्मितीसाठी सुरू असलेली आमटे कुटुंबाच्या पिढ्यांची ही व्रतस्थ, निरंतर वाटचाल समजून घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.

पुस्तकाचे नाव : नवी पिढी, नव्या वाटा लेखक : डॉ. प्रकाश आमटे संपादन : सुहास कुलकर्णी प्रकाशक : समकालीन प्रकाशन पाने : १३६, किंमत : रु. २००

(संपर्कः swapnilkashi566@gmail.com)



Source link

‘एआय’च्या विश्वात…: ‘डीपसीक’ने भारतासाठी उघडली संधींची कवाडे!

0
‘एआय’च्या विश्वात…:  ‘डीपसीक’ने भारतासाठी उघडली संधींची कवाडे!




‘डीपसीक’ हे चीनमध्ये २०२३ च्या मे महिन्यात स्थापन करण्यात आलेले एआय स्टार्टअप आहे. या कंपनीचे संस्थापक लियांग वेनफेंग यांनी २०२१ मध्ये ‘एनव्हिडीया’च्या जीपीयूची खरेदी सुरू केल्याने एआय मॉडेल्सच्या विकासाला गती मिळाली. ‘डीपसीक’ची एआय मॉडेल्स अत्याधुनिक कार्यक्षमतेची, किफायतशीर आहेत. हे तंत्रज्ञान अवघ्या ५० कोटी रुपयांत विकसित झाले. त्यामुळे जागतिक एआय क्षेत्रात ‘डीपसीक”ची प्रकर्षाने नोंद घेतली गेली. ‘ओपन एआय’चे सीईओ सॅम आल्टमन यांनी म्हटले होते की, चॅट जीपीटीसारखे प्रगत एआय साधन बनवणे कोणालाच सहज जमणार नाही. प्रत्यक्षात “डीपसीक’चे R1 मॉडेल लाँच झाल्यावर एनव्हिडीयासारख्या मोठ्या टेक कंपनीच्या शेअर्समध्ये २०% घसरण होऊन तिचे बाजारमूल्य सुमारे ६०० अब्ज डॉलरने घटले. परिणामी वैश्विक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली. दोन्हीकडून प्रचंड गुंतवणूक ‘एआय’च्या क्षेत्रातील वेगवान वाढ आणि नाविन्यामागे मोठ्या प्रमाणातील आर्थिक गुंतवणूक हे मुख्य कारण आहे. ‘ओपन एआय’ला मायक्रोसॉफ्टकडून सुमारे १० अब्ज डॉलरचा वित्तपुरवठा झाल्याचे वृत्त आहे. या प्रचंड गुंतवणुकीमुळे ‘ओपन एआय’ला डेटा सेंटर्सचा विस्तार, संशोधन आणि चॅट जीपीटीची कार्यक्षमता वाढवणे शक्य झाले. फेसबुकनेही आपल्या एआय विभागात अब्जावधी डॉलर गुंतवल्याची चर्चा आहे. शेकडो संशोधक, अभियंत्यांच्या सहयोगाने त्यांनी LLaMA सारखी मोठी भाषिक मॉडेल विकसित केली आहेत. दुसरीकडे, डीप माइंड आणि गुगल एआय यांनी हातमिळवणी करून ‘जेमिनी’सारखी मॉडेल तयार करण्यासाठी अब्जावधी डॉलर गुंतवले आहेत. गुगलच्या विस्तृत सेवांची पार्श्वभूमी पाहता, उच्चस्तरीय डेटा सेंटर आणि अल्गोरिदम संशोधनावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. ‘डीपसीक’ने या तुलनेत कमी संसाधने असूनही R1 हे अत्याधुनिक एआय मॉडेल विकसित केले. ‘डीपसीक’च्या गुंतवणुकीत सरकारी अनुदानांशिवाय खासगी गुंतवणुकीचा आणि आंतरराष्ट्रीय मदतीचाही समावेश होता. अमेरिका-चीन संघर्ष गेल्या काही वर्षांत एकीकडे तंत्रज्ञानाची भरारी सुरू असताना दुसरीकडे विविध देशांतील राजकीय आणि व्यापाराशी संबंधित संघर्षही वाढत होते. २०२२-२३ मध्ये अमेरिकेने चीनला अत्याधुनिक चिप्स आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर निर्बंध घातले. त्यामुळे चीनमधील हाय-टेक उद्योग आणि एआय क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे राहिले. अमेरिकेच्या तत्कालीन बायडेन प्रशासनाचे म्हणणे होते की, चीनला चिप्सचा खुला पुरवठा होत राहिल्यास जागतिक सुरक्षेला धोका निर्माण होईल. या भूमिकेमुळे केवळ व्यापारी संबंधच नव्हे, तर तंत्रज्ञान-विकासावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. अल्प संसाधनांत मॉडेल विकसन अमेरिकेच्या या निर्बंधांचा फटका चीनमधील अनेक कंपन्यांना बसला. विशेषत: एआयमधील संशोधन, प्रशिक्षण आणि मॉडेल-विकासनासाठी उच्च-कार्यक्षमतेचे जीपीयू अत्यावश्यक असतात. एनव्हिडियासारख्या अमेरिकी कंपन्यांकडून होणारा चिप्सचा पुरवठा मर्यादित झाल्याने चीनमधील स्टार्टअप्ससमोर मोठी अडचण उभी राहिली. अशा कठीण परिस्थितीत लियांग वेनफेंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या टीमने कमी जीपीयू संसाधने असतानाही अधिक परिणामकारक एआय मॉडेल तयार करण्यावर भर दिला. साधारणपणे जीपीयू आणि प्रचंड डेटावर अवलंबून राहणारे एआय संशोधन ‘डीपसीक’ने अधिक कुशलतेने राबवले. प्रशिक्षणाची प्रक्रिया, अल्गोरिदम ऑप्टिमायझेशन आणि हार्डवेअरच्या उपयोगात नावीन्यपूर्ण पद्धती वापरल्या. अल्प संसाधनांतही गुणवत्तापूर्ण एआय मॉडेल विकसित करणे शक्य असल्याचे ‘डीपसीक’ने दाखवून दिले. भारतासाठी नवी संधी भारतीय तंत्रज्ञान क्षेत्र जागतिक स्पर्धेत उतरत असताना, स्टार्टअप आणि इनोव्हेशन इको-सिस्टिमसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. भारतीय बँका, वित्त संस्था, उत्पादन क्षेत्र आणि लॉजिस्टिक उद्योगांमध्ये एआयवर आधारित स्वयंचलित सेवा आणखी बळकट होऊ शकतात. ‘डीपसीक’सारखी साधने वापरून तांत्रिक संस्थांचे अभ्यासक्रम अधिक अद्ययावत आणि उपयोजनक्षम बनवता येतील. संशोधन संस्थांनाही एआयच्या संदर्भात नवे प्रयोग आणि प्रकल्प हाती घेता येतील, त्यातून एआय निष्णातांची नवी पिढी तयार होऊन या क्षेत्रात नव्या स्टार्टअप्सची लाट येऊ शकेल. एआय आधारित सेवांची गरज वाढून डेटा विश्लेषक, मशीन लर्निंग इंजिनिअर, प्रॉडक्ट डेव्हलपर आदी तांत्रिक कौशल्यांना मोठी मागणी निर्माण होईल. कडक धोरणे आवश्यक ‘डीपसीक’सारखी साधने मोठ्या प्रमाणात वापरली जातील, तशी भारतीय नियामक संस्थांनाही डेटा संरक्षण व गोपनीयतेबाबत अधिक कडक धोरणे आखावी लागतील. या क्षेत्रातील तांत्रिक अधिष्ठान वाढवण्यासाठी अत्याधुनिक नियम, मानकांची अंमलबजावणी करावी लागेल, जेणेकरून तंत्रज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करता येईल. जागतिक बाजारपेठेत भारतीय प्रतिभेची चमक दाखवण्यात किफायतशीर एआय साधने महत्त्वाची भूमिका बजावतील. योग्य नियमन, सुरक्षा आणि नैतिक मूल्यांचा आदर राखून, भारतही एआयमधील संभाव्य शक्ती म्हणून उदयाला येऊ शकतो. (संपर्कः ameyp7@gmail.com)



Source link

डायरीची पाने: उन्हाळपाळी

0
डायरीची पाने:  उन्हाळपाळी


इंद्रजित भालेराव4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नव्या, बदललेल्या काळाचं स्वागत करायला हवं. त्या भोवती आपली संस्कृती गुंफायला हवी. असंस्कृतपणे कुठलाच व्यवहार केला जाऊ नये. त्यामुळे कामाचा आनंद मिळत नाही.

रानात औत घालून रान उलथून टाकण्याला ‘पाळी घालणे’ असं म्हणतात. खरं तर पाळी या शब्दाचा अर्थ रिकामी चक्कर मारणे असा होतो. त्या अर्थानं, रान रिकामं असतं तेव्हा मशागतीसाठी शेतात औत घालण्याला पाळी म्हटलं जात असावं. पेरणीसाठी, कोळपणीसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी शेतात औत घालतात त्याला पाळी म्हणत नाहीत. कारण तेव्हा पेरणी करणे, तण काढणे अशा काहीतरी कामानिमित्त शेतात औत घातलेले असते. पण, असं कुठलंच प्रत्यक्ष कारण नसताना रिकाम्या रानात औत घालण्याला ‘पाळी घालणे’ म्हणतात. रिकाम्या रानात चकरा मारत केलेलं काम म्हणून तिला पाळी म्हणत असावेत. त्यातही उन्हाळ्यात रान जास्त दिवस रिकामं असल्याने या काळात रानाची अधिक मशागत करणे शक्य असते. अशा मशागतीला ‘उन्हाळपाळी’ म्हटलं जातं.

नांगराने जमीन खोलवर भेदून उलथून टाकणे, भुसभुशीत करणे, हे काम पाळीत केले जाते. त्यामुळं खालची माती वर येते. उन्हाळाभर ती उन्हात तापते. पावसाळ्यात पहिला पाऊस पडला की एकदम फुलून येते. तेव्हा पेर साधली की धान तरारून येते. अशी रानाची मशागत करणे, ही एका अर्थाने रानाची साधनाच असते. प्रत्यक्ष तसा फायदा काही दिसत नसताना केवळ रानाची तयारी करून घेण्याला मशागत म्हणतात. अशी नांगरून टाकलेली रानं, रानातली काळी माती जणू तपश्चर्येला बसलेली असते. तिचं हे तप पाऊस पडला की फळाला येतं.

पाडव्याच्या दिवशी नवा सालगडी ठरला की, त्याचं हेच पहिलं काम असायचं. कारण तेव्हा रानात कुठलंच पीक नसायचं. त्यामुळं रिकाम्या रानाची मशागत करणे, हे एकच काम त्या नव्या गड्याच्या वाट्याला यायचं. आधीच्या काळात लोखंडी नांगर असायचे. त्याला चार, सहा, तर कधी कधी आठ आणि महाभारतातल्या नोंदीप्रमाणं बारा बैलही जुंपले जात. नांगर धरण्यासाठी एक आणि बैल हाकण्यासाठी दोन्हीकडून दोन माणसं लागत. कारण एकामागं एक असे चार बैल असायचे. एकाच बाजूच्या माणसाला ते हाकणं शक्य नसायचं. अशा वेळी त्यासाठी माणसेही एकापेक्षा जास्त लागायची. लोखंडी नांगर जमिनीत खोलवर रुतल्यामुळं दोन बैलांना ओढणे शक्य नसायचे. म्हणून दोनपेक्षा जास्त बैल जुंपावे लागायचे. लाकडी नांगर असेल, तर दोन बैल ओढू शकायचे, त्यामुळे त्याला दोनपेक्षा जास्त बैल जुंपता येत नसत. पण, लोखंडी नांगराला साखळीच्या मदतीने कितीही बैल जुंपता यायचे.

चैताचा महिना या उन्हाळपाळीमध्ये निघून जायचा. पाडव्याच्या दिवशी नवा गडी कामावर आलेला असायचा, तो पुढचा सगळा महिना ही मशागतच करायचा. या कठीण काळातच नवा सालगडी कसा आहे, हेही कळायचं. तो लेचापेचा असेल, तर त्याला सालभर ठेवायचं की नाही, याचा फेरविचार करता यायचा. अर्थात फक्त सालगडीच हे काम करायचा, असं नाही. कधी कधी स्वत: शेताचा मालकही हे काम करत असे किंवा सालगड्याला करू लागत असे. अशावेळी घरून बायका टोपलंभर भाकरी आणि गाडगंभर भाजी, वाडगंभर ताक पाठवून देत. कौतुकाने जात्यावर गाणी म्हटली जायची…

बंधु गं बंधू माझा, बंधू गं गुणाचा शेताला जातोया, चैताच्या उन्हाचा। असं चैताचं गं ऊन, जशी उन्हाची आगिन गोरी गं भावजय, शेता चालली नागिन। अशा नांगऱ्याच्या, पैजा लागल्या दोघाच्या हौशा या बैलानं, शिवळा तोडिल्या सागाच्या। अशा नंदी जोड्या, जोड्या चालती येगानी बापा गं समर्थानं, नांगर केले सागवानी। असं चैताचं ऊन, ऊन गोरीला सोसंना रानीवनी दूर दूर, झाडझुडुप दिसंना। बापाचं गं शेत, कसं बिघ्यामागं बिघं नाही शिनवटा थोडा, बंधू मपलं गं वाघ। बंधूची नांगरट, सुरू ठीक्यामागं ठीकं सोईऱ्या-धाईऱ्यानं, धरलिया इरजीक।

तेव्हाच्या उन्हाळपाळीचं वर्णन अशा ओव्यांतून जुन्या बायकांनी करून ठेवलं आहे. त्यामुळं पुढच्या पिढ्यांना निदान त्याचं स्वरूप तरी लक्षात येईल. आजही उन्हाळपाळी होते, नाही असं नाही. पण, त्यासाठी नांगर आणि बैलांची गरज उरलेली नाही. आता गावात एक-दोघांकडं ट्रॅक्टर असतो. शिवारातल्या सगळ्या शेतांची मशागत, उन्हाळपाळी ट्रॅक्टरच करून देतो. त्यासाठी ना कामावर गडी ठेवावा लागतो, ना लोखंडी वा लाकडी नांगर लागतो, ना बैलांची गरज पडते. नांगर हाकणाऱ्याची जागा आता ट्रॅक्टर हाकणाऱ्यांनी घेतली आहे. तो एकरानुसार जमीन नांगरून देण्याचे भाव ठरवतो. सध्या अडीच हजार रुपये एकर असा भाव आहे. त्याला डिझेल वगैरे धरून एकरी हजारभराचा खर्च असतो. दिवसभरात पाच एकर वावर नांगरणं होतं. ट्रॅक्टरवाला रात्रंदिवस शेतात ट्रॅक्टर चालवून सगळ्यांची मशागत करून देतो. लोकांनाही आता बैल-बारदाना, त्यासाठी चारापाणी, झोपडी-मांडव या सगळ्या गोष्टी नको वाटू लागल्या आहेत. त्यामुळं हा सोपा पर्याय सगळ्यांनी स्वीकारला आहे. जमिनीला त्यामुळं काही फरक पडत नाही. उलट ट्रॅक्टरची नांगरणी लोखंडी नांगरासारखी खोलवर होते. त्यामुळे जमीन खोलवर उलथून पडते आणि उन्हाळाभर तापत राहते.

काळाप्रमाणं माणसं बदलतात. त्याच्या काम करण्याच्या पद्धती अन् त्यासाठीची साधनं बदलतात. पूर्वी नांगर हाकणारा स्वत: गाणी म्हणायचा. आता ट्रॅक्टर चालवणारा पेनड्राइव्हमधली गाणी लावून ऐकत असतो. त्याची ती गाणी आख्ख्या शिवाराला ऐकू जातात. त्या नादात तो ट्रॅक्टर चालवतो. ती गाणी अर्थात गायकांनी गायलेली असतात, त्यात त्याचा स्वत:चा सहभाग नसतो. ट्रॅक्टरची मालकीण आपल्या ट्रॅक्टर चालवणाऱ्या मालकावर गाणी लिहिते का नाही, माहीत नाही. कशासाठी लिहिल? आणि ती कुठं गायिल? आता कुठं जातं राहिलं आहे? आणि कुठं दळण्याची गरज उरली आहे? त्यामुळं तिला गाणं रचण्याची, म्हणण्याची गरजच उरलेली नाही. काळ बदलतो. बदलायलाच हवा. नव्या काळाचं स्वागत करायला हवं. त्या भोवती आपली संस्कृती गुंफायला हवी. असंस्कृतपणे कुठलाच व्यवहार केला जाऊ नये. कारण त्यामुळे कामाचा आनंद मिळत नाही, इतकेच.

(संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा नावाबाबत कोर्टाने दिला होता निर्णय, ‘लव्ह स्टोरी’ सुपर-डुपर हिट ठरला, पण त्यात दिग्दर्शकाचे नावच नव्हते

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  जेव्हा नावाबाबत कोर्टाने दिला होता निर्णय, ‘लव्ह स्टोरी’ सुपर-डुपर हिट ठरला, पण त्यात दिग्दर्शकाचे नावच नव्हते


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल आणि त्यांच्या सर्वांत पहिल्या सुपरहिट, संस्मरणीय ‘लव्ह स्टोरी’ या सिनेमाविषयी.. मला आठवतेय, हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा मी १५ वर्षांचा होतो; पण तो मला खूप आवडला होता. सिनेमाच्या पडद्यावर पहिल्यांदाच नवतारुण्यातील आगळी प्रेमकहाणी पाहायला मिळाली होता. यातील सगळी गाणी सुपरहिट होती. कुमार गौरवची तर अशी क्रेझ बनली होती की प्रत्येक मुलगी जणू स्वप्नात त्यालाच पाहात होती. माझे नशीब म्हणजे मला रवैलजींसोबत काम करण्याची संधी मिळाली. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांच्याशी माझा ऋणानुबंध आहे. या काळात मी त्यांच्याकडून खूप सारे किस्से ऐकले आहेत. आज मी तुम्हाला ‘लव्ह स्टोरी’शी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहे.

या सिनेमातील हिट गाण्यांपैकी एक म्हणजे.. ‘तेरी याद आ रही है..’ राहुलजींनी मला सांगितले होते… आर. डी. बर्मन यांनी या गाण्याची चाल निश्चित केली आणि आनंद बक्षींसोबत बसून गाण्याच्या ओळी तसेच बोल निश्चित करण्यात आले. विजयता पंडितवर चित्रीत होणाऱ्या लताजींच्या ओळी कोणत्या आणि कुमार गौरववर चित्रीत होणाऱ्या अमितकुमारच्या ओळी कोणत्या, हेही ठरले. मग मी शूटिंगसाठी काश्मीरला गेलो. रेकॉर्डिंगच्या वेळी मी नव्हतो, पण निर्माते राजेंद्रकुमार मात्र उपस्थित होते. गाणे रेकॉर्डिंग होऊन माझ्याकडे आल्यावर ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो. कारण ते पूर्णपणे उलट रेकॉर्ड झाले होते. अमितकुमारसाठी फायनल केलेल्या ओळी लताजींच्या आवाजात होत्या आणि लताजींसाठीच्या ओळी अमितकुमारच्या आवाजात होत्या. मला वाटले, कदाचित चुकून असे घडले असावे. पण, चौकशी केल्यावर कळले की, कोणत्या ओळी कुमार गौरवला आणि कोणत्या विजयता पंडितला द्यायच्या, हा बदल राजेंद्रकुमारजींनी केला होता. पण, मी ज्या ज्या ओळी ज्यांच्यासाठी फायनल केल्या होत्या, त्याप्रमाणेच त्या चित्रीत केल्या. शूटिंगच्या वेळी विजयता पंडितला मी अमितकुमारचा प्लेबॅक दिला आणि लताजींचा प्लेबॅक कुमार गौरवला दिला. नंतर या गाण्याचे एडिटिंग पाहताना खूप मजा आली, कारण त्यात अमितकुमारचा प्लेबॅक विजयता पंडितच्या वेळी आणि लताजींचा प्लेबॅक कुमार गौरवच्या वेळी ऐकू येत होता. पुढे लताजी आणि अमितकुमार यांच्या ओरिजनल ओळी त्यांच्या आवाजात डब करुन फिल्मसोबत जोडण्यात आल्या.. असो.

सिनेमा पूर्णत्वाला आला असताना काही क्रिएटिव्ह गोष्टींवरुन राजेंद्रकुमार आणि राहुलजींमध्ये मतभेद झाले. सिनेमा तयार झाल्यावर त्याचे पहिले पोस्टर बनवण्यात आले. राहुलजींनी ते पाहिले तर त्यावर लिहिले होते, ‘राजेंद्रकुमार्स लव्ह स्टोरी’ आणि त्यावर दिग्दर्शक म्हणून राहुलजींचे नावच नव्हते. त्यामुळे राहुलजींना खूप वाईट वाटले. खरे तर राजेंद्रकुमार आणि राहुलजींचे लहानपणापासूनचे संबंध होते. राजेंद्रकुमारांनी पूर्वी राहुलजींचे वडील एच. एस. रवैल यांचे सहायक म्हणून काम केले होते. त्यामुळे राहुलजींनी राजेंद्रजींना सांगितले की, तुम्ही पोस्टरवर माझे नाव दिले नाही, त्यामुळे सिनेमातही ते देऊ नका. राहुलजींनी दिलेल्या माहितीनुसार, राजकपूर साहेबांनी त्यांना सांगितले होते की, सिनेमा खूप चांगला बनल्यामुळे दिग्दर्शक म्हणूनही आपले नाव देण्याची राजेंद्रकुमार यांची इच्छा होती. त्यानंतर मग राहुलजींनी कोर्टात धाव घेतली आणि विद्या सिन्हा, अमजद खान, डॅनी, अरुणा इराणी या कलाकारांची प्रतिज्ञापत्रे सादर केली. शेवटच्या दृश्यापर्यंत हा संपूर्ण सिनेमा राहुल रवैल यांनीच बनवल्याचे या सगळ्यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने निर्णय दिला की, हा सिनेमा राहुल रवैल यांनी बनवला असल्याने आपले नाव द्यावे की देऊ नये, हा त्यांच्या इच्छेचा विषय आहे. परंतु, दिग्दर्शकाच्या जागी अन्य कुणाचे नाव देता येणार नाही. मला वाटते, हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासातील हा असा पहिला सिनेमा असेल, जो इतके प्रचंड यश मिळवून ब्लॉक बस्टर ठरला, पण त्यात दिग्दर्शकाचे नाव मात्र दिसत नाही. तथापि, हा सिनेमा राहुल रवैल यांनी दिग्दर्शित केला असल्याचे साऱ्या इंडस्ट्रीला माहीत आहे.

मला राहुलजींच्या बाबतीत घडलेली आणखी एक घटना आठवतेय. राहुलजींचा थोरला मुलगा भरत हा मोठा फोटोग्राफर आहे. दुसरा मुलगा शिव रवैल याने ‘रेल्वे मॅन’ ही वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे. राहुलजींना ही मुले झाली तेव्हा त्यांच्या जन्माच्या दाखल्यावरील रिलीजन (धर्म) या रकान्यात त्यांनी ‘इंडियन’ असे लिहिले. तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने त्यांना तसे लिहिण्यास मनाई केली आणि या रकान्यात तुमचा धर्म लिहावा लागेल, असे सांगितले. राहुलजी म्हणाले, ‘मी हिंदुस्तानी आहे, माझा धर्म इंडियन आहे, तुम्हाला तसे लिहावेच लागेल.’

राहुलजींनी त्या अधिकाऱ्याला एक लेखी नोटिस पाठवली आणि अखेर त्यालाही ते मान्य करावे लागले. शिव आणि भरत यांच्या जन्माच्या दाखल्यावर धर्माच्या रकान्यात ‘इंडियन’ लिहिले आहे. राहुलजींनी याविषयी मला सांगिल्यावर माझ्या मनातील त्यांच्या विषयीचा आदर दुणावला. या गोष्टीवरुन मला नवाज देवबंदी यांचे दोन शेर आठवताहेत…

रोशनी का कुछ न कुछ

इमकान होना चाहिए

बंद कमरे में भी

रोशदान होना चाहिए।

माथे पे आप के चाहे

कुछ भी लिखा हो

सीने पे मगर

हिंदोस्तान होना चाहिए।

उद्या, म्हणजे ७ एप्रिलला राहुलजींचा वाढदिवस आहे. माझ्याकडून, प्रत्येकाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा! ज्या गाण्याचा किस्सा मी नुकताच तुम्हाला सांगितला, ते ‘लव्ह स्टोरी’मधील गाणे आज राहुलजींसाठी ऐकूया…

याद आ रही है,

तेरी याद आ रही है…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

देश – परदेश: ट्रम्प (असे) कसे घडले?

0
देश – परदेश:  ट्रम्प (असे) कसे घडले?


ज्ञानेश्वर मुळे9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ट्रम्प यांचे वडील फ्रेड हे अत्यंत कठोर स्वभावाचे रिअल इस्टेट व्यावसायिक होते. त्यांनी आपल्या मुलाला लहानपणीच शिकवले.. ‘जगात फक्त दोन प्रकारचेच लोक असतात. पहिला प्रकार जिंकणाऱ्यांचा किंवा मारणाऱ्यांचा आणि दुसरा प्रकार हरणाऱ्यांचा वा पराजित होणाऱ्यांचा.. या संस्कारांतून वाढलेल्या ट्रम्प यांनी फक्त आणि फक्त जेते किंवा विजयी होण्याचा दृढनिश्चय केला.

सध्या जगभर ट्रम्प नावाच्या वादळाने ‘हडकंप’ निर्माण केला आहे. पहिल्यांदाच अमेरिकेच्या तथाकथित शत्रू राष्ट्रांबरोबरच मित्र राष्ट्रांचेही धाबे दणाणले आहे. गंमत म्हणजे, समस्त अमेरिकाही या वादळातून सुटलेली नाही. संपूर्ण जगाप्रमाणेच अमेरिका कुठे जाणार, याबाबत कोणतेही मतैक्य नाही. ट्रम्प एक तर अमेरिकेला अत्युच्च शिखरावर नेणार किंवा त्यांच्या धोरणांमुळे अमेरिका रसातळाला जाणार, असे दोन टोकाचे तर्क सध्या मांडले जात आहेत. या रणधुमाळीचे मुख्य कारण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त दोनेक महिन्यांत शंभराहून अधिक असे ‘कार्यकारी आदेश’ (फतवे) काढले आहेत. आणि हा सपाटा सुरूच आहे. त्यामुळेच जगभर चिंतेचे सावट आणि काळजीचे वातावरण पसरले आहे. आपल्यावर केव्हा गाज कोसळणार, याची प्रत्येक देशाला दहशत वाटत आहे.

‘राजा कालस्य कारणम्’ या वचनाचा शब्दश: अर्थ राजा हा ‘काळ’ घडवतो, असा होतो. प्रत्यक्षात मात्र आपण दोन अर्थ काढू शकतो. पहिला, वर सांगितल्याप्रमाणे आपल्या कार्यकाळावर त्या राजाच्या कर्तृत्वाची पदचिन्हे स्पष्ट दिसतात. तो राज्याला भरभराटीला आणतो, जनतेचे भविष्य उज्ज्वल करतो, असा होतो. दुसरा अर्थ, राजा काळाचे कारण असतो / ठरतो. ‘काळ’ याचा अर्थ मृत्यू किंवा सर्वनाश असा घेतला जाऊ शकतो. सुवर्णकाळ आणि कर्दनकाळ असे दोन्ही ‘काळ’ राजाच्या रुपाने जनतेसमोर येतात. या अर्थाने जगातल्या सर्वांत शक्तिशाली अमेरिकेसाठी ट्रम्प काय ठरतील, तेही ‘काळ’च सांगेल.

एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचे किंवा व्यक्तित्वाचे विश्लेषण अनेक पद्धतीने करता येते. उदा. त्या व्यक्तीच्या निर्णयाची चिरफाड करणे, त्याच्या मित्रमंडळींचा विचारपूर्वक अभ्यास करणे, त्याच्या भूतकाळातील वर्तणुकीची तर्कसंगत मांडणी करुन काही निष्कर्ष काढणे. पण, याचबरोबर अनेक मानसशास्त्रज्ञ सांगतात की, व्यक्तीच्या बालपणाचा त्याच्या पुढच्या आयुष्यावर आणि कर्तृत्वावर खोल परिणाम होतो. त्यात परिवाराची पार्श्वभूमी, आर्थिक स्थिती, संस्कार, स्वभाव, परिसर या सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे शिक्षण, धर्म आणि मित्र परिवार या गोष्टींचाही खोलवर परिणाम होतोच; पण नंतरच्या काळात या गोष्टी विविध पद्धतीने प्रकट होतानाही जा‌णवतात. उदा. संत ज्ञानेश्वरांच्या बालपणी आलेल्या कटू अनुभवाने त्यांना फक्त शहाणे केले नाही, तर जगाकडे पाहण्याचा एक उदार दृष्टिकोन तयार झाला. म्हणूनच ते संत आणि तत्त्वज्ञ झाले. हिटलरच्या बाबतीत सांगायचे झाले तर, जर्मनीविषयीचा राष्ट्रवाद ‘लिओपोल्ड पोएश’ या त्याच्या माध्यमिक शाळेतच किशोरवयात त्याला प्रभावित करुन गेला. त्याचे शिक्षण अपूर्ण राहिले, कलाकार होण्याचे स्वप्नही पूर्ण झाले नाही आणि त्याला मजुरी करत निराश्रितासारखे वसतिगृहे बदलत जगावे लागले. या सर्वच गोष्टींचा त्याच्या मनावर गंभीर परिणाम झाला असावा आणि त्यातूनच पुढच्या ‘हिटलर’ होण्याचे बीजही रुजले असणार.

ट्रम्प यांच्या बाबतीत नेमके काय घडले? त्यांचा डीएनए नेमका काय आहे? परिवार, शिक्षण, शाळा, मित्र, परिसर या सर्व गोष्टी कशा होत्या? या गोष्टींचा विचार केला, तर ट्रम्प नेमके ‘कोण’ आहेत, हे समजायला मदत होईल. ट्रम्प यांच्या मनात डोकावायचे असेल, तर त्यांच्या बालपणाकडे वळून पाहावे लागेल.

ट्रम्प यांचे वडील फ्रेड हे अत्यंत कठोर स्वभावाचे रिअल इस्टेट व्यावसायिक होते. त्यांनी आपल्या मुलाला अगदी लहानपणीच शिकवले.. ‘जगात फक्त दोन प्रकारचेच लोक असतात. पहिला प्रकार जिंकणाऱ्यांचा किंवा मारणाऱ्यांचा आणि दुसरा प्रकार हरणाऱ्यांचा वा पराजित होणाऱ्यांचा. जेते आणि पराभूत हे दोनच प्रकार. ट्रम्प याच संस्कारांतून वाढल्याने त्यांनी फक्त आणि फक्त जेते किंवा विजयी होण्याचा दृढनिश्चय केला. फ्रेड अजिबात संवेदनशील पिता नव्हते. कडक स्वभावाचे आणि प्रेम, आपुलकी या शब्दांपासून ते खूप दूर होते. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी तेराव्या वर्षी लष्करी शाळेत पाठवले. उद्देश अतिशय स्पष्ट होता.. तिथे इतरांवर अधिकार गाजवून नियंत्रण ठेवण्याचे शिक्षण मिळावे. त्यांचा चरित्रकार टिमोथी ओब्रियन यांनी, ‘लष्करी शाळेतील सुरूवातीच्या काळातच रांगेत उभे राहिल्याने डोनाल्डच्या थोबाडीत मारले गेले,’ याविषयी लिहिले आहे.

अनेकांच्या मते, त्या शाळेतील पाच वर्षांत इतरांना ताब्यात ठेवण्याचे प्रशिक्षणच या महाशयांनी घेतले. ट्रम्प यांच्या नेतृत्व शैलीतील इतरांवर प्रहार करण्याचे, दुसऱ्यांना कमी लेखण्याचे, त्यांची खिल्ली उडवण्याचे कौशल्य ते या शाळेतच शिकले.

डोनाल्ड ट्रम्प यांचे आपल्या आईशी असलेले नातेही फारसे प्रेमाचे नसावे. ते अडीच वर्षांचे असताना ती गंभीर आजाराने पडून राहिली. त्यामुळे आईच्या वात्सल्याच्या आठवणी ट्रम्प यांच्याकडे नाहीत. लहान डोनाल्डला इतर कुठल्याही मुलांप्रमाणे काळजी घेणारी आई हवी होती. पण, तो व्याकूळ होऊन ओरडायचा, तेव्हा त्याच्यावर रागावले जायचे. आणि त्यापेक्षा वाईट म्हणजे, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जायचे. आईवडिलांच्या प्रेमाला पारखा झालेल्या डोनाल्डच्या व्यक्तित्वावर या वातावरणाचा फार जबरदस्त परिणाम झाला. आज ट्रम्प काही गोष्टी का करताहेत, याचा उलगडा बालवयातील डोनाल्डच्या अतृप्त भावनिक आणि मानसिक भुकेच्या शोधातून होऊ शकतो. अलीकडेच देशांतर करुन आलेल्या छोट्या मुलांना परिवारापासून अलग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

कृष्णवर्णीय जनतेवरची पाळत वाढवली, पहिल्या कारकिर्दीत भाषणांमध्ये कोरोनाविषयी कधीच गांभीर्य दाखवले नाही. या आणि अशा अनेक गोष्टींच्या तारा ट्रम्प यांच्या बालवयातील जडणघडणीशी जोडलेल्या असाव्यात, असे वाटते. मेरी ट्रम्प या त्यांच्या पुतणीने लिहिलेल्या, ‘Too Much and Never Enough : How My Family Created the World’s Most Dangerous Man’ हे पुस्तकाचे शीर्षक सर्व काही सांगून जाते. थोडक्यात सांगायचे तर, ‘ट्रम्प कुटुंबाने जगातील सर्वात धोकादायक माणूस कसा तयार केला?’ असे या पुस्तकाचे नाव आहे. त्यामुळेच, दुर्लक्षित बालपणातूनच इतरांच्या विचारांकडे दुर्लक्ष करणारे ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प’ तयार झाले नाहीत ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

(संपर्कः dmulay58@gmail.com)



Source link

रसिक स्पेशल: ‘जिबली’ची चित्रे अन् धोक्याच्या रंगछटा

0
रसिक स्पेशल:  ‘जिबली’ची चित्रे अन् धोक्याच्या रंगछटा


अतुल कहाते11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘एआय’चा आवाका, त्याचा वेग, झपाटा हे सगळं अवाक् करून सोडणारं आहे. आपल्याला त्यामुळं गांगरल्यासारखं होत असलं, तरी ‘जिबली’च्या निमित्तानं आपली सारासार विवेकबुद्धी गमावून ‘एआय’च्या त्सुनामीत गटांगळ्या खाण्यापासून तरी निदान स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे!

भारतात जिलबी सगळ्यांना माहीत असली, तरी गेल्या काही दिवसांपासून आपल्या डिजिटल विश्वात ‘जिबली’ हा नवा प्रकार अचानक धुमाकूळ घालू लागला आहे. यामागेही पुन्हा एकदा ‘एआय’चंच तंत्रज्ञान असणं, हा आता आश्चर्यही वाटू नये इतका सातत्यानं घडणारा प्रकार असल्याचं दिसत आहे. हायाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाता आणि तोशिओ सुझुकी या तिघांनी १९८५ मध्ये जपानच्या टोकियोमधल्या कोगाने या भागात ‘स्टुडिओ जिबली’ची स्थापना केली. तेव्हापासून अॅनिमेशन, जाहिराती, टीव्हीसाठीचे चित्रपट अशा अनेक गोष्टींसंबंधीची निर्मिती करण्याचं काम जिबलीकडून होतं आहे. जिबलीचं वैशिष्ट्य म्हणजे, पारंपरिक पद्धतीनं तयार केले जात असलेले कार्टून, अॅनिमेशनपट यांच्यापेक्षा खूप वेगळ्या प्रकारची आणि जिवंत वाटतील अशी चित्रं त्यात असतात. बहुतेक जिबली चित्रं एखाद्या निष्णात चित्रकारानं हातानं काढल्यासारखी वाटत असल्यामुळं ती अगदीच बघत राहावीशी वाटतात.

गंमत म्हणून ठीक, पण… ‘एआय’ तंत्रज्ञानाची मूळ संकल्पना म्हणजे माहितीच्या अतिविशाल साठ्यांचा अक्षरश: फडशा पाडणे, त्यातून शिकणे आणि शिकलेल्या गोष्टींचा वापर प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी किंवा नवनिर्मितीसाठी करणे. ‘माहिती’ हा यातला महत्त्वाचा मुद्दा. इथे माहिती म्हणजे मजकूर, चित्रं, व्हीडिओ, आवाज, संगीत असं काहीही असू शकतं. मोझार्टच्या सिंफनी, भीमसेनजी किंवा किशोरीताईंची रागांची सादरीकरणं, चित्रपट हे सगळं ‘एआय’ समजू / ऐकू / वाचू / बघू शकतं आणि त्यातून शिकून नवं तयार करू शकतं. साहजिकच, जिबलीची आजवरची चित्रं बघून त्यानुसार नवी चित्रं तयार करणं किंवा आपण दिलेल्या वैयक्तिक चित्राचं रूपांतर जिबलीसारख्या चित्रामध्ये करणं हे ‘एआय’ला सहजशक्य आहे. यासाठीची तरतूद ‘ओपन एआय’ आणि इतर कंपन्यांनी करून दिल्यावर जगभरात आपल्या छायाचित्रांचं रूपांतर जिबलीसारख्या चित्रांमध्ये करण्याची लाटच पसरली. निव्वळ गंमत म्हणून हा प्रकार करून बघणं ठीक असलं, तरी यातून दोन ठळक मुद्दे समोर येतात : पहिला स्वत:पुरता, तर दुसरा सर्वव्यापी. त्याविषयी बोललं पाहिजे.

‘डीप फेक’चा धोका : पहिला मुद्दा म्हणजे, आपण आपली स्वत:ची, कौटुंबिक, खासगी छायाचित्रं जिबलीसारख्या स्वरूपात काढून घेण्यासाठी स्वत:हून पुरवतो, तेव्हा आपण ‘एआय’ला आयतं खाद्य पुरवतो. ‘एआय’चं शिक्षण पूर्णपणे त्याला मिळू शकत असलेल्या माहितीच्या आधारावर सुरू असल्यामुळं त्याच्यासाठी ही पर्वणीच आहे. यातून आपली छायाचित्ररूपी माहिती ‘एआय’ कंपन्यांकडे तर जातेच; पण तिथून ती कशी, कुणासाठी, कधी वापरली जाईल, यावरचं नियंत्रण आपण पूर्णपणे गमावून बसतो. ‘डीप फेक’सारखे प्रकार सातत्यानं घडत असताना आपण स्वत:हून हा धोका ओढावून घेण्यासारखं आहे. उद्या आपल्या कुटुंबातल्या कुणाचा ‘डीप फेक’ व्हिडिओ निघाला किंवा आपल्या कुटुंबातल्या कुणाचा आपण संकटात असल्याचा बनावट पण अगदी खरा वाटणारा व्हिडिओ कॉल आला आणि आपण त्याला फसलो, तर त्यामागे आपणच अशा प्रकारे ‘एआय’ला पुरवलेलं खाद्य कारणीभूत ठरू शकतं. काही वर्षांपूर्वी फेसबुकवर.. ‘तुम्ही आत्ता अमुक वर्षे वयाचे असताना असे दिसत असाल, तर तमुक वर्षांचे झाल्यावर कसे दिसाल?’ अशा प्रकारच्या आकर्षक गोष्टी असायच्या. असंख्य लोकांनी आपली छायाचित्रं फेसबुकला यासाठी पुरवून समृद्ध केलं. याचा हा आधुनिक प्रकार म्हणता येईल.

रोजगारांच्या मुळावर घाव : दुसरा मुद्दा सर्वव्यापी अशासाठी की, आज जिबली तर उद्या काय, असा प्रश्नच विचारण्याची सोय आता ‘एआय’मध्ये राहिलेली नाही. ‘एआय’साठी खरोखरच काहीही अशक्य नाही. सगळ्या क्षेत्रांमधल्या सगळ्या गोष्टी शिकणं ‘एआय’ला शक्य आहे. त्यामुळे अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची मुळात गरजच काय, असा प्रश्न विचारला जाणंही अपरिहार्य झालं आहे. जिबलीचं सोडा; ज्या संगणक क्षेत्रानं ‘एआय’ची निर्मिती केली आहे, त्या क्षेत्रामध्येच ‘प्रोग्रॅमिंग’ किंवा ‘कोडिंग’ करत असलेल्यांची गरज लवकरच खूप कमी होईल, अशी परिस्थिती ‘एआय’ने निर्माण केली आहे. म्हणजेच, संगणक क्षेत्रानं रोजगारांच्या बाबतीत आपल्या मुळाशीच घातलेला हा घाव आहे.

‘एआय’ला काहीही अशक्य नाही : जिबलीच्या बाबतीत बोलायचं, तर जीव ओतून चित्रं काढत असलेल्या चित्रकारांचं काय? मुळात जिबलीची निर्मिती केलेल्या लोकांचं काय? आता ‘एआय’मध्ये सर्रास कुणीही अशी चित्रं काढू शकत असेल आणि अॅनिमेशन तयार करू शकत असेल, तर ‘जिबली’ या मूळ कंपनीकडं कोण जाईल? इतर कुठल्याही क्षेत्राच्या बाबतीतही आपल्याला असंच म्हणता येईल. फक्त कला, साहित्य यापुरतं हे मर्यादित नाही, हे संगणकशास्त्राच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेलच. पण, इतरही असंख्य क्षेत्रांमध्ये माणूस करत असलेलं काम ‘एआय’साठी अजिबात अशक्य नसल्याचं आपल्या लक्षात येईल. ‘एआय’चा आवाका, त्याचा वेग, झपाटा हे सगळं अवाक् करून सोडणारं आहे. आपल्याला त्यामुळं गांगरल्यासारखं होत असलं, तरी ‘जिबली’च्या निमित्तानं आपली सारासार विवेकबुद्धी गमावून ‘एआय’च्या त्सुनामीत गटांगळ्या खाण्यापासून तरी निदान स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे!

‘एआय’ माणसासारखा विचार करू लागला तर..? ‘एआय’चे ‘गॉडफादर’ जेफ्री हिंटन यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला : ‘एआय खरोखरच माणसासारखा विचार करू शकेल का?’ यावर हिंटन यांनी प्रतिप्रश्न केला : ‘माणूस विचार करतो म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला समजलेलं आहे का?’ हे ऐकून मुलाखतकार गडबडला. हिंटन पुढे म्हणाले : ‘जेव्हा आपल्याला हे समजेल, तेव्हा ते ‘एआय’ला शिकवणं अगदी सहजशक्य आहे.’

(संपर्कः akahate@gmail.com)



Source link