Sunday, September 13, 2026
Homeसातारालोणंद पोलिसांची विजयी कारवाई! खुनानंतर अवघ्या तासाभरात आरोपी जेरबंद

लोणंद पोलिसांची विजयी कारवाई! खुनानंतर अवघ्या तासाभरात आरोपी जेरबंद


सातारा :- साताऱ्यातील लोणंद पोलीस ठाण्याच्या टीमने एक अत्यंत धाडसी आणि वेगवान कारवाई करत इंदीरानगर (ता. खंडाळा) येथील खुनातील दोन आरोपींना गुन्हा घडल्यानंतर केवळ एक तासात अटक केली आहे.

दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता इंदीरानगर, ता. खंडाळा, जि. सातारा येथील बिरोबा मंदिराच्या परिसरात जुन्या वादातून किरण किसन गोवेकर (रा. कोरेगाव, ता. फलटण) याचा लाकडी फळकुटी व धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला. आरोपी सतिश भाऊसाहेब काळे व रोहित शिवाजी डेंगरे (दोघेही रा. इंदीरानगर, लोणंद) हे घटनास्थळावरून फरार झाले होते.

या गंभीर घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बी. वाय. बालचीम यांनी तत्काळ सुचना देऊन तपासाची जबाबदारी लोणंद पोलिसांवर सोपवली. सपोनि सुशिल बी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. विशाल कदम, मा.पो.उ.नि. ज्योती चव्हाण, पो.ह.वा. चंद्रकांत काकडे, पो.कॉ. सचिन कोळेकर यांनी अवघ्या तासाभरात तपास करत आरोपींचा शोध घेऊन त्यांना लोणंद येथून ताब्यात घेतले.

ही कारवाई लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सुशिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या यशस्वी मोहिमेत पोउनि. शिवाजी घुले, सपोफौ. देवेंद्र पाडवी, पोहवा. नितीन भोसले, सर्जेराव सुळ, विजय पिसाळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, महेश टेकवडे, विठ्ठल काळे, सुनिल नामदास, सतीष दडस, केतन लाळगे, अभिजीत घनवट, शेख शिंगाडे, राणी कुदळे, भारती मदने, स्नेहल कापसे, होमगार्ड सचिन निकम, अनिल पवार, सुहास काटकर, विकास कोकरे यांनी देखील सहभाग घेतला.

या यशाबद्दल मा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी लोणंद पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments