Wednesday, September 2, 2026
Homeसाताराश्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पालखीतळांची पाहणी; प्रशासन व विश्वस्त समितीचा...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पालखीतळांची पाहणी; प्रशासन व विश्वस्त समितीचा समन्वय

फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 19 जून ते दि. 21 जुलै या कालावधीत संपन्न होणार आहे. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पालखी मुक्कामी असणाऱ्या पालखीतळांची पाहणी करण्यात येत आहे. प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.

याअंतर्गत फलटण तालुक्यातील तरडगाव, फलटण व बरड येथील पालखीतळांची पाहणी करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्सव समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या शिष्टमंडळाने हा दौरा केला.

यावेळी फलटणच्या प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या वतीने पालखी सोहळा समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या दौऱ्यात रामभाऊ चोपदार व इतर विश्वस्त, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, तसेच तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव अहिवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन आणि समिती यांच्यात सुसंवाद आणि समन्वय कायम राखत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments