Tuesday, September 22, 2026
Homeसाताराजनता दरबार: महायुतीचा जनतेसाठी पुढाकार

जनता दरबार: महायुतीचा जनतेसाठी पुढाकार

📍 राधाकृष्ण मंगल कार्यालय, वाठार स्टेशन
📅 सोमवार, ७ एप्रिल २०२५ | दुपारी ३:०० वाजता

फलटण : उत्तर-कोरेगाव तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुती तर्फे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यावर भर दिला जाणार आहे.

महत्त्वाचे निर्देश:
🔹 जनतेच्या समस्या सोडवणे हा या दरबाराचा मूळ उद्देश आहे, त्यामुळे आलेल्या निवेदनांवर प्राधान्याने कार्यवाही केली जाईल.
🔹 तक्रारदारांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, त्यामुळे गोंधळ न घालता संयमाने सहभाग घ्यावा.
🔹 कोणत्याही अधिकाऱ्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
🔹 दर महिन्याला जनता दरबार आयोजित करण्याचा मानस असल्याने ऐनवेळी तक्रारी नोंदवू नयेत.

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जनता दरबार यशस्वी करण्यासाठी विशेष जबाबदारीने सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments