Monday, July 27, 2026
Home Blog Page 436

एअर इंडियाच्या विमानात पुन्हा लघवी कांड, खासगी कंपनीच्या बड्या अधिकाऱ्याच्या अंगावर केली लघुशंका

0
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा लघवी कांड, खासगी कंपनीच्या बड्या अधिकाऱ्याच्या अंगावर केली लघुशंका


दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय २३३६ या विमानाच्या बिझनेस क्लासमधील एका पुरुष प्रवाशाने एका खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लघवी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एअर इंडियाने या घटनेला दुजोरा दिला आणि सांगितले की क्रूने पीडितेला तक्रार दाखल करण्यासाठी मदत करण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. विमान बँकॉकमध्ये उतरत असताना ही घटना घडली. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये एअर इंडियाच्या विमानात लघवी केल्याचा प्रकारही समोर आला होता.



Source link

Big decision regarding postponing MPSC State Services Mains Examination

0
Big decision regarding postponing MPSC State Services Mains Examination



Big decision regarding postponing MPSC State Services Mains Examination | ‘एमपीएससी’ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मोठा निर्णय… एमपीएससीच्या बैठकीत ठरले की….





Source link

ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेणे जनतेशी धोका, संपूर्ण जग बॅलेट पेपरवर आलंय; मल्लिकार्जुन खर्गेंचा भाजपवर निशाणा

0
ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेणे जनतेशी धोका, संपूर्ण जग बॅलेट पेपरवर आलंय;  मल्लिकार्जुन  खर्गेंचा भाजपवर निशाणा


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे दु:ख काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मनात अजूनही आहे. अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना ते म्हणाले की, भाजपने महाराष्ट्राची निवडणूक फसवणुकीने जिंकली आहे. ते म्हणाले की, विरोधकांना पराभूत करण्यासाठी राज्यात घोटाळा करण्यात आला. इतकंच नाही तर त्यांनी ईव्हीएम निवडणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. संपूर्ण जग ईव्हीएमकडून मतपत्रिकेकडे वळत आहे, पण आपण ईव्हीएमचा वापर करत आहोत. हा सगळा घोटाळा आहे. हे थांबवले पाहिजे आणि भारतातही मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची गरज आहे. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, संपूर्ण जग आता मतपत्रिकेवर आहे आणि आम्ही ईव्हीएमद्वारे निवडणुका घेत आहोत.



Source link

एसटी कर्मचाऱ्यांना ५६ टक्केच वेतन… कामगार संघटना म्हणते…

0
एसटी कर्मचाऱ्यांना ५६ टक्केच वेतन… कामगार संघटना म्हणते…



लोकसत्ता टीम

नागपूर: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ९ एप्रिलचा दिवस उजाडल्यावरही वेतन नाही. त्यातच आता महामंडळाने आर्थिक कोंडीचे कारण देत मार्च महिन्याचे ५६ टक्केच वेतन कर्मचाऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. शिल्लक रकमेबाबतही तोंडी आदेशात काही स्पष्ट नाही. त्यामुळे एसटी कामगारांच्या विविध संघटना संतापल्या आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.

शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला महामंडळाकडे सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम वर्ग केली जातो. पण गेले अनेक महिने मागणी प्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचणी येत आहे. यंदा कमी निधी मिळाला असतांनाच महामंडळाकडून एसटी बँकेला ४० कोटी रुपये इतकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या कर्जापोटी द्यावी लागली. त्यामुळे महामंडळाकडे निधीची कोंडी जास्तच वाढली.

एसटी कर्मचाऱ्यांचे पी. एफ., ग्र्याजुटी, बँक कर्ज, एल. आय. सी., अशी साधारण ३ हजार ५०० कोटी रुपयांची देणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊन सुद्धा महामंडळाकडून संबंधिक संस्थांकडे वर्ग केली गेली नाही. एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांसह इतरांना देणी असलेली थकीत देणी सात हजार कोटी रुपयांवर गेली आहे. यंदा महामंडळाने शासनाकडे मार्च महिन्याच्या वेतनासह इतर थकीत देणीसाठी ९२५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. परंतु २७२ कोटी ९६ लाख रुपयेच मिळाले. त्यातील ४० कोटी रुपये कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेडीसाठी महामंडळो एसटी बँकेकडे वर्ग केला.

त्यामुळे ८७ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनापैकी केवळ ५६ टक्केच निधी दिला जाणार आहे. त्यामुळे हा कमी वेतन बुधवार वा गुरूवारी मिळण्याचे संकेत आहे. त्याबाबतच्या सूचना महामंडळातर्फे सर्व विभाग नियंत्रकांना मिळाल्या आहे. शिल्लक वेतनाबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाणार असल्याचे एसटी अधिकारी सांगत आहे. दरम्यान इतक्या विलंब झाल्यावर आता कमी वेतन मिळणार असल्याने एसटी कामगारांच्या संघटना संतापल्या आहे. काहींनी आंदोलनाची तयारीही केली आहे. यंदा नागपुरातील एसटी कर्मचाऱ्यांना ५६ टक्केच वेतन अदा केले जाणार असल्याच्या वृत्ताला एसटीच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

कामगार संघटना काय म्हणते?

सरकार एसटी महामंडळाच्या आर्थिक कोंडीवर उपाय शोधत नसतांनाच आता कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडणार आहे. हे कर्मचाऱ्यांचे शोषन आहे, असा आरोप महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला. एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार म्हणाले, रखरखत्या उन्हात सेवा दिल्यावरही एसटी कर्मचाऱ्यांना कमी पगार देणे चुकीचे आहे. या विषयावर कामगारांच्या न्यायासाठी आंदोलन केले जाईल.



Source link

रेल्वे स्टेशनच्या पिवळ्या रंगाच्या बोर्डावर काळ्या रंगानेच का लिहीतात? कधी विचारही केला नसेल असं आहे उत्तर

0
रेल्वे स्टेशनच्या पिवळ्या रंगाच्या बोर्डावर काळ्या रंगानेच का लिहीतात? कधी विचारही केला नसेल असं आहे उत्तर


वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या मते, देशभरात दररोज २२,५९३ गाड्या धावतात. ज्यामध्ये सुमारे 13452 प्रवासी गाड्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये लाखो लोक प्रवास करतात.

भारतात दररोज 22000 हून अधिक गाड्या चालवल्या जातात. भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन हावडा रेल्वे स्टेशन आहे. सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांच्या यादीतही त्याचा समावेश आहे.

भारतात एकूण 7349 रेल्वे स्थानकांची संख्या आहे. भारतातील काही रेल्वे स्थानकांची नावे खूपच आश्चर्यकारक आहेत. परंतु आपल्या देशात अशा रेल्वे स्थानकांची कमतरता नाही ज्यांची नावे वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुम्ही हसू आवरणार नाही.

जर तुम्ही अनेकदा भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल, तर तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, रेल्वे स्थानकांची नावे पिवळ्या बोर्डांवर काळ्या रंगात का लिहिली जातात. खरं तर, यामागे फक्त एक नाही तर अनेक विशेष कारणे आहेत.

(हे पण वाचा – Train Colour Codes : काही रेल्वे निळ्या, काही लाल आणि काही हिरव्या का असतात? त्याचा अर्थ काय?) 

पिवळ्या बोर्डवर रेल्वे स्टेशनचे नाव लिहिण्याचे पहिले कारण म्हणजे पिवळा रंग हा खूप चमकदार रंग आहे. जो रेल्वे चालकाला दुरूनच दिसतो. याशिवाय, पिवळा रंग थांबण्याचे संकेत देखील देतो.

पिवळे बोर्ड ट्रेनच्या लोको पायलटला वेग कमी करण्याचा किंवा सतर्क राहण्याचा इशारा देतात. अनेक रेल्वे स्थानकांवर गाड्या थांबत नाहीत, अशा गाड्यांचे लोको पायलट स्टेशनमध्ये प्रवेश केल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत खूप सतर्क राहतात आणि सतत हॉर्न वाजवत राहतात जेणेकरून स्टेशनवर उपस्थित प्रवासी सतर्क होतील.

पिवळा रंग इतर रंगांपेक्षा खूपच प्रभावी आहे आणि रात्रीच्या अंधारात तो दुरूनही दिसतो. याशिवाय, हे रंग डोळ्यांना खूप आराम देतात. पिवळ्या बोर्डवर काळ्या रंगात लिहिलेली स्टेशनची नावे दुरूनच दिसतात.





Source link

पालघर जिल्ह्याला नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय

0
पालघर जिल्ह्याला नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय



पालघर : पालघर जिल्ह्याला स्वतंत्र नवीन कार्यालय स्थापनेला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजुरी दिली. यासंदर्भात पुढील आठवड्यात आवश्यक शासन निर्णय काढण्यात येतील असे त्यांनी पालघर येथील लोक दरबार च्या सुरुवातीला घोषित केले. त्यामुळे पालघरला विरार पाठोपाठ पालघरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय उपलब्ध होणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोक दरबाराची आयोजन केले होते. आपण धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलो तरी ठाण्यालगत असणाऱ्या व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष जवळच असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण लोकदरबार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार तर्फे राबवत असणाऱ्या योजना सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचत असल्याचे आपण या लोकदरबारात आपण पाहणारचो उपस्थित अर्जदार व जनाचे जे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

दरम्यान पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख तसेच जिल्हाप्रमुख यांनी सातत्याने मागण व पाठपुरावा केल्याने पालघर साठी नव्याने परिवहन कार्यालय पाण्यासाठी जागा मंजूर झाली असेल नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रताप सरनाईक यांनी मंजुरी दिली. याच महिन्यात हे कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहणार असून यासंदर्भात शासन निर्णय पुढील आठवड्यात जारी करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनेक वर्षांची मागणी मार्गस्थ

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तर राहणाऱ्या नागरिकांना वाहनांच्या परवाना मंजूरी व नूतनीकरण करण्यासाठी वसई येथे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालघर येथे राज्य शासनाने दिलेल्या जागेत प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून पुढे येत होती. ही मागणी मंजूर झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत असणाऱ्या रिक्षा चालक-मालक संघटन समाधान व्यक्त केले आहे.

सूर्या पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणी भेट

मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सूर्या प्रकल्पाच्या वसई, विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या एमएमआरडीएच्या योजनेची पाहणी केली. सूर्यानगर येथील एम.एम.आर.डी.ए. च्या प्रकल्पाची सरनाईक यांच्याकडून पाहणी. मिरा-भाईंदरकरांना पाण्यासाठी शासन तारीख पे तारीख देत असल्याच सांगत सरनाईक यांच्याकडून सरकारला घरचा आहेर दिला.

या ठिकाणची पाहणी केल्या नंतर त्यांनी योजनेचा घेतला आढावा घेतला. संबंधित योजना सहा महिन्यात पूर्ण होऊन मीरा-भाईंदर वासियांना पाणीपुरवठा होणार असल्याची सरनाईक यांच्याकडून माहिती देण्यात आली. तर विविध शहरांसाठी सूर्या प्रकल्पामधील पाणी आरक्षित केल्याने पालघर मधील सिंचन क्षेत्र कमी झालं याकडे लक्ष आधण्यात आले. यावर शासन योग्य तोडगा काढणार असल्याचा सरनाईक यांनी आश्वासन दिले.



Source link

Sanjay Nirupam On Stand Up Comedy Kunal Kamra Eknath Shinde Shivsena Controversy Politics Uddhav Thackeray

0
Sanjay Nirupam On Stand Up Comedy Kunal Kamra Eknath Shinde Shivsena Controversy Politics Uddhav Thackeray



Sanjay Nirupam On Stand Up Comedy Kunal Kamra Eknath Shinde Shivsena Controversy Politics Uddhav Thackeray | ‘एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं करण्यासाठी ठाकरे गटाने कामराला पैसे दिले’, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप





Source link

highest temperature ever recorded in april was 128 years ago pune print news ccp14 zws 70

0
highest temperature ever recorded in april was 128 years ago pune print news ccp14 zws 70



highest temperature ever recorded in april was 128 years ago pune print news ccp14 zws 70 | पुणे तापले… १२८ वर्षांपूर्वी नोंदवले गेले एप्रिलमधील आजवरचे सर्वाधिक तापमान!





Source link

revised pension scheme implemented for employees including teachers in bhiwandi zws 70

0
revised pension scheme implemented for employees including teachers in bhiwandi zws 70



revised pension scheme implemented for employees including teachers in bhiwandi zws 70 | भिवंडीत शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू





Source link

“३० वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; साखरवडीत तथागत गौतम बुद्ध मुर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळा बसविण्या आला!”

0
“३० वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; साखरवडीत तथागत गौतम बुद्ध मुर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळा बसविण्या आला!”


साखरवाडी (ता. फलटण): अनेक वर्षांची प्रतीक्षा, अनेक महिन्यांचा संघर्ष आणि अखेर प्रशासनाकडून मिळणाऱ्या दुर्लक्षाला कंटाळून साखरवाडीतील बौद्ध बांधवांनी स्वतः पुढाकार घेत ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. “आता सुट्टी नाही!” अशा ठाम निर्धारासह सोशल मीडियावर संदेश देत, भगवान तथागत बुद्ध यांचे भव्य मूर्तिस्थान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नुकताच साखरवडीत उभारण्यात आला.

गेल्या ३० वर्षांपासून साखरवाडीत बुद्धविहार व्हावा, यासाठी स्थानिक बौद्ध अनुयायी सातत्याने प्रयत्नशील होते. अनेक वेळा निवेदने, मोर्चे आणि आंदोलने होऊनही शासनाच्या आश्वासनांशिवाय काहीही हातात पडत नव्हते. मात्र, यावेळी लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन थेट बुद्धविहारासाठी आक्रमक होत याठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्ती व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा बसविण्यात आला आहे .

या ऐतिहासिक क्षणी साखरवाडी व परिसरातील भीम अनुयायी आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘आता वेळ आली आहे, शासनाने याची दखल घेऊन या विहारास अधिकृत मान्यता द्यावी’, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

“आम्ही प्रतीक्षा केली, आंदोलनं केली, मोर्चे काढले… पण आता आमचा धीर सुटला. आम्ही स्वतःचा बुद्धविहार स्वतःच उभारणार आहे!” – असा आवाज साखरवाडीतून निघू लागला आहे.