Saturday, July 25, 2026
Home Blog Page 427

बुद्ध विहाराच्या मागणीसाठी साखरवाडीत आंदोलनाचा भडका! पोलिस लाठीमारानंतर अटकेतले भीमसैनिक अखेर न्यायालयातून मुक्त

0
बुद्ध विहाराच्या मागणीसाठी साखरवाडीत आंदोलनाचा भडका! पोलिस लाठीमारानंतर अटकेतले भीमसैनिक अखेर न्यायालयातून मुक्त


फलटण :- फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे बुद्ध विहाराच्या मागणीसाठी गेले 60 दिवस सातत्याने तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलनकर्त्यांनी 60 व्या दिवशी खुल्या जागेत तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना केली. या प्रकारानंतर प्रशासनाने कठोर पवित्रा घेत बौद्ध समाजातील महिला व पुरुषांवर लाठीमार केला आणि तब्बल 30 भीमसैनिकांना अटक केली.

या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेशीर लढवय्ये तात्काळ मैदानात उतरले. विशेष सरकारी वकील अॅड. बापूसाहेब शिलवंत, अॅड. संदीप शिवाजीराव कांबळे, अॅड. मनोज जावळे, अॅड. मेघा आहिवळे, अॅड. निलेश भोसले, अॅड. प्रेम आहिवळे, अॅड. शाम आहिवळे, अॅड. अजित चाबुकस्वार, अॅड. मनीष काकडे, अॅड. प्रबुद्ध मिसळ आदींनी न्यायालयात दमदार युक्तिवाद करत सर्व 30 भीमसैनिकांची जामिनावर मुक्तता करून घेतली.

पोलिसांनी सांगितलेली मूर्तीची जागा ही पोलीस प्रशासनाची असल्याचा दावा करत लाठीमार केला गेला. यात अनेक आंदोलक जखमी झाले, तर अटकेत घेतलेल्यांना फलटणपासून तब्बल 150 किमी लांब कराड पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

या लढ्याचे नेतृत्व आणि खबरदारीचे काम युवा नेते व फलटण दर्शनचे संपादक सुधीर अहिवळे, अध्यक्ष संजय दादा गायकवाड, कामगार संघर्ष संघटनेचे अध्यक्ष महादेव गायकवाड (आझाद समाज पार्टी), तसेच इतर कार्यकर्त्यांनी उचलून धरले. साखरवाडीच्या युवकांनी सांगितले की, “आपण सगळे एकत्र होतो, म्हणूनच हा लढा यशस्वी झाला.”

Murder of missing girl near Karad crime news

0
Murder of missing girl near Karad crime news


कराड : कराड तालुक्यातील वाठार येथून गुरुवारपासून (दि. १०) बेपत्ता झालेल्या पाचवर्षीय बालिकेचा खून झाल्याचे शुक्रवारी पहाटे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून, तिने खुनाची कबुली दिली आहे.कराड विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर याबाबतची देताना म्हणाले, ‘संशयित १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने खून करण्यामागे बालिकेच्या आईने टोमणे मारल्याने हे कृत्य केल्याचे कारण दिले आहे. मात्र, हे कारण पोलिसांना पटणारे नसल्याने या घटनेचा विविध अंगांनी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे.’

गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ही पाच वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. पोलिसासह नातेवाइकांकडून काल रात्रभर तिचा शोध घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान, आज शुक्रवारी (दि. ११) पहाटे पाच वाजता वाठार ते रेठरे मार्गावर या बेपत्ता बालिकेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अधिक तपास केल्यावर एका १६ वर्षांच्या मुलीस याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. तिने या खुनाची कबुली दिली असून, बालिकेच्या आईने टोमणे मारल्याने आपण हे कृत्य केल्याचे कारण तिने दिले आहे. मात्र, हे कारण पोलिसांना पटणारे नसल्याने या घटनेचा विविध अंगांनी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. कराड विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप अधिक तपास करीत आहेत.





Source link

क्रांतीचा उगम: महात्मा फुले जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडून अभिवादन व लस्सी वाटप

0
क्रांतीचा उगम: महात्मा फुले जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडून अभिवादन व लस्सी वाटप

फलटण – समाज परिवर्तनाच्या व विचारक्रांतीच्या अध्वर्यू क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2025, फलटण यांच्यावतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी उपस्थित सर्व बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि सामाजिक सलोखा व सेवा-भावना जपत सर्व नागरिकांना थंडपेय लस्सी वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी समितीचे पदाधिकारी गणेश अहिवळे, अजय काकडे, गोविंद काकडे, सुरज काकडे, सिद्धार्थ अहिवळे, भूषण बनसोडे, चंद्रकांत मोहिते, मंगेश सावंत, कपिल काकडे तसेच क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देण्यात आला.

शोध हरवलेल्या स्वप्नांचा… दहावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील भयावह कहाणी!

0
शोध हरवलेल्या स्वप्नांचा… दहावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील भयावह कहाणी!

बारामती : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने पाठलाग, छेडछाड आणि सततच्या धमक्यांमुळे कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना संपूर्ण गावाला हादरवणारी ठरली असून, चार जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी विशाल दत्तात्रय गावडे, प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे आणि सुनील हनुमंत खोमणे अशी आरोपींची नावे असून, हे चौघे मिळून गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलीचा पाठलाग करत होते. तिला वेळोवेळी अश्लील प्रस्ताव देणे, धमकी देणे आणि शस्त्र दाखवून तिच्यावर दबाव आणण्याचे प्रकार सातत्याने सुरू होते.

७ एप्रिल रोजी गावातील यात्रेपूर्वी आरोपींनी पीडितेला धमकावत सांगितले, “माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या आईवडिलांचं मुंडकं उडवीन!” या धमकीमुळे मानसिकदृष्ट्या तणावात आलेल्या मुलीने आईवडिलांच्या सुरक्षिततेच्या भीतीपोटी टोकाचं पाऊल उचललं.

या घटनेनंतर पोलीसांनी संबंधित आरोपींविरोधात भादंवि कलम १०७, ७८, २९६, ३५२, ३५१, तसेच पोक्सो कायदा आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.

टॉयलेटच्या फ्लशवर का असतात दोन बटणं? 85 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर, करतात चुकीचा वापर

0
टॉयलेटच्या फ्लशवर का असतात दोन बटणं? 85 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर, करतात चुकीचा वापर



आपण रोज वॉशरुमला जातो. तिथे फ्लशचं बटण दाबतो आणि निघून जातो. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, टॉयलेटच्या फ्लशवर दोन वेगवेगळ्या आकाराची बटणं का असतात? हे फक्त डिझाईन आहे की याचा काही अर्थ आहे?
 



Source link

Video: सलमान खानने फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, शेअर केला व्हिडिओ

0
Video: सलमान खानने फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, शेअर केला व्हिडिओ


सलमान खानने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. खरं तर ‘सिकंदर’ रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर लोक त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशातच त्याने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या फिटनेसचा पुरावा दिला आहे. सलमानचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते खूश झाले आहेत. ‘टायगर अजून म्हातारा झालेला नाही’, यावर त्यांचा विश्वास बसला आहे.



Source link

जगातील सर्वात उंच पूल बनवत आहे चीन, केवळ एका मिनिटात होणार एका तासाचा प्रवास; पाहा झलक

0
जगातील सर्वात उंच पूल बनवत आहे चीन, केवळ एका मिनिटात होणार एका तासाचा प्रवास; पाहा झलक


चीन लवकरच आपल्या अभियांत्रिकी चमत्काराचा आणखी एक नमुना संपूर्ण जगासमोर मांडणार आहे. खरं तर चीन सध्या जगातील सर्वात उंच पूल बांधत आहे आणि तो या वर्षी प्रवासासाठी खुला केला जाऊ शकतो. या पुलाला हुजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज असे नाव देण्यात आले असून तो बांधण्यापूर्वीच चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच या पुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे लोकांना श्वास रोखून धरावा लागला आहे. देशाच्या ग्रामीण भागाला कनेक्टिव्हिटी देण्याबरोबरच हा पूल पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.



Source link

हे असे लांब कानाचे कुत्रे आपल्याकडे असतात का? उदयनराजेंनी सांगितला वाघ्या कुत्र्याचा इतिहास

0


सातारा : रायगडावरील (Raigad) छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन गेल्या काही दिवासांपासून वाद रंगला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून, इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेही संदर्भ नाही, राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून हे कुत्रे आले आहे. त्यामुळे, या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी देखील वाघ्या कुत्र्याच्या समाधीला आक्षेप घेतला आहे. त्यानंतर, इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी वाघ्या कुत्र्याचा संदर्भ असल्याचे सांगत होळकर कुटुंबीयांशी त्याचा संबंध जोडला आहे. तसेच, हा कुत्रा इतिहासात होता, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे, वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन चांगलाच वाद रंगला आहे. आता, खासदार आणि शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje bhosle) यांनी ह्या कुत्र्याचा संबंध नसल्याचे म्हटले. तसेच, ब्रिटीशांकडून हा कुत्रा आल्याचेही त्यांनी सांगितले.  

रायगड म्हटलं की तुम्हाला शिवाजी महाराजांची प्रतिमा समोर येते की कुत्र्याची प्रतिमा येते हे सांगा? असा प्रति सवालच उदयनराजेंनी उपस्थित केला. हा सगळा वाद ब्रिटिशांनी आणला आहे, हे असे लांब कानाचे कु्त्रे आपल्याकडे असतात का? ही सगळी ब्रिटिशांची कुत्री आहेत, असेही उदयनराजेंनी म्हटले. तसेच, वाघ्या कुत्र्याची समाधी विनाकारण इतिहासात घुसवल्याचे उदयनराजेंनी सूचवले आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भाने पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना एक पत्रही दिलं आहे. याआधीही अशी मागणी करणारं एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. वाघ्या कुत्र्याचे इतिहासात कोणतेही पुरावे सापडत नसल्याने त्याची समाधी रायगडावरून कायमस्वरुपी हटवण्यात यावी, असं आवाहन त्यांनी पत्राद्वारे केलं होतं. पण, धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास विरोध केला. गरज पडली तर यासाठी तीव्र आंदोलन करू, न्यायालयात जाऊ असा इशाराही हाके यांनी दिला आहे.

शिवरायांच्या स्मारकासाठी गव्हर्नर हाऊस असावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठीचे गव्हर्नर हाऊस हे राजभवनाच्या ठिकाणी करावे अशी माझी मागणी आहे. या संदर्भात मी  गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. अरबी समुद्राच्या नजीक हे शिवस्मारक करायचं तर त्याकरता राजभवन ही चांगली जागा आहे. एवढी मोठी 45 एकर जागा आहे. राज्यपालांना राहायला किती जागा लागते. त्यामुळे हीच जागा मिळावी, अशी मी मागणी करत असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचे पर्यटन, 10 दिवसांची आयकॉनिक रेल्वेटूर सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अधिक पाहा..



Source link

अंधेरी रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमणमुक्त, स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार, भाजप आमदाराच्या पाठपुराव्याला यश

0
अंधेरी रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमणमुक्त, स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार, भाजप आमदाराच्या पाठपुराव्याला यश



अंधेरी रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमणमुक्त, स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार, भाजप आमदाराच्या पाठपुराव्याला यश





Source link

Cold war between BJP leaders chandrakant patil murlidhar mohol and medha kulkarni in Pune on rise

0
Cold war between BJP leaders chandrakant patil murlidhar mohol and medha kulkarni in Pune on rise


पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणावरून पुण्यातील वातावरण तापले असताना शिस्तप्रिय पक्ष म्हणून गणल्या जाणाऱ्या पुणे शहरातील भाजपमध्ये आंदोलनावरून ‘भडका’ उडाला आहे. त्यास भाजपच्या महिला आघाडीने डॉ. सुश्रृत घैसास यांच्या कुटुंबाच्या रुग्णालयाची केलेली तोडफोड कारणीभूत ठरली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आंदोलकांची बाजू घेतल्याने खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. त्यामुळे कोथरुडमधील या तीन दिग्गज नेत्यांमधील शीतयुद्ध चव्हाट्यावर आले आहे.

भाजपमध्ये कोणताही पदाधिकारी हा कधीही पक्षातील वाद जाहीरपणे व्यक्त करत नसतो. मात्र, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर डॉ. सुश्रृत घैसास यांच्या कुटुंबाच्या कोथरुडमधील एरंडवणे येथील रुग्णालयाची भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या आंदोलनानंतर खासदार मेधा कुलकर्णी या उद्विग्न झाल्या. त्यांनी याबाबत शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून जाहीरपणे नाराजी दर्शविली. घाटे यांनीही त्यांना प्रत्युतर दिले. त्यानंतर भाजपने तातडीने बैठक घेतली. या बैठकीत आंदोलनावर ‘चिंतन’ झाले. चंद्रकांत पाटील यांनी ‘कोणतीही गंभीर घटना घडल्यानंतर त्यावर आंदोलन करणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे’ असे सांगत आंदोलकांच्या बाजूने मतप्रदर्शन केले. मुरलीधर मोहोळ यांनीही आंदोलकांचे समर्थन केले. त्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी या बैठकीतून निघून गेल्या. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने निघून गेल्याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले.

मात्र, या प्रकाराने कोथरुडमधील या तीन प्रमुख नेत्यांमधील ‘कोल्डवॉर’चा भडका उडाला आहे. मेधा कुलकर्णी, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ या भाजपच्या तिन्ही नेत्यांची कर्मभूमी ही कोथरुड आहे. कुलकर्णी आणि पाटील यांच्यातील शीतयुद्धाला २०१९ च्या विधानसभेपासून सुरुवात झाली. तत्पूर्वी २००९ मध्ये झालेल्या मतदार पुनर्रचनेत कोथरूड विधानसभा मतदारसंघ नव्याने तयार झाला. तोपर्यंत हा परिसर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये होता. भाजप- शिवसेना युती असताना हा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिला.

हेही वाचा

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एक लाखांहून अधिक मते घेऊन कुलकर्णी या निवडून आल्या. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिला आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षाचा हा निर्णय कुलकर्णी यांच्यादृष्टीने धक्कादायक होता. कुलकर्णी या आमदार होण्यापूर्वी २००२ पासून सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्याऐवजी पुण्याबाहेरील पाटील यांना पक्षाने संधी दिल्याने त्यांनी नाराजीही दर्शविली होती. मात्र, पक्षशिस्तीचा प्रभाव त्यांच्यावर असल्याने त्यांनी जाहीर वाच्यता केली नाही.

मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील शीतयुद्ध हे कोथरुडमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना कुलकर्णी यांनी उघडपणे विरोध केल्याने वेळोवेळी दिसून आले आहे. बालभारती-पौडरस्ता रस्त्याला कुलकर्णी त्यांनी विरोध केला. त्यांनी पर्यावरणप्रेमींची बाजू घेतली. कोथरुडमधील तात्यासाहेब थोरात उद्यानात मोनोरेल प्रकल्प राबविला जाणार होता. या प्रकल्पासाठी मोहोळ हे आग्रही होते. मात्र, खासदार कुलकर्णी यांनी या प्रकल्पाला विरोध केल्यास त्यांच्यात वादाची ठिणगी पडली.

हेही वाचा

पाटील आणि मोहोळ यांच्या ताब्यात कोथरुड गेल्यानंतर अस्वस्थ असलेल्या खासदार कुलकर्णी यांची २०२२ मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकांपूर्वीच त्यांची राज्यसभेच्या खासदार पदी वर्णी लागली.

खासदार कुलकर्णी यांचे राजकीय कार्यक्षेत्र हे कोथरुड आहे. २००२ मध्ये त्या पहिल्यांदा नगरसेविका झाल्या. त्यानंतर सलग तीनवेळा त्या निवडून आल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि घैसास रुग्णालये ही त्यांच्या प्रभागाजवळील आहेत. त्यामुळे भाजपच्या महिला आघाडीने घैसास रुग्णालयाची तोडफोड करणे, हे त्यांना पटले नाही. त्यामुळे त्यांनी जाहीरपणे असंतोष व्यक्त केला. त्यावरून शहराध्यक्ष आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध झाले. त्यानंतरच्या बैठकीत पाटील आणि मोहोळ यांनी त्यांना या विषयावरून एकाकी पाडले. त्यावरून शीतयुद्धाचा भडका उडाल्याने शिस्तीच्या भाजपला बेशिस्तीचे वळण लागल्याचे स्पष्ट झाले आहे.





Source link