Tuesday, August 18, 2026
Homeसाताराक्रांतीचा उगम: महात्मा फुले जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडून अभिवादन...

क्रांतीचा उगम: महात्मा फुले जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडून अभिवादन व लस्सी वाटप

फलटण – समाज परिवर्तनाच्या व विचारक्रांतीच्या अध्वर्यू क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2025, फलटण यांच्यावतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी उपस्थित सर्व बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि सामाजिक सलोखा व सेवा-भावना जपत सर्व नागरिकांना थंडपेय लस्सी वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी समितीचे पदाधिकारी गणेश अहिवळे, अजय काकडे, गोविंद काकडे, सुरज काकडे, सिद्धार्थ अहिवळे, भूषण बनसोडे, चंद्रकांत मोहिते, मंगेश सावंत, कपिल काकडे तसेच क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments