Saturday, July 25, 2026
Home Blog Page 428

शर्टाचं बटण उघडं ठेवून कोर्टात पोहोचणं वकिलाला पडलं महागात, न्यायाधीशांनी सुनावली ‘ही’ शिक्षा!

0
शर्टाचं बटण उघडं ठेवून कोर्टात पोहोचणं वकिलाला पडलं महागात, न्यायाधीशांनी सुनावली ‘ही’ शिक्षा!


No match is being played.

Apr 10, 2025 | Match 24

Indian Premier League, 2025

DC

(20 ov) 163/7

VS

RCB

169/4(17.5 ov)

Delhi Capitals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets
Full Scorecard →

Apr 09, 2025 | Match 23

Indian Premier League, 2025

RR

(20 ov) 217/6

VS

GT

159(19.2 ov)

Gujarat Titans beat Rajasthan Royals by 58 runs
Full Scorecard →

Apr 08, 2025 | Match 22

Indian Premier League, 2025

CSK

(20 ov) 219/6

VS

PBKS

201/5(20 ov)

Punjab Kings beat Chennai Super Kings by 18 runs
Full Scorecard →





Source link

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचा साधेपणा… ‘त्या’ एका कृतीनं सिद्ध झालेला सूर्यपुत्राचा मोठेपणा

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचा साधेपणा… ‘त्या’ एका कृतीनं सिद्ध झालेला सूर्यपुत्राचा मोठेपणा


Ambedkar Jayanti 2025 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी कैक पिढ्यांच्या भवितव्याचा पाया रचला. समाजाला बाबासाहेबांनी दाखवलेली वाट ही कायमच एका क्रांतिच्या आणि प्रगतीच्या दिशेनं नेताना दिसली. अशा या बाबासाहेबांच्या विचारांची शिदोरी आणि वारसा पुढे नेला तो म्हणजे त्यांच्या मुलानं अर्थात यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांनी. 

निष्ठा आणि स्वाभिमान… 

भैय्यासाहेब आणि बाबासाहेबांच्या नात्यावर भाष्य करणारा एक किस्सा सांगितला जातो, एक असा क्षण जिथं भैय्यासाहेबांना निष्ठा आणि स्वाभिमानाची कायमस्वरुपी लक्षात राहण्याजोगी शिकवण मिळाली. दिल्लीतील ठेकेदारानं भैय्यासाहेबांसोबत काम करत त्यांना नफ्याची आमिष दाखवलं, ही बाब बाबासाहेबांना कळताच त्यांनी आपल्या या मुलाला घरी जेवण करु न देताच तडक मुंबईला पाठवलं होतं. इथं त्यांना नितीमूल्यांची खरी शिकवण मिळाली आणि याच प्रसंगाची खुणगाठ त्यांनी मनाशी कायमस्वरुपी बांधली. 

वडिलांच्या आदर्शांना केंद्रस्थानी ठेवत कायमच भैय्यासाहेब समाजात अगदी सामान्य आयुष्य जगले. मुंबईत एका न्यायालयीन कामासाठी गेलं असता तिथं भैय्यासाहेब रांगेतच उभे राहिले. तिथं काहींना त्यांचा परिचयही आला मात्र रांगेची शिस्त त्यांनीही पाळली. सामान्यांपैकीच आपणही एक आहोत हीच त्यांची भूमिका. तत्त्वांना धरून चालणाऱ्या याच भैय्यासाहेबांना त्यांचा साधेपणा आणि त्यांच्या विचारसरणीमुळं सूर्यपुत्र म्हणून संबोधलं जात असे. 

बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या याच मुलानं धम्मकार्यात सहभाग घेत पुढाकारानं समाजसेवेची ही ज्योत तेवत ठेवली. प्रिंटींग प्रेस सुरू करत त्यांनी विचारप्रसाराचं कार्य हाती घेत ही जबाबदारी लिलया पेलली. उद्योगविश्वातील या कामगिरीनंतर ‘जनता’ आणि ‘प्रबुद्ध भारत’ ही दोन्ही मुखपत्र चालवण्याची जबाबदारी भैय्यासाहेबांनी स्वीकारली आणि त्याच्या व्यवस्थापनासह संपादनाचं काम स्वीकारलं. 

भैय्यासाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या ग्रंथाचं प्रकाशन केलं. अनेक स्मारकांच्या उभारणीमध्ये बाबासाहेबांचं योगदान मोलाचं समजलं जात असून चैत्यभूमीसुद्धा त्यातील एक उदाहरण. 17 सप्टेंबर 1977 रोजी भैय्यासाहेबांचं निधन झालं, पण आजही सूत्रपुत्राचं नाव तितक्याच आदरानं घेतलं जातं हे खरं. 





Source link

tahawwur ranas key role in identifying locations targeted in the 26 11 terrorist attacks mumbai print news zws 70

0
tahawwur ranas key role in identifying locations targeted in the 26 11 terrorist attacks mumbai print news zws 70



tahawwur ranas key role in identifying locations targeted in the 26 11 terrorist attacks mumbai print news zws 70 | हल्ल्याची ठिकाणे ठरवण्यात राणाचा हात; मुंबईतील एका व्यक्तीशी चर्चा केल्याची साक्ष, हेडलीच्या मुंबई दौऱ्याला मदत





Source link

SBI कडून ATM वापरासंदर्भातील नियमांमध्ये बदल; जाणून घ्या…

0
SBI कडून ATM वापरासंदर्भातील नियमांमध्ये बदल; जाणून घ्या…


SBI revised ATM transaction rules : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अतिशय महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल करम्यात आले असून, खातेधारकांनी याची दक्षता बाळगत नवे नियम लक्षात घ्यावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार एसबीआयनं नुकतीच एटीएम ट्रान्झॅक्शन चार्ज आणि फ्री युज लिमिटमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. 1 मे 2025 पासून एसबीआय ग्राहकांना मोफत मासिक मर्यादा ओलांडल्यानंतर त्यापुढील व्यवहारांसाठी 23 रुपये इतकं शुल्क भरावं लागणार आहे. 

मोफत एटीएम सुविधेत बदल… 

SBI नं ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या मोफत एटीएम व्यवहारांच्या संख्येत बदल केला असून आता दर महिन्यात एसबीआयच्याच एटीएममध्ये विनामूल्य 10 व्यवहार आणि इतर बँकांच्या एटीएममध्ये 5 विनामूल्य व्यवहारांची मुभा देण्यात आली आहे. 

समजून घ्या… 

एसबीआयच्या या नव्या नियमानुसार ज्या खातेधारकांच्या खात्यात सरासरी 25 ते 50 हजार आणि 50 हजार ते 100000 रुपये आहेत त्यांना इतर बँकांच्या एटीएममधून 5 वेळा पैसे काढता येणार आहेत. खात्यावर मासिक शिल्लक सरासरी 100000 रुपयांहून अधिक असल्यास खातेधारकांना एसबीआयसह इतर बँकांच्या एटीएममधून कोणत्याही मर्यादेशीवार रक्कम काढता येणार आहे. 

एटीएम ट्रान्झॅक्शन लिमिट संपल्यानंतर बँकेकडून पुढील प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये + जीएसटी अशी रक्कम आकारली जाईल. एसबीआयच्या एटीएमसाठी हे नियम लागू राहणार असून, इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढायचे झाल्यास त्यावर एटीएम ट्रान्झॅक्शन लिमिटनंतरच्या  प्रत्येक व्यवहारावर 21 रुपये + जीएसटी अशी रक्कम आकारली जाईल. ट्रान्झॅक्शन अर्थात पैसे काढण्याच्या मर्यादेवर रक्कम आकारली जाणार असून, एसबीआयकडून बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट अशा सेवांवर मात्र ट्रान्झॅक्शन लिमिटनंतरही कोणतंही सेवाशुल्क आकारलं जात नाही. 

वरील अट फक्त एसबीआयच्याच एटीएमपुरता सीमित असून, इतर बँकांच्या एटीएममधील व्यवहारांमध्ये मात्र इतर सेवांसाठीसुद्धा 10 रुपये आणि जीएसटी अशी रक्कम आकारली जाईल. तर, खात्यावर पैसे नसल्यास ट्रान्झॅक्शन Fail दाखवल्यास तुम्ही 20 रुपये आणि जीएसटी अशी एकूण रक्कम भरण्यास बांधिल असाल. 





Source link

आज तुमच्या राशीत काय आहे? कोणाला मिळणार धनलाभ? कोणी राहावं सावध? वाचा संपूर्ण दिवसभर राशीभविष्यातील ताज्या घडामोडी

0
आज तुमच्या राशीत काय आहे? कोणाला मिळणार धनलाभ? कोणी राहावं सावध? वाचा संपूर्ण दिवसभर राशीभविष्यातील ताज्या घडामोडी



Today Horoscope Live in Marathi 11 April 2025: Horoscope Today Live Updates : आज तुमच्या राशीत काय आहे? कोणाला मिळणार धनलाभ? कोणी राहावं सावध? वाचा संपूर्ण दिवसभर राशीभविष्यातील ताज्या घडामोडी





Source link

निष्पापांच्या मृत्यूवर हसणारा हाच तो क्रूरकर्मा; Tahawwur Rana भारताच्या ताब्यात येताच अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया…

0
निष्पापांच्या मृत्यूवर हसणारा हाच तो क्रूरकर्मा; Tahawwur Rana भारताच्या ताब्यात येताच अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया…


Tahawwur Rana Extradition From US: 26/11 मुंबई हल्ल्यामध्ये जवळपास 174 निष्पापांचा बळी गेला आणि या मृत्यूचं थैमान पाहून एका काळीज नसलेल्या क्रूरकर्म्यानं हसत व्यक्त होणं पसंत केलं होतं, तो म्हणजे या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा. अनेक प्रयत्नांनंतर अखेर मुंबईवर झालेल्या 26/11 च्या भ्याज हल्ल्याचा कट रचणाऱ्या या तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी रात्री पटियाला हाऊस कोर्टात त्याला हजर करण्यात आलं. 

राणा भारतात आला आणि… 

विमानतळावर आल्यानंतर राणाला जवळपास अडीच तासानंतर न्यायालात आणण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. यावेळी एनआयएच्या वकिलांनी राणाची 20 दिवसाची कोठडी मागितली. राणाच्या कोठडीची कारणंही वकिलांनी कोर्टासमोर मांडली. शिवाय राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणा याला 18 दिवसाची कोठडी दिली. सदर सुनावणीच्या वेळी कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया… 

तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर अमेरिकेनंही पहिली प्रतिक्रिया देत या लढ्यातील आपली भूमिका स्पष्ट केली. 9 एप्रिल रोजी आपल्या देशातून राणाला संपूर्ण प्रक्रियेसह भारताच्या ताब्यात देण्यात आलं असं सांगताना दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्र तत्पर आणि कटिबद्ध असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. 

अमेरिकेच्या वतीनं टॅमी ब्रूस यांनी ही प्रतिक्रिया वृत्तसंस्थेला देत अमेरिकेनं कायमच दहशतवादाशी लढण्याच्या भारताच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलं. ‘जसं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात, अमेरिका आणि भारत ही दोन्ही राष्ट्र जागतिक स्तरावर दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी सदैव एकत्र काम करत राहतील. ‘तो’ (राणा) त्यांच्या ताब्यात असून, आमच्यासाठी ही बाब अतिशय अभिमानाची आणि महत्त्वपूर्ण आहे’, असं ही ब्रूस यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान एनआयएकडून आता राणाची सातत्यानं चौकशी केली जाणारस असून, 26/11 हल्ल्याशी संबंधित इतर सर्व गोष्टी आणि गुपितं उघड केली जाणार आहे. यंत्रणांनी तशी तयारीच केली असून, या चौकशीतून लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तनातील दहशतवाद्यांच्या तळांसह त्यांची कटकारस्थानं यामुळं उघड्यावर पडतील असा विश्वासही व्यक्त केला जात आहे





Source link

Agriculture business Management मातीतलं शिक्षण : कृषी व्यवसाय व्यवस्थापन

0
Agriculture business Management मातीतलं शिक्षण : कृषी व्यवसाय व्यवस्थापन


शेती हे असे क्षेत्र आहे. ज्यामध्ये करिअर करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. आज आपण कृषी व्यवसाय व्यवस्थापन याबाबत माहिती घेणार आहेत. शेती प्रामुख्याने तीन भागांमध्ये विभाजित केली आहे.

● उत्पादन

● प्रक्रिया

● व्यवस्थापन करणे

शेती उत्पादन प्रक्रिया करिअर या संदर्भात आपण याआधी माहिती घेतली आहे. आता व्यवसाय व्यवस्थापनातील करियर पाहूया. शेती क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे छोटे मोठे उद्याोग तसेच आता नाविन्यपूर्ण तयार होणारे बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या या सर्वांना उद्याोग आधारित स्पर्धांना तोंड द्यावे लागते. अशावेळी व्यवस्थापन कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांस नोकरीत प्राधान्य मिळते.

कृषी व्यवसाय व्यवस्थापन यामधील काही खासगी संस्थेतील संधी

● कृषी व्यवस्थापक

● कृषी उद्याोजक

● मार्केटिंग तज्ञ

● व्यवसाय विश्लेषक

● सप्लाय मॅनेजर

● खरेदी-विक्री अधिकारी

कृषी व्यवसाय व्यवस्थापन यामध्ये कृषी सहकार्य, कृषि विपणन व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, टिकाऊपणा आणि खर्च- नफा व्यवस्थापन या बाबींचा समावेश होतो.

वरील सर्व क्षेत्रांमध्ये व्यवस्थापन करणे व व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या गोष्टी समाविष्ट आहेत.

कृषी व्यवसाय व्यवस्थापन ही पदवी महाराष्ट्रातील सर्व शासकीय विद्यापीठे व खाजगी शिक्षण संस्था यामध्ये उपलब्ध आहे. हा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे.

सरकारी नोकरीमध्ये संधी

● कृषी व्यवस्थापक

● सर्व बँकेमध्ये शेती अधिकारी

● सरकारी कंपन्यांमध्ये व्यवस्थापन मॅनेजर

● शेती व्यवसाय अधिकारी

● कृषी विज्ञान केंद्र इ.

● जनसंपर्क अधिकारी

● क्रेडिट मॅनेजर

कृषि व्यवसाय व्यवस्थापन हा एक अभ्यासपूर्ण विषय आहे. यामध्ये पदवी नंतर एमबीएसुद्धा आपण करू शकतो. व पदवित्तर पदवी धारण करू शकतो.

आधुनिक शेतीमध्ये व पारंपरिक शेती पद्धतीत आता पीक मूल्यांकन करण्यासाठी इंटरनेट उपलब्ध झाले आहे. यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज हा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये पाणी,खते, औषधे व व्यवसाय व्यवस्थापन या बाबी समाविष्ट करून आपण कृषी व्यवस्थापनाची नवीन वाक्य निर्माण करत आहेत. यासाठी व्यवस्थापन कौशल्य आवश्यक आहे.

कृषी व्यवसाय हा शेती निगडित उत्पादनावर आधारित आहे. यामध्ये शेती ही आपल्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे. शेतकरी हाच मुळात शेती व्यवस्थापनातील महागुरू आहे. परंतु शेतकऱ्याचे व्यवस्थापन हे अनुभव आधारित आहे. आणि त्यामुळे आता नविन तंत्रज्ञानाची जोड शेतीला देत असताना शेती कौशल्य व व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रातील समतोल राखणे गरजेचे आहे.

व्यवस्थापनातील इतर काही करिअरच्या संधी

● लॉजिस्टिक व्यवस्थापन

● स्टार्ट- अप्स व्यवस्थापक

● प्रकल्प व्यवस्थापक

● अन्न ई- व्यवसाय व्यवस्थापक

● ई-कॉमर्स मॅनेजर

● विमा व्यवस्थापक

शेतीमध्ये नवीन स्टार्ट-अप्स झपाट्याने आपली वाढ नोंदवत आहेत. यामध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत तसेच प्रक्रियेपासून ते व्यवस्थापनापर्यंत या सर्वांना व्यवस्थापन कौशल्य, बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक ज्ञान, संवाद कौशल्य, तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक सल्ला, संशोधन बाबी या गोष्टींची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. अशावेळी कृषी व्यवस्थापन हा करिअर साठी एक महत्त्वाचा विकल्प म्हणून आपण आत्मसात करू शकतो.

sachinhort.shinde@gmail.com





Source link

लोहिया आज असते तर त्यांनी भाजपविरोधाचा नारा दिला असता…

0
लोहिया आज असते तर त्यांनी भाजपविरोधाचा नारा दिला असता…



लोहियांचा वैचारिक वारसा पुन्हा रुजवण्याची सुरुवात त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर करण्यापासून करायला हवी.

राम मनोहर लोहिया यांची २३ मार्च रोजी ११५ वी जयंती साजरी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहियांचा उल्लेख ‘दूरदृष्टीचे नेते, निर्भीड स्वातंत्र्यसैनिक, आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते’ या शब्दांमध्ये केला. नेहमीप्रमाणे लोहियावादी विचारांवर उभारलेल्या समाजवादी पक्षाचा आणि राष्ट्रीय जनता दलाचा अपवाद वगळता लोहियांच्या वैचारिक वारशाची फार कुणी आठवण काढली नाही. लोहियांचा राजकीय वारसा त्यांच्या अनियमित राजकारणाच्या विखुरलेल्या आठवणींमध्ये झाकोळला गेला आहे. लोहियांचा समाजवादी विचार आणि त्यानुसार त्यांनी सुचवलेले राजकीय आणि धोरणात्मक उपाय हे काही मोजक्या लोहियावादी समूहापुरते मर्यादित राहिले. ही केवळ इंडिया आघाडीसाठी शोकांतिकेची बाब नाही तर एकूणात भारतासाठीच ही दुःखद बाब आहे.

मोदींनी आणि भाजपच्या नेत्यांनी लोहियांची आठवण काढण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भाजपच्या नेत्यांनी लोहियांच्या अनेक भूमिका, विधानं, घोषणा या आपल्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने मांडल्या आहेत. लोहियांच्या मूळ भूमिकेच्या पूर्णपणे विसंगत अशी त्यांची मांडणी केली आहे. भाजपचे नेते लोहियांनी नेहरूंवर केलेल्या टीकेचा आनंद घेतात आणि त्या आधारे भाजपचा अजेंडा पुढे रेटतात. वस्तुतः अनेक मुद्द्यांबाबत लोहियांचे नेहरूंसोबत एकमत झाले असते. ‘इंग्रजीवर बंदी’ ही त्यांची घोषणा हिंदीच्या वर्चस्वासाठी वापरली गेली आहे तर मागास जातींना त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचा वापर ओबीसींच्या सत्ता वर्चस्वाची पाठराखण करण्यासाठी केला गेला आहे.

लोहियांचा वैचारिक वारसा पुन्हा रुजवण्याची सुरुवात त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर करण्यापासून करायला हवी. काँग्रेसविरोध हे काही राजकीय तत्त्वज्ञान नव्हते, तर प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात केलेली ती एक तात्कालिक रणनीती होती. लोहियांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसपासून केली. समाजवादी काँग्रेस सोडून जाऊ लागले तेव्हा लोहियांनीच त्यांना विरोध केला होता. त्यांनी १९६० च्या दशकात जेव्हा काँग्रेसचे वर्चस्व होते, अशा काळात काँग्रेसविरोधाचा नारा दिला.

 लोहिया आज असते तर त्यांनी भाजपविरोधाचा नारा दिला असता आणि विरोधी पक्षांच्या ऐक्याची हाक दिली असती, यात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. 

त्याचप्रमाणे लोहिया काही इंग्रजीच्या विरोधात नव्हते. ते स्वतः खूप आनंदाने इंग्रजीत बोलायचे आणि त्यांना इंग्रजी आवडतही असे. त्यांचा विरोध होता तो इंग्रजीच्या वर्चस्ववादाला, तिच्या धुरीणत्वाला. इंग्रजी परकीय भाषा आहे म्हणून ते विरोध करत नव्हते तर ही भाषा सरंजामीचे आणि वर्गीय विषमतेचे प्रतीक आहे, असे त्यांचे मत होते. लोहिया हिंदीला सर्वश्रेष्ठ भाषा मानत नव्हते. उलट सर्वच भारतीय भाषांचे ते आग्रही प्रचारक होते. त्यामुळेच सर्वच भाषांमधील लेखक त्यांच्यामुळे प्रभावित झाले, यात नवल नाही. हिंदीमध्ये लिहिणारे फणीश्वरनाथ रेणू, रघुवीर सहाय, सर्वेश्वर दयाल सक्सेना, विजयदेव नारायण साही, आसामी भाषेत बीरेंद्र कुमार भट्टाचार्य, कन्नड भाषेत लिहिणारे यु. आर. अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी, पी लंकेश आणि सिद्दलिंगा अशा अनेक लेखकांवर लोहियांचा प्रभाव होता. आज लोहिया असते तर ते हिंदीच्या वर्चस्वाच्या विरोधात बोलले असते आणि सर्व भारतीय भाषांच्या ऐक्याची आग्रही मांडणी त्यांनी केली असती.

लोहियांनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष हिंदीपट्ट्यातील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ओबीसींना प्रवेश करण्यासाठी योग्य पक्ष ठरला, हे खरे आहे; पण त्यांचे सामाजिक न्यायाचे धोरण केवळ ओबीसींपुरते मर्यादित नव्हते. सकारात्मक भेदभावावर आधारित सर्वसमावेशक धोरणाचा त्यांनी आग्रह धरला.  ओबीसी, दलित, आदिवासी, स्त्रिया या सर्व वंचित समूहांना न्याय मिळावा याकरता त्यांनी दिलेली ‘पिछडा पावे सौ में साठ’ ही घोषणा आज सोयीस्कररित्या विसरली जाते. लिंगभावाच्या आधारे होणारा अन्याय हा त्यांनी मांडलेल्या सहा अन्यायांपैकी एक आहे. या अन्यायाला उत्तर म्हणून त्यांनी ‘सप्तक्रांती’ सांगितली. सर्व जात वर्गातील स्त्रियांची अवस्था ही शूद्रांसारखी असून त्यांना प्राधान्याने संधी दिली पाहिजे, असे लोहियांचे मत होते. श्रेणीबद्ध विषम व्यवस्थेला प्राधान्यक्रमावर आधारित व्यवस्थेतून उत्तर दिले पाहिजे, असे म्हणणा−या लोहियांनी ओबीसींमधील आत्यंतिक मागास जातींना आणि अनुसूचित जातीतील महादलितांना आज पाठिंबा दिला असता. लोहियांची सामाजिक न्यायाची दृष्टी जात, वर्ग आणि लिंग या तिन्हींचा एकत्रित विचार करुन तयार झालेली आहे. या तिन्ही घटकांच्या आधारेच भारतीय समाजव्यवस्थेतील उतरंडीच्या तळाशी असणारे लोक आजचे भाजपचे वर्चस्व मोडीत काढू शकतात.

भारतीय सभ्यतेच्या वारशावर आणि राष्ट्रवादी दृष्टीवर आधारलेल्या सांस्कृतिक संसाधनाचा अभाव हे सध्याच्या धर्मनिरपेक्ष राजकारणासमोरील एक मूलभूत आव्हान आहे. अशाप्रकारच्या मूलगामी समाजवादी राजकारणासाठी लोहियांची सांस्कृतिक दृष्टी आज उपयोगी पडू शकते. राजकीय कृतींसाठी लोहियांनी लक्षवेधी प्रतीकात्मक भाषा वापरली आहे. लोहियांच्या मते, गरीब आणि आज्ञाधारक सती–सावित्रीपेक्षा द्रौपदी ही महाभारतातील शहाणी, खेळकर, निर्भीड आणि स्वतंत्र बुद्धीची नायिका ही भारतीय स्त्रीत्वासाठी आदर्शवत आहे. भगवान राम हा त्यांच्यासाठी उत्तर दक्षिणेला जोडणारा तर भगवान कृष्ण हा पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल होता. आज एक व्यापक पर्यावरणीय जाणीव निर्माण झाली आहे. ही जाणीव निर्माण होण्याच्या कितीतरी आधी लोहियांनी वेगवेगळ्या नद्यांच्या संवर्धनाविषयी सर्जक पद्धतीने लक्ष वेधले होते. त्यांच्या मते गंगा आणि शरयू या नद्या कर्तव्याचे प्रतीक आहेत तर यमुना आणि तिच्या वितरिका विविध रसांचे प्रतीक आहेत. खाजगी संपत्तीचे समाजवादी पद्धतीने वितरण व्हावे, हे सांगताना इशोपनिषदातील नचिकेताचे आख्यान सांगत ते ‘कांचनमुक्ती’ विषयी भाष्य करतात. स्वाभाविकच लोहियांच्या मांडणीमुळे अनेक कलाकार प्रभावित झाले. अगदी एम.एफ.हुसैन यांची रामायणातील आणि महाभारतातील अनेक चित्रं ही लोहियांच्या मांडणीच्या प्रभावातून जन्माला आली.

लोहियांनी हिंदू जमातवादाची चिकित्सा करताना वसिष्ठ आणि वाल्मिकी यांच्या आधार घेतला. वसिष्ठ हे उच्च जातीय हिंदूंच्या कोत्या मनाचे प्रतीक आहे कारण त्यांना कनिष्ठ जातीयांविषयी राग आहे, संशय आहे आणि त्यांचे शोषण करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात आहे. एकांतात असलेले मानवी मन या भावनेने व्यापलेले असते. वाल्मिकी मात्र हिंदू धर्मातील उदार आणि खुल्या मनाचे प्रतीक आहे कारण ते धर्मांतर्गत सुधारणांसाठी तयार आहेत, ते न्यायाची मागणी करतात आणि बाह्य प्रभावांचा स्वीकार करतात. हिंदू विरुद्ध मुस्लीम असा झगडा आहे, असे दाखवले जाते. प्रत्यक्षात मात्र तो हिंदू धर्मातल्या या दोन प्रवाहांमधला संघर्ष आहे.  हिंदू धर्मातील उदार प्रवाह जोरकसपणे पुढे येतो तेव्हाच भारत प्रगतीपथावर जाऊ शकतो. अलीकडच्या काळातील हिंदू धर्मातील संकुचित आणि कर्मठ प्रवाहाचा उदय भारताचा एक देश म्हणून आणि एक संस्कृती म्हणून अधःपतन करणारा आहे.

कोणत्याही राजकीय विचारवंताचे संदर्भमूल्य हे समकालीन जगातील उपयोगिता मूल्यापुरते मर्यादित नसते. वर उल्लेखलेल्या अनेक बाबींच्या पलीकडे भारताच्या स्वतःच्या अशा आधुनिकतेच्या धारणेला लोहियांनी तात्त्विक अधिष्ठान दिले. मार्क्सवाद, पाश्चात्य समाजवाद यासारख्या युरोपकेंद्री सिद्धांतनांची त्यांनी काटेकोर चिकित्सा केली. हे करताना त्यांनी भाबड्या देशीवादाचे किंवा भारतीय इतिहासाचे अनाठायी गौरवीकरण केले नाही. नव्या मूलगामी समाजरचनेचा त्यांनी आराखडा मांडला. लोहियांनी सामाजिक आणि आर्थिक समतेचा आग्रह धरतानाच निर्वसाहतीकरणाचे राजकारण आणि संस्कृती यासाठीची पार्श्वभूमी तयार केली. तुम्हाला लोहियांचे विचार पटणार नाहीत किंवा त्यांची मांडणी आजच्या काळाच्या कसोटीवर अपुरी वाटेल किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता वाटेल; पण लोहियांचा विचार हा विचारधारेचा एक महत्वाचा स्त्रोत आहे, हे नाकारता येणार नाही. आजच्या गणराज्यात हा विचार जिवंत ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे.

अनुवादः श्रीरंजन आवटे

राष्ट्रीय संयोजक,  भारत जोडो अभियान

yyadav@gmail.com



Source link

फ्री-स्टाइल बुद्धिबळ म्हणजे काय? भविष्यात बुद्धिबळपटूंचा याकडेच अधिक कल? गुकेशला अजूनही या प्रकारात यश का नाही?

0
फ्री-स्टाइल बुद्धिबळ म्हणजे काय? भविष्यात बुद्धिबळपटूंचा याकडेच अधिक कल? गुकेशला अजूनही या प्रकारात यश का नाही?



What is free-style chess? Will chess players be more inclined towards it in the future? Why is Gukesh still not successful in this form? विश्लेषण : फ्री-स्टाइल बुद्धिबळ म्हणजे काय? भविष्यात बुद्धिबळपटूंचा याकडेच अधिक कल? गुकेशला अजूनही या प्रकारात यश का नाही?





Source link

अमित शहांचे तटकरेंच्या निवासस्थानी उद्या स्नेहभोजन, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा; शिंदे गटात अस्वस्थता

0
अमित शहांचे तटकरेंच्या निवासस्थानी उद्या स्नेहभोजन, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा; शिंदे गटात अस्वस्थता



Amit Shah lunch Tatkare residence Raigad Guardian Minister post in spotlight अमित शहांचे तटकरेंच्या निवासस्थानी उद्या स्नेहभोजन, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा; शिंदे गटात अस्वस्थता





Source link