Saturday, July 25, 2026
Home Blog Page 429

Is closeness with Fadnavis beneficial to Sarnaik? फडणवीसांशी जवळीक सरनाईकांच्या फायद्याची?

0
Is closeness with Fadnavis beneficial to Sarnaik? फडणवीसांशी जवळीक सरनाईकांच्या फायद्याची?


मुंबई : एसटी मंडळाच्या अध्यक्षपदी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना शिंदे गटाला सूचक इशारा दिला होता. यावरून शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एसटी मंडळाच्या अध्यक्षपदाचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक सरनाईक यांना उपयुक्त ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

फडणवीस यांनी शिंदे यांच्या काळातील अनेक निर्णयांना कात्री लावली. एसटी महामंडळात नवीन बस खरेदी करण्याच्या निविदेला स्थगिती देण्यात आली होती. त्यातच एसटी महामंडळ शिंदे गटाकडे राहिल, अशी अपेक्षा होती. परंतु सरकारने परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. सरनाईक यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यांचा मंत्रिमंडळातील समावेशही फडणवीस यांच्यामुळेच झाल्याची तेव्हा चर्चा होती. त्यातच महामंडळाच्या अध्यक्षपदी सरनाईक यांची नियुक्ती झाल्याने जवळीकीला बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या पदावर नियुक्त करून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष





Source link

It has been revealed that during tenure of Assembly Speaker Rahul Narvekar, number of eye-catching suggestions has tripled compared to previous Speakers ‘लक्षवेधी’ आवडे विधानसभा अध्यक्षांना!

0
It has been revealed that during tenure of Assembly Speaker Rahul Narvekar, number of eye-catching suggestions has tripled compared to previous Speakers ‘लक्षवेधी’ आवडे विधानसभा अध्यक्षांना!



It has been revealed that during tenure of Assembly Speaker Rahul Narvekar, number of eye-catching suggestions has tripled compared to previous Speakers ‘लक्षवेधी’ आवडे विधानसभा अध्यक्षांना!





Source link

Retired principal murder wife सहचारिणीच्या असह्य वेदनांवर मृत्यूची फुंकर

0
Retired principal murder wife सहचारिणीच्या असह्य वेदनांवर मृत्यूची फुंकर


नाशिक : पत्नी मेंदूविकाराने त्रस्त.. सातत्याने आजारी असल्याने तिला असह्य वेदना होतात. पत्नीचे हे हाल पाहू शकत नसल्याने निवृत्त मुख्याध्यापकाने तिची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्येचे पाऊल उचलले. नाशिक शहरातील जेलरोड परिसरात गुरुवारी ही हृदयद्रावक घटना घडली. पत्नीवर आत्यंतिक प्रेम असल्याने आजारपणातील तिची दुर्दशा पाहू शकत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे या निवृत्त मुख्याध्यापकाने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सांगितले.

जेलरोड येथील सावरकर नगरातील एकदंत अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी (७८) हे पत्नी निवृत्त शिक्षिका लता जोशी (७६) यांच्याबरोबर राहत होते. त्यांचे दोन्ही मुले मुंबई येथे उच्चपदस्थ अधिकारी आहेत. लता या काही वर्षांपासून मेंदूविकाराने त्रस्त होत्या. त्यातून त्या सावरल्या होत्या. परंतु अधूनमधून त्यांची तब्येत बिघडतच होती. सततच्या आजाराला जोशी दाम्पत्य कंटाळले होते. बुधवारी सायंकाळी मुरलीधर यांनी लता यांची गळा दाबून हत्या केली. नंतर स्वत: गळफास घेतला. त्यांची गृहसेविका नेहमीच्या कामासाठी आली असता आवाज दिल्यावरही दरवाजा न उघडल्याने तिने आजूबाजूच्या रहिवाशांना त्याबद्दल सांगितले. नंतर उपनगर पोलिसांना कळविण्यात आले.

पोलीस घटनास्थळी आल्यावर लता या मृतावस्थेत तर, मुरलीधर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. पोलिसांना घरात मुरलीधर यांनी लिहिलेली चिट्ठी मिळाली. त्या चिठ्ठीत पत्नी लता यांच्या आजारपणाचा उल्लेख करून तिच्या वेदना पाहणे असह्य होत असल्याने तिची हत्या करत असल्याचे सांगितले. माझे तिच्यावर आत्यंतिक प्रेम असल्याने मीपण आत्महत्या करत आहे, असा उल्लेखही चिठ्ठीत होता. या प्रकरणी मुरलीधर जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी जोशी दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा
हेही वाचा

चिठ्ठीत नेमके काय?

‘‘मी मुरलीधर रामा जोशी. पत्नीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे. याच्याशी कोणाचा काहीही संबंध नाही. मी खुशीने आत्महत्या करत आहे. तसेच मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे. पोरांनी मला माफ करावे. सीमाने (गृहसेविका) खूप सेवा केली. तिला माझ्याकडून ५० हजार रुपये चालू खात्यातून द्यावे. ती बाहेर गेली असताना मी हे कृत्य करत आहे. तिचा संबंध नाही. तिच्या मुलाची फी भरण्यासाठी पैशांचा उपयोग होईल. लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले पाच हजार अंत्यविधीसाठीचे पैसे आहेत. मंगळसूत्र, जोडवी आहेत. ते लताला घालावेत. नंतर सीमा राठोड हिला द्यावेत. माझे देहदान करावे. लताचा तुमची इच्छा असल्यास अंत्यविधी करावा. माझी आत्महत्या फेल झाली तर मात्र वृद्धाश्रमात ठेवावे. माझ्या कृत्यास कोणीही जबाबदार नाही.’’





Source link

Mumbai mangrove forest Chandrapur मुंबईतील कांदळवनाची भरपाई चंद्रपूरमध्ये

0
Mumbai mangrove forest Chandrapur मुंबईतील कांदळवनाची भरपाई चंद्रपूरमध्ये


मुंबई : सागरी किनाऱ्यावरील कांदळवनांची विकासकामांमुळे झालेली हानी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करून भरून काढण्याचा अजब मार्ग पत्करण्यात आला आहे. सागरी किनारा मार्ग प्रकल्पामुळे वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या भागातील कांदळवने बाधित होणार आहेत. त्याची नुकसानभरपाई म्हणून चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कांदळवने नष्ट झाल्यामुळे किनारपट्टी भागांची हानी चंद्रपूरमध्ये झाडे लावून भरून कशी निघणार असा प्रश्न आहे. सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा – भाईंदर दरम्यानच्या विस्तारासाठी वर्सोवा ते भाईंदर भागातील कांदळवनांचे स्थलांतर करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्याच वेळी भरपाई म्हणून वनीकरण करण्याची अटही घालण्यात आली आहे. भौगोलिक क्षेत्रानुसार आणि हवामानानुसार वनांची रचना, वनस्पती वेगवेगळ्या असतात. ही वनसंपदा निसर्गात जैवविविधतेच्या दृष्टीने निरनिराळ्या भूमिका बजावतात.

कांदळवनाचा विनाश पर्यावरणावर आणि मच्छीमार समाजाच्या उपजीविकेवर परिणाम करतो. त्याची भरपाई कांदळवने नसलेल्या ठिकाणी करून काय साधणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

हेही वाचा

नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत झटपट पोहोचता यावे यासाठी सागरी किनारा रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील श्यामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी- वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) बांधण्यात आला आहे.

नवी मुंबई सागरी रस्त्यामुळे होणाऱ्या कांदळवनाच्या नुकसानभरपाईसाठी जळगावमधील एका गावात केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने परवानगी दिली होती. तसेच मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या बोरिवली- विरार दरम्यान रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाने मंजुरी दिली होती. या प्रकल्पामुळे तेथील कांदळवने बाधित होणार असल्याने त्यांची नुकसानभरपाई म्हणून गडचिरोलीत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

भाईंदरमध्येही नुकसानभरपाई

या प्रकल्पामुळे होणाऱ्या कांदळवनाची नुकसानभरपाई भाईंदरमध्येही करण्यात येणार आहे. भाईंदरमधील ३० हेक्टर जमिनीवर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा

कांदळवनांचे महत्त्व

कांदळवने ही किनाऱ्यांसाठी वरदान आहेत. कांदळवनांमध्ये झाडे, झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती आणि जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींचा समावेश असतो. त्यांच्या मुळांचा जमिनीवर असलेला भाग गुंतागुंतीसारखा वाटत असला तरी ही मुळे एकप्रकारे भरतीच्या पाण्याचा वेग रोखणाऱ्या बफरसारखे काम करतात. हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठीही कांदळवनातले वृक्ष आणि दलदल हे कार्बन सिंकसारखे काम करतात. म्हणजे ती मोठ्या कार्बन शोषून घेतात. अनेक जलचरांचे ते आश्रय स्थान आहे. कांदळवने ही उपजीविकेचे साधन म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे कांदळवन हे सागरी किनाऱ्यांसाठी लाभलेले वरदान आहे.

कांदळवनाची नुकसानभरपाई करण्याचा अर्थ कांदळवन नष्ट करणे असाच निघतो आणि इतक्या दूरवर वृक्षारोपण करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. यामुळे मच्छीमार समाजाच्या उपजीविकेवरही परिणाम होतो. – बी.एन. कुमार, पर्यावरणप्रेमी, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन

एक रस्ता बांधण्यासाठी मुंबईतील नैसर्गिक संपत्ती नष्ट केली जाते. मुंबईकर आधीच बिघडलेल्या वातावरणाला तोंड देत आहेत. असे असताना दरवेळी विकासकामांसाठी वृक्षतोड करणे हे योग्य नाही. मुंबईतील हे क्षेत्र नष्ट केल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. – झोरू बथेना, पर्यावरण अभ्यासक





Source link

महायुती सरकारचे १०० दिवसांचे कृती अभियान; नगरविकास, शिक्षण विभाग कामगिरीत काठावर

0
महायुती सरकारचे १०० दिवसांचे कृती अभियान; नगरविकास, शिक्षण विभाग कामगिरीत काठावर



Mahayuti government’s 100-day action campaign; Urban Development, Education departments on the edge in performance महायुती सरकारचे १०० दिवसांचे कृती अभियान; नगरविकास, शिक्षण विभाग कामगिरीत काठावर





Source link

अंबानींच्या ‘सूर्यतारा’साठी वनमंत्र्यांच्या पायघड्या, गुजरातच्या धर्तीवर राज्यात प्रकल्प

0
अंबानींच्या ‘सूर्यतारा’साठी वनमंत्र्यांच्या पायघड्या, गुजरातच्या धर्तीवर राज्यात प्रकल्प



Anant Ambani Jamnagar Vantara Maharashtra Suryatara project Ganesh Naik अंबानींच्या ‘सूर्यतारा’साठी वनमंत्र्यांच्या पायघड्या, गुजरातच्या धर्तीवर राज्यात प्रकल्प





Source link

BJP launches campaign to create awareness about Waqf वक्फबाबत जनजागृतीसाठी भाजपकडून अभियान

0
BJP launches campaign to create awareness about Waqf वक्फबाबत जनजागृतीसाठी भाजपकडून अभियान


पीटीआय, नवी दिल्ली

वक्फ कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे देशव्यापी अभियान राबविले जाईल. २० एप्रिलपासून १५ दिवस चालणाऱ्या या अभियानात विरोधकांचे आरोप खोडून काढले जातील असे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रतिनिधींपुढे स्पष्ट केले.

विरोधक मुस्लीम समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप नड्डा यांनी केला. वक्फच्या पारदर्शक कारभारासाठी सरकारने यामध्ये पसमंदा मुस्लीम तसेच महिलांना सहभागी करून घेण्याचा निर्धार केल्याचे ते म्हणाले. बैठकीला भाजपशासित राज्यातील वक्फ मंडळाचे सदस्य व अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.





Source link

The third and final element in the article ‘Satyagraha, Socialism and Democracy’ written by Lakshman Shastri Joshi is democracy तर्कतीर्थ विचार : लोकमतातून निर्मित लोकशाही

0
The third and final element in the article ‘Satyagraha, Socialism and Democracy’ written by Lakshman Shastri Joshi is democracy तर्कतीर्थ विचार : लोकमतातून निर्मित लोकशाही


तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिखित ‘सत्याग्रह, समाजवाद व लोकशाही’ लेखातील तिसरे व शेवटचे घटकतत्त्व लोकशाही होय. स्वातंत्र्यपूर्व काळात सत्याग्रहाचा वापर महात्मा गांधी करीत होते. त्या वेळी स्वातंत्र्याचा लढा चालविणारा पक्ष हा लोकपक्ष होता. शत्रूस्थानी सत्ताधारी राज्यकर्ता पक्ष होता. तो लोकमतास जबाबदार नव्हता. लोकशाहीमध्ये मात्र या उलट परिस्थिती असते.

लोकशाहीमध्ये सत्याग्रहाला राजकीय साधन व राजकीय आंदोलन म्हणून स्थान आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. लोकशाहीतील सत्ता लोकमताने निर्माण केलेली व अर्पिलेली असते. आणि ही सत्ता सामान्य निर्वाचनाच्या समयी दर पाच वर्षांच्या कालावधीनंतर लोकमत स्वाभिमत पक्षाच्या हाती अर्पण करू शकते. कायदा मोडण्याची व राज्यपद्धतीच्या विरुद्ध सत्याग्रही लढा देण्याची आवश्यकताच राहत नाही. कारण लोकमताला बहुमताने राज्यपद्धती व कायदा बदलून घेण्यास अनुकूल संधी लोकशाहीत नेहमीच असते.

भारत, इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, अमेरिका इत्यादी लोकशाही राष्ट्रांत अहिंसात्मक पद्धतीने लोकमत परिवर्तनाचे व बहुमतानुकूल पक्षाच्या हाती सत्ता समर्पित करण्याचे संपूर्ण अधिकार असतात. म्हणून अहिंसात्मक संघटित प्रतिकाराची म्हणजेच सत्याग्रहाची लोकशाहीत आवश्यकताच नाही, असे म्हणता येते. उलट, अशा लोकशाही स्वातंत्र्याच्या वातावरणात सत्याग्रही संघटनांची सामुदायिक आंदोलने उभारणे, ही एकप्रकारची बळजबरी ठरते. लोकमतानुसार स्थापित झालेल्या कायदेशीर राज्याला कायदेभंगाने धोका पोहोचविला, तर कायद्याचे पावित्र्य धोक्यात येते आणि कायद्यावरील श्रद्धा नष्ट झाली म्हणजे बेबंदशाही प्रवृत्ती उफाळू लागतात.

हेही वाचा

डाव्या हुकूमशाहीत प्रस्थापित राज्यपद्धतीविरुद्ध प्रचार करण्याचे व संघटना करण्याचे स्वातंत्र्य नसते. त्यामुळे लोकमत प्रचारद्वारा संघटित करून सत्याग्रह आंदोलन उभारणी हे डाव्या कम्युनिस्ट हुकूमशाहीत किंवा उजव्या हुकूमशाहीत अशक्य ठरते. सत्याग्रहाचे आंदोलन उभारण्यास अनुकूल असे मतस्वातंत्र्य व संघटनास्वातंत्र्य संसदीय लोकशाहीतच जास्तीत जास्त असते. संसदीय लोकशाहीला समाजवादी ध्येयाकडे नेण्याकरिता सत्याग्रह आंदोलन उभारणे अत्यंत शक्य आहे. संसदीय लोकशाही ही समाजवादी ध्येयाकडे जातेच असे नाही. तिच्यावर कित्येकदा पिळवणूक करणारा खासगी भांडवलदारांचाही प्रभाव पडलेला असतो. जागृत व संघटित लोकमत हा प्रभाव नष्ट करू शकते.

कित्येकदा लोकमत प्रतिगामी सामाजिक परिस्थितीत मागासलेले असू शकते. अशा वेळी लोकमताला जागृत करून त्यामध्ये समाजवादी क्रांती करणारी लोकशाही निर्माण करण्याचे सामर्थ्य आणणे आवश्यक असते. अशा वेळी लोकहृदय परिवर्तनाचा मार्ग म्हणून सत्याग्रहाचे आंदोलन उपयोगी पडू शकले. याचे उदाहरण म्हणजे भारतीय अस्पृश्यता होय. भारतीय अस्पृश्यता कायद्यामध्ये नष्ट झाली आहे, परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थितीत अस्पृश्यतेसारखी अन्यायमय संस्था जिवंत आहे. तिचा नाश सत्याग्रहाच्या मार्गानेही करण्याची गरज वाटते; पण सत्याग्रहापेक्षा विधायक कार्यक्रम हा उपाय अधिक बिनधोक ठरतो. अमेरिकेत निग्रो जमातीला फेडरल कायद्याने सामाजिक समतेचा हक्क दिला आहे, परंतु गोऱ्या जमातीतील रूढी ही प्रत्यक्ष जीवनात समानतेचा हक्क बजावू देत नाही. अशा परिस्थितीत सत्याग्रही आंदोलनाची आवश्यकता भासते, परंतु सत्याग्रही आंदोलन अहिंसेच्या मर्यादेत चालविण्यास आवश्यक असलेली मानसिक उन्नती झालेला सत्याग्रही दुर्मीळ ठरतो.

हेही वाचा

सत्याग्रह हे अत्यंत महत्त्वाचे राजनैतिक साधन आहे, परंतु राजनैतिक साधन यादृष्टीने ते वापरण्यास अनुकूल अशी राजकीय व सामाजिक परिस्थिती सर्वत्र उपलब्ध होऊ शकत नाही. डाव्या व उजव्या हुकूमशाहीत सत्याग्रह आंदोलन व्यापक लोकमताच्या उठावाकरिता आवश्यक असे सामुदायिक सामर्थ्य मिळवू शकत नाही. संसदीय लोकशाही कसे ते मिळवू शकते? परंतु संसदीय लोकशाहीच्या वातावरणात लोकमत जागृत व संघटित करून समाजवादी देशाची आराधना करणारा पक्ष राजकीय सत्ता हाती घेऊ शकतो. म्हणून सामुदायिक सत्याग्रहापर्यंत जाण्याची आवश्यकता संसदीय लोकशाहीत आहे, असते. ट्रम्प प्रशासन विरोधी ‘हॅण्ड्स ऑफ’ आंदोलन हे याचे वर्तमानातील उदाहरण आपल्यासमोर ताजे आहे.





Source link

Dennis the Menace J North died व्यक्तिवेध : जे नॉर्थ

0
Dennis the Menace J North died व्यक्तिवेध : जे नॉर्थ


घरोघरी एखादं खोडकर, व्रात्य मूल असतं, घरदार त्याच्या खोड्यांनी त्रस्त असतं, पण तरीही त्याच्या बाललीला सगळ्यांनाच हव्याहव्याशा असतात. ‘डेनिस द मेनिस’ मधला डेनिस मिशेल तसा होता. आणि त्याला पूर्ण न्याय दिला होता, ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेमतेम आठ वर्षांच्या जे नॉर्थने. डेनिसला घरोघरी पोहोचवणाऱ्या जे नॉर्थचं नुकतंच निधन झालं.

आज जगभर सगळीकडेच दूरचित्रवाणीवर मनोरंजनाचा पूर असताना त्याने साकारलेला डेनिस विसरला जात नाही, हे त्याचं वेगळेपण. १९५९ ते १९६३ या काळात अमेरिकन टीव्हीवर ४ सीझन्स (१४६ भाग) सादर झालेली सीबीएस नेटवर्कची ‘डेनिस द मेनिस’ ही मालिका कमालीची लोकप्रिय झाली. ती मुळात घेतली होती हँक केचम यांच्या डेनिस द मेनिस या प्रसिद्ध कॉमिक स्ट्रिपवरून. डेनिस हे त्यातलं मुख्य पात्र. पाच-सहा वर्षांचा डेनिस तसा निष्पाप. त्यातूनच होणाऱ्या गोंधळातून होणारी विनोदनिर्मिती हा या कार्टून स्ट्रिपचा आणि नंतर मालिकेचा विषय होता.

जेच्या अभिनयात अतिशय नैसर्गिकता होती. तो कोणताही संवाद सहजपणे, जणू तोच डेनिस आहे अशा पद्धतीनं बोलायचा. मालिकेच्या प्रत्येक भागामध्ये डेनिस एखादी गडबड करायचा पण त्यामागचे हेतू निरागस असायचे. एका भागात डेनिस शेजारच्या मिस्टर विल्सनच्या बागेतील झाडाची फुलं तोडतो. मिस्टर विल्सन रागावतात, पण नंतर जेव्हा त्यांना समजतं की डेनिसने ती फुलं त्यांच्या वाढदिवसाची सजावट करायची म्हणून तोडलेली असतात, तेव्हा त्यांचा राग पळून जातो. डेनिस या व्यक्तिरेखेमुळे जे इतका लोकप्रिय झाला की त्याला ‘डेनिस’ म्हणूनच ओळखलं जायचं. त्याचे पोस्टर्स, खेळणी बाजारात आली. तो जाईल तिथे त्याला बघायला प्रचंड गर्दी होत असे.

हेही वाचा

‘डेनिस द मेनिस’नंतर जे नॉर्थने काही चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्यात त्याला फारसं यश मिळालं नाही. दुसरीकडे बालपणी मिळालेली प्रसिद्धी आणि तिचं दडपण याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. ‘डेनिस द मेनिस’मुळे तो जगभर पोहोचला असला तरी पडद्यामागे त्याचं बालपण हरवत गेलं.

त्यानेच एका मुलाखतीत सांगितले होते की मी खूप लोकप्रिय होतो, पण प्रत्यक्षात खूप एकाकी होतो. जे नॉर्थची मावशीच त्याची व्यवस्थापक होती आणि तिने जेवर अतिशय कडक शिस्त लादली होती. त्यामुळे त्याला वैयक्तिक जीवनात अनेक मानसिक आणि भावनिक अडचणींचा सामना करावा लागला.

हेही वाचा

‘डेनिस द मेनिस’ ही मालिका १९६३ मध्ये बंद झाली. त्यानंतर जेने ‘झोब्रा इन द किचन’सारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलं, पण प्रेक्षकांना तो नेहमी ‘डेनिस’च वाटत राहिला. हे त्याचं एकेकाळचं सामर्थ्य हीच त्याची मर्यादा ठरली. पुढे तो नेव्हीमध्ये भरती झाला. तिथून बाहेर पडल्यानंतर त्याने बालकलाकारांच्या हक्कांसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काम केलं. जे नॉर्थचं जीवन हे बालकलाकाराच्या प्रसिद्धीच्या जगाआड असलेल्या कटू वास्तवाचं उदाहरण आहे.





Source link

Infrastructure in industrial sector is in state of disrepair Entrepreneurs complain to government agencies

0
Infrastructure in industrial sector is in state of disrepair Entrepreneurs complain to government agencies



Infrastructure in industrial sector is in state of disrepair Entrepreneurs complain to government agencies | औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांची बोंब; उद्योजकांची सरकारी यंत्रणांसमोर तक्रार





Source link