Sunday, September 13, 2026
Homeसाताराबुद्ध विहाराच्या मागणीसाठी साखरवाडीत आंदोलनाचा भडका! पोलिस लाठीमारानंतर अटकेतले भीमसैनिक अखेर न्यायालयातून...

बुद्ध विहाराच्या मागणीसाठी साखरवाडीत आंदोलनाचा भडका! पोलिस लाठीमारानंतर अटकेतले भीमसैनिक अखेर न्यायालयातून मुक्त


फलटण :- फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे बुद्ध विहाराच्या मागणीसाठी गेले 60 दिवस सातत्याने तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलनकर्त्यांनी 60 व्या दिवशी खुल्या जागेत तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना केली. या प्रकारानंतर प्रशासनाने कठोर पवित्रा घेत बौद्ध समाजातील महिला व पुरुषांवर लाठीमार केला आणि तब्बल 30 भीमसैनिकांना अटक केली.

या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेशीर लढवय्ये तात्काळ मैदानात उतरले. विशेष सरकारी वकील अॅड. बापूसाहेब शिलवंत, अॅड. संदीप शिवाजीराव कांबळे, अॅड. मनोज जावळे, अॅड. मेघा आहिवळे, अॅड. निलेश भोसले, अॅड. प्रेम आहिवळे, अॅड. शाम आहिवळे, अॅड. अजित चाबुकस्वार, अॅड. मनीष काकडे, अॅड. प्रबुद्ध मिसळ आदींनी न्यायालयात दमदार युक्तिवाद करत सर्व 30 भीमसैनिकांची जामिनावर मुक्तता करून घेतली.

पोलिसांनी सांगितलेली मूर्तीची जागा ही पोलीस प्रशासनाची असल्याचा दावा करत लाठीमार केला गेला. यात अनेक आंदोलक जखमी झाले, तर अटकेत घेतलेल्यांना फलटणपासून तब्बल 150 किमी लांब कराड पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

या लढ्याचे नेतृत्व आणि खबरदारीचे काम युवा नेते व फलटण दर्शनचे संपादक सुधीर अहिवळे, अध्यक्ष संजय दादा गायकवाड, कामगार संघर्ष संघटनेचे अध्यक्ष महादेव गायकवाड (आझाद समाज पार्टी), तसेच इतर कार्यकर्त्यांनी उचलून धरले. साखरवाडीच्या युवकांनी सांगितले की, “आपण सगळे एकत्र होतो, म्हणूनच हा लढा यशस्वी झाला.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments