Raj Thackeray on Hindi Compulsion : हिंदीला दक्षिण भारतीय राज्यांमध्ये आधीपासूनच विरोध होत आहे. तामिळनाडूतील द्रमुक सरकारने हिंदीविरोधात जोरदार मोहिम उघडली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या करण्याच्या नव्या शैक्षणिक धोरणावर टीका करत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येत आहे, पण आम्ही हे खपवून घेणार नाही असा स्पष्ट शब्दात इशारा हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
सासूकडून होणारा सुनेचा छळ तुम्ही अनेकदा ऐकला आणि पाहिला असेल. पण अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयात एक खटला दाखल करण्यात आला ज्यात एका सासूने आपल्या सुनेविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली आहे. या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान असा ही प्रश्न उपस्थित झाला की, सासू आपल्या सुनेवर असा गुन्हा दाखल करू शकते का? त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने उत्तर दिलं आहे.
फलटण (साहस टाइम्स प्रतिनिधी) – फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी इतरत्र वळवण्याचा काही मंडळींचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत, “फलटणचे पाणी कुणालाही देऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल ते करावे लागले तरी करू!” असा स्पष्ट इशारा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.
फलटणमधील ‘लक्ष्मीनिवास पॅलेस’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे यांनी जलवाटप, सिंचन क्षेत्रातील घट आणि नागरी विकासाच्या मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. यावेळी श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी जि.प. सदस्य धैर्यशील (दत्ता) अनपट, दूध संघ अध्यक्ष धनंजय पवार आणि माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
संजीवराजेंनी स्पष्ट केले की, “फलटण तालुक्यातील सिंचनाखालील क्षेत्र कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे फलटण, माळशिरस आणि खंडाळा तालुक्यांनी एकत्र येऊन या अन्यायकारक निर्णयाचा विरोध करावा लागेल.”
त्याचबरोबर, फलटण शहरासमोरील कोळकी, जाधववाडी, साखरवाडी आणि विडणी या गावांना नगरपंचायत दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी आपला प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. “फलटणला कोळकीचा भाग जोडण्याचा प्रस्ताव आम्ही रोखला आणि कोळकीचे स्वतंत्र अस्तित्व टिकवले,” अशी आठवणही त्यांनी करून दिली.
यावेळी बोलताना माजी आमदार दीपक चव्हाण यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती व सध्याचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निरा देवधर प्रकल्पाला गती दिल्याची आठवण करून दिली. “२०१४ नंतर केंद्र सरकारकडून एक रुपयाही निधी मिळालेला नव्हता,” असा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, गेल्या २५ वर्षांत फलटण-कोरेगाव विधानसभा क्षेत्रात झालेल्या विविध विकासकामांचा आढावा देखील त्यांनी घेतला.
पुणे | साहस टाइम्स प्रतिनिधी. :- क्रीडा क्षेत्रात आपल्या उत्तुंग कामगिरीने राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल करणाऱ्या दोन कन्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कु. वैष्णवी विठ्ठल फाळके हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला असून, तिच्या खेळातील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल शासनाने घेतली आहे. हा पुरस्कार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी बालेवाडी, पुणे येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. वैष्णवीच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्याचबरोबर हॉकी या खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. अक्षता ढेकळे हिलाही याच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दमदार कामगिरीचा गौरव म्हणून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील हॉकी खेळाडूंमध्ये हा एक सन्मान मानला जातो.
या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने राज्याच्या क्रीडाजगताला नवा गौरव प्राप्त करून दिला आहे. साहस टाइम्सतर्फे दोघींनाही मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
Waqf Law Supreme Court Hearing : नव्या वक्फ कायद्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत परिस्थिती जैसे थे असणार आहे. नेमकं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान काय म्हटलं जाणून घ्या.
ज्या ट्रेनमध्ये आपण दररोज प्रवास करतो. त्या ट्रेनचे पूर्ण नाव काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ट्रेन या शब्दाचा अर्थ काय हा प्रवास करणाऱ्या 99% लोकांना माहित नाही. . तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ट्रेनलाही पूर्ण रूप असते. ज्याप्रमाणे जेसीबी आणि टीव्हीचे पूर्ण अर्थ आहेत, अगदी त्याचप्रमाणे ट्रेनचाही फुलफॉर्म आहे.
ट्रेनचे पूर्ण नाव काय आहे?
ज्याला इंग्रजीत ट्रेन म्हणतात, त्याला लोक हिंदीत रेलगडी किंवा लोहपथगामिनी म्हणतात. तर मराठीत आगगाडी असे ही म्हटले जाते. पण TRAIN या इंग्रजी शब्दाचा फुल फॉर्म Tourist Railway Association Inc असे आहे. याला संक्षिप्त स्वरूपात train म्हणतात. ट्रेन हा शब्द देखील इंग्रजीतून घेतलेला नाही, तर तो फ्रेंच शब्द ट्रॅहिनरपासून आला आहे. याचा अर्थ ओढणे किंवा लॅटिनमध्ये त्याला ट्राहेरे म्हणतात.
आणखी काही शब्द
आपण दिवसातून अनेक वेळा IRCTC हा शब्द वापरतो. पण तुम्हाला त्याचे पूर्ण रूप माहित आहे का? आयआरसीटीसीचे पूर्ण रूप इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असे आहे. त्याचप्रमाणे, IRFC चे पूर्ण रूप इंडियन रेल्वे फायनान्स कोऑपरेशन असे आहे. तर, IRCON चे पूर्ण रूप इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन लिमिटेड आहे. आरव्हीएनएलचे पूर्ण रूप रेल विकास निगम लिमिटेड आहे.
याचा रेल्वेशी संबंध काय?
रेल्वेशी संबंधित इतर अनेक शब्द आहेत ज्याचा फुलफॉर्म किंवा अर्थ तुम्हाला माहित नसेल. WL, RSWL, PQWL, GNWL प्रमाणे, सामान्य लोकांना ते समजणे कठीण आहे. जर तुमच्या तिकिटावर WL लिहिले असेल तर याचा अर्थ तुमची सीट कन्फर्म झालेली नाही आणि ती वेटिंग लिस्टमध्ये गेली आहे. जेव्हा तुमची सीट किंवा बर्थ मूळ स्थानकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी बुक केली जाते तेव्हा तुम्हाला RSWL (रोडसाइड स्टेशन वेटिंग लिस्ट) तिकीट दिले जाते.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी द्विराष्ट्र सिद्धांताचा मुद्दा उपस्थित केला असून, भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत यावर भर दिला आहे. बुधवारी इस्लामाबादमधील ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शनमध्ये भाषण करताना असीम मुनीर यांनी पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मुलांना राष्ट्र कसे जन्माला आले हे सांगण्याचं आवाहन केले.
“…आपल्या पूर्वजांना वाटलं की आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत,” असं मुनीर म्हणाले. “आपला धर्म वेगळा आहे, आपल्या प्रथा वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. द्विराष्ट्र सिद्धांताचा पाया तिथेच घातला गेला. आपण दोन राष्ट्रे आहोत, आपण एक राष्ट्र नाही,” असं ते म्हणाले.
“आपल्या पूर्वजांनी मोठा त्याग केला आहे, आणि आपण या देशाच्या निर्मितीसाठी खूप त्याग केला आहे. त्याचं रक्षण कसे करायचे हे आपल्याला माहिती आहे,” असं ते म्हणाले.
Pakistan Army Chief General Asim Munir spews hate against #Hindus and propagates the #TwoNationTheory, which failed in 1971 when Bangladesh got independence from Pakistan. He asserts that children must be taught such “falsehoods” since it’s easier to brainwash youth. Shameful! pic.twitter.com/vaVZhEK4v8
ते पुढे म्हणाले,”माझ्या प्रिय बंधूंनो, बहिणींनो आणि मुलांनो, कृपया पाकिस्तानची गोष्ट विसरू नका आणि तुमच्या पुढच्या पिढीला पाकिस्तानची कहाणी सांगायला विसरू नका, जेणेकरून त्यांचे पाकिस्तानशी असलेले नाते कधीही कमकुवत होणार नाही. ती तिसरी पिढी असो, चौथी पिढी असो, किंवा पाचवी पिढी असो, त्यांना माहित असेल की पाकिस्तान त्यांच्यासाठी काय आहे”.
यादरम्यान त्यांनी स्थानिक माध्यमांचा हवाला देत त्यांनी बलुचिस्तानमधील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. “दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही बलुचिस्तान आणि पाकिस्तानला हानी पोहोचवू शकत नाहीत,” असं विधान त्यांनी केल्याचं एएनआयने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने सांगितलं.
मुनीर यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी सैन्याच्या दृढनिश्चयावर भर दिला आणि परदेशातील पाकिस्तानी लोकांनी देशाप्रती केलेल्या समर्पणा आणि वचनबद्धतेचे कौतुक केले.
“आम्ही लवकरच या दहशतवाद्यांना पराभूत करू. बीएलए, बीएलएफ आणि बीआरए इत्यादींशी संबंधित हे 1500 दहशतवादी बलुचिस्तान आपल्यापासून हिरावून घेऊ शकतात असं तुम्हाला वाटतं का?,” अशी विचारणा मुनीर यांनी केली. “पाकिस्तानच्या शत्रूंना असं वाटतं का की मूठभर दहशतवादी पाकिस्तानचे भवितव्य ठरवू शकतात?दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही बलुचिस्तान आणि पाकिस्तानला हानी पोहोचवू शकत नाहीत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपूर: लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले असून ग्राहकांमध्ये चिंता आहे. त्यातच गुरूवारी (१७ एप्रिल २०२५ रोजी) सोन्याचे दर दोन तासातच दोनदा घसरले. तर चांदीच्याही दरात घसरण बघायला मिळाली. त्यामुळे सोने- चांदीचे दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान गुरूवारी सोन्याचे दर काय होते? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
हल्ली लग्नसराईचे दिवस असल्याने सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची गर्दी दिसत आहे. त्यातच नागपुरात २५ दिवसांपूर्वी सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले होते. परंतु मागच्या आठवड्यात या दरात घसरण झाली असली तरी त्यानंतर पून्हा दरवाढीने हे दर विक्रमी उंचीवर पोहचले आहे. त्यातच गुरूवारी नागपुरातील सराफा बाजार जास्त दरावर उघडला. परंतु त्यानंतर सलग दोन तासात दोनदा सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली.
नागपुरातील सराफा बाजारात गुरूवारी (१७ एप्रिल २०२५ रोजी) सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९५ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८९ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार २०० रुपये होते. हे दर एक तासांनी सकाळी ११.३० वाजता २४ कॅरेटसाठी ९५ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार १०० रुपये नोंदवले गेले. तर त्याच्या एक तासांनी १२.३० वाजता २४ कॅरेटसाठी ९५ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८८ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे गुरूवारी सकाळी १०.३० वाजताच्या तुलनेत दोन तासांनी दुपारी १२.३० वाजता नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४०० रुपये कमी झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा
करोनानंतर दरात सातत्याने वाढ
करोनानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने कर कमी केल्याने दरात घसरण झाली होती. परंतु त्यानंतर पून्हा सातत्याने सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे.
चांदीच्या दरात उलट स्थिती
नागपुरात गुरूवारी सकाळी १०.३० वाजता (१७ एप्रिल २०२५ रोजी) चांदीचे दर प्रति किलो ९६ हजार ६०० रुपये, ११.३० वाजता प्रति किलो ९६ हजार ६०० रुपये तर ११.३० वाजता प्रति किलो ९६ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे गुरूवारी दोन तासात नागपुरात चांदीचे दर प्रति किलो ५०० रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे.