Friday, July 24, 2026
Home Blog Page 400

‘तू समाजासाठी धोका आहेस,’ श्वान मालकाने कुत्र्याच्या 5 पिल्लांना भिंतीवर आपटून ठार केलं, म्हणतो ‘त्यांना पाहून…’

0
‘तू समाजासाठी धोका आहेस,’ श्वान मालकाने कुत्र्याच्या 5 पिल्लांना भिंतीवर आपटून ठार केलं, म्हणतो ‘त्यांना पाहून…’


हैदराबादमधील रहिवाशी संकुलात एका व्यक्तीने श्वानाच्या पाच नवजात पिल्लांची क्रूरपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. इमारतीच्या पार्किग परिसरात त्याने आधी पिल्लांना भिंतीवर आणि नंतर जमिनीवर आपटलं. यानंतर त्याने दगडाने त्यांच्यावर हल्ला केला.  आश्चर्याची बाब म्हणजे, व्यावसायिक असणारा आशिष स्वत: एका श्वानाचा मालक आहे. श्वानासह फिरण्यासाठी बाहेर पडल्यावर त्याने भटक्या पिल्लांची हत्या केली. रहिवाशांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

अंगावर काटा आणणाऱ्या व्हिडीओत आशिष आपल्या पाळीव श्वानासह अपार्टमेंटच्या पार्किंग परिसरात चालत जाताना दिसत आहे. यानंतर तो नवजात श्वानाच्या दिशेने चालत जातो. आशिष त्यातील एका पिल्लाला उचलतो आणि खाली जमिनीवर आपटतो. यानंतर पिल्लू जिवंत आहे का हे तपासण्यासाठी तो त्याच्या अंगावर बसतो. तो एवढ्यावरच थांबत नाही. आपल्या पायाखाली तो त्या पिल्लाला चिरडतो. 

पार्किंगमध्ये पाचही पिल्लं मृतावस्थेत आढळली असून, त्यांच्या शरिरावर गंभीर जखमा आहेत. आशिषला जाब विचारण्यात आला असता त्याने आपण पिल्लांना नियंत्रित करत असल्याचा आणि आपल्या श्वानाकडे येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र त्याचा हेतू वेगळा असल्याचं स्पष्ट होत आहे. पिल्लं काय त्रास देऊ शकतात अशी विचारणा शेजाऱ्यांनी केली असता आशिषकडे काही उत्तर नव्हतं. 

यानंतर व्हिडीओत आशिष आपण पिल्लांची हत्या केल्याची कबुली देताना दिसत आहे. “मी त्यांना दगडाने मारलं आणि भिंतीवर आपटलं,” अशी कबुली तो देतो. पिल्लांनी काही त्रास दिला होता का? असं विचारल्यावर त्याने नाही उत्तर दिलं. तुझ्या मनात भटक्या श्वानांबद्दल काही राग आहे का? असं विचारलं असता तो म्हणाला, “कधीकधी ते भुंकतात आणि हल्ला करतात”. आपणही एका श्वानाचे पालक असून, आपल्याकडे श्वान आहे असंही तो सांगतो.

एका व्हिडिओमध्ये, शेजारी जाब विचारत असताना आशिष रडू लागतो. त्याची पत्नी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसते. “त्याने काय केले आहे ते त्याला विचारा; त्याने कुत्र्याच्या पिल्लांना मारलं आहे,” असं एक शेजारी सांगतो. तिला तो एका पिल्लाला मारणारा व्हिडिओ देखील दाखवतो. “तू समाजासाठी धोका आहेस,” असं एक शेजारी म्हणतो.

भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्राण्यांवरील कोणतेही क्रूर कृत्य दंडनीय गुन्हा आहे.





Source link

पतंजलीची सेंद्रिय चळवळ भारतीय शेतीचे भविष्य कसे घडवत आहे?

0
पतंजलीची सेंद्रिय चळवळ भारतीय शेतीचे भविष्य कसे घडवत आहे?


पतंजलीची सेंद्रिय शेती मोहीम भारतीय शेतकऱ्यांसाठी आशेचा एक नवीन किरण म्हणून उदयास आली आहे. रासायनिक शेतीच्या समस्यांना तोंड देणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांसाठी, पतंजलीने सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीद्वारे मातीचे आरोग्य सुधारले आहेच. मात्र शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही मजबूत केली आहे. पतंजलीने ‘नव हरित क्रांती-अ‍ॅन अ‍ॅग्रो व्हिजन’ योजनेद्वारे शेतकऱ्यांचे जीवन सुधारले आहे. यामध्ये नवीन तांत्रिक उपाययोजनांचा अवलंब करून आणि शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन शेती सुधारली जात आहे. या उपक्रमामुळे असे दिसते की आता भारतीय शेतीचे भविष्य आणखी उज्वल होईल. पतंजलीने ‘नव हरित क्रांती-अ‍ॅन अ‍ॅग्रो व्हिजन’ योजनेद्वारे शेतकऱ्यांचे जीवन सुधारले आहे. यामध्ये नवीन तांत्रिक उपाययोजनांचा अवलंब करून आणि शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन शेती सुधारली जात आहे. या उपक्रमामुळे असे दिसते की आता भारतीय शेतीचे भविष्य आणखी उज्वल होईल.

पतंजलीची कृषी मोहीम
भारतातील खेड्यांमध्ये दररोज सकाळी शेतकरी आशेने आणि अपेक्षेने आपल्या शेतात जातात. मात्र, बदलत्या काळामुळे आणि रासायनिक शेतीच्या आव्हानांमुळे त्यांचे कष्टाचे काम कठीण झाले आहे. मातीची गुणवत्ता खालावत आहे. पिके कमकुवत होत आहेत आणि शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. यामुळेच पतंजली शेतकऱ्यांसाठी आशेचा एक नवा किरण म्हणून उदयास आला आहे. बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आचार्य बालकृष्ण यांच्या देखरेखीखाली, पतंजली संशोधन संस्थेचे (PRI) सुमारे 150 शास्त्रज्ञ शेतकरी आणि शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एकत्र काम करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी, एक संपूर्ण योजना तयार करण्यात आली आहे. ज्याचे वर्णन ‘नव हरित क्रांती – अ‍ॅन अ‍ॅग्रो व्हिजन’ नावाच्या पुस्तकात करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पतंजली केवळ सेंद्रिय शेती शिकवत नाही. यासोबतच तो शेतकऱ्यांना स्वस्त दरात चांगल्या दर्जाचे बियाणे, सेंद्रिय खत आणि खते देखील पुरवत आहे. यामुळे शेतीचा दर्जा सुधारत आहे आणि शेतकरी आता शाश्वत पद्धतींद्वारे चांगले उत्पादन घेऊ शकतात.

शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे
पतंजलीच्या यशाचे एक प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण. पतंजली किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या सोप्या आणि फायदेशीर पद्धती शिकवल्या जातात. यामुळे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो. ज्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते आणि नैसर्गिक आणि निरोगी पिके तयार होतात.
याशिवाय पतंजलीने तंत्रज्ञान क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, कंपनीने जिओ-मॅपिंग, जिओ-फेन्सिंग आणि हवामान माहितीसाठी अॅप्स तयार केले आहेत. जेणेकरून मूलभूत आवश्यक माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत सहज पोहोचू शकेल. याशिवाय पतंजली शेतकऱ्यांना पाणी बचत तंत्रे आणि शाश्वत शेती पद्धतींबद्दल माहिती देखील प्रदान करते.

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे
शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी पतंजली प्रामाणिकपणे काम करण्याच्या पद्धतींना प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या सेंद्रिय शेती उत्पादनांना योग्य आणि चांगला दर मिळावा. ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल यावर ते खूप लक्ष केंद्रित करत आहेत. कारण सेंद्रिय शेतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते पण त्यातून मिळणारे फायदे कधीकधी चांगले नसतात. असे म्हणता येईल की सेंद्रिय शेतीमध्ये गुंतवलेले पैसे हे चांगल्या आणि सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक आहे.

(This article is part of IndiaDotCom Pvt Ltd’s consumer connect initiative, a paid publication programme. IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)





Source link

पतंजलीचं अ‍ॅग्रीकल्चर मॉडेल गावाच्या विकासात मदशीर? कसं ते जाणून घ्या…

0
पतंजलीचं अ‍ॅग्रीकल्चर मॉडेल गावाच्या विकासात मदशीर? कसं ते जाणून घ्या…


Patanjali Agricultural Model : पतंजलीचं अ‍ॅग्रीकल्चर मॉडेल आज भारतातल्या गावांच्या यशामागे एक महत्त्वाचा पाया बनत चालला आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वात पतंजलीनं ‘नव हरित क्रांती – एन एग्रो व्हिजन’ या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शेती सुलभ करणं हे उद्दिष्ट ठेऊन एक मोठं मॉडेल तयार केलं आहे. यामुळे शेतकरी मध्यस्थींपासून मुक्त होतात आणि त्यांना थेट फायदा मिळतो. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते.

सेंद्रिय शेती आणि पारंपरिक अनुभव यांचं संगम

पतंजलीचं कृषी मॉडेल सेंद्रिय शेतीवर भर देतं, जे आपल्या पारंपरिक शेती पद्धतींवर आधारित आहे. या मॉडेलमध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामुळे ते रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर कमी करू शकतात. पतंजलीकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय खतं, उत्तम दर्जाची बियाणं आणि कमी दरात खते मिळतात, यामुळे त्यांचा खर्च कमी होतो आणि कमाई वाढते.

या मॉडेलमध्ये आयुर्वेद आणि पारंपरिक शेतीपद्धती यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलं जातं. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांचं जीवन सुधारत नाही, तर आपल्या शेती परंपराही जपल्या जातात. पतंजलीचा हा उपक्रम भारतीय कृषी व्यवस्थेला एक नवी दिशा देतो, जिथे शाश्वत शेतीला प्रोत्साहन दिलं जातं. 

पतंजलीचे सेंद्रिय उत्पादने

पतंजलीनं अनेक सेंद्रिय उत्पादने विकसित केली आहेत, जी शेतकऱ्यांना मदत करतात. उदाहरणार्थ, ‘पतंजली बायो पोटाश प्लस’ हे एक द्रव स्वरूपातलं क्षार जैविक खत आहे, जे मातीतील क्षारची उपलब्धता वाढवतं. हे उत्पादन Fraturia aurantia नावाच्या बॅक्टेरियावर आधारित आहे, जे झाडांना पोटॅश शोषून घेण्यास मदत करतं आणि बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करतं. अशा प्रकारची उत्पादने शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील अवलंबन कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे शेतीचा खर्च कमी होतो आणि मातीचं आरोग्य चांगलं राहतं.

तांत्रिक इनोवेशन आणि शेतकरी सशक्तीकरण

पतंजलीनं शेतकऱ्यांना मदतीसाठी अनेक तांत्रिक नवप्रयोग केले आहेत. त्यांनी असे ॲप्स विकसित केले आहेत, ज्याच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतांची जिओ-मॅपिंग, जिओ-फेन्सिंग आणि हवामानाची माहिती सहज मिळवू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना पिकांची चांगली निगा राखता येते आणि बाजारसंबंधी माहिती मिळवणं सोपं होतं. पतंजलीनं शेतकरी आणि सरकार यांच्यातील अंतर कमी करण्याचंही काम केलं आहे. त्यांची ‘नव हरित क्रांती – एन एग्रो विजन’ योजना शेतकऱ्यांना माती परीक्षण, कृषी डिजिटायझेशन आणि पीएम किसानसारख्या सरकारी योजना पोहोचवण्यात मदत करते.

(This article is part of IndiaDotCom Pvt Ltd’s consumer connect initiative, a paid publication programme. IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)





Source link

खेळणा सिंचन प्रकल्पाभोवती शाकाहारी वटवाघळांची वसाहत

0
खेळणा सिंचन प्रकल्पाभोवती शाकाहारी वटवाघळांची वसाहत


छत्रपती संभाजीनगर – उडतो पण पक्षी नाही, असा सस्तन प्राण्यांमध्ये मोडणारा आणि निपा, करोना आजाराने जागतिक स्तरावर चर्चेत आलेल्या वटवाघळांतही शाकाहारी आणि सामिषहारी, असे दोन प्रकार आहेत. यातील शाकाहारी वटवाघळांची महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येने आढळणारी वसाहत ही सिल्लोड तालुक्यातील खेळणा धरणाच्या काठी आहे. अभ्यासकांच्या मते शाकाहारी वटवाघळे ही परागीकरण वाहक असून १७ एप्रिल हा जागतिक वटवाघूळ संवर्धन दिन मानला जातो.

जगात वटवाघळांच्या बाराशे प्रजाती आहेत. त्यातील ६० प्रजाती या शाकाहारी आहेत. शाकाहारी प्रजातींचे शास्त्रीय नाव टेराॅपस जिगॅन्टस तर इंडियन फ्लाइंग फाॅक्स फ्रुड हे इंग्रजी नाव. याचेच मराठी नाव फलाहारी वटवाघूळ. इंग्रजी नावात फाॅक्स हा शब्द येण्यामागचे कारण वटवाघळांचे तोंड हे कोल्ह्याप्रमाणे दिसते हे आहे. महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा भागातील शेंडी आणि सिल्लोडपासून १५ किमी अंतरावर असलेल्या खेळणाकाठी हजारोंच्या संख्येने वटवाघळे आढळतात. खेळणाकाठच्या उंबर, काशिद, सिसम, निंब, निलगिरी, सुबाभूळ अशा काही वृक्षांवर मिळून दहा हजारांच्या संख्येतील वटवाघळांची वसाहत पाहायला मिळत असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक डाॅ. संतोष पाटील यांनी दिली.

डाॅ. पाटील यांनी सांगितले की, आपण ‘इंडियन टेरोपस जिगॅंटियस की स्टोन स्पेसिस फाॅर इकोसिस्टिम ऑफ अजिंठा माऊंटन रेंज’हा शोधनिबंध जर्नल ऑफ वाइल्ड लाइफ अँड बायो डायव्हर्सिटी’ या शोधपत्रिकेला पाठवला आहे. डोंगर समृद्ध करण्यात शाकाहारी वटवाघळांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पिंपळ, वड, उंबर, नांदरकी, अंजीर आदी वृक्षे हे कुठेही कोणीही न लावता उगवण्यामागचे कारण वटवाघळे आहेत. वरील वृक्षांमधील चिकट फळे वटवाघळे खातात. त्यानंतरच्या विष्ठेतून पडलेल्या बियांमधून वृक्ष उगवलेले दिसतात. परागीकरण प्रक्रियेत वाहकांमध्ये मधमाशा, पक्ष्यांनंतर तिसरा क्रमांक वटवाघळांचा लागतो.

सिल्लोड तालुक्यातील खेळणाकाठी १० हजारांच्यावर संख्येने शाकाहारी वटवाघळे आढळतात. परिसर शांत, निर्मनुष्य आहे. हा काठ म्हणजे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या वसाहतीचे ठिकाण आहे. १७ एप्रिल हा दिवस जागतिक वटवाघळे संवर्धन दिन जागतिकस्तरावरील अभ्यासकांनी ठरवलेला आहे. खेळणाकाठ वटवाघळांमुळे अभ्यासकांना खुणावणारे ठिकाण आहे. – डाॅ. संतोष पाटील, वन्यजीव अभ्यासक, सिल्लाेड



Source link

‘राहुलसह संबंध ठेवून …’, अनिताने सांगितलं जावयासह पळून जाण्याचं खरं कारण, पोलिसांना म्हणाली ‘मला मुलीच्या…’

0
‘राहुलसह संबंध ठेवून …’, अनिताने सांगितलं जावयासह पळून जाण्याचं खरं कारण, पोलिसांना म्हणाली ‘मला मुलीच्या…’



उत्तर प्रदेशच्या अलीगड येथे जावयासह पळून गेलेल्या सासूला उत्तर प्रदेश पोलिसांनी नेपाळ सीमेवरुन अटक केली आहे. दोघेजण नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. चौकशीदरम्यान सासू सपना उर्फ अनिताने जावयासह पळून जाण्याचं कारण सांगितलं.
 



Source link

शेकापच्या बालेकिल्ल्याला भाजपने लावला सुरुंग

0
शेकापच्या बालेकिल्ल्याला भाजपने लावला सुरुंग



अलिबाग : रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र या बालेकिल्ल्याला आता भाजपने सुरूंग लावला आहे. पक्षाची तिन पिढ्या धुरा सांभाळणाऱ्या पाटील कुटूंबात उभी फूट पडली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाची वाटचाल अधिकच खडतर होण्याची चिन्ह दिसू लागली आहे.

गेल्या काही वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस असलेल्या जयंत पाटील यांच्या कुटूंबात सुप्त संघर्ष सुरू होता. जयंत पाटील यांच्या पक्षांतर्गत एकाधिकारशाही बंधू सुभाष पाटील आणि भाचा आस्वाद पाटील यांना फारशी रुचत नव्हती. पण मिनाक्षी पाटील यांनी हा वाद विकोपाला जाणार नाही याची दक्षता घेतली होती. कुटूंबात फूट पडू दिली नव्हती. मात्र मिनाक्षी पाटील यांच्या पश्चात कुटूंबात समन्वय राखेल असा दुवा निखळला. त्यामुळे कुटूंबातील सुप्त संघर्ष पंढरपूर येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशना दरम्यान पहिल्यांचा समोर आला.

चिटणीस मंडळावरील सदस्यांच्या मनमानी नियुक्त्यांना माजी आमदार सुभाष पाटील यांनी जाहीर आक्षेप घेतला. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत पक्षाकडून सुभाष पाटील यांना उमेदवारी नाकारली गेली. मला उमेदवारी देणार नसाल तर जिल्हा चिटणीस असलेल्या आस्वाद पाटील यांना उमेदवारी द्या अशी मागणी सुभाष पाटील यांनी पक्षाकडे केली. पण जयंत पाटील यांनी तिही मागणी फेटाळत, त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे दोन्ही भावंडामधील वाद विकोपाला गेले.

सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील चित्रलेखा पाटील यांच्या निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. त्यामुळे चित्रलेखा पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पाटील कुटूंबातील अस्वस्थता आणि सुप्त संघर्ष भाजपने अचूकपणे हेरला. शेकापला त्यांच्यात बालेकिल्ल्यात सुरूंग लावण्याची आयती संधी भाजपकडे चालून आली. यानंतर रायगडचे जिल्हा संघटक सतीश धारप आणि प्रदेश कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अलिबागमध्ये ऑपरेशन लोटसला सुरूवात केली. आस्वाद पाटील यांना पक्षात घेण्यासाठी पहिल्यांदा हालचाली सुरू केल्या. नंतर सुभाष पाटील यांनाही पक्षात येण्यासाठी भाग पाडण्यात आले. बुधवारी मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सुभाष पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, भावना पाटील यांच्यासमवेत सात जिल्हा परिषद सदस्य, २ जिल्हा बँकेचे संचालक, ६० आजी माजी सरपंच अशी मोठी फळी भाजपमध्ये दाखल झाली. त्यामुळे पाटील कुटूंबासह शेकापत मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले.

विवीध पक्षातील प्रस्तापित नेत्यांना पक्षात घ्यायचे आणि संघटनात्मक बांधणी करायची अशी रणनिती भाजपने रायगड जिल्ह्यात आखली होती. पनवेल प्रशांत ठाकूर यांना आणि पेण मतदारसंघात धैर्यशील पाटील आणि रविशेठ पाटील यांना पक्षात घेऊन त्यांनी दोन्ही मतदारसंघ ताब्यात घेतले होते. पेण आणि पनवेल नंतर भाजपने अलिबाग मतदारसंघा लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवातही केली होती. पण शेकापचे ग्रामीण भागात असलेले संघटन हे भाजप समोरील सर्वात मोठे आव्हान होते. सुभाष पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे हा अडसरही दूर होणार आहे.

दुसरीकडे नेते गेले तरी पक्षाला फरक पडणार नाही असा दावा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला आहे. पण पेण मध्ये धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतरही पाटील यांनी असाच दावा केला होता. मात्र त्यानंतर पेण मतदारसंघात शेकापची मोठी वाताहत झाल्याचे दिसून आले होते. सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांची पक्षसंघटनेवर घट्ट पकड होती. ग्रामिण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शेकापची बालेकिल्ल्याची आगामी वाटचाल खडतर ठरणार आहे.



Source link

22 cartridges stolen from ammunition factory over family dispute

0
22 cartridges stolen from ammunition factory over family dispute



22 cartridges stolen from ammunition factory over family dispute | ‘साडू’नेच केला ‘साडू’चा गेम, दारुगोळा कारखान्यातून २२ काडतुसांची केली चोरी



Source link

निळ्या ड्रमनंतर आता काळा साप प्रकरण! प्रियकरासोबत मिळून पत्नीने शांत डोक्याने काढला पतीचा काटा

0
निळ्या ड्रमनंतर आता काळा साप प्रकरण! प्रियकरासोबत मिळून पत्नीने शांत डोक्याने काढला पतीचा काटा


हत्या लपवण्यासाठी मृत अमित कश्यपच्या खाटेखाली सापही फेकण्यात आला होता. प्रथमदर्शनी अमितचा मृत्यू सर्पदंशाने झाला असावा, असे पोलिसांना वाटत होते, मात्र घरच्यांना सुरुवातीपासूनच ही हत्या असल्याचा संशय होता. त्यांच्या आग्रहाखातर अमित कश्यपचे शवविच्छेदन करण्यात आले आणि सत्य समोर आले.



Source link

मेरठमध्ये मुस्कान पार्ट 2! निळ्या ड्रमनंतर आता काळ्या सापाचा खेळ! प्रियकरासोबत पतीला दिला भयानक मृत्यू

0
मेरठमध्ये मुस्कान पार्ट 2! निळ्या ड्रमनंतर आता काळ्या सापाचा खेळ! प्रियकरासोबत पतीला दिला भयानक मृत्यू


Muskaan Part 2 case Meerut : उत्तर प्रदेश मेरठमधील बहुचर्चित सौरभ हत्याकांडनंतर मुस्कान पार्ट 2 घटना समोर आली आहे. यावेळी पतीची हत्या करण्यासाठी पत्नीने प्रियकरासोबत निळा ड्रम विकत घेतला नाही तर थेट सापाची खरेदी केली आहे. महिले पतीला भयानक मृत्यू देण्यासाठी सापाची कहाणीचा खेळ रचला. पतीने पोलिसांना सांगितलं की पतीचा मृत्यू 10 वेळा साप चावल्याने झाला. अखेर या मृत्यूमागील हत्येचे रहस्य पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे समोर आले. 

पतीचा मृत्यू साप चावल्याने नाही तर…

मेरठच्या बहसुमा पोलीस स्टेशन परिसरातील अकपरपूर सादत गावातील ही धक्कादायक घटना आहे. येथे राहणारा अमित हा एक मजूर होता आणि त्याच्या लग्नाला 8 वर्षे झाली होती. या लग्नातून त्यांना तीन मुलेही होती. अमितची पत्नी रविता हिची अमितच्या मित्राशी मैत्री झाली आणि ही मैत्री प्रेमात बदलली. जेव्हा अमितने या मैत्रीला विरोध केला तेव्हा दोघांमधील भांडणं व्हायला लागली. प्रियकरासोबत राहण्यासाठी रविताने तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला. 

यावेळी रविताने मुस्कानसारखा निळा ड्रम विकत घेतला नाही, ना तिने मृतदेहाचे तुकडे केलं, त्याऐवजी तिने एक हजार रुपयांना साप विकत घेतला. त्यानंतर एका दिवशी संपूर्ण कुटुंब फिरायला गावाबाहेर गेले असताना, रविताने वाटेत तिच्या प्रियकराला फोन केला आणि म्हणाली की आज रात्री काम होईल, सापाला तयार ठेव. त्याच रात्री रविताचा प्रियकर शांतपणे घरात आला आणि दोघांनी मिळून अमितचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर, मृतदेह बेडवर ठेवण्यात आला आणि त्याच्या जवळ एक साप ठेवला. त्यावरून लोकांना वाटेल की, सापाने दंश केल्यामुळे पतीचा मृत्यू झाला. 

सकाळी संपूर्ण घरात गोंधळ उडाला की अमितला साप चावला आहे. मात्र, जेव्हा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. शवविच्छेदन अहवालात असं दिसून आलं की अमितला केवळ सापाने चावले नाही तर त्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तपास सुरु केला. एसपी ग्रामीण राकेश कुमार यांच्या मते, जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा प्रत्येक कोनातून प्रश्न विचारण्यात आले. 

पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा रविताने सांगितलं की, 10 वेळा सापाने चावलं अन् तेव्हा पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलिसांनी तिच्यावर दबाव टाकल्यावर तिने सत्य उघड केले. रविताने सांगितले की तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून तिच्या पतीची हत्या केली आहे. दोघांनाही एकत्र राहायचे होते. आता पोलिसांनी रविता आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 

अकबरपूर सादत गावातील अमित कश्यप उर्फ ​​मिक्कीचा मृत्यू सापाच्या चावल्याने झाला नाही. अमितची हत्या त्याची पत्नी रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप यांनी केली. दोन्ही आरोपींनी प्रथम तिचा गळा दाबून खून केला आणि नंतर घटनेला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी तिच्या पलंगावर एक विषारी साप सोडला. शवविच्छेदन अहवालात गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्यानंतर, पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन धक्कादायक खुलासा केला.





Source link

Heat continues in Mumbai but relief from heat wave

0
Heat continues in Mumbai but relief from heat wave


लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : शहर तसेच उपनगरात पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार होतील. तसेच आर्द्रता अधिक असल्यामुळे उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवेल. मात्र, सध्या तीव्र उष्णतेची म्हणजेच ‘उष्णतेच्या लाटे’ची शक्यता नाही. त्यामुळे काही दिवस तरी माफक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. कमाल तापमान जरी कमी असले तरी वातावरणातील आर्द्रतेमुळे बैचेन होते. मुंबईतील तापमानात बुधवारी २ अंशांनी घट झाली. मात्र, दिवसभर उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. संपूर्ण दिवस उकाडा आणि मधूनच उन्हाचा चटका यामुळे पुन्हा उष्णतेची लाट येते की काय ही चिंता नागरिकांना सतावू लागली आहे. परंतु जरी या काही दिवसांत मुंबईत उष्मा वाढला, तापमानात वाढ झाली तरी उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचा अंदाज खासगी हवामान अंदाजकांनी व्यक्त केला आहे.

आर्द्रतेचा वैताग

सध्या मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तापमानात घट झाल्यानंतरही उष्मा जाणवत आहे. मुंबई, तसेच उपनगरांत पुढील तीन – चार दिवस कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान असेल. मात्र आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. यामुळे विशेषत: सकाळी व सायंकाळी अधिक घालमेल होऊ शकते.

हेही वाचा

आर्द्रता ही बाहेरील वातावरणात साधारण ३० ते ७० टक्क्याच्या दरम्यान असते. ४५ ते ५५ टक्के ही सापेक्ष आर्द्रता बहुतांश लोकांसाठी सुखद मानली जाते. मात्र, मुंबईत ही आर्द्रता सध्या ७० टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे मुंबईचे दिवसभराचे तापमान जरी कमी असले तरी आर्द्रतेमुळे असह्य उष्मा सहन करावा लागत आहे.

कमी आर्द्रता असल्यास (३० टक्के खाली)

  • त्वचा कोरडी होते.
  • श्वास घेण्यास त्रास होतो.
  • डोळे, घसा कोरडे पडतात.

अति आर्द्रता असल्यास (७० टक्के पेक्षा जास्त)

  • शरीर उष्णतेचा निसर्गरित्या निचरा करू शकत नाही.
  • बुरशी, अॅलर्जी, दमटपणा वाढतो.
  • उष्णतेचा त्रास अधिक होतो.





Source link