Sunday, September 13, 2026
Homeसाताराशिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा : वैष्णवी फाळके आणि अक्षता ढेकळे यांचा गौरव!

शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा : वैष्णवी फाळके आणि अक्षता ढेकळे यांचा गौरव!

पुणे | साहस टाइम्स प्रतिनिधी.  :- क्रीडा क्षेत्रात आपल्या उत्तुंग कामगिरीने राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल करणाऱ्या दोन कन्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

कु. वैष्णवी विठ्ठल फाळके हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला असून, तिच्या खेळातील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल शासनाने घेतली आहे. हा पुरस्कार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी बालेवाडी, पुणे येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. वैष्णवीच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्याचबरोबर हॉकी या खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. अक्षता ढेकळे हिलाही याच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दमदार कामगिरीचा गौरव म्हणून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील हॉकी खेळाडूंमध्ये हा एक सन्मान मानला जातो.

या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने राज्याच्या क्रीडाजगताला नवा गौरव प्राप्त करून दिला आहे. साहस टाइम्सतर्फे दोघींनाही मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments