


फलटण (ता. १८ एप्रिल) – ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटणमध्ये श्री चक्रपाणी प्रभू पालखी महोत्सव सध्या भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. १३ एप्रिलपासून सुरू झालेल्या या उत्सवाचा मुख्य दिवस शुक्रवार, १८ एप्रिल २०२५ रोजी साजरा करण्यात येत आहे.
या पवित्र दिवशी श्री चक्रपाणी प्रभूंच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आमदार सचिन पाटील आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या जीजामाला नाईक निंबाळकर यांनी उपस्थित राहून श्रद्धेने दर्शन घेतले.
यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये मांढरे आप्पा, बाळासाहेब नानावरे, डी. के. अण्णा पवार, अनुप शहा, राहुल शहा, अर्जुन अप्पा नाळे, बंडू शिंदे, रमेश माठपती, प्रितम बेंद्रे, निलेश खानविलकर, नितीन वाघ आणि इतर कार्यकर्ते, पदाधिकारी, भाविक यांचा समावेश होता.
श्री चक्रपाणी प्रभूंचा पालखी सोहळा हे फलटणच्या धार्मिक परंपरेचे एक अत्यंत महत्त्वाचे प्रतीक असून या सोहळ्यात दरवर्षी हजारो भाविक सहभागी होत असतात. यावर्षीही उत्सवाचे आयोजन भक्तीभाव आणि शिस्तबद्धतेने पार पडले.


लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : सिबील स्कोअर चांगला असलेल्या व्यक्तींचे बनावट पॅनकार्ड आणि अन्य खोटे दस्तऐवज तयार करून आधारकार्ड मिळविण्यात आले असून या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून ५५ क्रेडिट कार्ड घेऊन एक कोटी २६ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखेने आसाममधील अतीसंवेदनशील आणि गुन्हे पार्श्वभूमी असलेल्या पाच गावांमध्ये जाऊन ही कारवाई केली.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील आरोपींनी गेल्यावर्षी २३ फेब्रुवारी ते २० जून या काळात एका बँकेकडून ५५ क्रेडिट कार्ड मिळवली. या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून बँकेची एक कोटी २६ लाख ९८ हजार ३२७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. बँकेचे उपाध्यक्ष नयन भगदेव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने हा गुन्हा तपासासाठी वर्ग करून घेतला आणि तपासाला सुरुवात केली. आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे प्राप्त केलेल्या क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाईन खरेदीसाठी केला. तसेच काही रक्कम इतर बनावट बँक खात्यात वळती केल्याचे उघड झाले.
गुन्हे शाखेच्या कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलीस निरीक्षक शामराव पाटील, कक्ष दोनचे पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे यांनी आरोपींनी वापर केलेल्या बँक खात्यांचे स्टेटमेंट, केडिट कार्डचा वापर केलेली ठिकाणे, गुन्हा करताना वापरलेले मोबाइल यांचा तांत्रिक तपास करून आरोपींची माहिती गोळा केली. त्यानंतर तपासासाठी पोलीस पथक स्थापन करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने आसाममध्ये जाऊन स्थानिक लहरीघाट पोलिसांच्या मदतीने मोरगाव जिल्ह्यातील अमरागुरी, लालीपथ्थर, हत्याराबोरी, तातीपोरा आणि कारीमरी या पाच गावांतून पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.
मोहेबूर अब्दुल रहेमान (२८), अझरुल सादिकुल इस्लाम (२७), इलियास रफीकुल इस्लाम (२५), अबू बकर सिद्दिक रमजान अली (३७) आणि मोहिमुद्दीन अहमद अब्दुल मलिक (२६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. चौकशीत आरोपींनी इतर तीन वित्त कंपन्यांची बनावट कागदपत्रे देऊन कोट्यावधी रुपयांचे कर्ज आणि क्रेडिट सुविधा घेऊन फसवणूक केल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शाखेने सांगितले. आरोपींनी अशाप्रकारे आणखी किती कंपन्यांची फसवणूक केली आहे, तसेच आरोपीचे आणखी किती साथीदार आहेत, याबाबत गुन्हे शाखेचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.


No match is being played.
Apr 18, 2025 | Match 2
Central American Cricket Championships, 2025
PAN (19 ov) 145 | VS | TCI 96(18.2 ov) |
| Panama beat Turks and Caicos Islands by 49 runs | ||
| Full Scorecard → | ||
Apr 17, 2025 | Match 1
Central American Cricket Championships, 2025
MEX (20 ov) 174/4 | VS | CRC 50/9(11.2 ov) |
| Mexico beat Costa Rica by 124 runs | ||
| Full Scorecard → | ||
Apr 17, 2025 | Match 33
Indian Premier League, 2025
SRH (20 ov) 162/5 | VS | MI 166/6(18.1 ov) |
| Mumbai Indians beat Sunrisers Hyderabad by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||

Infosys Dividend 2025: 10 कोटी रुपये कमावयला तुम्हाला किती वर्षे लागतील? 50, 60 वर्षे? बहुतांशजणांना संपूर्ण आयुष्यातही रक्कम कमावता येत नाही. पण दीड वर्षाचा मुलगा करोडो कमवू शकतो? असं तुम्हाला कोणी सांगितलं तर? हो. असं इतर कुठे नव्हे तर आपल्या देशातच घडलंय. अवघ्या 17 महिन्यांच्या मुलाने डिव्हिडंटच्या माध्यमातून 10 कोटी रुपये कमावलेयत. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. कोण आहे हा छोटा मुलगा? त्याने इन्फोसिसशी काय कनेक्शन? सविस्तर जाणून घेऊया.
देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांना 17 महिन्यांचा नातू आहे. एकाग्र रोहन मूर्ती असे त्याचे नाव आहे. अलीकडेच इन्फोसिसने 2024-25 आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 22 रुपये अंतिम डिव्हिडंट जाहीर केलाय. यानंतर एकाग्र जगभरात चर्चेत आलाय. कारण त्याने आतापर्यंत कंपनीकडून 10.65 कोटी रुपयांचा डिव्हिडंट मिळवलाय. यासोबतच एकाग्रला आणखी 3.3 कोटी रुपये मिळणार आहेत.
इन्फोसिसने प्रति शेअर 22 रुपये अंतिम डिव्हिडंट जाहीर केला. एकाग्राकडे कंपनीचे 15 लाख शेअर्स आहेत जे एकूण भागभांडवलाच्या 0.04% आहेत. डिव्हिडंट मिळविण्याची रेकॉर्ड तारीख ३० मे निश्चित करण्यात आली आहे आणि पेमेंट 30 जून रोजी केले जाईल.
एकाग्राला या वर्षी तीन हप्त्यांमध्ये 7.35 कोटी रुपयांचा अंतरिम डिव्हिडंट मिळाला होता. आता अंतिम डिव्हिडंटसह त्याची एकूण कमाई 10.65 कोटी रुपये होईल. 1 वर्ष 5 महिन्यांच्या वयात तो भारतातील सर्वात तरुण करोडपतींपैकी एक आहे.
2024 मध्ये नारायण मूर्ती यांनी त्यांच्या नातवाला इन्फोसिसचे 15 लाख शेअर्स भेट म्हणून दिले. त्यावेळी या शेअर्सचे बाजारमूल्य 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. नोव्हेंबर 2023 मध्ये जन्मलेला एकाग्र त्यावेळी 4 महिन्यांचा होता.
कंपनी तिच्या शेअर्समधील गुंतवणुकीवर परतावा म्हणून तिच्या शेअरहोल्डर्सना देत असलेली रक्कम डिव्हिडंट म्हणून ओळखली जाते. जेव्हा एखादी कंपनी नफा कमावते तेव्हा त्याचा काही भाग भागधारकांमध्ये वाटला जातो. ज्याला डिव्हिडंट म्हणतात. उदाहरणार्थ जर तुमच्याकडे एका कंपनीचे 1000 शेअर्स असतील आणि कंपनी प्रति शेअर 10 रुपये डिव्हिडंट जाहीर करत असेल तर तुम्हाला एकूण 10 हजार रुपये डिव्हिडंट मिळेल. ही रक्कम तुमच्या डिमॅट खात्यातून थेट लिंक केलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.
कंपनीने मार्च तिमाहीत 40 हजार 925 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो मागील तिमाहीपेक्षा 2% कमी आहे. असे असले तरी निव्वळ नफा 3% वाढून 7 हजार 33 कोटी रुपये झाला. जो विश्लेषकांच्या 6 हजार 697 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. शेअर्सच्या किमतीबद्दल विश्लेषकांचे मत काय?राष्ट्रीय शेअर बाजारात इन्फोसिसचे शेअर्स 0.45% वाढून 14190.50 रुपयांवर बंद झाले. गेल्या 12 महिन्यांत त्यात फक्त 0.02% वाढ झाली आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून 24.49% ने घट झाली आहे.
नारायण मूर्ती यांनी काही काळापूर्वी भारताची उत्पादकता वाढवण्यासाठी ’70 तासांच्या कामाचा आठवडा’ सुचवला होता. त्यांचे हे विधान खूपच वादग्रस्त ठरले. असे असले तरी नारायण मूर्तींसाठी काम आणि कमिटमेंटचे महत्व खूप आहे. आता ते हा वारसा त्यांच्या नातवालाही देत आहेत.

Patanjali Farming Initiatives: पंतजलीने भारताच्या कृषी क्षेत्रात मोठे बदल घडवून आणत आहेत. कंपनी सेंद्रिय शेती आणि अशा पद्धतीना प्रोत्साहन देत आहे. जे मातीचे आरोग्य सुधारू शकतात आणि शेतकऱ्यांना सक्षम करु शकतात. पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करुन पतंजली केवळ पिकांची गुणवत्ता सुधारत नाही तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे याची खात्रीदेखील करत आहे. अखेर पतंजली शेती उपक्रम शाश्वत शेतीसाठी गेमचेंजर कसे ठरत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पतंजलीचे उद्दिष्ट्य हे सेंद्रिय शेती आहे. याचच अर्थ केमिकलमुक्त पद्धती वापरून शेती करणे. यामुळं जमीन सुपिक होते. पतंजली किसान समृद्धी कार्यक्रमसारख्या प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे योग्य प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरुन ते त्यांच्या शेती पद्धती सुधारू शकतील आणि पिक उत्पादन वाढवू शकतील. जेव्हा मातीची गुणवत्ता सुधारेल तेव्हा पिकेदेखील निरोगी असतील आणि शेती दीर्घकाळ टिकेल.
पतंजलीचा शेतीकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन भारतातील शाश्वत शेतीसाठी मोठा बदल घडवून आणत आहे. कंपनी पाणी वाचवण्यास आणि मातीचे चांगले जतन करण्यास मदत करणारे तंत्रज्ञान आणण्यासाठी संशोधन आणि नवीन कल्पनांवर लक्ष केंद्रित करत आहे. ही विचारसरणी केवळ पीक उत्पादन वाढविण्यास मदत करत नाही तर शाश्वत शेती शेतकऱ्यांसाठी एक चांगला आणि उत्पन्न देणारा स्रोत देखील बनवते. यामुळे शेतकरी त्यांचे घर, कुटुंब आणि गाव चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात.
पतंजलीच्या सेंद्रिय शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचा मातीचे आरोग्य आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यात महत्त्वाची भूमिका आहे. शेणखत आणि कंपोस्ट सेंद्रिय पदार्थ वाढवून जमिनीची सुपीकता सुधारते, तर गोमूत्र आणि कडुलिंबाचे द्रावण नैसर्गिक कीटकनाशके म्हणून काम करतात आणि जमिनीत उपयुक्त जीवाणूंना प्रोत्साहन देतात.
पतंजली ऑरगॅनिक प्रोम हे एक विशेष उत्पादन आहे, ज्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन 12:1 च्या प्रमाणात असते. ते केवळ मातीची रचना सुधारत नाही तर वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वे देखील प्रदान करते. याशिवाय, पतंजली सेंद्रिय खत हे औषधी वनस्पती, फुले, भाज्या आणि गाईच्या शेणाच्या अवशेषांपासून बनवले जाते, ज्यामध्ये ट्रायकोडर्मा, स्यूडोमोनास आणि एस्परगिलस सारख्या फायदेशीर जीवाणूंचा समावेश असतो. हे खत जमिनीची भौतिक आणि रासायनिक रचना सुधारण्यास मदत करते आणि ती नापीक होण्यापासून रोखते.
