Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रमहाबोधी मुक्ती आंदोलनासाठी अक्कलकोट वंचित आघाडीची बैठक पार पडली; स्वाक्षरी मोहिमेला मिळणार...

महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी अक्कलकोट वंचित आघाडीची बैठक पार पडली; स्वाक्षरी मोहिमेला मिळणार गती

सोलापूर : अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळवून देण्यासाठी नियोजन बैठक आज पार पडली. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे आणि जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली.

बैठकीत मोहिमेच्या नियोजनासोबतच तालुका कार्यकारिणी निवडीसंदर्भात चर्चा झाली. गावागावात आणि खेडोपाडी ही स्वाक्षरी मोहीम प्रभावीपणे राबवली जाईल, असे बैठकीत ठरवण्यात आले.

या बैठकीला युवक तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, संदीप बाळशंकर, यशवंत इंगळे, नागेश हरवाळकर, नरसिंह गायकवाड, बबन गायकवाड, श्याम बनसोडे, संदीप गजदाने, माणिक गायकवाड, गंगाराम गायकवाड, तालुका उपाध्यक्ष संतोष बाळशंकर, अमृत बाळशंकर, ईश्वर गायकवाड, संतोष घाटगे, शिवाजी चौगुले तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता रविराज पोटे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या काळात महाबोधी महाविहारच्या स्वातंत्र्यासाठी स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असून, तालुका आणि शहर पातळीवरील नेतृत्व एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे बैठकीत ठामपणे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments