Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशभारतातील सर्वात कमी वयाचा करोडपती? अवघ्या 17 महिन्यांच्या मुलाने कमावले 100000000 रुपये;...

भारतातील सर्वात कमी वयाचा करोडपती? अवघ्या 17 महिन्यांच्या मुलाने कमावले 100000000 रुपये; जगभरात चर्चा!

भारतातील सर्वात कमी वयाचा करोडपती? अवघ्या 17 महिन्यांच्या मुलाने कमावले 100000000 रुपये; जगभरात चर्चा!

[ad_1]

Infosys Dividend 2025: 10 कोटी रुपये कमावयला तुम्हाला किती वर्षे लागतील? 50, 60 वर्षे? बहुतांशजणांना संपूर्ण आयुष्यातही रक्कम कमावता येत नाही. पण दीड वर्षाचा मुलगा करोडो कमवू  शकतो? असं तुम्हाला कोणी सांगितलं तर? हो. असं इतर कुठे नव्हे तर आपल्या देशातच घडलंय. अवघ्या 17 महिन्यांच्या मुलाने डिव्हिडंटच्या माध्यमातून 10 कोटी रुपये कमावलेयत. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. कोण आहे हा छोटा मुलगा? त्याने इन्फोसिसशी काय कनेक्शन? सविस्तर जाणून घेऊया. 

देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांना 17 महिन्यांचा नातू आहे. एकाग्र रोहन मूर्ती असे त्याचे नाव आहे. अलीकडेच इन्फोसिसने 2024-25 आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 22 रुपये अंतिम डिव्हिडंट जाहीर केलाय. यानंतर एकाग्र जगभरात चर्चेत आलाय. कारण त्याने आतापर्यंत कंपनीकडून 10.65 कोटी रुपयांचा डिव्हिडंट मिळवलाय.  यासोबतच एकाग्रला आणखी 3.3 कोटी रुपये मिळणार आहेत.

डिव्हिडंट कधी मिळेल आणि एकाग्राचे किती शेअर्स?

इन्फोसिसने प्रति शेअर 22 रुपये अंतिम डिव्हिडंट जाहीर केला. एकाग्राकडे कंपनीचे 15 लाख शेअर्स आहेत जे एकूण भागभांडवलाच्या 0.04% आहेत. डिव्हिडंट मिळविण्याची रेकॉर्ड तारीख ३० मे निश्चित करण्यात आली आहे आणि पेमेंट 30 जून रोजी केले जाईल.

आतापर्यंत लाभांशातून किती उत्पन्न मिळाले आहे?

एकाग्राला या वर्षी तीन हप्त्यांमध्ये 7.35 कोटी रुपयांचा अंतरिम डिव्हिडंट मिळाला होता. आता अंतिम डिव्हिडंटसह त्याची एकूण कमाई 10.65 कोटी रुपये होईल. 1 वर्ष 5 महिन्यांच्या वयात तो भारतातील सर्वात तरुण करोडपतींपैकी एक आहे.

तुम्हाला मिळणाऱ्या शेअर्सची किंमत किती?

2024 मध्ये नारायण मूर्ती यांनी त्यांच्या नातवाला इन्फोसिसचे 15 लाख शेअर्स भेट म्हणून दिले. त्यावेळी या शेअर्सचे बाजारमूल्य 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. नोव्हेंबर 2023 मध्ये जन्मलेला एकाग्र त्यावेळी 4 महिन्यांचा होता.

डिव्हिडंट म्हणजे काय?

कंपनी तिच्या शेअर्समधील गुंतवणुकीवर परतावा म्हणून तिच्या शेअरहोल्डर्सना देत असलेली रक्कम डिव्हिडंट म्हणून ओळखली जाते. जेव्हा एखादी कंपनी नफा कमावते तेव्हा त्याचा काही भाग भागधारकांमध्ये वाटला जातो. ज्याला डिव्हिडंट म्हणतात. उदाहरणार्थ जर तुमच्याकडे एका कंपनीचे 1000 शेअर्स असतील आणि कंपनी प्रति शेअर 10 रुपये डिव्हिडंट जाहीर करत असेल तर तुम्हाला एकूण 10 हजार रुपये डिव्हिडंट मिळेल. ही रक्कम तुमच्या डिमॅट खात्यातून थेट लिंक केलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

इन्फोसिसचे तिमाही निकाल

कंपनीने मार्च तिमाहीत 40 हजार 925 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो मागील तिमाहीपेक्षा 2% कमी आहे. असे असले तरी निव्वळ नफा 3% वाढून 7 हजार 33 कोटी रुपये झाला. जो विश्लेषकांच्या 6 हजार 697 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. शेअर्सच्या किमतीबद्दल विश्लेषकांचे मत काय?राष्ट्रीय शेअर बाजारात इन्फोसिसचे शेअर्स 0.45% वाढून 14190.50 रुपयांवर बंद झाले.  गेल्या 12 महिन्यांत त्यात फक्त 0.02% वाढ झाली आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून 24.49% ने घट झाली आहे.

70 तास कामाचा आठवड्याच्या विधानावरुन वाद

नारायण मूर्ती यांनी काही काळापूर्वी भारताची उत्पादकता वाढवण्यासाठी ’70 तासांच्या कामाचा आठवडा’ सुचवला होता. त्यांचे हे विधान खूपच वादग्रस्त ठरले. असे असले तरी नारायण मूर्तींसाठी काम आणि कमिटमेंटचे महत्व खूप आहे. आता ते हा वारसा त्यांच्या नातवालाही देत ​​आहेत.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments