Friday, July 24, 2026
Home Blog Page 394

chanakya neeti these four virtues of a person makes him successful and wealthy

0
chanakya neeti these four virtues of a person makes him successful and wealthy


Chanakya Niti for Success in Life: महान अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्राची रचना केली आहे, ज्यामध्ये त्यांनी संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे सखोल वर्णन केले आहे. चाणक्यजींनी नेहमीच आपल्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या आयुष्यातील संकटांना पार करण्यासाठी नीतीशास्त्रात काही महत्त्वाचे विचार सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांच्या या विचारांचं पालन केल्यास मनुष्य जीवनात येणाऱ्या संकाटांना न डगमडता त्यांना धैर्याने सामोरं जाऊन एक चांगलं आयुष्य जगू शकतो.  असे मानले जाते की जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतो, त्याच्या जीवनात खूप प्रगती, नाव आणि कीर्ती मिळते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात काही विशेष गुण सांगितले आहेत जे माणसाला श्रेष्ठ बनवतात आणि त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातात. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या…

दृढ हेतू माणसाला यश मिळवून देतात

तुम्ही पाहिले असेल की कठीण काळात लोकं नेहमी नाराज होतात आणि ध्येयापासून दूर जातात आणि हे दृढ हेतू नसल्यामुळे घडते. चाणक्य यांच्या नुसार प्रबळ हेतू असलेले लोकंच अडचणी आणि संकटांवर मात करतात आणि यश मिळवतात.

हेही वाचा

दान करणारा नेहमी श्रीमंत असतो

आचार्य चाणक्याजी यांच्यानुसार, दान करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते. ते म्हणतात की मंदिरात दान केल्याने माणसाला समृद्धी आणि आनंद मिळतो. गरीब आणि असहाय्य माणसांना मदत करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात नाव आणि कीर्ती मिळते.

कठीण परिस्थितीत धीर धरणे आवश्यक आहे

आचार्य चाणक्य यांच्या मते, संयम हा सर्वात मौल्यवान मनुष्य आहे, जो त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. प्रतिकूल परिस्थितीतही संयम बाळगला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. असे नाही की थोडेसे अपयश आले आणि ध्येय सोडले आणि मग ते काम न करण्याचा निर्णय घेतला.

नम्र व्यक्ती

आचार्य चाणक्य जी म्हणतात की माणसाची नम्रता त्याला महान बनवते. पण माणसाचा स्वभाव नम्र नसेल तर यशस्वी होऊनही तो यशाच्या शिखरावर फार काळ टिकत नाही. म्हणून स्वभावाने नेहमी नम्र असले पाहिजे. कारण असे केल्याने शत्रूही तुमच्यासमोर नतमस्तक होऊ शकतो, म्हणूनच असे म्हणतात की नम्रता हा माणसाचा सर्वात मोठा रत्न आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)



Source link

बुलढाण्यात टक्कल व्हायरसनंतर आता लोकांची गळू लागली नखं, रहस्यमय आजाराने लोकांमध्ये दहशत

0
बुलढाण्यात टक्कल व्हायरसनंतर आता लोकांची गळू लागली नखं, रहस्यमय आजाराने लोकांमध्ये दहशत


बुलढाणा जिल्ह्यात केस गळती होऊन लोकांच्या डोक्यावर टक्कल पडले होते. तेथे आता नवीन आजाराने डोके वर काढले आहे. केस गळतीनंतर चक्क लोकांच्या बोटांची नखे गळायला लागली आहे. बोंडगावसह चार गावात तब्बल २९ जणांचे नख गळतीचे प्रकरण समोर आले आहेत.



Source link

गर्भवती महिलेसह पतीला अमानुष मारहाण… घराच्या वादातून आशा वर्करनेच….

0
गर्भवती महिलेसह पतीला अमानुष मारहाण… घराच्या वादातून आशा वर्करनेच….



Pregnant woman and husband brutally beaten up Incident in Chikhaldara taluka of Melghat गर्भवती महिलेसह पतीला अमानुष मारहाण… घराच्या वादातून आशा वर्करनेच….



Source link

Pune navi mumbai mumbai travel to be smooth from may work on southern side of thane creek bridge 3 project completed || पुणे, नवी मुंबई

0
Pune navi mumbai mumbai travel to be smooth from may work on southern side of thane creek bridge 3 project completed || पुणे, नवी मुंबई



Pune navi mumbai mumbai travel to be smooth from may work on southern side of thane creek bridge 3 project completed || पुणे, नवी मुंबई – मुंबई प्रवास मेपासून सुसाट, ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील बाजूचे काम पूर्ण



Source link

Success Story Of IAS Akanksha Anand cracked upsc with YouTube classes without coaching

0
Success Story Of IAS Akanksha Anand cracked upsc with YouTube classes without coaching



Success Story Of IAS Akanksha Anand cracked upsc with YouTube classes without coaching | युट्यूबवर शिकून झाली IAS! कोचिंगशिवाय केली UPSC परीक्षा उत्तीर्ण, वाचा आकांक्षाने कसा केला अभ्यास…



Source link

चमत्कार..! ज्या तरुणावर झाले होते अंत्यसंस्कार, तोच दीड महिन्यानंतर सुखरुप घरी परतला; गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का

0
चमत्कार..! ज्या तरुणावर झाले होते अंत्यसंस्कार, तोच दीड महिन्यानंतर सुखरुप घरी परतला; गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का


दरभंगामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेव्हा एका मुलावर त्याच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले. आता दीड महिन्यानंतर तो जिवंत परतला आहे. भाऊ आणि वकिलासह तो न्यायालयात पोहोचला आणि आपण जिवंत असल्याचा पुरावा दिला.



Source link

पुष्पक विमान कोणाचं होतं; इंद्र देव की रावण? 99 टक्के लोकांना माहित नाही योग्य उत्तर

0
पुष्पक विमान कोणाचं होतं; इंद्र देव की रावण? 99 टक्के लोकांना माहित नाही योग्य उत्तर


Who was the real owner of Pushpak Viman : पुष्पक विमानाचं नाव सगळ्यांनी नक्कीच ऐकलं असेल. ज्या लोकांना पुष्पक विमानाबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी सांगायचं झालं, तर रामायणामध्ये याचा उल्लेख आहे. त्रेतायुगात जेव्हा रावणानं माता सीतेचं अपहरण केलं, तेव्हा तो त्यांना पुष्पक विमानातून लंकेला घेऊन गेला होता. आज जसं आपण विमानात बसून एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो, तसंच ते विमान होतं. आकाशात उडणारं, वेगानं जाणारं. रावाणाचा वध केल्यानंतर श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे पुष्कप विमानात बसून अयोध्येला जातात. पण मग आता प्रश्न असा आहे की पुष्पक विमान होतं तरी कुणाचं? पुष्पक विमान रावणाचं होतं की देवांचे देव इंद्र यांचं?

तर याचं उत्तर थोडं वेगळं आहे. पुष्पक विमान रावणाचं किंवा इंद्र देवाचं नव्हतं. पौराणिक ग्रंथ रावण संहितानुसार, ब्रह्मदेवानं हे विमान त्यांच्या भक्त वैश्रवण  यांना दिलं होतं. तर पुष्पक विमानाचं तेज हे सुर्यासारखं होतं. हे ज्या कोणाला मिळणार तो देवांच्या समान होणार असं म्हटलं जातं होतं. पुष्पक विमान ना रावणाचं होतं ना देवांचा राजा इंद्र देवाचं.

कोण होता वैश्रवण?

वैश्रवण म्हणजेच रावणाचा सावत्र भाऊ कुबेर. त्यांनी ब्रह्मदेवांची खूप तपश्चर्या केली होती, त्यामुळे ब्रह्मदेवांनी त्यांना दोन वर दिले. एक म्हणजे त्यांना चौथा लोकपाल बनवलं आणि दुसरं म्हणजे पुष्पक विमान दिलं. हे विमान विश्वकर्मा यांनी बनवलं होतं.विश्वकर्मा म्हणजे देवतांचे मुख्य शिल्पकार. त्यांनी हे विमान खास ब्रह्मदेवांसाठी तयार केलं होतं, पण त्यांनी ते कुबेराला दिलं.

विश्रवा हे कुबेर आणि रावण यांचे वडील होते. कबुरचा जन्म हा विश्रवा यांच्या पहिल्या पत्नीपासून जन्माला आले होते आणि रावण त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा अर्थात कैकेसीचा मुलगा. यामुळे कुबेर आणि रावण हे सौतेले भाऊ होते.

रावण जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने कुबेराकडून लंका आणि पुष्पक विमान दोन्ही जोरजबरदस्तीने हिसकावून घेतलं. तर एकंदरीत काय पुष्पक विमान आधी कुबेराचं होतं आणि नंतर रावणानं ते हिसकावून घेतलं. 

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)





Source link

CET परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून बळजबरीनं जानवं आणि मनगटावरील रक्षासूत्र काढले; शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल!

0
CET परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून बळजबरीनं जानवं आणि मनगटावरील रक्षासूत्र काढले; शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल!


Karnataka CET Exam Controversy: सीईटी परीक्षेवेळी सर्व राज्यांमध्ये अनेक कठोर नियमांचे पालन केले जाते. यामुळे काही राज्यांमध्ये सीईटी परीक्षेदरम्यान वादाला तोंड फुटल्याच्या घटना समोर येत असतात.  कर्नाटकातील शिवमोगा येथे सीईटी म्हणजेच कॉमन एन्ट्रन्स टेस्ट दरम्यान वाद निर्माण झाला. परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना जानवं आणि मनगटावरील धार्मिक धागा काढण्यास सांगण्यात आले. हेच वादाचे मूळ बनले. 

शिवमोग्गा येथील आदि चुंचुंगिरी पीयू कॉलेज कॅम्पसमध्ये ही घटना घडली. सीईटी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने परीक्षा केंद्रावर येते होते. सर्व परीक्षार्थींची कसून तपासणी सुरु होती. दरम्यान 3 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर थांबवण्यात आले. त्यांच्या अंगावरील जानवं आणि हातावर बांधलेला संरक्षक धागा (कलावा) काढण्यास सांगण्यात आलं.

सीईटी परीक्षेत काय झाले?

गेटवर उपस्थित असलेले सुरक्षा रक्षकांनी परीक्षार्थींची कसून तपासणी करत होते. यावेळी त्यांनी 2 विद्यार्थ्यांना हटकले. कारण त्यांनी जानवं आणि मनगटात धार्मिक धागा बांधला होता. धार्मिक धागा परीक्षेच्या आड येत नव्हता, त्यामुळे आम्हाला परीक्षेला जाऊ द्या, असे विद्यार्थी सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण सुरक्षारक्षक ते ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. जानवं आणि कलावा काढा तरच प्रवेश मिळेल यावर सुरक्षारक्षक ठाम होते. यातील तिसरा विद्यार्थी धागा न काढण्यावर ठाम होता. त्यामुळे विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांतील वाद वाढत गेला आणि हळुहळू तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले. 

ही घटना 16 एप्रिल रोजी घडली. ज्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याला सुमारे 15 मिनिटे गेटवर थांबवण्यात आले. अखेर रक्षकांनी त्याच्या हातातील संरक्षक धागा काढला आणि यानंतरच परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली. ही माहिती हळूहळू संपूर्ण परिसरात पसरली आणि प्रकरणाला वेगळेच वळण लागले. अखिल कर्नाटक ब्राह्मण सभेने या घटनेचा निषेध केल. त्यांनी तात्काळ जिल्हा दंडाधिकाऱ्यांची (डीएम) भेट घेतली आणि कठोर कारवाईची मागणी केली. आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून दोषींवर त्वरित कारवाई करावी, असा आरोप त्यांनी केला.

पीडितेच्या पालकांनी काय म्हटले?

पीडित विद्यार्थ्याच्या काकांनी माध्यमांना याबद्दल माहिती दिली. ‘माझा पुतण्या आदि चुंचुंगिरी पीयू कॉलेजमध्ये सीईटीसाठी गेला होता. तिथे गार्डने त्याला टी-शर्टच्या आत घातलेलं जानवं आणि मनगटावर बांधलेला  संरक्षक धागा काढण्यास सांगितल्याचे’, ते म्हणाले. धाग्यासह परीक्षा केंद्रात प्रवेश देणार नसाल तर मी परीक्षा देणार नाही, अशी भूमिका पुतण्याने घेतली. यानंतर त्याला 15 मिनिटे बाहेर बसवण्यात आले. नंतर त्याला धाग्यासह परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आल्याची मााहिती त्याच्या काकांनी दिली. यानंतर जानवं घालून त्याला परीक्षेसाठी सोडण्यात आलं. पण त्याच्या हातावरील धागा काढून कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. माझ्या पुतण्याआधी दोन मुलांसोबतही अशाच प्रकारे धागा काढून फेकण्याचा प्रकार घडला होता.

कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री काय म्हणाले?

कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री एम.सी. सुधाकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ‘असे घडायला नको होते. जर हे घडले असेल आणि दावा केल्याप्रमाणे असेल तर ते निषेधार्ह आहे. मी कार्यकारी संचालकांकडून अहवाल मागितला असल्याचे’, ते म्हणाले. परीक्षांसाठी काही निश्चित प्रोटोकॉल आहेत. जे प्रत्येक संस्था पाळते. पण त्यात जानवं किंवा मनगटातील धागा काढून टाकण्याचा कोणताही उल्लेख नाही. जर तपासात हे खरे ठरले तर विभाग दोषी लोकांवर कारवाई करेल, असेह ते म्हणाले.





Source link

Over 10,000 children are malnourished in the remote tribal area of Melghat in Amravati district

0
Over 10,000 children are malnourished in the remote tribal area of Melghat in Amravati district


नागपूर : बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी प्रत्येक वर्षी केंद्र व राज्य सरकार कोट्यवधींचा खर्च करते. परंतु, त्यानंतरही अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या अतिदुर्गम आदिवासी भागातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये १० हजारावर बालके कुपोषित असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

जिल्हा परिषद अमरावती येथील आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये धारणी तालुक्यात एकूण २० हजार ३८० बालकांपैकी (शून्य ते पाच वर्षे वयोगट) १४ हजार १२६ सर्वसाधारण वजन व उंचीची होती. ४ हजार ९६४ बालके कमी वजनाची तर १ हजार २९० बालके तीव्र कमी वजनाची अशी एकूण ६ हजार २५४ बालके कुपोषित होती.

चिखलदरा तालुक्यातील १३ हजार ९६४ बालकांपैकी ९ हजार ८६० बालके सर्वसाधारण वजन व उंचीची तर ३ हजार ३१६ बालके कमी वजनाची, ७८८ बालके तीव्र कमी वजनाची अशी एकूण ४ हजार १०४ बालके कुपोषित होती. दरम्यान, कुपोषणावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून धारणी येथील उपजिल्हा रुग्णालय,

चिखलदरातील चूर्णितील ग्रामीण रुग्णालय, ११ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ प्राथमिक आरोग्य पथके, ७ फिरत्या आरोग्य पथकांसह इतरही यंत्रणांमार्फत उपचार व उपाय केले जात असल्याचे जिल्हा परिषद अमरावतीकडून स्पष्ट करण्यात आले.

या विषयावर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे जन माहिती अधिकारी राजेश रोंगे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संबंधित विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही आकडेवारी दिल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती.

सात महिन्यात ४९ उपजत मृत्यू

मेळघाटमध्ये २०२१-२२ मध्ये ११३ उपजत मृत्यू (गर्भातच बाळाचा मृत्यू), २०२२-२३ मध्ये ७९ मृत्यू, २०२३-२४ मध्ये ७२ मृत्यू, तर एप्रिल-२०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान सात महिन्यात ४९ उपजत मृत्यू झाल्याचेही माहिती अधिकारातून पुढे आले.

या भागात २०२१-२२ मध्ये ५ मातामृत्यू, २०२२-२३ मध्ये ३ मृत्यू, २०२३-२४ मध्ये ५ मृत्यू तर एप्रिल-२०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान येथे १ मातामृत्यू झाले.



Source link

Action taken against hawkers and encroachments on footpaths in Titwala and Balyani

0
Action taken against hawkers and encroachments on footpaths in Titwala and Balyani



Action taken against hawkers and encroachments on footpaths in Titwala and Balyani | टिटवाळा, बल्याणीतील पदपथांवरील फेरीवाले, अतिक्रमणांवर कारवाई



Source link